शुक्रवार, २६ मे, २०२३

कॉम्पुटर आणि स्मार्ट मोबाईल मुळे माणस स्मार्ट झाली का ?.

 कॉम्पुटर आणि स्मार्ट मोबाईल मुळे माणस स्मार्ट झाली का ?.




    अमेरिकेत देव नाही,ना मठ नाही,पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे.गेल्या 200 वर्षात दुष्काळ नाही.कुठले होमहवन नाही,ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही,ना अनुष्ठानं नाही.हरिनाम सप्ताह नाही,ना पारायणे नाहीत.अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत,कशाचीच कमतरता नाही.माणशी 2876 वृक्ष आहेत.भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेतआपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे असे म्हटल्या जाते.पण एकही भारतीय झाड लावत नाही.विशेष उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा आणि त्या झाडाला जपत सुद्धा नाही.अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं एक ही घर किंवा बंगला दिसणार नाही. त्यांनी घरा घरात कॉम्पुटर वायफाय स्मार्ट मोबाईल वापर करून जग जवळ आणले आहे
      भारतात बहुसंख्ये लोकांच्या दारात झाड नाही.तर फार हिरवळ कुठली?.स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली.साधं पिण्याच शुद्ध पाणी देवू शकत नाही.सर्वच देवाच्या भरोशावर आणि सरकारच्या मर्जीवर अवलंबून. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे.आणि लोकसंख्या आहे 31 कोटी. तर भारताची आहे 135 कोटी.35 कोटीची 135 कोटी झाली. फक्त 80 वर्षात.एवढीच जबरदस्त प्रगती आहे. इथे हजारो जाती,सतराशे साठ धर्म. कुणाचाच कोणाला मेळ नाही.प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा.आणि तरी योग्य वेळी सर्वच म्हणतात "गर्वसे कहो हम हिंदू है!." आणि देवाच्या आरत्या स्मार्ट मोबाईलवर होत आहेत.
     एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले.तरी एकएकाला 4-5 लेकरं.कुत्र्यावाणी भटकत आहेत रस्त्यावर,ना शिक्षण ना संस्कार.ना आचार,ना शिस्त,सगळं बिनधास्त. आणी मस्त. आताच पिण्यास पाणी नाही. तर पुढे काय?. कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही.निसर्गाची चाड नाही.नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत. तेहतीस कोटी देवाचे नांव घेऊन प्रार्थना केल्या जात आहे.ईश्वराशिवाय कुणी महान नाही.हे ऐकुण ऐकुण हजारो वर्ष झाली.दरवर्षी तेच. पाऊस नाही पडलाच तर पिकाला भाव नाही.शेतकरी पाऊस पडला तरी आत्महत्या करतो. नाही पडला तरी आत्महत्या करतो.सगळंयाना आरक्षण पाहीजे म्हणता म्हणता आरक्षण शंभर टक्के होण्याची वेळ आली. ज्यांचे सर्वच क्षेत्रात शंभर टक्के आरक्षण आहे तोच इतरांना काही मिळनार नाही.अशी यंत्रणा उभी करते. म्हणूनच कॉम्पुटर वायफाय स्मार्ट मोबाईल मुळे माणस स्मार्ट झाली का ?.असा प्रश्न उभा राहतो.
     वित्तमंत्री सितारामन यांनी संसदेत सांगीतले देशातील 1 लाख 60 हजार कंपन्या बंद झाल्या,सहाकोटी लोक बेरोजगार झाले. नोकरयांच नाही.तर आरक्षण घेवून काय चाटायचे. आता नोक-याच बंद होत आहेत.आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची ताकद नाही.मॅचच फिक्स असेल.तर खेळायचेच कशाला.जनता दिशाहीन झाली आहे.स्वप्न राखेत मिसळली आहेत.संविधान नावांला उरले आहे.प्रचंड महागाई ने जनता मरणप्राय झाली आहे.तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर वाढवतच आहे.दवाखाने  कुटूंबाचे दिवाळं काढत आहे.जनतेला लुटण्यासाठी लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य गिधाडे सरसावली आहेत.चिंता व ताणतणावाने अर्धा भारता मधुमेह ग्रस्त झाला आहे.तीस टक्के लोकांना रक्तदाब आहे. शेतात काम करायला मजूर नाही.अंगमेहनतीला माणुस नाही.सगळे बिनकामाची माणसं आहेत.गावा गावात कॉम्पुटर वायफाय स्मार्ट मोबाईलमुळे जग जवळ येत आहे.आणि माणसातील माणुसकी दूर जाता आहे.नवरा साहेब व बायको मॅडम झाल्या आहेत.स्वयंपाकाला बाई,भांडी व धुण्याला बाई. तरी मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे.आणि साहेबांना टेकल्याशिवाय बसता येत नाही.
   कुंभ मेळ्यात दहा हजार सुशिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी साधूची दिक्षा घेतली होती. आणि आता रस्त्यावर भटकत आहेत.विरक्त झाले आहेत.लग्नाचे वय टळून गेले आहे.बायका मिळत नाहीत.गांवागावांत किमान चाळीस पन्नास पोरं पोरी बिन लग्नाची आहेत.भयंकर विदारक परिस्थिती आहे.स्मार्ट मोबाईलवर मैत्री जुळते आणि तुटते त्यामुळे जग जवळ येत आहे असे म्हणतात.जगातील वेगवेगळ्या देशाची माहिती मिळत आहे.पण तिकडे रीतीरिवाज परंपरा नाहीत,तर दिवसागणिक नवीन शोध घेऊन आचरण आहे.त्यामुळेच स्मार्ट मोबाईल वेगवेगळ्याप्रकारांचे बनविल्या जातात.किती ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी, एरोस्पेस अभियांत्रिकी आणि नौदल आर्किटेक्चरसह, वाहन अभियांत्रिकीची एक शाखा आहेत, ज्यामध्ये यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक,सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अभियांत्रिकीचे घटक समाविष्ट आहेत जे मोटरसायकल,ऑटोमोबाईल्स आणि ट्रक आणि त्यांच्या डिझाइन, उत्पादन आणि ऑपरेशनवर लागू होतात.आपल्याकडे सुद्धा हे कॉम्पुटर वायफाय,स्मार्ट मोबाईल आधुनिक तंत्रज्ञान आले आहे.पण त्याची सत्यनारायण महापूजा घातल्या शिवाय ते चालू करणे मोठा अलिखित अपराध आहे.म्हणूनच देशातील माणसं कॉम्पुटर वायफाय, ३ जी ,४ जी स्मार्ट मोबाईल वापरून स्मार्ट झाली नाही.रीतीरिवाज परंपरा त्यांना हे करायला मुभा देते पण अट एकच असते त्याची सुरवात भटा ब्राम्हणांच्या हस्ते पूजा दक्षिणा देऊन झाली पाहिजे.
    बाराही महिने बाजारात फळे बळेच पिकवून विकत आहेत. मराठी शाळा बंद पडल्या आहेत.मुलांना धड इंग्रजी येत नाही.आणि मराठी येत नाही.मराठी इंग्लिश मिक्स बोलत आहेत.टिव्ही वरच्या मालिका फालतू झाल्या आहेत.महिला गुन्हेगारी  वृत्तीच्या जास्त दाखवत आहे.मुलं लहान पणा पासूनच हिसंक होत आहेत.13 व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत.सरकारने कायदा काढला होता,१८ वर्षा नंतर लग्न झाले पाहिजे.आता त्यात बदल करून मुलामुलीचे लग्नाचे वय २१ वर्षे केले.मुलमुली १४/१५ वर्षाची झाली की लग्ना नंतर जे करायला पाहिजे ते सर्व अगोदर करून मोकळे होत आहेत.त्यामुळे आईवडील भावांना जातीची खानदानची इज्जत गेल्याचे वाटून खून करण्यात येत आहे.कायदे अनेक आहेत पण अंमलबजावणी प्रभावीपणे नाही. कारण स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत असले तरी माणसं स्मार्ट बनतांना दिसत नाही.
     देशात दारू कितीही महाग केली तरी त्यासाठी रांगा लागत आहेत.ती घेणे प्रतिष्ठेची झाली आहे.आणि प्रार्थना स्थळे बहुजन समाजाला लुटीची ठिकाणं झाली आहेत.वृद्धाआश्रमाची संख्या झपाट्याने वाढत आहेत.तो एक मोठा व्यवसाय होवू पहात आहे.आईला बाळासाठी वेळ नाही.पाळणाघरे वाढत आहेत. लेका-सुनांना सासुसासरे नकोत.अनाथालये वाढत आहेत. माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत. खोटं बोलणच खरं मानलं जात आहे.चोरांना लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे.सज्जनांना वेडयात गणले जात आहे.धर्मसत्ता आणि राजसत्ता हेच अधिकृतरीत्या करीत आहे.
    लोकशाही समता बंधुता स्वातंत्र्य हे फक्त वाट्सअपचे संदेशा पुरतीच मर्यादित झाली आहे.चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत. प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे.तरी आज काही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत.तर काही सुना सासु सासऱ्यांना घराबाहेर काढत आहेत.समाज व समाजातील वरिष्ठ नागरिक मजा पाहत आहेत.समाजाची भिती राहिल्या नसल्यामुळे लोकलज्जा राहिली नाही. एकंदरीत भारत विस्फोटाच्या व उद्रेकाचा ज्वालामुखी बनत आहे.भारत मानवी वस्तीसाठी धोकादायक होत चालला आहे.वेळीच सावरलो नाही.तर आपल्या वारसांचे जीवन प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडनार आहे.हे मात्र नक्की.स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत आहे तर नातेवाहिक दूर जात आहेत.म्हणूनच देशातील माणसं कॉम्पुटर वायफाय ३ जी ,४ जी स्मार्ट मोबाईल वापरून स्मार्ट झाली पाहिजे.भय,भिती आणि भूक रीतीरिवाज परंपरा जो पर्यंत सोडून देत नाही. तो पर्यंत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून कायम आचरणात आणले जाणार नाही.आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून आचरणात आणले तर भय,भिती आणि भूक मिटून जाईल.
 सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले.

 बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले.



     भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम कायद्याला जन्मा दिला.त्याला कंत्राटी कामगारांच्या भल्यासाठी असा दिशाभूल करणारा प्रचार करण्यात आला.सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कारखाने,कंपनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कामगारांची जबाबदारी राहील असे सांगून सर्वांनीच आपली मुख्य जबाबदारी टाळली.त्यामुळेच आता बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले.
    कोरोनाच्या संकटाने शेकडो बिल्डर व ठेकेदारांनी आपली जबाबदारी टाळून असंघटित इमारत बांधकाम कामगार मजदूरांना व इतर कामगारांना काम बंद आहे जागा खाली करा गांवी जा ही जबाबदारी टाणारी भूमिका घेतली, त्याला पोलीस,कामगार आयुक्तालय, मंत्रालयाने मूक संमती दिली म्हणूनच मोठ्या संख्येने असंघटित कामगार रस्त्यावर उतरून गांवी जाण्यास मजबूर झाला.रडत बसण्यापेक्षा संघर्ष करण्याची त्याने थोडी हिंमत दाखवली असती,तर बिल्डर,ठेकेदारांना त्यांच्या पुढे गुडघे टेकून बसण्याची पाळी आली असती. असंघटित कामगारांच्या समस्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियनचे संघटित पणाची संघशक्ती न समजणाऱ्या असंघटित कामगारांचे मोठे नुकसान झाले होते. आता त्याचीच पुनर्वती बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण झाले असे म्हणता येईल.
    बिल्डर व ठेकेदारीचे समर्थन करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली दिला होता. या निर्णया विरोधात राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी जायाला पाहिजे होते पण 12 राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन व एक अंतर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन सि एफ टी यु आय यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली नाही. या मागचे खरे कारण काय असेल तर बहुसंख्य मागासवर्गीय कामगारांचे जाती व्यवस्था नुसार कायमस्वरूपी आर्थिक शोषण होत राहावे. याचे वैचारिक समर्थन होय.यामुळे प्रत्येक वेळी सरकारी, निमसरकारी खाजगी कारखान्यात कंपन्यांच्या आत चालणारे कायमस्वरूपी काम प्रत्येक वर्षी ठेकेदार बदली केल्या मुळे कामगार ही बदलावा लागतो. त्यामुळेच ठेकेदारी पद्धतीने काम करणारा कोणत्याही कामगार कोणत्याही सरकारी निमसरकारी खाजगी कारखान्यात,कंपनीत कायमस्वरूपी कामगार राहू शकत नाही. युनियन बनवु शकत नाही हा देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एसटी, आदिवासी भटक्या जाती जमाती आणि अल्पसंख्याक समाजाच्या कामगारांवर अन्याय करणारा निर्णय झाला होता. या विरोधात स्वतंत्र मजदूर युनियन बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगारात प्रबोधन करून जनजागृती करीत आहे.जे मागासवर्गीय बहुजन समाजातील कामगार या जातीव्यवस्था समर्थन करणाऱ्या ट्रेंड युनियन चे वार्षिक सभासद आहेत त्यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करून आपण कोणाचे व कोणत्या विचारधारेचे समर्थन करतो ते आज पर्यंत त्याने ठरविले नाही.महापुरुषांच्या नांवाचा जयजयकार करणारा बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी,एस.सी,एस.टी,भटका विमुक्ता, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज सर्वच क्षेत्रात शैक्षणिक,सांस्कृतिक,कला क्रिडा,धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या असंघटित म्हणूनच ओळखला जातो.
      सरकारी निमसरकारी व खाजगी कारखान्यात,कंपनीत स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे ठेकेदार बदली झाला तरी कामगारांना कामावरून कमी करू नये अशी राज्य व केंद्र सरकारने सुरवातीला भूमिका घेतली होती.त्यावेळी भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य असे जनआंदोलन देशभरात उभे राहिले होते. त्यातूनच अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्षाचा जन्म झाला.पुढे राजकिय सत्ताधारी भांडवलदारांच्या फंडिंगवर निवडणूक लढवुन निवडून येत असल्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या प्रणित कामगार संघटना,ट्रेंड युनियन सत्ताधाऱ्यांच्या किंवा सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात न जातात केवळ रस्त्यावरील आंदोलने करून कामगारांची दिशाभूल व फसवणूक करीत आले आहेत.राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही इंटक प्रणित गिरणी कामगारांची युनियन होती.त्यांच्या पक्षाचे अनेक राज्यात व केंद्रात सरकार होते तरी मुंबई व देशातील गिरण्या बंद झाल्या व त्यांच्या जमिनीवर टोलेजंग टॉवर उभे राहून लाखो गिरणी कामगार उध्वस्त झाला. म्हणूनच बहुसंख्य कामगार ट्रेंड युनियन इंटक व राष्ट्रीय पक्षा पासुन दूर गेला.त्या पक्षाची परिस्थिती ना घरका ना घाटका अशी झाली आहे.
   स्वतंत्र मजदूर युनियन गेल्या सतरा वर्षा पासुन बहुजन समाजातील मागासवर्गीय कामगारांना सांगत आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 12 व 13 फेब्रुवारी 1938 साली रेल्वे गँग मन कामगारांच्या दोन दिवशीय कामगार परिषद समोर सांगितले होते की मागासवर्गीय समाजाच्या कामगारांनी स्वतःची ट्रेंड युनियन लवकरात लवकर स्थापन करून तिला स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियनशी संलग्नता स्विकारावी असे सर्व क्षेत्रातील मागासवर्गीय कामगारांना आवाहन केले होते. आज पर्यंत लाखोच्या संख्येने मागासवर्गीय कामगार,कर्मचारी अधिकारी जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियनला वार्षिक वर्गणी देऊन आर्थिक दृष्ट्या मजबूत करतात.ते संघटीत कामगारांना असंघटित कामगार करणाऱ्या कंत्राटी कामगार कायद्याचे समर्थन करून पुन्हा जाती व्यवस्था स्थापना करण्यासाठी मदत करतात असे लिहले व म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण केंद्र,व राज्य सरकारने जाहीरपणे बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरणचं केले.वस्त्रहरण केले ते एका अर्थाने खुप छान झाले.प्रत्येक संस्था,संघटना,पक्ष,कार्यकर्ते नेते,शेठ,सावकार,सर्व समाजातील माणसांना कामगारांना कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना एक प्रकारचा हिंदू असल्याचा गर्व चढला होता. आता बहुसंख्य बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्यात येणारा कामगार, कर्मचारी अधिकारी हा हिंदू नसणार आहे.तो फक्त शोषित असणार आहे.मग तो मराठा,मागासवर्गीय ओबीसी नसणार आहे. शोषण करणाऱ्यांची आणि शोषितांची जात,धर्म एक असू शकत नाही.ज्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील बारा ट्रेंड युनियन महासंघाचे नांव वेग वेगळी असली तर ध्येय उदिष्ट एकच होते.ते आज शंभर टक्के सिद्ध होतांना दिसत आहे.
     राष्ट्रीय पातळीवर बारा ट्रेंड युनियन महासंघ आहेत, तरी कामगारांच्या अनेक समस्या आज जशाच्या तसा आहेत त्या सोडविण्यासाठी ट्रेंड युनियनने सनदशीर मार्गाने लढण्याची तयारी करण्या ऐवजी अयोध्या मध्ये राम मंदिर बांधकाम करण्यासाठी आंदोलन उभारण्यासाठी ट्रेंड युनियन संघटनानां पक्षांना आर्थिक मदत करतात.पण सामाजिक सुरक्षितता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यावर भर देत नाही. सामाजिक सुरक्षिततेचे कायदे जन्माला येण्यामागे एक दूरदृष्टी होती.सेवा निवृत्तनंतर कामगारांना उर्वरित जीवन सन्मानाने सुखा समाधानाने जगता यावे यासाठी ही सामाजिक सुरक्षितता कायदे झाले.आज देशात ९३ टक्के कामगार असंघटित आहेत. त्यात ३८ करोड असंघटित कष्टकरी कामगारांची कंत्राटी कामगार म्हणून नोंद असतांना केवळ दहा टक्के कामगारांना सामाजिक सुरक्षितता कायद्याचा फायदे मिळत आहेत तर ९० टक्के कामगार हे या लाभा पासुन वंचित आहेत.हे सरकारच्या जबाबदार अधिकाऱ्याने दिलेली माहिती आहे.
     देशातील संघटीत असंघटित कामगारांना न्याय हक्क व प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ४४ कायदे चार कोड बिलात रूपांतर करून झाले आहेत.त्यांचे बिल संसदेत पडून आहे असे सांगितल्या जाते पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी सार्वजनिक उधोग धंद्यात सुरू झाली आहे.रेल्वे स्टेशनवर काम करणारा सफाई कामगार,सुरक्षा रक्षक,मेल एक्सप्रेसच्या डब्यात पाणी भरणारा कामगार, कारखान्यात काम करणारा इतर कामगार हा मोठया प्रमाणात कंत्राटी कामगार भरल्या जात आहे.त्यावर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी ज्या शक्तीने लढले पाहिजे होते त्या शक्तीने लढत नाही.गांधीवादी,गोवळकरवादी समाजवादी,मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या लाल बावटावाल्या ट्रेंड युनियन मागासवर्गीय कामगारांना खूप प्रामाणिक वाटतात. पण आम्हाला हे समजत नाहीये कि जातीव्यवस्था समर्थक कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे नेते मागासवर्गीय कामगारांची गेट बाहेरची जात नष्ट करण्यासाठी काय करतात?.
    देशातील सर्वात जास्त कम्युनिस्ट चळवळी कामगारांच्या जोरावर चालतात. खालचे काम करणारे खास करुन त्या कामगारां पैकी बहुतांशी कामगार कर्मचारी हे मागासवर्गीय असतात. खरं तर मागासवर्गीयांना शंभर टक्के न्याय देण्याचं खरं काम बाबासाहेबांनी केलं. तर मग बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याच्या कामगार संघटना, युनियन कडे मागासवर्गीय कामगार मोठया संख्येने का जात नाही?. हा प्रश्न स्वताला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या कामगार,कर्मचारी अधिकारी यांना का पडत नाही. संघटित कामगारांना त्यांच्या मुलामुलींना असंघटित कामगार बनविण्यात कामगार संघटना युनियन आणि त्यांच्या महासंघाची मोठी भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे.बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने असंघटित कामगारांना आता थोडी बुद्धी येईल अशी अपेक्षा आहे.गांवात असला तरी शहरात असला तरी ग्रामपंचायत, तहशील कार्यालयात कामगार म्हणून नांव नोंदणी झालीच पाहिजे, असंघटित कामगारांनी येणाऱ्या काळात संघटित न झाल्यास भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल.बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने कंत्राटी कामगारांचे भविष्य अंधकारमय असेल. यातुन त्यांनी काही बोध घेतला तर कंत्राटी कामगार आणि क्रांतिकारी विचारांची स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय ट्रेंड युनियनच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्यास मोठी राजकीय कामगार क्रांती घडवू शकतात.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप मुंबई 9920403859.

बाबासाहेबांच्या जिवनातील माता रमाई आणि माईसाहेब यांचा स्मृतिदिन

 बाबासाहेबांच्या जिवनातील माता रमाई आणि माईसाहेब यांचा स्मृतिदिन 



रमाबाई भीमराव आंबेडकर (जन्म ७ फेब्रुवारी १८९८ मृत्यू २७ मे १९३५) या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.त्यांच्या जीवन संघर्षावरील एक प्रेरणादायी गीत आजकाल सर्वच ठिकाणी आणि सर्वच वयाच्या लोकांना तन,मन,धनाने आकर्षित करते.नांदण नांदण होत रमाचा नांदण ११ फेब्रुवारी २०२१ पासून आज पर्यंत ३७ लाख लोकांनी हे गीत लाईक केले आहे.तर ४५ लाख १९ हजार ६९३ लोकांनी ते पहिले आहे.हे गीत प्रकाश पवार यांनी लिहले होते. हर्षद शिंदे यांनी संगीत दिले देऊन आनंद शिंदे यांनी ते गायिल्या मुळेच अजरामर झाले आहे.कडूबाई खरात डी जे च्या तालावर आता युट्युब वर अनेक गायकांनी ते परत परत गाऊन लाखो लोकांना गुणगुणायला व शरीर हलव्याला मजबूर करते.

     शाळेत असतानाच १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची कन्या रामीबाई उर्फ रमाबाई  ८-९ वर्षाची असतांना झाले. रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो. असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही. त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवऱ्या बाबत राईचा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा,दूरदृष्टिपणा होता.त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा मंत्र आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती. आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाईची मानसिक परिस्थिती काय असेल.घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या. काय वर्णन करून ठेवले आपल्या थोर विचारवंतांनी?.

   रमाबाईचा जन्म कुठे झाला, आईवडील काय करता होते,घरची गरीब परिस्थिती तिचे,दुःख आजार यांचे वर्णन करणारे लेखक समाजाला काय संदेश देण्यासाठी लिहतात. बाबासाहेबांना रमाबाई ची कशी साथ होती त्यावर लक्ष केंद्रित करून लिहले पाहिजे, ते प्रेरणादायी होईल. नवरात्रात शारदा,सरस्वती,अंबिका,लक्ष्मी श्रीदेवी यांचावर लिहणारे कधी जन्म,आईबाप,भाऊ बहीण,शिक्षण, संसार, नवरा,मुलगा मुलगी,सासु सासरे, त्याने गांव तालुका जिल्हा, राज्य यांचा उल्लेख कुठेच येऊ देत नाही. हिंस प्राणी वाहन कसे होते. यावर कधीच लिहल्या जात नाही.सर्व भर नवस,कडक उपवास,मनोभावे पूजा नेवैद्य यातुन होणार चमत्कार साक्षातकार प्रसन्नता यांचा किती मोठा प्रभाव आजच्या उच्च शिक्षित महिलांच्या वर आहे.हे सिद्ध होत आहे. आपण बाबासाहेबांची रमाई कशी सांगितली पाहिजे,कष्ट,त्याग आणि जिद्दीने पती मागे उभी राहणारी.म्हणूनच गीतकार प्रकाश पवार यांचे नांदण नांदण होत रमाचा नांदण गीत खूपच अर्थ पूर्ण आहे.२७ मे १९३५ ला रमाबाई चे दुखद निधन झाले.तो काळ १९०७ ते १९२७ भिमराव आंबेडकर आठरा अठरा तास अभ्यास करून वेगवेगळ्या विषयांच्या पदव्या घेत होते.नंतर १९२७ ते १९३५ चा बाबासाहेबांचा जनसंघर्ष डोळ्या समोर आणा तेव्हा रमाबाई आपल्या पती कडून काय अपेक्षा करीत होत्या.आणि बाबासाहेबांना काय करत होते. 

     माता रमाई २७ मे १९३५ ला गेल्या नंतरचा बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाचा अभ्यास करा. डॉ.सविता भीमराव आंबेडकर (जन्म : मुंबई, २७ जानेवारी १९०९; - मुंबई, २९ मे २००३) ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात,हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या. 

    सविता आंबेडकर यांचा जन्म २७ जानेवारी १९०९ रोजी मुंबईत रोजी एका मराठी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे रत्नगिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दोरला गावचे होते. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली व तीन मुले होती. या एकूण आठ मुलांपैकी ६ भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला. त्यांच्या त्या काळातही पुरोगामी विचारांचा त्यांच्या कुटुंबावर प्रभाव होता.आणि माईसाहेबांना त्याचा मोठा अभिमान वाटे.शारदा ह्या विद्यार्थिदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर मुंबईच्या ग्रंन्ट मेडिकल कॉलेज मधून डॉक्टरीसाठी एम.बी.बी एस ही पदवी ही पदवी मिळवली होती. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यासनी आपण एवढीच त्यांची दिनचर्या होती. या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणिभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांची महात्ना गांधीशी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे एम.डी.च्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले. पण ऐन प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी त्यांना टायफाॅईड, डिहायड्रेशन, बॉईल्स असे आजार झाले व त्यांचे एम.डी. होणे राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले.

   शारदा कबीर यांनी गुजरात मध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केले, नंतर त्या मुंबईत आल्या आणि निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर अशा मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तेथे इ.स. १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. त्यापूर्वी डॉ. राव यांच्या घरी त्यांची भेट झाली होती. डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाई आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर असलेल्या शारदा कबीर यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतली.मुंबईच्या विलेपार्लेमध्ये राहणारे डॉ.एस.राव आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच डॉ.शारदा कबीर यादेखील डॉ.राव यांच्या घरी येत जात असत. कारण त्यांच्या मुली आणि शारदा मैत्रिणी होत्या. त्यांच्याच घरी इ.स.१९४७ मध्ये शारदा कबीर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली, त्यावेळी राव यांनी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली.

    आंबेडकर जेव्हा जेव्हा मुंबईला येत तेव्हा ते डॉ.मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर प्रकृतीच्या तपासणीसाठी जात. मालवणकरांनी आंबेडकरांना अनेक पथ्ये आणि औषधांबाबत अनेक सूचना दिल्या होत्या. आंबेडकरांना या गोष्टी जमण्यासारख्या नसल्याने डॉ.कबीर यांनी ‘एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्याकडे काही दिवस राहून बाईंना (सौ.आंबेडकरांना) सर्व समजावून सांगेन’, असा सल्ला दिला. डॉ.शारदा कबीर यांना तेव्हा रमाबाईंच्या निधनाबाबत माहिती नव्हती. पुढे बाबासाहेब आंबेडकर एकदा डॉक्टर मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आले असताना डॉ.कबीर त्यांना पथ्यपाण्याबाबत सांगू लागल्या. अखेर त्यांना बाबासाहेब म्हणाले, ‘अहो पण माझ्या घरात बाईमाणूस नाही, मी अगदी एकटा आहे, हे सर्व कोणाला सांगू?’. त्यावेळी डॉ.शारदा यांना आंबेडकरांच्या एकाकीपणाबाबत समजले. त्यानंतर दोघांची पुन्हापुन्हा भेट होऊ लागली. डॉक्टर आणि पेशंट म्हणून डॉ.आंबेडकरांशी त्यांचे नाते घट्ट झाले होते. त्यावेळी ‘कोणी मला माझे बाबासाहेबांशी लग्न होईल, असे सांगितले असते, तर मी ते कधीही मान्य केले नसते’, असे डॉ. माईसाहेब स्पष्टपणे कबूल करतात. मात्र त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी अत्यंतिक आदर आणि सहानुभूती होती.

एकदा इ.स. १९४७ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेब डॉ. मालवणकरांच्या कन्सल्टिंग रूमवर गेले असताना बाबासाहेबांनी शारदा यांना म्हणाले, ‘चला, मी तुम्हाला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे.’ त्यापूर्वीही अनेकदा आंबेडकर आणि शारदा कबीर एकत्र बसून बोलायचे. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या. या भेटींमुळे बाबासाहेबांबद्दल सविता यांना बरीच सखोल माहिती मिळाली होती. त्यातून त्यांच्या मनातील आदर अधिकच वाढला होता. एक दिवस आंबेडकर डॉ.सविता यांना म्हणाले. “माझे सहकारी मला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करत आहेत. पण मला माझ्या आवडीची, योग्यतेची स्त्री मिळणे फार कठीण आहे. तरीही माझ्या कोट्यवधी बांधवांसाठी मला जगायला हवे. त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीतरी असायला हवे. त्यामुळे माझ्यासाठी सुयोग्य स्त्रीचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो.” अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. पण त्यावर तेव्हा काय उत्तर द्यायचे हे न समजल्याने डॉ.कबीर गप्पच राहिल्या. त्यानंतर डॉ.आंबेडकर दिल्लीला निघून गेले आणि शारदाही त्यांच्या कामात गुंतल्या. त्या दिवसाबाबतही त्या विसरून गेल्या. पण एक दिवस अचानक शारदा यांना एक पार्सल मिळाले. पार्सलसोबतच्या पत्रात बाबासाहेबांनी डॉ.शारदा यांना मागणी घातली होती. पत्रात लिहिले होते, ‘अर्थात तू तयार असशील तरच. तरी तू विचार करून मला कळव. तुझ्या आणि माझ्या वयांतील फरक आणि माझी प्रकृती या कारणांनी तू मला नकार दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही’. पत्र वाचल्यानंतर मात्र डॉ.सविता यांना बाबासाहेबांच्या मनातील भावना समजल्या. त्या बाबासाहेबांच्या मोठेपणाने दिपून गेल्या. त्यांच्याबाबत आदर असला तरी त्यांची जीवनसाथी होण्याचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. त्यामुळे या विषयावर त्यांच्या मनात बराच खल झाला. 

        एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसा द्यायचा असे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होते. अखेर डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्याच दिवशी डॉ.सविता डॉ.मालवणकरांशी या विषयावर बोलण्यासाठी गेल्या. धैर्य एकवटून त्यांनी मालवणकरांना बाबासाहेबांनी लिहिलेले ते पत्र दाखवले. त्यावर क्षणभर विचार करत मालवणकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय तो निर्णय तुम्हीच घ्या. डॉ. मालवणकरांच्या सल्ल्यानंतर डॉ.सविता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या. त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांना विश्वासात घेऊन काय करावे असे विचारले. त्यांना मोठा भाऊ म्हणाला “म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार. अजिबात नकार देऊ नकोस. एक भाऊ तर त्यांना चिडवू लागला. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आंबेडकरांवर जीवापाड प्रेम करतात. ही डॉक्टरीणबाई नकार देते आहे हे कळलं तर तुझी खैर नाही”, असे तो गमतीत बोलला. अखेर रात्रभर विचार करून डॉ.सविता यांनीही होकारच द्यायचा निर्णय घेतला. त्यामागे दोन कारणे होती, एक तर डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व सेवा करण्यासाठी त्या प्रवृत्त झाल्या आणि शिवाय त्यांच्या भावनांनीही होकार दिलेला होता. एवढ्या मोठ्या माणसाला त्यांना नकार देताच आला नाही. त्यांनी पत्र लिहून आंबेडकरांना होकार कळवला. कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांची प्रकृती सुधरवायची म्हणजे त्यांना देशाची राज्यघटना लिहिण्याचे ऐतिहासिक काम करता येईल असे त्यांनी ठरवले होते.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.शारदा कबीर यांच्या लग्नासाठी १५ एप्रिल १९४८ ही तारीख ठरली. दिल्लीला विवाह उरकणार होता. त्यानंतर मधल्या काळात बाबासाहेब आणि सविता यांच्यात बराच पत्रव्यव्हार झाला. त्यातून त्यांचे नाते अधिकच खुलत गेले. बाबासाहेबांनी विवाहासाठी डॉ.मालवणकरांसह अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित केले होते. कारण तेव्हा देशात दंगली, तणावाचे वातावरण होते. यावेळी डॉ आंबेडकर दिल्लीच्या १ हार्डिंग्ज ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत होते. १५ एप्रिलला विमानतळावरून डॉ.शारदा कुटुंबीयांसह बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेल्या. बंगल्यावर जाताच बाबासाहेबांनी सर्वांची विचारपूस केली. सर्वांच्या ओळख भेटीचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या श्री.चित्रे यांच्या सूनबाई शारदा यांना आत घेऊन गेल्या. त्यांनी शारदा यांना साजशृंगार करण्यास मदत केली. रजिस्ट्रार ऑफ मेरेजेसचे अधिकारीही त्याठिकाणी उपस्थित होते. मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आणि डॉ.शारदा यांच्या वतीने त्यांचा भाऊ वसंत कबीर आणि कमलाकांत चित्रे यांनी तर डॉक्टर साहेबांच्या वतीने नागपूरचे रावसाहेब मेश्राम यांच्यासह आणखी एकाने सही केली. १५ एप्रिल १०४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होऊन त्या शारदा कबीरच्या सविता आंबेडकर झाल्या. लग्नानंरच त्याचे नाव 'शारदा'चे 'सविता' झाले, परंतु बाबासाहेब आंबेडकर त्यांना 'शारू' (शारदा) असेच म्हणत असत.त्यांनी ६ डिसेंबर १९५६ला बाबासाहेब गेल्या नंतर अनेक संकटांना तोंड देत संघर्ष केला.२९ मे २००३ रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.बाबासाहेबांच्या जिवनातील माता रमाई याचं २७ मे आणि माईसाहेब यांचा २९ मे हा स्मृतिदिन आहे.अशा या महापुरुषांच्या जिवनातील संघर्षात सहभागी असणाऱ्या कष्ट,त्याग आणि जिद्धीने सहकार्य करणाऱ्या माता रमाई आणि माईसाहेब यांच्या स्मृतिदिन दिनास विनम्र अभिवादन.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

नांदन नांदन होत रमाच नांदन महिलांचे प्रेरणा गीत.

 नांदन नांदन होत रमाच नांदन महिलांचे प्रेरणा गीत.



     नांदन नांदन होत रमाच नांदन,भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण हे आज महिलांचे प्रेरणा गीत झाले आहे.गीतकार प्रकाश पवार यांनी लिहलेल हे गीत आनंद शिंदे यांनी गायलेलं व हर्षद शिंदे यांनी स्वरबद्ध केलेले गीत आज घराघरात आवर्जून वाजत असते.प्रत्येक महिलांच्या तोंडी ह्या दोनतीन ओळी हमखास असतात. घरगुती लग्न सोहळा असो कि जाहीर सभा कोणताही कार्यकम असो त्याठिकाणी हे गीत हमखास लावल्या जाते.ते सर्वांचेच आकर्षण असते.त्याची शब्द रचनाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संसाराचे चित्र डोळ्या समोर उभे करते.त्यामुळेच कष्टकरी महिलांना हे गीत कायम प्रेरणादायी असते.या गीताला आज पर्यंत युट्यूबला ११ फेब्रुवारी २०२१ पासून आज पर्यंत ३७ लाख लोकांनी हे गीत लाईक केले आहे.तर ४५ लाख १९ हजार ६९३ लोकांनी ते पहिले आहे.हे गीत आनंद शिंदे यांनी ते गायिल्या मुळेच अजरामर झाले आहे.कडूबाई खरात डी जे च्या तालावर आता युट्युब वर अनेक गायकांनी ते परत परत गाऊन लाखो लोकांना गुणगुणायला व शरीर हलव्याला मजबूर करते.राज्यातील अनेक गायकांनी ते गायिले आहे.सर्व महिला वर्गात ते लोकप्रिय झाले आहे.
नांदन नांदन होत रमाच नांदन
नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण

धनी असता मुलखातीरी
पार पाडी कर्तव्य सारी
धनी असता मुलखातीरी
पार पाडी कर्तव्य सारी

पाणी श्रमान शेंदन असं रमाच नांदन
पाणी श्रमान शेंदन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण

नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी
नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी

कंबर कसून बांधन असं रमाच नांदन
कंबर कसून बांधन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण

कण्या शिजवून सांजेला नटवी
पाणी डोळ्याला लावुन पोर उठली
कण्या शिजवून सांजेला नटवी
पाणी डोळ्याला लावुन पोर उठली 

कोंड्या मांड्याच रांदन असं रमाच नांदन
कोंड्या मांड्याच रांदन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण

होती कष्टाच जीवन जगत
सुख प्रकाश भावी बघत
होती कष्टाच जीवन जगत
सुख प्रकाश भावी बघत

नाव अंतरी गोंदण असं रमाच नांदन
नाव अंतरी गोंदण असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन

भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांद
    नांदन नांदन होत रमाच नांदन महिलांचे प्रेरणा गीतामधून कष्टकरी महिलांनी प्रेरणा घेतली आहे.म्हणूनच कष्टकारी महिला नेहमी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला सर्वच कामात सतत मदत करीत असतात अशा महिलांचे प्रेरणा स्थान म्हणजे माता रमाई आहेत. माता रमाई बाबत आज प्रयन्त अनेक प्रकारचे लिखाण हे भावनिकच झाले आहे.रमाबाईच्या कष्ट त्यागाला भावनिक केल्या गेले आहे. भिमराव आंबेडकर यांना जी साथ मिळाली ती भावनिक कधीच नव्हती ती पतीच्या कर्तव्य दक्षतेला मना पासुन पत्नीची साथ होती.ती प्रेरणा खेडया पड़यातील व शहरातील झोपड़पट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीनी घेतली म्हणुन ते आंबेडकर चळवळीतील प्रत्येक जन आंदोलनात पति पत्नी सहभागी होतात.विशेष ते सर्वच असंघटित कामगार असतात.पण असंघटित कामगार म्हणुन ते कोणतेही आंदोलन करीत नाही.त्याची त्यांना जाणीव नाही.रमाबाई आणि भिमरावचे सर्व नातलग कोणते कामगार होते?.तो इतिहास डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला महत्व देऊन संघटीत झाले पाहिजे.
    रमाबाई बदल जेवढा आदर अडानी असंघटित महिला करतात,तेवढा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या महिला करत नाही. अशा महिला आपल्या पतीला बिनपगारी कोणतेही काम करू देत नाही.(देत असतील अशा त्या महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि माफी सुद्धा ) आज प्रयन्तचा इतिहास आणि अनुभवा वरुन हे मी लिहतो. अन्यता आंबेडकर चळवळीत आज जी लेटरहेड वर जागणाऱ्याची जी संख्या आहे.ती राहली नसती.प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका महिलाचा हात असतो तसाच एका अपयशस्वी पुरुषा मागे एका महिलांचा हात असतो.मग घराघरत असलेल्या आंबेडकर चळवळीतील गटागटच्या नेत्यांच्या महिलाचे प्रेरणा स्थान कोणते?. नांदन नांदन होत रमाच नांदन,भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण हा आदर्श असू शकत नाही.
  रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो.असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही.त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवरया बदल राईचा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा, दूरदृष्टिपणा होता. त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा संदेश आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती.आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.रमाबाई वर असे प्रसंग किती वेळा आले.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.त्यापूर्वी गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार अशी परिस्थिती देशभरात निर्माण झाली होत. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाईची मानसिक परिस्थिती काय असेल.घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या. पण काय वर्णन करून ठेवले आल्या थोर विचारवंतांनी??
     रमाबाईचे पतीनिष्ठ उदाहरण द्रुष्टी समोर ठेवून बाबासाहेब नेहमी जाहीरपणे सांगत असत. स्री हा समाजाचा अलंकार आहे.आपल्या कुटुंबाचे आणि कुळाचा नांव लैकिक स्रियाच्या शिलावरच अवलबून असतो. स्री हि जशी गृहिणी तशी सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता ही असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात सुरवात पासून शेवट प्रयन्त रमाबाईनी हाल अपेष्ट,दुख गरिबी यांच्याशी सतत संघर्ष करीत राहिल्या त्यामुळे त्या नेहमी आजारी राहत होत्या पण त्यांनी बाबासाहेबाकडे तक्रार केली नाही.म्हणूनच नांदन नांदन होत रमाच नांदन,भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण असे वर्णन गीतकार करतात. त्यांचा जन्म कुठे झाल.आईवडील काय करीत होते त्यांच्या दुखाचे वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या त्याग,कष्टाची नोंद घेतली पाहिजे.तोच आदर्श महिलांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८,आणि मृत्यू २७ मे १९३५ झाला. रमाबाई ह्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.२७ मे १९३५ ला त्यांचे दुखद निधन झाले. अशा त्यागमूर्ती रमाईच्या ८८ व्या स्मृतिदिना निमित्य त्यांच्या त्याग,कष्टाला कोटी कोटी प्रणाम.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

बुधवार, १७ मे, २०२३

"संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षा, क्यो की संघ बडा बलवान."

 "संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षाक्यो की संघ बडा बलवान."



     जगात स्वार्थ पायी माणस आत्मकेंद्रित झाली आहेत.एकत्र मातृसंस्था संस्कृती नष्ट झाली आहे.एकत्र कुटुंब पद्धत विभक्त पद्धतीत झपाट्याने बदलत आहे.अन्याय,अत्याचार करून शोषणाच्या पद्धतीत सुद्धा स्मार्टचोरी मोठ्या प्रमाणत होत आहे.त्यामुळेच कोण कोणाचे रक्षण करण्याच्या भांडगडीत पडतांना दिसत नाही.म्हणूनच निसर्ग नियमाने माणसांनी संघटीत राहिले पाहिजे.संघटीत झाल्यावर कोणीच अन्याय अत्याचार आणि शोषण करतांना शंभर वेळा विचार करेल.त्यांचा कधी पराभव होत नाही असे तथागत बुद्धांनी वज्जी समाजाचे उदाहरणे देऊन बुद्ध आणि त्यांचा धम्मामध्ये सांगितले आहे.
   जगात अनेक वस्तुचा शोध लागला त्यामुळे मानव जातीचा मोठा फायदा झाला,पण त्याच बरोबर नुकसान सुध्दा झाले.ती वस्तु म्हणजेच आरसा!. आरशात प्रत्येकचे प्रतिबिंब दिसते आणि जसे आहे तसेच दिसते. मनातील विकार ही आरसात दिसतात.जगात एकमेव महामानव असे आहेत की ज्यांचा जन्म,ज्ञान प्राप्ती आणि महापरीनिर्वाण एकाची दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला झाले.त्यामुळे वैशाख पोर्णिमा हा दिवस जगातील १८० देशात राष्ट्रीय उत्सव म्हणून खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.भूख्खू संघाला दान दिल्या जाते,काही उपासक लहानपणीच मुलांना संघाला धम्माला  दान देतात.
वैशाख पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी वैशाख पोर्णिमा सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि वैशाख पोर्णिमा याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही.प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारावर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.मोदी भारतात असले कि मनुवादी विचारांचे कट्टर समर्थक असतात.परदेशात गेले कि बुद्ध शिवाय दुसरे नांवच घेत नाही.बुद्धाची संघ शक्ती तिकडे गेल्यावरच आठवते.बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत का आठवत नाही.ते म्हणतात "संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षाक्यो की संघ बडा बलवान."
       तथागत बुद्धानी वैशाख प्रोर्णिमाला जगाला जो मानव मुक्तीचा मार्ग दाखविला त्यालाच धम्म म्हणतात.धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग त्या मार्गाने जाण्यासाठी पंचशीलाचे पालन केले पाहिजे.पंचशीलेचे पालन आपण केले तर दररोजच्या जगण्यातील अनेक विकार नष्ट होतात.आणि विचार आचरणात आणले तर स्वताचा विकास व कल्याण कोणीच रोखु शकत नाही. ते समजून घेण्या करीता आदर्श आणि प्रेरणा स्रोत समजून घेतले पाहिजे.वैशाख प्रोर्णिमा किंवा बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते. ते समजून घेण्यासाठी धम्मात व धर्मात गुरु शिष्य परंमपरेला खुप महत्व आहे.एका गुरूच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या त्या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला.हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरु समोर हा आरसा धरला व गुरुच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुच्या अंतकरणात मोह,अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली,ज्यांना पूर्ण देवाचा दर्जा दिला त्यांच्या मनात ही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वाईट वाटले. तो गुरुना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.
     रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिता बरोबर हा प्रयोग करून पाहिला.त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन खूप राग आला व तो परत गुरुकुलातील गुरुंकडे धावला.गुरुपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात,हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच,काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.गुरुनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग,द्वेष,अहंकार,क्रोध,माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू तर दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वत:चे अवलोकन केले असते, तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते.याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे,कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.लक्षात ठेवा आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही.म्हणूनच ही वैशाख प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते.
     भारतातील बुद्धाच्या धम्माचे ही असेच झाले बुद्धाने सांगितलेल्या धम्माचे पालन न करता ते इतरांच्या धर्मावर सतत टिका टिपणी करीत राहतात.बुद्धाच्या धम्मा बद्धल आलेला सकारात्मक विचार यांच्या आचरणातून व्यक्त होत नसल्यामुळे ते जगातील सर्व श्रेष्ठ धम्माला नकारात्मक दृष्टीने पाहतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली तथागतच्या बुद्ध धम्माची दिक्षा दिली.वैशाख प्रोर्णिमा किंवा बुद्धाच्या धम्माच्या प्रवचनाचा अर्थ समजु शकले नाही. आज ही ९० टक्के लोक पंचशिलेचे पालन करीत नाही. पंचशील म्हणजे काय?. हेच समजत नसेल तर अंमलात आणण्याचा प्रश्नच राहत नाही. त्यामुळेच आंबेडकरी समाजात टोकाचे विकार ठासुन भरले आहेत. त्यात कोणीच अशिक्षित किंवा सुशिक्षित माघार घेण्यास तयार नाही. म्हणुन बुद्ध प्रोर्णिमा व बुद्ध धम्माच्या शिकवणीचा आरसा प्रत्येका जवळ हवा आहे.तो हरविल्या मुळे मातृसंस्था,पिपल संस्था, समता सैनिक दल,रिपाई,बहुजन,वंचित, समिती,कृती समिती एकूण आंबेडकरी चळवळ भक्त्त आणि शिष्यात विखुरल्या गेल्या आहेत.नगरा नगरात हेच चित्र निर्माण झाले आहे. आज प्रत्येका कडे आरसा आहे पण तो त्यात स्वताचे प्रतिबिंब पाहत नाही. इतरा चे मात्र आवर्जुन पाहतो आणि भाष्य करतो.त्यात सत्य लिहण्याची बोलण्याची मांडण्याची हिंमत कोणी केल्यास त्यांचे परिणाम समाजात अतिशय वाईट होत आहेत.त्यामुळे कोणी बोलण्याची लिहण्याची हिंमत करीत नाही.पंचशील लागु होत नसेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्मा मधील कोणते विचार आम्हाला चालतील?. बुद्धाचे विचार आणि शिकवण आरसा सारखी सोबत ठेवावी लागेल.तरच भारत बौद्धमय होईल.त्यासाठी संघ शक्ती हवी."संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षाक्यो की संघ बडा बलवान."
     भारत ही तथागत गौतम बुद्धाची जन्मभूमी आहे.बुद्धाचा जन्म कुठे झाला?.लिबूंनी!. ज्ञानप्राप्ती कुठे झाली?.गया बुद्धगया!. महानिर्वाण कुठे झाले ?.कुशीनगर!. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख प्रोर्णिमाला भारतात घडल्या त्यामुळेच त्यांचे भारताचे जागतिक पातळीवर खुप महत्व आहे. भारतातील मनुवादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी येथे तिचे वैशाख प्रोर्णिमाचे महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांतावरून तथागत बुद्ध जगातील सर्वोत्तम महापुरुष मानव प्राण्यांचे मार्ग दाते ठरले.चीन,जपान,व्हियेतनाम, थायलंड,म्यानमार,श्रीलंका,सिंगापूर,अमेरिका,कंबोडिया,मलेशिया, नेपाळ, इंडोनेशियासह जगाच्या पाठीवर १८० देशातील बौद्ध धम्म मानणारे लोक हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतात.कारण त्यांच्या मैत्रीभावना संघ शक्ती कुठून कुठून भरलेली आहे.म्हणूनच ते म्हणतात."संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षाक्यो की संघ बडा बलवान."
    जगात ज्यांनी बुद्धाचा मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांत समजून घेतला ते देश सर्व गोष्टीने वैभवशाली वैभवसंपन्न आहेत.बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते.त्यात प्रत्येक मानवांनी आपली प्रतिमा पाहिलीच पाहिजे. तरच बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आपल्याला समजून घेता येईल.जागरूक वाचकांना माझ्याकडून व माझ्या लोकप्रिय दैनिकाच्या वतीने वैशाख पोर्णिमा व बुध्द जयंतीनिमित्त हार्दिक मंगल कामना!.सर्वांचे मंगल हो!!!.
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९.


बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.

 बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.



     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती घेतांना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या.त्या पूर्ण पणे न स्विकारल्या मुले तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आण्यात समाज खुप कमी पडतो.म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांची १३२ वी जयंती असो या बुद्धाची (ई स.पूर्व ५६३ वी/ २५६७ वी ) जयंती असो,आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झालाच नाही असे ही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो.कारण प्रत्येक धर्माचे सण त्या त्या धर्माच्या माणसांना नवसंजीवनी देतात.उत्स्पुर्तपणे ते सणाचा आनंद घेतात. दरवर्षी त्याचा उत्साह वाढत जातो. तिथे विचारांशी काही घेणे देणे नसते.वडिलोपार्जित परंपरा आणि धर्माचा समाजाचा रीतीरिवाज पाळला जातो.त्यात विचार आणि त्यानुसार आचरण बिलकुल नसते.त्याप्रमाणेचं महापुरुषांची जयंती,भिम जयंती बुद्ध जयंती होत चालली की काय असा प्रश्न उभा राहतो.बुद्ध विहारे कशा साठी बांधली जातात?.मंदिरात पूजा अर्चा कर्मकांड केली जातात.पण बुद्ध विहार हे विचारांचे प्रबोधन करणारे केंद्र असतात.त्यातूनच समाजात वैचारिक परिवर्तन होत असते.म्हणूनच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.
      भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.तोच खरा धम्मोधर असतो.धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.त्यामुले आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही.बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण,उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.त्यांची बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असातात.वर्षभर ते उपासक, उपासिकांनी आणि भिक्खू संघाने गजबजलेली असतात.तिथे लक्षवेधी उपक्रम राबविले जातात.
     बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं  प्रकाशीत व्हा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी "शासन करती जमात व्हा!." या दोन महान संदेशाचा अर्थच आम्ही समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही. बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही.जो पर्यंत अन्याय,अत्याचार होत नाही.शोषण होत नाही.
    धर्मांतरीत आंबेडकारी समाज,संघ,संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही.म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.पण हे समाजाला कोण सांगेल?. आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते.युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेउन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील.तुम्हाला समता,स्वत्रंत,बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेउन सातत्य ठेवावे लागेल.केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर एकत्र जयंती साजरी करण्याचा अर्थ काय?.यासाठीच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.
     माणसाच्या संघाने संघटने पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.हे आजच्या आंबेडकरी चळवळीला कोण सांगेल?. बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.त्यात सर्वोचस्थानी आपन पोचु शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे.संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती.पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदा मुळे बंद असतात.त्यामुळेच खऱ्या अर्थाने वैचारिक चर्चा होते,पण परिवर्तन होत नाही.व्यक्तिगत आर्थिक परिवर्तन होतांना दिसते पण सामाजिकदृष्ट्या ते दिसत नाही.
         श्रीलंका,थायलंड,बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे ही शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात.तिथे शिस्तबद्धता आचरणात सर्व व्यवहार आणली जातात.एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्या शिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणासाठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जाती साठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो.समाज एकत्र आला तर संघ,संघटना आणि पक्ष तयार होतो.मग तो मानव कल्याणा करीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.
        आज देशात भिख्खु संघ संघटित नाही.त्यामुले देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही.डॉ बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपन कुठे तरी कमी पडतो.म्हणुन तमाम आंबेडकरी चळवळी बौद्ध बांधवास बुद्ध जयंती निमित्याने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ति बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना. त्यासाठीच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.   हिच सर्वाना नम्र विनंती, आणि सर्वांना हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.

 कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.



    भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीने हातात हात घालून देशातील सर्व मानव जातीला आर्थिक संकटात टाकले. कष्टकरी बहुजन,मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक मजूर,शेतमजूर,कामगार असणाऱ्यांना 
जगण्यासाठी पहिल्या पेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे.कारण मुक्तपणे शोषण करणारी कंत्राटी पद्धत अंमलात आली आहे.त्यामुळे अन्याय,अत्याचारा विरोधात बोलण्याची हिंमत केली की कामावरून काढल्या जाते.न्याय मागणे गुन्हा झाला आहे.आपना सर्वांना माहीत आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान संदेश आहे. "मांगीतल्याने मिळत नाही,संघर्षा शिवाय पर्याय नाही." "शिका,संघटीत व्हा आणी संघर्ष करा.हा क्रम लोकांनी बदलून टाकला प्रथम आपसात संघर्ष करतात. त्यांचा फायदा दुसऱ्या समाजाने घेतला की एक दिवसा करीता संघटित होतात.किंवा एक दोन महिने राज्यभर एका जातीची जनआंदोलन होतात.मग त्यातुन काय शिकतात?. बहुसंख्येने मागासवर्गीय,ओबीसी, आदिवासी,अल्पसंख्याक समाज हा असंघटीत मजूर,कामगार आहे. तो असंघटीत मजूर कामगार म्हणून कुठे एकत्र येतो का?. जातीसाठी एकत्र येऊन लढतो तोच जर कंत्राटी मजूर कामगार म्हणून एकत्र आला तर त्याला हक्काचा रोजगार कायमस्वरूपी मिळू शकतो. त्यासाठी कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.
    आरक्षणातील पदोन्नती साठी कामगार कर्मचाऱ्यांचा जो संघर्ष आज सुरू आहे.त्यांनी इतिहास वाचला असता तर ? जगातील ज्या काही क्रांत्या झाल्यात त्यामध्ये कामगारांची अहंम भूमिका होती. कामगार संघटनांनी शासनावर नियमितपणे दबाव ठेवावा, जर शासन ऐकत नसेल तर कामगारांच्या संख्येच्या बळावर सत्ता हस्तगत करावी. ही बाब बाबासाहेबांनी मुबंईच्या मील संपाच्या भाषणात प्राकर्षाने सांगितले होती. पण आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचा फायदा अनेक मनूवादी कामगार संघटनांनी उचलला.त्यांनी राष्ट्रीय ट्रेंड युनियन बनविल्या, भांडवलदार आणि सत्ताधारी पक्षाची त्यांनी दलाली सूरू केली.आणि आम्हाला असंघटित कंत्राटी कामगार,मजूर करून जात,धर्म, प्रांतात गुंडाळून ठेवले.त्यामुळेच असंघटीत कंत्राटी कामगारांच्या दरवर्षी फौजा निर्माण होत आहेत.कामगार कल्याण मंडलात सर्व त्यांचेच प्रतिनिधी (नोंदणीकृत कामगारांच्या सभासद संख्येनुसार) आहेत. त्यामुळे आजही आम्हाला minimum vej (किमान मजूरी) पूरेशी मिळत नाही. जनआंदोलनात आमची भाषा मात्र नेहमी "असा कसा देत नाही?. घेतल्या शिवाय राहत नाही!." अशी असते. त्यामुळे आपल्याला जमिनीवर उभे राहून भान ठेवून बोलले व वागले पाहिजे.राष्ट्रीय संघटन बनविले पाहिजे की नाही?. 
        किमान वेतन न दिल्या गेल्यामुळे देवयानी खोब्रागडे यांना परदेशात काय भोगावं लागलं हे या देशातील प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती तरी महिने ओरडून सांगत होती. मिनीमम वेजचे इतर देशात काय महत्व आहे हे आपल्या देशातील कोणत्याच कामगारांच्या ट्रेंड युनियन व मीडियाच्या लक्षात आले नाही. त्या बाबत कामगारांना यांची साधी माहिती नाही.त्यांना कामगार, कर्मचारी म्हणून काय अधिकार आहेत यांची माहिती कोणी सांगितली पाहिजे?.  जाती साठी संघर्ष करणारे हे सांगत नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे फक्त वर्गव्यवस्थेवर बोलतात,जाती शोषणावर बोलत नाही.तरी बहुसंख्येने मागासवर्गीय,ओबीसी, आदिवासी अल्पसंख्याक कंत्राटी मजूर,कामगार त्यांच्याच लाल बावट्या खाली जातात.ते ही त्यांना सांगतात कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.
     स्वतंत्र मजदूर यूनियन (आय एल यु) आदरणीय जे.एस.पाटील यांच्या कुश्ल,त्यागी निष्टावंत अभ्यासू नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर रेल्वे,विद्युत,बँक,खदान,कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर,व सर्व संघटीत,असंघटीत कंत्राटी कामगारांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करीत आहे. आपल्या मूलभूत हक्काची लढाई राज्य व केंद्रा सरकारच्या विरोधात संघर्ष करीत आहे.८ डिसेंबर २०१७ ला दिल्लीच्या रामलीला मैदानात लाखो आरक्षण लाभार्थी सहकाऱ्यांना सोबत घेऊन विशाल रॅली घेऊन राष्ट्रीय पातळीवर आम्ही आहोत हे केंद्र सरकारला प्रथमच दाखवुन दिले. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांची योग्य नोंद घेतली व आज त्या संदर्भातील पत्रव्यवहार होत आहे. म्हणजेच कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.त्या शिवाय कोणी नोंदच घेणार नाही.
     बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व कामगार,कर्मचारी बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे की "नाव भिमाचं नी काम बापूचं" सोडून द्या. "नावंपण भिमाचचं नी काम पण भिमाचंच" यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनचे संघटनेचे सदस्य बनून स्वाभिमानाने जगण्यासाठी कामाला लागा. तुमच्या खात्यातील कामगार,कर्मचाऱ्यांना संघटीत करून त्यांची ट्रेंड युनियन रजिस्ट्रेशन करा त्यांचे संस्थापक अध्यक्ष तुम्हीच राहा पण ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारधारेच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन आय एल यु शी संलग्न करा.अन्यता केवळ आरक्षणच नाही,तर भारतीय संविधान नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही.राजकीय गटबाजी संपविण्यासाठी ट्रेंड युनियनलाच पुढाकार घ्यावा लागेल.राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली, दबावाखाली ट्रेंड युनियन ने काम केल्यामुळे कामगार कर्मचारी उद्धवस्त झालेत.राजकीय पक्ष हा नेहमी भांडवलदारांच्या आर्थिक मदतीने निवडणूका लढत असतो. त्याबदल्यात तो कामगार कर्मचाऱ्याच्या शोषण, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही, राजकीय नेते कामगार कर्मचाऱ्यांना अपंग बनवुन ठेवतात.आता तर सर्व सरकारी उद्योग क्षेत्रात कायम कामगाराच्या जागी कंत्राटी कामगार भरण्याची अधिकृतरीत्या ठेकेदारी देऊन टाकली.म्हणजेच कोणा कोणाल गुलाम बनवायचे यांची यादी तयार आहे.म्हणूनच संविधानात लिहले आहे. जाती संघटना पेक्षा कामगार संघटना मोठया असतात.हा इतिहास सर्व कामगार कर्मचारी यांनी लक्षात घ्यावा.विशेष सर्वच क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी संघटना युनियन बनविल्या शिवाय शोषण थांबणार नाही. आताचे सरकार आर एस एस प्रणित आहे त्यांना या देशाचे संविधान नको आहे,ते नष्ट करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे त्या हिसेबानी ते कामाला लागले. आपले काय?. आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही पक्ष संघटनेकडे या विरोधातील कृती कार्यक्रम नाही.आता आपण कामगार कर्मचारी गप्प बसलो तर केवळ आरक्षण नाही,तर संविधान लोकशाहीच्या मार्गानेच संपविल्या जाईल.नंतर एक होतं संविधान असे म्हणण्याची पाळी आपल्यावर यायला ऊशीर लागणारं नाही.हीच वेळ आहे निर्णय घेण्याची यांचे उत्तर बाबासाहेबांनी तेव्हा दिले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १२ व १३ फेब्रुवारी १९३८ साली मनमाड येथे रेल्वे गँगमन कामगारांच्या दोनदिवशीय परिषद मध्ये केले होते. सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन बनवुन स्वतंत्र मजदूर युनियन शी संलग्न करा.आज आता आरक्षण लाभार्थीची नोकरी धोक्यात आली आहे,नव्हे गेलीच आहे.पुढील पिढीचे भविष्य अंधकारमय झाले आहे. म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांनी ट्रेंड युनियन मध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता आपली खरी ओळख दाखविण्याची वेळ आली आहे.
   भारतातील बहुसंख्येने कामगार कर्मचारी हा मागासवर्गीय शोषित,पिढीत व आदिवासी अन्यायग्रस्त असल्याने त्यांना ७० वर्षानंतर ही सामाजिक व आर्थिक न्याय मिळू शकला नाही. आताच्या आर एस एस प्रणित भाजपा सरकारने एक हजार कामगार कायदे विना चर्चा रद्द करून टाकले.शेतकरी शेतमजूर, असंघटीत कामगार यांचे प्रश्न तर संघटीत कामगारांच्या प्रश्नापेक्षा विक्राळ स्वरूपात उभे आहेत. त्यावर प्रस्थापित कामगार चळवळी कोणताच वैचारिक संघर्ष करण्यासाठी तयार नाही. त्याचे दुःख मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांना बिलकुल नाही.भारतात आजमितीला सात टक्के संघटीत कामगारांच्या ५५ हजार युनियन नोंदणीकृत आहेत.तर ९३ टक्के असंघटीत कामगारांच्या राष्ट्रीय युनियन नाहीत. त्यांच्या करीता वैचारीक पातळीच्या तेरा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कार्यरत आहेत. त्यांची अधिकृत मान्यता ही मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांच्या मेंबरशिप वर अवलंबून आहे.त्या या प्रमाणे आहेत.१) ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC ),
२) सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (CITU),३) भारतीय मजदूर संघ (BMS), ४)हिंद माजदूर किसान पंचायत (HMKP), ५) हिंद मजदूर सभा (HMS), ६) इंडियन फेडरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन (IFFTU), ७) इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन काँग्रेस (INTUC), ८) नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (NFITU), ९) नॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (NLO), १०) ट्रेंड युनियन को-ऑडीनेशन सेंटर ( TUCC), ११) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस (UTUC), १२) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस-लेनिन (UTUC-L), १३) कॉन्फडेरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन ऑफ इंडिया (CFTUI).यांची राजकीय विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी त्यांचे सांस्कृतिक संस्कार एकच आहेत. हे आम्ही विसरतो.म्हणूनच आय एल यु ला राष्ट्रीय ट्रेंड युनियन चा दर्जा मिळू शकला नाही.असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!. ही भाषा आता बंद करावी,आणि भविष्य उज्वल करण्यासाठी  आरक्षण लाभार्थी कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी बनावे!.संघटीत कामगार असंघटीत कंत्राटी कामगार बनत आहे.म्हणूनच कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब म्हणाले मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी तुम्ही सुखात रहावं म्हणून यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो M.A., PH.D.,M.SC,D.SC, L.L.B.तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होते. पण मी ती नाकारली. का?. कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्याचा होता.मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो.पण नाही.माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी.मी तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो.महार,मांग, चांभार,सुतार, लोहार,माळी,धनगर,कुणबी, कोळी या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो.मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्विकारला.पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी "हिंदु कोड बिल" बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले.मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC,ST,OBC,NT यांना आरक्षण दिलं.पण बांधवांनो तुम्ही मला व चळवळीला काय दिले?. तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा.हे सर्व बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी यांनी एक व्हावे. तुम्ही सर्वांनी एकत्र या कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल. म्हणूनच असंघटीत कंत्राटी मजूर,शेतमजुरांना कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.संघटित व्हा!.कंत्राटी कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९. 
अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य,

मनापासून जिवंत माणसा पर्यत

 मनापासून जिवंत माणसा पर्यत 



      माणसांचे मन आता स्वतःच्या ताब्यात नाही.ते प्रत्येक वेळी ते मार्केटिंग,जाहिरातीतील उगड्या नागड्या शरीरावरुन ठरविल्या जात आहे.पायातील चप्पल,बूट ते डोक्यावरील तेल कोणते वापरावे,अंडरवेयर म्हणजे चड्डी बनियन कोणती वापरावी,अंग धुण्यासाठी साबण आणि कपडे धुण्यासाठी साबण व पावडर कोणती वापरावी हे सर्व वृत्तपत्रातील व वृत्तवाहिन्यावरील जाहिराती पाहून बाई,माणसाला,मुलामुलींना ठरवावे लागते.त्यांचा समाज मनावर किती चांगला व किती वाईट परिणाम होत आहेत. यांचा गांभीर्याने विचार कोणी करत बसत नाही. सर्व थरावरील माणसं परिणामाची पर्वा न करता एन्जॉय करीत आहेत.
     हा लेख मनापासून शांतपणे वाचा आणि पहा पण निर्णय स्वतः घ्या. नात्यातील जिवंत माणसासाठी किंवा मित्रमंडळीसाठी तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. त्याने ते समाधानी होतील ही अपेक्षा कधीच ठेऊ नये. कोणासाठी काही करा पण मनापासून समाजातील जिवंत माणसा पर्यत गेले पाहिजे.जगातलं कटु सत्य हे आहे की "नाती" जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की, आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. त्याला कोणी किंमत देत नाही. जमीन,गाडी,बंगला,प्लॉट,सोने आणि एकूण किती संपत्ती आहे हे कोणीच विचारत नाही. पण मुलं,मुली किती आहेत आणि काय करतात हा प्रश्न कोणत्याही माणूस माणसाला भेटला तर निश्चितच विचारतो.तेव्हा खरा प्रश्न पडतो, मुलं आहेत पण, नोकरीत नाहीत?. एकत्र राहत नाहीत?.नशा पाणी खूप करतात. त्यामुळेच सांभाळत नाही. तेव्हा संपूर्ण जीवन संघर्ष डोळ्यासमोर येतो.जमीन,गाडी,बंगला,प्लॉट,सोने एकूण खुप संपत्ती आहे.पण मनाला सुख समाधान नाही मनाला शांतपणे झोपच येत नाही. डोक्यात सतत विचारांचे किडे वळवळ करीत राहतात.भर समुद्रात भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नसते. त्यावेळी त्या जहाजाला जमिनीशी जोडल्या शिवाय पाणी पुरवठा होत नाही.माणसांचे ही असेच आहे, मनापासून माणसांशी जोडले गेले पाहिजे, समाजातील माणसांशी जोडले गेले पाहिजे.केवळ स्वार्थासाठी जोडले तर ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणूनच जिथं आपली आपल्या माणसांची कदर नाही, तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसाण्यात वेळ वाया घालवू नका. 
     आपले हातून एखादयाचे चांगले काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोचपणे करा. नेहमी गरजु माणसांना मदत करा. आपल्यामुळे दुसऱ्या माणसांना त्रास होईल असे कदापी वागू नका. त्यामुळे वरून आनंद वाटेल पण शांतपणे विचार केला तर मनाला दुःख होईल.ते कोणालाच दाखवीत येत नाही. ते लपविण्यासाठी तोंड लपविण्याची पाळी येते. म्हणूनच नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हरलात तर 'अहंकार' हरेल.तथागत गौतम बुद्धाचा महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कायमस्वरूपी माणसात राहाल.तर समाजाशी जोडले जाल. तोच समाज सुखा, दुःखात सहभागी होणार, तिथे पैसा,सोने,संपत्तीं काहीच कामाची नसते.उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा नेहमीच येतात.प्रत्येक ऋतूत वादळ येतात.वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.प्रत्येक माणसांने समूह म्हणून विचार केला पाहिजे व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर सोबत कोणीच राहत नाही. माणसात संघ भावना असणे आवश्यक आहे. कारण संघ खुप मजबुत असतो,तो सर्व प्रकारचे रक्षण करण्यासाठी असतो.मधमाश्याचा पोळ बघा एकत्र राहून अप्रतिम गोड मध गोळा करून माणसाला देतो.ते करत असतांना कोणी दगड पोळावर मारला तर एकाच वेळी हजारो मधमाश्या दगड मारणाऱ्यावर हल्ला चढवतात. त्यात तो मारल्या जातो. जमिनीवर राहणाऱ्या माणसासाठी जनावरांसाठी संघ भावना कायमस्वरूपी रक्षण करते.
      पाण्याने भरलेल्या तलावात.मासे किड्यांना खातात,तर तोच तलाव कोरडा झाल्यास. किडे मास्यांना खातात.संधी सगळ्यांना मिळते.फक्त आपली वेळ येण्याची वाट पहावी लागते.निसर्ग सर्वांना समान न्याय योग्य वेळी देतो. निसर्गाच्या नियमांचे पालन केले तर कोणताच यम तुमच्या समोर उभा राहत नाही, आणि नियम धाब्यावर बसवून वागला तर यम सेवा उपलब्ध करून देण्यात तत्पर आहे. म्हणूनच माणसांनी माणसासोबत मनापासून जोडले पाहिजे.जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात म्हणजेच माणसांच्या मनात रुजवावे लागते.माणसांचा माणसावर विश्वास असला तर कोणतंच नातं तुटत नाही,विश्वास नसला तर कोणतंच नातं जुळून येत नाही. माणूस स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची कला आहे.त्यासाठी माणसात संघ भावना असावी लागते. चांगले काम करा आठवणीत राहणार, वाईट काम केले तरी आठवणीत राहणार पण किती प्रमाणात हे महत्त्वाचे असते.एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर.त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे.
    आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं,कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते प्रेरणादायी चैतन्य. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा.समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आहे. जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.निसर्गाने सोनं निर्माण केलं.आणि चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला?. दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. माणसा माणसात संघ भावना निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. देश अडचणीत असेल तेव्हा आपली देशभावना देशभक्ती जागृत होते.माणूस जेव्हा अडचणीत असेल तेव्हा मनातील माणूस प्रामाणिक राहिला पाहिजे.तेव्हा जात,धर्म,प्रांत, भाषा मनात येता कामा नये. म्हणूनच माणसांनी जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे राहिले पाहिजे.जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहिले पाहिजे.नोकरीतील पदाचा,संपत्तीचा कधी गर्व करू नये.ते आज आहे उद्या नसेल.माणसं सर्वच ठिकाणी मिळतील त्यांच्या जवळ मनापासून जिवंत माणसा पर्यत पोचले पाहिजे. माणूस असेल तर समाज असेल समाज नसेल तर माणूस म्हणून कुठे नोंद होत नाही, म्हणूनच मनापासून जिवंत माणसा पर्यत ही संघ भावना असावी.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई

मनोज भाईची रिपब्लिकन एक्सप्रेस सुटली

 मनोज भाईची रिपब्लिकन एक्सप्रेस सुटली



      विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.हे एक रोपटे त्यांनी लावले होते.त्यांनी त्यावेळीच सांगितले होते की मी एका खडकाळ जमिनीवर बीज टाकतो,त्याचे रोपटे होईल की नाही यांची प्रथम मलाच शास्वती नाही. रोपट्याचा महावृक्ष होऊन त्याला गोड फळे लागतील की हे ही सांगता येत नाही. हे सत्य आहे.एका रोपट्याचे झाड होते,लोक झाडाला ओळखतात.पण रोपटे लावणारा व त्याला पाणी घालणार याला मात्र लोक विसरतात.पण हे सहज आणि सर्वत्र घडणारे आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन मुंबई वरून दिल्ली कडे निघाली त्यात अनेक जिल्हातील प्रमुख नेते रेल्वे स्टेशनवर प्रवाशी  चढले आपल्या जागेवर बसले.पण त्यांचे दिल्ली पर्यंत कसे जावे यावर चर्चा करून एकमत होत नव्हते.त्यात वादविवाद होऊन एक एक नेता ट्रेन मधून खाली उतरत होता. त्यात १२ मे ला मनोज भाई संसारे कायमस्वरूपी त्या ट्रेन मधून उतरले. 
      विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन मुंबई वरून प्रथम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरने आवश्यक होती.पण आम्ही ट्रेन आणली चालू केली आहे.आणि तिच्यात बसून आम्ही दिल्लीला जात आहोत. असे सांगितल्यामुळे दर स्टेशनला इतर नवे प्रवाशी चढत होते.येणाऱ्या नव्या प्रवाशी नेत्यात आणि मुंबई वरून सून आलेल्या नेत्यात,उभे राहण्यावरून,आपला किंवा त्याचा धक्का लागण्यावरून प्रत्येक स्टेशनला वाद होवू लागले. इथ ट्रेन थांबवा.आम्ही म्हणू तेव्हाच चालू कराट्रेन चा ड्रायव्हर नीट नाही. याचा राग प्रत्येकाला येवू लागला. आम्ही डोकं शांत न ठेवता आप आपसात भांडू लागलो,सर्वांना भांडताना वाटते मी ट्रेन आणली मीच चालू केली, तरी काही प्रवाशी जिल्हा प्रमुख नेत्यांनी आप आपसात गोड बोलून ट्रेन मधे बसून राहून नाराजी मिटविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांची मने वळवण्याचा मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला.काही प्रवाशी प्रामुख नेत्यांना त्याचा उलट राग आला. आणि ते पुढच्या रेल्वे स्टेशनवर उतरून गेले.मुंबई वरून दिल्लीला जाता जाता या ट्रेन मध्ये सगळे भांडखोर प्रवाशी प्रमुख नेते चढले आहेत, असे म्हणत जिल्हा प्रमुख नेते राग येवून नाशिक,जळगांव,शेगांव अकोला,वर्धा,नागपुरात गाडीतून उतरून जातात.ट्रेन सोडून देणे यात त्या वेळी त्यांना जिल्हा प्रमुख नेत्यांना मोठ्ठी बुद्धिमता वाटत होती.पण ते जरी उतरले तरी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन दिल्लीला जाणार थांबणार होती का? तर बिलकुल नाही?आता प्रत्येक जिल्हा प्रमुख नेत्यांना वाटते ती ट्रेन दूर गेल्यावर जर आम्हाला वाटत असेल की ही ट्रेन आम्ही सुरू केली होती. आणि ती दूर गेली.तर यात आम्ही ट्रेन पासून दूर झालो हा आमचा दोष असला पाहिजे.ट्रेन तर कशी तरी दिल्लीला गेली आणि स्थिर झाली.
         एका चांगल्या मित्रा बरोबर केव्हा केव्हा मतभेद भांडणे होतच असतात.परिवारात आईवडील बायको मुले,यांच्या बरोबर आमची रोज काही नाही काही कुरबुर किरकिर होत असते. आणि जगात वावरतांना कोण कुठे कसा आणि कधी भांडेल याची काही शाश्वती नसते. रोज अनेकाशी मतभेद होत असतात. म्हणून राग येवू आम्ही घरी बसलो तर आपण घरात आणि जग पुढे गेलेले असेल. म्हणून या जगात वावरताना शांत बुध्दीने आणि शांत चित्ताने आपले कार्य करीत राहणे व आपला मार्गक्रमण करीत राहणे यातच खरी बुद्धिमत्ता असते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन हे सर्व जिल्ह्यातील प्रमुख,कार्यकर्त्या व नेत्यासाठी कॉमन लीहले आहे.अनेक नेते रिपब्लिकन व्यापकता सोडून जातात आणि नवीन रिपब्लिकन ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे समाजाचे,चळवळीचे आणि नेत्याचे मोठे न भरून येणारे नुकसान होते.रिपब्लिकन युवानेते अशी प्रतिमा निर्माण होत असतांना मनोज भाई रिपाई पासून वेगळे झाले.पुढे त्यांचा प्रवास आपल्या समोर आहेच.
     स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते व युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष,संगीत कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननिय मनोजभाई संसारे यांचे आज शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी अल्पशा आजाराने वडाळा मुंबई येथे दुखःद निधन झाले.त्यांच्या कर्तुत्वान झुंजार स्मृतींना भावपूर्ण आदरांजली!.वाहणारा लेख पाठवा असा अनेक संपादक व पत्रकार मित्राचा कॉल आला होता.त्यावेळी मी कुटुंबासोबत मुंबई बाहेर होतो.त्यामुळेच मनोज भाईच्या अंतयात्रा व अंतिम संस्कार मध्ये सहभागी होऊ आणि लिहू शकलो नाही.
मनोज संसारे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. त्यांना पक्षाघातही झाला होता.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता.शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली.आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पँथर,आक्रमक,प्रभावी वक्ता आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाई संसारे यांचे वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी त्यांची दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चातआई मीराताई संसारे,पत्नी, सुर्यकांत,मुलगा अनिकेत,मुलगी प्रियांका, दोन भाऊ सागर,सुमित संसारे,बहिण सुषमा असा असा परिवार आहे.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते व युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष,संगीत कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननिय मनोजभाई संसारे या आपल्या लाडक्या,लढवय्या अभ्यासू नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील हजारो कार्यकर्ते वडाळ्यातील कोरबा मिठागर येथे जमले आहेत.

     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते रामदास आठवले यांच्यासोबत रिपब्लिकन युवक नेते म्हणून मनोज संसारे हे सुरुवातीला काम करत होते.ते विद्यार्थीदशे पासूनच रिपब्लिकन चळवळीत कार्यरत होते. प्रभावी वक्ते आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांनी अल्पावधीतच लौकीक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पँथर नेते भाई संगारे यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. भाई संगारे यांच्या निधानानंतर मनोज संसारे यांनी युथ रिपब्लिकन या पक्षाची स्थापना करून गावागावात पक्ष वाढवण्याचं काम सुरू केलं होतं. या कालावधीत ते दोनदा वडाळा पूर्व कोरबा मिठागरमधून मुंबई महानगरपालिका मध्ये दोनदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. एकदा त्यांची आई मीराताई संसारे या ही नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.संसारे यांनी दोनदा विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. या पक्ष उभारणीत त्यांना प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आजच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि ज्येष्ठ संपादक सुनील खोबरागडे यांची साथ लाभली होती. संसारे यांनी समाजातील कलावंताना संघटीत करून त्यांच्या समस्यांना सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते हिरहिरीने भाग घेत होते.

       मुंबई महानगरपालिका बेस्ट च्या कामगारांना त्यांनी संघटीत करून न्याय मिळवून दिला होता.कामगार चळवळीत त्यांचे लक्षवेधी योगदान होते.रेल्वे कामगारांच्या वार्षिक अधिवेशनात ते आणि मी अतिथी वक्ते म्हणून अनेकदा एका विचारपिठावर आलो होतो. मनमाडला परिसंवाद मध्ये असंघटीत कामगारांच्या समस्या आणि उपाय या विषयावर त्यांनी मला बोलण्यासाठी जास्त वेळ दिला होता.त्याच बरोबर लोकशाहीर वामनदादा कर्डक,प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भांडुपला कलावंताचा मेळावा तीन वर्ष घेतला होता.अखिल भारतीय रेल्वे शुशाहीन कामगार संघटनेच्या वतीने बुद्ध गया येथील कालचक्र मैदानात दहा हजार चर्मकार समाजाला बुद्ध धम्म दीक्षा देण्याचा समारंभ मनोज भाई संसारे ,सुनिल खोबरागडे यांचा उपस्थिती झाला होता.मनोज भाई हे सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असायचे.दरवर्षी महापरीनिर्वाण दिनाला त्यांच्या मंडपात हजारो लोकांना मोफत भोजन दान मिळत होते.त्याच बरोबर शिवाजी पार्कच्या मैदानात त्यांचा तथागत बुद्धाचा व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याने सर्वांचे लक्षवेधल्या जात असते.असा आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेत्याचे अल्प आजाराने वयाच्या ५८ व्या वर्षी जाणे समाजासाठी चळवळीसाठी मोठी हानीकारक आहे.असे आक्रमक अभ्यासू कार्यकर्ते,नेते घडविण्यास खूप वेळ लागतो.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते व युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष,संगीत कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननिय मनोजभाई संसारे या आपल्या लाडक्या,लढवय्या अभ्यासू नेत्याला भावपूर्ण श्रदांजली.

सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.