भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांच्या जीवन कार्याची युवापिढीला माहिती होण्यासाठी
स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मान.एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मंत्रालयात निवेदन देण्यात आले आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांच्या जीवन कार्याची युवापिढीला माहिती होण्यासाठी १) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन मुंबई गिरणी कामगार,क्रिडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन पश्चिम मुंबई ४०००१३,येथे रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांचा पूर्ण पुतळा बसविण्यात यावा.२) रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांचे मंत्रालयात मुख्य प्रवेशद्वार लॉबी मध्ये तैलचित्र लावण्यात यावे,महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयात रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांचा फोटो लावण्यात आला पाहिजे,कारण तेच रविवार च्या सुट्टीचे जनक आहेत.३) रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांच्या विषयी साहित्य पुस्तक प्रकाशन महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले पाहिजे.४) महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे कामगार प्रशिक्षण केंद्र,उभारून त्यात १०/१२वी/एम पी एस सी,यु पी एस सी,आय ए एस,आय पी एस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले पाहिजे.५) रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे जन्मगावी स्मारक बांधून त्यात त्यांचा पुतळा,बसवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे.६) रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांची जयंती,स्मुर्तीदिन शासकीय कार्यालयात शाळा महाविद्यालयात साजरी करण्यात आली पाहिजे.७) रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांचे डाक तिकीट केंद्राने प्रकाशित केले होते ते पुन्हा प्रकाशित करण्यात आले पाहिजे.८) रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांच्या नांवे एक शासकीय समिती स्थापन करण्यात यावी त्यामध्ये १५ समिती सदस्य असावेत, म्हणून १) सेवानिवृत्त आय ए एस, २ प्रतिनिधी,२) सेवानिवृत्त आय पी एस,आय जी २ प्रतिनिधी,३) कामगार संघटना ३ प्रतिनिधी ,४) पत्रकार,संपादक,२ प्रतिनिधी,५) समाज सेवक एम एस डब्ल्यू २ प्रतिनिधी,६) साहित्यिक २ प्रतिनिधी, ७) शिक्षण क्षेत्रातील २ तज्ञांचा समावेश असावा.
भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघांजी लोखंडे यांच्या जीवन कार्याची युवापिढीला माहिती होण्यासाठी वरील महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन त्यावर गांभीर्याने चर्चा व्हावी यासाठी आयु.सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.यांनी मान.देवेंद्र फडणवीस - उपमुख्यमंत्री मान.अजि तदादा पवार - उपमुख्यमंत्री,मान.सुरेश खाडे - कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य,मान.मुख्य कामगार सचिव,मान.रविराज इंळवे-कल्याण आयुक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांना ही निवेदन देण्यात आले आहे.
आपला नम्र
आयु.सागर रामभाऊ तायडे
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा