कोरोना देशात आला कसा?
कला नगर परीसरात अनेक बिल्डर चे मोठ मोठे टॉवर चे काम सुरू आहे, ठेकेदारांनी हजारो असंघटित कामगार इमारतीच्या आत लेबर कॉम्प्स बनवून ठेवले आहेत, २२ मार्चला लॉक डाऊन ची घोषणा झाल्यावर या कामगारांना काम बंद आहे गांवी जाण्यास सांगितले असता हजारो कामगार रस्त्यावर उतरले, काहींना तीन तीन महिन्यांचा पगार सुध्दा दिला नाही, सर्वांना इमारतीच्या बाहेर काढण्यात आले या बिल्डर ठेकेदारावर सरकार कारवाई करणार आहे काय?. इमारत बांधकाम कामगारांची इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नांव नोदणी झाली होती काय?.बांद्रा स्टेशनवर गांवी जाण्यासाठी आलेल्या कामगारांकडे बॅगा का नव्हत्या?. लाठीमार झाल्यावर हे कामगार कुठे गेले ?.याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना नसावी आणि वृत्तवाहिन्या त्या बाबतीत काहीच सांगतांना दिसत नाही, कोरोना देशात आला कसा?. म्हणजे हे दिसते तेवढे साधे प्रकरण नाही.बिल्डरचे व भाजपाच्या नेत्यांचे आर्थिक जिव्हाळ्याचे संबंध जगजाहीर आहे.
उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात महाआघाडी सरकारच काम कौतुकास्पद सुरु आहे.कोरोना महासंकटाला मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सामोरे जात आहेत.ते पाहिल्यावर त्यांना वीस पंचवीस वर्षाचा मंत्रीपदाचा अनुभव असलेल्या नेत्या सारखे वागतांना दिसतात. अनुभवी नेत्यांना जे जमले नसते ते ही संकटात असतांना सुरु असलेले दररोजचे कामकाज शांतपणे होत असताना फडतूस लोकांना रात्र रात्र झोप लागत नाही.ते अजूनही माझ्या हातून सत्ता का गेली याचा अभ्यास करीत आहेत. उद्धव ठाकरे यांचे काम पाहून संपूर्ण पेशव्यांच्या वारसदारांना झोप येत नाही. ठाकरेंचे सरकार कसे पडता येईल याचा रात्रंदिवस विचार करीत आहेत. तर बहुसंख्य लोकांना पोटपूजा कशी करावी यांचे मोठे संकट आले,कोरोना देशात आला कसा? यांचे त्यांना आश्चर्य वाटते?.
लॉक डाऊन मुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाला त्यामुळे लोकांचा मेंदू काम करेनासा झाला. लाखोच्या संख्ये असंघटीत कामगार शहर सोडून गावाकडे जात आहेत.त्यामुळे कोरोनावर मात करता येईल.उपासमारीमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या तक्रारीचे काय?.रोजगारा साठी गांव सोडणारे गावात परत राहण्यास आले तर त्यांचा अन्न धान्य आणि भाजीपाला,तेल,मीठ मिरचीचा प्रश्न कसा सुटेल हा प्रश्न उभा राहत आहे.मोदी या प्रश्न कडे गांभीर्याने पाहत नाही.ग्रामीण भागात अगोदरच खूप समस्या आहेत. त्यात यांची मोठी भर पडणार आहे. "गुन्हा पासपोर्ट वाल्यांनी केला आणि शिक्षा रेशनकार्ड वाल्यांना मिळत आहे." असे बहुसंख्य कामगारात बोलल्या जात आहे.आणि हे शंभर टक्के सत्य आहे.ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राज्य सरकार २१ मार्चला घोषणा करते,केंद्र सरकार २२ मार्चला झोपेतून जागं होते २३ तारखेपासून २१
दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करते. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा मुळे देश व येथील नागरिकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. त्याविरोधात सरकारला जाब विचारायला हवा तर तो विचारला जात नाही. मोदी समर्थकांनी सर्व दोष तबलीगी जमातला दिला आहे.
सर्व सामान्य माणसाच्या डोक्यात हेच बसले की तालिबानी जमात मुळे देशात कोरोना आला.याबाबत सरकारला कोणताही प्रश्न विचारा उत्तर तालिबानी येते.
जगात कोरोनाची सर्वत्र धुमाकूळ घातला होता तेव्हा १२ फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी कोरोनाची भयानकता सांगून जाहीर इशारा दिला होता. त्याकडे नेहमीसारखे पप्पू म्हणून दुर्लक्ष केले गेले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या सर्व टीमसोबत भारतात येतात,तेव्हा कोरोना संक्रमित आहेत की नाही तपास न करता मोदी त्यांना गांधीनगर, आग्रा दिल्ली फिरवून शाही मेजवानी देतात. तेव्हाच आज कुठेही न दिसणारे भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय १३ मार्चला कोरोना महा संकटाला घाबरण्याचे काही कारण नाही असे जाहीर करते.
१३ ते १५ मार्च दिल्ली च्या निजामुद्दीन इलाक्यात मुस्लिम समाजाच्या तबलिगी जमात की मरकत म्हणजे महा मेळावा संपन्न होतो. त्यानंतर ही देशातील सुप्रसिद्ध मंदिरे सुरू असतात.१६ मार्च पर्यत मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धी विनायक मंदिर सुरू होते.१६ मार्च पर्यत उज्जैनचे सुप्रसिद्ध महाकालेश्वसर मंदिर सुरू होते.१७ मार्च पर्यंत शिर्डीचे सुप्रसिद्ध मंदिर सुरु होते.१७ मार्च पर्यत शनी शिंगणापूरचे शनी मंदिर सुरु होते.१८ मार्च पर्यंत जम्मूचे वैष्णोदेवी देवी मंदिर सुरु होते.२० मार्चला बनारसचे कशी विश्वनाथ मंदिर सुरु होते.२१ मार्चला महाराष्ट्र राज्यात लोक डाऊन जाहीर झाला.आणि देशाचे प्रधानसेवक २५ मार्चला ताली थाळी वाजविण्याचे आवाहन करतात.२३ मार्च पर्यंत देशाची संसद सुरु असते.त्यात कणिका कपूर च्या पार्टीत दुशांतसिंग सहभागी होतात त्याची बातमी कोणती हि वृत्त वाहिनी माहिती देत नाही. मात्र २२ मार्चला लॉक डाऊन च्या नंतर लोक ताली,थाळी वाजवतात त्याची बातमी संकटावर मात केल्याच्या अभिभावात मोठ्या प्रमाणत दाखवली जाते.
२३ मार्चला देशात लॉक डाऊन असतांना मध्यप्रदेशच्या राजधानीत भोपाळला शिवराज चौव्हाण यांच्या सरकारचे शपथविधी तीन,चारशे लोकांच्या उपस्थितीत पार पडते.त्याची बातमी वृत्तवाहिन्या कशा देतात.२५ मार्चला उतर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी अयोध्यात रामलला मूर्ती दुसऱ्या टिकाणी नेऊन ठेवणार होते त्यावेळी शेकडो साधू संत,आणि मंत्रिमंडळातील मंत्री,आमदार मोठ्या संख्ये उपस्थित होते.पण कोणत्याही वृत्त वाहिन्यांनी बातमी दाखवली किंवा छापली नाही.अशा अनेक घटना आहेत.ज्या आर एस एस प्रणित भाजपा नेत्याच्या कोरोना मुळे देश संकटात असतांना घडल्या आहेत.त्या दाखवणे किंवा प्रिंट मीडियात प्रसिद्ध करणे देश हिता पेक्षा भाजपाच्या हिताच्या होत्या.देश कोरोना च्या महामारी च्या संकटात असताना ही हिंदू मुस्लीम दंगली घडविण्याची मानसिकता ठेऊन राजकारण खेळण्याची संधी सोडायला तयार नाहीत.चरित्र हीन लोक सत्ताधारी झाल्यावर त्यांच्यात बद्दल अपेक्षित असते.
अमेरिकेवरून कोरोना उजाड माथाने देशात आला.हे शंभर टक्के सत्य न स्वीकारता सरकार तबलिगी जमात ला दोषी ठरवून आपली जबाबदारी टाळत आहे.मुळात दिल्ली पोलीस व हवाई वाहतूक, इमिग्रेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे विषय.जागतिक स्तरावर हायअलर्ट असताना देशाच्या राजधानी मध्ये काय कार्यक्रम होताहेत हे सरकारला माहीत नसेल तर हा सरकारी नालायकपणा आहे. त्याचा दोष केंद्र सरकारचा आहे.त्यासाठी जबाबदार केंद्र व दिल्ली मधील सरकार आहे.
जानेवारी मध्ये कोरोनाने देशात पहिला मृत्यू झाला होता.फेब्रुवारी मध्ये जागतिक आरोग्य संघटना महामारी जाहीर करते आणि आपल्या देशात केंद्र सरकार २३ मार्चला झोपेतून जागं होते.केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा मुळे देश व येथील नागरिक धोक्यात आले.त्याविरोधात सरकारला जाब विचारायला हवा तर तो विचारला जातो तबलीगी जमातला.व सरकारला प्रश्न विचारणारांना देशद्रोही ठरविले जाते?. जानेवारी ते मार्च तीन महिने वेळ होती कोरोना विरोधी आपत्ति व्यवस्थापन करायला.परंतु सरकार गाफील होते.मास्क, ऑक्सिजन सिलेंडर यांची पुरेशी व्यवस्था तपासणी केंद्र युद्ध पातळीवर ऊपलब्ध करण्यात येणे आवश्यक होते.आरोग्य यंत्रणा सजग व चौकस करणे आवश्यक असताना काय केले?. सुविधा उपलब्ध करणे याला पुरेसा वेळ होता. जागतिक महामारी विरोधात राष्ट्रीय आपदा व्यस्थापन देशपातळीवर सुरू करायला हवे होते.राज्या राज्यातील मुख्यमंत्री व केंद्र सरकार यांच्या बैठका घेऊन नियोजन झाले पाहिजे होते.ते झाले नाही उलट सरकार तीन महिने अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे आतिथ्य, मध्य प्रदेशातील सरकार पाडणे,निवडणे व संसदेचे अधिवेशनात व्यस्त होते.दरम्यान कोरोना ग्रस्त प्रवासी देशात विना तपासणी दाखल होत राहीले.देशातून मास्क व सिलेंडर यांची निर्यात होत राहीली.हा सर्व प्रकार राष्ट्रीय द्रोह व देशातील नागरिकांच्या जिवीताशी खेळण्याचा अक्षम्य गुन्हा होता,आणि आहे.जो मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळाने केलाय. हे संकट देशावर लादले ते मोदी व केंद्र सरकारने परंतु काही लोक यावर अजिबात चर्चा करीत नाही.ते दोष देतात फक्त मुस्लिम व सरकारला आरोपी ठरविणारांना. काहींच्या मेंदू मध्ये २०१४ सालापासून आलेल्या वैचारिक बिघाडामुळे त्यांची विचारशक्ती पुर्ण कुंठीत झाली आहे.
कोरोना देशात आला कसा? यावर बोलण्या ऐवजी मुस्लिम कसे देश विरोधात आहेत यावर ते बुध्दी पाजळताहेत परंतु कुणालाही साधा प्रश्न पडत नाही की याच काळात योगी आदित्यनाथ, यदूयुरप्पा किंवा मध्य प्रदेश मध्ये देखील लॉकडाऊन चा भंग केला गेला.तो मात्र गुन्हा ठरत नाही कारण ती करणारी माणसं भाजपची आणि विशेषतः मुस्लिम नसतात.
अफवा पसरविणे गुन्हा असताना भिडे नावाचा विकृत गौमूत्र व तुपाने कोरोना बरा होतो,असे सांगणाऱ्या भिडेला अटक करा म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देणाऱ्यांच्या विरोधात संचारबंदी कायदा मोडण्याचा गुन्हा दाखल होतो. भिडे निदोष राहतो. त्यावर टिका होत नाही तर समर्थन केले जाते.त्यात राज्य सरकारही सामिल असतं. सुमित्रा महाजन सारखी बाई या वयात मृत्युंजय मंत्रांचा जप करण्यास सांगते.यापुढे देशात भाजपच्या कोणत्याही नेत्यास हॉस्पिटल मध्ये दखल केले नाही पाहिजे.
पंतप्रधानाची कामे काय आहेत?. की आम्ही काय व्यवस्था व सुविधा उपलब्ध केल्या हे देशाच्या नागरिकांना सांगणे. जागतिक महामारी मध्ये जर सरकारचा बालीशपणा हा मास्टर स्ट्रोक वाटत असेल तर भक्तगणांनी मेंदू काढून टेबलवर बरणीत सुरक्षित ठेवला आहे,त्यामुळे बरणीत ठेवलेल्या मेंदूला सरकारी बेजबाबदारपणा दिसत नाही म्हणून ते कुठल्याही आपत्ति करीता एका विशिष्ट समूहाला जबाबदार ठरविणार,हे ओघाने आले. कोरोना देशात आला कसा? हे कोणी विचारू नये.तो राष्ट्रीय गुन्हा ठरेल.
"ज्याने कायदा मोडला तो गुन्हेगार मग तो कुणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे" असा पवित्रा घेणे म्हणजे माणूस बुध्दी वापरतो, त्यांची विवेकबुद्धी कायम आहे हे समजते. परंतु येथे बेसिक मध्येच लोचा आहे.कायद्यापुढे सर्व सामान असतात.सर्वांना समान न्याय,हक्क अधिकार देण्यात आले आहेत. आजचे चित्रच वेगळे आहे.कोरोना देशात आला कसा?. त्या संकटाला प्रत्येक माणूस तोंड देत आहे. त्यामुळेच भविष्यात अंधार दिसत आहे.तो नष्ट करण्यासाठी पुन्हा संघ शक्तीची आवश्यकता आहे. जात,धर्म,प्रांत भाषा,सर्व विसरून ती दाखवावी लागेल.तरच भविष्य उज्वल असेल.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा