रविवार, १४ जून, २०२०

तड-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.



तड-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.
जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, पोलिस यंत्रणा, मिडिया, इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत आहेत.आणि आमच्या देशात कोरोना विरूद्ध लढा फक्त सत्ताधारी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, इतर सेवेकरी , पोलिस यंत्रणा, मिडिया इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोना लढा देत आहेत यांची तुलना केली.तर भाजपा प्रणित राज्यात सत्ताधारी नागरिकांना सेवा देतांना उघड उघड पक्षभेद जातीभेदाच्या नांवावर भेदभाव दाखवीत आहे. आणि त्या विरोधात केंद्र व राज्यातील विरोधीपक्ष याविरोधात बोलतो तेव्हा तो देशद्रोही ठरत आहे.महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्ष फक्त आणि फक्त असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत आहे. देश, राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. हे साधं आजच्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां कळत नाही हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे.वृत्तवाहिन्या हि पक्षपाती बातम्या देतांना दिसतात.जे उघडया डोळ्याने दिसते ते सत्य दाखविणे आणि सांगणे हे त्यांचे काम असते.त्यामुळेच प्रसार माध्यमावरील जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
कोरोना गरिब,श्रीमंत,उद्योगपती,सत्ताधारी पक्षाचे नेते,विरोधी पक्षनेते वगैरे असा भेदभाव करत नाही,कोरोनाची लागण कोणालाही व कधींही होऊ शकते.तेव्हा विरोधी पक्षनेत्यांना एकच हात जोडून विनंती आहे की, तुर्तास तरी राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी एकत्र येऊन काम करा.राज्याची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि राजकारण करत बसाल तर हिच जनता तुम्हाला पायदळी तुडविल्या शिवाय राहणार नाही.आज तुम्ही जे जे काम कराल त्यांचा इतिहास लिहला जाणार आहे.आणि जगातील विचारवंत त्यांची बारकाईने नोंदी करून ठेवतात.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून जगात ओळखल्या जातो.त्यांचा ऐतिहासिक म्हणी त्या त्या देशात प्रसिद्ध आहेत.नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन मतदारांना मतदान मांगीतले होते.म्हणत होता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?. 
"जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही आम्ही राज्य केले असते !" -- लॉर्ड माउंटबँटन,इंग्लंड.यांचे वाक्य जग प्रसिद्ध आहे. भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजान प्रमाणे लढा!.-- नेताजी सुभाषचंद्र बोस.म्हणत होते. नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजाच्या इतिहासाची गरज आहे.असे ऑडॉल्फ (अॅडॉल्फ) हिटलर सांगत होता. शिवाजी महाराज हे फक्त नांव नाही, तर शिवाजी महाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !.-- स्वामी विवेकानंद.जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते ! -- बराक ओबामा, अमेरिका. जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !.-- इंग्रज गव्हर्नर यांनी त्यांच्या नोंद वहीत लिहून ठेवले.
काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? "सिवा भोसला" जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है . -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर) उस दिन "सिवा भोसला" ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी "सिवा भोसला" से मिलना नही चाहता.-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.
क्या उस गद्दारे दख्खन से "सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !.-- बडी बेगम अलि आदिलशाह.
१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला.महाराष्ट्राचा आजचा राजकीय सत्ता संघर्ष समजून घ्याचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतील.त्यासाठी कॉम्रेड शरद पाटील यांचे शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण?.हा ऐतिहासिकदृष्ट्या संदर्भ ग्रंथ वाचवा लागेल.
वरील उदाहरणावरून आम्ही आंबेडकरी,सत्यशोधक चळवळीचे लोक नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच, महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते.
ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता.प्रति औरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले. परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता.
बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते.दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता. महाराजांनी याचा पराभव केला.सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते. महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं.
उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा, या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव. (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा इतिहास मराठा,ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने वाचला नाही.आणि ज्यांनी वाचला त्यांनी सांगितला नाही.मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांच्या कडून खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. पण हजारो वर्षाची मानसिकता बदलायला वेळ लागणार आहेच.म्हणूनच पेशव्यांचे वारसदार फडणवीस डोके वर काढत आहे.महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाजाच्या खांद्यावर उभा राहून भाजपा मोठा झाला.भाजपानी फडणवीस मोठा केला. आज त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही.त्याचं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला ही राहिला नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.म्हणून कोरोनाच्या महामारीत नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा,सहकार्य मदतीची गरज असतांना वैचारिक,सामाजिक,राजकीय पक्षभेद,जातीभेद,प्रांतभेद निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षनेते करीत आहेत. त्यामुळेच हा प्रश्न निर्माण होतो.तड फडणवीस त्यांचा पक्ष महाराष्ट्राचा मित्र की शत्रु?.
 सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

राजकारणातील तड फडणीस

राजकारणातील तड फडणीस
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते.डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही.आणि संकट आल्या शिवाय, डोळे उघडत नाहीत.राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन म्हणणारे राजकारणातील तड फडणीस आपण पाहत असाल,वाचत असाल. 
जल बिन मछ्ली म्हणजे पाण्याच्या बाहेर जिवंत मासळी काढली तर ती कशी करते कधी पाहिले काय?. ती पाण्यात जाण्यासाठी ज्या जिद्दीने तडफड करते ते पाहिल्यावर कोणत्याही माणसांचे मन हेलावून निघते. असाच प्रकार सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणविस साहेबांची   परिस्थिती त्या माश्या सारखी झाली आहे. अहोरात्र खोटे बोलून शेतकरी,मराठा, धनगर, ओबीसी, मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करून ई व्ही एम मुळे निवडणूक जिंकली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पद आपले हक्काचे आहे. शंभर टक्के गृहीत धरून चालले असतांना शिवसेनेच्या वाघांची डळकाळी फोडून शिकाऱ्याने शिकार सहजतेने करून नेली.. त्यामुळेच देवेन्द्र ची हालत एका वाटसरू सारखी झाली.
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.त्याला मारण्या साठी दगड उचलावा.दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.तर हात सुटून विहीरीत पडण्याची भिती यालाच तोंडाशी आलेला घास गेला असे म्हणतात.
देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. केवळ महाराष्ट्रात नाही?,सर्व राज्यासह देशभरात सुरू असतांना देवेंद्रजी फडणविस यांना रात्रंदिवस झोप लागत नाही.आजचा महारष्ट्र आणि मुख्यमंत्री दिसतो. त्यांना सारखा शेतकरी आत्महत्या करतो, वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील मंत्रालयात येऊन आत्महत्या करतो.जेंव्हा ऐशी वर्षाच्या शेतकऱ्याने आपल्या कार्यकाळात मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व आपन कित्येएक दीवस त्याच्या कुटुंबियांना आपण नजरकैदेत ठेवले होते.हा इतिहास शेतकरी विसरला नाही.विसरला असेल तर तो शेतकरी नसावा.
 "एक मराठा लाख मराठा"  मराठ्यांचे लाखोंचे क्रांती मुक मोर्चे शिस्तप्रीय पद्धतीने निघाले होते व बावीस बांधवांनी बलीदान दिले तरी आपन मुग गिळून गप्प बसलात होता.म्हणे अभ्यास सुरु आहे. जेंव्हा न्याय्य मागण्यासाठी आमचा आदिवाशी कष्टकरी बांधव नाशिक ते मुंबई पायी प्रवास करत आसताना उन्हामुळे पिगळनाऱ्या डांबरी रस्त्यावर चालल्यामुळे त्याचे पाय सोलुन निघत असतांना ही तो आझाद मैदानात आला होता.त्याच्या सातबाराचे काय केले.हा इतिहास वनविभागाची जमीन कसणारा आदिवासी विसरला नाही.विसरला असेल तर तो भूमुहीन आदिवासी नसावा. 
फडणविस साहेब आज महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे आर्थिक आडचणींचा सामना करत असताना, तुम्ही मोदीच्या पी एम केयरला मदत करा असे आवाहन करता हे सांगताना थोडी तरी लोकलज्जा ठेवली पाहिजे होती. आपन फार अभ्यासू राजकारणी व्यक्तीमत्व आहात असे तुमचे लोक म्हणतात. 
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे परंतु जगाच्या पाठीवर कोरोनाचे राजकारण करनारे आपन एकटेच आहात. आपनही पाच वर्षे  महाराष्ट्रातचे मुख्यमंत्री राहीलात आपन कीती हॉस्पिटल व पायाभुत सुविधा ऊभ्या केल्या व आजच्या महाआघाडी सरकारने त्या बंद केल्या त्यामुळे महाराष्ट्र संकटात सापडला. हे सांगितले पाहिजे ना?.
अच्छे दिन दाखविण्यासाठी तुम्हाला वृतपात्रांना संपूर्ण पाच वर्षात दरदिवशी ऐशी हजार रुपये जाहीरातींवर खर्च करावे लागले. हे आम्ही सांगत नाही माहिती अधिकारात ऊघड झाले आहे.देवेंद्रजी संपुर्ण देशामध्येच कोरोनाच्या रुग्नांचा आकडा वाढतोय मग ते अपयश सन्माननिय मोदी साहेबांचे अपयश नाही का?. जी,एस,टी चे एकविस हजार कोटी केंद्राकडे अडकुन पडलेत ते घेऊन येण्यास मदत करण्या ऐवजी महाराष्ट्राला संकटात टाकण्याचे महापाप आपण करीत आहात असे वाटत नाही काय?. सांगली महापुराच्या वेळी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना काय मार्गदर्शन करीत होता त्याच्या बातम्या आणि व्हीडीवो क्लिप पाहता काय?.राजकारणात यशस्वी होण्यासाठी सहकार्याचा आणि मतदारांचा विश्वासघात करण्याचा अनुभव प्रचंड असतांना आज आपण विरोधीपक्ष नेते आहात आणि कोणताही राजकारणात विश्वासघात करण्याचा अनुभव नसणारे मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात अतीशय चांगले काम करत आहेत. त्यांना ते शांतपणे करू द्या.
आपण तरुण तड फड करणारे राजकारणातील तड फडणीस आहात.मतदारांनी पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्र संकटात असतांना काय करीत होता?. असे विचारले नाही पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील जनतेला मतदारांना वाचविण्यासाठी संविधानाच्या चौकटीत काम करा.हीच आपणास मतदारांच्या वतीने विनंती करतो.
सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.



हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.
अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते ते शिक्षण देणारा देशच महासत्ता असतो. अमेरीकेने हे सिद्ध केले की तो सुशिक्षित लोकांचा देश आहे.एका अश्वेत (काळ्या किंवा कृष्णवर्णीय) अमेरिकन नागरिकाला वर्णद्वेषातुन झालेल्या पोलीसी मारहाणी विरोधात व्हाईट हाऊस घेरले जाते. सर्व काळे गोरे शिस्तबद्ध,शांतपणे जनआंदोलन करून पोलिसांना गुदगे टेकायला लावते. हे सुशिक्षित पणाचे लक्षण आहे. 
भारतातील केरल राज्य हे शिक्षणात एक नंबर वर आहे.त्या राज्यात एका मुक्या प्राण्यावर हत्तीनीवर अननस मध्ये स्पोटक फटके भरून खाण्यासाठी दिले ही घटना मानव जातीला कलंक लावणारी ठरत आहे.कोरोना संकटाला समर्थपणे तोंड दिल्यामुळे केरलाचे नांव गौरण्यात येत असतांना ही हत्तीणीची घटना केरला राज्याच्या शिक्षण आणि मानसिकतेला कलंकित करणारी आहे.
भारतात लाॅकडाऊन काळात अनेक असंघटित गरिब कामगार,मजदूर त्यांची मुलमुली रस्त्यावर जाती व्यवस्थेमुळे भूकबळी ठरवून मारल्या गेली. अनेक गरोदर महीला रस्त्यावरुन हजारो मैल चालत गेल्या काही प्रसुत झाल्या. हे सगळ सुरु असतांना भारतातील अक्षर ओळख असलेले लोक,सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे (सुशिक्षित म्हणता येणार नाही.) स्वत:च्या घरातील पाककला. टिकटाॅक चे विडीओ,
"नथीचा नखरा,केसातील गजरा" सारख्या थिल्लरपणात मग्न होते. ज्यांनी या असह्य मजदूरांना अन्नाची पाकिटे देऊन मदत केली त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आणि अभिनंदन.त्यांची इतिहासात नोंद होणार आहे. बहुसंख्य माणसांची मानसिकता अमेरिका आणि भारत यातील फरक आहे.
अमेरिकेतील सुशिक्षित स्वतंत्र मानसिकता आणि भारतातील अक्षर ओळखीची गुलामी मानसिकता.निसर्गासाठी छोट्या मुंगी पासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्षा पासून ते माणसा पर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून. कुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही.कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही पण स्वतःच्या महत्वाकांक्षे साठी आई बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर जात फक्त माणसाची असते. त्याला हत्तीच्या जीवाचं काय पडलय ?.
नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटो बाबतची कहाणी अत्यंत करूण आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. २७ मे २०२० ला केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने "माफ कर बहिणी" म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली.
सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली. कोणताही प्राणी हिंस झाला तर शांत राहत नाही.कुत्रा असो की हत्ती तो पिसाटतो पण या हत्तीणीने या ही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली.
शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोचले. तिने पाण्याबाहेर यावं म्हणून दोन हत्ती सुद्धा पाण्यात सोडले. तिला वाट दाखवण्या करता, पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली. दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले पण ५ च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली. पोस्टमोर्टम मध्ये कळलं ती गर्भवती होती.
मोहन कृष्णन ने लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तिने तो नाकारला. माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता. तिला त्यांच्यावर माणसावर विश्वास ठेवावा वाटला नाही. तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं.
माणसाला माहित आहे त्यांचे बाळ बाहेर येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात.  पण कोणत्या प्राण्याच्या बाळाला बाहेर येण्यासाठी किती महिने लागतात याची माहिती आहे काय?. वीस महिने लागतात एक हत्तीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेंव्हा काय भावना असतील तिच्या?. तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती?. वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती?. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर संध्याकाळी सात नंतर दरवाजे बंद होत होते.तेव्हा बाराशे फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून चढुन गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाही तर प्राण्यांतील.
एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं त्या माणसाने?. ते कृत्य एका कोणी माणसांने केले.पण अख्खी मानव जात बदनाम करून गेली.मागासवर्गीय आदिवासी,अल्पसंख्याक आणि भटक्या जाती जमातीचे निर्दयपणे खून होतात तेव्हा ही कोणत्याही माणसांच्या जातीला दुख होत नाही.तेव्हा संपूर्ण गांव खून करणाऱ्या माणसाच्या जातीच्या पाठी मागे उभे राहते.खैरलांजी,जवखेडा,खेर्डा,सोनाई,राहता असे एक नाही हजारो उदाहरण राज्यात देशात घडली आहेत.त्यावर अमेरिके सारखे सर्व लोक एकत्र येवून निषेध करीत नाही.येवढा फरक आहे अमेरिका आणि भारतात.
धर्माचा पगडा संस्कार लहानपणा पासून माणसाच्या जातीवर केलेले असतात.धर्माने कि अधर्माने,स्वर्ग कि नरक,पाप कि पुण्य हे मापदंडाच्या कसोट्या कोरोना,चक्रीवादळ,आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज असेल असे सांगणारे देवाच्या मंदिरातून बाहेर पडून आज बेरोजगार होऊन बसले आहेत. नाही तर त्यांनी यज्ञ,होमाचा झपाटा लावला असता.
 कोरोना पॉजीटीव रुग्ण,चक्रीवादळामुळे घराचे शेतीचे नुकसान झालेला मजदूर आणि शेतकरी यांचा विचार करीत असतांनाच नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो.डोळ्यात खळणारं पाणी थांबवण मुश्किल होऊन जातं.
माणसाला न्याय देतांना माणसाची जात आडवी येते. एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित मनुवादी हिंदुत्व मानणाऱ्या माणसाच्या जातीव्यवस्था वर्णव्यवस्था न्यायालयात होणार नाही.पण भारतीय संविधान मानणाऱ्या माणसाच्या न्यायालयात न्याय जरूर मिळेल.आसाराम,राम रहीम सारख्यांना शिक्षा देण्यास भाग पडणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळवून देईल हीच अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई 

ही बहुजनांसोबत गद्दारी नव्हे का?

ही बहुजनांसोबत गद्दारी नव्हे का?
अकोला जिल्ह्यामध्ये सनात्यांची मक्तेदारी संपवून अठरा पगड जातीतील ज्यांना कधीही सत्तेच्या जवळपासही ज्यांनी येऊ दिले नाही अशा समाजातील लोकांना सत्तेत बसवण्याचंं काम ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलं, सामान्यातील सामान्य व ज्या समाजाची कधी कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही त्या लहान-सहान मागास समाजाला पं.स.सदस्य, सभापती,जि.प.सभापती,आमदार,मंत्री,कॅबीनेट मंत्र्यापर्यंत नेऊन बसवलं त्यानंतरही ते गद्दारी करत असतील तर त्याला काय?.म्हणावे, ज्या बहुजन समाजाच्या भल्यासाठी आतापर्यंत काँग्रेस,राकाँ,भाजपा,सेना काहीही करू शकले नाही म्हणून अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न उदयास आणला व त्या पॅटर्नचे नाव संपुर्ण महाराष्ट्रभर गाजले सुद्धा ! बहुजन समाजातील वंचिताच्या कल्याणाकरीता झटने सोडून सनातन्याच्या पंगतीला जाऊन बसणे ही बहुजनांसोबत गद्दारीच म्हणावी लागेल! 
भारिप-बमसं ने जिल्हाभरात जे वंचित समाज आहे,ज्यांना कधीही न्याय मिळू शकत नाही, सत्तेच्या जवळपासही फिरकता येत नाही असे असतांना अशा समाजातील लोकांची मोट बांधून मोठ्या कष्टाने पक्ष उभा केला, ज्यांची लायकी नसतांनाही समाजाच्या  भरोशावर व बाळासाहेबांवरील असलेल्या निस्सीम प्रेमापोटी अशा लोकांना निवडून देऊन नेते बनवण्यात आले. त्यानंतर हे नेते झाल्यावर त्यांनी समाजाचे, बहुजनांचे, वंचितांचे काम करणे गरजेचे असतांना यांनी तसे तं केलंच नाही, यांनी आपआपल्या समाजातील किती लोकांना सक्षम बनविले? कोण्या समाजाचे भले केले? यांनी फक्त स्वत:चा स्वार्थ साधत सात पिढ्या बसून खातील एवढी कमाई केली, शाळा कॉलेज काढली व यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली असतांना 
निष्ठेने काम करणार्‍या पदाधिकार्‍यांच्या चुगल्या करून, बाळासाहेबांच्या जवळची असणारी माणसं त्यांची उणी दुणी काढून त्यांना दूर करण्याचे पाप केले व पक्ष खिळखिळाच करत राहिले.
खताच्या गटारी भरणे,भिंती बांधणे, लोकांच्या कामावर मजूर असणार्‍या बळीराम सिरस्कार
यांना २००१ मध्ये पारसमधून जि.प.ची उमेदवारी देऊन डायरेक्ट जि.प. अध्यक्ष बनविले, २००३ मध्ये जि.प. सदस्य, सन २००९ व २०१४ मध्ये बाळापूर मतदार संघातून आमदार बनविले. पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून कारभार दिला, त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली.  अजून काय द्यायचे बाकी होते? बाळासाहेबांनी तळागाळातील माणसाला नेतृत्व दिले, की जनसामान्याचे प्रश्न सोडवीन, हे सारं थोतांड होतं ते उघडं पडलं. भारिप-मध्ये फक्त सत्ता भोगण्यासाठी होतं हे आता लोकांना माहीत पडले,  अशोक वाटीकामध्ये भाषण देतांना बळीराम सिरस्कार म्हणाले होते की, ‘‘दोन एकर जमीन असलेल्या माणसाला कोणतेही राजकीय, सामाजिक  पाठबळ नसतांना या महान असलेल्या बाळासाहेबांनी मला जि.प.चा अध्यक्ष बनविलं, मी आयुष्यभर त्यांना सोडणार नाही त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही.’’ बाळासाहेबांना अपेक्षीत होतं की, फुले-शाहू-आंबेडकरी विचाराचा वारसा त्यांनी चालवावा.  परंतू घेतलेली शपथही ते या माया लोभापायी विसरले! वास्तविक पाहता तर त्यांनी मोठ्या मनाने प्रा.डॉ. संतोष हुशे सारख्या नेत्याला येथून तिकीट द्या, निवडून आणून दाखवितो असे म्हणायला पाहीजे होते. तसेच  प्रा. धैर्यवर्धन पुंडकर साहेब सहज निवडून  आले असता परंतू त्यांचे विरोधात काम करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना मोठ्या मनाने निवडून आणले असते तर त्यांचे मोठेपण दिसून आले असते त्यांचा लालसेपायीचा खुजेपणा दिसून आला. 
हरीदास भदे साहेब हे १९९२ मध्ये जि.प.सदस्य व पं.स.चेसभापती झाले. २००३ मध्ये जि.प. सदस्य बनले, २००४ मध्ये बोरगाव मंजू मतदार संघातून आमदार व २००९ मधून अकोला पूर्वचे आमदार म्हणून निवडून आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिले, व शेवटच्या क्षणी ते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव होते!  एवढं भरभरून दिलेलं असतांना त्यांनी त्यांच्या समाजाचं, बहुजन समाजाचंं काम करणे अपेक्षीत असतांना ज्या पक्षांनी कधीही बहुजनांंचं भलं केलं नाही त्यांचे सोबत जाऊन हे मागास समाजासोबत, बहुजनासोबत गद्दारी नाही तर काय म्हणायचे? बाळासाहेबांसाठी काय-काय शपथा घेतल्या, सर्व मातीमोल करून ठेवलं. लालसा फार भयंकर असतात. ज्या पक्षांनी कधी सतरंज्या उचलण्यापलीकडे काहीही नाही दिलं नाही, ज्या पक्षाने काहीही नसतांना भरभरून दिलं काहीही कारण सांगून जात असाल  तर आपल्याला हा बहुजन समाज माफ करणार नाही?
यापूर्वी भगोडे भाजपाशी तडजोड करण्याच्या हालचाली ऐकू येत होत्या, परंतू त्यांचे प्रतिनिधी निश्चीत असल्यामुळे तिथे दाळ शिजणार नाही असे बघून त्यांनी हा राकाँचा मार्ग निवडला. 
बौद्ध समाजाने जीवाचे रान करायचे, कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो तो कोणीही असो आमच्या बाळासाहेबांनी सांगीतला म्हणून त्यांचेवर जीव जायेपर्यंत प्रेम करायचे. त्याला भरभरून मते द्यायची. त्यांनी निवडून आल्यावर स्वत:चीच घरे भरायची. तसेही काही जणांची घाण सवय असते, चालत्या गाडीत बसण्याची, भारिप-बमसंची चालती होती पुर्ण भोगून बसले, तिथे सात पिढ्यांना पुरेल इतकी कमाई केली, आता राजकारण करण्यासाठी  बाहेर पडले. अशा लोकांनी राजकारणाला व्यवसाय करून टाकले आहे,अशा लोकांना समाजाचे काहीही घेणे देणे नसते! 
आतापर्यंत भारिप-बमसंमधून गेलेल्यांचा ईतिहास आहे की, ते राजकारण न करताच ईतिहास जमा झालेले आहेत. त्यांना ग्रा.पं.ची निवडणूक लढणेही शक्य झाले नाही अशी गत सोडून गेलेल्याची झालेली आहे. ़कारण मोठे होण्यासाठी बुट,चपला घासून मोठे व्हावे लागते बूट चाटून नव्हे! हे लक्षात असू द्यावे.
राकाँने अमोल दादा मिटकरी यांना आमदारकी देऊन चांगले काम केले आहे. एका दोन एकर वाल्या शेतकर्‍यांच्या मुलाला आमदारकी दिली हे खरेच चांगले काम केले. त्यांची वत्तृâत्वशैली, त्यांचा जनतेवर असलेला प्रभाव, मिटकरी साहेबांनी अशोक वाटीकेमध्ये भाषणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांसारख्या विदवानाची लोकसभेत गरज आहे असे गर्जून सांगीतले होते. अशा फुले-शाहु-आंबेडकरी विचाराच्या कर्तृत्ववानला आमदारी दिल्याने जिल्ह्यातील राकाँचे ठेकेदार जणू त्यांना दुष्मन समजू लागले आहे,आगपाखड करू लागले आहे. मिटकरी हे महाराष्ट्रभर प्रबोधन करणारे जातीवंत विचारधारेचे आहे. परंतू भदे, सिरस्कार यांच्या घेण्याने येथील मंडळी यांना कशी वागणूक देतील? हा फार मोठा प्रश्न आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती आहे की, तुमच्यावर समाजाची फार निष्ठा आहे,  अशा गद्दार लोकांंना समाजाने तीस वर्षापासून तुमच्या म्हणण्याप्रमाणे झेलले आहे. तुम्ही जो माणूस दिला त्यांच्यावर मेंढराप्रमाणे तुटून पडून त्यांनी प्रेम दिलं आहे, याच विचारांच्या लोकांनी समाजातील जवळची नेतेही तुमच्यापासून दूर केली आहे. आतापर्यंत तुम्ही समाजातला आमदार दिला नाही, यापुढे आपणही राजकारणच करा, एकट्याने लढून आपला माणूस आमदार, खासदार होणार नाही, तडजोड करा व आपला माणूस कसा निवडून जाईल याचा विचार करा! कारण गवई साहेबांनी अख्या आयुष्यात एकही समाजाचा आमदार, खासदार होऊ दिला नाही. तुम्ही ़खरमरीत बोलणी करा, वाटाघाटी केल्यास २८८ आमदारांमध्ये आपल्या बौद्ध समाजाचे किमान २५ आमदार निवडून येऊ शकतात एवढी तुमची ताकद आहे व आपण राष्ट्रीय नेते म्हणून भारतभर राजकारण करू शकता. असे करत असतांना गद्दार लोकांना ओळखायला शिका एवढे मात्र खरे!
या जाणत्या राजाला काय म्हणावे? तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं झुलवत ठेवत का असेना नामांतर केलं म्हणून बौद्ध समाज तुम्हाला मानतो. यापुर्वी काँग्रेसने मखराम, बोडखे, भांडे यांना फोडून बाळासाहेबाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला व ते स्वत:च खलास झाले. आपणही या गद्दारांना प्रवेश देऊन बाळासाहेबाला डिवचण्याचं काम केलं आहे, त्यांच्या गळ्यात गळे घालत लढा आर.एस.एस.च्या विरोधात असल्याचं दाखवता व फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ खिळखीळी उध्वस्त करू पाहता, असे होत राहिल्यास तुम्हाला पुढची स्वपे्न फक्त पाहतच राहावी लागणार, एवढे मात्र खरे! 
एकीकडे कोरानाच्या महामारीने लोक मरत असतांना त्यांनी पक्ष प्रवेशाची एवढी घाई कशासाठी? तोंडाला मुसकं लाऊन प्रवेश करणे एवढं गरजेचं वाटलं का? परंतू तिथे हे मोकळे पणाने बोलू शकणार नाही, मुस्कं बांधल्यागतच राहावे लागेल!
पंजाबराव वर, अकोला, मो.नं. ९९२२९२४६८४.

१० जून भारतीय कामगार दिन

१० जून भारतीय कामगार दिन  
कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन.लॉक डाऊन मुळे उद्योग धंदे बंद त्यामुळे असंघटीत संघटीत कामगारांचे जीवन उध्वस्थ.कामगारांच्या न्याय हक्का साठी संघर्ष करणाऱ्या ट्रेड युनियन जाती व्यवस्थेच्या समर्थनात गप्प झाल्या आहेत.१० जून २०२० ला कामगारांचे अस्तित्व नाकारणारे कायदे मंजूर होऊन अंमलबजावणी देश भरात सुरु.१० जून १८९० चा कामगार दिन आणि रविवार सुट्टीचा संघर्षमय इतिहास आजचा कामगार विसरला. 
रविवार सुट्टीचा लाभ घेणारे आज खूप कामगार, कर्मचारी अधिकारी सुरक्षित ठिकाणी नोकरी करणारे संघटित व असंघटित कंत्राटी कामगार,नाका कामगार लाखोंच्या संख्येने आहेत.पण त्यांना हे माहिती नाही की ही रविवार सुट्टी कोणाच्या नेतृत्वाखाली संघर्ष झाल्यामुळे मिळाली. तो दिवस म्हणजे 10 जुन 1890 होय.तोच खरा भारतीय कामगार चळवळीचा म्हणजे कामगार कर्मचारी अधिकारी यांचा कामगार दिन आहे. त्यानंतर अनेक नेते आले आणि गेले त्यांनी कामगार चळवळीत कालानुरूप थोडा बदल घडवून आणला पण ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीला कोणतीही मोठा धक्का बसेल असा निर्णय घेतला नाही.आर एस एस प्रणित भाजपाच्या मोदी सरकार विरोधात कोणती राष्ट्रीय ट्रेड युनियन कामगारांच्यासाठी रस्त्यावर आणि न्यायलयात दंड ठोकून उभी आहे?.
जेटएअरलाईनचे कामगार कर्मचारी अधिकारी एक दिवसात बेरोजगार झाले मालकाने कंपनी बंद केली.त्यानंतर काही दिवसांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी मुंबई विमानतळा वरून एकही विमान उडू व उतरू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती.पुढे काय झाले?. गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक लढ्यात एका हिंदू हृदय सम्राटांनी भाग घेतांना जाहीरपणे सांगितले होते.मुंबईतील गिरण्या बंद होऊ देणार नाही आणि गिरण्याची एक इंच जागा विकू देणार नाही. पुढे काय झाले?. हा कामगार चळवळीचा इतिहास वर्तमान लिहला जातो. त्यातुनच प्रेरणा घेतली जाते व चळवळ बांधली जाते.आता देशात कामगार दिन कधी साजरा केला जातो?. रविवार सुट्टी कशी मिळाली यांची माहिती राष्ट्रीय ट्रेड युनियनचे कोणतेही कामगार नेते देत नाही.

    भारतात जागतिक कामगार दिन मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. त्यांचा आणि भारतातील कष्टकरी कामगारांचा काय संबंध?. भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला होता. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालया समोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता
.
मुंबई सारख्या महानगरामध्ये ज्यांनी कामगारांसाठी मोठी चळवळ उभी करून त्यांच्या हक्कांसाठी पूर्ण जीवन खर्ची केले असे रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे या थोर व्यक्तीची त्यांच्या मुंबई या कर्मभूमीत नाव निशाणी किंवा लक्षवेधी स्मारक सुद्धा नसावे हे कामगार चळवळीला भूषणव्य नाही. आज देशभरातील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी रविवार सुट्टीचा लाभ घेतात.आणि रविवार म्हणजे आपल्या हक्काच्या सुट्टीचा दिवस आहे हे अधिकाराने सांगतात. हा रविवार नेमका कसा आपल्या पदरी पडला?. त्यासाठी कोणी किती संघर्ष केला?..यांची नोंद मात्र घेत नाही. आपल्या सारख्या कामगार लोकांसाठी एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले संपूर्ण जीवन कोणी खर्ची केले हे आपणास माहीत असायलाच पाहिजे.भारतीय कामगार चळवळीचे जनक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि कामगार संघटनेचे भारतातील पाहिले कामगार नेते ज्यांनी साप्ताहिक सुट्टी ही शासकीय सहमतीने अंमलात आणली असा क्रांतिकारी कामगार नेत्यांची माहिती बहुसंख्य कामगारांना कर्मचाऱ्यांना नाही. म्हणूनच भारतात जागतिक कामगार दिन साजरा होतो. पण भारतात ज्यांनी कामगारांना रविवारची सुटी व आठ तासाची दिवटी,एक तास जेवणाची सुट्टी मिळवण्यासाठी १८८४ ते १८९० म्हणजे सात वर्षे सनदशीर मार्गाने गिरणी मालक, भांडवलदार व ब्रिटिश सरकारशी संघर्ष केला.त्या नेत्यांचा जय जयकार होत नाही.
नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १८४८ मध्ये झाला.मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ठाण्यात झाले आणि पुढे उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे भायखळा भागात आले व तिथेच ते राहिले. पण दुर्दैव असे की अशा थोर सत्यशोधकाची माहिती ना त्यांनी स्वतः लिहून ठेवली ना अन्य कोणी लिहिली.पण एक शोध पत्रकारिता करणारे झुंझार पत्रकार मनोहर कदम यांनी भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे पुस्तक लिहून आताच्या कामगार नेत्यांचे तोडपाणी चे धंदे उघड पाडले. स्वतःच्या चांगल्या नोकरीला लाथ मारून आपले सर्व कुटुंब उपासमारीने होरपळणार आहे हे स्पष्ट दिसत असताना, देशातील लक्षावधी स्त्री-पुरुष कामगारांचे संसार फुलवण्याचे व्रत हयातभर नारायण लोखंडे यांनी स्वीकारले. आणि एकच वेळी गिरणी मालकांच्या दृष्टीने स्वामीद्रोह आणि ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने राजद्रोह स्वीकारला. त्यामुळे केव्हाही काहीही घडण्याची शक्यता असताना नारायण मेंघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक समाजाच्या कावड झेंड्याखाली कामगारांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला.आणि महात्मा जोतिबा फुले यांची प्रेरणा घेऊन त्यांनी मुंबई मध्ये “बॉम्बे मिलहॅन्डस असोसिएशन” ही भारतातील पहिली कामगारांची संघटना स्थापन केली.        १० जून १८९० साली देशात प्रथमच कामगारांना गिरणी मालका कडून साप्ताहिक सुट्टी मंजूर करून घेतली. हा दिवस म्हणजे भारतातील कामगार चळवळीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस होय. असंघटित कामगारांची “मुकी बिचारी कुणी हाका” अशी त्या कामगारांची स्थिती त्यावेळी होती. रात्रंदिवस काम करून घ्यायचा आणि त्याबदल्यात अतिशय किरकोळ मजुरी द्यायची आणि एक दिवसाची सुद्धा विश्रांती नाही, ना कोणत्या आरोग्य विषयक सोयी नाही. मरे पर्यंत फक्त काम आणि मिळेल तेवढा मोबदला घेऊन मुकाट्याने जगावं लागत असे.अशा कामगारात जनजागृती करण्याचे आवाहन नारायण लोखंडे यांनी स्वीकारले होते.
आज ही नाका कामगार,घरकामगार, कचरा वेचक कामगार यांच्या बाबत मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पक्ष, संघटना संस्थेचे कार्यकर्ते नेते चांगले बोलत नाही. हे सुधारणार नाहीत हे बेवडे,दारुडे आहेत.त्यांची संघटना बांधणे मूर्खपणा आहे.असे म्हणणारे लोक आहेत.मग नारायण लोखंडे यांनी कोणत्या परिस्थितीत काम केले असेल यांची कल्पना करा.१८७५ मध्ये भारतातील काही महत्वपूर्ण शहरांमध्ये एकूण ५४ गिरण्या चालू होत्या. मुंबईमध्ये हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि त्याच बरोबर कामगारवर्ग सुद्धा वाढत चालला होता. ‘दिनबंधूं’ च्या १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात नारायण लोखंडे यांनी गिरण्यात काम करणाऱ्या स्त्रिया आणि बालकामगार यांची संख्या देऊन त्यांच्या कडुन किती काम करून घेतले जाते याची तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली होती. गिरण्यात काम करणाऱ्या बायकांचा आकडा २५,६८८ इतका होता आणि त्यांच्या कडून सुमारे ९ ते १० तास काम करून घेतले जाई. सुमारे ६,४२४ बालकामगार होते (मुले आणि मुली) ज्यांच्याकडून ७ तास काम करून घेतले जाई. काही गिरण्या सकाळी ५ वाजता सुरू होत आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होत. एखादा कामगार पाच-दहा मिनिटे उशिरा आला की त्याला दंड होत असे. आजारी असल्यामुळे आला नाही तर त्याचा पगार कापला जाई. दीर्घ आजार असला की पैसा नाही म्हणून वाणी धान्य व किराणा देत नसे आणि दिले तर पुढच्यावेळी व्याजासकट तो वसूल करी असा परिस्थितीत कामगार जगत असतांना त्यांची संघटना बांधणी करण्याचे ऐतिहासिक काम नारायण मेंघाजी लोखंडे करीत होते.१८८४ मध्ये नारायण मेंघाजी लोखंडे यांनी २३ आणि २६ सप्टेंबरमध्ये दोन सभा घेतल्या आणि पाच प्रमुख मागण्या सरकार पुढे ठेवल्या,१) कामाचे तास कमी करावेत २) सर्व कामगारांना आठवड्यातून एक सुट्टी मिळावी.३) जेवणासाठी किमान अर्ध्या तासाची सुट्टी मिळावी.४) कामगारांना पगार वेळेवर व्हावा. किमान मागील महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत व्हावा.५) अपघातात सापडलेल्या कामगाराला नुकसान भरपाई व रजेचा पगार मिळावा. मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन देण्यात यावे असा कामगारांच्या वतीने त्यांच्या मागण्या सादर करणारा जाहीरनामा फॅक्टरी कमिशनला सादर केला. १८९० मध्ये त्यांनी “बॉम्बे मिल हॅन्डस असोसिएशन” ही संघटना स्थापना केली. ज्यामध्ये अनेक नामवंत मंडळी होती. यामध्ये रघु भिकाजी, गणू बाबाजी, नारायण सुर्कोजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे व नारायणराव पवार इत्यादी मंडळी होती.यांनी मुंबईतील कामगारात प्रचंड मेहनत घेऊन जनजागृती केली.आणि २४ एप्रिल १८९० साली महालक्ष्मी रेसकोर्सवर लोखंडे यांनी मोठी सभा घेतली. यामध्ये कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.शेवटी १० जून १८९० रोजी रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. हा कामगारांच्या एकजुटीचा व नारायण मेंघाजी लोखंडे यांचा कुशल नेतृत्वाचा मोठा विजय होता.म्हणूनच भारतातील कामगारांचा पहिला कामगार दिन हा १० जुन १८९० हाच खरा कामगार दिन आहे.
१८९५ साली नारायण मेंघाजी लोखंडे यांना ब्रिटिश सरकारने “रावबहादूर” ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. भारतीय कामगार चळवळीचे जनक असलेले नारायण मेंघाजी लोखंडे यांचे ९ फेब्रुवारी १८९७ रोजी प्लेगच्या साथीत आकस्मितपणे वयाच्या ४९व्या वर्षी दुःखद निधन झाले. अशा या महान सत्यशोधक व्यक्तिमत्वाची संपूर्ण भारतीय कामगार, कर्मचारी अधिकारी यांनी रविवार सुट्टीचा कामाच्या तासाचा आणि वरटाईम लाभ घेतांना आठवण जपली पाहिजे आणि त्यांचा इतिहास आज कामगार कर्मचारी अधिकारी यांना सांगितला पाहिजे.
१९१९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा परिणाम स्वरूप कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी भारतामध्ये आता 
पर्यंत ‘इंटक, आयटक, सिटू, भारतीय मजदूर संघ, हिंद मजदूर संघ” या सारख्या बारा ट्रेड युनियन राष्ट्रीय स्तरावर काम करीत आहेत. ज्या १९२६ च्या कायद्याच्या अंतर्गत  रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत. काँग्रेसची आणि आर एस एस प्रणित भाजपाची राजकीय दौडघोड आणि कामगार चळवळ यशस्वी होण्यास याच ट्रेड युनियन कारणीभूत होत्या. कारण काँग्रेसच्या माध्यमातून दोन ट्रेड युनियन चालविल्या जात होत्या. एक हिंद मजदूर संघ ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वा खाली होती तर दुसरी आयटक नेहरूंच्या नेतृत्वाखाली होती. या दोन्ही संघटना नंतर एकत्रित झाल्या आणि “इंटक” च्या आधारे कॉग्रेसचे काम चालविले गेले.  वास्तविक पाहता ट्रेड युनियनला “आंतरराष्ट्रीय कामगार कायदे” लागू असतात. आंतरराष्ट्रीय कामगार कायद्यासंदर्भात जगातले जे कामगार काम करतात. त्यांच्या युनियनमधून भारतातला एखादा प्रतिनिधी पाठविला पाहिजे असे धोरण ठेवून ब्रिटीश भारतात असतांना काँग्रेसने भारतातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी या संघटनेची निर्मिती केली. म्हणून १९२६ ला त्यांना Affiliation मिळाले. या कायद्यानुसार रजिस्टर्ड झालेल्या ज्या संघटना आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय महासंघात सदसत्व मिळते. यामध्ये सदस्यत्व असलेल्या संघटनेला कामगाराच्या हितासाठी संघर्ष करण्यासाठी त्यांना सामुहिक सौदेबाजीचा अधिकार प्राप्त होतो. सामुहिक सौदेबाजी कशाला म्हणतात तर जेव्हा एखादा कर्मचारी संघटन घेऊन रस्त्यावर उतरतो. तेव्हा तो आपल्या समूहासाठी हक्काची मागणी करू शकतो. हा सामुहिक सौदेबाजीचा हक्क ज्या छोट्या-मोठ्या संघटनाना असतो. त्या धर्मदाय आयुक्ताकडं रजिस्टर्ड झालेल्या असतात. १८६० च्या Society Act मधून ज्या संघटना रजिस्टर्ड होतात त्यांना अशा प्रकारचा सौदेबाजीचा अधिकार नसतो. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १२/१३ फेब्रुवारी १९३८ ला रेल्वे गॅंगमन कामगार परिषद मनमाड येथे सर्व मागासवर्गीय कामगारांनी आपली स्वतःची ट्रेंड युनियन स्थापून ती स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) संलग्न करण्याचे आवाहन केले होते.त्या युनियन नी स्वतंत्र मजदूर पक्षाला मदत करण्याचे सांगितले होते.ते बहुसंख्य आंबेडकरी चळवळीतील कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्वीकारले नाही. त्याबदल्यात त्यांनी असोशियन, फेडरेशन बनविल्या त्यामुळे त्यांना युनियनचा दर्जा मिळाला नाही. न्यायालयीन लढाई करण्याचा हक्क नाही.म्हणूनच ते प्रत्येक निवडणूकीत इतर युनियनशी तडजोड करून आपले अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमी लाचारी पत्कारतात त्यांच्या या स्वार्थीपणामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राष्ट्रीय ट्रेड युनियन इंडिपेंडंट लेबर युनियन (ILU) मजबूत झाली नाही.आज ती सतरा उधोग धंद्यात असून बावीस राज्यात दौडघोड करीत आहे.आय एल यु ला सर्व मागासवर्गीय,आदिवाशी, अल्पसंख्याक यांनी साथ दिल्यास राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही. 
भारतात आज ज्या प्रस्थापित 
बारा ट्रेड युनियन आहेत.
त्यांची नांवे वेगवेगळी असली तरी त्यांची मुख्य विचारधारा एकच आहे मनुवादी,हिंदुत्ववादी. त्याच बरोबर वेगवेगळ्या राज्यात जिल्ह्यात 
१६०० हुन अधिक ट्रेड युनियन आहेत. मात्र त्या मालकाच्या हातातील कटपुतळे व सयाजीराव आहेत. कारण ह्या कामगार वर्गाकडून त्या पार्टीला रिसोर्स मिळत असतो. कारण त्याला रजिस्ट्रेशन असते. प्रत्येक कामगाराचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याला सदस्यत्व घेण्यासाठी वार्षिक १००-२०० रु फंड द्यावा लागतो. जर विचार केला तर एकट्या रेल्वेकडे १६ लाख कर्मचारी कामाला आहेत. १६ लाख कर्मचाऱ्यांनी जर २०० रुपये दिले तर ३२ कोटी निधी मिळतो. हा निधी प्रस्थापित पक्षाला मिळतो. तसेच हे लोकं त्या पक्षाचे वाहक बनतात. अशा माध्यमातून या कामगारांनी पक्ष व युनियन प्रबळ बनविल्या. ट्रेड युनियन हे कर्मचाऱ्यांच्या मुलभूत हितासाठी काम करत असते. यामुळे कर्मचारी पावरफुल बनतो.त्यांमुळे सत्ताधारी पक्ष ट्रेड युनियनच्या कायमस्वरूपी दबावाखाली काम करतो.आता उलट झाले आहे.राष्ट्रीय ट्रेड युनियन कायमस्वरूपी सत्ताधारी पक्षाच्या बटिक झाल्या आहेत.महात्मा फुलेंच्या विचारांवर “रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे” यांनी १८९० साली भारतामध्ये  “बॉम्बे मिल हॅन्डस असोसिएशन " नावाची पहिली संघटना स्थापन केली.त्यांच्यामुळे भारतीय कामगारांना रविवार सुट्टी इतर सोयी सुविधा मिळाल्या त्यामुळेच १० जून हाच भारतीय कामगारांचा कामगार दिन आहे तो कामगार कर्मचारी अधिकारी यांनी दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा करावा. स्वतंत्र मजदूर युनियन वतीने दरवर्षी १० जून हा भारतीय कामगार दिन साजरा केला जातो.सर्व संघटित असंघटित कामगारांनी त्यांच्या संघटना युनियननी १० जून हा भारतीय कामगार दिन म्हणून साजरा केला पाहिजे. कामगार चळवळीचा इतिहास येणाऱ्या पिढीला सांगितला पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,९९२०४०३८५९.

कोरोना मागासवर्गीय हत्याकांड ,ओबीसी आणि उच्चवर्णीय विवेकवादी लोकांचे कर्तव्य?.

कोरोना मागासवर्गीय हत्याकांड ,ओबीसी आणि उच्चवर्णीय विवेकवादी लोकांचे कर्तव्य?. 
    साऱ्या भारतात मनुस्मृती प्रणित धर्म व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीय लोकांना भारतातील इतर 85 टक्के मागासवर्गीय ओबीसी,एस सी ,एस टी,विजेएनटी आदिवासी आणि अल्पसंख्याक यांचे शोषणाचे अधिकार दिले होते. सर्व स्त्रियांना शूद्र ठरवून, उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय सर्वच स्त्रियांना मानवी हक्कांपासून वंचीत करण्याचे हे देशव्यापी अधिकार होते. हीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी वर्णव्यवस्था कायम रहावी त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून बंड करणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या विरोधात तीन उच्चवर्णीयांना हाती शस्त्र घेन्याचे अधिकार मनुस्मृतीनेच दिले. परन्तु आगरी कोळी भंडारी माळी यासारख्या 52 टक्के शूद्र ओबीसींना,कितीही अन्याय झाला अगदी परकीय देशाने आक्रमण केले तरीही शस्त्र हाती घेऊ नये अशी बंधने घातली.. आणि आजचे अतिशूद्र यांच्यावर, अर्थात(बौद्ध) sc st वर कल्पनाही करता येणार नाहीत अशी बंधने घालून अत्याचार करण्यात आले. आगरी कोळी कराडी समाजाने आम्ही मनुस्मृती नुसार शूद्र आहोत हे समजून घ्यावे. शूद्र म्हणजेच जातीच्या दाखल्यावरील ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय होय. 
      उच्चवर्णीय जातींना मागासवर्गीय लोकांवर धार्मिक,राजकीय आणि सामाजिक अन्याय अत्याचार करण्याची जन्मतःच प्रेरणा आपला हिंदू वैदिक धर्म देतो. अर्थात या अन्याय अत्याचारांना सहन करण्याची सहनशीलता,संयम, मानसिक गुलामी मनुस्मृती प्रणित धर्मच देतो हेही आपण समजून घेतले पाहिजे. आगरी कोळी भंडारी सागरपुत्र समाजाने जागतिक वैभवाचे दिवस 2000 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या काळात अनुभवले. त्यानंतर थेट छत्रपती शिवरायांच्या काळात आरमार आणि जमिनीचे मालकी अधिकार मिळाले.  मात्र समुद्रावर कोणताही व्यवसाय करायला मनुस्मृतीने कायमस्वरूपी विरोधच केला होता. छत्रपती शिवरायांचे मनुस्मृतीला आव्हान देत तयार झालेले सागरी आरमार पेशवे व  मराठ्यांनी बुडविले! पेशवे काळातच खोती सावकारी आली.    
      मनुस्मृती जाळण्यासाठी महाड, रायगड येथे आम्ही आदरणीय नारायण नागु पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत लढलो. मनुस्मृतीच्या समर्थक उच्चवर्णीय खोती सावकारी विरोधात लढण्याची हिम्मत केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाली. पुढे बाबासाहेबानी सांगितलेल्या 'शिका! जागृत व्हा! संघटित व्हा!' या समाज उद्धारक मंत्राने आम्ही शिक्षणाची शाळांची मोहीम हाती घेऊन कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 108 शाळांचे जाळे कोकणात उभे केले. नारायण नागु पाटील, त्याचे चिरंजीव अॅड दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांचे फार मोठे योगदान यात होते. अर्थात हा शिक्षणाचा विचार बाबसाहेबाकडून आला. मी स्वतः जनता विद्यालय बेलोशी अलिबाग,आताच्या अॅड दत्ता पाटील हायस्कुल मधूनच दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. हजारो गरीब ओबीसी शिक्षक आणि लाखो यशस्वी विद्यार्थी येथुन पुढे आले. याच लोकांनी पुढे जमीन आणि शिक्षणाची चळवळ रायगड जिल्ह्यात चालवली.
      गरीब ओबीसी विद्यार्थ्यांची ही चळवळ आज ही रायगडात चालू असताना नवी मुबंईचे शिक्षण महाग झाले. उच्च शिक्षण डी वाय पाटील, पतंगराव कदम, दत्ता मेघे या शिक्षण सम्राटांच्या हाती गेले. प्राथमिक शिक्षण लाख रुपयात तर उच्च शिक्षण कोटी रुपयात विकत मिळतेय हे अजूनही आमच्या रायगडच्या खेड्यात कळले नाहीय. परन्तु महिन्यास 3 ते 5 हजार रुपये खोली भाडे घेणाऱ्या नवी मुबंईच्या आगरी कोळी बांधवांसाठी ते अशक्य होईल एव्हढे महाग झाले आहे. ते कळण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पहिले जागृतीचे काम केले होते. यांच्यानंतर दोनशे वर्षानी आज कोरोनाच्या महामारी मुळे 2020 मध्ये शिक्षण हकांची जाणीव नवी मुबंईस होत आहे. रायगड जिल्ह्यातील शिक्षण चळवळ गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी समाजाच्या वर्गणी मधून सुरू झाली होती. अनेक ठिकाणी गावकरी एकत्र येऊन जागा, श्रमदान आणि वर्गणी देऊन कर्मचारी लोकांच्या पगाराचा भार घेऊन शासकीय अनुदान येईपर्यंत हा भार सोसत होते. आज शिक्षणाच्या जागी बुवा बापू नाना दादा यांनी लोकांचे मेंदू ताब्यात घेऊन, शिक्षणा साठीची वर्गणी दान थांबविलीय. त्यामुळे शाळांपेक्षा मंदिराचे कळसच उंच झालेले दिसतात. कोरोनाच्या महामारीत देवांनी मैदान सोडले! तरीही सर्व अध्यात्मिक बुवा आणि मंदिराच्या दानपेटीतील पैसा, औषधे, अन्न धान्य गरजू मागासवर्गीय माणसाच्या उपयोगी येत नाही. आज रायगडचे लोक निसर्ग वादळात उध्वस्त आहेत परन्तु धर्म संप्रदाय मंदिर ट्रस्ट गप्प आहेत.हे काम राजकीय पक्ष आणि सरकारचे आहे असे सांगून पैसा सोडायला तयार नाहीत. कोरोना नंतरच्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे?. यातून नवी मुबंईच्या तरुणांनी विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण हक्काचे जे आंदोलन उभे केले आहे त्यास पूर्ण देशाने पाठींबा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे 
       सुरुवातीस मंदिराची आणि देवाचीही निर्मिती मागासवर्गीय माणसानेच आपल्या मेहनतीने केली. नंतर त्याचा ताबा मात्र उच्चवर्णीय ब्राह्मण ट्रस्टीनी घेतला. अर्थात ते आज मालकच झाले!. नवी मुबंईतील 95 प्रकल्पग्रस्त गावातील करोडो रुपयांच्या म्हणजे दोन कोटी रुपये गुंठा भावाचे सरासरी तीन एकरचे म्हणजेच( 240 कोटी रुपयांचे भूखंड) प्रस्थापित शिक्षण सम्राटांनी पाच ते सहा या संख्येनी गिळले यात ब्राह्मण मराठा उच्चवर्णीय पुढे आहेतच परन्तु काही आगरी कोळी राजकीय नेतेही आहेत. हे भूखंड मुख्यतः साडेबारा टक्के योजनेतील शेतकऱ्याच्या हक्काच्या जमिनीतून सिडकोने परस्पर कापून विकले आहेत. यात सिडकोने मोठी फसवणूक केली आहेच. परन्तु सिडको ही मागासवर्गीय ओबीसींच्या शिक्षणाच्या विरोधात आहे हे सत्य समोर आले आहे. अर्थात ज्यांनी आमचे भातशेती मासेमारी हे व्यवसाय संपविले ते शिक्षणाचा अधिकार नाकारणारे उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय लोक आम्हास शिक्षण देतील यावर कुणी ओबीसी आगरी कोळी कराडी तरुणांनी विश्वास ठेवू नये. आम्ही पावणेचार टक्के सिडकोने चोरलेली जमीन मिळवून देतो अशी सामाजिक न्यायाची हाकाटी देणाऱ्याचे ?.. काम विकास पाटील यांच्या माहिती अधिकाराने बिनपैशात साध्य झाले आहे. ओबीसी वरच्या अन्यायाची माहिती असूनही उच्चवर्णीय लोकांविरोधात बोलायची हिम्मत नसलेले लोक गप्प बसतात याचे कारण ते त्याचे समर्थकच असतात.
      सध्या महाराष्ट्रात नागपूर ते पुणे आणि देशात मागासवर्गीय तरुणांच्या हत्या सुरू आहेत. परन्तु त्याविरोधात बोलायची हिम्मत असलेले मोजके लोक आहेत. केंद्र सरकारने ओबीसी तरुणांच्या डाॅक्टर होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 11 हजार जागा आपल्या उच्चवर्णीय मुलांसाठी परस्पर वळवल्या,खाल्ल्या परन्तु त्याकडे लक्ष देणारे आगरी कोळी ओबीसी तरुण अजून जागे झाले नाहीत. आपल्याच धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय लोकां विरोधात लढणारे ओबीसी जसे दुर्मिळ?. तसेच स्वतःच्याच जातीतील फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात आवाज उठविणारे विकास पाटील यांच्यासारखे धाडसी तरुण आम्ही जपले पाहिजेत. सक्षम केले पाहिजेत.मुबंईच्या गावठाण हक्कात लढणारे माहीम कोळीवाड्यातील तरुण जयेश आकरे,वयोवृद्ध निजाई बाबा हे साऱ्या मुबंईस न्याय देऊ शकतात. परन्तु सामान्य माणसांनी त्यासाठी सेठ सावकार प्रस्थापित नेत्यांना न घाबरता समोर आले पाहिजे. ज्या भूखंडाच्या जोरावर नवी मुबंईतील उच्चवर्णीय आणि आपल्याच ओबीसी जातीतील शिक्षण सम्राट शिक्षणाचा बाजार मांडत आहेत त्या जागा आमच्या शेतजमिनीच्या पुनर्वसन भूखंडाच्या हक्काच्या जागा आहेत. न्यायालयात आणि जमिनीवरच्या आंदोलनातून आपण त्या लढून मिळवू. परन्तु गावठाण हक्काचा विस्तार करून शाळा कॉलेजेस आरोग्यासाठी सोयी म्हणून आवश्यक भूखंड मा जिल्हाधिकारी यांनी द्यावेत हा कोळीवाडा गावठाण विस्तार हक्काचा वेगळा विषय आहे.सिडकोची लढून मिळविलेली पाच हुतात्मे आणि दि बा पाटील यांच्या महान नेतृत्वामुळे मिळालेली, साडेबारा टक्के योजना म्हणजे गावठाण हक्क नाही. नवी मुबंई विमानताळात विस्थापित गावाचे पुनर्वसन गावठाण विस्तारासह होत आहे. अर्थात मूळ जागेच्या तीनपट जागेसह होतेय.  तर शेतजमिनीच्या बाबतीत मूळ जागेच्या 20 टक्के जागा पुनर्वसन म्हणून मिळतेय. दोन्ही योजना वेगळ्या आहेत. यात आगरी कोळी जातीतील आणि उच्चवर्णीय सर्वपक्षीय जातीतील प्रस्थापित नेते प्रकल्पग्रस्त ओबीसींची फसवणूक करीत आहेत.
      सध्या महाराष्ट्रात बौद्ध तरुणांच्या हत्या मूळच्या क्षत्रिय लोकांकडून होत आहेत. आम्ही उच्चवर्णीय असल्याच्या 'सैराट' अहंकारातून हे घडतेय. उद्या पोलिसांकडून आरोपी पकडले जातीलही. परन्तु ज्या उच्चजातीय शोषक जातींकडून मनुस्मृतीच्या मानसिकते आधारे हे दुष्कृत्य होतेय ते देशासाठी अत्यन्त धोकादायक आहे!. त्यावर मनुस्मृतीप्रणीत  उच्च वर्णात सर्वोच्च सत्ताधारी ठिकाणी असलेल्या ब्राह्मण लोकांनी बोलले पाहिजे. त्यानंतर वैश्य लोकांनीही बोलायला हवे. मनुस्मृती 11 (33) या श्लोकात म्हणते, 'ब्राह्मणाची वाणी हेच त्यांचे शस्त्र आहे.' समाज शत्रूच्या बाबतीत त्यांनी हे शास्त्र वापरावे. 'क्षत्रियांना धडा शिकविण्यासाठी ब्राह्मणांनी शस्त्र हाती घ्यावे.' 2 (24 18) नुसार  'गाईच्या रक्षणासाठी आणि वर्ण व्यवस्था कायमस्वरूपी राखण्यासाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी कोणतीही किंमत देऊन धर्मव्यवस्था अबाधित ठेवावी.' परन्तु मागासवर्गीय तरुण याचे जीव आणि शिक्षण हक्क याबाबतीत उच्चवर्णीय विरोधात जात असतील तर मागासवर्गीय लोकांनी शस्त्र सोडाच?. लोकशाहीतील भाषण लेखन न्याय असे कोणतेही अहिंसक शस्त्र हाती धरू नये; असे स्त्री शूद्रातीशूद्र यांचे वागणेही मनुस्मृती नुसारच चालू असणे हे अशोभनीय निंद निय आहे.
     अमेरिकेतील गोऱ्या पोलिसी अत्याचार आणि काळ्या भूमिपुत्र हत्याकांडा विरोधात लोकशाही मार्गाने चाललेली आंदोलने ही भारतातील मागास ओबीसी,एससी,एसटी,  विजेएनटी यांच्यासाठी जागतिक आदर्श देणारी आहेत. मी पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप आणि नागपूर येथील अरविंद बनसोडे या तरुणांच्या हत्येसंदर्भात शासनास सामाजिक न्यायासाठी विनंती करीतच आहे. या देशातील उच्च जातीतील समस्त विचारवन्त लोकशाहीवादी सुसंस्कृत नागरिकांनी अमेरिकेतील गोऱ्या लोकांप्रमाणेच ,मागासवर्गीयन्यायाच्या बाजूने पाठींबा द्यावा अशी विनंतीही करीत आहे. 
     देशातील समस्त मागासवर्गीय आणि विवेकवादी उच्चवर्णीय यांनी एकत्र येऊन भारतीय जनतेच्या मनास संविधानिक साक्षर करण्यासाठी पुढे यावे. राष्ट्रीय एकात्मता अखंडता टिकवावी. आम्ही आगरी कोळी कराडी ओबीसी तरुणांनी प्रथम आमच्याच जातीतील शिक्षण विरोधी जमीनदार सरंजामी लोकांना विरोध करून राज्य स्तरावरील उच्चवर्णीय शिक्षण सम्राटांच्या अत्याचारी स्वभावास बदलण्याचे अहिंसक आंदोलन नवी मुबंई तुन सुरू केले आहे. मला विश्वास आहे ओबीसीसह सारे भारतीय त्यास पाठींबा देतील..आणि मागासवर्गीय तरुणांच्या हत्येविरोधात एकत्र येऊन समतेचे न्यायाचे एकत्रित आंदोलन उभे करून जगास नवा आदर्श देतील. जय भारत!
           
राजाराम पाटील 8928452112

विराज जगताप हत्याकांड :सरकारचे मनुवैदिक मानस शास्त्र?.

विराज जगताप हत्याकांड :सरकारचे मनुवैदिक मानस शास्त्र?.
   लोकसभेच्या मावळ मतदारसंघात विराज जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्या हत्येमागचे कारण साऱ्या देशासाठी अत्यन्त लज्जास्पद आहे. मी याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा निवडणूक लढलो. उरण पनवेल ते रायगड या समुद्री हवामान ते घाटमाथा या परस्पर भिन्न भौगोलिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ने परस्पर विरोधी वातावरणातली ही चुरशीची निवडणूक होती. या मतदारसंघात विजयी झालेल्या शिवसेना भाजपा युती चे खासदार श्रीरंग बारणे आणि कॉग्रेस राष्ट्रवादीच्या पार्थ अजित पवार यांच्यातील लढतीत मी आगरी मागासवर्गीय  उमेदवार होतो. पिंपरी चिंचवड परिसरातील जनतेचा साधा भावनिक प्रेमळ पाठींबा, लोकशाहीशी प्रामाणिक नाते सांगणारा मतदार पाहून मी भारावून गेलो होतो.  
     विराज सारख्या विशीतल्या तरुणांची जेव्हा हत्या होते तेव्हा माता पित्याच्या पितृवत्सल काळजाच्या तुमच्या माझ्यासारख्याचे काळीज पिळवटून जाते. जी अवस्था विराजच्या आईची आहे ती माझ्यासारख्या प्रत्येकाची असावी. आई वडिलांचे आपल्या मुलांविषयी जे प्रेम असते त्याची तुलना जगात कुणाशीही होऊ शकत नाही. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी मी स्वतः हे अनुभवतोय. आपल्याला मुलासारख्या असणाऱ्या विराजच्या हत्या ज्या कारणामुळे होतात त्याचे दुःख फार मोठे आहे. 
     या मतदार संघात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडून ही मोक्याची तेव्हढीच धोक्याची जबाबदारी मिळे पर्यंत आणि निवडणुकीच्या अंतिम निकाळा पर्यंत बाळासाहेब आणि प्रत्येक कार्यकर्ता मतदार बंधू भगिनींच्या सहकार्याची आठवण चिरस्मरणीय ठरली. विराजची हत्या ही संतापजनक घटना कानावर येईपर्यंत मी माझ्या सर्वच कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींशी केवळ कौटूंबिक मायेने ममतेने बांधला गेलोय!. अर्थात या परिसरातील बांधवांचे दुःख तेच माझेही दुःख आहे.
     मागासवर्गीय पाटील असतात याची जाणीव घाटमाथ्यावर बऱ्याच लोकांना नसावी! निवडणुकात सांम,दाम,दंड,भेद,पैसा,धमक्या आणि ईव्हीएम चा कल्पक वापर करून लोकांची मते लीलया घेऊन जिंकायचे पवार-मोदी (क्षत्रिय वैश्य युती) कृत्रिम राजकारण, विसरायला लावणारी प्रेमळ मागासवर्गीय माणसे मी येथे घरा घरात पाहिली. 
      जगाला प्रेमाने जिंकायचे, तर स्वतःला पंचशीलाने! याच कार्ला मातृसत्ताक संस्काराने शिकलेल्या सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी स्वभावाचा मी एक सामान्य माणूस या घटनेने प्रचंड दुःखी झालोय. सार्वत्रिक निवडणुकीत नेता म्हणून जेव्हा कुणी आपले अमूल्य मत देतो, तेव्हा त्या नेत्यांचे विचार आचार आणि व्यवहार यास दिलेली ती जाहीर मान्यता असते. आपल्या घरातही आपण आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना असे मत देताना अंतर्मनात त्याचे किती कठोर मूल्यमापन करतो याची जाणीव मला स्वतःस आहे. मावळ मधले 75 हजार मतदार हे याच कौटूंबिक नात्याने मला मनातून जोडले गेलेत. 
     शासन कर्ता कसा असावा याचे उत्तर देताना एकविरा पुत्र बुद्ध म्हणाले होते, "शासन कर्त्याने चुकणा-या जनतेस शिक्षा करणे म्हणजे शासनकर्ता होणे नाही! तर आपण आपल्या मुलाशी जसे पित्याप्रमाणे वागतो तसे जनतेचा पिता होणे होय." मूल चुकते त्यास कोणताही पिता मृत्युदंड देत नाही. बाप झालेल्या प्रत्येक माणसाला माझे शब्द समजत असतील. यामुळेच सम्राट अशोका सारखा जगातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राज्यकर्ता घडविणारा, मातृसत्ताक आई एकविरापुत्र बुद्ध हे माझे राजकीय मार्गदर्शक  झाले. 
      विराजची क्रूर हत्या ही साऱ्या देशातील माता पित्यासाठी आता, राज्यकर्त्यांची विचारसरणी कशी असावी याचे चिंतन करायला लावणारी घटना आहे. पश्चिम महाराष्ट्र हा वारकरी विचारांचा आहे. संत तुकारामांचा एक अभंग पंडित भीमसेन जोशींनी गायला. 'जे का रंजले गांजले.. त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा..।। दया करणे जे "पुत्रासी"तेचि दासा आणि दासी।। तुका म्हणे सांगू किती? त्याची  भगवंताच्या मूर्ती...।।' वारकरी साहित्याचे गाढे अभ्यासक माळी समाजाचे प्रा शंकर महाजन हे माझ्याबरोबर होते. आमच्याकडे आई एकवीरेंच्या वात्सल्याने आणि घाटावर विठू माऊलीच्या प्रेमाने वाढलेल्या महाराष्ट्राला माझी विनंती आणि प्रश्नही या लेखातून मी करत आहे. माता पित्याच्या मनाचे राजकारणी आम्ही घडवू शकत नाही का?. 
     मी पहिला प्रश्न मला म्हणजे राज्यकर्त्यांना विचारीन. साऱ्या देशाचे प्राण वाचविण्या साठीच लाॅकडाऊन जाहीर केलेय ना?. केंद्रीय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना हा माझा प्रश्न आहे! सरकारच्या उद्देशा बाबत शंका येण्याचे कारण महाराष्ट्रात मागासवर्गीय तरुणांच्या हत्या जात वर्चस्वातून होणे म्हणजे शासनाची उच्चवर्णीय मानसिकता प्रकट होणे आहे!  ही अत्यंत घातक स्थिती आहे. नोटबंदी आणि लाॅकडाऊन याचे पंतप्रधान मोदींचे हेतू उदात्त असले तरी 85 टक्के मागासवर्गीय जनतेच्या जगण्यावरचे मृत्यूचे नवनवे प्रयोग अशीच वास्तव स्थिती लोकांना जाणवतेय! रांगेत उभे राहून आणि नोटबंदीच्या मंदिने आलेले मृत्यू या थंड डोक्याने केलेल्या हत्याच होत्या!.
      बेरोजगारी गरिबी यामुळे झालेले मागासवर्गीयांचे स्थलांतर, रेल्वेखाली चिरडलेल्या कामगारांचे मृत्यू आणि घरा घरात उपासमारीने आणि गरिबीमुळे औषध पाण्याविना मरणारे कोरोनाग्रस्त नागरिक या सरकारी हत्याच आहेत ना?. जमावबंदी असताना उच्च जातीचा विषाणूग्रस्त माथेफिरू सहाच्या संख्येने येऊन एखाद्या प्रेम करणाऱ्या तरुणास रस्त्यात मारतो ही उच्चवर्णीय मानसिकतेच्या सरकारने केलेली मागासवर्गीय नागरिकांची हत्याच आहे ना? केंद्र आणि राज्याच्या फडणवीस पवार वादात या कोवळ्या मुलांचे हत्येचे विकृत राजकारण कुणी करू नये!!.   
       विराज जगताप हा देशाच्या सरकारी मानसिकतेचा प्रश्न आहे. लाॅकडाऊन ही आता लोकशाही विरोधी आणीबाणी वाटू लागली आहे. त्यात मागासवर्गीय माणसाच्या हत्या अधिक ठळकपणे दिसतात. अर्थात विराज जगताप हा केंद्र सरकारचा विरोधक नव्हता ना? मोदी सरकारला लोकसभेत विरोधकच उरला नसताना विराजची हत्या होते यापाठीमागे कोणते दहशतवादी राजकारण असावे? अमेरिकेतील जॉर्ज प्लॉईड या काळ्या अमेरिकन नागरिकाच्या रस्त्यावरील गोऱ्या पोलिसाने केलेल्या क्रूर हत्येने हा प्रश्न देशाच्या अध्यक्षांच्या मानसिकतेकडे बोट दाखवू लागला. आम्हीही विराजची हत्या ज्या सरकारी मानसिकतेने घडली आहे; ते मनुवादी क्षत्रिय राजकारण आहे हे मान्यच करायला हवे! 
     जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्पना गोऱ्या मानसिकतेची वर्णभेदी घृणास्पद शिवी ऐकावी लागते. मग मनुस्मृती समर्थक भाजपाचे केंद्रीय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांची मानसिकता एकविरापुत्र बुद्धाच्या करुणेची निश्चितच नाही ना? मी आगरी ओबीसी जातीचा प्रतिनिधी पराभूत खासदार म्हणून देशाच्या जनतेस हा प्रश्न विचारतोय!. 
      आम्ही पंतप्रधानांच्या मानसिकते बाबत नोटबंदीच्या काळातच हे प्रश्न विचारायला हवे होते. 'शूद्रांना संपत्तीचे काडीचेही अधिकार नसतात'; याच मनुस्मृतीच्या तत्वाने गरीब कष्टकरी महिलांनी पिठाच्या डब्यात जपून ठेवलेल्या कष्टकऱ्यांच्या एखाद्या पाचशेच्या नोटेला बाहेर काढण्यासाठी ही कारवाई होती का?. ज्यास जन्म आहे त्यास मृत्यूही आहे हे सत्य आम्ही जाणतो. परन्तु विराज या तरुणास मागासवर्गीय जावई म्हणून स्वतःची क्षत्रिय कन्या स्वीकारत असताना, तिचा निर्णय नाकारणारी मानसिकता नक्की आहे तरी कोणती?. विराजची हत्या आमच्या मराठा मुलीवर प्रेम केले म्हणून जाहीर रित्या करण्याची मनुवादी नैतिकता ज्या मनात जन्म घेते, गुन्हा तेथे मना मनात घडलाय!!. 
   आपल्या देशात मनुस्मृतिस धार्मिक नैतिकतेचे अधिष्ठान सांगणारे जे लोक आहेत त्यांनी राग न मानता आता तरी पुढे यावे! त्याच प्रमाणे मनुस्मृतीच्या विरोधक लोकांनी हे लक्षात घ्यावे हत्या या प्रथम मानवी मनातच घडतात. पोलिसांनी गुन्हेगाराच्या मनाचा वेध घेणारे पुरावे शोधावेत. अॅट्रोसिटी हा कायदा मनुस्मृती च्या मागासवर्ग विरोधी उच्चवर्णीयांच्या आक्रमक हल्य्या पासून संरक्षण देणारा कायदा आहे. तो मागासवर्गीय रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये या शिवरायांच्या स्वराजनीतीचा ऐतिहासिक कायदा आहे. शिवरायांचा पराक्रमी वारसा सांगणाऱ्या मराठा महाराष्ट्राला तो समजू नये? हे आम्हा प्रबोधनकारांचे अपयश आहे. आपल्या आजूबाजूला असलेली अशी विकृत मने ओळखून आम्ही अत्यंत अमूल्य असे जीवन वाचविण्याची एकविरापुत्रांची जीवनविद्या समजून घेतली पाहिजे.
     विराजची हत्या ही मला देशाची मानसिक फाळणीचा परिणाम म्हणून अधिक भीतीदायक वाटते. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मा अनिल देशमुख यांना संशयाच्या नजरेने पहायला लावते! अर्थात माझेही आडनाव पाटील असल्यामुळे याचा देशमुख पवार काटे पाटील आडणावाशी संबंध जोडणे चुकीचेच आहे. केंद्र आणि राज्याच्या सरकारने आज जो धर्म वंश जात संघ सेना आणि राष्ट्रवादी उपाध्या धारण करतात तरीही जनतेच्या मनातून उतरलेल्या राजकीय पक्ष संघटनांनी,याच्यापेक्षा अधिकचा विश्वास मागासवर्गीय जनतेला देणे गरजेचे झालेय! जनमानसात आज सरकारविषयी संशयाचे वातावरण निर्माण झालेय याची कबुली मी देत आहे.
      विराजची हत्या झालीय त्याचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदला गेलाय. मला पूर्ण विश्वास आहे मावळ मतदार संघ भीमा कोरेगावमुळे अत्यन्त संवेदनशील झालाय सरकारला न्याय देण्याऐवढं संविधानिक वातावरण येथे आहे. अर्थात उरण पनवेल रायगडचा कोकणातील मातृसत्ताक मानसिकतेचा प्रदेश हे पुरुषसत्ताक मानसिकतेच्या मागासवर्ग विरोधी मानसिकतेच्या प्रदेशावर नैतिक दबाव निर्माण करीलच! 
     प्रेम हे आंधळे असते हे मानवी मनाच्या निर्णय स्वातंत्र्याला नाकारणारे वाक्य आहे. प्रेम म्हणजे मालकीची भावना नव्हे. माझ्या मुलीने कुणावर प्रेम करावे हा मुलीच्या स्वातंत्र्याचा विषय आहे असे हुंडा नाकारणारे मातृसत्ताक कोकण मानते. आईच्या मानसिक स्वातंत्र्या सह शारीरिक हत्या करणाऱ्या परशुरामाची ही भूमी नाही. ती लग्नात हुंडा नाकारणाऱ्या ,महिलांना धार्मिक आर्थिक आणि शस्त्रास्त्रांचे अधिकार देणाऱ्या सागरपुत्र एकविरापुत्र बुद्धाची भूमी आहे!! म्हणूनच विराजला मनाने वरणाऱ्या मुलीची मानसिक हत्या विराजला मारणाऱ्या लोकांनी केलीय. हे हत्या प्रकरण बौद्ध एससी एसटी या अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रोसिटी कायद्याची सुरक्षा दिलेल्या अतिशूद्र जातींचेच नाही. तर शूद्र ओबीसी जातीच्या तरुणांना उच्चवर्णीय जातीची मुलगी नाकारणाऱ्या त्यासाठी हत्या करणाऱ्या हत्या-यांचे आहे. ओबीसींना हे माहीत असावे!. 
     आम्ही अंदाजे 85 टक्के मागासवर्गीय आणि 15 उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जन्माने श्रेष्ठ लोकांचा उल्लेख अशा शोषण, हत्या आणि मागासलेपण आरक्षण समजण्यासाठी करतो. प्रेम प्रकरणातून कायदा हातात घेण्याची परंपरा पाहता अशा उच्चवर्णीय वस्त्या दहशतवादी घोषित करणे मागासवर्गीय जातीसाठी अतिशयोक्तीचे ठरू नये. अर्थात मुस्लिम आतंकवादी असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा विराजची हत्या हा वैदिक क्षत्रिय आतंकवाद आहेच ना?. गांधीहत्या ही ब्राह्मणी आतंकवाद आहे. समाजात दहशत पसरविणे हाच तर जाहीर हत्याकांडात हेतू असतो. माझ्यासारख्या उमेदवारास पुण्याकडे लोकसभा लढविताना याचा विचार यापुढे करावाच लागणार कारण मी ही विराजसारखाच मागासवर्गीय आहे. विराजने फक्त प्रेम केले. मी तर सर्व सत्ताधारी जमीनदार जातींची सत्ता घेण्याची मानसिकता ठेवतोय!.
      प्रश्न आहे प्रत्येक घरात जन्मणा-या मुलींचा ज्या प्रेम करताना जात नाही तर मुलांचे कर्तृत्व आणि प्रेमच पाहून निर्णय घेतात. आमच्या ठाणे, रायगड, मुबंई या अपरांत प्रदेशात मुलींचा निर्णय अंतिम असतो बंधनकारक असंतो. माझा प्रश्न माझ्या मतदार संघातील सर्वच निवडणूक लढलेल्या जिंकलेल्या हरलेल्या खासदार आमदार आणि नगरसेवक सरपंच सदस्य यांना आहे. हत्या केवळ विराजची दिसतेय; परंतु विराजच्या प्रेमिका मुलींचीही झालीय! तिच्या मनाचा विचार कोण करणार?.  
    गोऱ्या मानसिकते विरोधात एका जॉर्ज साठी अमेरिका हलवून सोडणाऱ्या काळ्या लोकांपेक्षा एकविरापुत्र बुद्धाच्या देशातील आम्ही सारे लोक प्रेम प्रकरणात आपल्या प्रियकराची भावी पतीची हत्या करणारे जन्मदाते, रक्ताचे भाऊ यांच्याबद्दल ती मुलगी काय विचार करीत असेल? वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या सुविध्य पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्या मनात विराजच्या आईला समजाविताना सांत्वन करताना, विराजच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या मुलीच्या दुःखाची जाणीव निश्चितपणे झाली असावी!.  
     सावित्री माई या शूद्र ओबीसी महिलेच्या आग्रहाने शिकलेल्या सर्वच भारतीय महिलांनी पुरुष प्रियकर मारण्याची कृती ही स्त्री विरोधी आहे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. जाती बाहेर जाऊन लग्न केलेल्या स्त्रिया या बंडखोर स्त्री स्वातंत्र्याचे महत्व माझ्यापेक्षा अधिक सांगू शकतील! मी विराजची हत्या ही माझ्या मानसपुत्र आणि मानस कन्येची हत्या समजतो!!. या मावळ मतदार संघात आई एकवीरेंच्या बलशाली मातृसत्ताक विचारांची गौरवशाली परंपरा घेऊन कोकणच्या महिला स्वातंत्र्याचे गीत धार्मिक आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याचे आगरी कोळी पद्धतीचे काती कोयते घेऊन स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याचे जीवन कौशल्य अभ्यासण्याची विनंती करीन. ही लढाई पुरुषसत्ताक पुरुषांपेक्षा कोळीवाड्यातील मातृसत्ताक महिला लढतील. भेटूया कार्ला बौद्ध लेण्यात आई एकवीरेंच्या विचारासोबत. लढाई सुरू झालीय विराजच्या तुमच्या माझ्या प्रेमाची.....! मानवी हक्कांची ..!!
         
राजाराम पाटील 8928452112,