शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!.

 आयु.बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांना वाढदिवसा निमित्य खुले जाहीर पत्र 

         आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!. 

आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर आज आंबेडकरी चळवळीचे खरे रक्ताचे वारसदार आहेत. पण आपण खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे वारसदार आहेत. परंतु राजकीय वारसदार आज ही होऊ शकले नाहीत. कारण तुम्ही जिथून सुरुवात केली होती.ती परिस्थिती आज ही जशीच्या तशीच आहे. सम्यक समाज आंदोलन या सामाजिक जनआंदोलनातून आपण सुरवात केली होती.त्या जनआंदोलनाचे आपण नेते होता.पण त्यात मोठे योगदान देणारे नेते अर्जुन डांगळे आणि अविनाश महातेकर हे होते.याच्या मुळेच मुंबईसह राज्यात गांव तिथे बौध्द महासभेची शाखा, गांवागांवात जाऊन जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता. त्यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले.खूप मोठी जनजागृती झाली होती.असे लिहले तर चुकीचे होणार नाही.त्यामुळेच राजकीय समीकरण बदलली होती. तो बदल समाजवादी, डाव्यांनी उचलून धरल्यामुळे सतत प्रसिद्धी मिळत होती. तेच हवा निर्माण करीत होते.हे सर्वच मान्य करतात.तो बदल काही अर्थाने पूर्ण झाला असे म्हणता येत नाही.आणि अपूर्ण राहिला असे ही म्हणता येत नाही.मागासवर्गीय समाजातील लोक बहुजन म्हणूनच जवळ आले.विशेष बुलढाणा,अकोला जिल्ह्यातील बौद्ध समाजावर होणारे हल्ले,अन्याय,अत्याचार करणारे कोण आहेत हे पाहिल्यावर, आपले एकूण संघटन,बौद्ध महासभा,भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या चळवळीशी असलेला घरोबा कुठे तरी कमी पडतो असे वाटते.त्याचे सत्यशोधक पद्धतीने आत्मपरीक्षण करून त्यातील काही प्रश्न आपल्या वाढदिवसा निमित्य आपल्या भक्त आणि शिष्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न करतो. कारण आंबेडकरी चळवळीत अनेक बुद्धिवादी लेखक, पत्रकार,साहित्यिक आहेत.पण त्याच्या मध्ये एका गोष्टीचा अभाव आहे.तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात नाही.सत्य मांडल्यावर समाज काय म्हणेल?.सत्ताधारी नाराज होतील.याची त्यांना भिती वाटते. म्हणून ते सत्याला सत्य म्हण्यास लिहण्यास घाबरतात.हे आपणच (विचारवंतां कडून अपेक्षा -आंबेडकर चळवळ संपली आहे.पण नंबर ३६ ) म्हटले आहे.त्यामुळे हा नियम मला लागू नाही.कारण मी प्राध्यापक,वकील , इंजिनियर,साहित्यिक,विचारवंत नाही. एक असंघटीत कामगार व कार्यकर्ता आहे.आणि अब्राम्हणी सत्यशोधक मासिकातून लिहता लिहता वृत्तपत्रात लिहायला लागलो.क्रांतिकारी विचारांच्या चळवळीची दिशा व दशा यावर सत्य शोधक नजरेतुन चिंतन आणि परीक्षण करून लिहायला लागलो.
    भूमिहीन शेत मजुरांचे प्रश्न सोडविण्या करिता त्यांना आपण गायरान,पडीत,वनविभागाच्या जमीन ताब्यात घेऊन कसायला लावून शेतमजुरांचे अल्पभूधारक शेतकरी केले. त्याच्या त्या कसलेल्या जमिनी नांवावर करण्यासाठी "भूमिहीन हक्क संरक्षण समिती स्थापन" केली होती. त्यामुळे बाबासाहेबाच्या लढ्यातील एका सेनापतीच्या अर्धवट राहिलेल्या लढ्याला आपण एक वेगळी दिशा देण्याचे काम हाती घेतले होते. "कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय?."  या घोषणेने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश ढवळून निघाला होता.तोच धागा पकडून आपण राजकारण नको समाजकारण हवे त्याच्या समाज परिवर्तनातून राजकारण करू असाही आपला संकल्प होता.त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय,शोषित, पिडीत, आदिवाशी समाज तुम्हाला अंधार नष्ट करणारा नवा सूर्य प्रकाश म्हणत होती.सूर्याची किरण वरून खाली येतात.इथे प्रकाश खालून वर गेला.आणि बरेच काही विसरला.असे भूमि कसणारे हक्कदार म्हणतात.काही लढता लढत मेले. त्या आंदोलनातील लोक काल पण आपल्या सोबत होते आणि आज ही तुमच्या सोबत असतील ते केवळ बाबासाहेबांचे नातु म्हणून. 
पण कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहक्क समितीचे पुढे काय झाले?.मराठवाडा, विदर्भातील पडीत,गायरान, वनविभाग शेत जमीनी नांवावर झाल्या काय?.आपली राजकीय शक्ती वाढली असली तरी बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्येने शेतजमिनी नांवावर आज ही झाल्या नाही त्यांचे दावे अपात्र ठरविण्यात आले.अनेक गांवात वन हक्क समितीचे गठन होत नाही.त्यामुळेच नाहरकत पत्र, ठरावाचे पत्र ग्रामसभा देत नाही.त्याबाबत आता आपली आपल्या पक्षाची कोणतीच ठोस भूमिका का नाही.एस सी,एस टीच्या शे पाचशेच्या मतदानाच्या साठी पाच दहा हजार मतदान असलेल्या बहुजन समाजातील लोकांनां आपणास नाराज करायचे नाही हेच राजकारण त्यामागे आहे की नाही?.म्हणूनच प्रदिप भाई,अंभोरे, जगदीश इंगळे,नरसिंग गायकवाड,कडूदास कांबळे यांना भूमी मुक्ती मोर्च्या, बहुजन मुक्ती मोर्च्या सारख्या अनेक संघटनानां हे भूमिहीन,शेतकऱ्यांचे जन आंदोलन करावे लागत आहे.१९८२/८४ पासुन शेतजमीन कसणाऱ्या भूमिहीन शेतकाऱ्यांच्या जमिनीची नोंद सातबाऱ्यावर होत नाही.गांवातील बौद्धांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जागरूकता बहुजनास सहन होत नाही.म्हणून अन्याय, अत्याचार व लक्षवेधी हत्याकांड  होत आहेत. म्हणजेच आपण जिथून सुरुवात केली होती.ते समस्या आज ही कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. यांचा आपणास राजकीय सोयी साठी सोयीस्कर विसर करावा लागत असेल तर सामाजिक आंदोलन राजकिय दृष्ट्या यशस्वी कसे होईल असा माझा प्रश्न आहे.तो तुमच्या भक्तांना कार्यकर्त्यांना चुकीचा वाटत असे.तर त्यांनी आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील असंघटित कष्टकरी शेतमजूर, भूमिहीन लोकांचा सर्वे करावा.
आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय अध्यक्ष झाल्यावर " माझा पक्ष,माझी सत्ता " घोषणा दिली.आणि मी आंबेडकरी चळवळीतील राजकीय निळ्या आकाशातील चमकणारे तारे आहोत.हे दाखवून दिले.ज्या डॉ बाबासाहेबाच्या रक्ताचे आपण वारसदार आहेत.त्या बाबासाहेबानी आपले आयुष्य अस्पुष्य समाजाला धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी खर्ची केले.त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था,संघटना, पक्ष निर्माण केल्या. त्याची सुरवात त्यांनी "बहिष्कृत हितकारणी सभा " स्थापन करून केली.पुढे त्याचा विस्तार करत "समाज समता संघ " उभा केला.राजकीय क्षेत्रात आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी 'स्वतंत्र मजूर पक्ष ' स्थापन केला. भारतदेश हा कृषी प्रधान आहे ७०% लोक शेतीवर मजुरी करून जगतात.त्यातील ८५% समाज हा बहुजन समाजातील आहे.म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त भटक्या जाती, इतर मागासवर्गीय,आदिवाशी समाजातील लोक आहेत.हे सर्व भारिप बहुजन महासंघाचे अधिकृत सभासद असणारच. त्याच्या साठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून राजकीय हक्क्चे व्यासपीठ निर्माण केले होते. तो पक्ष ते विचार आज कोणा कडेच जिवंत नाहीत.देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन काढून त्या 
​स्वतंत्र मजदूर युनियन Independent Labour Union (ILU).​
 
संलग्न कराव्यात आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियन निर्माण करून सरकारवर कायमस्वरूपी दबाव ठेवावा हेच मागासवर्गीय समाजाचे कामगारांचे मुख्य उद्धिष्ट असले पाहिजे होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ल्या गोष्टीकडे कार्यकर्ते नेते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने न जाता नवीन मार्ग शोधतात त्यात आपली मोठी शक्ती खर्च होतेच पण मतभेदांमुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज विखुरलेल्या जात आहे.यात आपली निर्णायक भूमिका आणि जबाबदारी असली पाहिजे होती.ती आपण पार पाडतांना दिसत नाही.
बाळासाहेब मागासवर्गीय बहुजन समाज हा सर्वात मोठा असंघटीत कामगार आहे.आज त्याची संख्या सरकारी ९३% आहे.त्याचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अनेक योजना आहेत.त्याची आपणास संपूर्णपणे माहिती असणारच.पण आपण म्हणता की सरकारी योजना मागासवर्गीय समाजाला अपंग बनवितात.मग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी विकासासाठी राज्य व केंद्रात ज्या योजना कायदेशीर रित्या बनवुन देशाला अर्पण केला.त्या चुकीच्या होत्या काय?.डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे स्वप्न होते की माझा समाज सत्ताधारी जमात व्हावा.महाराष्टातील आजची राजकीय वर्तमान स्थिती पाहता रिपब्लिकन पक्षातील फुट एकजातीय आहे.केवळ सर्व बौद्ध समाज एकत्र आला तर राजकीय टक्केवारी पाहता सत्ताधारी बनू शकत नाही.पण सर्व बौद्ध समाजातील आंबेडकरी गट एकत्र आले तर एकच गट मजबूत होऊ शकतो.त्याची एकी पाहून इतर मागासवर्गीय आदिवाशी भटक्या समाजातील लोक या पक्ष कडे आकर्षित होऊ शकतात.त्यासाठी एक विश्वास पात्र नेत्याची गरज आहे. आणि ते फक्त बाळासाहेब आंबेडकर असु शकतात.त्यासाठी त्यांना दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी पण दाखवावा लागेल. विद्यार्थी दसे पासून ज्यांनी आंबेडकरी


चळवळीत अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष केला.आणि सत्ते जवळ गेले त्यांना जर आपण बांडगुळ म्हणणार असाल तर?.असे लोक प्रत्येक जिल्ह्यात आहेत. मागासवर्गीय समाजात आंबेडकरी चळवळी त्यांना मान्यताप्राप्त नेता म्हणून मानले जाते त्यांना आपण चॅनल मीडिया प्रिंट मीडिया समोर ओळखत नाही असे सांगता. पण चळवळीतील जेष्टनेत्याच्या श्रद्धांजली सभेत त्यालाच उभे राहण्यासाठी हात देता.त्यांच्या मातोश्रीच्या अंत्यसंस्कार यात्रेत सहभागी होता.हे कौतुकास्पद आहेच  यांचा समाजात प्रचंड परिवर्तन घडविणारा संकेत जातो. यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या कथेचे पारायण सर्व गटाच्या प्रमुखना करावे लागेल.२१ जानेवारी १९४९ रोजी औरंगाबादला झालेल्या कार्यकमात बाबासाहेब आपल्या अनुयायांना उदेशून सांगतात.जो पर्यंत तुम्ही तुमची मजबूत संघटना जगाला इतर समाजाला दाखवत नाही तो पर्यंत तुमच्यावर असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतच राहतील.म्हणून दुसऱ्यावर अवलबून राहू नका.स्वताची ताकद निर्माण करा.मग पहा तुम्हाला कोण त्रास देतो. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना शंभर वेळ विचार करावा लागेल.बाळासाहेब आज जो तो नेता संस्थापक राष्टीय अध्यक्ष आहेत.त्यांना त्याची मर्यादा आपण दाखवू शकता.प्रत्येक नेत्याला त्याचा मतदार संघ वाटून द्या इतर जिल्ह्यात मतदार संघात ढवळाढवळ करण्याचीही कोणालाही गरज नाही.आपण लिहता की आंबेडकरी चळवळीचा व आंबेडकरी विचाराचा माणूस मोठ्या प्रमाणत मुंबई,नांदेड, विदर्भातील बुलढाणा,अकोला,भंडारा,गोंदिया,चद्रपूर,नागपुर,गडचिरोली,असे काही आंबेडकरी जिल्हे आहेत. तिथे आंबेडकरी विचारधारेची माणस घडविण्याची गरज आहे.( आंबेडकरी चळवळ संपली आहे,पान ४१/४२ )
      ऍड बाळासाहेब आंबेडकर उर्फ  प्रकाश आंबेडकर यांच्यावर लिहणे म्हणजे खूप मोठी जोखीम असते .त्याच्या भक्तांना त्याच्या बाबत खरे लिहणे पसंत पडत नाही.प्रकाश यशवंत आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण तडपदार नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्याच बरोबर ते अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी नि परिवर्तनवादी म्हणून ही त्यांची ख्याती आहे असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्यामुळे सर्व समाज त्यांचा खूप आदर करतात. पण त्या पलिकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण करत राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली. खरं तर बाबासाहेबांच्या घरात जन्माला आल्यावर नावाचा जो फायदा मिळतो तो मिळालाच पण त्याच बरोबर मोठ्या माणसाच्या घरात जन्मास येण्याचे तोटे ही असतात.प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे उगीच लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या अन त्यात काही वावगं ही नाही.मात्र त्यातून सावरत त्यानी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत अकोल्यात वेगळा राजकीय आदर्श घालून दिला.एकमेव नेता असा आहे कि ज्याचा स्वताचा मतदार संघ आहे.बाकी सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेते उंटावरचे शहाणे आहे.जे स्वताला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात पण वीस वर्षात स्वताचा मतदार संघ बांधू शकले नाहीत.म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बनावे.करीता मित्रांना शत्रू न बनविता मित्रच राहु द्या मित्र शत्रु झाल्यास काय होते हे एका गोष्ठीतुन पाहता येईल. एकदा कुत्र्यात व गाढवात पैज लागते की जो लवकरात लवकर मुंबईत जाईल तो सिंहासनावर बसेल. ठरल्याप्रमाणे दोघेही तयार झाले.कुत्र्याला वाटले मीच जिंकेल कारण गाढवापेक्षा मी जास्त धावू शकतो.पण कुत्र्याला पुढे काय होणार यांची नक्की माहिती नव्हती.शर्यत सुरू झाली कुत्रा जोरात धाऊ लागला.पण थोडेसे पुढे गेला नसेल तर लगेच गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासना जवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते.त्यामुळे त्याने शर्यत जिंकून ते राजा झाले होते.निराश झालेला कुत्रा तेव्हा म्हणतो माझ्याच लोकांनी मला मागे ओढलं नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.हीच परिस्थिती मागासवर्गीय बहुजन समाजातील नेत्यांची कार्यकर्त्यांची झाली आहे.म्हणूनच आपल्या माणसांना विश्वासात घ्या,पुढे जाण्यासाठी सहकार्य करा.त्यांना प्रोत्साहन द्या,नाहीतर बाहेरची गाढव आपल्यावर राज्य करीत राहतील.म्हणूनच 
बाळासाहेब आपल्या कडून सर्व समाजाची खूप अपेक्षा आहे.आपण समाजाचे ऐक्य घडवू शकतात.पण आपला अभिमान आडवा येतो. आपण  स्वाभिमान आहात, स्वाभिमानी असावे पण समाज हिता करिता अभिमान आणि स्वाभिमान. समान अंतरावर ठेवल्यास बाबासाहेबाचे खरे रक्ताचे नाही तर वैचारिक वारसदार आपणच ठरू शकता. फक्त आपल्याला वीस पावले मागे येऊन पन्नास पुढे जाता येईल.आपण पंधरा वीस आमदाराची अपेक्षा करता. ऐक्य झाल्यास पन्नास साठ आमदार आपण सहज निवडून अनु शकता.त्याकरिता आपल्या समोर आंबेडकरी जिल्ह्याची अभ्यासपूर्ण माहिती आहे.त्याचा योग्य वापर करा आणि आंबेडकरी चळवळीतील समाजाचे ऐक्य घडवा.आणि आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!. आपल्या वाढ दिवसा निमिती हार्दिक शुभेच्छा 
आपला 
सागर रामभाऊ तायडे- भांडूप मुंबई -९२२१३१५८०६,

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

लॉक डाऊन होईल काय?.मनाला सुन्न करणारी गोष्ट

 लॉक डाऊन होईल काय?.मनाला सुन्न करणारी गोष्ट 


२३ मार्च २०२० ला देशात पहिला लॉक डाऊन झाला तेव्हा कोरोनाच्या भीतीमुळे इटली,स्पेन अमेरिका सारखे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सज्ज असलेले देश कोलमडून पडले होते. त्यांच्या देशात सरकारने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्या जातात म्हणून ते कोरोनाशी चिवटपणे संघर्ष करून तग धरून होते.या उलट भारतात झाले होते,कायदा फाट्यावर मारणारे सुदैव्याने राज्य व केंद्रात सत्तेवर होते इतर देशांनी नोव्हेंबर,डिसेंबर २०२० ला दक्षता घेऊन उपाय योजना केल्या होत्या.महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारा देश त्याबाबत कोणतीच तयारी करीत नव्हता.केंद्र सरकारने गांभियाने घेतले नाही म्हणूनच जनतेणे ही गांभीर्याने घेतले नाही. देशातील विरोधी पक्ष सुद्धा मानसिक दुष्ट्या अपंग झाला होता.त्याचा आवाजात दम राहिला नव्हता.प्रत्येक राज्यातील शहरात लोक सैरावैरा जीव वाचविण्यासाठी शहर सोडून गांवाकडे पायी जात होते.त्यावर पोलिसांना लाठी चार्ज करावा लागत होता. तरी ही रोडवरील गर्दी कमी होतांना दिसत नव्हती हे इतर देशांच्या लोकांसाठी मनाला सुन्न करणारी गोष्ट होती.आज आता मुंबई सारख्या महानगरीत लॉक डाऊन होईल काय?.या भितीमुळेच लोक थंडी तापाने फणफणत आहेत.
परदेशात असलेले भारतीय लोक तेव्हा आपल्या लोकांना सावधान करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या भागातून व्हिडीओ क्लिप पाठवीत होते. तरी आपण भारतीय लोक त्या गांभीर्याने पाहत नव्हतो आणि  विचार ही करत नव्हतो. कोरोना च्या गंभीर संकटावर चर्चा होण्या ऐवजी पोलिसांनी दंडे का मारले त्यांना हा अधिकार कोणी दिला यावर जागोजागी चर्चा होतांना दिसत होती.ही मनाला सुन्न करणारी गोष्ट होतीआता एप्रिल २०२१ ला लॉक डाऊन होईल काय?.ही मनाला सुन्न करणारी गोष्ट होत आहे.
 एक डॉक्टर मरण्या पुर्वी आपल्या घरी बायको,मुलांना भेटण्यासाठी जातो, बायको मुलांना गेट वर थाबूंन बाहेरून पाहतो.थोडी विचार पूस करतो. अणि निघुन जातो. हॉस्पिटल मध्ये गेल्यावर निसर्गाच्या विज्ञानाच्या नियमानुसार या जगाचा निरोप घेऊन निघून जातोकिती दुःखाचा क्षण असेल तो की आपल्या बायकोची,मुलांची गळाभेट सुध्दा घेता आली नाही, ना प्रेम करता आले, ना पापी घेता आली आपल्या लेकरांची, ही मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे कि नाही?. 
ही घटना अखंड मानवजात आपली कर्जदार असेल डाॅ हैदियो अली हे नांव नेहमी लक्षात ठेवा, हे मार्मिक चित्र त्यागाची प्रतिक आहे इंडोनेशियाचे डाॅ हैदियो अली यांची गोष्ट गेल्यावर्षी मनाला वेदनादायक होती, जे कोराना बाधीत रूग्णांचा इलाज करता करता स्वत सक्रंमित झाले. जेव्हा त्यांना वाटलं की ते आता वाचु शकत नाही तेव्हा ते आपल्या घरी गेले, बाहेरूनच आपल्या घराच्या गेटवर थाबुंन आपल्या गर्भवती पत्नी व दोन लहान चिमुकल्या मुलांना मन भरून पाहीले, आणि निघुन गेला,तेव्हा त्यांच्या पत्नीने फोटो होता, जेव्हा शेवटचा आपल्या गर्भवती पत्नी व दोन लहान चिमुकल्या मुलांना मन भरून पाहीले आले होते तेव्हा,ते लांबुनच पाहत थांबले होते, त्यांना नव्हत वाटतं की त्यांच्या मुळे त्यांच्या पत्नी व दोन लहान चिमुकले कोरानाच्या संपर्कात यावे म्हणून ,
डाॅ हैदियो अली हे माणसाच्या रूपात खरा सुपरहिरो ठरला आहे, त्यांनी मानवजाती साठी दिलेले बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी आपण त्यांनी दिलेला संदेश पाळावा. 
गेल्या वर्षी 30 मार्च राष्ट्रीय डॉक्टर दिन होता. तेव्हा संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत होता. यात आघाडीवर होते अर्थातच डॉक्टर आणि त्यांचे सहकारी. तळहातावर शिर घेऊन हे योद्धे मैदानात उतरले होते. नोकरीचा भाग म्हणून काम करणं वेगळं आणि एक मिशन समजून त्यात स्वतःला झोकून देणं वेगळं,जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं अशी शेखी मिरविणारे कीडे-मकोडे-भिडे भारतात पायलीचे पंधरा आहेत.विज्ञानाची कास धरत कोरोना संकटाचा हे योद्धे निडरपणे आणि समर्पित भावनेने मुकाबला करत आहेत. कारण ते जाणतात अध्यात्माचा अंतिम थांबा विज्ञानच असून आपणास थांबता येणार नाही.संकट आल्याशिवाय माणसं देव आणि डॉक्टरांचा धावा करत नाहीत. ही मानवी प्रव्रुती होय. कदाचित म्हणूनच 'गरज सरो,वैद्य मरो.' ही म्हण रूढ झाली असावी. एकच वाटतं- कोरोनावर मात करायची असेल तर देवाचा धावा नव्हे; तर डॉक्टरात देव शोधा. त्यांचे मनोबल वाढवा.कोरोनाला हरविण्यासाठी डोक्याला कफन बांधून लढणा-या डॉक्टर,नर्स आणि सर्व सफाई कामगार कर्मचारी वर्ग यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत.कोरोना संकाटला रोखले नाही तर मनाला सुन्न करणाऱ्या घटना घडतील त्यांची कल्पना करावी.
 सरकारच्या सुचनाचे पालन नाही केले तर डॉक्टर आणि हॉस्पिटल बेड मिळणार नाही.भारत १३५ कोटी लोकसंख्येचा देश.८४ हजार लोकांमागे आयसोलेशनबेड, ३६ हजार लोकांमागे १  क्वारंटाईन बेड, देशात ॲलोपथी डाॅक्टर ११ लाख ५४ हजार सरकारी रुग्णालयातील बेड्स  लाख, गेल्या वर्षीचे हे आकडे आहेत. 
देशातील नागरिकांवर महामारीचे भयानक संकट असतांना ही आपण हॉस्पिटलला महत्व दिले नाही तर राम मंदिर साठी गावागावात मंदिर निर्माण निधी मोठ्या उत्सवात संकलन करण्यात आला. कोरोनाच्या पहिल्या आक्रमानातून आपण काहीच शिकलो नाही, म्हणून दुसरे आक्रमण आता सर्वानाच भारी पडणार आहे. लॉक डाऊन कोणाला परवडणारा नाही. गेल्या वर्षाच्या अनुभवातून आपण काहीच शिकलो नाही.या वर्षी आपण त्यात काय काय सुधारणा केली हे राज्य व केंद्र सरकार सांगूच शकत नाही. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला तर नियंत्रण करणे अवघड होईल आणि डाॅक्टर,हाॅस्पिटल दोन्ही मिळणार नाहीत. म्हणूनच सर्वांनी सरकारच्या सूचना पाळाव्यात.लॉक डाऊन होईल काय?.मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे.
अशा परिस्थितीत ही सुरक्षित नोकरी करणारे सरकारी कर्मचारी गोरगरिबांची अडवणूक करून दंडाच्या नांवावर वसुली करत राहणार.भरमसाठ पगार,भत्ते असूनही ते समाधानी नाहीत.त्यांच्या अकुशल कर्माची शिक्षा याच जन्मी निवृत्तीनंतर त्यांचे मुलं व समाज त्यांना देत असतात.
जन्मापासुन ते मृत्युपर्यत माणुस जगण्यासाठी प्रत्येकाशी शर्यतीत धावत असतो आणि तिथे जो थांबला तो संपला.पण आज आयुष्यात पहिल्यांदाचं अशी शर्यत होतेय,जो थांबेल तोच जिंकेल.अशी गेल्या वर्षी परिस्थिती होती.हजारो लाखो लोकांची नोकरी गेली होती.सर्वात मोठे संकट असंघटीत कामगारांच्या कुटुंबावर आले होते.लॉकडाऊनमुळे गेल्या 
२३ मार्च ते २३ सप्टेंबर २०२० मी घरात बसून अत्यावशक सेवा देत होतो.निवांतपणे झोप येत नव्हती.सतत असंघटीत कामगारांचे मोबाईलवर कॉल सुरु होते. त्या सर्व मनाला सुन्न करणाऱ्या गोष्टी आहेत.असंघटित कामगारांच्या वतीने मायबाप सरकारला विनंती आहे,पोटावर मारू नका, पाठीवर मारा!.लॉक डाऊन करण्या आदी भुकेला टाळेबंदी करुन दाखवा,
मग आजन्म लॉकडाऊन करा. पुरे एक वर्ष झाले सरकारने हा खेळ मांडला आहे कोरोनाची भिती दाखऊन माणूस घरात कोंडला आहे. तुम्हाला भीती वाटते लोक रस्त्यावर उतरून जाब विचारातील. त्या भीतीमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या मनात असंतोष वाढत आहे. मनुवादी विरोधी पक्ष त्याला हवा देण्याचे कार्य अहोरात्र करीत आहे. त्यामुळेच एक ना एकदिवस जनभावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.हे मात्र निश्चित आहे.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.

बुधवार, ३१ मार्च, २०२१

कामगार संघटना कोणी संपवील्या?.

 कामगार संघटना कोणी संपवील्या?.


जगातील कामगारानो एक हो!. असे म्हणतांना आता कोणी दिसत नाही.गर्वसे कहो हम कामगार नही हिंदू है !!!. म्हणणारे हिंदू ही आता कुठे दिसत नाही. "जो हक मांगनेसे ना मिले, उसे छिन के लेना पढता है. हे कामगार कर्मचारी अधिकारी एकूण ट्रेंड युनियनचे नेतृत्व करणारे नेते विसरले म्हणूनच कामगार संघटना, युनियन संपविला गेल्या.कामगारांची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन संपविला कोणी?.
ही भांडवलदारांची "हम दोन हमारे दोन" हुकुमशाही देशात मुळेघट्ट करीत आहे.
आरक्षणातील पदोन्नती साठी कामगार कर्मचाऱ्यांचा जो संघर्ष आज सुरू आहे.तेच जर स्वताच्या वैचारिक संघटना मजबूत केल्या असत्या तर,आज तो संघर्ष त्यांना करावा लागला नसता.त्यांचा कामगार चळवळीचा इतिहास वाचला असता तर?. जगातील ज्या काही क्रांत्या झाल्यात त्यामध्ये कामगारांची महत्वपूर्ण भूमिका होती. हे लक्षात आले असते.
 कामगार संघटनांनी शासनावर नेहमी दबाव ठेवावा, जर शासन ऐकत नसेल तर सत्ता हस्तगत करावी. ही बाब बाबासाहेबांनी मुबंईच्या मील संपाच्या भाषणात प्राकर्षाने सांगितली होती. पण आम्ही या बाबीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे याचा फायदा अनेक मनूवादी कामगार संघटनांनी उचलला.त्यांनी राष्ट्रीय ट्रेंड युनियन बनविल्या,भांडवलदार आणि सत्ताधारी पक्षाची त्यांनी हातमिळवणी केली. गर्वसे कहो सांगून आम्हाला मात्र जात,धर्म,प्रांतात गुंडाळून ठेवले. संघटित कामगारांना उध्वस्त करून असंघटीत कामगारांच्या फौजा निर्माण केल्या.कामगार कल्याण मंडलात सर्व त्यांचेच प्रतिनिधी (कामगारांच्या सभासद संख्येनुसार नाहीत) आहेत. त्यामुळे आजही आम्हाला minimum vej (किमान मजूरी) पूरेशी मिळत नाही. जनआंदोलनात आमची भाषा मात्र नेहमी "असा कसा देत नाही?. घेतल्या शिवाय राहत नाही!." अशी असते. त्यामुळे आपल्याला जमिनीवर उभे राहून भान ठेवून बोलले व वागले पाहिजे.राष्ट्रीय संघटन बनविले पाहिजे की नाही?.किमान वेतन न दिल्या गेल्यामुळे देवयानी खोब्रागडे यांना परदेशात काय भोगावं लागलं हे यादेशातील प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती तरी महिने ओरडून सांगत होती. मिनीमम वेजचे इतर देशात काय महत्व आहे हे आपल्या देशातील कोणत्याच कामगारांच्या ट्रेंड युनियन व  मीडियाच्या लक्षात येत नाही.
  स्वतंत्र मजदूर यूनियन(आय एल यु ) संपूर्ण देशभर रेल्वे, विद्युत,बँक,कृषी,महसूल,जिल्हा परिषद, शिक्षक कर्मचारी,अंगणवाडी, इमारत बांधकाम कामगार, शेतकरी,शेतमजूर व सर्व संघटीत,असंघटीत कामगारांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करून सनदशीर मार्गाने नेतृत्व करीत आहे.आपल्या मूलभूत हक्कासाठी राज्य व केंद्रा सरकारच्या विरोधात न्यायालयीन संघर्ष करीत आहे. 
राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली, दबावाखाली ट्रेंड युनियनने काम केल्यामुळे कामगार कर्मचारी उद्धवस्त झालेत. राजकीय पक्ष हा नेहमी भांडवलदारांच्या आर्थिक मदतीने निवडणूका लढत असतो. त्याबदल्यात तो कामगार कर्मचाऱ्याच्या शोषण, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही, राजकीय नेते कामगार कर्मचाऱ्यांना अपंग बनवुन ठेवतात.हा इतिहास सर्व कामगार कर्मचारी यांनी लक्षात घ्यावा. आताचे सरकार आर एस एस प्रणित आहे त्यांना यादेशाचे संविधान नको आहे,ते नष्ट करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे त्याहिसेबानी ते कामाला लागले आहेत. ९३ टक्के असंघटित कामगार जे ८५ टक्के मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजातील मजूर,कामगार आहेत त्यांच्या समाजाच्या संघटना व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडे कोणतेही भविष्यातील नियोजन,उपाय योजनेचा आराखडा तयार नाही.
आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही पक्ष संघटनेकडे या विरोधातील कृती कार्यक्रम नाही.आता आपण कामगार कर्मचारी गप्प बसलो तर केवळ आरक्षण नाही,तर संविधान लोकशाहीच्या मार्गानेच संपविल्या जात आहे.नंतर एक होतं संविधान असे म्हणण्याची पाळी आपल्यावर यायला ऊशीर लागणारं नाही.हीच वेळ आहे निर्णय घेण्याची यांचे उत्तर बाबासाहेबांनी तेव्हा दिले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३४ ला स्थापन केलेली सफाई कामगारांची म्युनिसिपल कामगार संघ,देशातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये मान्यताप्राप्त ट्रेंड युनियन असली पाहिजे होती.१९३६ साली स्थापन केलेली स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु )आहे.त्यात देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन बाबासाहेबांनी १९३८ ला मनमाड येथे रेल्वे गँगमन कामगारांच्या दोनदिवशीय परिषद मध्ये केले होते. तेव्हाच हे ही सांगितले होते की कामगारांचे दोनच शत्रू आहेत,एक भांडवलशाही दुसरी ब्राह्मणशाही हे कायम लक्षात ठेवा. आज यांनी हात मिळवणी करून देशाच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत.
आज आता आरक्षण लाभार्थीच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत,नव्हे पुढील पिढीचे भविष्य अंधकारमय होणार आहे.म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांनी ट्रेंड युनियन मध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता आपली खरी ओळख दाखविण्याची वेळ आली आहे.
भारतातील बहुसंख्येने कामगार कर्मचारी हा मागासवर्गीय शोषित,पिढीत व आदिवासी, अल्पसंख्याक अन्यायग्रस्त असल्याने त्यांना ६५ वर्षानंतर ही सामाजिक व आर्थिक न्याय मिळू शकला नाही. आताच्या आर एस एस प्रणित भाजपा सरकारने एक हजार कामगार कायदे विना चर्चा रद्द करून टाकले.शेतकरी शेतमजूर, असंघटीत कामगार यांचे प्रश्न तर संघटीत कामगारांच्या प्रश्नापेक्षा विक्राळ स्वरूपात उभे आहेत.त्यावर प्रस्थापित कामगार चळवळी कोणताच वैचारिक संघर्ष करण्यासाठी तयार नाही. त्याचे दुःख मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांना बिलकुल नाही.भारतात आजमितीला सात टक्के संघटीत कामगारांच्या ५५ हजार युनियन नोंदणीकृत आहेत.तर ९३ टक्के असंघटीत कामगारांच्या राष्ट्रीय युनियन नाहीत. त्यांच्या करीता वैचारीक पातळीच्या तेरा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कार्यरत आहेत.त्यांची अधिकृत मान्यता ही मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांच्या मेंबरशिप वर अवलंबून आहे.त्या या प्रमाणे आहेत.१) ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC ),२) सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (CITU),३) भारतीय मजदूर संघ (BMS),४)हिंद माजदूर किसान पंचायत (HMKP),५) हिंद मजदूर सभा (HMS),६) इंडियन फेडरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन (IFFTU),७) इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन काँग्रेस (INTUC),८) नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (NFITU),९) नॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (NLO),१०) ट्रेंड युनियन को-ऑडीनेशन सेंटर ( TUCC),११) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस (UTUC),१२) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस-लेनिन (UTUC-L), १३) कॉन्फडेरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन ऑफ इंडिया (CFTUI).यांची राजकीय विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी त्यांचे सांस्कृतिक संस्कार,मुख्य उद्धिष्ट एकच आहे. हे आम्ही विसरतो. म्हणूनच आमची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन संपविला कोणी?. यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
देशातील तमाम मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी आपल्या संघटना, युनियन आंबेडकरी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनशी संलग्न करून शक्ती प्रदर्शन करावे.असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!.ही भाषा आता बंद करावी, तुमची अधिकृतपणे सभासद नोंदणी कोणा कडे आहे?. त्यांचा फायदा कोण कसा घेतो त्यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. दरवर्षी तुमच्या संघटनेचे युनियनचे ऑडिट रिपोर्ट सादर होत नसतील तर तुमची दखल कोण घेणार?.म्हणूनच नोंदणीकृत सभासद बनून भविष्य उज्वल करण्यासाठी आरक्षण लाभार्थी कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी बनावे!.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब म्हणाले मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी तुम्ही सुखात रहावं म्हणून यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो M.A., PH.D., M.SCD.SC L.L.B.तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होते. पण मी ती नाकारली. का?.कारण मला फक्त समाजाला न्याय मिळवून द्याचा होता.मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो.पण नाही. माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी.मी  तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो. महार,मांग,चांभार,सुतार, लोहार,माळी,धनगर, कुणबी, कोळी या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो.मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्विकारला. पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी "हिंदु कोड बिल" बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले.मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC,ST,OBC,NT यांना आरक्षण दिलं.पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलंत.तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा.हे सर्व बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी यांनी एक व्हावे.तुम्ही सर्वांनी एकत्र या कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल. असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!. असे किती दिवस म्हणत राहणार?. लोकसंख्याच्या एकूण हिशेबाने आपण सत्ताधारी असले पाहिजे किंवा विरोधी पक्षात आपले वर्चस्व प्रस्थापित झाले पाहिजे होते.शासन,प्रशासनावर आपला कायमस्वरूपी दबाव आणि नियंत्रण असले पाहिजे होते.ते का होत नाही. यांचा सर्व मजूर, कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.आमची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन संपविला कोणी?.

आयु.सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९. 
अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य,

पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व नसावे.

 पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व नसावे.

चार पायाच्या जनावरांत आणि जलतळ प्राण्यात संस्था,

संघटना,पक्ष नसतात तरी ते संकटात सापडल्यावर एकत्र येऊन संघटीत पणे मुकाबला करतात त्यात कोणी नेता नसतो.पण सामूहिक नेतृत्व मात्र कायम असते.त्यांचे वर्णन लोकशाहीर वामन दादा कर्डक यांनी एका गीतात खूप अर्थपूर्ण केली आहे. "अन्याय अत्याचारांची येतच हाक रे भरुरूरू उडावी पाखरे" चिमणी पाखरे,मध माश्या आणि मुंग्या यांचे संघटन वैचारिक दृष्ट्या खूप मजबूत आणि प्रेरणादायी असते.त्यांना माणसा सारखे बोलता येत नाही,विचार करता येत नाही, किंवा माणसा एवढा स्वार्थी मेंदू त्यांना नसतो.तरी ते वेळोवेळी संघटितपणे शक्ती प्रदर्शन करतात.त्यांच्यात माणसासारखी जनजागृती करावी लागत नाही. ते जन्मापासून जगण्यासाठी संघर्ष कसा करावा ते शिकतात.
माणसांच्या मुलांना जन्मापासून सर्वच शिकवावे लागते.तेव्हाच तो शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक आर्थिक विकास करतो.वाईट गोष्टीचे आणि व्यसन 
करण्याचे शिक्षण, प्रशिक्षण दिले जात नाही.ते ज्या मित्रा सोबत मैत्री असते ती मित्रमंडळी आपोआप सर्व शिकवत असतात.यासाठीच संस्था, संघटना पक्षाची गरज असते. अन्याय अत्याचार झाल्यावर एकत्र येणाऱ्यांची संस्था, संघटना पक्ष फार काळ टिकत नाही. कारण त्यांचे एकत्र येण्याची मुख्य उद्धिष्ट,ध्येय धोरण निश्चित नसतात.त्यात कोणतीही जनजागृती नसल्यामुळे ते जेवढे जवळ येतात तेवढ्याच ते लांब जात असतात.
 जागृती हे जरी समाजाच्या उन्नतीचे मुख्य अंग असले, तरी नुसत्या जागृतीचा उपयोग नाही. समाजाच्या उन्नतीकरिता काही विधायक कार्यक्रमाची आवश्यकता असते.समाजात एखाद्या माणसाने जागृती केली व त्याच्या मृत्यूनंतर समाजाला दिशा दाखविणारा दुसरा एखादा कर्तबगार पुरुष निर्माण झाला नाही तर एकखांबी तंबूप्रमाणे समाज मोडकळीस येतो.- असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ जानेवारी १९५५ ला मुंबईत कार्यकर्त्यांना सांगितले होते. म्हणूनच संस्था, संघटना पक्ष स्थापन करतांना त्यांची लिखित घटना असते, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय कामकाज कसे करावे?. कोणी करावे?. त्यांची नियमावली बनविली असते.त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर सुरुवात पासून सर्वांनाच त्यांचे पालन करावे लागते. त्यामुळेच संस्था संघटना पक्षात कधीच एक खांबी नेतृत्व उभे राहत नाही. त्यासाठी जीवनशैलीचे तत्व खूप महत्वाचे असते.
सभासदाला कार्यकर्ता पदाधिकारी नेता बनण्याचे स्वप्न असावे पण ते साकार करण्यासाठी ध्येयवादी  गगनभरारीचं वेड असावे लागते.कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो.
कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या जीवनात अशी वादळ कायम घोंगावत असतात. 
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच कार्यकर्त्या नेत्यांचे असते. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जीवघेणा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.तेव्हा तो कार्यकर्ता नेता संस्था,संघटना पक्षात समाजात मान्यताप्राप्त होतो.
कार्यकर्ता नेताला संस्था,संघटना पक्ष समाजात  मान्यताप्राप्त करण्यासाठी तोंडात साखर डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घ्यावी लागते. भिंतीवर कॅलेंडर असते त्यातील प्रत्येक महिन्यातील दिवस व तारखेला चौकोनाला लक्षवेधी पेनाने गोल करून दिनांक व वेळेचे नियोजन करून ठेवावे लागते,त्यासाठी त्याची अंमलबजावणी करणारी कमिटी काय करते त्यांचा कायम संपर्क ठेवून माहिती घेऊन चर्चा केली पाहिजे तरच यशस्वी होता येते.
आजकाल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रत्येक तालुक्यात निर्माण झाले आहेत, त्यांची संघटना,पक्ष जिल्ह्यातील सर्व तालुख्यात नसली, तरी ते एकखांबी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष असतात. त्यांच्या कार्यालयात कॅलेंडर वर कोणत्याही तारखेला महिन्याला कुठलही चित्र नसते.तरी ते पेपरमध्ये दररोज सरकारच्या विरोधात,तर कधी कोणाच्या विरोधात पत्रकबाजी करीत राहतात. त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळते पण संघटना वाढत नाही. त्यांचे अस्तित्व राजकीय उपद्रव मूल्य निर्माण करण्यासाठी सर्व समाजात होत असते.
विचारधारेवर चालणाऱ्या संस्था, संघटना, पक्षाचा कार्यकर्ता,पदाधिकारी या व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त बोलके असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र निर्माण करण्यासाठी वेगळा विचारपण हवे असतो.समस्या वर अभ्यासपूर्ण उपाय स्वतःजवळ प्रथम असला पाहिजे,सरकारी योजना काय आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय पातळीवर यंत्रणा कशी काम करते,त्यांची माहिती संघटना पक्षांच्या पदाधिकारी यांना नसेल तर ते प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. नेतृत्व स्वतःला सर्व सर्वश्रेष्ठ समजत असेल तर ते दोन,तीन,चार नंबरचे नेतृत्व तयार होऊ नये यांची दक्षता घेत असते,असे एकखांबी नेतृत्व नेहमीच विचारधारा आणि संघटना,पक्षा पेक्षा स्वतःलाच मोठे समजत असते. ते लोकशाहीला कधीच महत्व देत नाही. जाहीर सभेत त्याला बसायला सिंहासनच पाहिजे.त्यामुळेच दोन नंबरचे नेतृत्व तयार होत नाही,जे असते ते कार्य कर्तृत्व दाखवून झालेलं नसतं तर आशीर्वादाने चमचागिरी करून झालेलं असते.ते पक्षात संघटनेत कोणतेही सत्य मांडण्याचे किंवा चर्चा घडवून आणण्याचे धाडस दाखवू शकत नाही.असे बोलणारे पक्ष संघटनेच्या बाहेर फेकल्या जातात.त्यामुळेच मग पक्ष संघटनेत प्रामाणिक, इमानदार निर्भीडपणे नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व दाखविणाऱ्याला बदनाम करून बाहेर काढला जाते. त्यामुळेच पक्ष संघटना दरवर्षी मजबूत होण्या ऐवजी कमकुवत होत जाते.जुन्यांना काढले जाते नव्यांना जोडल्या जाते.म्हणूनच संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून सभासदांच्या प्रामाणिकपणावर,संघटनेशी एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५/२६ मार्च १९५३ ला दिल्ली येथे  सांगितले होते. ते आज पर्यत कोणीच मनावर घेतले नाही, त्यामुळे सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक,राजकीय संस्था,पक्ष संघटना एक नां धड भराभर चिंद्या झाल्या आहेत.क्रांतीकारी विचारधारे तोंडात असते आणि आचरणात हुकूमशाही!. यामुळेच पक्ष संघटना वाढत नाही.पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व झाल्या आहेत.

रंगपंचमी म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा?.

 रंगपंचमी म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा?.



 होळी व धुलीवंदन रंगपंचमी सर्व जातीचे लोक विशेष तरुण तरुणी अतिशय उत्स्फूर्तपणे होळी साजरी करतांना दिसतात.९० टक्के तरुणांना हे सांगता येत नाही की होळी का जाळतात. गौड राजा हिरण्यकश्यपू यांची बहीण होलिका हिला आर्यांनी म्हणजेच भटा ब्राम्हणांनी कपट नीती ने बलात्कार करून भर चौकात संध्याकाळी रात्र झाल्यावर जिवंत जाळले तिच्या भवती चारीबाजूने लांब बाबू घेऊन ते तिला लाकडाच्या सरणातून बाहेर पडू देत नव्हते हे बघून गावातील लोक जोर जोराने ओरडत,बोबळत होते. त्यासरणात होलिका जळत होती, ब्राम्हण कोणालाच जवळ येऊ देत नव्हते.त्यामुळे परिसरात लोकांच्या मनात प्रचंड चीड होणार यांची खात्री असल्यामुळे आर्यांनी दुधात भंग टाकून चारीबाजूने माठ भरून ठेवले होते.लोक ओरडायला लागले की त्यांना तांबे भरून भांग पिण्यासाठी दिली जात होती.भांग पिलेला माणूस थोड्या वेळाने गुंगायला लागतो. सर्व विसरतो जिथे जागा भेटलं तेथे लुढकतो. ही पुराणिक कथा आहे.होळी जर चारित्र्य वान होती तर जाळली का जाते ?. आणि चारित्र्य हीन असेल तर तिची पूजा का केली जाते. ही परंपरा, रितीरिवाज किती वर्षांपासून दरवर्षी उत्स्फूर्तपणे साजरी केली जाते. 
होळी जाळल्या नंतर दुसऱ्या दिवशी धुळीवंदन म्हणजे रंग पंचमी रंग लावण्याचा बहाण्याने मुली,महिलांच्या शरीराशी छेळाछेळी करणे आलेच,रंग कोणाला लावायचा यांची पूर्वजांनी अलिखित निमावली केली होती. वहिनी, नणंद, दीर भावजय,मामाची मुलगी,आत्याचा मुलगा अशी काही नात्यातील लोकांना धुलीवंदनाच्या म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी रंग लावण्याची रीत होती.आता ती पूर्णपणे बदलली दिसत आहे.आता स्वराचार,गलिच्छ तिरस्कार वाढवणारे प्रकार होत आहेत.
शहरात विविध जाती धर्माचे लोक चाळीत,सोसायटीत प्लॉट मध्ये एकत्र राहतात.तिथे एकत्र येण्याचे निमित्त पाहिजे असते.त्यात सकारात्मक विचारांचे उत्साहित लोकच भाग घेतात,आणि नकारात्मक विचारांचे लोक लांब राहण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना होळी,धूळवंदनाच्या निमित्ताने बरोबर टार्गेट केले जाते, "बुरा मत मानो भाई होळी है"  असे म्हटले जाते.शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्यामुली मुलांच्या टार्गेट असतात.त्यामुळे विनयभंग हा सर्रास होत असतो. त्यालाच धुलीवंदन, रंगपंचमी म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा म्हणतात.हा प्रकार गल्लीबोळात होतांना दिसतो.
पुराण कथा सांगतात की होलिका प्रल्हादला मांडीवर बसुन जाळल्या गेली पण प्रल्हाद वाचून बाहेर आला नि होलिका जाळली,त्यांचा आनंद उत्सव दुसऱ्या दिवशी आर्यांनी रंग उधळून साजरा केला. होलिका म्हणजे एक राजाची बहन ,मुलगी तिला दहशत निर्माण करण्यासाठी भर चौकात लोकांच्या समोर जिवंत जाळली त्यामुळे ब्राह्मण किती भयानक मनोवृत्तीचे असतात हे दाखऊन देतात. दर पांच दहा वर्षात असे भयानक आघात समाजात परिणाम करणारे घडविले जातात त्यांचा मग सण, उत्सव साजरा केला जातो. अनेक संतांचे प्रगट दिन साजरा होतात,जन्म मृत्यू कुठे, कधी झाला हे सांगितले जात नाही.कोणी विचारण्याची हिंमत करत नाही. संत तुकाराम महाराज सारखे संत नदीत डुबकी मारून मारले जातात व पुष्पक विमानात बसुन वैकुंठाला गेल्याची रसभरीत कथा तयार केली जाते. पुढे गोविंद पानसरे, गौरी लंकेश,कलबुर्गी सारखेच घडविले जाते त्यांचे शास्त्र, पुराण कथा लिहून त्यांना म्हणजेच सर्व हिंदूंना,मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजाला गुलाम बनवून ठेवले जाते तेच लोक असे सण उत्सव म्हणून साजरे करतात. 
हे आजच्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्क, वायफाय वापरणाऱ्या जमान्यात लोक आंधळ्या सारखे होळी जाळून दुःख,नष्ट होण्याची अपेक्षा करतात. मुंबई ही भारताची औद्योगिक राजधानी म्हटल्या जाते.इथे अनेक देशाचे राज्यांचे लोक कामगार,कर्मचारी आणि अधिकारी म्हणून एकत्र नोकरी करत असतात. त्यामुळेे सर्वांची चांगलीच मैत्री झाली असते. मराठी कामगार,कर्मचारी आणि अधिकारी होळी साजरी करण्यासाठी गांवी कोकणात सुट्टी टाकून जातात.मराठी कामगार, कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सुट्टी टाकून उत्सव साजरा करण्यासाठी गांवी जातात. कसा साजरा करतात हा उत्सव थोडक्यात सांगायच तर सुकी ओली लाकड एकत्र रचतात.दहा ते पंधरा फूट उंच आणि पंधरावीस फूटाची रुदी असलेला ओल्या सुक्या लाकडांचा ढीग मध्ये मध्ये सुके गवत लावून जो ढीग रचतो तीला होळी म्हणतात.या होळीची गांवात महिला एकत्र येऊन तिची पूजा करतात आणि मग या होळीला पेटविल्या जाते.आणि पेटणाऱ्या होळीच्या भोवती लोक बेबंद होऊन नाचतात,बोंबलतात.मोठा आनंद व्यक्त करतात.जसे आर्यांनी होलिकेला जाळले तसेच अनुकरण आजचे लोक करतात. ते न चुकता केले जाते. हे फक्त एकाच गावात नाही,तर राज्यातील प्रत्येक गावागावात होळी पेटवतात तेेव्हा करतात.
 शहरात ही होळी लहान स्वरुपात असते पण गावात मोठी असते.या निमित्ताने कोकणात जाणा-या बसेस,रेल्वे प्रायव्हेट वाहनांना खूप गर्दी असते.लोक कुठे असतील तिथून आपल्या गावाकडे गर्दी चेंगराचेंगरी, टॉफिक जाम असतानां ही गाव गाठतात. बायको पोरांसह. नुसती लाकड जाळायला इतक्या लांबून लोक वाट्टेल तो खर्च,त्रास सहन करून गावाला जातात. या होळीत दुःख, दैन्य अज्ञान, भेदभाव,जाळून ते लोक होळी मातेकडे सुखा समृध्दीची शांतीची आरोग्याची मागणी करतात. 
कोकणातीलच नाही एकूण मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांची होळीत दुःख जळली?. यांचा हिशेब आज पर्यत कोणी लिहला नाही.दैन्यही या होळीत जळते. म्हणजे दारीद्र्य नष्ट होते?. मग ते जळल्यावर गावातले किती लोक दारीद्र्य मूक्त झालीत?.अहंकार अज्ञानही जळते म्हणतात?. आज पर्यंत कोणा कोणाचा अहंकार, अज्ञान, दैन्य भेदभाव जळाला ते कोणीच सांगत नाहीत. गरीब श्रीमंतातला भेद जळतो?. काळा गोरा हा भेद जळतो ?. भारतात जातीयतेचा भयानक भेदभाव आहे तो जळतो ?. म्हणतात पण जळायला ते काय वस्तू आहे.हे कोणी मान्य करीत नाही.
अग्नीत लोखंड ही वितळवण्याची,भस्म करण्याची ताकद आहे.पण लोखंड ही वस्तू आहे.अहंकार,दुःख,दैन्य,अज्ञान, भेदभाव या कोणत्याही वस्तू नाहीत. हे आहेत माणसांच्या मनाचे रोग आहेत. माणसान निर्माण केलेल्या या व्यवस्था आहेत. एक तरी होळी दरिद्री माणसासाठी सुखसमृध्दी मागून त्याला सुखी करून गेल्याचा पुरावा म्हणून एखाद्या माणूस त्यांचे कुटुंब दाखवता येईल काय?.
एकतरी कॅन्सरचा रोगी बरा झाल्याचे उदाहरण दाखवा?.  असे लाकड जाळून अन देवळात लोळून घालून माणसाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक विकास आणि कल्याण झाले असते.तर भारतात भ्रष्टाचार,बलात्कार, जातीयता,राजकीय पक्षांची अंदाधुंदी माजलीच नसती. 
याचा अर्थ असाच आहे की हे सणवार कर्मकांड आणि देव थांबवू शकत नाही. हे सगळ थांबवतील फक्त आणि फक्त मानवतावादी विचारसरणी. मानवतावादी विचारसरणीचे लोक शासन प्रशासनात आणले पाहिजे. कर्मकांड आणि धर्मांध जातीयवादी लोक असतील तर असे उत्सव वाढत जातील.
परंपरा रितीरिवाजाच्या नांवावर हिंसक वळण लागत आहे. लैंगिकता, विनयभंग बलात्कार या सारखे एकतर्फी प्रेम वाढत जात आहेत. आजची पिढी सुशिक्षित आहे, स्मार्टफोन, कॉम्प्युटर, फोरजी नेट,वायफाय वापरणारी असतांना ही परंपरा, रितीरिवाजाच्या नांवा खाली नवीन संकल्पना पुढे येत आहेत. होळी का जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन,रंगपंचमी का खेळली जाते.यांची माहिती दिली जात नाही. आजच्या पिढीला त्यांची गरज वाटत नाही. फक्त एन्जॉय करण्यासाठी निमित्त पाहिजे. म्हणूनच धुळीवंदन म्हणजे डोळ्यात धूळ आणि डोक्यात नशा झाली आहे. 
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप, मुंबई

विलास वाघ परिवर्तन विचारांचा सुगावा

विलास वाघ परिवर्तन विचारांचा सुगावा 

 माणूस गेल्या नंतर त्याचे महत्व कळते.त्याने लावलेलं रोपटे जेव्हा वटवृक्ष बनतो त्यावेळी त्यांच्या त्याग कष्ट आणि जिद्दीचे कौतुक केले जात नाही.आज त्यांनी लावलेला वटवृक्ष विशाल डेरा घेऊन उभा दिसतो.शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना विशेष कवी,गायक, लेखक,पत्रकार,साहित्यिक यांना प्राध्यापक विलास वाघ उषा वाघ यांचे सुगावा प्रकाशन व सुगावा मासिक माहिती नाही असा एक ही व्यक्ती भेटणार नाही, पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक पुस्तक,ग्रंथ प्रकाशित करणारे एकमेव प्रकाशक व प्रकाशन म्हणजेच विलास वाघ सुगावा. वैचारिक क्रांती घडवून आणण्याची असेल तर स्वतःचे वैचारिक प्रबोधन परिवर्तन घडविणारे मुखपत्र मासिक, पाक्षिक,साप्ताहिक पाहिजे.त्यासाठी स्वतःचा प्रिंटिंग प्रेस व प्रकाशन संस्था पाहिजे.हे मी विजय सातपुते यांच्या संगतीने कॉम्रेड शरद पाटील यांच्याकडून शिकलो.तेव्हाच मला विलास वाघ,उषा वाघ यांच्या सुगावाची ओळख झाली. चळवळीतील लेखक,साहित्यिक यांची पुस्तके प्रकाशित करून ते किर्याशील कार्यकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचे ऐतिहासिक काम विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशन यांनी केले आहे. त्याला तोड नाही. पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनाच्या चळवळीतील स्वयंप्रकाशित, उच्चशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. विलास वाघ सर. उत्तम संपादक, उत्कृष्ट प्रकाशक म्हणून महाराष्ट्रात त्यांची वेगळी ओळख राहिली आहे. मासिक सुगावा आणि त्यांच्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन करून परिवरर्तन करणाऱ्या चळवळीला गती देणा-या शेकडो साहित्यिकांची पुस्तके समाजापुढे आणण्याचे महान कार्य विलास वाघ सरांनी अत्यंत निष्ठेने केले. उपेक्षित समाजघटकाच्या मुलामुलीना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत यासाठी त्यांनी आश्रमशाळा,महाविद्यालये या स्तरावर रचनात्मक कार्य करून महापुरुषांच्या विचार चळवळीतील सच्चा अनुयायी कसा असावा याचा आदर्शजीवन पट उभा केला. महाराष्ट्राच्या या निष्कलंक, चारित्र्य संपंन्न व्यक्तिमत्वाची वाटचाल नव्या पीढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादायी आहे. विलास वाघ सर म्हणजे निष्ठेने जिद्धीने त्याग करून कोणताही गाजावाजा न करता काम करत रहाणारे ध्येयवादी व्यक्तीमत्व होते., साधी राहणी उच्च विचारसरणी आणि सामाजिक प्रश्नची जाणीव ठेऊन चळवळ करणारे, ही वाघ सरांची ओळख होती.बाकी अनेक लोक असतात चळवळ कमी आणि वळवळ जास्त करीत असतात. विलास अनंत राव वाघ जन्म १ मार्च १९३९ रोजी,मु-पो. मोराने तालुका जिल्हा धुळे,पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे,पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड विद्यालय,जून १९५८ एसएससी परीक्षा पास.१९५८ ते १९६२ पुण्यातील एसपी महाविद्यालयातून बी एस सी उत्तीर्ण.जून 1962 कोकणातील नरडवणे गावात शिक्षकाची नोकरी.१९६४ ते १९८० पुण्यातील अशोक विद्यालयात शिक्षकाची नोकरी .१९७२ : सुगावा प्रकाशनाची सुरुवात ते आजतागायत सुरू. १९८१ बीएड उत्तीर्ण.१९८३ उषा ताई वाघ याच्याशी आंतरजातीय विवाह: सरांच्या अनेक कामामध्ये ताईंचा पुढाकार १९८१ ते १९८६ पुणे विद्यापीठातील प्रौढ निरंतर शिक्षण विभागात रीडर म्हणून काम केले. १९८६ पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा.१९६४ ते १९८० या काळात वडारवाडीत बालवाडी सुरू केली.सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरू केले.राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वर्ष अध्यक्ष.१९७२ समता शिक्षण संस्थेची स्थापना या संस्थेमार्फत महिलाश्रम वसतिगृह तळेगाव येथे सुरू केले.कस्तुरबा मुलींचे वस्तीग्रह तळेगाव ढमढेरे येथे सुरू केले.समता मुलांचे वस्तीगृह तळेगाव येथे सुरू केले. १९७८ भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींसाठी तळेगाव येथे आश्रम शाळा सुरू केली. १९८९ मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केली. १९९४ मोराणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले.१९९६सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार, दोन वेळा चेअरमन. १९७४ पासून सुगावा मासिक सुरू केले.समाज प्रबोधन संस्था मासिकेचे पदाधिकारी.पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त.परिवर्तन मिश्र विवाह संस्थेची स्थापना.विलास वाघ साधा माणूस पुस्तक विकण्याचे काम करतो असे वाटणाऱ्याना या रचनात्मक कामाची फारशी ओळख नसेल.शिक्षणात सवलत घेऊन उच्चशिक्षित झाल्यावर नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ घेणारे आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती करीत राहतात.सुंदर बायको सुंदर गाडी,बंगला प्लॉट नंतर मुलांचे शिक्षण यातच त्यांचा पूर्ण वेळ जातो त्यांना समाजात गावात,तालुख्यात,जिल्ह्यात विलास वाघ सरांच्या सारखे रचनात्मक कार्य करावे असे कधीच वाटत नाही.आपले लोक व्यसनाधीन आहेत ते सुधारणार नाहीत असेच त्यांच्या तोंडपाठ असते. मी मुंबई असतांना १९८२ ला कॉम्रेड शरद पाटील यांची ओळख झाली.ते आम्हाला नेहमी म्हणत होते. तुम्हा इंडियात राहणाऱ्यांना भारत कसा समजेल.तो समजून घेण्याचा असेल तर भारतातील ग्रामीण भागातील खेड्यात येऊन दोनचार दिवस राहून पहा. तेव्हा मी ,विजय सातपुते,अंकुश भोले,सर्जेराव द्राक्षे,श्रीधर चीलप १९८४ ला असंतोषवाडी देवपूर,धुळे,विसरवाडी,पिंपळनेर शहादा, नंदुरबार साक्री या आदिवासी भागात डोंगर बागुल,नजुबाई गाबीत यांच्या सोबत फिरलो तेव्हा खरा इंडिया व भारत यातील फरक कळला.त्यावेळी कॉम्रेड शरद पाटील नेहमी विलास वाघ यांचे काम आणि कार्य याची माहिती देत होते.तो पुण्यात राहून धुळे जिल्ह्यात काय काय करतो त्याचा आदर्श घ्या असे सांगत होते.हे लिहण्याचा कधी योग आला नाही.पण विलास वाघ सरांचे दुखद निधनानंतर हे सर्व आठवायला लागले.माणूस गेल्या नंतर त्याचे महत्व कळते.त्याने लावलेलं रोपटे जेव्हा वटवृक्ष बनतो त्यावेळी त्यांच्या त्याग कष्ट आणि जिद्दीचे कौतुक केले जात नाही.मात्र तो गेल्या नंतर त्यांनी लावलेला वटवृक्ष विशाल डेरा डोळ्यासमोर उभा दिसतो.विलास वाघ आणि मासिक सुगावा कायम आठवणीत राहण्यासाठी सुगावाचे वार्षिक वर्गणीदार,आजीवन सभासद व्हा.अशा प्राध्यापक विलास वाघ सरांना सत्यशोधक कामगार संघटना परिवारांच्या वतीने भावपूर्ण श्रदांजली.

भिमप्रतिज्ञा घेणारे प्रा.जोगेंद्र कवाडे.(प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या १ एप्रिल ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख.)

 भिमप्रतिज्ञा घेणारे प्रा.जोगेंद्र कवाडे.


(प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या १ एप्रिल ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख.)

जोगेंद्र लक्ष्मण कवाडे (जन्म: १ एप्रिल,१९४३.) हे एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल रिपब्लिकन पक्षांचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदारसंघातुन १२ लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या ते जून २०१४ पासून महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आहेत.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीतून कवाडे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. ते आंबेडकरी चळवळीतील जहाल नेते म्हणूनच प्रसिध्द आहेत.व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व कट्टर आंबेडकरवादी आहेत.रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर मध्ये ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर येथून १९७२ पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक होते, याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या (१९५६ नंतरचे धर्मांतरित बौद्ध; विशेषतः नवबौध्द ) सवलतीसाठी आंदोलन केले होते, त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) नामांतरासाठी त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरूणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी नागपूर ते औरंगाबाद 'लॉंगमार्च' काढला होता. त्यांच्या या तीव्र आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली होती. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते काँग्रेस रिपब्लिकन आघाडी चे उमेदवार म्हणून१९९८ मध्ये रिपब्लिकन ऐक्याचे लोकसभा उमेदवार म्हणून चिमूर लोकसभा मतदारसंघातुन तिकिटावर निवडून आले होते. मात्र पुढे रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य फुटले आणि प्रत्येक नेत्यांनी आपला पक्ष स्थापन केला.प्रा जोगेंद्र कवाडे  त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली, जो भारतीय काँग्रेस पक्षाच्या आघाडी तील एक घटक पक्ष होता. जून २०१४ पासून कवाडे हे महाराष्ट्र विधान परिषदेत विद्यमान सदस्य (आमदार) आहेत.
महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी चळवळीत एकशेएक धुरंधर राष्ट्रीय नेते आहेत.ते रिपब्लिकन ऐक्यासाठी नेहमीच तयार असतात.समोर गर्दी दिसली की ते प्रत्येक वेळी काही तरी लक्षवेधी घोषणा करीत असतात. नेत्यांचे व समाजांचे ऐक्य राहण्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतात, आणि ऐक्यातून कोणी फुटून बाहेर पडला तर त्याला उद्याचा सूर्य दिसू देणार नाही अशी लाखोंच्या जनसागरा समोर शिवाजी पार्क दादर मुंबई येथे भिमप्रतिज्ञा घेणारे लॉग मार्च प्रणेते प्रा जोगेंद्र कवाडे यांचा ७८ वा जन्म दिन १ एप्रिल "संघर्ष नायक दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसा तो दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आत्मचिंतन करणारा लेख लिहत आहे.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नांव देण्यासाठी सरांनी जीवाचे रान केले.ऐतिहासिक लॉग मार्च काढला.तेव्हा मी आमचे संपूर्ण कुटुंब त्यांचे भक्त होतो.नामांतर कृती समिती ते दलित मुक्ती सेना, व्हाया दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ पर्यत मी भक्त होतो. प्रा जोगेंद्र कवाडे सरा सारखा निर्भीड,निःपक्षपाती, प्रामाणिक लढाऊ झुंजार नेता महाराष्ट्र राज्यात नव्हे तर भारतात असूच शकत नाही, एवढा आत्मविश्वास आम्हाला वाटत होता. महाराष्ट्रात ३३ जिल्हे असतांना सरांना सतरा जिल्हे बंदी असणे म्हणजे गिनीज बुकात नोंद असणारा एकमेव नेता असावा असा माझा तेव्हा समज होता. तेव्हा आपले भाषण आम्ही कान देऊन मन शांत ठेऊन ऐकत होतो.तुमचे भाषण ऐकले की अंगावरचे केस ताठ उभे राहायचे.म्हाताऱ्यांच्या अंगातील रक्त तरुणांप्रमाणे सळसळत असे.ते भाषण ऐकून मुठी आवळून घोषणांनी आकाश पातळ दणाणून सोडत असो.तेव्हा पासुन आम्ही सरांची धडा शिकविण्याची भाषा ऐकतो.आज पर्यत आपल्या प्रत्येक सभेत मोर्चात,आपण जातीवाद्यांना सत्ताधाऱ्यांना,मायबाप सरकारला धडाच शिकवत आहात. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून बाहेर पडल्यास उद्याचा सूर्य दिसू देणार नाही, शिवाजी पार्क मधील एका सरसेनापती च्या भिमप्रतिज्ञेचे काय झाले?.असे आजची मुलंमुली विचारतात.
नामांतराच्या लढाईत अनेकांना धडे शिकविण्याच्या भाषेनेच खेड्यापाड्यातील गोरगरीब असंघटित मजुरांचा आई बहिणीची इज्जत लुटायला लावली. अनेक गावांतील महारवाडे, बौद्धवाडे, माणसांसह जाळून टाकण्यास भाग पाडले.कारण प्राध्यापकांची भाषाचं कायम सत्यानाश करणारी होती. जातीवाद्यांच्या ढुंगणावर भीमटोळे मारणारे, सत्ताधाऱ्यांचे धोतर पिवळे करणारे प्रा जोगेंद्र कवाडे कुठेच दिसले नाही.एकीकडे ही जहाल भाषा असतांनाच दुसरीकडे नामांतरासाठी ह्या प्राध्यापक कवाडे मेला तरी चालेल, त्याचे तुकडे तुकडे केले तरी चालतील,पण नामांतर झाल्याशिवाय राहणार नाही. असे बेंबीच्या देठापासून सांगणारे प्रा.कवाडे सरांनी लाखो भीमसैनिकांना भक्त बनविले होते.पण भिमाच्या क्रांतिकारी विचारांचे शंभर सैनिक बनवू  शकले नाही. भक्तांचे सेनापती होता येते.शिष्यांना सैनिकांना शिस्त लावण्यासाठी सेनापतीला शिस्त लागते.सैनिकांना शिस्तबद्ध पालन देण्यासाठी बौद्धिक शक्ती लागते.शत्रूवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण द्यावे लागते. प्राध्यापक कवाडे सर आपण ते भीमसैनिकांना काहीच देऊ शकला नाही.
नामांतरासाठी लढणाऱ्यांना शेवटी प्रथम दिलेल्या जोडनांवावर म्हणजेच नामविस्तारावरच समाधान मानावे लागले. मग एवढा रक्तपात घडविण्याची गरज काय होती?.नामांतराच्या चळवळीत मागासवर्गीय एस सी समाजाचे कोणते प्रबोधन आपण केले?. शांती, समता,बंधुभाव,निर्माण करण्या ऐवजी आपण कायम शिवीगाळ, सत्यानाश,धडा शिकवू,जाळून टाकू या शब्दांचे बॉम्बगोळे आपण भाषणांतून भोळ्याभाबड्या एस सी मागासवर्गीय समाजावर फेकत होता.त्यामुळेच तो असंघटित मजूर समाज पेटून उठायचा,त्यामुळेच गावा गावांतील वातावरण ढवळून काढले जात होते. गावा बाहेर राहणाऱ्या समाजाने गावात राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला नाही तर गावांच्या आत राहणाऱ्या समाजाने गावा बाहेर राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला, हा इतिहास आपल्या जहाल भाषणांनी घडविला असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. सांगा कवाडे सर आपण कोणाकोणाला धडा शिकवला?.
महाराष्ट्र राज्यातील ३३ जिल्ह्या पैकी सतरा जिल्ह्यात प्रवेश बंदी यांचे आम्हाला खूप कौतुक व गर्व वाटायचे. परंतु भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांने संविधानाच्या पानांवर लिहून ठेवले होते, की ज्याच्या भाषणामुळे, वागण्यामुळे दोन समाजात शांतता भंग पावत असेल ज्या व्यक्तीमुळे दोन समाजात जातीय दंगल होण्याची शक्यता असेल अशा व्यक्तीला जिल्ह्यात सभा घेण्याची,भाषण करण्याची बंदी घातली जाते. कायद्यानुसार १४४ कलम लागु करून पोलीसांना त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.सांगा सर पोलीस कोणाच्या नियमांचे पालन करीत होते. कशासाठी आपल्याला प्रवेश बंदी होती. तेव्हा आम्हाला कळत नव्हते,भारतीय संविधान कधी वाचलेच नव्हते.इतिहास वाचला तर इतिहास घडविला जातो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येक आंदोलन सत्याग्रह शांततेत व कायदेशीर मार्गाने होत होती.एका बाजूला समाजाचे प्रबोधन दुसऱ्या बाजूला कायदेशीर सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून संघटित पणे लढाई असायची.रस्त्यावरच्या लढाईत ते कमी पडले असतील तरी कायदेशीर लढाईत ते कुठेही कमी पडले नाही,कारण त्यांचा मूकनायक, प्रबुद्ध भारतातील लोकांचा सरसेनापती विधाविभूषित कायदेपंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर होता.नामांतर चळवळीतुन तयार झालेले सरसेनापतीनी दलितांना मुक्त करण्यासाठी सेना निर्माण केली होती.परंतु खेड्या पाड्यातील असंघटित शेतमजूर,वीट भट्टी कामगार, खडी फोडणारा कामगार,शहरातील झोपडपट्टीत राहणार असंघटित कष्टकरी नाका कामगार,इमारत बांधकाम कामगार,घरकामगार,कचरा वेचक,सफाई कामगार यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हा ही कृतीकार्यकर्म, योजना नव्हत्या आणि आजही नाही.समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटने कडे, नेत्याकडे अभ्यासपूर्ण योजना असाव्या लागतात. मागासवर्गीय समाजा साठी राज्य व केंद्रांच्या योजना फक्त कागदावर असतात. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे ठोस उपाययोजना कार्यक्रम नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना देऊन ठेवल्या आहेत, त्यांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आपल्या उभी केली पाहिजे तरच आपण रिपब्लिकन पक्षाच्या विचार धारे नुसार सर्वांना समान न्याय मिळवून देऊ शकतो. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून चार महान नेते खासदार झाले,त्यावेळी रिपाईने लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळवला होता.असा इतिहास लिहला गेला आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत चार नेते चार दिशेला गेले आणि इतिहास पुसून टाकला. सर आपण ही निर्भीड, निःपक्षपाती प्रामाणिक सरसेनापतीचा इतिहास पुसून टाकला आहे. 
शरद पवार यांनी नामांतर ठराव मंजूर केला पण अंमलबजावणी केली नाही, त्यांच्या विरोधात सोळा वर्ष जनआंदोलने केली,त्यांनीच शेवटी तडजोड करून नामविस्तार केला.त्यांच्या आशीर्वादाने आपण खासदारांचे विधान परिषदेत आमदार झाला.राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना खाली तालुख्याचा नेता बनवून ठेवले.खासदार आमदार बनत नाही, मुख्यमंत्री होणार असेल तर चालते.कारण तो राज्याचे नेतृत्व करतो. विधान परिषदेत असलेला आमदार राष्ट्रीय नेता नसतो, त्याने ती संधी आपल्या पक्षातील दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्या दिली पाहिजे होती. त्यासाठी गोपाळराव, रमाकांत, बाबुराव,अशांतभाई, चिंतामण,या ही पेक्षा एकशे एक तानसेन होते ज्यांनी तुम्हाला सुरवात पासून शेवट पर्यंत जीवाला जीव लावून मदत केली.त्यांनाच आपण धडा शिकवला.सर काल पर्यत सर्वांना धडा शिकवला पण पाठांतर घेतले नाही. म्हणूनच आज भिमसैनिकांना त्यांची शिक्षा मिळत आहे. सर नामांतर चळवळीत ज्यांच्या घरदारांची राख रांगोळी झाली तो कोण होता?.तो तेव्हा ही असंघटित मजूर,कामगार होता आणि आज ही आहे.त्यांचा वापर आपण फक्त राजकारणासाठी केला आणि करीत आहात.त्यांच्या करीता अनेक कल्याणकारी योजना आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी उर्वरित आयुष्य लावा निरोगी राहा,सुखी राहा. १९८२ मी तुमचा भक्त होतो, विजय सातपुते यांच्यामुळे कामगार नेता पत्रकार झालो,म्हणूनच लाखो भीमसैनिकांच्या वतीने लिहत आहे.आज पर्यंत दिलेल्या प्रत्येक जाहीर सभेतील धड्याची अंमलबजावणी करा.सरसेनापती म्हणून सैन्याला शिस्त लावा. प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचकांना हार्दिक शुभेच्छा!!!.