गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

 क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा!.



असंघटीत कामगार सर्वात जास्त कोणत्या जाती धर्माचे आहेतहे जग जाहीर आहे.पण त्याच बरोबर संघटीत कामगार आणि कर्मचारी कोणत्या जाती धर्माचे आहेत, यांची राज्य,केंद्र सरकार कडे रीतसर नोंद आहे.कामगार असंघटीत असो अथवा संघटित कामगार यांनीच जगात सामाजिक, राजकीय क्रांत्या घडविल्या हा इतिहास आहे.मग जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटल्या जाते हे शंभर टक्के सत्य आहे. मानवाला दुःख मुक्त करण्याचा संदेश देणारे जगात पाहिले मानव महापुरुष, महासंत तथागत गौतम बुद्ध होत,त्यांनी अडीच वर्षा पूर्वी सांगितले होते,गुलामला माणसा सारखे वागवा. सावकार, शेतकरी,राजे,महाराज्यांनी गुलामाला माणसा सारखी वागवणुक दिली. त्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात प्रचंड भर पडली आणि बदल घडला,त्याच प्रमाणे भारतीय कामगार संघटनेचा इतिहास महात्मा फुलेचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पासून सुरू होतो.त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन या कामगार संघटनेची स्थापना १८८४ मध्ये केली म्हणून त्यांना कामगार चळवळीचे जनक आम्ही म्हणतो.कारण त्यांनी गिरण्यातील कारखान्यातील असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांना देशात प्रथम संघटित केले.आणि संघर्ष करून अनेक अधिकार मिळवुन दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३४ ला स्वतंत्र मजदूर युनियनची Independent Labour Union,(ILU).स्थापना केली, हे सर्व क्षेत्रातील संघटित असंघटीत कामगारांचे राष्ट्रीय फेडरेशन असेल.असी त्यांची संकल्पना होती,१९३४ ते १९३६ पर्यंत त्यांनी अतिशय दुर्लक्षित अज्ञानी,असंघटीत सफाई कामगार, दगड फोडणारे खाण कामगार, कोळसा खाणीत काम करणारे कामगार यांची खाणीत जाऊन पाहणी केली, मुंबईतील सफाई कामगार कर्मचारी यांची १९३७ साली म्युनिसिपल कामगार संघ ही ट्रेड युनियन स्थापन केली.
मुंबई ही भारताची औधोगिक आणि आर्थिक राजधानी आहे.म्युनिसिपल कामगार संघ मुंबईतुन राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका मध्ये मागासवर्गीय समाजाची आंबेडकरी विचारधारा असणारी ट्रेंड युनियन असायला पाहिजे होती.देशभरातील सर्व महानगरपालिका,नगरपालिकेतील कामगार कर्मचारी हे आय एल यु चे सभासद होऊन आय एल यु हे देशव्यापी आंबेडकरी विचारधारेचे ट्रेंड युनियन महासंघ असता.पण तसा प्रयत्न झाला नाही असे म्हणता येत नाही,प्रयत्न झाला पण तो एक खांबी नेतृत्वात झाला.ज्या क्षेत्रातील जो तज्ञ असेल त्यांनीच त्याचे नेतृत्व केले पाहिजे.केवळ तज्ञ असुन चालत नाही,त्यात कुशल वक्तृत्व कौशल्य,संघटन कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आवश्यक असते.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या कोणत्याही संस्था,संघटना,पक्षात लोकशाही नुसार सभासद नोंदणी होऊन तिमाही,सहामाही,वार्षिक बैठका होत नाहीत,त्यांचे रीतसर रिकार्ड ठेऊन त्रिवार्षिक, पंचवार्षिक निवडणूका होत नाही.एकच नेता धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व करतो,तोच नेता त्यांच्याशी प्रामाणिक,लाचारी पत्कारून चमचागिरी करीत असतो त्यालाच कार्यकर्ता पदसिद्ध पदाधिकारी बनतो.तो संस्था,संघटना आणि पक्ष वाढीसाठी काहीच करू शकत नाही,तो फक्त साहेबाला खुश ठेऊ शकतो.कुशल संघटक,कुशल वक्ता आणि कुशल नेतृत्व असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचे प्रवेशद्वार बंद असते. कौशल्य, गुणवत्ता दाखवुन नेतृत्व मिळाल्यास संस्था, संघटना आणि पक्ष मोठे होतात.जिल्ह्यात राज्यात दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेता निर्माण होणार नाही यांची काळजी घेणारे नेते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संस्था, संघटना आणि पक्ष वाढविण्यासाठी असमर्थ ठरले म्हणून त्यांनी स्वतःच्या संस्था, संघटना आणि पक्ष काढून स्वतःच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष झाले.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय संस्था, संघटना आणि पक्षात लोकशाही मार्गाने सभासद होऊन काम करून निवडणूका घेण्यासाठी भाग पाडावे त्याकरिता निःपक्षपाती,निस्वार्थी,निर्भीड पणे विचारधारे वर प्रामाणिक पणे काम केल्यास सर्वच समाजाचा राज्याचा देशाचा विकास आणि कल्याण निश्चितच झाला असता. 
आम्हाला बाबासाहेबांचे शब्द कधीच आठवत नाही. बाबासाहेब म्हणतात मी जेवढी गरिबी अनुभवली असेल, तेवढी देशातील कोणत्याच नेत्याने अनुभवली नसेल, मी गरिब असून कधीही गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभीमान व माझे आंदोलन कमी होऊ दिले नाही, ऐवढी गरिबी असूनही मी कधीही पैशासाठी, पदासाठी विकलो गेलो नाही आणि तेच ध्येय प्रत्येक कामगार कर्मचारी यांनी डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास.सत्ता कोणाची ही असो प्रशासन आपलेच असेल.आणि आपल्या रक्ताच्या माणसासांठीच काम करेल.
असा कामगार कर्मचारी आणि अधिकारी निर्माण झाला पाहिजे. हेच कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्गांचे ट्रेंड युनियन जाळे आर एस एस ने देशभर नव्हे जगभर निर्माण केले. आज ग्रामपंचायत ते सचिवालय पर्यंत त्यांचेच कामगार कर्मचारी अधिकारी कसे काम करतात त्यांचे अनेक उदाहरण दररोज वृतपत्रात नियमित वाचायला मिळतात. मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार करणारे आरोपी गावात,शहरात मोकाट फिरतात पोलिस अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ का असतात?. कारण कायद्या पेक्षा बाहेरील शक्ती मोठी असते.तिच्या दडपणाखाली कामगार,कर्मचारी,अधिकारीवर्ग काम करतो.म्हणुन त्यांचे स्वरक्षण करणारी यंत्रणा म्हणजे शासन प्रशासन असते.त्यांच्यावर ज्या विचारधारेच्या युनियनचे प्राबल्य आणि नेतृत्व असते.त्यांच्या दडपणाखाली हे सर्व प्रशासन काम करते.
मागासवर्गीय कामगार कर्मचारी विचाराने एकत्र आल्यास काय होऊ शकते त्यांचे हे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार कर्मचारी संघटना. ही ३९ वर्षापूर्वी स्थापन झाली आहे, त्यांनीच देशव्यापी विद्युत फेडरेशन २००० ला बनविले.त्यांच्याच प्रयत्नाने स्वतंत्र मजदूर युनियन २००३ ला नव्याने स्थापना झाली.आज महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना सोबत घेवून स्वतंत्र मजदूर युनियन देशभरात बावीस राज्यात आणि सतरा क्षेत्रात आदरणीय जे एस पाटील यांच्या त्यागी कुशल नेतृत्वाखाली लक्षवेधी वाटचाल करीत आहे. 
आरक्षण पदोन्नती आणि नवीन भरती ह्यात मागासवर्गीय समाजाच्या कामगार कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून दूर ठेवण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या शिक्षणाकरिता १९५६ ला एक संस्था स्थापन केली होती. त्यात विषय ठेवले होते राजकारण, अर्थकारण,बजेट व कामगार क्षेत्र,यावरून बाबासाहेब कामगार क्षेत्राला किती महत्व देत होते हे कळून येते. आम्हाला जो इतिहास घडवावयाचा आहे तो सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन घडवावा लागेल. 
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही इंजिनियर रमेश रंगारी आणि जे एस पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती.या कर्मचारी संघटनेच्या आपल्या २२ पतसंस्था आहेत.स्वतंत्र मजदूर युनियनचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षक  असला पाहिजे.त्यांनी कामगार कर्मचारी यांना आय एल यु चे धेय्य धोरणे कार्यप्रणाली समजावून सांगितली पाहिजे. आज अनेक संघटनेचे कार्यकर्ते,वरिष्ठ इंजीनिअर व अधिकारी संघटनेचे कार्यकर्ते स्वताच्या संघटना युनियनचे ध्येय धोरणे समजून सांगण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच ते इंटक,आयटक,सिटू,भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्या पदवीधरांना स्वार्थासाठी ट्रेड युनियनच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. पदोन्नती मधील आरक्षणाचा गंभीर प्रश्न असतांना आजच्या घडीला अडीच तीन लाख कर्मचारी अधिकारी पदोन्नती आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटना युनियनचे सभासद व आर्थिक देणगीदार आहेत.त्या आर्थिक बळावर ते सर्वोच्य न्यायालयात दिवसाला पंचवीस लाख रुपये घेणारा वकील उभा करीत आहेत.त्यांच्या वकीला समोर आपल्या वकिलाना जास्त वेळ बोलण्याची संधी न्यायमूर्ती देत नाही.तिथे ही उच्चवर्णीय समाजाची विषमतावादी व्यवस्था योग्य त्या पद्धतीने काम करते.याची जाणीव बहुसंख्य आरक्षण लाभार्थी मागासवर्गीय कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना नाही.ते अजूनही वेगवेगळ्या संघटना युनियन मध्ये विभागलेले आहेत.काय फरक आहे विषमतावादी आणि समतावादी विचारांच्या ट्रेड युनियन मध्ये हे समजून घेणे आजच्या परिस्थितीत अतिशय आवश्यक आहे.
कामगार कायदा १९२६ व सोसायटी कायदा १८६० जो सरकारी कर्मचारी अधिकारी यांना माहिती असला पाहिजे.कामगार क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या संघटना व त्यांची देशपातळीवरील सभासद संख्या आणि त्या संघटनेचे राजकिय स्वरूप. स्वतंत्र मजदूर युनियन व राष्ट्रीयपातळीवरील ट्रेड युनियन,संघटनेमधील फरक.
स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) शी संलग्न असलेल्या संघटित व असंघटित कामगार कर्मचारी संघटना आणि त्यांची सभासद संख्या.तिच्या वाढीसाठी उपाय योजना.  नगरपालिका व जिल्हापरिषद येथे असलेल्या संघटनेतील आपल्या कामगारांना क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या संघटनेचा पर्याय उपलब्द करून देण्यासाठी जनसंपर्क जनजागृती देण्यावर भर असला पाहिजे.असलेल्या संघटनांना आय.एल.यु शी संलग्न करून घेण्यासाठी वैचारिक प्रबोधन.असंघटित कामगारांच्या अडचणी व त्यावर उपाय. बाबासाहेबांचे कामगारापुढे दिलेले मनमाड व दिल्ली येथील भाषणाचे सार समजावून सांगून यातून जे कामगार कर्मचारी अधिकारी कार्यकर्ते म्हणून तयार होतील त्यांचे विभागीय पातळीवर एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर घेतल्या गेल्यास संघटनेकडे प्रशिक्षित कार्यकर्ता नेता नेतृत्व करण्यास सक्षम होईल.
उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी सेवा निवृत्तीनंतर काय करतात?.आर एस एस वर टिका करने सोपी आहे, पण त्यांच्या विचारांचा प्रशिक्षित वाहक तयार करून घरदार कुटुंब सोडून पूर्णवेळ समाजात काम करणारा स्वयंसेवक आपण पाहत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दलाची संकल्पना त्यांनी शंभर टक्के अमलात आणली. आपण मात्र चर्चाच करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियन स्वतंत्र मजदूर युनियन मान्यताप्राप्त करण्यासाठी आदरणीय जे.एस.पाटील निवृत्तीनंतर ही पायाला भिंगरी बधून देशभर संघटन बांधणीसाठी फिरत आहेत. लॉक डाऊन सारखी परिस्थिती असतांना ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मिटिंगा घेतल्या.शासन कर्ती जमात बनण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा होता. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यागी जिद्दी अभ्यासू कार्यकर्त्याची नेत्याची गरज होती.ती पूर्ण करण्याची जबाबदारी जे एस पाटील साहेब स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.देशातील सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांनी प्रामाणिकपणे सहकार्य केल्यास २०२२/२३ ला शंभर टक्के आपण यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच शासन करती जमात बनायचे असेल तर प्रशिक्षित कार्यकर्ता व नेताची आवश्यकता आहे.
सागर रामभाऊ तायडे९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट

 कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट



    कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक,मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते.जेंव्हा जेंव्हा माझं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो.परवाच्या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना हाॅट सीटवर आले.एकदम शांत रीतीने बसले.किंचाळत,डान्स करत,रडत,हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही.ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत.पीएचडी आहेत व कोलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.अतिशय प्रसन्न,साधं व्यक्तिमत्त्व.डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो. 
    नीरजजी खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतलं परंतु दुगुनास्त्रमुळे त्यांना ती लाईफ लाईन पुन्हा मिळाली.सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली.त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं.तीन लाख वीस हजार जिंकून,बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला. ब्रेक नंतर अमिताभ बोलू लागले.चलिए डाॅक्टरसाब अब आप के सामने आ रहा है ग्यारह वा प्रश्न..ए रहा प्रश्न..इतक्यात नीरजजी म्हणाले..सर मैं क्विट करना चाहता हूँ.. अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे,तीन लाईफ लाईन जीवित असताना.करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का?विचारलं..आज तक ऐसा कभी हुआ नही. 
नीरजजी शांतपणे म्हणाले.माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत.त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत.मला वाटतं "जो प्राप्त है पर्याप्त है." अधिक की आशा नही है.अमिताभ बच्चन अवाक् झाले.सर्वत्र शांतता पसरली.एक सेकंद स्तब्धता होती.नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं.अमिताभ म्हणाले..खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली.खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली.मनातून मी त्यांना नमस्कार केला. 
   आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही.हाव कमी होत नाही.कमीच पडतो.या पैशा मागे लागून घर,झोप,न नाती,प्रेम,मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही.अशा वेळी डॉ.नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी,अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली.तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं.आम्ही एका आश्रमात राहतो. 
    मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती.आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली.जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे.खून खराबा होताना आपण पाहतो.स्वार्थ बोकाळलाय सर्वत्र.परंतु हे उदाहरण अपवाद आहे.देव माणसात असतो.ते नीरजजी सारख्या दुऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात.मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. आज माझ्या आवडीच्या विषयावर म्हणजेच अनोख्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायला मिळालं याचा आनंद आहे. 
   गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी.स्वार्थाचा त्याग करावा.सर्व सुखी होतील.हा धडा शिकायला मिळाला.मला नेहमीच अशा व्यक्तिंविषयी आदर वाटतो व समाजाच्या उन्नतीसाठी परखडपणे लिहावं लागतं.काही लोक खूप अभ्यासपूर्ण लक्षवेधी प्रेरणादायी लिहतात पण नांव टाकायला घाबरतात.लोक काय म्हणतील.हीच भीती मनात असते.त्या लोकांचे लेख मला नेहमी आवडतात त्यांना मी संकलनात ठेवतो.एकमेकाशी जुळले की प्रसिद्धीला देतो.लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक लोक मनतात माझ्या मनातील आपण अक्षरक्षा मांडले.सायंटिस्ट पी.एच.डी असलेले  डॉ.नीरज सक्सेना असा निर्णय घेऊ शकतात.
  राज्य व केंद्र शासन प्रशासकीय सेवेतील उच्च पदावरील अधिकारी सेवा निवृत झालेवर संतुष्ट राहत नाही.किंवा राजकारणात सक्रिय असलेले नेते साठ,सत्तर,एन्शी झाले तरी आमदार खासदार की च्या चार,पांच टर्म पूर्ण झाल्या तरी कुठे थांबायला तयारच नसतात.त्यामुळेच अनेक पक्षाचा नवीन जन्म होतो.त्यामुळेच समाजात असंतुष्ट लोकांची वेगवेगळी जमात तयार होते. त्यातून एकाच कुटुंबातील वेगवेगळे पक्ष,संघटना, संस्था निर्माण होऊन देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा विकास होण्या ऐवजी भकास होण्यासाठी संघर्ष आणि स्पर्धा लागते. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील समजदार सुसंस्कारित मानसांनी कुठे थांबावे हे नक्की केले पाहिजे आणि संतुष्ट राहिले पाहिजे. 
संकलन :- सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

प्रकाश आंबेडकरांना "परिस" का म्हणतात ?.

 प्रकाश आंबेडकरांना "परिस" का म्हणतात ?.



परिस ही संकल्पना लोखंडांचं सोन करणारी आहे.लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते असा समज आहे.राजकारणात निवडून येण्यासाठी गडगंज पैसा आणि समाजात नावलौकिक असला पाहिजे तद्वतच निवडून येण्यासाठी जातीची भरभक्कम मते असली पाहिजे अर्थात तुमची जात संख्येने मोठी पाहिजे असा समज रुढ झाला आहे.आणि म्हणूनच मग छोट्या छोट्या जातीचे आणि परिस्थितीने गरीब असलेले लाखो होतकरू निवडणुकीच्या रिंगणातुन बाद झालेले आहेत हे लोकशाहीच्या ७२ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध केले आहे...!! 
   अशा परिस्थितीत १९९२-९३ साली नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली,त्या निवडणुकीत भारिप ने आदिवासी समाजातील भिमराव केराम या गरीब तरुणाला निवडणुकीत ऊभे केले,त्याच्या साठी आठवडी बाजारातून वर्गणी गोळा केली आणि भिमराव केराम या गरीब आदिवासी तरुणाला आमदार म्हणून निवडून आणले,आदिवासी समाजातील गरीब तरुणाच्या जीवनाचं,कुटुंबाचं सोनं झालं.
 अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू मतदारसंघातून अतिशय छोट्या कोळी समाजाचे डॉ.डी.एम.भांडे यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले,आणि त्यांना १९९९ साली आमदार म्हणून निवडून आणले, ते २००० सालच्या विलासराव देशमुख मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होते,त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 १९९९ साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून "बारी" या छोट्याशा जातीचे परिस्थितीने अतिशय गरीब असलेले रामदास बोडखे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडणुक खर्चासाठी पैसा दिला,मते दिली आणि निवडून आणले ते विलासराव देशमुख मंत्रीमंडळात रोजगार हमी राज्यमंत्री म्हणून मंत्री होते,त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
   अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील माळी समाजाचे बळीराम सिरस्कार अतिशय गरीब कुटुंबातील त्यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले तथा दोन वेळा बाळापूर मतदार संघाचे आमदार बनविले,बळीराम सिरस्कार यांच्या जीवनाचे,आणि कुटुंबाचे सोने झाले...!! 
अकोला जिल्हा परिषदमध्ये मुस्लिम समाजातील "कासार" या छोट्याशा जातीतील अतिशय गरीब कुटुंबातील सौ.साबिया अंजुम सौदागर या महिलेला भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष पदी विराजमान केले,त्यांची राजकीय पत निर्माण झाली आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 जळगांव जामोद येथील वृत्तपत्र विकणारा गरीब बौद्ध तरुण संजय पारवे याला भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली नगरसेवक म्हणून निवडून आणले आणि जळगांव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष बनविले,त्याची राजकीय पत निर्माण झाली,तो नेता म्हणून ऊभा राहिला त्याच्या जीवनाचे सोने झाले...!! 
  भटक्या विमुक्त जाती समुहातील "वडार"समाजाच्या सौ.अनिता अव्वलवार यांना भारिप बहूजन महासंघाने मुर्तिजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षा बनविले आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
अतिशय गरीब कुटुंबातील भटक्या विमुक्त जमाती मधील "पाथरवट" समाजाच्या सौ. कविताताई ढाळे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली निवडून आणले आणि पातुर पंचायत समिती उपसभापती बनविले त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 अकोला जिल्हा परिषद मध्ये अतिशय छोट्या तेली समाजाचे बालमुकुंद भिरड यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली,निवडून आणले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले,त्यांची राजकीय पत निर्माण झाली,त्यांची नेता म्हणून ओळख निर्माण झाली, त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 अतिशय गरीब, बौद्ध समाजातील प्रतिभाताई भोजने यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडून आणले आणि अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले, त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
वरील उदाहरणे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत,गेली चाळीस वर्षे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे अशाप्रकारे अनेक प्रयोग करीत आहेत आणि अतिशय छोट्या छोट्या जात समुहाचे,गरीब कुटुंबातील लोकप्रतिनिधी निवडून आणतं आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सभापती,पंचायत समिती सभापती,उपसभापती, सरपंच अशी विविध राजकीय पद ऊपभोगायला मिळतं आहेत.आणि त्यांच्या जीवनाचं सोनं होतं आहे म्हणून आशावादी जनता, छोट्या छोट्या जात समुहातील ओबीसी तरुण तथा आदिवासी,भटके विमुक्त प्रकाश आंबेडकर यांना परिस या उपाधीने संबोधतात...!! 
जे राजकीय पद आणि प्रतिष्ठा याची कल्पना सुद्धा केली नव्हती,ती श्रीमंतांची,आणि जातदांडग्यांची मक्तेदारी आहे असे वाटतं होते ते पद आणि ती प्रतिष्ठा प्राप्त होतं असेल तर ती बाब कल्पनातीत असते आणि म्हणूनच मग गरीब,होतकरु छोट्या छोट्या जात समुहातील भटके विमुक्त,आदिवासी,मायक्रो ओबीसी प्रकाश आंबेडकर यांना परिस समजतात आणि परिस म्हणूनच त्यांच्याकडे बघतात...!!. 
    २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक समाजाच्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी जातदांडगे,धनदांडगे राजकीय घराणेशाहीची  कोणाचीच भीती न बाळगता जातीचा उल्लेख करून मागासवर्गीय ओबीसी मराठा, आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या लढाऊ गरीब प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.त्यांना निवडून द्यावे की जात दांडगे,धन दांडगे राजकीय घराणेशाहीचे उमेदवार निवडून द्यावे याचा गांभीर्याने विचार सर्वच मागासवर्गीय ओबीसी,गरीब मराठा,आदिवाशी,भटक्या विमुकत्या सह मुस्लिम समाजाने करावा.गेली साठ सत्तर वर्ष कॉग्रेसने सर्व समाजाला कसा कसा न्याय दिला. त्याचा आपल्याला अनुभव आला आहेच.त्यानंतर भाजपाने २०१४ नंतर सर्व समाजाला कोणता वेग वेगळा न्याय दिला यांचा ही अनुभव आपण घेत आहात.
   सापनाथ आणि नागनाथ यांची कोणते ध्येय उदिस्ट धोरणे वेग वेगळी आहेत.याचा ही गांभीर्याने विचार मतदारांनी करावा आणि आपल्या मताची किंमत मीठ मिरची,मटन दारू किंवा हजार पांचशे नाही तर येणाऱ्या पिढीचा विकास की भकास लिहणारा असेल.म्हणून कोण निवडून येईल आणि कोण पडेल याचा विचार न करता कोणाच्या मतदानाने इतिहास लिहला जाईल त्यांना मतदान करा.आपली ही मतदार म्हणून  राजकीय पत निर्माण झाली पाहिजे. आपण ज्यांना मतदान केले त्यांची ही नेता म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे.आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पक्षांचे नेत्याचे आणि आपल्या जीवनाचे सोने झाल्या शिवाय राहणार नाही.हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि सत्ते शिवाय परिवर्तन बुद्ध,फुले,आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम यांनी घडवून दाखवला.निवडणूककडे केवळ हार जीत म्हणून पाहू नका. एक समाजाचे मिशन म्हणून पहा.आपला संघर्ष एका निवडणुकी पुरता मर्यादित नाही तो कायम स्वरूपी अन्याय अत्याचारांच्या विरोधात संघर्ष करण्याचा आहे हे विसरू नाक.आणि आपल्याच विचारांच्या पक्षाच्या नेत्याच्या उमेदवारांना मतदान करा.आपण आपली संख्या मतदानात दाखवली तर भविष्य काळात स्वाभिमानने जगत येईल.अन्यता गुलाम लाचार म्हणून जगावे लागेल.हे लक्षात घ्यावे.अन्य पक्षातील तमाम सर्व मागासवर्गीय,ओबीसी मराठा, आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मतदारांनी यावेळी त्या-त्या नेत्यांना नम्रपणे सांगावे,दादा,भाऊ,अण्णा,काका,साहेब आजवर आम्ही तुमच्या सोबत होतो.आज ज्यानं आम्हाला माणूस बनवलं त्याचा नातू हाक देतोय.माफ करा आम्हाला आता यावेळी त्यांच्या शब्दाला किंमत म्हणून त्यांच्या सोबत गेलेच पाहिजे,भले तो कुठेही नेऊ दे.पण त्याने रात्रदीवस संघर्ष करून प्रस्थापित पक्षांच्या जातदांडगे,धनदांडगे राजकीय घराणेशाहीच्या समोर वंचित बहुजन आघडी ही शक्ति उभी केली.त्यात आम्ही सहभागी झालोच पाहिजे.कारण आजचे आमचे हे आयुष्य,हे जीवन त्याच्या आजोबाची देणं आहे. आमच्या आयुष्याला आकार देता देता त्यांच्या घराची राख रांगोळी झालीय. त्याच्या आजोबानं त्यांच्या नातवंडांचा विचार केला असता तर ताट इस्त्रीची कपडे घालून आज दिमाखात फिरलो नसतो.मी ऊपाशी राहू नये म्हणून ज्यानं पावाचा तुकडा खाऊन दिवस काढले. एवढा त्याग कष्ट जिद्ध माझ्या जन्मदात्यानही केला नाही. त्या महापुरुषाचा नातू आम्हाला साद घालतोय.त्यांच्या सोबत उभे राहणे यांचे कर्तव्य आहे. माझ्या बाप आजोबा बाबासाहेबांच्या मागे जीवदेण्यासाठी उभा होता म्हणूनच आज आम्ही ताट मानने खेड्या गांवात शहरात उभे आहोत.(जयदीप,प्रा.जोगेंद्र कवाडे,आठवले सुरेखा कुंभारे,डॉ.मिलिंद माने,कुठे उभे आहेत हे डोळेउघडे ठेऊन पहा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संविधान चौकात नागपुरात पुष्पहार अर्पण केल्यावर जय श्रीराम घोषणा दिल्यावर यांनी काय केले. त्यावेळी नाही आणि नंतर ही काहीच बोलू शकले नाही यांचे कारण काय ???. लाचारी गुलामगिरी )
 आजवर आम्ही दारू पियून मटन बिर्याणी आणि हजार पांचशे रुपये घेऊन तुमच्या प्रचारासाठी जीवाचं रान केले. तुम्ही आम्हाला जे जे दिले तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आलोय. आता थोडं ज्यानं माणूसपण दिलं त्याच्या नातवासाठी थोडं करु द्या. नाहीतर इतिहासात आमची गद्दार,कृतघ्न म्हणून नोंद होईल.त्या महापुरुषा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी गमावली तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. सर्व मागासवर्गीय,ओबीसी मराठा,आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मतदारांनी थोडंसं संवेदनशील व्हावे आणि पहा मतदान केल्याने काय होते.आपल्या ही जीवनाचा परिस झाल्या शिवाय राहणार नाही. एकच वेळ विचारकरून दारू पियून मटन बिर्याणी खाऊन आणि हजार पांचशे रुपये घेऊन मतदान मात्र आपल्याच विचारांच्या पक्षाच्या नेत्याच्या उमेदवारांना मतदान करा.माझे विचार पटत नसतील तरी येणाऱ्या युवा पिढीच्या भविष्यासाठी वेळीच निर्णय घेऊन मतदान करायचा निर्णय घ्या.व इतरांना ही सांगा. 
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई