शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

रोहिथ वेमुला आणि आंबेडकरी चळवळ




रोहिथ वेमुला प्रकरणामुळे उच्च शिक्षणातील जातीवाद सिद्ध झाला.दर दोन तीन महिन्याने देश भरात तो कुठे ना कुठे होत असतो. तरी पण आज प्रयन्त आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी विद्यार्थी संघटना देश पातळीवर उभी राहू शकली नाही,त्याला समाज नाही तर उच्च शिक्षण घेऊन उच्च पदे भोगणारे अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार आहेत,कारण आंबेडकरी चळवळीतील संस्था,संघटना आणि पक्ष यांचा स्वतःचा कोणताही नियोजनबद्ध कृती कार्यक्रम,योजना नाही,एका तीन टक्के समाजातील लोकांनी 97 टक्के असलेल्या समाजातील तरुणानां हाताशी धरून त्यांना समाजात वितंडवाद निर्माण होईल असे कृत्य करण्यास लावणे (पुतळा विटंबना,शिवीगाळ,मारहाण,नामांतर, स्मारक,प्रेमविवाह,जोरदार टिका,कमी लेखने ) म्हणजे यावरच आंबेडकरी चळवळी ने दर दोनतीन महिन्यांनी जनआंदोलन करणे हाच आपल्या चळवळीचा धंदा किंवा कृती कार्यक्रम आहे,त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात किंवा राज्यात असा घटना घडत राहणे व त्यावर आपण वेगवेगळे राहून जन आंदोलन करणे हाच गेल्या 30 वर्षाचा इतिहास आहे, त्यामुळे रोहिथ वेमुला घटने पासुन आपण काही वेगळे शिकू असे समजणे मूर्ख पणाचे असेल,आणि जी काही आंदोलन करून कोथळे बाहेर काढणारी किंवा धडा शिकविणारी नेते मंडळी आहे.त्याच्या पासून ज्या प्रमाणे सुशिक्षित आणि सुरक्षित ठिकाणी राहणारी नोकरी,व्यवसाय करणारी मंडळी लांब राहते त्याच्या प्रमाणे असंघटीत कष्टकरी कामगार मजूर,शेतमजुर लांब राहले तर यांची दुकाने बंद होण्यास वेळ लागणार नाही.कारण आंबेडकरी संघटना पक्ष क्रांतिकारी विचारावर विश्वास ठेऊन चालत नाही,हे गेल्या पाच पंचवार्षिक लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीतील एकूण अभ्यास केल्यास दिसून येईल,त्या करिता प्रत्येकाला आत्मचिंतन करावे लागेल. 
   नामांतर ते रमाबाई,खैरलांजी, जवखेडा,खेर्डा, शिर्डी या अन्याय अत्याचाराच्या जनआंदोलनातुन नेत्यांनी आणि समाजाने कोणता आदर्श घेतला?. म्हणुन हे जनआंदोलन फक्त स्वतःच्या अस्तित्वा करीता होतात,सरकारला विरोधकांना धडकी बसविण्या करीता नाही,त्यामुळेच आंबेडकरी चळवळीत कुराडीचे दांडेच जास्त निर्माण झाले असे मला वाटते.भारतात जाती व्यवस्था आजकालची नाही हजारो वर्षाची असली तरी त्यांच्या पोलादी साखरदांडाच्या बेडया डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः अनुभव घेऊन तोडल्या आणि देशात नव्हे तर जगात एक उच्च आदर्श निर्माण केला,त्यामुळेच उच्च शिक्षण देणाऱया आयआयटी, एम्स, एफटीआयआय आदी संस्थांमध्ये आज मागासवर्गीय समाजातील तरुण विद्यार्थी म्हणुन प्रवेश घेऊन गुणवत्ता सिद्ध करून दाखविताना दिसतात.त्यामुळेच जागतिक पातळीवर ज्याचे नांव गेल्या महिना भर देशासह विदेशात गाजते तो रोहिथ वेमुला पीएचडी करून हैदराबाद विद्यापीठाला त्याच्या गुणवंते मुळे मोठे करणार होता, त्यामुळे त्याने केलेली आत्महत्या ही कुणा एका रोहितची नव्हे, तर उद्याच्या आंबेडकरी चळवळीची आत्महत्या ठरली आहे.कारण आज जर आंबेडकरी विचाराच्या विद्यार्थी संघटना आणि त्यांना राजकीय पाठबळ देणारा राजकीय पक्ष जिवंत असता तर रोहिथ वेमुलाचा बळी घेण्याची हिंमत स्मुर्ती इराणी,दत्तात्रय बंडारू,आप्पा राव यांनी केली नसती,त्यांनी ती केली ती अखिल भारतीय विद्यार्थी संघटना वाढी साठी. आपली राजकीय शक्ती वापरली म्हणून आज त्यांना दोषी ठरवुन जन आंदोलन करणे हा आपला विरोधाला विरोध करण्याचा सनदशीर मार्ग असला तरी तो साप गेल्यावर सर्पणावर काठी मारण्या सारखा आहे.
   एमबीबीएसच्या शिक्षणा दरम्यान उच्चवर्णीय शिक्षकांच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या घटना राज्यात किंवा देशात हजारो आहेत.काही ठिकाणी त्यांची साधी नोंद होत नाही.कारण ते कोणत्याही विद्यार्थी संघटने सोबत किंवा सामाजिक,राजकीय संघटना पक्षा बरोबर नसतात,ज्यांना सामाजिकदृष्ट्या समाजा बरोबर राहण्याची जाणीव असते ते जाणीवपूर्वक संस्था,संघटना,पक्षा बरोबर हितसंबंध ठेवतात.त्यामुळे त्यांच्यावर अन्याय,अत्याचार करणारा हजारदा विचार करतो.म्हणून असा लोकावर अन्याय,अत्यचार झाल्यावर त्यांना समाजाची गरज भाजते.तो पर्यंत ते तटस्थ आणि स्वताच्या गुर्मीत असतात.आंबेडकरी विचारधारा जागरूक आणि सतर्क असलेल्या समाजाची चळवळ आहे.म्हणून आज कोणत्याही क्षेत्रात ती मागे नाही, त्याने प्रगती आणि समृद्धीच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱया समाजाच्या नाकावर टिचून ताट मानेने वावरत आहे.त्यामुळे इतर समाजाच्या मनात एकाच वेळी संताप, उद्वेग आणि असहाय्यतेची भावना निर्माण झाली आहे.भारतातल्या मागसवर्गीय जाती-जमातीतील स्कॉलर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची कारणमीमांसा करतानाच इथले समाजशास्त्रीय जातवास्तव अधोरेखित करण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करीत आलो आहेत.कुणाही संवेदनशील माणसाचे काळीज फाटून जाईल, अशा अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हत्येचा पंचनामा सत्य शोध समितीने,अन्याय अत्याचार कृती समित्यांनी केल्या आहेत. एम्स, आयआयटी, शासकीय मेडिकल कॉलेजेस मधील पंचवीस वर्षाचा एकूण आवहाल आपण जर तपासला तर त्यातून कोणाला आपण न्याय मिळवून दिला त्यांचे एकही आदर्श उदाहरण आपल्या डोळ्या समोर नाही.नितीन आगे या विद्यार्थ्याला शाळा कॉलेज मधून बाहेर नेउन मारा असे सांगणाऱया मुख्यधापक बाळासाहेब वाघ यांचे आंबेडकरी विचारच्या लढाऊ संघटना,पक्षाच्या नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी काय वाकडे केले हे कोणी सांगू शकेल काय ?.

मागासवर्गीय विद्यार्थ्याने कितीही अभ्यास केला.गुणवंतां सिद्ध केली तरी त्याला जातीमुळेच नोकरी मिळते हे ब्राम्हण समाज सोडून इतर सर्व ( बहुजन ) समाजच्या डोक्यात ह्याच उच्चवर्णीयांकडून भरविल्या गेले आहे.राज्यातील नितीन आगे,संजय जाधव,सुनील जाधव,सागर शेजवळ,सोनई च्या मुली या शिक्षणामुळे इतर समाजच्या डोळ्यात सलत होत्या हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही.त्याला पोलीस आणि मिडीयाने प्रेम प्रकरणाचा रंग चढविला,आणि त्यात दोन दोन महिने आंदोलन करणारी कार्यकर्ते,नेते फसले,दोन तीन महिने गल्लीबोळात आंदोलन झाली.त्यांचे काय झाले?. ती फसली असे म्हणणे चूक ठरणार काय?.
हैदराबादचा रोहिथ वेमुला हा तर आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता.भारतातील सर्वात जास्त सामाजिक संस्था (एन जी ओ )मागासवर्गीय समाजाच्या विकास आणि कल्याण करण्या करिता हैदराबाद मध्ये आहेत.शिक्षणाचे प्रमाण बरया पैकी आहे.राजकीय जागृती महाराष्ट्रा पेक्षा जास्त आहे.मग रोहितच्या संघर्षात फेलोशिप रोखल्या पासून होस्टेलच्या बाहेर फेके पर्यंत कोणी मदत करण्यास पुढे का आले नाही?.महाराष्ट्रातील लोक किती ही राजकीय गटात विभागले असले तरी ते फक्त अन्याय,अत्याचारचा निषेध,निदर्शन,मोर्चा आंदोलनात एकत्र येतात.त्यामुळे ते देशात सर्वात पुढे आहेत.मागासवर्गीय समाजातील शिक्षण घेणारा आंबेडकरी तरुण मग तो चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता असो, की निव्वळ चारचौघांसारखं मुकाटयाने करिअर एके करिअर करणारा असो, त्याला संघर्ष करून मरण टळता येत नाही. त्याचे आंबेडकरी असणे हेच इथल्या सनातनी मानसिकतेला त्याला संपवायला सबळ कारण असते.रोहिथच्या आत्महत्येला कारणीभूत असणारी जी नीच मानसिकता आहे, ती नेमकी हीच आहे.केवळ याकुब मेनन याच्या फाशीला विरोध केला म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदने त्याला देशदोही ठरविले एवढेच कारण नाही. रोहिथ आणि इतर जातिभेदाचे बळी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता होती, परंतु उच्चवर्णीय सनातनी प्रोफेसर आणि प्रिन्सिपॉल यांना हवी असणारी, त्यांची आवडती ‘जात’ नव्हती. हाच त्या सर्वांचा मुख्य दोष होता. अगदी नितीन आगे आणि रोहिथचा ही.
मागासवर्गीय खालच्या जातीतले विद्यार्थी इतक्या वर येऊन व्यवस्थेला वरचढ ठरतात,तेव्हा अज्ञान,अंधश्रद्धा आणि रीतीरीवाजाला विज्ञानाची कास धरणारा हा विद्यार्थी,कार्यकर्ता,नेता सनातनी विद्वान मनुवादी हिंदू लोकांना,नाईलाजाने सहन करावा लागतो.कारण त्यांना हे भारतीय संविधानाच्या चौकटीत खपवून घ्यावे लागते.तेव्हा त्याचे खच्ची करण दोन प्रकारे होते एकतर त्याला भटा ब्राम्हणाची विषकन्या देऊन जावई केल्या जातो किंवा सत्तासुंदरीचे दर्शन घडविले जाते,एकवेळ तिचे दर्शन झाले की हा विद्यार्थी दसे पासूनचा वसतिगृहात राहणार कार्यकर्ता, नेता बनून समाजाची चळवळीची विक्रीचं करीत राहतो,तर काही प्रामाणिक ,इमानदार लढाऊ सरसेनापती खासदारांचे आमदार ते ही मागच्या दाराने बनतात,कसा मुळे घडते हे ?.भटा ब्राम्हणाची दुधारी यंत्रणा या कामी खूप वातावरण निर्मिती करते,( उदाहरण रामदास आठवले ते सचिन खरात ) त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील विचार करणारे, प्रश्न विचारणारे, व्यवस्था तोडू पाहणारे, संघर्ष करू पाहणारे कुठच्याही जातीचे लोक, हे प्रस्थापित व्यवस्थापन करणाऱ्या पुरोगामी,समाजवादी, डाव्या,उजव्या पक्ष संघटना प्रमुखांना नको असतात,
  रोहित व्यवस्था बदलू पाहणारा, आंबेडकरी विचारधारा जाणणारा, जगणारा एक तरुण होता.तो संघर्ष करून मरणास तयार असणारा.आत्महत्या करूच शकत नाही. म्हणूनच तो प्रस्थापितांसाठी अधिक घातक ठरत होता.खरे तर स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची क्षेत्रे खुली झाली, परंतु मागासवर्गीयामधून उच्चशिक्षण घेऊन पुढे येऊ पाहणारी पिढी शांभुक,एकलव्य ते रोहित पर्यंत थंड डोक्याने संपवायचे काम आज ही चालूच आहे.कुठल्याही क्षेत्रातले वर्चस्व टिकविण्याचे जबाबदारी त्यांनी आजही इतर समाजातील मराठा,बनिया,बहुजन समाजातील मनूवादी मंडळी कडे प्रशिक्षण देऊन दिली आहे.
जागृत विद्यार्थी असणे हा यांच्या मुळावर बसलेला घाव आहे, याची कल्पना पेरियार स्टडी सर्कल, नॉन नेट फेलोशिप व एफटीआयआय आंदोलन,याबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकांतून दिसून आली होती. या सर्व आंदोलनात विद्यार्थ्यांच्या रक्ताने भाजप सरकारचे हात माखले आहेत.सरकारी मुस्कटदाबीनेच रोहितला संपवले आहे. इथल्या दहशत पसरविणारया मान्यताप्राप्त व्यवस्थेनं, चालू काळात शिकणाऱया, आणि पुढील काळात उच्चशिक्षण घेऊ पाहणारया, ते घेण्याची मनात जिद्द बाळगणारया तमाम मागासवर्गीय विद्यार्थांना दिलेला हा सज्जड इशारा आहे.पदवी, पदव्युत्तर शिक्षणातले त्याचे पुढची वाटचाल करणारे सकारात्मक टप्पे त्याच्या कुटुंबातील लोकांचे आयुष्य वाढविणारे असतात. त्याच्या त्या यशात जेव्हा असे जातीय मोडते घातले जातात, तेव्हा तो विद्यार्थी फक्त एकटा मरत नाही.तर संपूर्ण चळवळ मारून टाकण्याचे ते एक हत्यार ठरते गेल्या पंचवीस वर्षात अशा लक्षवेधी घटना घडल्या त्यावर आंबेडकरी समाजाने दोन दोन महिने आंदोलन केली, त्यांची दाखल कोणी कोणी घेतली?. असा विचार करण्या पेक्षा त्यातून आम्ही काय शिकलो?. शिका!, संघटित व्हा!!,आणि संघर्ष करा!!!,याचा अर्थ आजही चळवळीतील जाणकार आणि किर्याशील कार्यकर्त्यांना नेत्यांना समजत नसेल तर देशातील आंबेडकरी चळवळीचे एकूण भविष्य काय असेल?.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा