मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

मुस्लिम समाजाचे देशाच्या मातीशी आणि विचारांशी घट्ट नातं

 मुस्लिम समाजाचे देशाच्या मातीशी आणि विचारांशी घट्ट नातं



          एन आर सी आणि सी ए ए मूळे सर्वात जास्त मुस्लिम समाजाला टार्गेट केले गेले आणि देशातील नोट बंदी,भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी या मूळ समस्या कडून लक्ष दुसरीकडे वळविण्यात मोदी सरकार यशस्वी झाले.पण हे सांगितल्या गेले नाही की या बिलाची कायद्याच्या चौकटीत अंमलबजावणी सुरू झाली तर सर्वात जास्त मागासवर्गीय जाती,जमाती,भटक्या,विमुक्तया, आदिवासी आणि अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम समाजातील लोक एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक म्हणून नांव नोंदणी केली जाणार नाही. कारण मूळ कागदपत्रे सादर करण्यात हे सर्व घटक अपयशी ठरले जातील.परंतु हे घुसखोर नाहीत तर हजारो वर्षांपासून या देशाच्या मातीशी आणि विचारांशी घट्ट नातं जोडलेल लोक आहेत.
       आसाम मध्ये नागरिकता कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा त्यात आसाम मध्ये राहणारे अडीच लाख आदिवासी आपले पुरावे देवू न शकल्यामुळे आज सरकारी बंदी म्हणून जेल मध्ये आहेत. कारण ते 1947 च्या आधीचे व 1971 पर्यंतचे पुरावे देवू न शकल्याने त्यांना भारतीय नाहीत म्हणून सांगितले गेले. आपल्या कडे जर नागरिकता कायदा आला तर आपण कुठून कागद देणार?.लोक आपल्याला सांगतात की आधारकार्ड, मतदान कार्ड व रेशनकार्ड,जातीचे दाखले हे पुरावे आहेत. पण मतदान कार्ड 1995 ला आले, आधारकार्ड 2008 आले व रेशनकार्ड हे रहिवासी पुरावा मानला जात नाही ह्या NRC व CAA मधे सर्वांचे 1971 च्या आधीचे आजोबा किंवा वडिलांचा जन्म दाखला किंवा जमीनीचा सात बारा हेच पुरावा मानला जाईल. हे मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक समाजाकडे तर अजिबात नाही. म्हणून आपणास ह्या कायद्याला केवळ मुस्लिम समाजातील लोक विरोध करतात.तेच भारतातील बहुसंख्य हिंदूंचे शत्रू आहेत असे भाषविल्या गेले.त्यामुळेच विशिष्ट समाजाचे तीन टक्के लोक म्हणजेच मान्यताप्राप्त पत्रकार,संपादक,विचारवंत,साहित्यिक वृत्तवाहिन्याचे निवेदक सूत्रसंचालक मुस्लीम समाजा कडून मोठा धोका असल्याचे चित्र निर्माण करतात.
        दुसरीकडे अनेक राज्यातील आदिवासीचा सुप्रीम कोर्टात असलेला वन हक्क कायद्या बाबत ही सूनवाई सारखी टाळली जात आहे. केंद्र सरकार संविधानाच्या चौकटीत काम करतांना दिसत नाही.तर मनुस्मृतीची अंमलबजावणी करतांना दिसत आहे.आर्य भटा ब्राह्मणांनी या देशातील मातीशी व विचारांशी वेळोवेळी बेईमानी करून सौदेबाजी केली आहे. राज्यकर्त्यांना बायका,पोरी देऊन कट कारस्थाने करून प्रत्येक वेळी दगाबाजी केल्याचा इतिहास आहे.भारतातील थोर मुस्लिम पराक्रमी योद्धे महापुरुषांना साथ देणारे नेहमी प्रकाश झोतापासून अलिप्त राहुन देशसेवा करणारे मुस्लिम इतिहासाच्या पांनापानांवर दिसणारे आहेत.सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध लढा देणारे हजरत.टीपू सुलतान व बंगालचे नवाब सिराजुदौला मुस्लिम समाजातील होते. 1857 च्या उठावामध्ये दिल्ली पर्यन्त फासावर लटकवलेले 58000 मौलवी व त्यांचे असंख्य अनुयायी मुस्लिम समाजातील होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यानी अफजल खानाचा कोथला काढला ती ख़ास वाघनखे बनवून देणारे रुस्तुमे जमाल हनेनान मुस्लिम होता.अफजल खानाचा कोथला काढला हे नेहमी सांगितले जाते, पण शिवाजी महाराजांच्या मानेवर तलवार चालविणारा भास्कर कुलकर्णी सांगितल्या जात नाही.वैचारिक निष्ठा आणि पैशासाठी नोकरी करणारे यातील फरक कळला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते ते केवळ पैसा साठी चाकरी करीत नव्हते.त्यात स्वराज्य निष्ठा आणि वैचारिक बांधीलकी होती.शिवाजी महाराजांचे एकमेव वकील काझी हैदर मुस्लिम होता.हा इतिहास सोयीस्करपणे टाळला जातो.
          महात्मा फुलेंना पुन्हा शाळेत टाकायला सांगणारे मुन्शी गफ्फार शेख, महात्मा फुलेना घर व शाळेसाठी जागा देणारे उस्मान शेख,राष्ट्रमाता सावित्रीआई ला शिक्षणात मदत करणारी सहशिक्षीका फातिमा शेख कोण?. उस्मान शेखची बहीण,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना  जगप्रसिद्ध चवदार तळे आंदोलनाला आपली जागा देणारे फतेह खान, महात्मा गांधीच्या प्रभावाने दिड लाख पठाणांसहित अहिंसक सेना ऊभारणारे खान अब्दुल गफार खान.शहीद भगतसिंगला त्याच्या गुप्त ठिकाणावर भोजन पाठवणारे नसीम चंगेजी. बाबासाहेबांना घटनासमिती वर जाता यावे म्हणून तेव्हाच्या प. बंगालच्या आता बांग्लादेश, च्या मुस्लिमांनी बाबासाहेबांना निवडून आणले म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले.हा इतिहास मागासवर्गीय,आदिवासी अल्पसंख्याक समाज विसरला असेल पण ब्राह्मण समाज विसरायला तयार नाही.म्हणूनच तो प्रत्येक वेळी वेगवेगळे कट कारस्थाने करून सर्व मागासवर्गीय,आदिवासीयांना हिंदू म्हणून एकत्र करतो आणि मुस्लिम समाजा विरोधात दंगली घडविण्याचे नियोजन करतो.हा खरा इतिहास सर्वाना मागासवर्गीय,आदिवासी, अल्पसंख्याक समाजातील जागरूक नागरिकांनी,कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वाचला पाहिजे. आप आपल्या समाजात प्रबोधन शिबीर घेऊन जनजागृती केली पाहिजे.
          भारतीय मुस्लिम बांधवानी कोणत्याही राजकीय पक्षात जातांना आर्थिक स्वार्थ, व्यक्तिगत पदाची लालसा दूर ठेवून देशहितासाठी समाजहितासाठी वैचारिक दृष्टीने जागरूक राहिले पाहिजे. ब्राह्मणांच्या पोरी बायका मिळतात म्हणून समाजद्रोही होऊ नये. किती ब्राह्मणांच्या पोरी,एस सी,एसटी व मुस्लिमांच्या घरात आहेत हे सांगण्यासाठी हा लेख नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभा मध्ये कोणी निवडून पाठविले.   ते बंगालचे 48% मुस्लीम समजाचे लोक होते.तोच प्रदेश आज बांगलादेशात का गेला?. इतिहास वाचा मुस्लीम देशाच्या मातीशी प्रामाणिक आहेत. एक दोन माथेफेरू चुकीचे वागतात म्हणूनच सर्व समाज नालायक बदमाश ठरविला जात आहे. तोच कायदा राष्ट्रपिता महात्मा गांधीला गोळ्या मारणाऱ्या नथुराम गोडसेला का लावला जात नाही?. सकाळी उठल्यावर राम नाम सत्य है का म्हटल्या जात नाही?.
        देशाचे दुश्मन मुसलमान नाहीत तर राज्यकर्ते आहेत. ज्यांच्या मतदानाने हे निवडून आले तेच मतदार त्याचे मतदार यादीतील नांव आणि निवडणूक ओळख पत्र भारताचे नागरिक होण्यास पात्र नाही ?. मग प्रथम सर्व मतदार याद्यातील नांवे रद्ध करा जे एन आर सी म्हणजे National Register of Citizens रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक आहेत त्यांच्या कडून लोकसभेच्या प्रतिनिधीची निवड करा. भारतात असे भासविले जाते कि मुसलमान   देशाचे दुश्मन आहेत.असे असते तर अकबर बादशहा चा सेनापति मानसिंह एक हिन्दू नसता. आणि महाराणा प्रताप सिंग यांचा सेनापति हकीम खां एक मुसलमान नसता.
जेव्हा जेव्हा यांचे कट कारस्थान उघड होते तेव्हा तेव्हा यांना धोका निर्माण होतो.त्यावेळीच हे सांगतात देश खतरा मै है. देश खातरयत कधीच नसतो असे तर यांनी सत्ता आणि कुर्सी त्यासाठीच देशात सर्वात संवेदशील समाज म्हणून हिंदू म्हणजे ८५ टक्के मागासवर्गीय,आदिवाशी आणि मुस्लीम समाजात भावनिकदृष्ट्या दंगली लावल्या जातात 
मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक यांना सरकार मुलभूत अधिकार देण्यास असमर्थ ठरते तेव्हाच सर्व देशाच्या नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असे मनुस्मृती प्रणित कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न होत आहे.त्यासाठी हिंदू असो या मुस्लीम यांनी देशाच्या मातीशी वैचारिकता दाखवून शांत राहून भारतीय संविधानाच्या चौकटीत न्याय मागितला पाहिजे.भारताचे जागृत नागरिक म्हणून आपण जागे राहिलो नाही तर भयंकर परिणाम सर्व देशवासीयांना भोगावे लागतील.
          आजचे आर एस एस प्रणित मोदी सरकार हिंदू मुस्लीम समाजा समोर जेवणाची पंचपक्वान असलेली थाळी ठेवून आहे. पण तुमचे हात व तोंड बांधून ठेवत आहे.ज्यांना तुम्ही मतदार म्हणून निवडून दिले तेच तुम्हाला भारताचे नागरिक असण्याचे सिद्ध करण्यास सांगत आहेत. हिंदू मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना वाटते एन आर सी फक्त मुस्लीम समाजासाठी आणि अल्पसंख्याक मुस्लीम समाज हि हेच लक्षात घेऊन जास्त आक्रमक होऊन जन आंदोलने करीत आहे. साहजिकच इतर समाज मुस्लिमांच्या या एकजूटीचा हेवा करीत आहे.बहुसंख्य मागासवर्गीय हिंदू अशिक्षित,अज्ञानी, अंधश्रद्धा मानणारे आहेत त्यांना मुस्लीम समाज कसा संघटीत आणि आक्रमक आहे हे सांगितल्या जाते. पण त्यांची पाळेमुळे या देशाच्या मातीत तेवढीच घट्ट व वैचारिक दुष्ट्या मजबूत आहेत हा इतिहास सांगितला जात नाही.भारतीय संविधान जर संपले ते या देशात कोणीच सुख समाधानाने जगू शकणार नाही. जे स्वताला हिंदू समजतात ते सर्व  मागासवर्गीय,आदिवासी,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मनुस्मुर्ती नुसार वागविले तर काय होईल?. आर एस एस प्रणित संस्था,संघटना बुद्धीजीवी पत्रकार,संपादक लोकप्रतिनिधी रात्रन दिवस संविधान नष्ट करण्यासाठी काम करीत आहेत.एकदा संविधान संपल कि या देशातील बहुसंख्य हिंदू मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राहणार नाही.मुस्लीम या देशाचे मोठे दुश्मन आहेत,हे प्रथम सर्वांनी डोक्यातून कडून टाकले पाहिजे.मुस्लिम समाजाचे भारताशी वैचारिक नाते ?. हा इतिहास आहे हे विसरू नका.जात ,धर्म प्रांत,राज्य हे विसरून भारतीय नागरिक म्हणून संघटीत झाले पाहिजे.नंतर विचार करण्यासही वेळ मिळणार नाही.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

शिक्षणातील गुणवत्ता आणि समाजातील आचरण

 शिक्षणातील गुणवत्ता आणि समाजातील आचरण 



        भारत हा कृषिप्रधान देश होता,शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जात होता. देशात सर्वत्र सुजलम,सुपलम होते. शेतकरी,शेतमजूर अशिक्षित असुन सुद्धा इमानदार,प्रामाणिक होता.कारण त्याला शिकवण तशी दिली होती,उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करणे कमी पणाचे वाटत असे,म्हणूनच गांवात शाळा कॉलेज पेक्षा मंदिराला जास्त महत्व प्राप्त झाले होते. आज भी आहेच त्यावरच एका विशिष्ट जातीच्या लोकांचे वर्चस्व आणि उत्पन्न अवलंबून आहे. त्याला कोणीच रोखु शकत नाही. अज्ञान अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी शिक्षण काळाची गरज होती. परंतु आजचे शिक्षण खोटे बोलून कशी फसवणूक, अडवणूक करून पैसे कमवावे हेच तत्वज्ञान सांगते.त्यात प्रामाणिकपणा शिल्लक राहिला नाही. शिक्षण धंदा झाला आहे, आरोग्यासाठी हॉस्पिटल सेवा देणारा धंदा झाला आहे, रोजगार कंत्राटदाराचा धंदा झाला आहे. शिक्षणसंस्था,हॉस्पिटल,कंत्राटदारी सर्वच बाजुने सर्वच समाजाचे आर्थिकदृष्ट्या शोषण करणारी मजबुत यंत्रणा उभी राहिली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आशिर्वाद असल्यामुळे त्यांचे प्रशासकीय अधिकारी व त्यांची यंत्रणा कोणाचं काही वाकडं करू शकत नाही.त्यामुळेच शिक्षणातील,आरोग्यातील,रोजगारीतील गुणवत्ता संपली आहे.
           शिक्षणसंस्था चालकांना पैसे फेकले की पाहिजे त्या गुणवतेचे प्रमाणपत्र मिळते.डॉक्टर झाले तर हॉस्पिटल काढून पाहिजे त्यापद्धतीने रुग्णाच्या नातलगांना आर्थिक दृष्ट्या लुटता येते.थोडया दिवसात रुग्ण पण जातो आणि पैसे पण जातो.कोणत्या डॉक्टर वर किंवा हॉस्पिटलवर कडक कारवाई झाल्याचे आठवतं का?.मोठं मोठ्या शहरात टोलेजंग इमारती टॉवर,मेट्रो स्टेशन बांधलेली दिसतात.ते बांधणारे कुशल मनुष्यबळ असलेले असंघटित कामगार कोणाला दिसले काय?.बांधणाऱ्या कंपनीचे नांव लिहले असते,पण कंत्राटदाराकडे असलेला कामगार कोण होता कुठून आला होता यांची नोंद झाली असते काय?.त्यांचे शिक्षण किती होते?.किती मार्क मिळाले होते त्यांचे प्रमाणपत्र गुणवत्ता कोणी तपासले?. शहराचा विकास दिसतो.सर्वत सिमेंट काँक्रीटीकरण दिसते, ते करणारा असंघटित कामगार सारखा विंचवाचे बिराड पाठीवर घेऊन या साईट वरून ते साईटवर फिरत राहतो,कंत्राटदार करोडपती होत आहे.केबल टाकणारी कंपनी आणि कंत्राटदार कोणी असो कामगार आंध्रप्रदेश,तेलंंगना राज्यातील अण्णाच असतो मुंबईतील फुटपाथवर,आरे कॉलनीच्या रोडवर पाल टाकून राहतो. शिक्षण व आरोग्य यांच्याशी त्यांना काही घेणेदेणेच नाही. या असंघटित कामगारांच्या श्रमाची कोणी तुलनाच करू शकत नाही. ते जे काम करतात ते पाहून लोकं तोंड व नाक बंद करतात. त्यांची गुणवत्ता पाहणारा,मोजणार तपासणार एक ही अधिकारी, इंजिनिअर आज पर्यत जन्माला नाही.महात्मा फुले, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लिहून ठेवले ते वाचून अंमलबजावणी करणारी यंत्रणा आज अस्तित्वात नाही.
       बिल्डिंग बांधण्यासाठी जे साहित्य लागते ते विट, रेती,खडी, सिमेंट,दगड कुठून येते तिथे कोणते कामगार असतात. त्यांना कामगार म्हणून मान्यता तरी असते काय?. त्यांचे शिक्षण मार्कलिस्ट कोणी विचारत सुध्दा नाही.या कुशल मनुष्यबळाची गुणवत्ता आणि आचरण कोणाच्या लक्षात येत नाही.भारत हा कृषिप्रधान देश होता यादेशातील शेतकरी, शेतमजूर शेती काम करण्याचे कौशल्य आत्मसात लहानपणापासून करीत होता. त्याला कोणत्याही गुणवंतेचे प्रमाणपत्राची आवश्यकता नव्हती.आज शिक्षण मोठया प्रमाणात उपलब्ध आहे.शाळा कॉलेज मध्ये शिकवलेले शिक्षण प्रत्येक्ष जीवनात कुठेच उपयोगात येतांना दिसत नाही.फस्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि ८ अ,कळत नाही. ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही.ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होते.ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही.जे आजही कॉम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात.जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही.असे उच्चशिक्षित एकीकडे मोठया संख्येने असतांना. त्या तुलनेत तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,ट्रॅफिक हवालदारची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे, निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.असंघटित अशिक्षित प्रतिष्ठित मानले जातात. उच्चशिक्षित,उच्चपदस्थ असलेल्यांना नोकरीत असतांना जो मानसन्मान मिळतो.तो फक्त त्याच्या कार्यालयातच असतो. कार्यालयाच्या बाहेर समाजात त्यांची गुणवत्ता शून्य असते.
      शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडलेले विद्यार्थी ते जगायला सज्ज झालेले ते जीवनात यशस्वी झालेले असतात.जे शिक्षण माणसाला माणसाचे शोषण करण्याची प्रेरणा देते ते कसलं शिक्षण?. माणसाला माणसासारखं वागविण्याची प्रेरणा देते ते खरे शिक्षण असते.शिक्षण खुप असते पण वडीलधाऱ्यांशी कसे बोलावे ते माहिती नाही.शिक्षणाचा, नोकरीचा एवढा माज चढलेला असतो की स्थानिक रहिवाशात व समाजात वावरताना स्वतःला नेहमीच वेगळे समजणार.पैसा असला को सर्व सेवा विकत मिळतात. पण जेव्हा घरात लग्नकार्य असेल तर कोणी चालते.पण घरात कोणाचा मृत्यू झाला तेव्हा स्थानिक रहिवासी आणि समाजच लागतो.हे ते विसरतात त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कशी मोजणार?.मार्कशीट पाहून की आचरण पाहून?.थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक आचरणानाच्या शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही.प्रत्येक माणसांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
      मी नेहमीच वेगवेगळ्या विषयावर लिहतो. लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया येतात.त्यात उच्चशिक्षित आणि अशिक्षित असंघटित शेतकरी,शेतमजूर असतात.काही उच्चप्रतीची प्रतिक्रिया व्यक्त करतात.तुम्ही खुप छान लिहले,सांगितले त्याला ते पटलं की तो म्हणतो तुम्ही अगदी माझ्या मनातील लिहल,हे बोलायला लिहायला मला योग्य शब्द सापडत नव्हते एवढंच.आणि त्यातूनच एक वेगळी मैत्री सुरू होते.तुम्ही प्राध्यापक आहात काय?.कुठे नोकरी करता?.वय किती?. मुलं किती?. काय करतात?. जात,धर्म,जिल्हा सर्वच आपोआप येते.मैत्रीपूर्ण सबंध निर्माण होतात,त्यातुन जिव्हाळा तयार होतो. शिक्षणातील मार्कलिस्ट पाहून नोकरी मिळते.पण समाजातील आचरणातुन स्थानिक पातळीवर व समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणूनच प्रत्येक माणसांनी समाजाप्रती आचरणातून गुणवत्ता दाखवावी.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

कार्यकारी अभियंता व प्रशासकीय विभागीय अधिकारी यांचे डोके ठिकाणावर आहे काय?.

 कार्यकारी अभियंता व प्रशासकीय विभागीय अधिकारी यांचे डोके ठिकाणावर आहे काय?.



    आजची वाढलेली लोकसंख्या आणि जागतिक स्पर्धा हे मानवाला जीवघेणी ठरत आहे. मनुष्याच्या हव्यास आणि लोभासाठी स्वतःचे प्राण देखील गमावण्यास तयार होत आहे. त्यामध्ये रस्ता सुरक्षा किती महत्त्वाची आहे हा मुद्दा समोर येत आहे. वाढती वाहने आणि प्रदूषण,नको असलेली गर्दी,सर्वांचा एकत्र निवास या गोष्टी अक्षरशःमाणसाचा दम काढत आहेत.सर्व कामकाज आणि उद्योगामुळे शहरीकरणात वाढ होत आहे.याकारणाने तेथील लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.गावाकडील लोक देखील शहरात स्थलांतरित होत आहेत. दळणवळण आणि प्रवासासाठी वाहनांची संख्या वाढत आहे. रस्त्यावरून फिरणे कठीण  झाले आहे. याचा परिणामानेच रस्त्यावरील अपघाताची संख्येत वेगाने वाढ होत असून रस्ते अपघातात दगावल्याची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.
        एक काळ असा होता की लोक वीस किलोमीटर पायी चालत जात येत होती. आज लोक दोन किलोमीटर अंतर चालत जात नाही.शहरी भागात मोठ्या प्रमाणात दळण वळणाची साधन उपलब्ध आहेत,पण खेड्यात आज ही रस्ते विकासा पासुन कोसो दूर आहेत.म्हणूनच गावी एक प्रसिद्ध म्हण आहे, "गांव तसे चांगले येशीला टांगले!." असे का म्हटल्या जाते तर गावांत जाणारे रस्ते हे खूप खराब असतात,म्हणजे गांव चांगले असेल तर गावातील माणसं ही दक्ष,चांगले असली पाहिजेत, आणि मानस दक्ष नसल्यामुळेच,चांगले नसल्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांना गांव वेशीवर टांगलेले वाटते.असेच अनेक गावे ग्रामीण भागात पाहण्यासाठी भेटतात.तेव्हा माझ्या सारख्या शहरात राहणाऱ्या पत्रकार,स्तंभ लेखक, कामगार नेता असा गावांत गेला की त्यांच्यातील शोध पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी जागी होते.मग त्या गावांतील सार्वजनिक समस्या जाणून घेऊन असा लेख प्रपंच सुरू होतो. दोन दिवसात खुमगांव बुट्टी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या गावात चार वेळा रस्त्याने येणे जाणे केले. त्यावेळी रस्त्यावरील खड्डे पाहून त्रास सहन करून केलेला प्रवास सहन झाला नाही, मग गांवातील लोक किती दिवसापासून असा जीवघेणा प्रवास याच खड्ड्यातील रस्त्याने सहनशीलता ठेवून करता?.त्याविरोधात कुठेही तीव्र आंदोलन केल्या जात आहे. त्या सार्वजनिक समस्या वर लिहलेला विशेष लेख आहे. 
      नांदुरा ते दहिवडी,केदार,बुर्ट्टी,खुमगांव,भिलवडी,धाडी,मामुलवाडी,जिगांव,ही गावे आहेत,खुमगांव हे रेल्वे स्टेशन असलेलं गांव हायवे नंबर सहा पासून पांच किलोमीटर अंतरावर आहेत.तर नांदुरा सोनज,दहिगाव,केदार ते डीघी हा एक समांतर रस्ता मजूर झाला आहे.त्याचे काही ठिकाणी काम कासव गतीने सुरु आहे. नांदुरा सोनज,दहिगाव ते खुमगांव हे अंतर फक्त आठ किलोमीटरवर आहे.पण गेली अनेक वर्षांपासून संत गाडगे महाराज विद्यालय ते खुमगांव सातशे चे हजार मीटर रास्त काही लोकांमुळे अडून पडला आहे, गावातील काही सदन शेतकरयांनी विद्यार्थांना जाण्या येण्यासाठी पायवाट दिली आहे. बहुसंख्य लोक मोटरसायकलने याच मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे वेळेची व डीजेल पेट्रोल ची बचत होते. अनेक वर्षापासून हा रास्त रखडून पडला आहे. त्यामुळे खुमगांवच्या आजूबाजूच्या पंधरा वीस गावातील लोकांना विशेष विद्यार्थ्यांनां शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.काम धंद्यासाठी जाणे येणे आवश्यक असतांना जाता येत नाही, शेतीतील भाजीपाला शहरात जाऊन विक्रीसाठी नेता येत नाही, कारण प्रवास खर्च व वेळ महत्वाचा असतो. त्यासाठीच रास्त चांगला असणे म्हणजेचं दळण वळणाची अतिशय आवश्यकता असते. तो नसल्यामुळे अनेक समस्या व संकटांना सामोरे जावे लागते.
           दहा पंधरा गावांतील गरोदर माता भगिणीला बाळंतपणासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत दवाखान्यात नेण्याचे असेल तर भगवान भरोसे घराबाहेर पडावे लागते,तशीच परिस्थिती कोणाला अपघात झाला,ह्रदय विकारांचा झटका आला तर तात्काळ दवाखान्यात नेणे अशक्य होते,घरात पैसा अदला,टू व्हीलर गाडी तीन,चार चाकी गाडी उपलब्ध असतांना ही रस्त्या अभावी जवळच्या माणसांना वाचू शकत नाही.यांचे दुःख आणि गांभीर्य गावांतील ज्येष्ठ नागरिक,सुशिक्षित तरुण आणि शहाण्या माणसांना नाही असे लिहणे चुकीचे ठरणार नाही. कारण मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही.ही एकविसाव्या शतकात खेदाची गोष्ट आहे.
         खुमगांव आणि आजूबाजूच्या गावांतील तरुण सुशिक्षित बेरोजगारांनी बँकेचे कर्ज घेऊन रिक्षा काढली तर काहींनी शेती विकून रिक्षा काढली, रिक्षा चालक मालक झाले. पण रस्त्यावरील खड्यामुळे त्यांच्या गाडीचे स्पेयर पार्ट घासून उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त होत असतो. तसेच शरीराचे हात,पाय,कंबर,यांना खड्ड्यातून गाडी चालवतांना बसणारे धक्के बिमारी लाऊन आयुष्य कमी करत आहेत. आणि हे केवळ हायवे रोड वरून गावांत जाणारा रास्ता रोड काही ठिकाणी व्यवस्थीत नसल्यामुळे होत आहे.
    भुसावळ ते अकोला हा राष्ट्रीय महामार्ग नंबर सहा तयार होत असतांना आजूबाजूच्या गावाचा खेड्याचा विसर उच्च शिक्षित इंजिनिअर व प्रशासकीय विभागीय अधिकारी वर्गाला पडलेला दिसतो, कोलासर फाट्यावरून दहिवडी ते खुमगांव रस्त्याने अनेक गावांना जोडणारा एकमेव रास्ता असतांना हायेवर अकोला,शेगाव,खामगाव नांदुरा मार्गाने येणाऱ्या गाड्या उजवीकडे जाण्यासाठी कोणत्याही पर्याय उपलब्ध करून दिला नाही. किंवा कोणतीही तरतूद करण्यात आली नाही आज दिसत नाही.भविष्यात होईल यांची खात्री नाही. हायवेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यातून उजवीकडे दहिवडी,केदार खुमगांव जाणाऱ्या गाड्यानी हायवेवर कसे पार करावे?. म्हणून विचारावे असे वाटते की कार्यकारी अभियंता व प्रशासकीय विभागीय अधिकारी यांचे डोके ठिकाणावर आहे काय?.
        याविरोधात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलायला वेळ नाही. गावांत कोणत्याही सामाजिक बांधिलकी ठेवणाऱ्या पुरोगामी विचारांच्या संघटना स्थापन झाल्या नाहीत.असल्या तरी त्यांना एक गाव बारा भांडगळी नको असतात. त्यामुळे गावांतील अतिशय आवश्यक असलेल्या रस्त्याकडे कोणाचे लक्ष केंद्रित होत नाही. यासाठी सर्व रिक्षा चालक मालकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे असे प्रसिद्ध स्तंभ लेखक,साहित्यिक कामगार नेते सागर तायडे यांनी शंकर खराटे रिक्षा चालक मालक यांना सांगितले आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता,प्रशासकीय विभागीय अधिकारी,तहशिलदार यांच्याकडे दाद मांगीतली पाहिजे. त्याला खुमगांवच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य करावे असे जाहीर आवाहन सागर तायडे यांनी केले आहे.
सागर रामभाऊ तायडे 9920403859,भांडुप मुंबई,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

माणसांच्या मनाची शांतता?.

 माणसांच्या मनाची शांतता?.



        नोटबंदी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केला कि रात्री १२ नंतर ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील.हा निर्णय जाहीर झाला तेव्हा आम्ही रात्री ९.२५ वाजताची स्वराज एक्सप्रेस १२४७२ नवी दिल्ली वरून निघणार होती.पण सर्वच गाड्या एक ते दिड तास उशिराने धावत होत्या त्यामुळेच स्वराज्य १०.४५ वाजता स्टेशनवर आली आणि प्रवास सुरु होता.११.२० ला मथुरा जंक्शन येणार होते.पण गाडी लेट असल्यामुळे ती १२ ४० ला पोचली आम्ही खाण्यासाठी काही जेवण घेतले त्याला ५०० ची नोट दिली तर त्याने सांगितले हे नोट आज रात्री बारा नंतर बंद झाली.आमच्या दोघाकडे ५०० च्याच नोटा होत्या माझ्याकडे ७० रुपये आणि रवि कडे एकशे तीस रुपये होते.यातच एक दिवस एकरात्र काढवी लागणार होती.पिण्याचे पाणी घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.अशा परिस्थितीत मनाची शांतता भंग पावली.ती आज ८ नोव्हेंबर २०२२ ला ही भंगलेल्या अवस्थेत आहे.
       आर्थिकदृष्ट्या प्रत्येक व्यक्तिकडे "शांतता" ही असली पाहिजे.आज ती अनेकाकडे नाही.हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते.परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात,तर जगलेली असतात.माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार,शक्तीनुसार जीवन जगत असला,तरी निसर्गाने ठरवलेला शेवट आणि सत्ताधारी पक्षाने घेतलेला निर्णय हा त्याला स्विकारावाच लागतो.त्यातच माणसांच्या मनाची शांतता?.भंग पावते किंवा नष्ट होते.आता नोट बंदीच्या परिणामावर कोणीच बोलत,लिहित नाही.चर्चा नाही.दोन हजाराची नोट निघाली तेव्हा तिच्या आत असलेल्या चिपची चर्चा खूप होत होती.कोणी साठा केला किंवा जमीन खाली वीस फुट खाली दोन हजाराच्या नोटा लपवून ठेवल्या तरी त्या पकडल्या जाणार अशी चर्चा त्यावेळी होती.त्यावेळी देशातील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबेल अशी माणसांच्या मनाची शांतात होती.तरी सुद्धा आज असंतोष कुठे ही दिसत नाही.
         सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक आणि आर्थिक जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखु नका, तुमच्या पेक्षा जास्त कुवत असुनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो याची जाणीव ठेवा."शांतता ही का महत्त्वाची असते?.आज काल आपण पाहतो,देशातील राजकीय सत्तापरिवर्तनामुळे काही माणसे लहान - लहान गोष्टींवर खुप चिडचिड करत असतात.वैचारिक विचारधारेमुळे राजकीय बदल हे प्रत्येक माणसांच्या जीवनात आलेल्या मुलभूत संकटांवर त्यांना मात करता येत नाही.त्यांचा तोंड बांधून मुका मार खावा लागत आहे.त्यामुळे ती माणसे स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असतात. नोटबंदी भ्रष्टाचार संपविण्यासाठी होती.त्यातूनच बेरोजगारी महागाई वाढली हे सत्य असले तरी त्यावर भाष्य करायचे नाही.मन शांत ठेऊन जे दिसते तेच सत्य आहे हे स्वीकारून मनाची शांतात ठेवा.तुम्ही जर स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असाल,तर तुम्ही दुसऱ्याचे मन दुखवत आहात.हे विसरून चालणार नाही.विना कारण दुसऱ्यांचे मन दुखवून स्वतःचे कधीच चांगले होत नाही. जो माणूस स्वतःचा सुखा पेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करतो. तोच जीवनात एक व्यक्ती म्हणून जगु शकतो.ज्या माणसाच्या जीवनात दररोज अनेक संकटे येतात, तरी पण तो माणूस नेहमी चांगल्या मार्गाने चालत असतो.तोच जीवनात संकटांवर मात करून पुढे जाऊ शकतो.पण जो माणूस नेहमी दुसऱ्यांचे वाईट चित्तो तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही.
    माणसाने नेहेमी शांतता राखावी.किती हि मोठे संकटे आली तरी जो माणूस कोणालाही दोष न देता.स्वता: त्या संकटांन वर मात करतो.तो जीवनात अनेक संकटांशी सामना करतो तोच जीवनात एक चांगल व्यक्ती महत्त्व मिळवु शकतो.जीवनात संकटे हि नेहमीच येत असतात जो माणूस शांत राहून सुद्धा संकटांवर मात करतो.त्याला यश मिळाले असे समजायला हरकत नाही.जो व्यक्ती संकटे आली म्हणून जीवन थांबवितो तो जीवनात तेथेच थांबतो.आणि थांबला तो संपला असे न होता कोरोना काळात जो थांबला तोच जगण्यात यशस्वी झाला.असे झाले होते.
        माणूस हा डोकयात मेंदू असणारा मानव आहे.प्रत्येकाच्या मेंदूचा आकार कमी जास्त असतो.त्यामुळेच तो विचार करून बोलू शकतो.त्याला सकारत्मक विज्ञानवादी विचारांचे महापुरुष,संत,प्रतिक मिळाले तर त्यांच्याकडून तो निश्चित चांगली प्रेरणा घेऊ शकतो.आणि नकारत्मक विचारांचे अज्ञान अंधश्रद्धा सांगणारे प्रतीके मिळाली तर तो कधी प्रश्न विचारू शकत नाही.जे आहे,जे सांगितले,लिहले ते सर्वच सत्य आहे हे त्याला मान्य करावे लागते.म्हणूनच प्रत्येक माणसांची प्रेरणा ही वेगळीच असते.प्रत्येकाच एक वेगळच व्यक्ती महत्त्व या जगात आहे. प्रत्येकांची संकटे ही वेगळी असतात. त्यांने त्याचावर कशी मात केली.ही एक तुमच्यासाठी खुप मोठी प्रेरणा असले.ते म्हणतात ना,जो माणूस शांततेचा काळात जास्त घाम गाळतो, तो युध्दाच्या ठिकाणी कमी रक्त सांडतो.त्याच प्रमाणे आपण सुद्धा कमी वयात जास्त घाम गाळला पाहिजे,म्हणजे पुढील आयुष्य हे सुंदर जगता येईल.
     माणसांच्या नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात.पाहणे,आवडणे,हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत.परंतु,सर्वात कठीण पाचवी पायरी आहे.ती म्हणजे "निभावणे" ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे "भान" असणे.आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे "ज्ञान" असणे दुसऱ्याचे चांगल (भलं) करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते.तर फक्त मनात चांगली "भावना" असावी लागते.सुखाचे अनेक भागीदार आपणांस भेटतील परंतु दु:खाचा एक "साक्षीदार" भेटायला सुध्दा नशीब लागते असे म्हणतात.म्हणूनच माणसांच्या मनाची शांतता.ही विचारावर अवलंबून आहे.नोटबंदी,भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई आणि मनाची शांतता.राजसत्ता धर्मसत्ता आणि मनाची शांतता कुठे कधी नात जुळवावे हे शेवटी माणसांच्या हातात आहे.कि विचारात हे कोणी ठरवावे. 
सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.  

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

लोकप्रतिनिधी समाजसेवक की नोकरदार?.

 लोकप्रतिनिधी समाजसेवक की नोकरदार?.





   आमदारांना ऐंशी लाखाचे बक्षीस देण्याची बातमी वाचली आणि आनंद झाला.कारण पाऊसामुळे कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या परिस्थिती पेक्षा वाईट परिस्थिती आज च्या आमदारांची झाली होती.काही आमदार सुरत,गुवाहाटी,गोवा ते मुंबई असा खडतळ प्रवास करून आले असल्यामुळे त्यांना विशेष मदतीची गरज होती.कोरोना काळात मुकाबला करण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी,कामगार,पोलीस,डॉक्टर,नर्स,पालिका कर्मचारी इमाने इतबारे रुग्णांची,नागरिकांची सेवा करीत होते.तेव्हा देशावर आर्थिक संकट आले, देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यामुळे या सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी कामगारांचे तीस टक्के वेतन,भत्ता,सर्व प्रकारच्या सवलती बंद करण्याची चर्चा लोकप्रतिनिधी करीत होते.पण हे आता लोकप्रतिनिधी कोण आहेत?. समाजसेवक की शासकीय नोकर?. यांचाच सर्व सवलती बंद करण्याची हिंमत प्रशासकीय आय ए एस अधिकारी संविधानाच्या चौकटीत का दाखवीत नाही?.निवडणूक आयोगाला खोटी प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा बंदोबस्त ही प्रशासकीय अधिकारी वर्ग करू शकतो.त्यासाठी कोणी टी एन शेषन,एन चंद्रशेखर,कृष्णप्रकाश निर्माण झाला पाहिजे. कोरोनाच्या महामारीत कर्तव्यदक्ष,इमानदार प्रशासकीय अधिकारी पुढे यावा ही अपेक्षा भारतीय नागरिक करीत होती.हे फक्त सिनेमात शक्य असते, वास्तवात नाही.
     भारतात राजकीय पक्ष नेत्या कडून ग्रामपंचायत ते लोकसभे पर्यत जे राजकीय लोक निवडणूकी द्वारे निवडून येतात.ते समाजसेवक,लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात ते एकदा का निवडून आले की त्यांना मरे पर्यत पेन्शन आणि विविध सुविधा मिळतात. सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी करून ज्या सुविधा कामगार कर्मचारी अधिकारी यांना मिळत नाही. त्यासर्व समाजसेवक,लोकप्रतिनिधी यांना मिळतात त्या सरळसरळ भारतीय संविधानांचा खून करून घेतल्या जातात.त्यात सर्वच राजकीय पक्ष आणि विचारधारा मानणारे आहेत.
    मोदी इ व्ही एम मुळे देशाचे हुकुमशहा झाले आहेत.हे जग जाहीर आहे.सर्वोच्च न्यायालयात एक पी.आय.एल दाखल झाली होती. ती सोशल मीडियावर खूप वायरल झाली होती. त्यावर सर्व सामन्यात फक्त चर्चा झाली.पण राजकीय,सामाजिक न्यायांची अपेक्षा ठेवणाऱ्या एकाही पक्ष्याने त्यावर तोंड उघडले नाही.राष्ट्रपती,राज्यपाल आणि न्यायमूर्ती  रबर स्टंप झाले आहेत.न्यायाची अपेक्षा कोणा कडून करावी?.
    माझा देश आहे त्यांचा मला गर्व आहे असे म्हटले पाहिजे.गर्वाने सांगण्यासाठी तो तसा वागला पाहिजे की नाही.तरच त्याला गर्वसे कहो हम भारतीय है असे म्हणण्याचा अधिकार असेल.विद्यार्थी दशे पासुन आम्हाला नागरीशास्त्र शिकविल्या जाते. ग्रामपंचायत ते सचिवालय ही प्रशासकीय यंत्रणा कशी कार्य करते. प्रत्येक नागरिकांना समान अधिकार समान संधी असते. त्यावर अन्याय अत्याचार झाला तर तोच भारतीय भारतात आवाज उठवण्यासाठी सज्ज झाला पाहिजे.आज असे भारतात कुठे ही काही दिसत नाही.प्रचंड असमानता दिसत आहे.समान न्याय,समान संधी हे फक्त राजकीय पक्षांच्या नेत्यांनीच उपभोगावी.बाकी सर्व कामगार कर्मचारी शेतकरी शेतमजूर यांना कोणतीही समान संधी समान न्याय मिळत नाही.कोरोना संकटातून मुक्त होण्यासाठी शहरांतून गांवात जाणाऱ्या मजदूरांच्या एसटी,बस,रेल्वे व्यवस्था, प्रवास खर्च कोण करेल यावर कोणत्याही राज्याचे व केंद्र सरकार चे एकमत झाले नव्हते.पण परदेशात अडकलेल्या मजदूरांना विमानाने आणण्यासाठी कोणाची अडचण आली नाही.कारण परदेशात नोकरी साठी गेलेला हा उच्चवर्णीय,उच्चवर्गीय समाजाचा मजदूर होता.खेड्यातुन शहरात आलेला हा मागासवर्गीय, ओबीसी,आदिवासी अल्पसंख्याक समाजातील मजदूर आहे. म्हणूनच राज्य व केंद्र सरकारला त्यांची किंमत वाटत नव्हती.
    राजकीय शेतकरी दरवर्षी करोडो रुपयांचे उत्पन्न घेतो.खरा शेतकरी स्वता वावरत नांगर, तिफन,डवरे धरून निंदन खुरपणी करून पीक घेतो तरी त्यांचा खर्च निघत नाही म्हणून तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्याला सवलती देतांना हेच लोकप्रतिनिधी सरकारच्या तिजोरी वर प्रचंड प्रमाणात बोजा पडेल म्हणून ओरडतात.या आमदारांना खासदारांना पेन्शन व इतर सवलती घेण्याचा काय अधिकार आहे.यांची आर्थिक परिस्थिती शेतमजूरांच्या पेक्षा खालची आहे की काय?. ते आर्थिक दृष्ट्या दुबल आहेत काय?.मग यांना पेन्शन देण्याची ही योजना कोणत्या निकषावर लावण्यात आली?.यावर कोणीच गांभियाने विचार करून लिहत,बोलत नाही.सर्व सभागृहाचे लोकप्रतिनिधी हे समाजसेवक असतांना. त्यांना नोकरदारा सारखे पेन्शन का असावे?.
     भारतीय संविधानात दिलेली व्याख्या यांनी यांच्या सोयी नुसार बदलुन टाकली. म्हणूनच सर्व खासदारांना पेंशन मिळू नये. कारण राजकारण समाजसेवा आहे. म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. १९७४ साला पासून अंगणवाडी महिला  कर्मचार्यांना आज पर्यंत मानधन मिळते.वेतन नाही. त्यांच्यासाठी विधानसभा,लोकसभेत चर्चा होत नाही. हे लोकप्रतिनिधी समाजसेवकांना अन्यायकारक वाटत नाही.राजकारण हे लोक प्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवानिवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना पाच वर्षांच्या सदस्यता नंतर पेन्शन मिळते.यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती नगरसेवक असेल तर मग तो आमदार बनतो आणि नंतर विधानपरिषद किंवा राज्यसभेचा सदस्य बनतो, मग त्याला तीन-तीन पेन्शन मिळतात. तीन वेगवेगळ्या सभागृहात लोकप्रतिनिधीत्व करणारया या समाजसेवकाची आर्थिक परिस्थिती कशी आहे.यांची कायदेशीर नोंदवही सरकार कडे नसेल,पण गावांतील,मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या प्रकारे माहिती असते.तरी मतदार त्या लोक प्रतिनिधीना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निवडून देते.हीच मोठी शोकांतिका आहे.
     देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद झाली पाहिजे.त्यासाठी नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. सेंट्रल पे कमिशनने, भारतीय संसदेच्या खासदारांचा भत्ता सुधारित करावा. पण ते नोकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे.यांची अंमलबजावणी कायद्यानुसार करण्यासाठी टी एन शेषन सारखा उच्च दर्जाचा अधिकारी जन्माला पाहिजे.आमदार खासदारांना वाचक बसेल असा एकही संविधानाच्या चौकटीत काम करणारा अधिकारी नसल्यामुळेच सर्व पक्षीय आमदार खासदार स्वत: साठी मत देऊन. स्वत:चे वेतन आणि भत्ते वाढवतात आणि त्या वेळी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधीचे या बाबत एकमत होते कोणतीही चर्चा न होता सर्व ठराव मंजूर होतात. म्हणजे हा भारतीय संविधानाचा सरळ खून आहे.
    भारतीय नागरिकासाठी प्रत्येक तालुका,जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरात राज्य व केंद्र सरकारचे सार्वजनिक आरोग्य सेवा देणारे रुग्णालय असतांना त्यात हे लोकप्रतिनिधी आरोग्य सेवा का घेत नाही?. भारतीय लाखो करोडो नागरिक सार्वजनिक रुग्णालयात दाखल होऊन उपचार करून घेतात तर मग आमदार खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयाचा लाभ का घेऊ नये?. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात केले जावे. विदेशात उपचार केले जाऊ नये, जर करायचेच झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे.तेवढी खर्च करण्या जोगी त्यांची आर्थिक परिस्थिती निश्चित आहे.जर भारतातील मोफत सवलत,राशन,वीज,पाणी, फोनबिल सहित सर्व सेवांची पूर्णपणे उपभोग घेऊन ही त्यांचे आमदार खासदार यांचे मन शांत होत नसेल तर त्यांना त्यांची मतदार व भारतीय नागरिक म्हणून ओळख करून देणे खूप गरजेचे झाले आहे. त्यासाठीच जागरूक नागरिकांनी काही तरी केलीच पाहिजे. त्यांना आमदार खासदारांना इतक्या सवलती संविधानाच्या कायद्याने मिळत नाहीत.तर नियमितपणे ते स्वतःच लोकप्रतिनिधी म्हणून या सवलती वाढऊन घेत आहेत.त्यामुळेच भारतात काही घराण्यातच राजकीय लोकप्रतिनिधीत्व मिळत राहते.त्याला सुरुंग कोणी तरी लावलाच पाहिजे. हे महाराष्ट्रातील मागासवर्गीय ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक म्हणजेच बहुजन समाज वंचित समाज मतदानाद्वारे करू शकतात.जर सरकारी, निमसरकारी,खाजगी नोकरी करून कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला साठ वर्ष नोकरी करून पेन्शन मिळत नसेल तर आमदार,खासदार यांना का देण्यात येत आहे?.ते लोकप्रतिनिधी समाजसेवक आहेत  की नोकरदार?. अर्धवट शिक्षण आणि ज्ञान असलेल्या लोकप्रतिनिधीच्या हाताखाली काम करणाऱ्या आय ए एस,आय पी एस प्रशासकीय अधिकारी वर्गाने देश संकटात असतांना गांभीर्याने विचार करून पुढाकार घेतला पाहिजे. आसाराम राम रहीम ला शिक्षा मिळवून देण्यासाठी जीवांची बाजी लावणारे अधिकारी आपल्या सारखेच अधिकारी होते. हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन नायक,किंवा बाजीराव सिंघम बनण्यासाठी कामाला लागावे. भारतातील नागरिक मतदार तुम्हाला डोक्यावर घेऊन आनंद उत्सव साजरा करतील.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई.

माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.

 माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.



    माणसाच्या आयुष्यात अनेक आनंदाचे दिवस एकदाच येतात.ते परत परत येत नाही,पण त्यांचा मनापासून आनंद घेतला तर ते पुन्हा पुन्हा येऊ शकतात.पण त्यांचा आनंद घेता आला पाहिजे आणि देता आला पाहिजे.प्रत्येक माणसांचे जन्मपासून मुत्यु पर्यंत नाम करण,बारसे,लग्न,आईबाबा होणे, मुलगा,किंवा जावई होणे नंतर सासू सासरे होणे, आजीआजोबा होणे एकदाच होते.पण त्यांचा आनंद घेता व देता आला पाहिजे.म्हणूनच माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
     माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी नेहमीप्रमाणेच ते शब्द माझ्या मनात आणि बोटं कीबोर्ड वर फिरू लागले त्यामुळे शब्दांना शब्द जुळून वाक्य बनु लागले.कोणत्याही प्रकारच्या कामांची पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही कां असू नये ?. आणि ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुकस्पद असेलच या अर्थाने नसावी.कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकते.ह्या पोचपावतीचे प्रत्येकाच्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आई- बाबा असतात. 
      घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला,कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसे आवर्जून सांगतात "छान झाला बर का आजचा कार्यक्रम" आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला त्यांना अजून उत्साह येतो. सुनांसाठी सासु सासऱ्यांनी दिलेली पोचपावती एकत्र कुटुंबाच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी असते.
       एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच appreciation देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कस हसू फुलते.घरातील कामवाली गजरे,फुल घालून आली तर अनेकांना खूप राग येतो,पण ती तिची आवड म्हणून ती गाजर,फुल लावत असेल तर तुम्हाला राग येण्याचे काम काय?. उलट ती मोठा गजरा घालून कामांवर आली की घरातील माणसांच्या तोंडून उस्फूर्तपणे निघाले पाहिजे की काय मस्त दिसतेस ग!.चल एक फोटो काढते तुझा!" त्याच प्रकारे आपला वाहन चालक दाढी करून चांगले कपडे घालून आला तर त्याच्याकडे कौतुकाने पाहून बेस्ट म्हणा ह्याने सुद्धा ते नोकर खूप खुश होतात.त्यामुळे त्यांची काम करण्याची ऊर्जा वाढते.त्यांना  न सांगितलेले काम ते न सांगता करून जातात. हीच असते माणसांनी केलेल्या कामांची पोच पावती.
     घरातील,परिसरातील कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यां पर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.गांवी एक प्रसिद्ध म्हण आहे त्याला हरभऱ्याच्या झाडांवर चढवले आणि सर्व कामे करून घेतली.सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांच्या हातून चांगले काम करून घ्याचे असेल तर त्या तरुणांची सर्वासमोर थोडी स्तुती करा त्यांच्या कामातील कला कौशल्याची कौतुकास्पद आपसात चर्चा करा.त्यामुळे त्या तरुणांचा काम करण्याचा उत्साह निश्चितच वाढतो.मग ती सहभागी असलेल्या सर्वांच्या साठी चांगली आठवण राहतो. करीता माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
     एखादं कामाचे मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात "छान निबंध लिहिलंस हो" अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असं काही नाही.कधीतरी आपल्याच दुकानदाराला ही म्हणावं "काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या दुकानातुन घेतलेले" सामान्य माणसांपासून अगदी कलाकारां पर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायला ही वयाच बंधन कधीच नसाते.काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात,पण तरीही अधूनमधून त्यांच्या आठवणी नक्की आनंद देऊन जातात. 
    बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही.तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त,तितकीच जास्त खरी असावी. माणसांची पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर कधी डोळ्यातून,कधी कृतीतून,स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी असावी.कधी योग्य आदर ठेवून,कधी गळा मिठी मारून,अगदी कधी "च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या" अशी वेगळ्या भाषेतून ही यावी.माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त,महत्वाचे म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत मस्त मित्र हवा.ह्या पोच पावती ने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते,उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो.आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही फक्त मोकळं व स्वच्छ मन! हवे असते.म्हणूनच माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
      नारायण हरी भिडे मुक्काम पोस्ट खुमगांव बुर्ती,तालुका नांदुरा,जिल्हा बुलढाणा माझ्या साडूच्या घरा जवळ एक गाय वासरू बांधलेले होते.माझे नातु खूप दिवसांनी गांवी गेल्यामुळे ते त्या गाय वासरांना दुरून पाहत होते,आणि गाय वासरू त्यांना कान वर करून डोळे मोठे करून,शेपटी आत मध्ये घेऊन पाहत होते.मी त्यांच्या जवळ गेलो त्यांच्या अंगावरून शिंगा वरून तोंडावरून हात फिरवत गोंजारत होतो. त्यांनी त्यांची पोच पावती आनंदाने स्वीकारून दिली.हे होते स्पर्शाने व्यक्त केलेले प्रेम, त्यांच्या डोळ्यातील आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. कळत न कळत हे व्यक्त झाले.म्हणूनच माणसांकडून मुक्या प्राण्याकडून माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.हा निसर्गाचा नियम आहे.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई.

माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.

 माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.



     डिजिटल इंडिया बनल्याचा प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी हे गर्वाने सांगतात.त्याचा प्रधान सेवक,चौकीदार आणि अंधभक्तांसह अनेकांना आनंद वाटते.पण प्रश्न ग्राहक मालकाचा नाही.ग्राहक एक अशी व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट आहे ज्याचा वस्तूची खरेदी-विक्री करण्याच्या कामकाजाशी संबंध नसून वस्तू किंवा सेवा प्रामुख्याने वैयक्तिक, सामाजिक,कुटुंब,घरगुती आणि तत्सम गरजा भागविण्यासाठी,किंवा वापरण्याच्या कामकाजाशी संबंध आहे.सुरक्षेचा हक्कः आरोग्यासाठी किंवा आयुष्यासाठी घातक असलेल्या किंवा इतर पद्धतींपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्याला माहिती निवडण्यासाठी आवश्यक असलेला अधिकार असतो.डिजिटल इंडियामुळे रोजगार,महागाई भ्रष्टाचार,शिक्षण,आरोग्यात काय बदल झाला.फसवणूक करण्याचा प्रकार वाढला कि कमी झाला.सेवा देण्याच्या नांवावर कोणता धंदा जोरात आहे.कष्ट करणाऱ्यांना किंमत नाही.आणि वाताकुलीत वातावरणात आरामशीर काम करणाऱ्याचे महत्व जास्तच वाढले. असो...
         २८ ऑक्टोबरला अमरावती एक्सप्रेस रेल्वेने मुंबई ते नांदुरा प्रवास केला.नांदुरा येथे गाडी सकाळी ४.४३ वाजता पोचते.येवढा सकाळी ग्रामीण भागातील खेड्यात जाणे अशक्य असते त्यासाठी सकाळचे सात वाजे पर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो.दुसरा पर्याय असतो तीन चार पट परतीचे भाडे देऊन रिक्षा घेऊन जाणे. यात प्रचंड धोका असतो. अनोळखी माणसां बरोबर प्रवास आणि मुंबई वरून आलेले ग्राहक.अशा वेळी ग्राहक म्हणून ग्रामीण भागातील खेड्यातून थंडीच्या दिवसात ३.३० वाजता उठून नांदुरा येथून मुंबईच्या पाहुण्यांना आणायला जाणे म्हणजेच पैसासाठी ग्राहकासाठी जाणे नव्हे तर माणुसकीची बांधिलकी ठेऊन सेवा देणे होय.शंकर खराटे रिक्षा चालक मालक मुक्काम पोस्ट खुमगांव बुर्ती,तालुका नांदुरा,जिल्हा बुलढाणा यांनी आम्हाला घेऊन जाण्यासाठी साडेचार वाजताच उपस्थित राहणे,स्टेशन बाहेर पडताच समोर येऊन स्वागत करणे आमच्यासाठी अपेक्षित नव्हते.तो सुखद धक्का त्यांनी दिला,नांदुरा ते खुमगांव पर्यतचा प्रवास रोडवरील खड्डे त्यांची कोणीच दखल घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.खड्डे सांबळात चर्चा करत नारायण भिडे साडूच्या घरी त्यांनी सुखरूप पोचवले.त्याचं वेळी मला परदेशातील टॅक्सी चालक मालकांची आठवण झाली. आणि माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.ही गोष्ट आठवली तेच तुमच्या समोर मांडत आहे.
          एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे,एक पाटी जिच्यावर लिहिले होते की माणसांनी काय बनावे बदक की गरुड?, निर्णय तुमचा आहे.तुम्हीच ठरवा. दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई.ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला.आणि बोलला, माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे.जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर.त्या कार्ड वर लिहिले होते,जॉन चे मिशन माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर,सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.
         मी भारावून गेलो होतो.गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ,नीटनेटकी होती.जॉन ने मला विचारले.आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय? मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. नाही, मला ज्यूस हवा आहे.तात्काळ जॉन उत्तरला.काही हरकत नाही सर,माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत.ह्यापैकी एकात ज्यूस,एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे.तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत.जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता.मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण स्वरात विचारले.सर,एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?. त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे?न राहवून मी त्याला विचारले.तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?त्यावर तो उत्तरला. नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे.आणि असमाधानी राहत असे.पण एकदा एका डॉक्टर कडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले. त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते.तुम्ही जे कोणी आहात त्याने काय फरक पडतो. ज्यात पुढे लिहिले होते. जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत तर खरेच तसेच होईल.तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.
     बदक बनू नका,गरुड बना.बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे.म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले.मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ,गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो. आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे. 
          तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात.किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालक द्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो.जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लुमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे.जॉन ने बदका सारखे सतत आवाज करत,सतत तक्रार करणे सोडून दिले आहे.आणि गरुडासारखी भरारी मारायला सूरूवात केली आहे.तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि  कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.
 तुम्ही काय ठरवले आहे?.बदकासारखे सतत आवाज करत (रडत) तक्रार करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर उडण्याचे?.लक्षात ठेवा.निर्णय तुमचा आहे.हे कुलूप फक्त आतून उघडते.म्हणूनच माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.असतो, ग्रामीण भागातील खेड्यातील शंकर खराटे याने थंडीचे कारण देऊन येणे टाळले असते तर आम्हाला थंडीत दोन तीन तास रिक्षाची वाट पाहण्या शिवाय पर्याय नसता.तर दुसरा पर्याय निवडला असता तर अनोळखी रिक्षावाला आणि त्यांच्या अनोळखी रोडमुळे त्याला खाड्याचा अंदाज आला नसता.त्याला जास्त पैसे देऊन ही त्यांचा साहजिकच शारीरिक त्रास आम्हाला झाला असता.म्हणूनच माणसांनी काय बनावे बदक की गरुड?, निर्णय तुमचा आहे. आम्हाला शंकर खराडे चालक मालक गरुडा सारखा वाटला तसेच आम्ही शंकर ला ग्राहक प्रवासी निश्चितच गरुडा सारखे वाटले असणार.
सागर रामभाऊ तायडे, 9920403859,भांडुप,मुंबई.