ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी
पुस्तके दान करणारे लिंमचंद आलीकने
जगात वाचन संस्कृती जपणारे जागरूक वाचक खूप आहेत.म्हणूनच दरवर्षी लाखो पुस्तक ग्रंथ लिहिली जातात. व विकली जातात.त्याच प्रमाणे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि दैनिक नियमितपणे प्रसिध्द होत असतात. त्यांचा वाचक ही मोठा जागरूक वाचक असतो.दैनिक भंडारा पत्रिका विदर्भातील पांच सहा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या घराघरात जाते. त्यांचे संपादक राजेश चेटूले यांनी व त्यांच्या संपादकीय मंडळींनी गेल्या एक दीड वर्षा पासुन दर आठवड्यात माझा लेख छापून मला खूप प्रसिद्धी दिली. त्यातीलच आयुष्यमान लिंमचंद राजाराम आलीकने हे जागरूक वाचक आहेत.दार गुरुवारी किंवा शुक्रवारी लेख वाचून झाला की सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान यांचा कॉल आल्या शिवाय राहत नाही.हे असे कसे लिहले?. ते तसे पाहिजे होते.हे माहिती कोणत्या पुस्तकातुन घेतली. अशी नियमितपणे परखडपणे प्रतिक्रिया व्यक्त करणारे लिंमचंद बाबा त्यांचे वय 78 वर्ष आहे.भद्रावती चंद्रपूरच्या ऑडनरी फॅक्टरीत काम करणारे कुशल गुणवंत कामगार होते.त्यांची शेतजमीन व घर सर्व गोसीखुर्द धरणात गेले.ते नोकरी निमित्ताने गावाबाहेर होते म्हणून त्यांची विस्थापित म्हणून नोंद झाली नाही.सर्व कायदेशीर नोंदी असलेले कागदपत्रे असतांना ही त्यांना न्याय मिळाला नाही.त्याविरोधात संघर्ष करण्यासाठी निवृत्तीनंतर अडयाळला राहले.आज ही सनदशीर मार्गाने संघर्ष करीत आहेत. वयोमानानुसार अनेक आजार असणारच पण व्यायामाची नियमित सवय आणि विपश्यना करीत असल्यामुळे तरुणांना लाजवेल अशी जिद्द त्यांच्यात आहे.सामाजिक बांधिलकी आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा याबाबतीत पत्रकार, लेखक, साहित्यिक विचारवंत यांना फोन करून नेहमी तळमळीने बोलतात. ते फक्त बोलत नाही तर त्यांनी या सर्व चळवळीशी बांधिलकी ठेवली आहे.त्यासाठी ते अनेक दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक, मासिकाची वार्षिक वर्गणीदार बनले आहेत. "बंद दरवाज" हे मासिक कोणत्या चळवळीचे आणि कोणत्या संपादकाचे आहे आपणास माहिती आहे काय ?. विपश्यना वरील मासिक,बामसेफचे दैनिक मूलनिवासी नायक, मूलनिवासी संघटक,पैगाम,जनतेचा महानायक, प्रबुद्ध भारत यात लिहणाऱ्यां लेखकाशी मोबाईल वरून संपर्क ठेवतात.त्याच बरोबर अनेक समस्या वर अनेकांना कॉल करून प्रोत्साहन देण्यासाठी संपर्क साधतात.अशा लिंमचंद राजाराम आलीकने यांनी मला नियमितपणे कॉल करून भेटण्यासाठी येण्यास भाग पाडले.माझे वय झाले आहे. माझे कधीही निधन होईल आणि मी गेल्यावर मी जमा केलेली ही पुस्तके ग्रंथ रद्दीत विकल्या जातील. त्यापेक्षा तुमच्या सारख्यानां दिल्यास त्यांची योग्य दखल घेतली जाईल, ते तुम्ही वाचुन तुमच्या ज्ञानात भर पडेल व आणखी ताकदीने लिहणार ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी ही पुस्तके खुप उपयोगी पडतील आणि लाखो वाचकांचे प्रबोधन करणार म्हणूनच मला ही पुस्तके तुम्हाला दान करायची आहेत.ती त्यांनी मला 22 मे 2018 त्यांच्या घरी दान दिले.ती खालील प्रमाणे आहेत.
1) भारतीय इतिहासाचे साक्षीदार, लेखक डॉ कृष्णकांत कवडुजी डोंगरे,देणगी मूल्य 300 रुपये, (2) डॉ आंबेडकर जीवन और मिशन,लेखक एल आर बाली,संपादक भीम पत्रिका, देणगी मूल्य 200 रुपये, (3) भारत के आदीनिवासीयो का इतिहास, लेखक ऍड एच लाल दिल्ली हायकोर्ट देणगी मूल्य 200 रुपये, (4) बौद्ध कालिन भारत का इतिहास, लेखक मुंशी एन एल खोब्रागडे, देणगी मूल्य 50 रुपये, (5) क्रांती आणि प्रतिक्रांती,लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर देणगी मूल्य 50 रुपये, (6) अस्पृश्य मूळचे कोण?.आणि ते अस्पृश्य कसे बनले?.लेखक भिमराव रामजी आंबेडकर देणगी मूल्य 50, (7) शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा ,लेखक महात्मा ज्योतीराव फुले,देणगी मूल्य 50 रुपये, (8) इतिहास तज्ञ चंद्रनाग आणि बौद्ध स्थळाचा शोध व बोध,लेखक दीक्षित बाबुराव आवळे देणगी मूल्य 60 रुपये, (9) नाग बौद्धो की पावन धरोहर पवनी के स्तूप पर हिंदुओ का जगन्नाथ मंदिर द्वारा अतिक्रमण क्यो?.,लेखक हबीर अंगार ई, देणगी मूल्य 100 रुपये, (10) आत्मदर्शन लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 30 रुपये, (11) बौद्ध जीवन मार्ग,लेखक मधुकर ताकसांडे, देणगी मूल्य 10 रुपये, (12) जागे मंगल प्रेरणा, लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (13) समाधी मार्ग, लेखक धर्मानंद कोसंबी देणगी मूल्य 24 रुपये, (14) कल्याण मित्र, लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (15) आत्मकथन भाग 1,लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (16) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म देणगी मूल्य 60 रुपये, ही एकूण 1039 रुपयांची पुस्तके आयुष्यमान लिंमचंद राजाराम आलीकने राहणार सौंदड अडयाळ,तालुका पवनी जिल्हा भंडारा यांनी ही मला अभ्यासपूर्ण लिखाण करण्यासाठी दान दिली.
पुस्तक काय करू शकतात.यासाठी विश्वरत्न ड़ाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.1 मंदिर बांधणे म्हणजे 1000 भिकारी तयार करणे.आणि 1 ग्रंथालय बांधणे म्हणजे.लाखो विद्वान तयार करणे. म्हणूनच वाचन का आवश्यक आहे.एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !.श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे.पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही.वाचनामुळे ज्ञानात भर पडते. वाचनासाठी फक्त आवड पाहिजे,माणूस एसटी,रेल्वेने प्रवासात असला तरी उभ्या उभ्याने वाचन करतो.म्हणूनच वाचन करणारी माणस विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत.वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो.
वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर. आता मलाच सारे काही कळते,अशा नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.
वाचनामुळे माणूस नम्र होतो जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते.वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.जगात जेवढे लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते. आयु लिंमचंद राजाराम आलीकने यांचा अनेक साहित्यिक विचारवंत, पत्रकार यांच्याशी संपर्क व ओळख असतांना माझी ओळख नसता, माझी ही पुस्तके दान देण्यासाठी निवड केली.आणि पुस्तके देऊन मला खूप सन्मानित केले.ते मी कोणत्याही शब्दात मांडू शकत नाही.पण त्यांनी दिलेल्या पुस्तकाचा ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी आणि जास्तीतजास्त वाचकाच्या प्रबोधनासाठी करीन.पण लिंमचंद राजाराम आलीकने सारखा विचार करणारी, दूरदृष्टी ठेवणारे माणस आंबेडकरी चळवळीत आहेत हे गर्वाने सांगावसे वाटते.
सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई 9920403859.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा