सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता

 आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता



आंबेडकरी विचारांचा जय जय कार करून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तडजोडी करणारे सामाजिक,धार्मिक आणि राजकीय नेते पायलीचे पंधरा मिळतील पण क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करणारे शोधावे लागतील,संविधानाच्या चौकटीत राहून पंचशिलेचे पालन करणारे व कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गाला संघटनेच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते पदाधिकारी बनविणारे एकमेव कामगार नेते म्हणजेच आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष


स्वतंत्र मजदूर युनियन,(आय एल यु) व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार,मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे नेते म्हणून राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता अशी लक्षवेधी ओळख निर्माण झाली आहे.
सुरक्षित नोकरी करणारे आरक्षण लाभार्थीच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रातील तळागळातील असंघटीत  कामगारांचे आशास्थान सन्मानीय जे.एस.पाटील साहेब आहेत. उत्तर भारतात बहुजन समाजात मान्यवर कांशीराम यांनी प्रबोधन करून प्रचंड राजकिय जागृती निर्माण केली होती.त्यामुळेच मागासवर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय महत्वकांक्षा निर्माण झाल्या आहेत. आपल्या राजकीय मूल्यांबाबत उघडपणे भरभरून बोलणारा बहुजन समाज मुख्यतः कर्मचारी-कामगार वर्ग हा फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीच्या माध्यमातून संघटित होण्याबाबत मात्र अगदीच उदासीन असल्याचे उत्तर व दक्षिण भारतात दिसून येते. कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात गोळवलकर, गांधीवादी,साम्यवादी कम्युनिस्ट विचारांच्या ट्रेंड युनियन मध्ये किर्याशील सभासद असल्याचे दिसून येते.प्रत्येक कामाच्या ठिकाणी असलेली ब्राम्हणवाद्यांची मक्तेदारी, त्यांच्या प्रस्थापित संघटना व मागास-बहुजन कामगारांवर पिढ्यानपिढ्या लादलेली सामाजिक विषमतेची व्यवस्था ही बहुजन समाजामध्ये फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीत संघटित होण्याविषयी भीती निर्माण करते. हि भीतीच सर्वप्रथम दूर करण्याचे लक्षवेधी प्रबोधन आदरणीय जे.एस.पाटील यांनी केले आहे.त्यामुळेच उत्तर भारतात व दक्षिण भारतात स्वतंत्र मजदूर युनियनची पाळे मुळे घट्ट होतांना दिसत आहेत.

भारतातील ब्राम्हणवाद दरवर्षी शोषण करण्याची माध्यमे बदलत असतो. व्यवस्थेचे परिवर्तन मान्य नसल्याने शोषितांसाठी वरवरचे बदल तो स्वतः घडवून आणतो. बहुजन कामगारांनी आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी स्वतंत्र 'ट्रेड युनियन' स्थापन न करता ब्राम्हणवाद्यांचेच नेतृत्व स्वीकारावे म्हणूनच वेल्फेअर असोसिएशन, फेडरेशनचा फार्स ब्राम्हणवाद्यांनी निर्माण केले आहेत. हे सर्वप्रथम स्पष्टपणे मांडण्याचे काम माननीय जे. एस. पाटील यांनी केले आहे, त्यामुळेच ते देशातील आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता म्हणून एकमेव नेतृत्व पुढे येत आहे. फुले-शाहू ,आंबेडकरवादी विचारांची देशव्यापी ट्रेड युनियन निर्माण होईल व ती राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन महासंघानां आव्हान निर्माण करील असे कोणालाही वाटले नव्हते, मान्यताप्राप्त प्रस्थापित ट्रेंड युनियनच्या विरोधात म्हणजेच ब्राम्हणवादाला थेट आव्हान आज आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता देत आहे.त्याला सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक यांनी मोठ्या प्रमाणात  साथ मिळत आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष आज स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून एक देशव्यापी कामगार चळवळ बनली आहे.
 आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता जे एस पाटील यांच्या कुशल नेतृत्वाने, मिशनरी बाण्याने, मोठ्या जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन उभी राहत आहे.देशभरातील मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील कामगार कर्मचारी जागरूक होऊन स्वतःच्या ट्रेंड युनियन स्थापन करून आय एल यु शी संलग्न करीत आहेत.
एखादया क्षेत्रात करिअर करायचंय म्हणून काम करणारे अनेक इंजिनियर लोक भेटतील पण आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियन उभी करण्यासाठी जीवाचे रान करणारा इंजिनियर एखादाच भेटेल. प्रशासनाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कामगार, कर्मचाऱ्यांना संघटित करून संघर्ष करण्यास तयार करणारा अधिकारी कुठेही भेटणार नाही, कामगारांना संघटित करून युनियन बनविली म्हणून बदली झाली,तर सुवर्ण संधी म्हणून नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करणारा इंजिनियर अधिकारी अशी ओळख निर्माण करणारा माणूस सेवा निवृत्तीनंतर घरी बसून नातवांना खेळवत बसला असतात.पण सेवा देत असतांना कामगार कर्मचाऱ्यांचे संघटना बांधणी करून प्रशिक्षित कार्यकर्ता पदाधिकारी निर्माण करणारा माझ्या दृष्टीने एकमेव नेता म्हणजेच जे एस पाटील साहेब असावे.
मी अनेक राजकीय सामाजिक नेते पाहिले, जे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटना पक्ष बांधणी करतात,तेव्हा ते तोंडात साखर डोक्यावर बर्फ व पायाला भिंगरी लावून फिरतात.तेव्हा कुठे त्यांचे थोडे फार नांव राहते.इथे पाटील साहेबांचे उलटे आहे,पायाला जरूर भिंगरी आहे,पण तोंडात साखर नाही, रोखठोक शब्दांत शिस्तबद्ध पध्दतीने काम करण्याची तंबी आहे,डोक्यावर बर्फ नाही तर सकारात्मक विचारांची प्रचंड ऊर्जा आहे.भावनिकता बिलकुल नाही,आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी भाषे सोबत सनदशीर मार्गाने आचरणाचे हमी हवी आहे. भारतीय संविधानात दिलेल्या प्रशासकीय कामाचा दर्जा वेळोवेळी दिली जाणारी जबाबदारी तिचा तिमाही,सहामाही,वार्षिक सर्वसाधारण सभेत मजूर केलेला अहवाल सादर करण्यात कोणतीही सबब चालत नाही, असे कडक शिस्तीचे आंबेडकरी विचारांचे क्रांतिकारी नेते सर्वच क्षेत्रात निर्माण झाले असते तर आंबेडकरी समाज हा शासन कर्ती जमात शंभर टक्के झाला असतात.
हजारो लोकांना गोळा करून संघटना स्थापन करून चालविण्या ऐवजी शंभर लोक रीतसर सभासद बनवून केलेलं काम निश्चितच ध्येय गाठण्यासाठी परिपूर्ण असते. त्यासाठी क्रांतिकारी विचारांची देवाणघेवाण नियमितपणे झाली पाहिजे.समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी आदरणीय जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन काम करते. त्यात देशभरातील संघटित असंघटित कामगार संघटना संलग्न होत आहेत, राष्ट्रीय पातळीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार,कर्मचाऱ्यांनी संघटित व्हावे आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेत्याचे हात मजबूत करावे,आदरणीय जे एस पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा लेख लिहला होताकौटुंबिक कामा निमित्ताने मुंबई बाहेर कोकणात असल्यामुळे व कोकणात नेटवर्किंगची समस्या असल्यामुळे तो देता आला नाही.लाखो कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाला प्रेरणा देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे.त्यांची साधी  राहणी,उच्च विचार आणि शुद्ध आचरण हे कौतुकास्पद आहे. कोणत्याही पोस्टरवर, होडिंग वर फोटो टाकून प्रचार प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई करणारे नेते शोधून सापडणार नाहीत, अशा कडक शिस्तीच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेंड युनियनचे राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्या आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता आदरणीय जे एस पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबई
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा