प्रकाश आंबेडकरांना "परिस" का म्हणतात ?.
परिस ही संकल्पना लोखंडांचं सोन करणारी आहे.लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते असा समज आहे.राजकारणात निवडून येण्यासाठी गडगंज पैसा आणि समाजात नावलौकिक असला पाहिजे तद्वतच निवडून येण्यासाठी जातीची भरभक्कम मते असली पाहिजे अर्थात तुमची जात संख्येने मोठी पाहिजे असा समज रुढ झाला आहे.आणि म्हणूनच मग छोट्या छोट्या जातीचे आणि परिस्थितीने गरीब असलेले लाखो होतकरू निवडणुकीच्या रिंगणातुन बाद झालेले आहेत हे लोकशाहीच्या ७२ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध केले आहे...!!
अशा परिस्थितीत १९९२-९३ साली नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली,त्या निवडणुकीत भारिप ने आदिवासी समाजातील भिमराव केराम या गरीब तरुणाला निवडणुकीत ऊभे केले,त्याच्या साठी आठवडी बाजारातून वर्गणी गोळा केली आणि भिमराव केराम या गरीब आदिवासी तरुणाला आमदार म्हणून निवडून आणले,आदिवासी समाजातील गरीब तरुणाच्या जीवनाचं,कुटुंबाचं सोनं झालं.
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू मतदारसंघातून अतिशय छोट्या कोळी समाजाचे डॉ.डी.एम.भांडे यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले,आणि त्यांना १९९९ साली आमदार म्हणून निवडून आणले, ते २००० सालच्या विलासराव देशमुख मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होते,त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!!
१९९९ साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून "बारी" या छोट्याशा जातीचे परिस्थितीने अतिशय गरीब असलेले रामदास बोडखे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडणुक खर्चासाठी पैसा दिला,मते दिली आणि निवडून आणले ते विलासराव देशमुख मंत्रीमंडळात रोजगार हमी राज्यमंत्री म्हणून मंत्री होते,त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!!
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील माळी समाजाचे बळीराम सिरस्कार अतिशय गरीब कुटुंबातील त्यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले तथा दोन वेळा बाळापूर मतदार संघाचे आमदार बनविले,बळीराम सिरस्कार यांच्या जीवनाचे,आणि कुटुंबाचे सोने झाले...!!
अकोला जिल्हा परिषदमध्ये मुस्लिम समाजातील "कासार" या छोट्याशा जातीतील अतिशय गरीब कुटुंबातील सौ.साबिया अंजुम सौदागर या महिलेला भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष पदी विराजमान केले,त्यांची राजकीय पत निर्माण झाली आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!!
जळगांव जामोद येथील वृत्तपत्र विकणारा गरीब बौद्ध तरुण संजय पारवे याला भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली नगरसेवक म्हणून निवडून आणले आणि जळगांव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष बनविले,त्याची राजकीय पत निर्माण झाली,तो नेता म्हणून ऊभा राहिला त्याच्या जीवनाचे सोने झाले...!!
भटक्या विमुक्त जाती समुहातील "वडार"समाजाच्या सौ.अनिता अव्वलवार यांना भारिप बहूजन महासंघाने मुर्तिजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षा बनविले आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!!
अतिशय गरीब कुटुंबातील भटक्या विमुक्त जमाती मधील "पाथरवट" समाजाच्या सौ. कविताताई ढाळे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली निवडून आणले आणि पातुर पंचायत समिती उपसभापती बनविले त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!!
अकोला जिल्हा परिषद मध्ये अतिशय छोट्या तेली समाजाचे बालमुकुंद भिरड यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली,निवडून आणले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले,त्यांची राजकीय पत निर्माण झाली,त्यांची नेता म्हणून ओळख निर्माण झाली, त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!!
अतिशय गरीब, बौद्ध समाजातील प्रतिभाताई भोजने यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडून आणले आणि अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले, त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!!
वरील उदाहरणे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत,गेली चाळीस वर्षे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे अशाप्रकारे अनेक प्रयोग करीत आहेत आणि अतिशय छोट्या छोट्या जात समुहाचे,गरीब कुटुंबातील लोकप्रतिनिधी निवडून आणतं आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सभापती,पंचा यत समिती सभापती,उपसभापती, सरपंच अशी विविध राजकीय पद ऊपभोगायला मिळतं आहेत.आणि त्यांच्या जीवनाचं सोनं होतं आहे म्हणून आशावादी जनता, छोट्या छोट्या जात समुहातील ओबीसी तरुण तथा आदिवासी,भटके विमुक्त प्रकाश आंबेडकर यांना परिस या उपाधीने संबोधतात...!!
जे राजकीय पद आणि प्रतिष्ठा याची कल्पना सुद्धा केली नव्हती,ती श्रीमंतांची,आणि जातदांडग्यांची मक्तेदारी आहे असे वाटतं होते ते पद आणि ती प्रतिष्ठा प्राप्त होतं असेल तर ती बाब कल्पनातीत असते आणि म्हणूनच मग गरीब,होतकरु छोट्या छोट्या जात समुहातील भटके विमुक्त,आदिवासी,मायक्रो ओबीसी प्रकाश आंबेडकर यांना परिस समजतात आणि परिस म्हणूनच त्यांच्याकडे बघतात...!!.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक समाजाच्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी जातदांडगे,धनदांडगे राजकी य घराणेशाहीची कोणाचीच भीती न बाळगता जातीचा उल्लेख करून मागासवर्गीय ओबीसी मराठा, आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या लढाऊ गरीब प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.त्यांना निवडून द्यावे की जात दांडगे,धन दांडगे राजकीय घराणेशाहीचे उमेदवार निवडून द्यावे याचा गांभीर्याने विचार सर्वच मागासवर्गीय ओबीसी,गरीब मराठा,आदिवाशी,भटक्या विमुकत्या सह मुस्लिम समाजाने करावा.गेली साठ सत्तर वर्ष कॉग्रेसने सर्व समाजाला कसा कसा न्याय दिला. त्याचा आपल्याला अनुभव आला आहेच.त्यानंतर भाजपाने २०१४ नंतर सर्व समाजाला कोणता वेग वेगळा न्याय दिला यांचा ही अनुभव आपण घेत आहात.
सापनाथ आणि नागनाथ यांची कोणते ध्येय उदिस्ट धोरणे वेग वेगळी आहेत.याचा ही गांभीर्याने विचार मतदारांनी करावा आणि आपल्या मताची किंमत मीठ मिरची,मटन दारू किंवा हजार पांचशे नाही तर येणाऱ्या पिढीचा विकास की भकास लिहणारा असेल.म्हणून कोण निवडून येईल आणि कोण पडेल याचा विचार न करता कोणाच्या मतदानाने इतिहास लिहला जाईल त्यांना मतदान करा.आपली ही मतदार म्हणून राजकीय पत निर्माण झाली पाहिजे. आपण ज्यांना मतदान केले त्यांची ही नेता म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे.आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पक्षांचे नेत्याचे आणि आपल्या जीवनाचे सोने झाल्या शिवाय राहणार नाही.हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि सत्ते शिवाय परिवर्तन बुद्ध,फुले,आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम यांनी घडवून दाखवला.निवडणूककडे केवळ हार जीत म्हणून पाहू नका. एक समाजाचे मिशन म्हणून पहा.आपला संघर्ष एका निवडणुकी पुरता मर्यादित नाही तो कायम स्वरूपी अन्याय अत्याचारांच्या विरोधात संघर्ष करण्याचा आहे हे विसरू नाक.आणि आपल्याच विचारांच्या पक्षाच्या नेत्याच्या उमेदवारांना मतदान करा.आपण आपली संख्या मतदानात दाखवली तर भविष्य काळात स्वाभिमानने जगत येईल.अन्यता गुलाम लाचार म्हणून जगावे लागेल.हे लक्षात घ्यावे.अन्य पक्षातील तमाम सर्व मागासवर्गीय,ओबीसी मराठा, आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मतदारांनी यावेळी त्या-त्या नेत्यांना नम्रपणे सांगावे,दादा,भाऊ,अण्णा,काका,साहेब आजवर आम्ही तुमच्या सोबत होतो.आज ज्यानं आम्हाला माणूस बनवलं त्याचा नातू हाक देतोय.माफ करा आम्हाला आता यावेळी त्यांच्या शब्दाला किंमत म्हणून त्यांच्या सोबत गेलेच पाहिजे,भले तो कुठेही नेऊ दे.पण त्याने रात्रदीवस संघर्ष करून प्रस्थापित पक्षांच्या जातदांडगे,धनदांडगे राजकीय घराणेशाहीच्या समोर वंचित बहुजन आघडी ही शक्ति उभी केली.त्यात आम्ही सहभागी झालोच पाहिजे.कारण आजचे आमचे हे आयुष्य,हे जीवन त्याच्या आजोबाची देणं आहे. आमच्या आयुष्याला आकार देता देता त्यांच्या घराची राख रांगोळी झालीय. त्याच्या आजोबानं त्यांच्या नातवंडांचा विचार केला असता तर ताट इस्त्रीची कपडे घालून आज दिमाखात फिरलो नसतो.मी ऊपाशी राहू नये म्हणून ज्यानं पावाचा तुकडा खाऊन दिवस काढले. एवढा त्याग कष्ट जिद्ध माझ्या जन्मदात्यानही केला नाही. त्या महापुरुषाचा नातू आम्हाला साद घालतोय.त्यांच्या सोबत उभे राहणे यांचे कर्तव्य आहे. माझ्या बाप आजोबा बाबासाहेबांच्या मागे जीवदेण्यासाठी उभा होता म्हणूनच आज आम्ही ताट मानने खेड्या गांवात शहरात उभे आहोत.(जयदीप,प्रा.जोगेंद्र कवाडे,आठवले सुरेखा कुंभारे,डॉ.मिलिंद माने,कुठे उभे आहेत हे डोळेउघडे ठेऊन पहा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संविधान चौकात नागपुरात पुष्पहार अर्पण केल्यावर जय श्रीराम घोषणा दिल्यावर यांनी काय केले. त्यावेळी नाही आणि नंतर ही काहीच बोलू शकले नाही यांचे कारण काय ???. लाचारी गुलामगिरी )
आजवर आम्ही दारू पियून मटन बिर्याणी आणि हजार पांचशे रुपये घेऊन तुमच्या प्रचारासाठी जीवाचं रान केले. तुम्ही आम्हाला जे जे दिले तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आलोय. आता थोडं ज्यानं माणूसपण दिलं त्याच्या नातवासाठी थोडं करु द्या. नाहीतर इतिहासात आमची गद्दार,कृतघ्न म्हणून नोंद होईल.त्या महापुरुषा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी गमावली तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. सर्व मागासवर्गीय,ओबीसी मराठा,आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मतदारांनी थोडंसं संवेदनशील व्हावे आणि पहा मतदान केल्याने काय होते.आपल्या ही जीवनाचा परिस झाल्या शिवाय राहणार नाही. एकच वेळ विचारकरून दारू पियून मटन बिर्याणी खाऊन आणि हजार पांचशे रुपये घेऊन मतदान मात्र आपल्याच विचारांच्या पक्षाच्या नेत्याच्या उमेदवारांना मतदान करा.माझे विचार पटत नसतील तरी येणाऱ्या युवा पिढीच्या भविष्यासाठी वेळीच निर्णय घेऊन मतदान करायचा निर्णय घ्या.व इतरांना ही सांगा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा