सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल ?.
देवनामप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्सवात आणि प्रमाणत का साजरी होत नाही. भारतात अनेक महापुरुषाच्या जयंती मोठया उत्साहात साजऱ्या केल्या जातात, पण दि ग्रेट अशोक सम्राटाचा सम्राट म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी केली जात नाही.तिथीनुसार तारखेनुसार,काल गणना नुसार असे अनेक वाद महापराक्रमी, राजे,महापुरुष आणि संतांच्या बाबतीत उपस्थित केले जातात त्यामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारापासून प्रेरणा घेण्यापासून रोखण्याचा हा खरा मुद्दा असतो.माननीय देवदास बानकर संपादक दैनिक मुक्तनायक कोल्हापूर यांनी सम्राट अशोकाच्या काळाचा अभ्यास करून १२ एप्रिल ही तारिक सम्राट अशोक जयंती आहे असे अकरा वर्ष ज्याचे समर्थन केले होते.त्यांनीच आता सम्राट अशोक जयंती (अशोक अष्टमी ) चैत्र महिन्याच्या अष्टमी दिनी अर्थात बुद्धाब्द शक वर्षातील येणाऱ्या तारखेप्रमाणे येत्या बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी असणार असे सांगितले आहे.धम्म दायक सम्राट राजा यांचा जयंतीची अशोक अष्टमी नोंद ही सुर्याकालगणनेवर आधरित ग्रगेरीन कॉलेनडर ख्रिस्ती शकातील तारखेप्रमाणे १२ एप्रिल धरण्यात आली होती.बुद्धाब्द शकाप्रमाणे याच दिवशी सम्राट अशोक जयंती अर्थात अशोक अष्टमी साजरी करणे योग्य आहे.कारण अडीच हजार वर्षा बुद्धाब्द शक हे चंद्रकालेगणनेवर मोजले जाते.आजही ती परंपरा कायम आहे.त्यात बदल केलेला नाही आणि बदल करता येत नाही.म्हणूनच ख्रिस्ती तारखेवर न जाता बुद्धाब्द शक नुसार सम्राट अशोक जयंती साजरी झाली पाहिजे.देवदास बानकर सह अनेक अभ्यासकाचे मत आहे.सम्राट अशोक यांचे विशाल साम्राज्य होते ज्याला अखंड भारत म्हणतात, सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला.तक्षशीला,नालंदा सारखे 23 विश्व विद्यालय स्थापना केली,या विद्यालयामध्ये देश -विदेशातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येतं असत. सम्राट अशोकचा कालखंड हा सुवर्ण कालखंड गणला जातो. भारतीय राष्ट्र ध्वजावर सम्राट अशोकाचे राजचिन्ह अशोक चक्र अंकित आहे. भारतात सम्राट अशोक पूर्वी व नंतर सम्राट अशोक सारखा सम्राट झाला नाही. तरीही या देशात सम्राट अशोकाची जयंती किंवा त्यांच्या नावाचा प्रचार -प्रसार होत नाही, यावर्षी पासून सम्राट अशोक जयंती साजरी करण्याचा संकल्प अनेक संस्था,संघटना मंडळ पुढाकार घेणार आहेत.
सम्राट अशोक जयंती हा एक सण व उत्सव आहे जो चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व ३०४ बिहार व निर्वाण (निधन) इसवी सन पूर्व २३२ मध्ये झालेले आहे. हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात.चक्रवर्ती सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इसवी सन पूर्व २७२ ते इसवी सन पूर्व २३२ च्या दरम्यान राज्य केले. यांना महान अशोक किंवा अशोक द ग्रेट असेही संबोधले जाते. हा भारतीय समाजातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण,पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूर पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.अनेकांच्या मतानुसार,सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून सम्राट अशोकाला स्थान दिले आहे.तरी त्यांच्या महान कार्यांची नोंद घेऊन जयंती उत्सव का साजरा केल्या जात नाही.हाच खरा संशोधनाचा विषय आहे.प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये रामायण,महाभारत इत्यादी आहेत प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.म्हणूनच मान्यवर कांशीराम आपल्या कॅडरबेस कार्यकर्त्यांना नेहमी सांगत होते बहुजन समाज पार्टीला सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे.अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले.बसपाला मानणारा बहुसंख्य बहुजन समाज भारताच्या कोण्या कोण्यात बसलेला आहे.उत्तर भारतातील बहुसंख्य ओबीसीनी मुंबईत व नागपुरात धम्मदिक्षा घेतली,ज्यात मौर्य समाजाचे मोठे योगदान आहे,मौर्य समाज हा सम्राट अशोकाच्या रक्ताचा वारसदार आहे असे म्हणतात पण तो मोठ्या संख्येने हिंदुत्व मानसिकतेने पछाडलेला होता आणि आहे.लडाक,जम्मू,काश्मीर मध्ये बसपाचा आमदार,खासदार निवडून येण्या मागे सम्राट अशोकाचा भारत ही विचारधाराहोती.पाकीस्थान,अफगाणीस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडील केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारा नंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. ते सम्राट अशोकाने करून दाखविले. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला आताचे बिहार म्हणजे तेव्हाचा मगध होता, बिहारची राजधानी पाटणा म्हणून ओळखली जाणारी तेव्हाची पाटीलपुत्र ही त्याची राजधानी होती.याचे एतिहासिक पुरावे आज पटना शहरात पाहण्यास मिळतात.कलिंगाच्या युद्धात झालेल्या प्रचंड मनुष्य हानी पाहून सम्राट अशोकाने हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौध्द धम्मचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता समर्पित केले अशोकाच्या काळातील अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवले. त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग,सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती,घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले,व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती,अहिंसा, प्रेम,दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धम्माचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले अशी कलिंगाचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते.बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात.तरी उत्तर भारतातील मागासवर्गीय ओबीसी बौद्ध धम्माकडे न जाता स्वतःला जास्तच सवर्ण समजत होते.जेव्हा अन्याय अत्याचार आणि भीषण हत्याकांड झाली तेव्हाच त्यांना आपण कोण आहोत आणि आपले पूर्वज कोण होते यांची आठवण होते.त्यांनी लोकसंख्येच्या बळावर राजकीय परिवर्तन घडविणे अपेक्षित असते.मान्यवर कांशीराम यांनी बौद्धधम्माची दिक्षा जाहीर पणे घेतली असती तर उत्तर भारत सम्राट अशोकाचा भारत झाला असता.त्यांची चूक उत्तर भारतातील ओबीसीनी सुधारली आता मायावतीने कोणाचा आदर्श घ्यावा हे ठरविले पाहिजे. किती दिवस आर एस एस प्रणित भाजपाला धर्मपरिवर्तनाच्या धमक्या देणार?. आणि राजकारण करणार करीत राहणार?.सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय करण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी तयार आहे हे देशातील धम्मदिक्षा सोहळ्यावरून दिसत आहे.इतिहास सांगतो वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धम्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला आहे.मायावतीने असेच बुद्ध सम्राट अशोक,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज डॉ भिमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगून ऐतिहासिक वास्तू जिल्हे, विद्यापीठ निर्माण केले. पण धम्मदिक्षा घेतली काय?.सम्राट अशोकाने आपल्या कारकिदीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणार्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवर ही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे,असे मानतात.आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर लोक अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली,अहिंसा,सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता,वडिलधार्या माणसांना मान देणे,संत,महात्मा,शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये,चोल साम्राज्ययाच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस,इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते. मग सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय होण्यास वेळ का लागतो. राजकीय गणिते मांडत राहिल्यास अशोकाचा भारत बौद्धमय होईल काय?. हे देशभरातील भव्य धम्मदिक्षा सोहळे केवळ ढोंग आहेत असे म्हणल्यास चूक ठरणार नाही. आज देशात लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून लोकशाहीचा सरळ खून करण्याचे कारस्थान उघड उघड होत आहे. लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवुन ठोकशाही,हुकूमशाही निर्माण होतांना दिसत आहे. सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांना ज्या मनूस्मृती संपविले त्याचं पद्धतीने आज लोकशाही संपत आहे.म्हणूनच विचारावेसे वाटते सम्राट अशोकाचा प्रबुद्ध भारत कसा निर्माण होईल.सम्राट अशोकाचे समाजो उपयोगी विचार अंमलात आणले नाही.तर विषमतावादी विचारांचे लोक डोके वर काढून समाजोपयोगी विचार नष्ट केल्या शिवाय राहणार नाहीत.आज तरी भारतात हेच घडताना दिसत आहे.म्हणूनच सम्राट अशोक जयंती निमित्याने त्यांच्या विचार कार्यावर चर्चा संवाद होणे आवश्यक आहे.सम्राट अशोकाच्या जयंती निमित्याने त्यांच्या क्रांतिकारी विचारांना कार्यांना त्रिवार अभिवादन आणि सर्व प्रिय वाचक,धम्म उपासक उपासिका यांना हार्दिक शुभेच्छा. सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई ९९२०४०३८५९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा