शनिवार, २० मार्च, २०२१

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड

 शिवराय ते भिमराय समता मार्च महाड

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना देव करून त्यांचा फक्त जयजयकार करण्याचे काम आर एस एस प्रणित भाजप,संस्था, संघटना, शिवसेना मनसेच्या भटा ब्राम्हणांनी चालविले आहे.त्यात मराठा व महार बौद्ध समाज अलगत अडकत चालला आहे. या दोन्ही महापुरुषांच्या क्रांतिकारी विचाराला आणि कार्यप्रणालीला मूठमाती देऊन जातीजातीत बंदिस्त करण्याचे काम वस्ती पातळीवर जोरात सुरू आहे. चवदार तळे महाडच्या सत्याग्रहातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावुन उभे राहिलेले सहकारी गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे, अनंतराव विनायकराव चित्रे,सुरबा नाना टिपणीस, प्रधान बंधु, संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम सवादकर, आर बी मोरे,शिवराम जाधव,सी ना शिवतरकर, पा न राजभोज,एन टी जाधव हे मुख्य सहकारी होते.यांना ही त्यांच्या जाती बांधवांनी संघटनांनी ब्रहिस्कृत केले होते.त्यावेळी दर्याखोऱ्यातील सर्व जाती पातीच्या मावळ्यांना एकत्र करून रायगडावरून स्वराज्याचा कारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकणातील महाड चवदार सत्याग्रहाची किती झळ पोहचली होती.
शिवरायांच्या रयतेच्या राज्यात जातीव्यवस्था तीव्र नव्हती.नंतरच्या काळात पेशव्यांनी शुद्रा अतिशूद्रांचे जिने हराम केले.त्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नव्हते. म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला.हा चवदार तळ्याचा इतिहास नव्याने सांगण्याचे काम विचारांचा जागर व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या किर्याशील कार्यकर्त्यानी संकल्प जाहीर केला आहे. १९ मार्च १९२७ ला महाड मध्ये काय घडले होते त्यात कोण कोण सहभागी जाते.त्यांची आठवण म्हणून २०१८
 
ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघाला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित बहुजन समाजासाठी सत्याग्रह केला. यंदा या सत्याग्रहाला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी लाखो लोक महाडला दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. कारण कोरोना महामारीची भितीमुळे लॉक डाऊन कडक करण्यात आला आहे.सरकारने कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उध्दभवलेली परिस्थिती विचारात घेता प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानणाऱ्या समाजाचे त्या आदेशानुसार वागणे नैतिक जबाबदारी आहे.
१९ मार्च २०१८ ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघाला होता.२० मार्चला लाखो लोक दरवर्षी येतात, पण १९ मार्चला काय झाले होते यांची माहिती घेत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकरानी आजच्याच दिवसी २० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजाती साठी खुले केले.केवळ महार जाती साठी चवदार तळे नव्हते.डॉ बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराने चवदार तळाच्या पाण्याला हात लावताच आग लागली. ती महाड मध्ये सुरु झालेली आग राज्यातून देशभर पसरली.ते क्रांतिकारी वैचारिक संघटन कैशल्य आज कोणत्याही नेत्याकडे नाही. शिवराय ते भिमराय समता मार्च १९ मार्च २०१८ ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघाला होता.त्यात मराठी साहित्य संमेलनात क्रांतिकारी विचार मांडून वैचारिक खळबळ निर्माण करणारे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सकाळ समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे, प्रा.अंजली मायदेव कर्वे इन्स्टिट्यूट पुणे,फारूक अहमद सुराज्य सेना प्रामुख्याने उपस्थित राहिले होते.
१९ मार्च १९२७ च्या सत्याग्रहात ज्यांनी सहभाग नोंदविला होता त्यांचे नातु पणतू पण सहभागी झाले होते.त्यात उल्का महाजन,मधुकर गायकवाड, मिलिंद टिपणीस,श्रीप्रकाश अधिकारी, आरिफ करंबेळकर, सुभाष वारे, युवराज मोहिते,अनिता पगारे,ललित बाबर,सुरेश सावंत,अविनाश कदम,भूषण सिसोदे, नागेश जाधव,कालीदास रोटे प्रदिप शिंदे सागर तायडे असे विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.आणि एक नवी वैचारिक चर्चा घडविण्याचा प्रयत्न झाला होता. २०१९ ची लोकसभा निवडणूक. २०२० ची कोरोना महामारी आणि आता २०२१ चा पुन्हा लॉक डाऊन यामुळे शिवराय ते भिमराय समता मार्च महाड
 चवदार तळे ही वैचारिक चर्चा त्यामुळे थांबली असली तरी ती महाराष्ट्रातील सत्तातरांत शिवसेनेचे शिवसैनिक आणि राज ठाकरे यांची मनसे सैनिक यांना आता खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य याची वैचारिक ओळख झाली असावी कारण त्यांना काल पर्यंत गोब्राम्हण पतीपालक शिवाजी शिकविला गेला होता. सर्वजाती धर्मावर निस्वार्थ प्रेम करणारा रयतेचा राजा त्यांना कधी सांगितला गेला नव्हता.

मराठा समाजाच्या तरुणाच्या डोक्यात मुस्लीम तिरस्कार प्रचंड भरला गेला होता.त्यांच्या हाताखाली ओबीसी मागासवर्गीय तरुण कायमस्वरूपी तोडफोड दंगली करण्यासाठी वापरला जात होता.चवदार तळ्याच्या सत्याग्रहात रायगड पाचाड ते महाड मधील सर्व मावळा सहभागी होता.रायगडाच्या कोकणातील सुपीक जमिनीत जातीजातीचे बीज छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांनी कधीच येऊ दिले नव्हते. दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या बारा बुलतेदाराना निसर्गाचे पाणी पिण्यासाठी कुठे ही संघर्ष करावा लागला नव्हता हा इतिहास आहे.मग महाडच्या चवदार तळ्याचे पाणी किंवा राज्यातील सर्वच सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा हक्क नाकारणारे कोण होते.हा इतिहास शिवसैनिक मनसे सैनिकांनी वाचणे खूप आवश्यक आहे
.
 शिवराय ते भीमराय समता मार्च चवदार तळे ही वैचारिक चर्चा घडवून आणली पाहिजे.आपण सहभागी होऊ शकत नसलो तरी यावर व्यापक चर्चा घडवुन शिवराय ते भिमराय समता कशी प्रस्थापित करता येईल यांचा विचार करूया. कोणती ही दळणवळणाची साधन नसतांना ज्यांनी या सत्याग्रहात सहभाग घेऊन यशस्वी संघर्ष केला त्या सत्यगृहींना कोटी कोटी प्रणाम!!!.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा