शिक्षण मोठे की संस्कार?.
जितके मोठे मन तितके सोपे जीवन.
वादाने अधोगती आणि संवादाने प्रगती, जग काय म्हणेल हा विचार करु नका.कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात.आणि यशस्वी लोकांवर जळतात.हे हिंदू धर्माचे संस्कार गीता,रामायण महाभारतात सांगितले आहे.त्यामुळेच भारतीय जनतेला हिंदू असल्याचा खुप गर्व आहे.त्या हिंदू धर्मात सहा हजार सहाशे जाती आहेत.त्यात भी पोटजाती असंख्य आहेत. त्यांच्या सर्व सुख दुःखाचे निवारण करण्यासाठी तेहतीस कोटी देव देविका चोवीस तास जागरूक आहेत.त्यांची मंदिरे वार उपवास,नवस महापुजा ही त्याच्यावर जन्मापासुन मृत्यु पर्यंत धर्माचे विविध संस्कार करण्यासाठी त्या तोडीचे धर्मग्रंथ आहेत. श्रीकृष्णाची गिता सर्वश्रेष्ठ आहे.ते प्रत्येक माणसाने स्वार्थासाठी अधर्माने वागले तर त्याला धर्मसंस्कार म्हणजे गिता तत्वज्ञान चुक ठरवीत नाही. धर्म की अधर्म ते समोरच्या व्यक्ती व आर्थिक व्यवहारा वरून ठरते. त्यामुळे कलियुगात त्याने कितीही उच्च शिक्षण घेतले असेल तरी ते धर्मसंस्कारा नुसार खोटे ठरते.पण भारतीय संविधाना नुसार ते गुन्हेगार ठरते. म्हणून भारतीयानां धर्माच्या संस्काराचा खूप गर्व आहे.म्हणूनच बहुसंख्येने बहुजन मागासवर्गीय समाजातील लोक गर्वसे कहो हम हिंदू है म्हणतात.
महाराष्ट्रात व देशात असा लक्षवेधी घटना खुप घडतात.त्यावर व्यापक चर्चा होत नाही.चॅनल मीडिया प्रिंड मीडिया यावर रोखठोकपणे लिहत नाही बोलत नाही.
एम एस्सी शिक्षित मुलाने निवृत्त प्राचार्य बाप- आईला दिले नारळ पाण्यातून विष दिल्याची लक्षवेधी घटना लातूर येथे घडली. सेवा निवृत्त वडील प्राचार्य व आईस,एम एस्सी (physics) मुलाने फ्लॅट नावावर वडील करत नाहीत म्हणून घुस मारण्याचे औषध नारळ पाण्यातून,ते कडू लागू नये.म्हणून साखर घालून प्रेमाने, आग्रहाने पाजले, अर्थात आपला पोर इतका का आग्रह करतोय, हे चाणाक्ष आईच्या लक्षात आले, त्या माउलीने ते नारळ पाणी अर्धे संपवत शंका मनात येई पर्यंत, प्राचार्य वडील नारळ पाणी घटाघटा पिऊन गेले.आणि काही क्षणात मृत्यू पावले.
अल्पसंख्याक समाजाचा शांतीचा संदेश देणाऱ्या ईदीच्या दिवशी ही हिंदू धर्माचे गर्व करणाऱ्या समाजाची बातमी मनाला बैचेन करून गेली साधा फ्लॅट नावावर करण्यासाठी, आई वडिलांना गावावरुन बोलवायचे आणि त्यांच्या पोटच्या पोरानं ज्यास तळ हातावरच्या फोडाप्रमाणे वाढवलं त्याने व ज्याला विज्ञानाच्या डिग्री पर्यंत शिक्षण दिले त्याने हे कृत्य करावे.तोच आईवडीलांना विषाचा घोट पाजतोय!. काय म्हणावं या शिक्षणाला? माणूस शिक्षणाने शिक्षित झाला की सुशिक्षित हा प्रश्न मात्र कायम माझ्या डोक्यात भुंगा बनून पोखरत असतो.त्यापेक्षा माझा अशिक्षित असंघटित नाका कामगार आईवडिलांना प्राणप्रणाने जपतो. शिक्षण माणसास स्वार्थी, धूर्त करते याचा हा पुरावा आहे.तो काळाच्या ओघात सिद्ध होतोय.संस्कार माणसाला मोठे बनवितात आणि शिक्षण मोठे बनवुन स्वार्थी बनवत असेल तर ?.समाजाचे देशाचे भवितव्य काय असेल?.
जे शिक्षण आपल्या आईवडिलांना पोसण्यासाठी मुलांना प्रेरीत करत नाही.जे ज्ञान देशाचे,समाजाचे, कुटूंबाचे प्रश्न सोडवू शकत नाही.आशा डिग्री वर अंत्यसंस्कार करावेत, असे वाटते. उच्चशिक्षित माणसं समाजाशी,देशाशी नेहमीच गद्दारी करीत आले आहेत.असंघटित कष्टकरी कामगार, मजुर,शेतकरी यांचे शोषण करण्यात सर्वात पुढे असनारा वर्ग हा नेहमीच सरकारचे कायदे कानून सांगुन शोषण करीत असतो.त्यात काही अपवाद असतात ते कौतुकास पात्र असतात.शेतकऱ्यांची कर्ज वसुली आणि उच्चशिक्षित, बिल्डर भांडवलदारांनी घेतलेल्या कर्जाची वसुली किती प्रामाणिक पणे करतात हे दिसुन येत आहे.त्यामुळे एकूण सुशिक्षित लोक किती संस्कारित आहेत हे सिद्ध होत आहे.
हिमांशू रॉय सारखा आय पी एस ऑफीसर कशी काय आत्महत्या करू शकतो, जो स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आहे, एक उच्च शिक्षित आध्यात्मिक गुरू कशी काय स्वतःस उजव्या कानशिला खाली पिस्तूलाची गोळी मारून घेतो.सारे अकालनीय आहे. नाही पटत असे शिक्षणाचे वांझोटी मंदिर बंद करावीत. कशी हिम्मत होते इतकं शिकून देखील
ह्या पेक्षा आपले अडाणी माणसं बरी होती,जे मरे पर्यंत माणसातच राहतात.
आपण लहानपणी कथा ऐकल्या असतात की, विंचूविन आपल्या पिलांना जन्म देते आणि तेच पिलं त्या विंचू आईस सर्व मिळून खाऊन जातात, फडशा पाडतात, असे तथा कथित विंचू जर तयार होत असतील तर ह्या विंचू च्या नांग्या कश्या ठेचाव्यात हे देखील काळाप्रमाणे इतिहासात सांगितले आहे. मग ती माकडीणीची गोष्ट आठवा जेव्हा स्वतःचा मृत्यू सामोरे असेल तर पिलांना देखील पायाखाली घेऊन नाका तोंडात जाणारे पाणी आडवावे लागते ही गोष्ट आहे.ती आता उलटी होतांना दिसत आहे.
हा सारा प्रकार पाहिल्या वर ऐकल्यावर मन जे छान असतं, नितळ असतं, पावित्र्या इतकं पवित्र असतं, ते गढूळ होतं.ते जेव्हा नितळ डोहात एखादा दुसरा असा खडा पडला तर उलथापालथ घडवितो. ऊन,वारा ,पाऊस न लागावा, म्हणून आपण झाडा खाली आश्रय घ्यावा. आणि त्याच झाडाची फांदी कडकन आपल्या डोक्यात पडावी, हे दैव की दुर्दैव!
मुलं सुशिक्षित झाल्यावर लग्न करतात.आणि दोन महिन्यातच आईवडीलांना सोडुन वेगळे राहण्याचा निर्णय घेतात.बेरोजगार मुलांचे ही आईवडील लग्न करून देतात ते ही आईवडीलांना मानसिक त्रास देतात.पहिला त्याला एकट्याला खाऊ घालावे लागत होते.लग्ना नंतर दोघांनाही खाऊ घालावे लागते.वर्षा नंतर ती संख्या वाढत जाते.पण उत्पन्नात भर पडत नाही. यावर कोणी चर्चा करीत नाही. घरात शांती नांदावी या ऐवजी अशांती नांदते.त्यामुळेच हत्या,आत्महत्या हिंसाचार वाढत आहेत असे म्हटले तर चूक ठरणार नाही. एकत्र कुटुंब आणि एकत्र गांव ही देशाची शान होती ती आता नष्ट होत आहे.एकत्र कुटुंबात सर्वांचा मानसन्मान ठेवणारे सांस्कृतिक संस्कार होते.त्यामुळेच गावातील सर्व जातीधर्माच्या वडीलधारी माणसाची आदरयुक्त भिती वाटत होती आज ती संपली म्हणूनच एक मुलगा आईवडीलांची संपत्ती साठी नारळाच्या पाण्यात विष घालून हत्या करण्याचे धाडस करीत आहे.त्याला समाजाची,कायद्याची आणि धर्माची भिती राहीली नाही. म्हणूनच संस्कार हे लहानपणापासून सत्य असत्य यातील फरक सांगितला पाहिजे.अंधश्रद्धा,अज्ञाना पासुन विज्ञानाच्या कक्षा कशा वाढत चालल्या हे सांगितल्यास मुलांच्या शिक्षणाच्या वयात योग्य संस्कार होती.मग हा प्रश्न निर्माण होणार नाही की शिक्षण मोठे की संस्कार?.