रविवार, १४ जून, २०२०

शासनकर्ती जमात म्हणजे आदर्श कर्मचारी,अधिकारी?.

शासनकर्ती जमात म्हणजे आदर्श कर्मचारी,अधिकारी?.
जगात मानव जात संकटात आहे.त्याला मदत करण्यासाठी सकारत्मक विचारांची मानसिकता असणारे, माणस माणुसकी दाखविण्यासाठी पुढे येत आहे.मदत करण्यासाठी सरकारी कायदा कानून असले तरच मदत करावी अशी मानसिकता केवळ भारतात असू शकते.इतर प्रगत देशात तसी नाही.म्हणूनच इटली,रशिया,अमेरिका,जर्मनी,स्पेन,फ्रांस,चीन सर्व परदेशातील सरकारने सर्वांच्या बँक खात्यात वीस ते चोवीस हजार रुपये जमा केले. भारतात प्रत्येक माणसाला जात,धर्म,काम धंदा,प्रांत याचे प्रमाण पत्र दाखवावे लागते. उपासी आहात याचा पुरावा काय?. तो दाखवावा लागतो.
तुम्ही नांव नोंदणीकृत कामगार,मजूर आहात तरच अन्न धान्य आणि मदत करण्याच्या लायक आहात. असंघटित कष्टकरी कामगार मजूर यांच्या नांवाने पोट भरणारे बोगस लोकांच्या नांवाची यादी इमारत बांधकाम कामगार म्हणून अधिकृतरीत्या जाहीर होते.राज्याच्या एका मंत्रांनी एका जिल्ह्यात,तालुकात कामगार अधिकाऱ्याला बोलाऊन तालुक्यात किती कामगारांची नांव नोदणी झाली. हे विचारले असता त्याने दिलेली यादी पाहून मंत्री महोदयांनी हे कामगार कोण आहेत.गावात दाखवा सांगितले असता.बोलती बंद झाली कोणी नांव दिले ते सांगा त्याचे उतर दिले गेले नाही.म्हणून ही नांव नोंदणी बोगस आहे हे ठरवून ताबडतोब इमारत बांधकाम कामगारांना सामानाची कीट वाटपाची  योजना बंद केली होती. आता यांनाच नोंदणीकृत कामगार म्हणून आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपये मिळणार असतील तर?. राज्याचे पॉवर फुल विरोधीपक्ष नेते कीट वाटप का बंद करण्यात आले होते अध्यक्ष महोदय यांचा सरकारने खुलासा करावा. अन्यता त्यांनी राजीनामा द्यावा.अशी मागणी करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. कारण राज्यात यांच्याच माणसाकडून मोठ्या प्रमाणात इमारत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी झाली होती. मग प्रश्न निर्माण होतो.बाकी कामगार,मजुरांचे काय?. त्यांना उपवासी मरू देणार का ?. 
कोरोना महामारी मुळे सर्वांची रोजीरोटी गेली.सलूनमध्ये काम करणारे कामगार, किराणा दुकानात,कपड्याच्या दुकानात काम करणारे कामगार,टेलर काम करणारे कामगार,ग्ररेज वाले कारागीर,असे एक दोन नाही तर ९३ टक्के असंघटीत कामगार मजूर आहेत.त्यांना सरकार कशी मदत देणार आहे.त्या पेक्षा सरसकट जो भारतीय नागरिक आहे. ज्यांच्या कडे मतदान कार्ड आहे.आणि ज्याला खरोखरच मदतीची गरज आहे.त्यांना मदत झाली पाहिजे.
भारतात कोरोनाने गोरगरीब कष्टकरी मृत्यू मुखी पडणार नाहीत, तर सर्वांची रोजीरोटी बंद झाल्यामुळे उपासमारीची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडतील ही भीती जास्त व्यक्त केली जात आहे. ज्यांना घरदार,गांव नाही कुठेही मृत्यू मुखी पडले तर त्यांच्यासाठी कोणी रडणारे येणार नाहीत, पण माणुसकीची मानसिकता आणि सकारत्मक विचारधारा असणारे लोक लढण्यासाठी तुम्हाला कडक शिक्षा करण्यासाठी पुढे आल्या शिवाय राहणार नाहीत.
अमेरिका,ईटली,चिन व शेजारील राष्ट्राचे प्रमुख हताशपणे मानवी मृत्युच्या साखळीकडे पहात असुन त्या शवाची विल्हेवाट लावण्यासाठी कामगार कर्मचारीवर्ग नाही म्हणून ते शोकाकुल अवस्थेत पाहत आहेत.
आपल्या राष्ट्राचे प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री अशा गंभीर परिणामापासुन नागरिकांना दुर ठेवत घरी राहण्याचे आवाहन (आता वेळ निघून गेल्यावर,आज) लॉकडाऊन करून काळजी घेत आहेत. शासन कर्ती जमात म्हणजे जिल्हास्तरीय जिल्हाप्रशासन,नगर प्रशासन,आरोग्य प्रशासन,पोलीस प्रशासन महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायतीसह फक्त सरकारी कर्मचारी काळजी घेत आहे. खाजगीकरणाचे समर्थन करणारे कामगार कर्मचारी आणि तो समाज कुठे दिसतो का पहा?.
अशा परिस्थितीत गोर गरिब नागरिकांच्या खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शासनाने रेशन धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना गहु तांदूळ याची व्यवस्था केली आहे. इतकेच नव्हे तर सकारत्मक विचारांच्या लोकांनी लोकांसाठी माणूसकीचे हात म्हणून नकळत मदतीसाठी पुढे येत आहेत. खंत मात्र इतकी की काहीजण निस्वार्थीपणे मदत करताहेत तर काही उपकारच करित आहे अशा भावनेने तर काही ज फोटो व्हिडीओ वायरल करतांना दिसतात व त्यातुन मिळविलेल्या लाईकवर खुष होतात तर काही लोक फोटो न टाकता गरजवंताच्या आम्ही कामी आलो म्हणुन मदत करून समाधानी होतात. फोटो टाकणे म्हणजे त्यामागील उद्देश की यातुन इतरांनी प्रेरणा घेऊन मदत करावी.यातुन वाटते की काहीही असो संकटकाळी मदत तर दिली. आजच्या घडीला गरज भागणे खूप गरजेचे झाले आहे. म्हणुनच रेशनदुकानातुन वाटप होणारे अन्न धान्य कितपत लोकांना पुर्ण मिळते या दिले जाते यावर लक्ष देणे ही गरजेचे आहे. दुकानदार ग्राहकांना सांगतात की धान्य कमी आले आहे. यावेळेस हे घेवुन जा पुढच्या महिन्यात बघु.शासन परिपत्रकातुन,बातम्यातुन सांगते की इतके धान्य आले आहे.गहु तांदूळ,साखर परंतु गहु,तांदळाशिवाय बाकीचे मिळत नाही. तसेच रेशन दुकानातून पावती घ्या, अन्नधान्य असलेले फलक लावा परंतु अशा नियमांचे पालन करणारे एखादे ही दुकान पाहण्यात आले तर त्यांचे फोटो कडून सोशल मिडीयावर टाका. संबंधीत अधिकारी दुकानात जातात धान्य देतांना फोटो घेतात परंतु समोरच्याला धान्य किती दिले हे मात्र दुर्लक्षित करतात.रेशन कार्डधारकांची देखील रेशन दुकानदाराला विचारण्याची हिंमत होत नाही,कारण त्याला धान्य घ्यायचे असते.कालचे तांदुळ कार्डावर असलेल्या प्रत्येक सदस्यांना प्रत्येकी पाच किलो प्रमाणे होते परंतु तसे न मिळता काही दुकाने अपवाद वगळता काही दुकानातून दहा,पाच,पंधरा किलो असे तांदुळ देण्यात आले.ते ही दुकान दोन दिवसच उघडी ठेवलीत.
वर्षानुवर्षे अशा कार्ड धारकांच्या हक्काचे गहु तांदुळ त्यांना दिले जात नाहीतच तर कमीतकमी आजच्या संकटसमयी तरी माणुसकी म्हणुन त्यांचे मिळणारे धान्य तर प्रामाणिकपणाने त्यांना द्यावे. संबंधित अधिकारी यांनी ही अशा बाबी लक्षात घेऊन त्यांच्याकडे मोबाईल द्वारे,या समक्ष गेलेल्या माहितीनुसार त्या दुकानावर लक्ष देवुन कारवाई केली पाहिजे. आज रोजी काही रेशनदुकानावर कारवाई करण्यात आली आहे परंतु असे काही दुकाने आहेत की त्यांच्या कडे चुकुनही अधिकारी बघत नाहीत त्या दुकानात जातात मात्र नावालाच. गोरगरिबांना अशाने न्याय कधी मिळणार?. अधिकारी यांनी नियमानुसार सदर दुकानात अन्नधान्य व भाव दर फलक,सदर मिळणारे धान्य,पावती देण्याची सक्ती व इतर बाबीचे निकस त्या दुकानात लावलेले पाहिजे असे न दिसल्यास कारवाई करण्याचे कर्तव्य बजाविले पाहिजे. शासन कर्ती जमात म्हणजे इमानदारीने लोकांना सेवा देणारा आदर्श कर्मचारी अधिकारी असा आदर निर्माण करा. रस्त्याने जाताना,कुठे ही भेटला तर लोकांनी आदरानी नमस्कार केला पाहिजे. त्यांच्या तोंडून गावरान शिवि नाही निघाली पाहिजे.तरच तुम्ही जीवनात काही तरी कमावले असे होईल. पैसा,सोने,चांदी, गाडी,बंगाल प्लॉट,जमीन जाग्यावरच राहणार आहे, शिल्लक राहील ती माणुसकी. म्हणुन संकटकाळी गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे जे असेल ते त्यांना मिळवून द्या.
कोरोना जैविक विषाणुच्या संकटात उपासमार न होता जगण्यासाठी सहकार्य करा. शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करा.कोरोना त्याच्या परीने आक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण शासन कर्ती जमात म्हणजे आदर्श कर्मचारी,अधिकार?. त्याविरोधात प्रामाणिकपणे लढत आहात.जर लोकांना योग्य सेवा दिली तर इतिहासत तुमचे नांव सुवर्ण अक्षराने लिहल्या जाईल.आणि कर्तव्यात कामचुकारपणा केला.तर इतिहासात नाही तर गावाच्या शहराच्या चौकात नांवाची चर्चा असेल.समोरून गेला तर एकाच वेळी अनेकांच्या तोंडातून कोणती शिवी निघेल ते सांगता येत नाही.म्हणूनच आज सरकारी नोकरीत आहात म्हणून लोक साहेब म्हणतात उद्या नोकरी गेल्यावर कुत्रा म्हटले नाही पाहिजे.सरकारी कायदे काही असू द्या तुम्ही माणूस म्हणून माणुसकी दाखवा.आज पोलीस,डॉक्टर,नर्स पालिका कामगार कर्मचारी जीवावर उद्धार होऊन कोरोनाशी संघर्ष करीत आहेत.त्यांना सुरक्षा कीट देण्यासाठी मोदींना पैसा व वेळ नाही.पण तिन्ही दलाच्या जवानाना आकाशातून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यासाठी वेळ आणि पैसा आहे.प्रसिद्धी साठी हा माणूस काय काय करणार आहे.शासन कर्ती जमात म्हणजे आदर्श कर्मचारी,अधिकारी यांनी याविरोधात संविधानाच्या चौकटीतून आवाज उचलणे आवश्यक आहे.शासन कर्ती जमात म्हणजे आदर्श कर्मचारी अधिकारी यांना जे संविधानिक अधिकार आहेत.ते मंत्री महोदयांना नाहीत.राजपत्रित अधिकारी संविधानिक अधिकारांचा संघटितपणे वापर करू शकतात.त्यासाठी सकारत्मक विचारांची मानसिकता दाखवणारी माणुसकी जिवंत असणे आवश्यक आहे. कोरोना महामारी पेक्षा मोदी सरकारचे डोके ठिकाण्यावर आणणारी प्रशासकीय यंत्रणेची देशाला गरज आहे. ते काम शासन कर्ती जमात म्हणजे आदर्श कर्मचारी,अधिकारीच करू शकतात.बलाढ्य सत्ता बदलून टाकण्याची ताकद प्रशासकीय यंत्रणेत आहे.हे नेहमी सिनेमात दाखविले जाते कधी सत्यात दाखवा हीच सकारत्मक मानसिकता असणाऱ्या उच्चशिक्षित उच्चपदस्थ कर्मचारी अधिकारी वर्गाना आवाहन आहे.
Attachments area

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा