गर्वसे कहो हम भारतीय है,
युक्रान देशात जे विध्यार्थी वैदकीय शिक्षण घेण्यासाठी गेले तेव्हा ते हिंदुस्तानातील कट्टरपंथीयांची मुलमुली होते.त्यांचा शंभर टक्के समज आहे की एस सी,एस टी,ओबीसी आरक्षणामुळेच आम्हाला आपल्या देशात प्रवेश मिळाला नाही.पण वैदकीय महाविद्याला कोणाची आहेत?.त्याचे संचालक कोण आहेत?.सरकार कोणाचे आहे?.मग खरच एस सी,एस टी,ओबीसी यांना आरक्षणा मिळते काय?.पैसे मिळविण्यासाठी त्याचा कोटा सांगितल्या जातो आणि पैसे भरणाऱ्यांना योग्य मार्गाने वशिलेबाजी प्रवेश दिला जातो. त्यातील वशिले बाजी कोणी लक्षात घेत नाही.महत्वाचे म्हणजे सर्वच हिंदुस्थानातील कट्टरपंथीय हिंदू आहेत.प्रत्येकाचे म्हणणे आहे माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून ते म्हणतात गर्वसे कहो हम हिंदू है.ते कधीच म्हणत नव्हते.गर्वसे कहो हम भारतीय है,तीच लोक आज युक्रान रशिया मध्ये भारतीय असण्याचे बोर्ड,बॉनेर,झेंडा घेऊन जीव वाचविण्यासाठी धडपडत जीवघेणा संघर्ष करीत आहेत.
टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या 183 जयंतीनिमित्त मी लेख लिहला त्याबद्दल अनेकांनी कौतुक केले.पण काही चळवळीचे कार्यकर्ते विचारवंत ओबीसी लेखकाच्या पोटात दुखले,त्यांना माझ्या बद्दल वाईट वाटले की मी चळवळीतील कामगार नेता असूनही एका भांडवलदाराच्या बाबत लिहले.त्यांना ते पटले नाही,त्यांनी लिहिले की त्याटाटांनी कोणत्याही कारखान्यामध्ये एका प्रांताचे कामगार भरु नका.स्थानिक कामगार जास्त भरु नका, परप्रांतिय मजुर भरा म्हणजे कामगारांची एकी होणार नाही.ते एकमेकांशी धर्म,जात,प्रांतावरुन,भाषेवरुन लढत रहातील व मालकांना त्यांच्या मर्जीचे कायदे करता येतील,अर्थात कामगारांचे शोषण व मालकांचा नफा अबाधित राहील.अशा भांडवलशाही लोकांवर तुम्ही लेख लिहीता, त्याला काय अर्थ आहे.महिन्यातून एकच लिहा,पण अर्थपुर्ण लिहा.सगळ्याच विषयांवर लिहिले पाहिजे,असा अट्टाहास नको.असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या या मित्राला नेमके कोणते दुःख आहे हेच कळत नाही, मी जगप्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा यावर लिहले यांचे दुःख आहे की मी स्तंभ लेखक म्हणून नियमितपणे विविध विषयांवर विविध वृत्तपत्रांत लिहतो त्याला खूप प्रसिद्धी मिळते यांचे दुःख आहे ते मला समजले नाही.असो ते ही शेवटी हिंदू आहेत हेच सांगतात.मी पारशी टाटा च्या कंपनीत १९८२ ते २०२१ पर्यत अनेक प्रकल्पावर जबाबदार कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले पण मला कुठे असे जाणवले नाही.असो विषय आहे गर्वसे कहो हम भारतीय असण्याचा.
भारतात वैदकीय महाविद्याला कोणाची आहेत?.कोणत्या कट्टरपंथीय हिंदू उद्योगपती ने हॉस्पिटल निर्माण केली.अल्पसंख्याक समाजाच्या बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं! असा इतिहास आहे.त्यावर कधी लिहल्या जात नाही.कि चर्चा होत नाही.मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो.पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती.यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत.तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात चिमुटभर साखर टाकली. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात साखर मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली. पारसी लोक बुद्धिमान होते,उद्यमी होते.ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.
ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटीशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला.अनेक पारसी कुटुंबांनी आपल नाव कमवले व पैसा कमावला.पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणनारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. बऱ्यापैकी कॅम्पच्या भागात हे पारसी वसले. इथले आल्हाददायक हवामान त्यांना मानवल.त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.
पारसीप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जीभॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता. यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.हा इतिहास मनुवादी भांडारकर संशोधन करणारे सांगणार नाहीत.म्हणूनच तो आपण वाचला पाहिजे.
पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक बैरामजी जीजीभोय हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या.जीजीभोय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोट वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्याला त्यांचच नाव देण्यात आलं.
१८७१ साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेज बनलं.एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेग सारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. वाडियांनी त्यांना पैशांची मदत केली. तर सर कोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दांपत्याने जागा दिली अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिल.या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं जहांगीरच नाव देण्यात आलं.१९४६ साली त्या काळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता.याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृद्यरोगावर उपचार करायला केकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृद्यरोगावरील विशेष उपचाराचा प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांच एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव रुबी हॉल क्लिनिक असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले. गर्वसे कहो हम हिंदू है मानणाऱ्या सर्वांनाच हे वैदकीय महाविद्याला सेवा देतात.त्याची मुलमुली आणि पालक मंदिर बांधायला जास्त प्राधान्य देतात.म्हणूनच नवीन वैदकीय महाविद्यालय निर्माण होत नाही.आणि जी झाली त्याचे मुख्य उदिष्ट पैसे कमविणे आहे आरोग्य सेवा देणारे डॉक्टर निर्माण करणारे नाही.
मुंबईतील प्रसिद्ध के ई एम हॉस्पिटलची कथा ही प्रेरणादायी आहे.तिची आरोग्य सेवा आणि सेवा देणारे डॉक्टर कौतुकास पात्र आहेत.पुण्याच्या रास्ता पेठेत सरदार मुदलियार यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी एडलजी यांनी प्रसूती शास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली.काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी मात्र के.ई.एम हे पुढच्या आयुष्यभराच हे मिशन बनलं.बानू कोयाजी यांनी केईएमचा कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवल. त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरत मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड दिली.डॉ.बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराच आणि आपलेपणाचं नाव बनलं. आजही ही जहांगीर पासून ते केईएमपर्यंत अनेक रुग्णालये पुंण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत.वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवल आहे.सायरस पूनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक अजरामर पायंडा पाडला.
मुंबईतील आचार्य दोंदे मार्गावर परळ येथे एक वैद्यकीय महाविद्यालय आहे.सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज म्हणजेच जी.एस.मेडिकल कॉलेज या नावाने ते ओळखले जाते. हे कॉलेज किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (के.ई.एम.) या रुग्णालयाशी संलग्न आहे.हे वैद्यकीय महाविद्यालय सुमारे 2000 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पदव्युत्तर आणि सुपरस्पेशलिटी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण प्रदान करते. पदव्युत्तर आणि पदव्युत्तर शारीरिक आणि व्यावसायिक थेरपी कोर्समध्ये विविध संबद्ध वैशिष्ट्यांमधील मास्टर आणि पीएचडी कोर्स. या संस्थेमार्फत एक नर्सिंग स्कूलसुद्धा चालविले जाते.त्यात सुमारे 390 स्टाफ फिजिशियन आणि 550 निवासी डॉक्टरांसह, 1800 बेड असलेल्या रुग्णालयात दरवर्षी सुमारे 1.8 दशलक्ष रूग्ण आणि 85,000 रूग्णांवर उपचार केले जातात. हे औषध आणि शस्त्रक्रिया या सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत काळजी आणि प्रगत उपचार सुविधा दोन्ही प्रदान करते. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे अनुदानीत ही संस्था अक्षरश देशभरातील रुग्णांना विनामूल्य सेवा देते. विशेष ते सर्व समाजातील वंचित घटक कष्टकरी कामगार,मजूर असतात.तेव्हा ते हिंदू नसतात तर फक्त भारतीय नागरिक असतात.
जगात जेव्हा जेव्हा युद्ध झाली तेव्हा तेव्हा माणुसकी असणाऱ्या माणसांनी काय म्हटले असेल?.युद्ध नको,बुद्ध हवा.पण तो माझ्या देशात नको दुसऱ्या देशात हवा.नुसतंच गर्व से कहो असं म्हणून माणसं जगत नसतात.प्रत्येक धर्मियांचा आदर हेच भारतीयत्व Live & Let Live रतन टाटा,आदर पुनावाला.डॉ.बानू कोयाजी,ग्र्ँट होमी भाभा अशा अनेक पारसी धर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे.त्यांनी कधी म्हटले नाही गर्वसे कहो हम पारशी है.पारशी समाजाचे महान लोक कधीच कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करत नाहीत.तरी ते म्हणतात हम भारतीय है और भारतीय रहेंगे.आणि ८५ टक्के मराठे मागासवर्गीय ओबीसी बहुजन समाज काय म्हणतात गर्वसे कहो हम हिदू है.मंदिर वही बनायेगे.मग आता शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराचे काय?.यांनी जर का ठरविले कि आम्ही भारतीय लोक तर काय होईल.बहुजन हिताय बहुजन सुखाय.पटले तर स्वीकारा नाही तर वाचा आणि विसरून जा.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा