मनोज भाईची रिपब्लिकन एक्सप्रेस सुटली
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.हे एक रोपटे त्यांनी लावले होते.त्यांनी त्यावेळीच सांगितले होते की मी एका खडकाळ जमिनीवर बीज टाकतो,त्याचे रोपटे होईल की नाही यांची प्रथम मलाच शास्वती नाही. रोपट्याचा महावृक्ष होऊन त्याला गोड फळे लागतील की हे ही सांगता येत नाही. हे सत्य आहे.एका रोपट्याचे झाड होते,लोक झाडाला ओळखतात.पण रोपटे लावणारा व त्याला पाणी घालणार याला मात्र लोक विसरतात.पण हे सहज आणि सर्वत्र घडणारे आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन मुंबई वरून दिल्ली कडे निघाली त्यात अनेक जिल्हातील प्रमुख नेते रेल्वे स्टेशनवर प्रवाशी चढले आपल्या जागेवर बसले.पण त्यांचे दिल्ली पर्यंत कसे जावे यावर चर्चा करून एकमत होत नव्हते.त्यात वादविवाद होऊन एक एक नेता ट्रेन मधून खाली उतरत होता. त्यात १२ मे ला मनोज भाई संसारे कायमस्वरूपी त्या ट्रेन मधून उतरले.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन मुंबई वरून प्रथम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरने आवश्यक होती.पण आम्ही ट्रेन आणली चालू केली आहे.आणि तिच्यात बसून आम्ही दिल्लीला जात आहोत. असे सांगितल्यामुळे दर स्टेशनला इतर नवे प्रवाशी चढत होते.येणाऱ्या नव्या प्रवाशी नेत्यात आणि मुंबई वरून बसून आलेल्या नेत्यात,उभे राहण्यावरून,आपला किंवा त्याचा धक्का लागण्यावरून प्रत्येक स्टेशनला वाद होवू लागले. इथ ट्रेन थांबवा.आम्ही म्हणू तेव्हाच चालू करा. ट्रेन चा ड्रायव्हर नीट नाही. याचा राग प्रत्येकाला येवू लागला. आम्ही डोकं शांत न ठेवता आप आपसात भांडू लागलो,सर्वांना भांडताना वाटते मी ट्रेन आणली मीच चालू केली, तरी काही प्रवाशी जिल्हा प्रमुख नेत्यांनी आप आपसात गोड बोलून ट्रेन मधे बसून राहून नाराजी मिटविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांची मने वळवण्याचा मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला.काही प्रवाशी प्रामुख नेत्यांना त्याचा उलट राग आला. आणि ते पुढच्या रेल्वे स्टेशनवर उतरून गेले.मुंबई वरून दिल्लीला जाता जाता या ट्रेन मध्ये सगळे भांडखोर प्रवाशी प्रमुख नेते चढले आहेत, असे म्हणत जिल्हा प्रमुख नेते राग येवून नाशिक,जळगांव,शेगांव अकोला,वर्धा,नागपुरात गाडीतून उतरून जातात.ट्रेन सोडून देणे यात त्या वेळी त्यांना जिल्हा प्रमुख नेत्यांना मोठ्ठी बुद्धिमता वाटत होती.पण ते जरी उतरले तरी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन दिल्लीला जाणार थांबणार होती का? तर बिलकुल नाही?. आता प्रत्येक जिल्हा प्रमुख नेत्यांना वाटते ती ट्रेन दूर गेल्यावर जर आम्हाला वाटत असेल की ही ट्रेन आम्ही सुरू केली होती. आणि ती दूर गेली.तर यात आम्ही ट्रेन पासून दूर झालो हा आमचा दोष असला पाहिजे.ट्रेन तर कशी तरी दिल्लीला गेली आणि स्थिर झाली.
एका चांगल्या मित्रा बरोबर केव्हा केव्हा मतभेद भांडणे होतच असतात.परिवारात आईवडील बायको मुले,यांच्या बरोबर आमची रोज काही नाही काही कुरबुर किरकिर होत असते. आणि जगात वावरतांना कोण कुठे कसा आणि कधी भांडेल याची काही शाश्वती नसते. रोज अनेकाशी मतभेद होत असतात. म्हणून राग येवू आम्ही घरी बसलो तर आपण घरात आणि जग पुढे गेलेले असेल. म्हणून या जगात वावरताना शांत बुध्दीने आणि शांत चित्ताने आपले कार्य करीत राहणे व आपला मार्गक्रमण करीत राहणे यातच खरी बुद्धिमत्ता असते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची रिपब्लिकन एक्सप्रेस ट्रेन हे सर्व जिल्ह्यातील प्रमुख,कार्यकर्त्या व नेत्यासाठी कॉमन लीहले आहे.अनेक नेते रिपब्लिकन व्यापकता सोडून जातात आणि नवीन रिपब्लिकन ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे समाजाचे,चळवळीचे आणि नेत्याचे मोठे न भरून येणारे नुकसान होते.रिपब्लिकन युवानेते अशी प्रतिमा निर्माण होत असतांना मनोज भाई रिपाई पासून वेगळे झाले.पुढे त्यांचा प्रवास आपल्या समोर आहेच.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते व युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष,संगीत कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननिय मनोजभाई संसारे यांचे आज शुक्रवार दिनांक १२ मे २०२३ रोजी अल्पशा आजाराने वडाळा मुंबई येथे दुखःद निधन झाले.त्यांच्या कर्तुत्वान झुंजार स्मृतींना भावपूर्ण आदरांजली!.वाहणारा लेख पाठवा असा अनेक संपादक व पत्रकार मित्राचा कॉल आला होता.त्यावेळी मी कुटुंबासोबत मुंबई बाहेर होतो.त्यामुळेच मनोज भाईच्या अंतयात्रा व अंतिम संस्कार मध्ये सहभागी होऊ आणि लिहू शकलो नाही.
मनोज संसारे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. त्यांना पक्षाघातही झाला होता.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होता.शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली.आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पँथर,आक्रमक,प्रभावी वक्ता आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाई संसारे यांचे वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी त्यांची दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चातआई मीराताई संसारे,पत्नी, सुर्यकांत,मुलगा अनिकेत,मुलगी प्रियांका, दोन भाऊ सागर,सुमित संसारे,बहिण सुषमा असा असा परिवार आहे.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते व युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष,संगीत कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननिय मनोजभाई संसारे या आपल्या लाडक्या,लढवय्या अभ्यासू नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील हजारो कार्यकर्ते वडाळ्यातील कोरबा मिठागर येथे जमले आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते रामदास आठवले यांच्यासोबत रिपब्लिकन युवक नेते म्हणून मनोज संसारे हे सुरुवातीला काम करत होते.ते विद्यार्थीदशे पासूनच रिपब्लिकन चळवळीत कार्यरत होते. प्रभावी वक्ते आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांनी अल्पावधीतच लौकीक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पँथर नेते भाई संगारे यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. भाई संगारे यांच्या निधानानंतर मनोज संसारे यांनी युथ रिपब्लिकन या पक्षाची स्थापना करून गावागावात पक्ष वाढवण्याचं काम सुरू केलं होतं. या कालावधीत ते दोनदा वडाळा पूर्व कोरबा मिठागरमधून मुंबई महानगरपालिका मध्ये दोनदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. एकदा त्यांची आई मीराताई संसारे या ही नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.संसारे यांनी दोनदा विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. या पक्ष उभारणीत त्यांना प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आजच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि ज्येष्ठ संपादक सुनील खोबरागडे यांची साथ लाभली होती. संसारे यांनी समाजातील कलावंताना संघटीत करून त्यांच्या समस्यांना सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते हिरहिरीने भाग घेत होते.
मुंबई महानगरपालिका बेस्ट च्या कामगारांना त्यांनी संघटीत करून न्याय मिळवून दिला होता.कामगार चळवळीत त्यांचे लक्षवेधी योगदान होते.रेल्वे कामगारांच्या वार्षिक अधिवेशनात ते आणि मी अतिथी वक्ते म्हणून अनेकदा एका विचारपिठावर आलो होतो. मनमाडला परिसंवाद मध्ये असंघटीत कामगारांच्या समस्या आणि उपाय या विषयावर त्यांनी मला बोलण्यासाठी जास्त वेळ दिला होता.त्याच बरोबर लोकशाहीर वामनदादा कर्डक,प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भांडुपला कलावंताचा मेळावा तीन वर्ष घेतला होता.अखिल भारतीय रेल्वे शुशाहीन कामगार संघटनेच्या वतीने बुद्ध गया येथील कालचक्र मैदानात दहा हजार चर्मकार समाजाला बुद्ध धम्म दीक्षा देण्याचा समारंभ मनोज भाई संसारे ,सुनिल खोबरागडे यांचा उपस्थिती झाला होता.मनोज भाई हे सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असायचे.दरवर्षी महापरीनिर्वाण दिनाला त्यांच्या मंडपात हजारो लोकांना मोफत भोजन दान मिळत होते.त्याच बरोबर शिवाजी पार्कच्या मैदानात त्यांचा तथागत बुद्धाचा व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याने सर्वांचे लक्षवेधल्या जात असते.असा आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेत्याचे अल्प आजाराने वयाच्या ५८ व्या वर्षी जाणे समाजासाठी चळवळीसाठी मोठी हानीकारक आहे.असे आक्रमक अभ्यासू कार्यकर्ते,नेते घडविण्यास खूप वेळ लागतो.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते व युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष,संगीत कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननिय मनोजभाई संसारे या आपल्या लाडक्या,लढवय्या अभ्यासू नेत्याला भावपूर्ण श्रदांजली.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा