बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ २००७ ला पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला.देशातील पहिली एस सी ची महिला देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली. आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय एस सी महिला नेता ठरली.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे.उतर भारतात कांशीराम यांनी जी समाज प्रबोधनाची मोहीम राबविली त्यामुळेच कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई असा नारा दिल्या जातो.
महापुरुषाची विचारधारा सांगणारी जी बसपा देशातील बहुजन समाजाला जागृत करून सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!."
मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात.आणि त्याचा वापर समाजाला तोडण्यासाठी हत्यार म्हणून कसा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि सयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे. आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे एस सी,एसटी,ओबीसी शोषित आदिवाशी अल्पसंख्याक समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.
कांशीराम यांच्या बसपाची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ होत्या आणि आहे. तरी चमच्यानी पक्षात भ्रष्टाचार केल्यामुळे चाळीस मंत्री गुन्हेगार ठरले त्यांना मायावती यांनीच जेलमध्ये टाकले ,पण पक्षाला विचारधारेला कलंक लागला असा विचार बहुजन समाज जास्त करतो,काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कारकीर्द मध्ये किती घोटाळे व भ्रष्टाचार झाले पण ते सर्वच समाज विसरून जातात,बहुजन समाज मात्र त्यावर कायमच चिंतन करत राहतो.
बसपाने बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण घेण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती केली आहे. सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे अनेक जिल्ह्याला दिली आहेत, त्यामुळेच बहुजन समाजात वैचारिक व आर्थिक क्रांती झाली. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात मोठा बदल झाला. हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने महत्वपूर्ण करून ठेवले "जिसकी संख्या भारी,उतनी उसकी भागेदारी" संपली.जिसका पैसा भारी उतना उसका पद भारी झाली.त्यामुळे घरादाराची परवा न करता बसपा साठी काम करणाऱ्या जीवदानी कॅडर चे मरण झाले.आणि त्यामुळेच चमचा युग काय करू शकते.हे दाखवून दिले.
मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून मान्यवर कांशीराम यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने देणगी,बुद्धी,वेळ आणि पैसा मिळविला त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.
कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक, राजकिय नेत्याने असे धाडस केले नाही.कांशीराम यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा ,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.
कांशीरामजी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा व मायावती आज प्रत्येक समाजाच्या घरात पोचली आहे,त्यामुळेच ब्राम्हण,बनिया,क्षेत्रीय समाज आता मोठ्या प्रमाणात बसपा मध्ये सहभागी होऊन जयभिम बोलतो आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हितासाठी उभे केले जाते.चमचा आपल्या समाजातील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो. कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा मान्यवर कांशीराम यांच्या स्मृर्ती दिनी बहुजन समाजाला विसरता येत नाही. काँग्रेस,भाजपा ज्या प्रमाणे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सत्ता काबीज करते त्याच प्रमाणे बसपाची वाटचाल आता सुरू झाली आहे, त्यामुळेच बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!. असे स्वप्न पाहण्यास हरकत नसावी, सर्व समाजाला सोबत घेतल्याशिवाय सत्ता प्रस्थापित करता येत नाही, त्यासाठी इतर पक्ष ज्या प्रमाणे काम करतात तसेच बसपाला करणे आवश्यक आहे, परिस्थिती नुसार बदल घडवून आणला पाहिजे त्यादृष्टिकोणाने मायावती योग्य प्रकारे राजकारण करत आहेत असे समजले पाहिजे,त्या सर्वांना सोबत घेऊन केंद्रातील सत्ता हस्तगत करू शकतात,मान्यवर कांशीराम जी च्या तालमीत तयार झालेल्या मायावती समजून घ्यायला मोठी अडचण आहे. दूरदृष्टी ठेवून काम केल्यास राष्ट्रीय पातळीवर मायावती च्या तोडीचे धाडसी राजकीय नेतृत्व दुसरे नाही.परिस्थिती नुसार माणसं बदलतात,तसेच राजकीय समीकरण आर्थिक परिस्थिती नुसार बदलतात,बहुजन समाजातील लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे, काँग्रेस, भाजपा कम्युनिस्ट,समाजवादी पक्षात सर्व समाजाचे लोक काम करू शकतात मग बसपात का नाही, इतर समाजाचे लोक बसपात सहभागी झाले तर प्रत्येक वेळी त्यांच्या जातीचा बाहू करता काम नये,वैचारिक फुटपट्या सर्वच ठिकाणी वापरल्या जात नाहीत, देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती दलित आहे,त्याला मंदिरात प्रवेश नाही,अनेक आमदार खासदार मागासवर्गीय समाजातील आहेत,त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तरी त्या त्या पक्षात त्यावर चर्चा होत नाही. म्हणूनच बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!. ही घोषणा यशस्वी झाली नाही. मान्यवर कांशीराम यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे धाडस आत्मसात केले पाहिजे तरच राजकारणात यशस्वी होता येते हे उद्धवजी ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केल्यापासून त्यांचा कट्टरपंथी हिंदू चेहरा कसा कसा बदलत गेला हा पी एच डीचा विषय झाला आहे. त्यानुसार मायावती यांना बाबा तेरा मिशन अदूरा,बी एस पी करेगी पुरा!. हे कांशीरामजी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी १५ व्या स्मृतीदिना निमित्ताने ठरवावे लागेल.मान्यवर कांशीरामजी यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला त्रिवार वंदन
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप मुंबई,