भिक्खू सर्व लोकांना धम्माच्या प्रकाशाने प्रकाशित करतो.
वर्षावास समारंभ व कठिण चिवरदान संपन्न
विशेष प्रतिनिधी मुंबई-
"यो हवे दहरो भिक्खू युज्ज्ती बुद्धशासने,सोम लोकं पभासेती अब्भा मुत्तोव चंदिमा"
याचा अर्थ जो भिक्खू कमी वयामध्ये प्रवज्जीत होऊन बुद्ध शासणात सहभागी होतो.तो भिक्खू जशाप्रकारे चंद आकाशात सर्व तारे व ग्रहांना प्रकाशित करतो.तशाच प्रकारे तो भिक्खू सर्व लोकांना धम्माच्या प्रकाशाने प्रकाशित करतो.
भगवान बुद्धाने हिमालयाच्या अनवतप्त सरोवरात पाचशे अरहन्तांसमवेत कठिण चीवर दानाचे फळ अपरिमित असल्याचे अनेक गाथांमधून विशद केलेले आहे. बुद्ध विनयानुसार ज्या विहारात भिक्खु वर्षावास अधिष्ठान करतात त्या विहारात कठिण चीवर दान सोहळा आयोजित करुन उपासक उपासिका यांनी अधिष्ठानीत भिक्खु यांना कठिण चीवर अनुमोदन करायचे असते.
पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली जयभिम नगर बुद्ध विहार हिरानंदानी पवई येथे पूज्य भदंत संघप्रिय,पूज्य भदंत शिलबोधी,पूज्य भदंत पद्मपाणी,पूज्य भदंत बोधीशील,पूज्य भदंत उपली,पूज्य भदंत करुणासागर यांनी वर्षावास काळामध्ये विविध अभिनव उपक्रम राबविले आहेत,पवई परिसरातील संपूर्ण बुद्ध विहारामध्ये जाऊन धम्म देशना देऊन उपसाकांमध्ये धम्माविषयी जनजागृती केली.तथागतांचे बाबासाहेबांचे विचार सांगून उपासक उपासिकांमध्ये बुद्ध धम्म,आणि संघ या तिन्ही रत्नाप्रती श्रद्धा निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे.त्या सर्व उपक्रमाचा व वर्षावासाचा सांगता समारोप दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून थाईलंड आणि लाओसा या देशातील भिख्खू,भिख्खूनी उपासक,उपासिका लाभली होती. त्याच बरोबर वर्षावास अधिष्ठान पुण्यवितरण व कठिण चीवरदान सोहळ्यास महाराष्ट्र व भारतातील वरिष्ठ भिक्खू संघाच्या मंगलमय उपस्थितीमध्ये रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला.
"कठिण चीवर" म्हणजे एका रात्रीत रूई पासून तयार केलेले चीवर होय. परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याकडे तयार असलेले चीवराला कमीत कमी पाच भिक्खुंसमोर आणून "इमं कठिण चीवरं भिक्खुसंघ देम, कठिणं अत्थरितुं" असे बोलून संघाला दिले जाते. यावेळी 'विनय कम्मवाचाचे' पठण केले जाते.जयभिम नगर बुद्ध भूमी वेलफेयर असोसिएशन द्वारा मुंबईतील उच्चभू हिरानंदानी गार्डन कोलगेट ऑफिस समोर पवई मध्ये जयभिम नगर बुद्ध विहारात कठिण चीवर दानोत्सव या कार्यक्रमांसाठी दान पारमिता संपादन करण्यासाठी मुंबईतील जागरूक उपासक उपासिका दरवषी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.मुंबईतील जागरूक उपासक -उपासिका यांनी दान पारमिता चीवर दान १,५०० + अन्य भोजन खर्च देऊन पुण्य संपादन करून सहपरिवार उपस्थित राहून व अनमोल मानवी जीवनातील पारमि वृद्धिंगत केली.
पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो (बुद्धगया) पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो (संघानुशासक) पूज्य भदंत धम्मरत्न,पूज्य भदंत शांतीरत्न,पूज्य भदंत विरत्न,पूज्य भदंत के.आर लामा थेरो,पूज्य भदन्त धम्मरत्न महाथेरो,पूज्य भदंत डॉ.एन.आनंद महाथेरो,पूज्य भदंत शासनक्रांती महाथेरो,पूज्य भदंत संघकिर्ती महथेरो,पूज्य भदंत विनयबोधी महाथेरो,पूज्य भदंत करुणाज्योती महाथेरो,पूज्य भदंत मिलिंदबोधी महाथेरो,पूज्य भदंत ज्योतीरत्न महाथेरो,पूज्य भदंत संघपाल महाथेरो,पूज्य भदंत बोधिशील थेरो,पूज्य भदंत बोधानंद थेरो,पूज्य भदंत सुगतानंद थेरो,पूज्य भदंत महामोग्गल्यान,पूज्य भदंत कीर्तीपियो पूज्य भदंत नागसेन,पूज्य भदंत बोधानंद थेरो,पूज्य भदंत सारिपुत्त,पूज्य भदंत महिंदानंद,पूज्य भदंत विनयबोधि,पूज्य भदंत धम्मपाल,पूज्य भदंत धम्मतप,पूज्य भदंत विनयशील,पूज्य भदंत संघरत्न,पूज्य भदंतदीपंकर,पूज्य भदंत शांतीरक्षित, पूज्य भदंत सत्यधम्म,पूज्य भदंत संघसेन,पूज्य भदंत गुनरत्न,पूज्य भदंत सदानंद,पूज्य भदंत अधिचित्तो,पूज्य भदंत आनंद,पूज्य भदंत बुद्धप्रिय,पूज्य भदंत धम्मराज,पूज्य भदंत कीर्तीबोधी,प्रियरत्नबोधी, पूज्य भदंसंघरत्न,पूज्य भदंत सम्यक बोधी,पूज्य भदंत सारीपुत्त,पूज्य भदंत मुदितानंद,पूज्य भदंत महेंद्र,पूज्य भदंत संघपाल,पूज्य भदंत महेंद्रबोधी,पूज्य भदंत दीपंकर,पूज्य भदंत बोधिधम्म,पूज्य भदंत भद्रशील,पूज्य भदंत अमृतानंद बोधी,पूज्य भदंत करुणानंद,पूज्य भदंत कश्यप,पूज्य भदंत नागसेन,पूज्य भदंत प्रज्ञाज्योती,पूज्य भदंतधम्मलोका,पूज्य भदंत अनिरुद्ध थेरो,पूज्य भदंत बुद्धरत्न शंभर च्या पेक्षा जास्त पूज्य भदंत उपस्थित होते.थाईलंड आणि लाओसा या देशातील भिख्खू, भिख्खूनी उपासक,उपासिका प्रत्येकी हजार रुपये दान दिले तर मुंबईतील उपासक,उपासिका यांनी दानपात्र फिरून जमा झालेल्या दानांतून प्रत्येकी एक हजार रुपये दान देण्यात आले.त्याच बरोबर अनेक जीवना आवश्यक अष्टपरिष्कार अर्थात चप्पल,टॉवेल,रुमाल,बॉटल,बंग चादर,बेडसिट अनेक वस्तू,कपडे मुंबईतील उपासक,उपा सिका यांच्या वतीने दान देण्यात आले. पूज्य भदंत शिलबोधी यांनी सर्व उपस्थित भिक्खू संघ आणि धम्म उपासक उपासिका यांनी वर्षावास समारंभ व कठिण चिवरदान सभारंभाला उपस्थिती दाखवली त्याबद्ल आभार मानले.पूज्य भदंत शिलबोधी ८६२३८८७३२४.संयोजक महाराष्ट्र युवा संघ तसेच पवई परिसरातील सर्व उपासक उपसिकांनी यांनी वर्षावास समारंभ व कठिण चिवरदान सभारंभ यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
सागर रामभाऊ तायडे यांसकडून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा