राजकारणातील तड फडणीस
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते.डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही.आणि संकट आल्या शिवाय, डोळे उघडत नाहीत.राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन म्हणणारे राजकारणातील तड फडणीस आपण पाहत असाल,वाचत असाल.
जल बिन मछ्ली म्हणजे पाण्याच्या बाहेर जिवंत मासळी काढली तर ती कशी करते कधी पाहिले काय?. ती पाण्यात जाण्यासाठी ज्या जिद्दीने तडफड करते ते पाहिल्यावर कोणत्याही माणसांचे मन हेलावून निघते. असाच प्रकार सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणविस साहेबांची परिस्थिती त्या माश्या सारखी झाली आहे. अहोरात्र खोटे बोलून शेतकरी,मराठा, धनगर, ओबीसी, मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करून ई व्ही एम मुळे निवडणूक जिंकली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पद आपले हक्काचे आहे. शंभर टक्के गृहीत धरून चालले असतांना शिवसेनेच्या वाघांची डळकाळी फोडून शिकाऱ्याने शिकार सहजतेने करून नेली.. त्यामुळेच देवेन्द्र ची हालत एका वाटसरू सारखी झाली.
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.त्याला मारण्या साठी दगड उचलावा.दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.तर हात सुटून विहीरीत पडण्याची भिती यालाच तोंडाशी आलेला घास गेला असे म्हणतात.
देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. केवळ महाराष्ट्रात नाही?,सर्व राज्यासह देशभरात सुरू असतांना देवेंद्रजी फडणविस यांना रात्रंदिवस झोप लागत नाही.आजचा महारष्ट्र आणि मुख्यमंत्री दिसतो. त्यांना सारखा शेतकरी आत्महत्या करतो, वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील मंत्रालयात येऊन आत्महत्या करतो.जेंव्हा ऐशी वर्षाच्या शेतकऱ्याने आपल्या कार्यकाळात मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व आपन कित्येएक दीवस त्याच्या कुटुंबियांना आपण नजरकैदेत ठेवले होते.हा इतिहास शेतकरी विसरला नाही.विसरला असेल तर तो शेतकरी नसावा.
"एक मराठा लाख मराठा" मराठ्यांचे लाखोंचे क्रांती मुक मोर्चे शिस्तप्रीय पद्धतीने निघाले होते व बावीस बांधवांनी बलीदान दिले तरी आपन मुग गिळून गप्प बसलात होता.म्हणे अभ्यास सुरु आहे. जेंव्हा न्याय्य मागण्यासाठी आमचा आदिवाशी कष्टकरी बांधव नाशिक ते मुंबई पायी प्रवास करत आसताना उन्हामुळे पिगळनाऱ्या डांबरी रस्त्यावर चालल्यामुळे त्याचे पाय सोलुन निघत असतांना ही तो आझाद मैदानात आला होता.त्याच्या सातबाराचे काय केले.हा इतिहास वनविभागाची जमीन कसणारा आदिवासी विसरला नाही.विसरला असेल तर तो भूमुहीन आदिवासी नसावा.
फडणविस साहेब आज महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे आर्थिक आडचणींचा सामना करत असताना, तुम्ही मोदीच्या पी एम केयरला मदत करा असे आवाहन करता हे सांगताना थोडी तरी लोकलज्जा ठेवली पाहिजे होती. आपन फार अभ्यासू राजकारणी व्यक्तीमत्व आहात असे तुमचे लोक म्हणतात.
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे परंतु जगाच्या पाठीवर कोरोनाचे राजकारण करनारे आपन एकटेच आहात. आपनही पाच वर्षे महाराष्ट्रातचे मुख्यमंत्री राहीलात आपन कीती हॉस्पिटल व पायाभुत सुविधा ऊभ्या केल्या व आजच्या महाआघाडी सरकारने त्या बंद केल्या त्यामुळे महाराष्ट्र संकटात सापडला. हे सांगितले पाहिजे ना?.
अच्छे दिन दाखविण्यासाठी तुम्हाला वृतपात्रांना संपूर्ण पाच वर्षात दरदिवशी ऐशी हजार रुपये जाहीरातींवर खर्च करावे लागले. हे आम्ही सांगत नाही माहिती अधिकारात ऊघड झाले आहे.देवेंद्रजी संपुर्ण देशामध्येच कोरोनाच्या रुग्नांचा आकडा वाढतोय मग ते अपयश सन्माननिय मोदी साहेबांचे अपयश नाही का?. जी,एस,टी चे एकविस हजार कोटी केंद्राकडे अडकुन पडलेत ते घेऊन येण्यास मदत करण्या ऐवजी महाराष्ट्राला संकटात टाकण्याचे महापाप आपण करीत आहात असे वाटत नाही काय?. सांगली महापुराच्या वेळी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना काय मार्गदर्शन करीत होता त्याच्या बातम्या आणि व्हीडीवो क्लिप पाहता काय?.राजकारणात यशस्वी होण्यासाठी सहकार्याचा आणि मतदारांचा विश्वासघात करण्याचा अनुभव प्रचंड असतांना आज आपण विरोधीपक्ष नेते आहात आणि कोणताही राजकारणात विश्वासघात करण्याचा अनुभव नसणारे मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात अतीशय चांगले काम करत आहेत. त्यांना ते शांतपणे करू द्या.
आपण तरुण तड फड करणारे राजकारणातील तड फडणीस आहात.मतदारांनी पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्र संकटात असतांना काय करीत होता?. असे विचारले नाही पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील जनतेला मतदारांना वाचविण्यासाठी संविधानाच्या चौकटीत काम करा.हीच आपणास मतदारांच्या वतीने विनंती करतो.
सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडू प मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा