कोरोना युद्ध नको!. बुद्ध हवा!.
चीन चायना यांनी जगावर महासत्ता गाजविण्यासाठी कोरोनाला जन्म दिला असे बोलले जाते.म्हणजे चायना जगातील सर्व मानव जातीचा तिरस्कार करून शांत कसा राहू शकतो.जगातील मानव नष्ट झाला तर त्यालाही मोठे नुकसान सोसावे लागेल.पण मित्रांचा मित्र तो आपला शत्रू असे समजून चायनाने कोरोना जगात पसरवला असे अमेरिका अध्यक्ष म्हणतात.माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा तो कोणत्याही घटनेचा अर्थ समजत नाही.सर्वच अंधकार दिसतो.तो आपले मानसिक संतुलन गमावून बसतो.तो वाटेल ते बडबडत राहतो.त्याला लोकलज्जा राहत नाही.तो कोणाची हि हत्या करू शकतो.त्यात तो आईवडील,साधू संत कोणाचाच विचार करीत नाही.शेवटी तो आत्महत्या करण्यास मागे पुढे पाहत नाही.चायना विरोधी अमेरीका यांच्या संघर्षात अनेक देशातील मानव जातीचा बळी नाहक जात आहेत. म्हणून कोरोनाचा क्रोध आणि मानवाची शांतता "कोरोना युद्ध नको!. बुद्ध हवा!." असी झाली आहे.
जगात अनेक वस्तुचा शोध लागला त्यामुळे मानव जातीचा मोठा फायदा झाला, पण त्याच बरोबर नुकसान सुध्दा झाले. ती वस्तु म्हणजेच आरसा !. आरशात प्रत्येकचे प्रतिबिंब दिसते आणि जसे आहे तसेच दिसते. मनातील विकार ही आरसात दिसतात.चायना,अमेरिका आणि भारताच्या सत्ताधारी नेत्यांचे कोरोना बाबतचे प्रतिबिंब जगातील मानव जातीला दिसत आहे.कोरोनामुळे जग दुखत असतांना दुख मुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची जयंती ७ मे ला आली आहे. कोरोनामुळे देशात लॉक डाऊन सुरु आहे.जगात एकमेव महामानव आहे की ज्यांचा जन्म,ज्ञान प्राप्ती आणि महापरीनिर्वाण एकाची दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला झाले.त्यामुळे वैशाख पोर्णिमा हा दिवस जगातील १८० देशात राष्ट्रीय उत्सव म्हणून खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
वैशाख पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी वैशाख पोर्णिमा सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि वैशाख पोर्णिमा याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही.प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारा वर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.मोदी भारतात असले कि मनुवादी विचारांचे कट्टर समर्थक असतात.परदेशात गेले कि बुद्ध शिवाय दुसरे नांवच घेत नाही.बुद्धाची संघ शक्ती तिकडे गेल्यावरच आठवते.बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही.ते म्हणतात "संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षा, क्यो की संघ बडा बलवान."
तथागत बुद्धानी वैशाख प्रोर्णिमाला जगाला जो मानव मुक्तीचा मार्ग दाखविला त्यालाच धम्म म्हणतात.धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग त्या मार्गाने जाण्यासाठी पंचशीलाचे पालन केले पाहिजे.पंचशीलेचे पालन आपण केले तर दररोजच्या जगण्यातील अनेक विकार नष्ट होतात.आणि विचार आचरणात आणले तर स्वताचा विकास व कल्याण कोणीच रोखु शकत नाही. ते समजून घेण्या करीता आदर्श आणि प्रेरणा स्रोत समजून घेतले पाहिजे.वैशाख प्रोर्णिमा किंवा बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते. ते समजून घेण्यासाठी धम्मात व धर्मात गुरु शिष्य परंमपरेला खुप महत्व आहे.
एका गुरूच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या त्या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला.हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरु समोर हा आरसा धरला व गुरुच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली,ज्यांना पूर्ण देवाचा दर्जा दिला त्यांच्या मनातहीविकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वाईट वाटले. तो गुरुना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.
रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिता बरोबर हा प्रयोग करून पाहिला.त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन खूप राग आला व तो परत गुरुकुलातील गुरुंकडे धावला.गुरुपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.गुरुनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते.याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.लक्षात ठेवा आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही.म्हणूनच ही वैशाख प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते.
भारतातील बुद्धाच्या धम्माचे ही असेच झाले बुद्धाने सांगितलेल्या धम्माचे पालन न करता ते इतरांच्या धर्मावर सतत टिका टिपणी करीत राहतात.बुद्धाच्या धम्मा बद्धल आलेला सकारात्मक विचार यांच्या आचरणातून व्यक्त होत नसल्यामुळे ते जगातील सर्व श्रेष्ठ धम्माला नकारात्मक दृष्टीने पाहतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली तथागतच्या बुद्ध धम्माची दिक्षा दिली.वैशाख प्रोर्णिमा किंवा बुद्धाच्या धम्माच्या प्रवचनाचा अर्थ समजु शकले नाही. आज ही ९० टक्के लोक पंचशिलेचे पालन करीत नाही. पंचशील म्हणजे काय?. हेच समजत नसेल तर अंमलात आणण्याचा प्रश्नच राहत नाही.त्यामुळेच आंबेडकरी समाजात टोकाचे विकार ठासुन भरले आहेत. त्यात कोणीच अशिक्षित किंवा सुशिक्षित माघार घेण्यास तयार नाही. म्हणुन बुद्ध प्रोर्णिमा व बुद्ध धम्माच्या शिकवणीचा आरसा प्रत्येका जवळ हवा आहे.तो हरविल्या मुळे मातृसंस्था,पिपल संस्था,समता सैनिक दल, रिपाई एकूण आंबेडकरी चळवळ भक्त्त आणि शिष्यात विखुरल्या गेली आहेत.नगरा नगरात हेच चित्र निर्माण झाले आहे.आज प्रत्येका कडे आरसा आहे पण तो त्यात स्वताचे प्रतिबिंब पाहत नाही. इतरा चे मात्र आवर्जुन पाहतो आणि भाष्य करतो.त्यात सत्य लिहण्याची बोलण्याची मांडण्याची हिंमत कोणी केल्यास त्यांचे परिणाम समाजत अतिशय वाईट होत आहेत.त्यामुळे कोणी बोलण्याची लिहण्याची हिंमत करीत नाही.पंचशील लागु होत नसेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्मा मधील कोणते विचार आम्हाला चालतील?. बुद्धाचे विचार आणि शिकवण आरसा सारखी सोबत ठेवावी लागेल.तरच भारत बौद्धमय होईल.
भारत ही तथागत गौतम बुद्धाची जन्मभूमी आहे.बुद्धाचा जन्म कुठे झाला?.लिबूंनी.ज्ञानप्राप्ती कुठे झाली?.गया बुद्धगया महानिर्वाण कुठे झाले ?.कुशीनगर. त्यांचा जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख प्रोर्णिमाला भारतात घडल्या त्यामुळेच त्यांचे भारताचे जागतिक पातळीवर खुप महत्व आहे. भारतातील मनुवादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी येथे तिचे वैशाख प्रोर्णिमाचे महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांतावरून तथागत बुद्ध जगातील सर्वोत्तम महापुरुष मानव प्राण्यांचे मार्ग दाते ठरले.चीन,जपान, व्हियेतनाम, थायलंड,म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर,अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशियासह जगाच्या पाठीवर १८० देशातील बौद्ध धम्म मानणारे लोक हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतात. अनेक देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. सरकारी, निमसरकारी प्रशासकीय यंत्रणेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी वर्ग कोरोनाचा क्रोध शांत करण्यासाठी मानवाला घरात शांततेत बसण्यासाठी सांगत आहेत. "कोरोना युद्ध नको!. शांत बुद्ध हवा!.".
जगात ज्यांनी बुद्धाचा मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांत समजून घेतला ते देश सर्व गोष्टीने वैभवशाली वैभवसंपन्न आहेत.बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते.त्यात प्रत्येक मानवांनी आपली प्रतिमा पाहिलीच पाहिजे. तरच बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आपल्याला समजून घेता येईल.जागरूक वाचकांना माझ्याकडून व लोकप्रिय दैनिकाच्या वतीने वैशाख पोर्णिमा व बुध्द जयंतीनिमित्त हार्दिक मंगल कामना!.सर्वांचे मंगल हो!!!.
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा