शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

 बिनभांडवली "राज" कारण?.


 शिक्षण घेण्यासाठी पहिला डोनेशन भरावे लागते त्याशिवाय प्रवेश मिळत नाही,म्हणूनच कष्टकरी कामगार मजूर म्हणतात शिक्षण घेणे किती महाग झाले,एखादा माणूस बिमार पडला तर त्यांला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी प्रथम डिपाजित भरावे लागते तेव्हाच डॉक्टर हात लाऊन इलाज करतात.त्यावेळी अनेक प्रकारच्या टेस्ट सांगितल्या जातात त्या केल्या शिवाय तडजोड नाही.तेव्हा प्रत्येक माणूस हॉस्पिटल खर्च किती महाग झाला ही खंत व्यक्त करतो. रोजगार मिळत नाही.कष्टाची बारा बारा तास काम करून ही किमान वेतन मिळत नाही. त्याविरोधात बोलण्याची कोणतीही सोय नाही.आवाज उचलला तर कामावरून काढल्या जाते.मालकांचे किंवा ठेकेदारांचे अनेक पक्षाशी आर्थिक हितसंबंध असतात.पक्षाचे कार्यकर्ते नेते अशा भानगडीत लक्ष देत नाही.मग महागाई विरोधात कोण लढणार ?. भ्रष्टाचारा विरोधात कोण लढणार व किती लढणार हे आता राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे कामकाज पाहिल्यावर भारतीय नागरिकांना समजले असेल.आजचे सत्ताधारी राजकीय पक्षनेते कालचे विरोधीपक्ष नेते होते त्यांनी बेरोजगारी,भ्रष्टाचार, महागाई विरोधात देशभरात किती रान पेटविले होते याची आठवण करा आणि शांत बसा.
राजकीय सत्ता स्पर्धेत उतरायचे असेल तर बिनभांडवली "राज" कारण करता आले पाहिजे. विचारधारा नसली तरी चालेल पण उपद्रव मूल्य दाखविण्याची हिंमत पाहिजे.त्यासाठी बिनडोक तरुण मुलाची फौज पाहिजे, त्यांना प्रथम तोडफोड करून हिरो बनवायचे मग त्यांच्या नावाखाली तडजोड करून हप्ते सुरू म्हणजेच बिनभांडवली "राज" कारण?. यशस्वी होतांना दिसत आहे, सत्ता,नाही की विरोधी पक्ष नाही तरी राज्यात बिनभांडवली "राज" कारणाची दहशतवादी पक्ष संघटना म्हणून मान्यत आहे.मराठी माणसांना न्याय हक्क देण्यासाठी उत्तर भारतीय टॅक्सी वाल्यांना मारहाण केली,मात्र एकाही सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मालकाच्या कानाखाली मारली नाही.एकाही बिल्डरच्या कामावर जाऊन कामगार कोण आहेत त्याची चौकशी केली नाही.गुजर मारवाडी व्यापाऱ्यांनी दुकानांवर दक्षिण भारतीय हॉटेल मालकांनी मराठीत पाटी लावली नाही म्हणून,पेट्रोल पंप वर,टोलनाक्यावर तोडफोड झाली.त्यामुळे मराठी माणसांना विशेष तरुणांना न्याय हक्क अधिकार रोजगार मिळाला असेलच. 
मराठी हृद्य सम्राटा साठी एक तरूण तडपदार अत्यंत हुशार सर्वांचा लाडका मुलगा एकदा गाड्या फोडताना पोलिसांनी पकडला.तुरूंगात पोलिसांनी रक्ताचा एक ही थेंब बाहेर येणार नाही याची दक्षता घेऊन चांगला चोप दिला आणि रीतसर केस बनवली. त्यामुळे कोर्टाची केसवारी दरमहा सुरू झाली.   आईवडिलांनी वाटेल ते काम करून मुलांना इंग्रजी मेडियम मध्ये शिक्षण दिले.नोकरी शोधात असतांना पोरगा  मराठी हृद्य सम्राटाचा मनसे सैनिक झाला.आणि करिअर गेलं,वर्ष वाया गेलं,जामीन नाही,जवळ पैसे नाहीत, आईबाप खंगले,तो तर आयुष्यातूनच उठला.असे एक नाही हजारो मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक म्हणून भरडल्या गेले,त्यांची कुठे ही मोजमाफ नाही.कारण त्याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले होते.  आणि तो पेटून उठला होता प्रचंड उर्जा घेऊन भडकला होता. त्यांचे आयुष्य जरी बरबाद झाले असले, तरी पण त्याच्यामुळे बिनभांडवली "राज" कारण करणाऱ्या नेत्याची मोठी प्रगती झाली.हे सर्व समाजाचे नागरिक विसरले आहेत.
बिनभांडवली "राज" कारण करण्यासाठी विशेष गुणवंता लागते.
तरुणांना नकारत्मक विचारांची नशा दिली कि तो नशेतच पेटून उठतो.ज्या प्रमाणे दारू विक्रेत्या दारूची नशा गुणदोषांचे मूल्य मापन न करता विकतात.तरुण परिणामाची परवा न करता पितात.त्याच प्रमाणे बिनभांडवली "राज" कारण करणारे नेते नकारत्मक विचारांची नशा मुलांना देत राहतात.दारूची नशा चार,आठ तासांनी उतरते.पण द्वेषाची नशा चढतच राहते.मग एक दिवस दारू विकणारा बंगला बांधतो.त्याच पद्धतीने बिनभांडवली "राज" कारण करणारा नेता कोहिनुर बांधून,किंवा सेंटर हॉटेल खरीदी करून काही दिवसात तिची विक्री करतो आणि किती करोड उत्पन्न मिळवतो. नंतर मान्यताप्राप्त 
राजकीय नेता होतो.  
मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक मात्र दारू पिणाऱ्या भिकाऱ्या पेक्षा भिकारी होतो.तर छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कोणीही देव- देवता यांची नावे सर्रास घेऊन 
मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाच्या  तरुणांना त्यांच्या नावाने भडकावले जाते.मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक कधीच विचार करत नाही.ज्याने भडकावले त्याचा मुलगा असतो?. स्टडीरूममधे.आणि जे भडकले ते मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जातात कस्टडी रूममध्ये.ज्यांनी भडकवले त्यांचा मुलगा अभ्यास करतोय आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतात.
बिनभांडवली "राज" कारणी नेत्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो.   आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते देशी प्यायला जातात.भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड इंग्लिश बोलतो
आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक बघून घेतो, तंगडंच काढतो,नादाला लागू नको, वावर गेला तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतो.कुठे गेली लाज,लोक लज्जा, कुठे गेला आत्मसन्मान.
छत्रपती शिवाजी महाराजांचे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता.पण स्वाभिमान मात्र गहाण टाकलाय.दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून मोठं व्हावं.दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा स्वतःचं रोपटं लावावे त्याची काळजी घेतली तर त्याचंही मोठं झाड होईल.त्याला गोड फळे येतील.तेंज तुम्हाला खायाला मिळणार नसले तरी तुमचे नातू मात्र हक्काने खातील.हे मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाच्या तरुण मनसे सैनिकांना कधी कळणार म्हणूनच त्यांनी हे बिनभांडवली "राज" कारण समजून घावे.
आम्ही २१व्या शतकात स्मार्ट फोन,एंटर नेट,वाय फ्राय कॉम्प्युटर चा वापर करून ही उपास,नवस,पायीपद यात्रेला महत्व देऊन वाद घालणे,भांडण करणे, मारामारी करत असू तर हीच गोष्ट मनाला खटकनारी आहे.
या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या आई वडिलांचे ऐका.नोकरी,व्यवसाय,धंदा,शिक्षण,घर,संसार इकडे लक्ष द्या.....
मनसे,राष्ट्रवादी,कॉँग्रेस,भा ज पा ,शिवसेना पक्षात गेलेल्या मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाच्या तरुणांनो ते राजकीय पक्ष म्हंणून सत्तेसाठी कधी युती आघाडी करू शकतात.आपले काय?.
पंजाबी गुजराती मारवाड्यांची मुले राजकीय पक्षा पासून लांब राहून CA,CMS,BMS, BBA,MBA ची ज्या मेहनतीने तयारी करतात.त्या पद्धतीने मराठी मुल तयारी करीत नाही.ती काय करतात?.दक्षीण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात.त्यांच्यापेक्षा अधीक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले ...ऊत्तर भारतातील मुले UPSC, railway ची तयारी करतात.
शिर्डी पदयात्रा,दहीहंडी,गणपती,नवरात्रीची सर्वशक्ती लावून तयारी करतात,वेळ अन वय निघून गेल्यावर आई बाबावर खापर फोडतात. ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हे सर्व देवाची यात्रा,पूजा केली त्यांना मात्र कोणताच दोष देत नाही करतात.ज्या वयात चांगले अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेण्याची जी वेळ असते.तेव्हा आमचा तरुण कुठल्यातरी मंडळाचा अध्यक्ष,पक्षाचा तालुकाध्यक्ष,युवाध्यक्ष,शाखाध्यक्ष किंवा कार्यकर्ता असतो आणी नंतर बेरोजगार.तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.म्हणूनच जगा फक्त तुमच्या आई-बापासाठी,समाजाच्या हितासाठी चळवळीत काम केल्यास कायम लक्षात राहाल.आणि समाज तुमच्या मागे कधी कुठेही उभा राहील.सुखा दुखात सहभागी होणाऱ्या मित्रांसाठी कायम जागरूक रहा प्रेम जिव्हाळा हा मतलबा पुरता नसावा.कायम मैत्रीभावना वाढणारा असावा.दोन समाजात कायम तेढ निर्माण करून स्वतचे अस्तित्व टिकविणारा बिनभांडवली "राज" कारण करणारा नेता ओळख आणि सावध व्हा.शिक्षण,आरोग्य आणि रोजगारात होणारा खासगी मालकांचा भ्रष्टाचार यांना का कधीच दिसत नाही.त्या विरोधात त्यांच्या कानाखाली मारण्याची आरोळी का दिल्या जात नाही. कारण त्यांच्या भरोशावरच तर बिनभांडवली "राज" कारण चालते.हे तरुणांनी विसरू नये.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
 वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी शिक्षणात बदल?
भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल जाणवत आहेत. अभ्यासक्रमात बदल होत असल्यामुळे आजची शिक्षण प्रणाली विज्ञानाच्या कक्षा मोडून चमत्काराच्या कक्षा वाढवत आहे.म्हणूनच आजच विद्यार्थी वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी तयार आहेत असे लिहाले किंवा म्हटले तर चूक ठरणार नाही.
भारतात देवा देवीकांच्या जन्म मृत्यूच्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातात.त्याचं बरोबर त्यांनी अफाट चमत्कार करून कसे देवाला प्रसन्न केले हे आवर्जून सांगितल्या जाते. गणेशोत्सवात दररोज होणारी आरती व नवरात्रीच्या देवीच्या आरती बहुसंख्य मुलामुलींना तोंडपाठ असतात. पण त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाही. रामानंद सागर यांनी रामायण, महाभारत टीव्हीवर आणल्या पासुन तर विद्यार्थी शिक्षकांनाच उलट सुलट प्रश्न विचारतात. त्यात इंग्रजी माध्यमाच्या स्कुल मध्ये थोडे विज्ञान थोडे सांस्कृतिक म्हणून जनरल नॉलेज म्हणून रामायण महाभारतातील पात्रराची वेशभूषा व ठराविक डॉयलाग बोलण्याची स्पर्धा घेतली जाते.कळत न कळत वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी मुलांवर विद्यार्थी दसे पासुन संस्कार केले जातात.
    सोशल मीडियावर अनेक विद्यार्थ्यांना आपले कला, कौशल्य आणि धाडस दाखविण्याची संधी मिळत आहे.  वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी मुलांवर विद्यार्थी दसे पासून सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा प्रश्न विचारू नये ही शिकवण दिली जाते.परंतु आजच्या तरुणांकडे स्मार्टफोन इंटरनेट असल्यामुळे सर्वच विद्यार्थी सर्वच ऐकून घेतलीच असे नाही.काही विद्यार्थी उलट सुलट प्रश्न विचारण्याची हिंमत करतात.ती ठरावीक जातीचेच असतात.त्यामुळे विचारल्या प्रश्नावर चर्चा होत नाही.तर प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जातीची हिंमत कशी झाली असे विचारण्याची?. यावरच समाजातील देशातील वातावरण तापविल्या जाते.असा घटना देशात घडविल्या जात आहेत.
    एक हुशार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात रामायण की कहाणी ही पोस्ट खुप फिरते आहे. आजचा विद्यार्थी हा स्मार्टफोन, कॉम्प्युटर, गुगल, यूट्यूब वर पाहिजे ते शोधणारा आहे.त्यामुळे शिक्षकांनी सांगितले तर चुपचाप ऐकून घेणारा नाही.त्याला जे पटल नाही तर प्रश्न विचारण्याचे धाडस करतोच.तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात झालेला प्रश्न उत्तर कसा घडतो वाचा.शिक्षक मुलांनो श्री रामचंद्रजी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी सर मला काही सांगायचे आहे.शिक्षक > बोल पप्पू ,पप्पू > रामचंद्र जी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय चुकीचा होता.शिक्षक तो कसा काय?.पप्पू > सर रामचंद्र जी कडे हनुमान होते.ते उड्डाण भरून लंकेत जाऊ शकत होते. मग पुल बांधण्याची गरज नव्हती.शिक्षक हनुमान उड्डाण घेऊ शकत होते बाकी वानर उडू शकत नव्हते. शिक्षक > फक्त हनुमान उडू शकत होते.बाकी वानर उडू शकत नव्हते.पप्पू > गुरुजी ते हनुमानाच्या पाठीवर बसुन जाऊ शकले असते.जर हनुमान पुरा पहाड हातावर उचलून आणू शकतात तर ?.शिक्षक > देवाच्या चमत्कार लिला वर प्रश्न विचारत नसतात नालायका. पप्पू >गुरुजी त्यांच्या कडे आणखी एक उपाय होता.गुरुजी > रागाने लाल होऊन काय?. पप्पू > गुरुजी हनुमान आपला आकार पाहिजे तेवढा लहान व मोठा करीत होते.जसा मगराच्या तोंडातुन लहान होऊन बाहेर निघाले होते व सूर्याला गिळण्यासाठी मोठे झाले होते.तसेच ते आपला आकार समुद्राच्या लांबी व खोली एवढा बनवुन घेऊ शकले असते. त्यांच्या पाठीवरून बाकी वानर व रामचंद्रजी लंकेत जाऊ शकले असते. गुरुजी आणखी एक गोष्ट विचारू?. शिक्षक >विचार. पप्पू >गुरुजी ऐकले आहे की समुद्रावर पुल बनवितांना वानर सेनेने दगडावर राम नांव लिहले होते?. त्यामुळे सर्व दगड पाण्यावर तरंगत होते म्हणे?. गुरुजी > हा ते सत्य आहे.पप्पू >गुरुजी मग वानर सेनेला वाचणे लिहणे कोणी शिकविले होते?. गुरुजी> हरामखोर,नालायक देवाच्या गोष्टीवर अविश्वास दाखवितो?. बंद कर तुझी बकवास व मुर्गा बनुन वर्गाच्या बाहेर उभा रहा.पप्पू > ठीक है गुरुजी, वर्षानुवर्षे आम्ही वर्गाच्याच काय गांवच्या बाहेर उभे आहोत. वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी 
आम्ही हजारो वर्षे त्याग,बलिदान दिले आहे.त्याला आम्ही कधीच अन्याय,अत्याचार म्हटले नाही. त्याला तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूर्वाश्रमीचे पाप मान्य केले आहे. कधी विचारले काय?.पाप म्हणजे काय?.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.विज्ञानाच्या चौकटीत ते घेतले तर तो श्रद्धा व अंधश्रद्धा,आणि ज्ञान व अज्ञान यातील फरक समजु शकतो. मग त्याला नेहमी प्रश्न पडतात.
गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाही.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही.पण मंदिर बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात.त्यात त्यांची चढावळ लागते.धर्मानुसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो. तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?.सुशिक्षित पदवीधर सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्तर मागत आहेत. मागासवर्गीय समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली, देव दर्शन, उपवास पकडून नवस फेडला म्हणून नाही.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला रोखण्यासाठी मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज देशभरात ब्राम्हणी प्रिंट,चॅनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहे.धर्मा नुसार सर्व हिंदू आहेत.मग मंदिराच्या उत्पन्ना वर सर्वच समान अधिकार का नाही?. राज्य व केंद्रातील सरकार यावर ठोस निर्णय का घेऊ शकत नाही?. शाळा,कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल,आज पर्यत धर्माने सांगितले ते मुलामुलींनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातुन कसा बाहेर आला यांचे शाळा कॉलेज मध्ये उत्तर मिळत नाही.पुढे असे सांगितल्या जाते रावण महापंडित होता!. मग आज पर्यत एकही पंडितांच्या मुलाचे नांव रावण का नाही?. शाळा कॉलेज मध्ये मुलामुलींना गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यात नियमितपणे आरती म्हटली जाते.बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे.मग कोणत्या शाळा कॉलेज, व हिंदूंच्या मंदिरात बुद्ध मूर्ती का नाही लावल्या जात नाही?.कोणत्याही भटा ब्राम्हणाने स्वतःचा मुलाचे किंवा इतर हिंदू धर्मातील लोकांच्या मुलाचे नांव गौतम ,सिद्धार्थ,तथागत का ठेवले नाही. वाल्मिकी ऋषी सर्वात श्रेष्ठ होते त्यांनी रामायण/महाभारत लिहले.मग कोणीच हिंदू धर्मातील आपल्या मुलांचे नांव वाल्मिकी का ठेवत नाही.असे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसत्ता हाती पाहिजे.राजसत्ता राजाच्या हाती असते. किंवा लोकशाहीच्या मार्गाने सत्ता मिळविता येते. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी समतावादी व्यवस्था पाहिजे.ती होऊ नये म्हणूनच आता शिक्षण वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी दिले जाते.
    ब्राम्हण किती ही उच्च शिक्षित असु द्या.तो कोणत्याही मोठया पदावर विराजमान झाला तरी आपली ब्राम्हणवादी,  असमानतावादी भूमिका जबाबदारी कधीच विसरत नाही. आपण हिंदू म्हटले की सर्व जाती पाती विसरून त्यांच्या आदेशाचे पालन करतो. पण शाळा, कॉलेज आणि मंदिर, व धर्म आणि अधिकार यातील फरक आपल्याला कळत नाही.मग स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्क, गुगल यूट्यूब यासाठी 3G,4G पाहिजे हे कसे कळते ?. हा अज्ञान व विज्ञान यातील फरक आहे.म्हणूनच सर्व भारतीय नागरिकांनी गांभीर्याने विचार करून मुुलांना
शिक्षण द्यावे. जर शिक्षणच विषमतावादी वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी दिल्या जात असेल तर ?. आपण काय केले पाहिजे?.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,