शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

मुस्लिम समाजाचे भारताशी वैचारिक नाते.

मुस्लिम समाजाचे भारताशी वैचारिक नाते.
एन आर सी आणि सी ए ए मूळे सर्वात जास्त मुस्लिम समाजाला टार्गेट केले जाते.पण हे सांगितल्या जात नाही की या बिलाची कायद्याच्या चौकटीत अंमलबजावणी सुरू झाली तर सर्वात जास्त मागासवर्गीय जाती,जमाती, भटक्या, विमुक्तया, आदिवासी आणि अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम समाजातील लोक एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक म्हणून नांव नोंदणी केली जाणार नाही. कारण मूळ कागदपत्रे सादर करण्यात हे सर्व घटक अपयशी ठरले जातील.परंतु हे घुसखोर नाहीत तर हजारो वर्षांपासून या देशाच्या मातीशी आणि विचारांशी घट्ट नातं जोडलेल लोक आहेत.
आसाम मध्ये नागरिकता कायद्याची अंमलबजावणी सुरू  केली. त्यात आसाम मध्ये राहणारे अडीच लाख आदिवासी आपले पुरावे देवू न शकल्यामुळे आज सरकारी बंदी म्हणून जेल मध्ये आहेत. कारण ते 1947 च्या आधीचे व 1971 पर्यंतचे पुरावे देवू न शकल्याने त्यांना भारतीय नाहीत म्हणून सांगितले गेले. आपल्या कडे जर नागरिकता कायदा आला तर आपण कुठून कागद देणार?. लोक आपल्याला सांगतात की आधारकार्ड ,मतदान कार्ड व रेशनकार्ड ,जातीचे दाखले हे पुरावे आहेत. पण मतदान कार्ड 1995 ला आले, आधारकार्ड 2008 आले व रेशनकार्ड हे रहिवासी पुरावा मानला जात नाही ह्या NRC व CAA मधे सर्वांचे 1971 च्या आधीचे आजोबा किंवा वडिलांचा जन्म दाखला किंवा जमीनीचा सात बारा हेच पुरावा मानला जाईल. हे मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक समाजाकडे तर अजिबात नाही. म्हणून आपणास ह्या कायद्याला केवळ मुस्लिम समाजातील लोक  विरोध करतात असे भाषविल्या जाते.
अनेक राज्यातील आदिवासीचा सुप्रीम कोर्टात असलेला वन हक्क कायद्या बाबत ही सूनवाई सारखी टाळली जात आहे. केंद्र सरकार संविधानाच्या चौकटीत काम करतांना दिसत नाही.तर मनुस्मृती ची अंमलबजावणी करतांना दिसत आहे.
आर्य भटा ब्राह्मणांनी या देशातील मातीशी व विचारांशी वेळोवेळी बेईमानी करून सौदेबाजी केली आहे. राज्यकर्त्यांना बायका,पोरी देऊन कट कारस्थाने करून प्रत्येक वेळी दगाबाजी केल्याचा इतिहास आहे.
भारतातील थोर मुस्लिम पराक्रमी योद्धे महापुरुषांना साथ देणारे नेहमी प्रकाश झोतापासून अलिप्त राहुन देशसेवा करणारे मुस्लिम इतिहासाच्या पांनापानांवर दिसणारे आहेत.
सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध लढा देणारे हजरत.टीपू सुलतान व बंगालचे नवाब सिराजुदौला मुस्लिम समाजातील होते. 1857 च्या उठावामध्ये दिल्ली पर्यन्त फासावर लटकवलेले 58000 मौलवी व त्यांचे असंख्य अनुयायी मुस्लिम समाजातील होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यानी अफजल खानाचा कोथला काढला ती ख़ास वाघनखे बनवून देणारे रुस्तुमे जमाल हनेनान मुस्लिम होता.अफजल खानाचा कोथला काढला हे 
नेहमी सांगितले जाते, पण शिवाजी महाराजांच्या मानेवर तलवार चालविणारा भास्कर कुलकर्णी सांगितल्या जात नाही.वैचारिक निष्ठा आणि पैशासाठी नोकरी करणारे यातील फरक कळला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते ते केवळ पैसा साठी चाकरी करीत नव्हते.त्यात स्वराज्य निष्ठा आणि वैचारिक बांधीलकी होती.शिवाजी महाराजांचे एकमेव वकील काझी हैदर मुस्लिम होता.
हात्मा फुलेंना पुन्हा शाळेत टाकायला सांगणारे मुन्शी गफ्फार शेख, महात्मा फुलेना घर व शाळेसाठी जागा देणारे उस्मान शेख ,राष्ट्रमाता सावित्रीआई ला शिक्षणात मदत करणारी सहशिक्षीका फातिमा शेख कोण?. उस्मान शेखची बहीण,
डॉ.बाबासाहेब आंबेडकराना जगप्रसिद्ध चवदार तळे आंदोलनाला आपली जागा देणारे फतेह खान महात्मा गांधीच्या प्रभावाने दिड लाख पठाणांसहित अहिंसक सेना ऊभारणारे खान अब्दुल गफार खान
शहीद भगतसिंगला त्याच्या गुप्त ठिकाणावर भोजन पाठवणारे नसीम चंगेजी.बाबासाहेबांना घटनासमिती वर जाता यावे म्हणून तेव्हाच्या प. बंगालच्या आता बांग्लादेश, च्या मुस्लिमांनी बाबासाहेबांना निवडून आणले म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले.हा इतिहास मागासवर्गीय, आदिवासी अल्पसंख्याक समाज विसरला असेल पण ब्राह्मण समाज विसरायला तयार नाही.म्हणूनच तो प्रत्येक वेळी वेगवेगळे कट कारस्थाने करून सर्व मागासवर्गीय, आदिवासीयांना हिंदू म्हणून एकत्र करतो आणि मुस्लिम समाजा विरोधात दंगली घडविण्याचे नियोजन करतो.
हा खरा इतिहास सर्वाना मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाजातील जागरूक नागरिकांनी ,कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वाचला पाहिजे. आप आपल्या समाजात प्रबोधन शिबीर घेऊन जनजागृती केली पाहिजे.
भारतीय मुस्लिम बांधवानी कोणत्याही राजकीय पक्षात जातांना आर्थिक स्वार्थ, व्यक्तिगत पदाची लालसा दूर ठेवून देशहितासाठी समाजहितासाठी वैचारिक दृष्टीने जागरूक राहिले पाहिजे. ब्राह्मणांच्या पोरी बायका मिळतात म्हणून समाजद्रोही होऊ नये. किती ब्राह्मणांच्या पोरी,एस सी,एसटी व मुस्लिमांच्या घरात आहेत हे सांगण्यासाठी हा लेख नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभा मध्ये कोणी निवडून पाठविले.ते बंगालचे 48% मुस्लीम समजाचे लोक होते.तोच प्रदेश आज बांगलादेशात का गेला?. इतिहास वाचा मुस्लीम देशाच्या मातीशी प्रामाणिक आहेत. एक दोन माठेफेरू चुकीचे वागतात म्हणूनच सर्व समाज नालायक बदमाश ठरविला जात आहे. तोच कायदा राष्ट्रपिता महात्मा गांधीला गोळ्या मारणाऱ्या नथुराम गोडसेला का लावला जात नाही?.सकाळी उठल्यावर राम नाम सत्य है का म्हटल्या जात नाही?.
देशाचे दुश्मन मुसलमान नाहीत तर राज्यकर्ते आहेत. ज्यांच्या मतदानाने हे निवडून आले तेच मतदार त्याचे मतदार यादीतील नांव आणि निवडणूक ओळख पत्र भारताचे नागरिक होण्यास पात्र नाही ?. मग प्रथम सर्व मतदार याद्यातील नांवे रद्ध करा जे एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक आहेत त्यांच्या कडून लोकसभेच्या प्रतिनिधीची निवड करा. भारतात असे भासविले जाते कि मुसलमान देशाचे दुश्मन आहेत.असे असते तर अकबर बादशहा चा सेनापति मानसिंह एक हिन्दू नसता. आणि महाराणा प्रताप सिंग यांचा सेनापति हकीम खां एक मुसलमान नसता.
जेव्हा जेव्हा यांचे कट कारस्थान उघड होते तेव्हा तेव्हा यांना धोका निर्माण होतो.त्यावेळीच हे सांगतात देश खतरा मै है. देश खातरयत कधीच नसतो असे तर यांनी सत्ता आणि कुर्सी त्यासाठीच देशात सर्वात संवेदशील समाज म्हणून हिंदू म्हणजे ८५ टक्के मागासवर्गीय ,आदिवाशी आणि मुस्लीम समाजात भावनिकदृष्ट्या दंगली लावल्या जातात 
मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक यांना सरकार मुलभूत अधिकार देण्यास असमर्थ ठरते तेव्हाच सर्व देशाच्या नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असे मनुस्मृती प्रणित कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न होत आहे.त्यासाठी हिंदू असो या मुस्लीम यांनी देशाच्या मातीशी वैचारिकता दाखवून शांत राहून भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय मागितला पाहिजे.भारताचे जागृत नागरिक म्हणून आपण जागे राहिलो नाही तर भयंकर परिणाम सर्व देशवासीयांना भोगावे लागतील.
आजचे आर एस एस प्रणित मोदी सरकार हिंदू मुस्लीम समाजा समोर जेवणाची पंचपक्वान असलेली थाळी ठेवून आहे. पण तुमचे हात व तोंड बांधून ठेवत आहे.ज्यांना तुम्ही मतदार म्हणून निवडून दिले तेच तुम्हाला भारताचे नागरिक असण्याचे सिद्ध करण्यास सांगत आहेत. हिंदू मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना वाटते एन आर सी फक्त मुस्लीम समाजासाठी आणि अल्पसंख्याक मुस्लीम समाज हि हेच लक्षात घेऊन जास्त आक्रमक होऊन जन आंदोलने करीत आहे. साहजिकच इतर समाज मुस्लिमांच्या या एकजूटीचा हेवा करीत आहे.बहुसंख्य मागासवर्गीय हिंदू अशिक्षित, अज्ञानी,अंधश्रद्धा मानणारे आहेत त्यांना मुस्लीम समाज कसा संघटीत आणि आक्रमक आहे हे सांगितल्या जाते. पण त्यांची पाळेमुळे या देशाच्या मातीत तेवढीच घट्ट व वैचारिक दुष्ट्या मजबूत आहेत हा इतिहास सांगितला जात नाही.भारतीय संविधान जर संपले ते या देशात कोणीच सुख समाधानाने जगू शकणार नाही. जे स्वताला हिंदू समजतात ते सर्व मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मनुस्मुर्ती नुसार वागविले तर काय होईल?. आर एस एस प्रणित संस्था,संघटना बुद्धीजीवी पत्रकार,संपादक लोकप्रतिनिधी रात्रन दिवस संविधान नष्ट करण्यासाठी काम करीत आहेत.एकदा संविधान संपल कि या देशातील बहुसंख्य हिंदू मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राहणार नाही.मुस्लीम या देशाचे मोठे दुश्मन आहेत,हे प्रथम सर्वांनी डोक्यातून कडून टाकले पाहिजे.मुस्लिम समाजाचे भारताशी वैचारिक नाते ?. हा इतिहास आहे हे विसरू नका.जात ,धर्म प्रांत,राज्य हे विसरून भारतीय नागरिक म्हणून संघटीत झाले पाहिजे.नंतर विचार करण्यासही वेळ मिळणार नाही.


कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास

कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास
भारत देश हा शोषण करणाऱ्या जाती धर्माचा आणि शोषण करू देणाऱ्या जाती धर्माचा देश आहे म्हणून ते दोघेही एकत्र राहून आपली उपजीविका चालवून जगतात.विशेष भांडवलदार आणि कामगार एकाच पक्षात,संघटनेत राहू शकतात,एकच मंदिरात पूजा करून देवाला आशीर्वाद मागतात. असा हा जगा वेगळा देश आहे.म्हणुनच पांच हजार वर्षा पूर्वी धर्मसत्ता देशात होती. पण एक हजार वर्षा पूर्वी ब्रिटिश लोकांनी
मागासवर्गीय समाजाला शिक्षण, आरोग्य, आणि स्वरक्षण करण्याचा अधिकार दिला.त्यात महार
समाजाचे लोक सर्वात पुढे आले त्यांनी आपला कौशल्य
,शौर्य दाखवुन दिले होते.त्यामुळे ब्रिटिशानी लढाईत सर्वात पुढे त्यांना ठेवले.त्यांनीच ब्रिटिशाहाच्या बाजुने संघर्ष करून धर्मसत्तेचा माज असलेली पेशवाई गाडली. त्या लढाईला १८१८ ते २०२० ला फक्त दोनशे दोन वर्ष पूर्ण होत आहेत.
२०१८ला राज्यात व केंद्रात पेशव्यांच्या विचारांचे सरकार होते.त्यांच्या मनात दोनशे वर्षाची सल कायम होती.बहुजन समाज म्हणजेच मागासवर्गीय समाजसाठी, कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास आहे. तेच मनुवादी मानसिकता असणाऱ्या पेशव्यांच्या रक्ताच्या वारसदारांना मान्य नव्हता. तो पुसून काढण्याचा प्रयत्न त्यांनी त्याचं बहुजन समाजातील तरुणांना आंधळे बनवुन संघर्ष करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यात ते पूर्णपणे फसले. पेशवाई पुन्हा इतर मागासवर्गीय आदिवासी यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने सत्ताधारी झाली होती.नीती तीच होती, शल,कपट,कट कारस्थान खोटे बोल पण रेटून बोल. म्हणुन मोहन भागवत पांच हजार वर्षा पूर्वी आमची धर्मसत्ता होती.हे गर्वाने सांगतात.पण धर्माची होती की अधर्माची हे ते सांगत नाही.
पेशवाईत फक्त महारांनाच अन्याय, अत्याचार सहन करावा लागत होता काय?. मराठे आणि इतर मागासवर्गीय समाजावर किती ही धार्मिक,सांस्कृतिक, मानसिक गुलाम बनविणारे रितीरिवाजाच्या नांवा खाली भयानक अन्याय अत्याचार झाले, तरी ते त्या विरोधात पेटून उठत नव्हते. म्हणूनच त्यांच्या जातीचा इतिहास नाही. जो अन्याय अत्याचारा विरोधात संघर्ष करतो त्यांची नोंद होते.
भिमा कोरेगाव पासुन ७ की.मी वर वढु गाव आहे.येथेच "छत्रपती संभाजी महाराज" यांचा खुन झाला व त्यांचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व दवंडी देऊन सांगितले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल.आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही "मराठा" पुढे आला नाही. (एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांनी हा इतिहास जरूर वाचवा,शिवश्री अमोल मिटकरी,श्रीमंत कोकाटे यांच्या सारख्या नव्या दमाच्या विचारवंताचे व्याख्यान आपल्या गांवात किंवा शाळेत जरूर लावावे.) तेव्हा एका पहिलवानाला ही बातमी समजली तो धाडस करतो सर्व शरीराचे तुकडे जमा करुन स्वत:च्या घरी आणुन शिंप्याच्या हातापाया पडुन त्याला तयार करतो आपला राजा आहे त्यास असे नाही सोडू शकत.तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाच धाडस पाहुन त्याचे नातलग ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात. आणि त्या पहिलवानाच्या अंगणात छत्रपती संभाजी राजेंना अग्नि डाग स्वत: तो पहिलवान देतो. त्या पहिलवानाचे नाव होते "गणपत महार" आजचा जयभिमवाला होय एका महाराने छत्रपती संभाजी राजेंना अग्नि दिली.आज ही संभाजी राजेंची "समाधी" ही महार वाडयात आहे. मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमुळे हा इतिहास उजळात येत आहे. ही बातमी मोगल व भटांना समजताच गणपत महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केले व महार जातीने दिवसा बाहेर पडण्यास बंदी घातली.त्यामुळे महारांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके टाकले अशी शिक्षा भटांनी सुनावली अशी कथा सोशल मीडियावर फिरते.पुढे ही बातमी पुण्यामध्येही पसरली लोक हया गणपत महाराला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन भट आणखी चिडले असे म्हणतात.
ब्रिटिशांना पुण्यामध्ये शिरने शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते.हे सर्व महार सैनिक पहात होते.त्यांच्या सेनापतीचे नाव "सिध्दनाक महार" होते.तो इंग्रजां सोबत करार करतो तुम्हाला हे राज्य मिळुन देतो.तुम्ही "आमच्या महार समाजाचे मडके झाडू मुक्त करा." सन्मानाने जगण्याचा आधिकार दया. इंग्रज त्याची अट मान्य करतात.हाच सिद्धनाक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन" घेताे आणि म्हणतो राजे आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो शक्ती दया, आशिर्वाद दया.असे म्हणून हे ५०० महार सोबत घेऊन २८००० पेशव्यांच्या सैनिकांना संपून टाकतात. तो दिवस होता १ जानेवारी म्हणुन हा शौर्य दिन म्हणून पाळला जातो. हाच कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास आहे.
मराठा मागासवर्गीय समाजाला हया इतिहासाची माहिती नसणे.हेच त्यांच्या मूळसमस्यांचे एक प्रमुख कारण आहे. पेशवाईत कोणीच सुख समाधानाने जगत नव्हते महार मराठे शूर होते म्हणूनच सरदार,सेनापती, वतनदार, देशमुख, पाटील होते.मराठा सेवा संघाच्या प्राध्यापक, विचारवंत अभ्यासकांनी हा इतिहास नव्याने लिहण्यास सुरवात केली आहे. हा इतिहास सर्वांनी जागृत होऊन मराठा मागासवर्गीय समाजाने वाचलाच पाहिजे. महारांच्या कंबरेला झाडू व गळ्यात मटके का आले ?.
देशात नव्हे तर जगात महार जातीचा शौर्यवान जात म्हणुन गौरव होत होता.हा इतिहास डॉ भिमराव आंबेडकर यांनी इंग्लंडला वाचला तेव्हा पासुन ते एक जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी जात असत.हा महार जातीचा इतिहास आहे.आज कोणी तुम्ही महार लोक नाही सुधारणार किंवा आपल्या पायरीने वागा,महार जातीचे नांव घेऊन शिवीगाळ केली तर म्हणणाऱ्याला कायद्या नुसार केस करून जेलची हवा खावी लागेल.पण तेव्हा महार लोक लढाऊ, प्रामाणिक इनामदार, विश्वासु आणि मर्दानगी दाखवून शौर्य गाजविणारे होते असा ज्या महार जातीचा इतिहास आहे.त्यामुळेच त्यांच्या गळ्यात मटके आणि कंबरला झाडू आला. हा एक सत्य इतिहास आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही घटना महारांच्या पोरांची मर्दानगी आणि शौर्य या मुळेच हत्याकांड घडल्याचा इतिहास आहे. म्हणून महारांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मटकं आणि कमरेला झाडू कसा आला?. हा इतिहास वाचला पाहिजे. असे का घडले ? खरच महार समाज इतका घाणेरडा होता का ?. महार समाजाचा इतिहास हा शौर्यांचा इतिहास आहे. त्यांच्या इतके साफ-स्वच्छ ,प्रगत जात कोणतीच नव्हती. मग गळ्यात मडके आणि कमरेला झाडू अचानक कसे आले?. करीता ही हकीकत वाचा एकदा रघुनाथ पेशव्याची पत्नी आनंदाबाई पेशवे आपल्या दासींसोबत फिरायला निघाली.अगोदरच पेशवे घराणे स्त्री लंपट आणि पुरुष लंपट होते हे जगजाहीर होते.अचानक आनंदाबाईला मातीवर एका पुरुषाच्या पाऊल खुना दिसल्या.त्या पाऊल खुणा सर्व सामान्य माणसापेक्षा मोठ्या आणि आकर्षक होत्या. आनंदीबाई त्या पाऊल खुनावरच भाळली.तिने त्या पाऊल खुना कुणाच्या आहेत याचा शोध घ्यायला लावले.शोधातून समोर आले की त्या पाउल खुना लोहारकाम करणाऱ्या चंद्रा महारांच्या होत्या. त्यावेळेस महार समाज राजांचे शस्त्र बनविन्याचे आणि युद्धात लढाई करण्यात शौर्यवान होते. जेव्हा आनंदाबाई त्याला पाहायला गेली तेव्हा तो तलवार बनविण्याचे काम करत होता.त्यामुळे सहाजिकच त्याच्या कामामूळे त्याचे शरीर पिळदार झाले होते.उष्णतेमुळे अंगावर अगोदरच कमी कपडे होते. त्यातल्या त्यात तेव्हा महार समाजाचे लोक कस्तुरीयुक्त पान खात होते.ज्यातुन सर्वबाजूला सुगंध दरवळायचा. चंद्राचे पिळदार शरीर आणि कस्तुरीयुक्त पानाच्या तोंडून येणारया सुगंधाने तिची कामवासना जागृत झाली.तिने त्याला राजवाड्यावर बोलविले.तिच्या नजरेतील कामवासना चंद्राच्या वडिलांनी ओळखली. त्याच्या वडिलाने त्याला राजवाड्यावर जावू दिले नाही. राणीला हा अपमान वाटला.एक राणी जर चंद्रा सारख्या महारावर भाळत असेल तर तिच्या राज्यातील इतर साध्या स्त्रियांची काय स्थिती होत असेल. (नितीन आगे चे प्रकरण आठवा) हा तिला प्रश्न पडला?. चंद्रा वाड्यावर आला नाही म्हणून तो एक राणीचा अपमान होता.त्याचा सुड म्हणून रघुनाथ पेशवेच्या सहीने तिने राज्यात फर्मान काढला की. "यानंतर महारांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू राहील.हे यासाठी की कोणत्याही महाराच्या तोंडुन कस्तुरीयुक्त पानाचा सुगंध कुणास जावू नये आणि ती थुंकी रस्त्यावर न टाकता मडक्यातच थुंकेल आणि कमरीला मातीवर सरपटणारा झाडू यासाठी की कोणत्याही "महाराच्या पाऊल खुणा मातीवरच्या पाहून जर राणी भाळू शकते तर इतर स्त्रियाही भाळतील म्हणून महारांच्या कमरेला झाडू लटकविण्यात आला." याचाच अर्थ असा होतो की महार गबाळ,अस्वछ नव्हतेच त्यांचा इतिहास हा अभिमानास्पद होता.जो ब्राम्हणांच्या कामवासनेने नासवला.हाच कोरेगांव भिमाचा प्रेरणादायी इतिहास आहे.
पेशवे तर सोडा परंतू महार समाजाच्या अंगी असलेले पराक्रम,शूरत्व व लढवय्यपणा इंग्रजांच्या ही पारखी नजरेतून सुटले नाही त्यांच्या ह्या गुणांचा पुरेपुर उपयोग पेशव्यांच्या विरोधात करून २८००० हजार पेशवाई सैनिक फक्त ५०० महार सैनिकांनी उभी कापून काढली.एक महार ५६ जणांना पुरुण उरत होता.पेशवे सैनिक न लढताच भांबावल्यासारखे सैरावैरा नुसतेच पळत सुटले. पेशवाई हारली आणि महारांनी ती पुर्णपणे नेस्तनाबूत करून टाकली.मग तेव्हा पासूनच एक म्हण पडली ती अशी कि तुझ्यासारखे असे छप्पन (५६) पाहिले. ह्या म्हणीचा खरा इतिहास हा आहे.
महारांच्या पराक्रमी शौर्य मुळे इंग्रज खूपच खुश झाले होते आणि ह्या खुशीच्या बदलल्यात महारांना इंग्रजांनी जमीनी बहाल केल्या.पण महारांनी जमिनी पेक्षा इतिहास कायम नांव राहावे आणि त्यांची आठवण राहावी म्हणून विजयस्तंभाची मांगणी केली.इंग्रजांनी ती मान्य करून विजयी स्तंभ बांधण्यात आला.त्या विजयी स्तंभावर ५०० महारांची नावे कोरण्यात आली.हाच तो १८१८ सालचा भीमाकोरेगावचा इतिहास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात शिक्षण घेतांना वाचला म्हणून त्यांनी आपल्या लोकांना सोबत घेऊन ह्या पराक्रमी शूरवीरांना वंदन करण्यासाठी १ जानेवारीला न चुकता जायाला लागले. म्हणुन आता लोक दरवर्षी जातात. कारण ते जर लढले नसते तर आपले अस्तित्व ही असून नसल्या सारखेच असते.
महारांचा हा शुर व पराक्रमाचा इतिहास सोशल मिडियावर देशभर सध्या फिरत आहे.परंतु यातुन आजच्या बौद्ध झालेल्या महारानी कोणती प्रेरणा घेतली?. ६ डिसेंबर, १ जानेवारी,१४ एप्रिल,विजया दशमी धम्मचक्र परिवर्तन दीना सारखे ते लाखोंच्या संख्येने एकत्र येतात आणि जातात, पण विजयी होत नाही आजही खेड्यातील बौद्ध समाजाला मराठा पाटील इतर समाजाच्या राजकीय गुंडगर्दी मुळे गांव सोडून पळून जावे लागते, हे भिमाकोरेगांवला मानवंदना देण्याच्या लायकीचे नाहीत असेच म्हणावे लागेल.तेव्हा ते शत्रू बलाढ्य आणि मोठया संख्येने आहे हे माहित असुन सुध्दा जिद्दीने लढले. आज आम्ही संख्येने सर्वांना सोबत घेऊन ८५ टक्के  होतो. हे माहित असुन ही पेशवाईच्या पालखीचे भोई होतो.म्हणजे कुठे तरी काही वैचारिक, स्वार्थीपणाची गडबड आहे.
१जानेवारी च्या शौर्यदिनाचा इतिहास वाचुन इतिहास घडवावा कि भिमा कोरेगांव ला जाऊन कुंटुंबिक सहल घडवीत राहणार?. तिथे ही वेगवेगळे बॅनर होडींग आणि स्टेज आणि वेगवेगळी भाषण!. मग कोणत्या तोंडाने आम्ही सांगणार आहोत की ५०० महार सैनिका कडून आम्ही प्रेरणा घेतली. खरच तुम्हाला कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास वाटतो का?. 
कडू भिडे गुरुजी आणि एकबोटे यांनी सुपारी घेऊन २०० वर्षाची परंपरा बंद करण्याचे पूर्व नियोजन केले होते.त्याला पोलिसांनी व सरकारने योग्य ती मदत केली.  इतिहास व वर्तमान काही असो, आता लाखो लोक दरवर्षी राज्यातुन नव्हे तर देशभरातून परदेशातून  कोरेगाव भिमा च्या विजयी स्तंभाला  मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने यायला लागले. कारण  कोरेगांव भिमा प्रेरणादायी इतिहास जगाला माहिती झाला.आजच्या पिढीला माहिती असणे आवश्यक आहे.

एकच वारी बारा जानेवारी झाली तर.....?. राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील.

एकच वारी बारा जानेवारी झाली तर.....?.
 राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जिवंतपणी जेवढी मानहानी झाली नाही त्यापेक्षा जास्त आज त्यांच्या क्रांतिकारी विचारांची मानहानी त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील वारसदारांनी महाराष्ट्रात लावली आहे.इतिहासाचा खून करून जातीजातीत विष पेरण्याची स्पर्धा लावली आहे.त्यासाठी त्यांचे जात बंधु प्रिंट मीडिया,चॅनल मीडियावर ठाण मांडून बसले आहेत.ते समाजात कशी बदनामी होईल यावरच आपली बुद्धी खर्च करीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ सारखी दुरदुष्टी आजच्या सर्व माता नी ठेवली तर आमच्या ही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजा सारखे शूरवीर निर्माण होतील.(जर संभाजी भिडेच्या हातून सुटली तर) राष्ट्रमाता जिजाऊ ही इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती.स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब,शेतकऱ्यावर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती.त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणा मूर्ती जिजामाता होती.हे जरी शंभर टक्के सत्य असले. तरी मराठयाच्या मनावर जिजामाते पेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आज ही कायम राहत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील?.स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा जिजामातेची म्हणजे एका स्त्री ची होती.परंतु गेले अनेक शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून "स्वराज्य" निर्माण करणे हि श्री ची इच्छा होती.हे विद्यार्थीदक्षे पासुन मुलामुलींच्या मनावर बिंबविले जाते.त्यामुळे जिजामाते पेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच मराठा समाजातील महिलांनी जास्त पसंत केले आहे.मराठा सेवा संघा च्या प्रबोधानाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.त्यामुळे एक घोषणा सर्व ठिकाणी निनादते एकच वारी बारा जानेवारी.यांची खरच अंमलबजावणी झाली.तर शेगांव,शिर्डी आणि पंढरपूर च्या पायी यात्रा निश्चित बंद होतील.त्यामुळे मराठाच नव्हे तर लाखो बहुजन समाजात करोडो रुपयाची बचत होईल.आणि आपल्या मुलामुलींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होती.म्हणुन एकच वारी बारा जानेवारी ही केवळ घोषणा नाही. क्रांतिकारी मंत्र होईल.
भारतात मुलांना घडविताना त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगून त्याच्यावर संस्कार केले जातात.त्यांना शाळा कॉलेज मधून हे शिकविल्या वर कोण कसा छत्रपती शिवाजी राजा निर्माण होईल?. स्वराज्याचे राजे असलेले मराठे आज सर्वच मनुवादी विचारधारा असलेल्या पक्षाचे गुलाम झाले आहेत. राज्यातील २८८ आमदारात १४५ मराठा समाजाचे आमदार आहेत.हे लिहतांना मला लाज वाटते त्यांना मराठा म्हणण्याची. म्हणुन त्यांना गुलामच म्हटले पाहिजे.हे बेशरम पणे मराठा क्रांती मोर्चात सहभागी होतात.रामायणातील संस्कार कोणाला हि शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही.तर दुसऱ्या करीता कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते.तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते.असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय शत्रू आणि  घरभेद्याशी लढाई केली नसती.शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे.हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हरले नाहीत.ती हिंमत लहानपणा पासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्याच्या मागे सदैव उभी होती.आज कालच्या माता मुलामुलीच्या मनात हिंमत निर्माण करण्या ऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात.त्याच्या पासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडनी करतात.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे.जी माता स्वताच्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते.ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते. ती जगा बाबत विचार करूच शकत नाही. त्यात एकादीच जिजामाता, सावित्रीमाता,रमाईमाता, अहिल्याबाई, ताराबाई तयार होतात.जगात आदर्श निर्माण करतात.इथे शालिनीताई,प्रतिभाताई,प्रभाताई,शोभाताई,मीनाताई,निलमताई निर्माण झाल्या.त्यांचा शिवाजी जिजाऊ कधीच आदर्श नव्हता.त्या गुलामांच्या गुलाम होत्या.त्यांच्या कडून राज्यच्या रयतेने कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत.
परकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना. जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्माता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना,अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते.तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी,वर्णबंदी,जातबंदी,रोटीबंदी,बेटीबंदी,शस्रबंदी, समुद्रबंदी होती. या सर्व बंदया प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावुन मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली.मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात.व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात.या मुंग्यांच्या एकजुटीतुन शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली.आणि सर्व जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणाना मावळे म्हणून गोळा केले.सम्राट अशोकाच्या नंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतीच्या गादीचा वारसा निर्माण केला.चंदगुप्त मौर्या,सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली.जिजामातेमुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.तर त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला.यांचे भान आजच्या आरक्षण मांगणाऱ्या मराठा क्रांति करणाऱ्यांना नाही. १४५ आमदारांनी मराठा आरक्षणा करीता राजीनामा देऊन निवडणूक घेण्यासाठी राज्यपाला समोर प्रस्ताव दाखल केला असता तर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा समाजाचे असते.१४५ आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे ते सभागृहात तोंड उघडू शकत नाही.भारतीय संविधान निर्माते त्यांची ती एकजातीय दादागिरी जाणुन होते म्हणुन त्यांनी तशी तरतुद लिहून ठेवली.म्हणुन ते मोर्चात सहभागी होतात.
छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष, संस्था,संघटना जिजामाता ची जयंती साजरी करताना दिसत नाही.पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने प्रमुख गल्लीबोळात साजरा करताना दिसतात.ममता,समता,करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते.ज्यांच्या आईवडीलाचा पत्ता नाही,कुठे जन्मले?.गांव,तालुखा,जिल्हा, राज्य कोणते तेच कधी कळले नाही अशा मातांना प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया रात्रंदिवस दाखविते,मात्र जिजामाता,सावित्रीमाई चे जन्मा पासून मृत्यू प्रयन्त सर्व इतिहास माहित असूनही त्याबाबत लिहल्या आणि दाखविल्या जात नाही,छत्रपती शिवाजी महाराजाना आद्यदैवत मानणारे जेव्हा त्याच्या मातोश्री चे चरित्र हरण करून विटंबना केली जाते. तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरून खळ्ळयाय खःटाक आवाज करीत नाही.अन एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला जातो.यालाच आईचे व दाई प्रेम म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊचे चरित्र हरण करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरवल्या जाते.राज्यातील मराठ्यांना हे दिसते तरी पण स्वार्था करीता हे त्यांचे गुलामी स्विकारतात. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊच्या चरित्रावर लिहणाऱ्यानां पिता समान मानुन मनसे सेवा करणारी ही औलाद मराठा समाजातील तरुण तरुणीला कशी दिसत नाही.त्यांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्रात तोडफोड करून धुमाकुळ घालणारी ही पोर कोणत्या मातेची आहेत?.त्यांना राष्ट्रमाता जिजामाता.छत्रपती शिवाजी महाराजाची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही.मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील?.
छत्रपती संभाजी राजे यांच्या शरीराचे तुकडे गोळा करून अग्नी देणारा समाज आज देशाचा सर्वात मोठा गुन्हेगार ठरविण्याची नियोजित योजना यशस्वी होत आहे.त्याला त्यावेळी मुख पाठींबा देणारा समाज आज ही मुख पाठींबा देऊन गप्प बसणार असेल तर देशात महाभारत घडेल,संविधाना मुळे सर्व जाती,धर्माचा,पंथा चा,राज्याचा नागरिक भारतीय म्हणूनच सुखाने जगत असतांना हे इतिहास खोटा सांगून समाजा समाजात आग लावुन मज्जा घेत आहेत.मानव जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणाऱ्या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार?.त्याने स्वजातीचा इतिहास वाचला पाहिजे,स्वता जागरूक होऊन समाजाला जागृत केले पाहिजे,मराठा सेवा संघाने लावलेल्या प्रेरणादायी प्रबोधन रोपांचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्यांच्या 32 फांद्या समाजाला गोड गोड फळांचे बौद्धिक टॉनिक देत आहे.संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या तरुण तडपदार विचारवंतांनी भटा ब्राम्हणाची झोप उडविली असतांनाच भिमा कोरेगांव च्या शौर्याला दोनशे वर्षा नंतर सुरुंग लागला आहे.तो कुचकामी ठरविण्याची मोठी जबाबदारी सेवा संघ प्रणित ब्रिगेड वर आली आहे. म्हणुनच एकच वारी बारा जानेवारी स्वाभिमानी मराठा बहुजन मागासवर्गीय समाजाच्या घराघरात राबविली पाहिजे.हिच राष्ट्माता जिजाऊ च्या जयंती निमित्त अपेक्षा.सर्व बहुजन समाजास हार्दिक शुभेच्छा आणि राष्ट्माता जिजाऊच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम