सोमवार, २ मे, २०२२

भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.

 भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.



जगाच्या नकाशावर हिंदुस्तान कुठे आहे?.हे आर एस एस प्रणित भाजपाच्या केंद्रीय सरकारने दाखवुन द्यावे. केंद्रात भाजपा सरकार आल्या पासुन त्यांनी सर्व ठिकाणी हिंदुस्थान हिंदुस्थान हा शब्द प्रयोग करण्याचा झपाटा लावला आहे.त्यामुळे देशभरात बजरंग दल,हिंदू वाहिनी,हिंदू जनजागृती समितीचे अंधभक्त गुंडागर्दी करणारे तरुण मागासवर्गीय तरुणांना अंध भक्त बनवून मागासवर्गीय समाजावर आणि मुस्लीम समाजावर नहाक अन्याय अत्याचार करीत आहेत.तर काही ठिकाणी एकाच पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करून जातीय दंगली घडविण्याचे षड्यंत्र करीत आहेत.ते स्वतःला किती ही हिंदू म्हणून घेत असले तरी हिंदूंचा खरा अर्थ चोर गुलाम,ही फारशी शिवी आहे हा इतिहास आहे आणि तो संशोधन करून सिद्ध झालेला आहे. त्यामुळे भारत हा कधीच हिंदुस्थान नव्हता यांचा इतिहास हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी जरूर वाचावा.
आर एस एस प्रणित भाजपा केंद्रीय सरकार पुढच्या २०१९ नंतर आले तर भारतातील सर्व चित्र बदलले जाईल.ते खरे राम राज्य असेल, आणि राम राज्य निर्माण करण्यासाठी प्रथम इंग्रजांनी जे जे निर्माण केले ते नष्ट करावे लागेल. इंग्रजांनी भारतीयांना काय दिले?. इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले आणि कायम स्वरूपी भारतीयांना उपभोगाच्या योजना सोडून गेले.इंग्रज आले नसते तर भटा ब्राम्हणांनी देशात मंदिर बांधुन दरवर्षी महाकुंभ मेळा भरविला असता. म्हणुन इंग्रजांचे राज्य चांगले होते कि साडे तीन टक्के ब्राम्हणाचे प्रशासकीय राज्य चांगले आहे.हे जरा आजच्या सुशिक्षित तरुणांनी डोळसपणे तपासुन पाहिले पाहिजे. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे त्यात गूगल इंजन आहे.ते सुरू करून पहा. 
भारतात सर्व प्रथम रेल्वे इंग्रजांनी सुरु केली.भारतात टेलिफोन दुरभाष्य यंत्रणा इंग्रजांनी सुरु केली,भारतात उद्योग धंदे उभारून त्यात भारतीयांना रोजगार उपलब्द करून दिला.शिक्षण घेण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण करुन सर्वाना शिक्षण घेण्याची समान संधी उपलब्ध करून दिली.वर्णव्यवस्थेत सर्वाना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता तो इंग्रजांनी भारतीय लोकांना विशेष बहुजन समाजाला दिला,(म्हणजेच मागासवर्गीय एस सी,एस टी, व्ही जे एन टी, ओ बी सी,आदिवासी, अल्पसंख्याक समाज) भारतात डाक विभाग,सार्वजनिक हॉस्पिटल,महाविद्यालय निर्माण करुन हजारो लोकांना रोजगार नोकरी दिली आणि जनतेला सेवा मिळवुन दिली. भारतात मनोरंजन आणि खेळाला प्रतिष्ठा इंग्रजांनी मिळवुन दिली.गाणे,बजावणे, नाचणे हा फक्त मागासवर्गीय समाजाचा जन्म सिद्ध अधिकार होता,तो इंग्रजांनी मोडुन त्याला कला क्रिडा कौशल्य असे गुणवत्ता असलेले नांव दिले,म्हणुन आज माधुरी,ममता,शिल्पा,सोनाली,मृणाल स्पृशा, स्मुर्ती, सुषमा,रेखा,जया,हेमा सर्व क्षेत्रात उगड्या नागड्या दिसतात. 
भारतात ''पुरातत्व विभाग'' इंग्रजांनी सुरु केला त्यामुळे भारताची प्राचीन सभ्यता और प्राचीन बौद्ध/जैन धर्म धर्माचा शोध लागला.भारतात कापसा पासुन कपडा बनविण्याचा कारखाना इंग्रजांनी सुरु केला.समुद्राच्या किनाऱ्यावर बंदरे बनवुन भारताचा मोठा विकास इंग्रजांनी केला.त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठया मोठया शहराचा विकास इंग्रजांनी केला. भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका आणि समान नागरिक अधिकार इंग्रजांनी सुरु केला. बाल विवाह,सती प्रथा इंग्रजांनी कायदे करुन बंद केले आणि विधवा विवाह इंग्रजांनी सुरु केले.भारतात सावित्री बाई आणि ज्योतिराव फुले यांनी महिला आणि अस्पृश्य स्त्रीया करीता शाळा खोलून स्वता शिकविले त्याला इंग्रजांनी योग्य आर्थिक मदत केली.जाहीर सत्कार केला.
भारतात दळण वळणा करीता रोड रस्ते,ब्रिज पूल प्रथम इंग्रजांनी बनविले.ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद,सह सर्व प्रशासकीय व्यवस्थेत सहभागी करुन घेण्याचे काम इंग्रजांनी केले,इंग्रज भारत सोडुन १९४७ साली गेले. तेव्हा एका डॉलर ची किंमत एक रुपया होती आज एका डॉलरची किंमत किती रुपये आहे माहिती करून घ्यावी.म्हणजे भारतात इंग्रजांनी भारताचा विकास आणि कल्याण केले.पण वर्णव्यवस्था मानणाऱ्या ब्राम्हणानी भारताची शासन प्रशासन व्यवस्था हाती घेतल्यावर देशात मंदिर निर्माण करुन देव आणि धर्माचे थोतांड मांडून स्वर्ग,नरकाचे चित्र उभे करून भारतीयांवर राज्य केले.म्हणुन त्यांना भारत नको आहे त्यांना हिंदुस्थान हवा आहे. हा धोखा घटनाकारांनी ओळखला होता म्हणून त्यांनी घटनेत तशी कायम तरतूद निर्माण करून ठेवली आहे. राज्यात,केंद्रात कोणतेही सरकार आले तरी भारत म्हणजे इंडिया हाच शब्द वापरावे लागेल.भारताला हिंदुस्तान लिहण्याचा व बोलण्याचा प्रयत्न या देशातील भट ब्राम्हण दररोज करतात.पण जागरूक अधिकारी कर्मचारीवर्ग त्याची योग्य वेळी दाखल घेतात म्हणून भारत हिंदुस्थान होत नाही आणि होणार नाही.भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण पहिला भारतीय आहेत आणि भारतीय राहू नंतर जात,धर्मं,पंथ,राज्य येईल याची काळजी घ्यावी.भारतात जो पर्यंत भारतीय संविधान आहे तो पर्यंत सर्व जाती धर्माचे पंथाचे राज्याचे लोक, सुरक्षित राहतील जेव्हा संविधान नसेल तेव्हा हा देश हिंदुस्थान होईल त्या नंतर कोणीच सुरक्षित नसेल.म्हणून भारताला भारत इंडियाच राहू द्या हिंदुस्थान होऊ देऊ नका.तसे झाले तर पाकीस्थान,अफगाणिस्तान होण्यास वेळ लागणार नाही.
आज देशभरात जे काही चालले ते खूप भयानक आहे.आर एस एस चा प्रमुख शत्रु डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी बनविलेली राज्य घटना जो पर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत राम राज्य म्हणजेच भटा ब्राह्मणांचे वर्णव्यवस्था असलेले राज्य येणार नाही म्हणूनच देशभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज प्रत्येक राज्यात टार्गेट केला जात आहे. या समाजाला चिरडून टाकले की इतर मागासवर्गीय आपोआप गुलाम बनतील ही आजच्या हिंदुस्थान बनू पाहणाऱ्यांचे स्वप्न आहे.ते सत्य करण्यासाठी ते सर्व माफदंड वापरत आहेत.
जातीय दंगली घडविण्यासाठी,शॉट कट नेता बण्यासाठी भोंगा काढण्याची भाषा करून कायदा सुव्यवस्था बिगडविनाऱ्यांची धमकी देणाऱ्या विरोधात पोलीस कोणतीच भूमिका घेतांना दिसत नाही.पण त्या विरोधात सर्वात जास्त बोलणारे कोणत्या समाजाचे नेते आहेत. अन्याय अत्याचारा विरोधात उभा ठाकणारा,बोलणारा,लिहणारा म्हणजे आंबेडकरी विचाराचा एकमेव माणूस किंवा समाज होय यांची जाणीव भटा ब्राम्हणांना आहे.ते ओळखण्यासाठी जास्त डोके चालविण्याची गरज नाही.फक्त डोळे उघडे ठेवून पाहिल्यास लगेच दिसते. रोडवर जाणाऱ्या शंभर मोटरसायकल पहा त्यात ज्याच्या गादीवर अशोक चक्र दिसलं तर लोक लगेच म्हणतात, हा आंबेडकरी विचाराचा व बौद्ध तरुण आहे! कोणत्याही फोर व्हीलर गाडीवर अशोक चक्र दिसलं तर लोक म्हणतात,हे बौद्धाचं कुटूंब आहे! घरावर निळा झेंडा व दरवाजा वर अशोक चक्र दिसलं तर लोक म्हणतात,हे बौद्धाचं घर आहे! मग राष्ट्रध्वजावर (तीरंगा) अशोक चक्र पाहून कोणीच का म्हणत नसेल,की "हा भारत बौद्धांचा देश आहे" आणि त्याला अडीच हजार वर्षाचा तथागत गौतम बुद्धाचा जम्बु दीप प्रबुद्ध भारत यांचा ऐतिहासिक इतिहास आहे.पण हिंदुस्थान कोणाचं होता त्याला कोणता इतिहास आहे हे कोणी सांगत नाही.म्हणून भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.आज रात्र नव्हेतर दिवस सुध्दा वैऱ्याचा आहे.तेव्हा उठा जागे व्हा भविष्यात स्वाभिमानाने जगण्यासाठी!. भारत माता की जय बोलणाऱ्यास विचारा.शिक्षण,आरोग्य आणि रोजगार महागाईचे काय?. हिंदुस्थानची माता पिता कोण?. त्यांनी या देशात काय काय निर्माण केले.ते जरूर सांगावे.तरच भारताला हिंदुस्थान बनविणे सोपी जाईल.

सागर रामभाऊ तायडे - ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई

बिनभांडवली "राज" कारण?.

 बिनभांडवली "राज" कारण?.


 शिक्षण घेण्यासाठी पहिला डोनेशन भरावे लागते त्याशिवाय प्रवेश मिळत नाही,म्हणूनच कष्टकरी कामगार मजूर म्हणतात शिक्षण घेणे किती महाग झाले,एखादा माणूस बिमार पडला तर त्यांला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी प्रथम डिपाजित भरावे लागते तेव्हाच डॉक्टर हात लाऊन इलाज करतात.त्यावेळी अनेक प्रकारच्या टेस्ट सांगितल्या जातात त्या केल्या शिवाय तडजोड नाही.तेव्हा प्रत्येक माणूस हॉस्पिटल खर्च किती महाग झाला ही खंत व्यक्त करतो. रोजगार मिळत नाही.कष्टाची बारा बारा तास काम करून ही किमान वेतन मिळत नाही. त्याविरोधात बोलण्याची कोणतीही सोय नाही.आवाज उचलला तर कामावरून काढल्या जाते.मालकांचे किंवा ठेकेदारांचे अनेक पक्षाशी आर्थिक हितसंबंध असतात.पक्षाचे कार्यकर्ते नेते अशा भानगडीत लक्ष देत नाही.मग महागाई विरोधात कोण लढणार ?. भ्रष्टाचारा विरोधात कोण लढणार व किती लढणार हे आता राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे कामकाज पाहिल्यावर भारतीय नागरिकांना समजले असेल.आजचे सत्ताधारी राजकीय पक्षनेते कालचे विरोधीपक्ष नेते होते त्यांनी बेरोजगारी,भ्रष्टाचार, महागाई विरोधात देशभरात किती रान पेटविले होते याची आठवण करा आणि शांत बसा.
राजकीय सत्ता स्पर्धेत उतरायचे असेल तर बिनभांडवली "राज" कारण करता आले पाहिजे. विचारधारा नसली तरी चालेल पण उपद्रव मूल्य दाखविण्याची हिंमत पाहिजे.त्यासाठी बिनडोक तरुण मुलाची फौज पाहिजे, त्यांना प्रथम तोडफोड करून हिरो बनवायचे मग त्यांच्या नावाखाली तडजोड करून हप्ते सुरू म्हणजेच बिनभांडवली "राज" कारण?. यशस्वी होतांना दिसत आहे, सत्ता,नाही की विरोधी पक्ष नाही तरी राज्यात बिनभांडवली "राज" कारणाची दहशतवादी पक्ष संघटना म्हणून मान्यत आहे.मराठी माणसांना न्याय हक्क देण्यासाठी उत्तर भारतीय टॅक्सी वाल्यांना मारहाण केली,मात्र एकाही सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मालकाच्या कानाखाली मारली नाही.एकाही बिल्डरच्या कामावर जाऊन कामगार कोण आहेत त्याची चौकशी केली नाही.गुजर मारवाडी व्यापाऱ्यांनी दुकानांवर दक्षिण भारतीय हॉटेल मालकांनी मराठीत पाटी लावली नाही म्हणून,पेट्रोल पंप वर,टोलनाक्यावर तोडफोड झाली.त्यामुळे मराठी माणसांना विशेष तरुणांना न्याय हक्क अधिकार रोजगार मिळाला असेलच. 
मराठी हृद्य सम्राटा साठी एक तरूण तडपदार अत्यंत हुशार सर्वांचा लाडका मुलगा एकदा गाड्या फोडताना पोलिसांनी पकडला.तुरूंगात पोलिसांनी रक्ताचा एक ही थेंब बाहेर येणार नाही याची दक्षता घेऊन चांगला चोप दिला आणि रीतसर केस बनवली. त्यामुळे कोर्टाची केसवारी दरमहा सुरू झाली.   आईवडिलांनी वाटेल ते काम करून मुलांना इंग्रजी मेडियम मध्ये शिक्षण दिले.नोकरी शोधात असतांना पोरगा  मराठी हृद्य सम्राटाचा मनसे सैनिक झाला.आणि करिअर गेलं,वर्ष वाया गेलं,जामीन नाही,जवळ पैसे नाहीत, आईबाप खंगले,तो तर आयुष्यातूनच उठला.असे एक नाही हजारो मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक म्हणून भरडल्या गेले,त्यांची कुठे ही मोजमाफ नाही.कारण त्याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले होते.  आणि तो पेटून उठला होता प्रचंड उर्जा घेऊन भडकला होता. त्यांचे आयुष्य जरी बरबाद झाले असले, तरी पण त्याच्यामुळे बिनभांडवली "राज" कारण करणाऱ्या नेत्याची मोठी प्रगती झाली.हे सर्व समाजाचे नागरिक विसरले आहेत.
बिनभांडवली "राज" कारण करण्यासाठी विशेष गुणवंता लागते.
तरुणांना नकारत्मक विचारांची नशा दिली कि तो नशेतच पेटून उठतो.ज्या प्रमाणे दारू विक्रेत्या दारूची नशा गुणदोषांचे मूल्य मापन न करता विकतात.तरुण परिणामाची परवा न करता पितात.त्याच प्रमाणे बिनभांडवली "राज" कारण करणारे नेते नकारत्मक विचारांची नशा मुलांना देत राहतात.दारूची नशा चार,आठ तासांनी उतरते.पण द्वेषाची नशा चढतच राहते.मग एक दिवस दारू विकणारा बंगला बांधतो.त्याच पद्धतीने बिनभांडवली "राज" कारण करणारा नेता कोहिनुर बांधून,किंवा सेंटर हॉटेल खरीदी करून काही दिवसात तिची विक्री करतो आणि किती करोड उत्पन्न मिळवतो. नंतर मान्यताप्राप्त 
राजकीय नेता होतो.  
मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक मात्र दारू पिणाऱ्या भिकाऱ्या पेक्षा भिकारी होतो.तर छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कोणीही देव- देवता यांची नावे सर्रास घेऊन 
मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाच्या  तरुणांना त्यांच्या नावाने भडकावले जाते.मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक कधीच विचार करत नाही.ज्याने भडकावले त्याचा मुलगा असतो?. स्टडीरूममधे.आणि जे भडकले ते मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जातात कस्टडी रूममध्ये.ज्यांनी भडकवले त्यांचा मुलगा अभ्यास करतोय आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतात.
बिनभांडवली "राज" कारणी नेत्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो.   आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते देशी प्यायला जातात.भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड इंग्लिश बोलतो
आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक बघून घेतो, तंगडंच काढतो,नादाला लागू नको, वावर गेला तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतो.कुठे गेली लाज,लोक लज्जा, कुठे गेला आत्मसन्मान.
छत्रपती शिवाजी महाराजांचे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता.पण स्वाभिमान मात्र गहाण टाकलाय.दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून मोठं व्हावं.दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा स्वतःचं रोपटं लावावे त्याची काळजी घेतली तर त्याचंही मोठं झाड होईल.त्याला गोड फळे येतील.तेंज तुम्हाला खायाला मिळणार नसले तरी तुमचे नातू मात्र हक्काने खातील.हे मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाच्या तरुण मनसे सैनिकांना कधी कळणार म्हणूनच त्यांनी हे बिनभांडवली "राज" कारण समजून घावे.
आम्ही २१व्या शतकात स्मार्ट फोन,एंटर नेट,वाय फ्राय कॉम्प्युटर चा वापर करून ही उपास,नवस,पायीपद यात्रेला महत्व देऊन वाद घालणे,भांडण करणे, मारामारी करत असू तर हीच गोष्ट मनाला खटकनारी आहे.
या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या आई वडिलांचे ऐका.नोकरी,व्यवसाय,धंदा,शिक्षण,घर,संसार इकडे लक्ष द्या.....
मनसे,राष्ट्रवादी,कॉँग्रेस,भा ज पा ,शिवसेना पक्षात गेलेल्या मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाच्या तरुणांनो ते राजकीय पक्ष म्हंणून सत्तेसाठी कधी युती आघाडी करू शकतात.आपले काय?.
पंजाबी गुजराती मारवाड्यांची मुले राजकीय पक्षा पासून लांब राहून CA,CMS,BMS, BBA,MBA ची ज्या मेहनतीने तयारी करतात.त्या पद्धतीने मराठी मुल तयारी करीत नाही.ती काय करतात?.दक्षीण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात.त्यांच्यापेक्षा अधीक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले ...ऊत्तर भारतातील मुले UPSC, railway ची तयारी करतात.
शिर्डी पदयात्रा,दहीहंडी,गणपती,नवरात्रीची सर्वशक्ती लावून तयारी करतात,वेळ अन वय निघून गेल्यावर आई बाबावर खापर फोडतात. ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हे सर्व देवाची यात्रा,पूजा केली त्यांना मात्र कोणताच दोष देत नाही करतात.ज्या वयात चांगले अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेण्याची जी वेळ असते.तेव्हा आमचा तरुण कुठल्यातरी मंडळाचा अध्यक्ष,पक्षाचा तालुकाध्यक्ष,युवाध्यक्ष,शाखाध्यक्ष किंवा कार्यकर्ता असतो आणी नंतर बेरोजगार.तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.म्हणूनच जगा फक्त तुमच्या आई-बापासाठी,समाजाच्या हितासाठी चळवळीत काम केल्यास कायम लक्षात राहाल.आणि समाज तुमच्या मागे कधी कुठेही उभा राहील.सुखा दुखात सहभागी होणाऱ्या मित्रांसाठी कायम जागरूक रहा प्रेम जिव्हाळा हा मतलबा पुरता नसावा.कायम मैत्रीभावना वाढणारा असावा.दोन समाजात कायम तेढ निर्माण करून स्वतचे अस्तित्व टिकविणारा बिनभांडवली "राज" कारण करणारा नेता ओळख आणि सावध व्हा.शिक्षण,आरोग्य आणि रोजगारात होणारा खासगी मालकांचा भ्रष्टाचार यांना का कधीच दिसत नाही.त्या विरोधात त्यांच्या कानाखाली मारण्याची आरोळी का दिल्या जात नाही. कारण त्यांच्या भरोशावरच तर बिनभांडवली "राज" कारण चालते.हे तरुणांनी विसरू नये.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.


शांतीचा संदेश देणारा रमजान

 शांतीचा संदेश देणारा रमजान 



 जगातील मानव जातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले होते.जात धर्म,प्रांत,भाषा,वेशभूषा,गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले.माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेऊ नये,शक्यतो एकमेकांना मदत करावी हेच शिकविले होते. पण काही लोक हे विसरतात.बिनभांडवली  "राज" कारणासाठी ते भोंगे आणि हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी शांतीचा संदेश देणाऱ्या रमजान मध्ये ही बाग देतात.त्यांचा उदेश एकच असतो दोन समाजाने आपसात मारामारी करून जातीय दंगल घडवावी.राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगडून टाकावी.त्यावर आपले बिनभांडवली "राज" कारण करून नेता बनावे. 
माणुस कोणत्याही जाती धर्माचा राज्याचा प्रांताचा असो त्यांचीशी प्रेमाने बोलावे त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी, कोणताही धर्म नफरत करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्माचे शांतीचा संदेश देणारे सण आहेत.त्यासाठी त्यांना त्या दिवसात चांगले काम व विचार करण्यासाठी मानसीक शारीरिक दृष्ट्या तयार केल्या जाते.हिंदू धर्मातील सहा हजार सहाशे जातींना भट ब्राम्हण लोक हिंदू म्हणून एकत्र ठेऊन आणि त्यांच्या कडून ब्राम्हणाच्या कट कारस्थानेचे दिवस म्हणजे विजय,पराजयाचे दिवस मोठ्या संख्येने सण म्हणून साजरे करण्यास लावतात. जसे कि श्रावण का पाळतात. त्या महिन्यात पोथ्या,पुराण,धर्म ग्रंथ वाचतात. काही आठवडे सोमवार कडक उपवास ठेवतात,दाढी सुध्दा करीत नाही.नंतर गटारी अमावस्या साजरी करतात.बौद्ध धम्म मानणारे लोक वर्षावास तीन महिने पाळतात.तेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न त्रिपटक सारखी ग्रंथ सामुदाहिक पणे वाचतात.नंतर धम्माला शरण जातात पण संघाला संघटनेला शरण जात नाही. म्हणजेच पंचशिलेचे पालन करीत नाही. असाच मुस्लिम समाजातील रमजान महिना असतो.तो समाजाला,शांती समता व स्वातंत्र्य मिळवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवितो, त्यासाठी कडक उपवास म्हणजे रोजा पकडला जातो. प्रत्येक धर्माचे हे सण मोठया संख्येने साजरे केले जातात.तेच सण दरवर्षी नवीन प्रेरणा घेऊन येतात. तरुणांना धार्मिक रितीरिवाज संस्कार, सांस्कृतिक वारसा देऊन जातात.श्रावण महिना,वर्षावास आणि रमजान काय आहेत हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना त्यांचे महत्व कळणार नाही. त्यासाठी त्यांचे त्यांना पालन करावे लागेल.
हिंदू धर्मात श्रावण पाळण्याचे सांगितले आहे. बुद्ध धम्मात वर्षावासात पंचशिलेचे पालन करायचे सांगितले आहे. महंमद पैगंबर रमजानच्या पवित्र महिन्यात काय करायला सांगतात.  पाहिले इमान,दुसरा नमाज,तिसरा रोजा चौथा हज आणि पाचवा जकात या पाच कर्तव्य प्रत्येक माणसाने पार पाळले पाहिजे. श्रावण महिन्यात, वर्षावासात आणि रमजान मध्ये लहान मुलामुलींना धर्माचे संस्कार,व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली जाते. चांगला नागरिक बण्यासाठी या पाच महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला जात,धर्म प्रांत,भाषा,वेशभूषा कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच रमजान हा केवळ इस्लाम मानणारा मुस्लिम समाज व मुसलमान हेच साजरा करू शकतात असे नाही. माणूस बनण्यासाठी पांच चांगले गुण माणसांच्या आचरणात असले पाहिजे.इथे दोन उदाहरण देतो.एक देशाचा राष्ट्रपती,दुसरा सरन्यायाधीश विचारांने अधिकारांने खूप मोठ्या पदावर विराजमान होते. पण आचाराने गुलाम झाले.कोणता आदर्श निर्माण करूच शकले नाही.धर्माचे संस्कार,शिक्षण हे वाघिणीचे दुध असते.यांनी काय सिद्ध करून दाखविले.असो...
पंचशिलेचे पालन करणारा कोणीही असु शकतो. इस्लाम मध्ये सांगितलेल्या पाच कर्तव्याचे पालन करणारा कोणीही असु शकतो.माणसाला माणसासारखे वागविण्याची शिकवण देणारा धर्म व धम्म जगात ओळखला जातो. जो माणसासोबत माणसासारखा वागत नसेल तर तो माणूस असु शकत नाही.तो ब्राम्हण असु शकतो. म्हणूनच माणसं ओळखण्यासाठी धर्माची धम्माची शिकवण मुलामुलींना लहानपणापासून दिली पाहिजे. सर्वच मुस्लिम मुसलमान नाहीत.जो मुसलमान पांच कर्तव्याचे पालन करत नसेल तर तो इस्लाम मानणारा असु शकत नाही.इस्लाम मानणारा मुस्लिम इमानदार, नमाज पडणारा, रोजा ठेवणारा,हज करून आलेला  आणि न चुकता समाजाच्या उन्नतीसाठी जकात दरवर्षी भरणारा असतो. मानव प्राण्यावर नेहमी प्रेम करतो.सहानुभूती दाखवितो आणि नियमितपणे सहायता करतो.
 रमजान मध्ये रोजा पकडणे म्हणजे सर्व वाईट कामावर सवयीवर विजय मिळविण्यासाठी तयार करणे होय.रोजा पकडला असेल तर वाईट मार्ग पासुन दूर राहिले पाहिजेच व वाईट लोकांच्या जवळ पास थांबायला मनाई असते.रोजा जेव्हा पकडला जातो तेव्हा भूख प्यास काय असते यांची त्यांना जाणीव होते त्यामुळेच भुख्या प्यास्या माणसाला पाहून रोजा पकडणाऱ्याच्या मनात दया उत्पन्न होते. सकारत्मक विचाराचे मनात घर पक्के होते.त्यातुनच दान करण्याची इच्छा होते.त्यामुळे पुण्य लाभते,मनाची एकाग्रता लागते.उत्पन्नात मोठी वाढ होते.रोजा सुरू असतानांच वर्षभराची जकात भरला जातो.रोजा पकडणाऱ्या व्यक्ती बद्दल समाजात आदर निर्माण होतो.खोटे बोलून फसवणूक करणे,हिंसा करणे,निंदा,चुगली करणे भ्रष्टाचार करणे यापासून वेगळे राहण्याची प्रेरणा मिळते.म्हणूनच एक महिन्याच्या रोजात या सर्व वाईट गोष्टी पासून वर्षभर दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.कुराण मध्ये अल्लाने सांगितले आहे की रोजा स्वतःला शुद्ध विचारांचा करण्याची पहिली पायरी आहे.त्यामुळे तुम्ही वाईट कामा पासुन स्वतःचे रक्षण करू शकता त्यापासुन दूर राहू शकतात. अल्ला खुदा च्या अस्तित्व मान्य करा त्यांची मनात आदरयुक्त भीती निर्माण करा.त्यामुळेच सर्व क्षेत्रातील मुसलमान अमीर,गरीब,उच्च शिक्षित अडाणी मशिदीत एक लाईन मध्ये नमाज पडायला उभे राहतात.जो जसा येईल तो तसाच लाईन मध्ये उभा राहून नमाज पडतो. त्यांच्या मनातील सर्व विकार नष्ट होऊन विनम्र पणे तो सर्वच्या मध्ये उभा राहतो तेव्हा तो फक्त पांच कर्तव्य पार पाडणारा माणूस असतो.
मशिदीत सर्व सामान असतात सर्वनां सामान स्वातंत्र्य अधिकार असतात.हिंदूंच्या मंदिरात असे पाहण्यासाठी मिळेल काय?. ब्राम्हण सर्व श्रेष्ठ, जास्त पैसे देणारा दानशूर समाजसेवक  मग तो किती भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारा असो तो मोठा भक्त ठरतो.हिंदू धर्मात वर्णाला महत्व आहे. ब्राम्हण बनिया सर्व श्रेष्ठ असतात बाकी क्षेत्रिय,शूद्र,अतिशूद्र शूरवीर, कलाकौशल्य निपुण्य असले तरी ते समता, स्वातंत्र्य व अधिकारांचे हकदार नसतात.देशाचा राष्ट्रपती सुद्धा नाही. हेच संस्कार व सांस्कृतिक शिक्षण लहानपणा पासुन शिकविले असल्यामुळे मोठे झाल्यावर ही मुलं मुली उच्च पदस्थ अधिकारी झाल्यावर लोकशाही, मानव अधिकार किंवा माणसाला माणसासारखे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यात नसतो.त्यामुळेच त्यांना देशातील सर्व मुसलमान गुन्हेगार वाटतात.जे व्यभिचार,चोरी, मारामारी, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात ते अल्ला ने सांगितलेल्या पांच कर्तव्य मानणारे नसतात.म्हणूनच ते स्वतः बरोबर मुस्लिम समाजातील पांच कर्तव्य इमानदारीने पार पाडणाऱ्या समाजाला बदनाम करतात. 
रोजा पकडणारा एका वर्षी रोजा पकडला तर जिवंत असे पर्यत रोजा पकडतो.आरोग्य ठीक नसेल शरीर साथ देत नसेल तरी तो नमाजाच्या वेळी जिथे असेल तिथे डोळे बंद करून हात जोडून आपले कर्तव्य पार पाडतो.आजूबाजूला कोणतेही वातावरण असु द्या त्याला त्यांच्या कर्तव्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणूनच रमजान महिन्यातील रोजा हा कोणा विषयीही मनात कटुता न ठेवता सार्‍यांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्याचे हे दिवस असतात. 
शांतीचा संदेश देणारा रमजान महिना सुरु असतांना काही ब्राम्हण पेशवे दंगल कशी घडविता येईल यांचे नियोजन भोंगे विरोधी हनुमान चालीसा पठण करून करीत आहेत. 
‘प्रेम दिल्याने वाढते’ असे म्हणतात. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून विविध धर्मीयांमध्ये प्रेम वाढीस लागावे, अशी अपेक्षा असते. डिजिटल इंडिया, स्मार्टफोनच्या आजच्या वातावरणात ती आता काळाची गरज ठरू पाहत आहे. यातूनच विश्‍वबंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे. रोजे म्हणजे फक्त उपवास किंवा उपाशी राहणं नव्हे तर या काळात रोजेदाराने काही मानसिक आणि व्यावहारिक नियम पाळणेही बंधनकारक असते.रमझानच्या काळात डोळे, कान आणि तोंडाचा चुकीचा वापर वर्ज्य आहे. म्हणजेच वाईट ऐकणे, बघणे किंवा बोलणे या तिन्ही गोष्टींना या काळात मनाई असते. रोजा म्हणजे रोखणे. परंतु या काळात केवळ तहान-भूक या गोष्टींवरच नियंत्रण आणले जाते असे नाही तर अनेक चुकीच्या गोष्टी कायमस्वरूपी दूर फेकण्याची प्रेरणा देऊन जाणारा महिना किंवा वार्षिक उत्सव असतो. आता त्यात चांगले घेणारा चांगलेच घेणार!. वाईट विचार करणाऱ्या माणसाला तुम्ही किती चांगले सांगा तो या कांनाने ऐकणार व दुसऱ्या कांनाने सोडून देणार. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वता पासुन करावी लागते. मग श्रावण महिना असो की वर्षावास असो. रमजान महिन्यातील रोजा तो स्वतःला करावा लागेल. तेव्हाच त्यांचे महत्व समजून घेता येईल.  
रोजा पकडण्याच्या काळात गरीब, निराधार व्यक्तींची मदत करण्याला मोठे महत्त्व असते. आपण जो आहार घेतो तोच आहार या व्यक्तींना ही दिला जायला हवा म्हणून रोजा एकटा माणूस कधीच सोडत नाही. तो सर्वाना सोबत घेऊन सोडला जातो. या काळात प्रत्येक मुस्लीम धर्मीयाने सदाचारी वर्तन ठेवणे बंधनकारक आहे.म्हणूनच तर समाजातील सर्व घटकांना गोरगरीब कष्टकरी फेरीवाले, रिक्षावाले सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक रोजा सोडण्याचा टेबल लावतात.येणारे जाणारे त्यांच्या कडे कौतुकाने पाहतात.कारण हा रोजा घराच्या चारभीतीच्या आत होणारा व्यक्तिगत सण नाही.तर समाजाला योग्य मार्ग दाखविणारा राष्ट्रीय पातळीवर संस्कार देणारा सण आहे. या काळात खोटे बोलणे, बदनामी करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीबद्दल अनुद्गार काढणे, खोटी शपथ घेणे आणि लोभ धरणे या गोष्टींमुळे रोजाचे फळ मिळत नाही. उपवासा सोबतच मानसिक आचरण शुद्ध ठेवणं रमजान काळात गरजेचे असते. हा अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा, सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा  दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण मुस्लीम धर्माचे पालन करणार्‍या प्रत्येकासाठी मानवतेची अनोखी शिकवणच आहे. म्हणूनच रमजान म्हणजे काय ?. प्रत्येक माणसाला माहिती असणे आवश्यक आहे. 
आपला धर्म चांगला व इतरांचा वाईट ही भावना कोणत्याही माणसात असता काम नये. भारतात सर्व धर्माचा आदर केला जातो म्हणून तो जगात सर्वधर्मसमभाव मानणारा देश म्हणून ओळखल्या जातो.सहा हजार सहाशे जातीत पोटजातीत धर्मात विभागलेला हा माणूस म्हणून भारतात गुण्यागोविंदाने राहतो, जगतो काही अपवादत्मक लोक समाजाच्या शांतीला सुरुंग लावुन आग लावण्याचे काम करतात. पण ते त्यात काही प्रमाणात यशस्वी होतात पण ते जास्त दिवस टिकत नाही.म्हणूनच आपल्या आजूबाजूला कोणत्या धर्माचा माणूस राहतो तो त्या धर्माच्या शिकवणी नुसार वागतो का?. जो धर्माच्या शिकवणी नुसार वागत नसेल तर तो सर्वाना मानसिक शारीरिक त्रास देण्यासाठी त्रासदायक काम करून आपले उपद्रवमूल्य दाखवुन सार्वजनिक वातावरण दूषित करीत राहील.त्या एका व्यक्तीमुळे सर्व समाज बदनाम होतो.असा व्यक्ती पासून सावध राहावे ही काळजी आजच्या काळात सर्व समाजाने घेतली पाहिजे.  रमजानचा महिना आणि ईद-उल-फित्राच्या सणाला सर्व समाजाला वाचकांना माझ्या व माझ्या लोकप्रिय दैनिका कडून हार्दिक शुभेच्छा !!!.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई