माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
माणसाच्या आयुष्यात अनेक आनंदाचे दिवस एकदाच येतात.ते परत परत येत नाही,पण त्यांचा मनापासून आनंद घेतला तर ते पुन्हा पुन्हा येऊ शकतात.पण त्यांचा आनंद घेता आला पाहिजे आणि देता आला पाहिजे.प्रत्येक माणसांचे जन्मपासून मुत्यु पर्यंत नाम करण,बारसे,लग्न,आईबाबा होणे, मुलगा,किंवा जावई होणे नंतर सासू सासरे होणे, आजीआजोबा होणे एकदाच होते.पण त्यांचा आनंद घेता व देता आला पाहिजे.म्हणूनच माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी नेहमीप्रमाणेच ते शब्द माझ्या मनात आणि बोटं कीबोर्ड वर फिरू लागले त्यामुळे शब्दांना शब्द जुळून वाक्य बनु लागले.कोणत्याही प्रकारच्या कामांची पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही कां असू नये ?. आणि ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुकस्पद असेलच या अर्थाने नसावी.कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकते.ह्या पोचपावतीचे प्रत्येकाच्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आई- बाबा असतात.
घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला,कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसे आवर्जून सांगतात "छान झाला बर का आजचा कार्यक्रम" आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला त्यांना अजून उत्साह येतो. सुनांसाठी सासु सासऱ्यांनी दिलेली पोचपावती एकत्र कुटुंबाच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी असते.
एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच appreciation देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कस हसू फुलते.घरातील कामवाली गजरे,फुल घालून आली तर अनेकांना खूप राग येतो,पण ती तिची आवड म्हणून ती गाजर,फुल लावत असेल तर तुम्हाला राग येण्याचे काम काय?. उलट ती मोठा गजरा घालून कामांवर आली की घरातील माणसांच्या तोंडून उस्फूर्तपणे निघाले पाहिजे की काय मस्त दिसतेस ग!.चल एक फोटो काढते तुझा!" त्याच प्रकारे आपला वाहन चालक दाढी करून चांगले कपडे घालून आला तर त्याच्याकडे कौतुकाने पाहून बेस्ट म्हणा ह्याने सुद्धा ते नोकर खूप खुश होतात.त्यामुळे त्यांची काम करण्याची ऊर्जा वाढते.त्यांना न सांगितलेले काम ते न सांगता करून जातात. हीच असते माणसांनी केलेल्या कामांची पोच पावती.
घरातील,परिसरातील कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यां पर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.गांवी एक प्रसिद्ध म्हण आहे त्याला हरभऱ्याच्या झाडांवर चढवले आणि सर्व कामे करून घेतली.सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांच्या हातून चांगले काम करून घ्याचे असेल तर त्या तरुणांची सर्वासमोर थोडी स्तुती करा त्यांच्या कामातील कला कौशल्याची कौतुकास्पद आपसात चर्चा करा.त्यामुळे त्या तरुणांचा काम करण्याचा उत्साह निश्चितच वाढतो.मग ती सहभागी असलेल्या सर्वांच्या साठी चांगली आठवण राहतो. करीता माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
एखादं कामाचे मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात "छान निबंध लिहिलंस हो" अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असं काही नाही.कधीतरी आपल्याच दुकानदाराला ही म्हणावं "काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या दुकानातुन घेतलेले" सामान्य माणसांपासून अगदी कलाकारां पर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायला ही वयाच बंधन कधीच नसाते.काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात,पण तरीही अधूनमधून त्यांच्या आठवणी नक्की आनंद देऊन जातात.
बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही.तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त,तितकीच जास्त खरी असावी. माणसांची पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर कधी डोळ्यातून,कधी कृतीतून,स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी असावी.कधी योग्य आदर ठेवून,कधी गळा मिठी मारून,अगदी कधी "च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या" अशी वेगळ्या भाषेतून ही यावी.माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त,महत्वाचे म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत मस्त मित्र हवा.ह्या पोच पावती ने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते,उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो.आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही फक्त मोकळं व स्वच्छ मन! हवे असते.म्हणूनच माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
नारायण हरी भिडे मुक्काम पोस्ट खुमगांव बुर्ती,तालुका नांदुरा,जिल्हा बुलढाणा माझ्या साडूच्या घरा जवळ एक गाय वासरू बांधलेले होते.माझे नातु खूप दिवसांनी गांवी गेल्यामुळे ते त्या गाय वासरांना दुरून पाहत होते,आणि गाय वासरू त्यांना कान वर करून डोळे मोठे करून,शेपटी आत मध्ये घेऊन पाहत होते.मी त्यांच्या जवळ गेलो त्यांच्या अंगावरून शिंगा वरून तोंडावरून हात फिरवत गोंजारत होतो. त्यांनी त्यांची पोच पावती आनंदाने स्वीकारून दिली.हे होते स्पर्शाने व्यक्त केलेले प्रेम, त्यांच्या डोळ्यातील आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. कळत न कळत हे व्यक्त झाले.म्हणूनच माणसांकडून मुक्या प्राण्याकडून माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.हा निसर्गाचा नियम आहे.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा