गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

सत्कार एक इंजिनिअर कामगार नेत्यांचा !.

सत्कार एक इंजिनिअर कामगार नेत्यांचा !.
शिक्षणात आरक्षणाची सवलत घेऊन उच्चशिक्षित झालेले लोक नोकरीत सुद्धा आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ घेतात. पण आरक्षणाच्या कोणत्याही रस्तावरील आंदोलनात भाग घेत नाही.शासकीय नोकरी मिळाली की आपले घर व कुटुंबात रममाण होतात.स्वतःच्या जन्मभूमीत तालुक्यात जिल्ह्यात कोणत्याही संस्था संघटना मध्ये उच्चशिक्षित म्हणून सहभागी होत नाहीत. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात होणाऱ्या संघर्षमय लढ्यात भाग घेत नाही.असे उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे लोक तेव्हा ही होते.त्याचा अनुभव स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला होता म्हणूनच ते खेदाने म्हणत होते की "मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया". त्याला काही लोक अपवाद आणि लक्षवेधी असतात.
आयु नरेंद्र जारोंडे इलेक्ट्रिकल इंजिनिअर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये उपअभियंता होते. शासकीय नोकरी करून कुुुटुंबात रममाण होण्यापेक्षा समाजावर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य सनदशीर मार्गाने संघर्ष करून आपण समाजाला काही देणे लागतो,ही वृत्ती जोपासणारा नेता म्हणजेच नरेंद्र जारोंडे 
आहेत.आजकाल असे नेते मिळणे दुर्मिळ झाले असतांना 
आपल्या सेवेत कसूर न करता कामगार,कर्मचारी हितासाठी लढणारा मागासवर्गीय कामगारांची चळवळ मजबूत पणे उभी करण्यासाठी तोंडात साखर,डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावणारे नेते म्हणजे नरेंद्र जारोंडे हे मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांना प्रेरणा देणारे नेतृत्व 
जे महानिर्मिती मधून ३१ जुलै २०१८ ला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर या पदावरुन निवृत्त झाले आहेत .त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा कार्यक्रम संघटनेने ५ ऑगष्टला संघटनेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र प्रेरणा नगर,हजारी पहाड,नागपूर येथे आयोजित केला होता.त्यात 13 राज्यातील कामगार,कर्मचारी व पदाधिकारी यांनी मोठया उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सत्कार साजरा केला.
एक इंजिनियरचा तो भव्य सत्कार नव्हता.तर फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या चळवळीत विद्यार्थी दशेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता असलेल्या नेत्यांचा तो सत्कार होता.विद्यार्थी दशेपासून ते निवृत्त होण्या पर्यंत त्यांनी जो संघर्ष केला.त्यात त्यांच्या पत्नीचे,मुलांचे योगदान खुप मोठे आहे.
नरेंद्र जारोंडे हे निवळ कामगार नेते नाहीत तर ते क्रांतिकारी आंबेडकरवादी विचारांचे प्रभावी लेखकही आहेत.त्यांच्या लेखनीची झलक त्यांनी दर वर्षी ऊर्जा श्रमिकच्या डायरीचे प्रकाशन करून त्या डायरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट देवून कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले.तसेच मागासवर्गीय विद्यार्थी व कर्मचारी संबंधी डायरीमध्ये शासनाचे नियम देवून कर्मचारी यांच्या ज्ञानात भरच पाडली आहे. त्यांनी देशव्यापी स्वतंत्र विद्युत एम्लाईज फेडरेशन मध्ये व देशव्यापी स्वतंत्र मजदूर युनियनच्या कार्यकारिणीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच दर दोन वर्षांनी होणाऱ्या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनामध्ये ऊर्जा श्रमिक मुखपत्र स्मरणिका प्रकाशित करून त्या स्मरणिकेमध्ये आंबेडकरवादी विचारवंताचे लेख प्रकाशित करुन आंबेडकरवादाला पुढे नेण्याचे काम केले.संघटनेचे मुखपत्र ऊर्जा श्रमिक हे मागील २५ वर्षापासून मान.नरेंद्र जारोंडे यांच्या संपादनाखाली चालू आहे.हे मुखपत्र नसते तर २२ पतसंस्था, कल्याण निधी, प्रशिक्षण संस्था, क्रांती ऊर्जा सार्वजनिक वाचनालय उभे झाले नसते.मा.नरेंद्र जारोंडे यांच्यामुळेच संघटनेने इंजिनियर रमेश रंगारी यांची १) आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता २) बहुजन कामगार चळवळीची आवश्यकता व स्वतंत्र  मजदूर युनियन ३) बहुजन राष्ट्र ही तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत.
स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान.जे.एस.पाटील यांच्या कडून प्रेरणा घेऊनच त्यांनी आपले कार्यक्षेत्र वाढवुन ठेवले आहे. नाही तर एका इंजिनियरचे कार्यक्षेत्र डिपार्टमेंट, डिव्हिजन आणि कॅबिन असते. त्यात ते बायको मूल प्लॉट बांगला व गाडी यांच्यातच निवृत्त होतात.आपण पाहत असाल काही लक्षवेधी उच्चशिक्षित अधिकारी निवृत्तीनंतर समाज,संस्था आणि संघटना मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.त्यात आंबेडकर भवन होत्याचे नव्हते होते.परंतु जे एस पाटिल,रमेश रंगारी,नरेंद्र जारोंडे,संजय घोडके,सुदाम हनवते,जीवन गायकवाड, ज्ञानेश्वर खैरे,राजु गायकवाड सारखे अनेक इंजिनियर आणि अधिकारी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय ट्रेंड युनियन जिवंत ठेऊन मान्यताप्राप्त करून घेण्यासाठी देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघटित करीत आहेत.त्यात नरेंद्र जारोंडे किर्याशील असतांनाच निवृत्त झाल्यामुळे स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) चे काम अश्वगतीने वाढणार आहे. शासकीय नोकरी करीता असतांना ते जेवढा वेळ कुटुंबाला देत नव्हते तेवढा वेळ संघटनेला देत होते.आता यापुढे नोकरी साठी जाणारा वेळ संघटना वाढी साठी ते देतील यात शंकाच नाही.कारण ते एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले नेते आहेत. म्हणूनच नरेंद्र जारोंडे यांचे भावी आयुष्य निरोगी राहून त्यांच्या हातुन ऐतिहासिक मागासवर्गीय कामगार,कर्मचारी संघटनेचे कार्य देशव्यापी व्हावे हीच अपेक्षा व त्यांना सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन च्या वतीने हार्दिक शुभेच्छा !.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई 9920403859,

संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही नाहीत काय?.

संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही नाहीत काय?.
भारतीय स्वातंत्र्य दिनाला एकाहतर (71) वर्ष पूर्ण करून बाहहतर (72) वर्षात पदार्पण करीत असतांना भारतीय संविधान जाळणारे देशद्रोही डोके वर काढत आहेत.त्याला सरकार,न्यायालय आणि मीडिया यांचे विनाअट समर्थन आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.तीन टक्के असलेला समाज ज्या संविधानामुळे सुरक्षित होता.त्या समाजाची दुसरी तिसरी पिल्लावर भारतीय संविधान जाळण्याची हिंमत करते.आणि त्यांचे छुपे समर्थन करणारी विविध समाजातील राजकीय वेश्या व्यवसाय करणारी (कार्यकर्ते नेते) मंडळी मूक होऊन बसते म्हणजेच भारताचं संविधान जाळणारे जर देशद्रोही आहेत,मग त्यांचे मूक समर्थन करणारी ही पिल्लावर देशद्रोहीच समजली पाहिजे. भारत माता की जय ,वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना देशद्रोही ठरविणारे देशप्रेमी संविधान जाळणाऱ्यांना देशद्रोही का म्हणत नाही?.संविधाना मुळे सर्व जातीधर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने नांदणारे सर्वधर्मसमभाव मानणारे समाज बांधव, ही घटना घडल्या नंतर कोण कोणत्या समाजातून निषेध नोंदविला जात आहे.प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती प्रभावी पणे या संविधान जाळणाऱ्यां लोकांची दखल घेत आहे.हाच का लोकशाहीचा चौथा खांब हीच का शोध पत्रकारिता ?. बाबासाहेब आंबेडकरानां यांना मानणारा विशिष्ट समाज रस्त्यावर उतरून निषेधार्थ आंदोलन करीत आहे.काही लोक निषेधाचे पत्रक कडून शांत बसले.सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावर एका ओळीचाही विरोध न दर्शवणारे खरच देशप्रेमी आहेत काय?.हेच का गर्वसे कहो हम गांडू है म्हणणाऱ्यांचे देशप्रेम?. 
इतिहास सांगतो की हा देश हजारों वर्ष परकियांचा गुलाम का राहिला? कारण त्यांच्यासाठी धर्म महत्वाचा आहे, देश नाही.ज्या देशातील नागरीकांची राष्ट्रध्वजा,
राष्ट्रगीताबद्दल जशी आस्था आहे.तशीच देशातल्या नागरिकांना देशाच्या संविधाना बद्दल आस्था का नाही?.. संविधानाने मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या कर्मठांचं धार्मिक वर्चस्व मोडीत काढलं आणि तथाकथित चारही वर्णांना एका पातळीवर आणलं, म्हणून त्यांच्या पोटात कायमस्वरूपी दुखतंय.त्यामुळे दर सहा महिन्यांनी, वर्षांनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर येते आणि देशभरात असंतोष निर्माण करून जाते.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र अभ्यासातुन, कष्टातुन संविधान घडविले आहे.त्यामुळे त्यांचे नाव संविधानाशी जोडलेलं आहे.हे कोणीच नाकारू शकत नाही.धर्मसत्ता, शिक्षणसत्ता, प्रशासकीय सत्ता,आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्ता यावर कायमस्वरूपी वर्चस्व या तीन टक्क्या वाल्या विशिष्ट समाजाचे आहे.जगात विज्ञानाने किती ही प्रगती केली असली तरी भारतातील एम बी बी एस डॉक्टर, पी एच डी प्राध्यापक,एम टेक,बी टेक इंजिनियर,बॉरिस्टर झालेला वकील, एम बी ए झालेला एम डी,सी ओ आणि  उच्च शिक्षित कोणत्याही अधिकारी तीन टक्क्या वाल्यांच्या हातुन पूजा,अर्चा,होम केल्याशिवाय आणि गंडा,धागा- दोरा बांधल्या शिवाय जागु शकत नाही एवढे त्यांचे भारतीय जनतेच्या मेंदूवर नियंत्रण असतांना ही ते समाधानी नाहीत. उठता बसता त्यांना संविधान आणि आंबेडकर यांना मानणारा समाज का डोळ्यात सळतो,का त्यांच्या मनात 
त्याचा आकस आहे.अगदी तो आम्ही जातपात मानत नाही असे म्हणणाऱ्यांच्या वागणुकीतूनही कळतनकळत डोकावतो. स्त्रियांना,मागासवर्गीय,अल्पसंख्यांकांनाही स्वाभिमानाने जगण्याचा हक्क संविधान देतं, त्याचा मनुवादी कर्मठांना राग आहे.हे ते बहात्तर वर्ष झाले लपवू शकले नाही.
भारताचं संविधान नागरिकांच्या श्रध्दा आणि उपासना यांचं सर्वांना समान स्वातंत्र्य देते, पण दगडांच्या मूर्तीला स्टेथोस्कोप लावून तपासणाऱ्यांना ते नाकारते, कारण हे संविधान विज्ञानवादाचा पुरस्कार करणारे आहे. अंधश्रद्धा च्या आत श्रद्धा ठेवून शोषण,अन्याय अत्याचाराला चाप लावते आणि नेमकं तेच शोषण मनुवादी मनुस्मृतीचे थोतांड करणाऱ्या कर्मठांच्या पोटापाण्याची तरतूद करते.हे त्यांना माहिती असल्याने मनुवादी कर्मठ संविधान नाकारतात. 
जात, धर्म, रंग, वर्ण, लिंग कशाच्याही आधारे नागरिकांत भेदभाव करता येणार नाही, हे संविधानाचं तत्व सांगते.तर मनुस्मृती ते भेदभाव पाळण्याचे कडक नियम सांगून कारवाई करण्यासाठी भाग पाडते. संविधान अशा प्रकारच्या भेदभावास बळकटी देणाऱ्या पारंपारिक पौराणिक धार्मिक मानसिकतेला ठोकरून लावते. याकरीता इथल्या मनुवादी कर्मठांना संविधान नकोय.म्हणूनच ते वेळ काळ पाहुन आपले नियंत्रण किती लोकांवर समाजावर आहे हे चेक करण्यासाठी संविधान आणि आंबेडकर यांच्या विरोधात गरड ओकून तपासुन पाहतात.
स्वर्ग आणि नरक, भुताप्रेतांची, आत्माबित्म्याची, अवतारांची, कर्मकांडांची, पुजा, विधी, होमहवन यांचं स्तोम माजवून लोकांना सतत भयाखाली ठेवून त्यांची लुबाडणूक करून वर्षानुवर्ष ऐतखाऊपणावर जगण्याची सवय झालेल्यांना आणि केवळ जातीच्या आधारावर गुणवत्तेचा टेंभा मिरवणाऱ्यांना संविधानाने इतरां सारखंच कामधंदा मेहनत करून पोट भरायला मजबूर केले.हे मुख्य गोष्ट आहे . त्यामुळे त्या तीन टक्के वाल्यां लोकांना संविधान मोडीत काढून पुन्हा ऐतखाऊ मनुवादी शोषणव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. खरं कारण वर्चस्व प्रस्थापित करण्याचं आहे.संविधान त्यासाठी जाळलं जाते. हा विषय कोण्या आंबेडकरवाद्यांचा नाही, कोण्या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष लोकांचा नाही. हा प्रश्न देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे.विषय कोणताही असो, तुम्हाला समर्थनार्थ किंवा विरोधात मत मांडण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचाही अधिकार आहे, पण संविधान जाळण्याच्या कृतीचं कदापि समर्थन होऊ शकत नाही.तरी 9 ऑगस्ट पासुन आज पर्यत सरकार, न्यायालय आणि मीडिया या घटनेवर ठोस भूमिका घेऊन बोलत नाही.म्हणजेच यांचे त्यांना उघड समर्थन आहे.म्हणून संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही नाहीत काय?.
भारतातील तमाम नागरिकांनी आपली जात, धर्म, भाषा, प्रांत, सामाजिक, राजकीय पक्ष, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून संविधान जाळण्याचं देशद्रोही कृत्य करणाऱ्यांचा केवळ निषेध करून न थांबता प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात यावी.कडक कारवाई होत नाही तो पर्यंत पाठपुरावा करा. आपण भारतीय नागरिक आहोत.संविधानामुळे भारत जाती धर्मा पेक्षा मोठा आहे.तो अखंड राहावा यासाठी संविधान राहिले पाहिजे. आम्ही देशद्रोही नाही. हे आपल्या आचरणातून सिद्ध करा.नाही तर आपण संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही आहोत हे सिद्ध होते.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई 9920403859,