रमाबाई पुतळा विटंबना आणि हत्याकांडाचे काय झाले?.
महाराष्ट्रसह देशभरात ऐतिहासिक आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र असलेल दादर येथील प्रसिद्ध आंबेडकर भवन पाडल्याचे प्रतिसाद,प्रतिवाद गाजले. त्यामुळे आम्ही मागील घडलेल्या लक्षवेधी घटना विसरून पुन्हा पुन्हा तेच तेच गल्ली बोळातील आंदोलनवर आपली पूर्ण शक्ति खर्च करतो,आणि आपली दुकानदारी कायम ठेवतो.
अहमदनगर जिल्हात दलित बौद्ध अन्याय अत्याचार च्या विरोधात आक्रोश मोर्चा काढल्यामुळे खुप गाजला होता. अहमदनगर जिल्ह्यात ज्या दलित बौद्ध तरुणाच्या हत्या झाल्या त्याबाबत जिल्ह्यातील आंबेडकरी संघटना पक्ष सोडल्यास कोणाला ही वाईट वाटले नाही.पण प्रचंड आक्रोश मोर्चा काढल्यामुळे जातीवादी मानसिकता असलेल्या त्याच्यातील सैतान (माणूस ) जागी झाला ?.देशातील कोणताही कायदा त्यांना लागू होत नसल्या सारखा रात्री मोर्चा कडून घटनाकाराला बाबत प्रचंड गरड ओकली.नेमके सध्या महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तेवर असल्यामुळे त्यावर योग्य कडक करवाई झाली नाही. तसाच प्रकार ऐतिहासिक आंबेडकर भवन रात्री २ /३ वाजता स्वयं घोषित ट्रस्टी ने पडून त्यावर योग्य कडक कायदेशीर करवाई होत नाही. ज्या रमाबाई नगरातल्या हत्याकांडा नंतरच राज्यातल्या दलित समाजाने युती सरकारला जातीयवादी ठरवलं होत आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला होता.पण युतीच्या पाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने ही दलितांच्या तोंडाला पानंच पुसली होती .हे विसरता येत नाही. मनोहर कदम साररखा जातीवादी अधिकारी पोलीस दलात ठेवणं धोकादायक असल्याचा अभिप्राय आपल्या चौकशी अहवालात देणाऱ्या गुंडेवार आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेस आघाडीने तेव्हाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलं होतं. शिवाय, मनोहर कदम याच्यामुळे रमाबाई नगरात झालेला गोळीबार आणि पोलिसांच्या बळाचा अतिरेकी वापर अनाठायी होता, असा ठपका ही आयोगाने ठेवला होता. असं असतानाही राज्य सरकारने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार र्वष लावली. या संपूर्ण काळात विविध दलित संघटना आणि दलित कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे अखेर २० डिसेंबर २००२ रोजी कदम याला अटक करण्यात आली. पण कदमने मात्र कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचं सांगत रूग्णालयात अटकेचे दिवस काढले. कारण युती असो या आघाडी दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.हे शिर्डीत विखे पाटलानी विरोधीपक्ष नेता असताना दाखवून दिले.विशेष म्हणजे,या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कदम पोलीस गणवेषात न्यायालयात हजर होत असे. त्याच्या या कृतीमुळे साक्षीदारांवर दडपण येत असल्याचा आरोप करत त्याच्या निलंबना साठी गजानन लासूरे आणि अनिकेत देशकर या दोघा वकिलांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने मंजूर केली. गंभीर गुन्ह्यचा खटला सुरु असलेला पोलीस अधिकारी गणवेषात आणि सेवेत असल्यास लोकांचा फौजदारी न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल, हे याचिकाकर्त्यांचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं होत. पण खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे रमाबाई नगरवासीयांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता.
11 जुलै 1997 ला जातीवादी हरामखोर राज्य राखीव दलाचा पोलीस फौजदार मनोहर कदम याने भ्याडपणे गोळीबार केला. या गोळीबरात सुखदेव कापडणे ,संजय निकम ,बबलू वर्मा, अनिल गरुड, किशोर कटारनवर, संजय कांबळे, विलास दोडके, मंगेश शिवसरने, अमन धनावडे, कौसल्या पाठारे असे 10 जण शहीद झाले होते तर 23 जण जखमी झाले होते.आज (11 जुलै) रमाबाई नगर, मुंबई हत्त्याकांडाचा स्मृतिदिन आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून रमाबाई नगर हत्त्याकांडाची नोंद झाली आहे. भिमसैनिकांवरील जातीवाद्यांचा व पोलिसी बळाचा वापर करून झालेला हल्ला भिमसैनिकांवरील अत्याचाराच्या घटनेत अतिशय निंदनीय होता. स्वतंत्र भारतात वावरणाऱ्या जातीयवादी षंड प्रवृतींचा आंबेडकरी समाजावरचा द्वेष जगासमोर आणणारी ही घटना होती.या हत्त्याकांडात अनेक भीमसैनिकांना, माया बहिणींना, आबाल वृद्धांना आणि लहान लहान भीमसैनिकांना पोलिसाच्या अत्याचाराचे शिकार होऊन शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे भिमसैनिकांसाठी 11 जुलै हा काळा दिवस आहे.
रामबाई हत्याकांडा नंतर अनेक जनांदोलन झाली .नामांतर साठी १६ वर्ष संघर्ष झाला.खैरलांजी ते,जवखेडा, खर्डा, सोनई,शिर्डी अहमदनगर जिल्हा राज्यातील दलित बौद्ध समाजा करिता जातीवादी मानसिकता असलेल्या सैताना चा उगमस्थान झाला होता.रमाबाई हत्याकांडा पासून शिर्डीच्या हत्याकांडा पर्यंत सर्व आंबेडकरी संघटना राज्यात तालुखा जिल्ह्यात आपसातील मतभेद विसरून जनांदोलन करताना पोलीस स्टेशन वर सनद शीर मार्गाने नोंद करतात.पण न्यायलाया कडून न्याय मिले पर्यंत सर्व पुरावे नष्ट केल्या जातात.आणि मुख्य आरोपी पुराव्या अभावी सही सलामत सुटत आले आहेत.मग आमची तरुण मुले विचारतात बाबा रमाबाई नगरातील हत्याकांडाचे काय झाले?.आणि पुतळा विटंबना करणारा कोण होता तो पकडला काय?.त्याचा मुख्य सूत्रधार कोण होता?.त्यांचे काय झाले.रमाबाई हत्याकांडा करिता ज्यांनी ज्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.तेच मुख्य आरोपी झाले.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली तो आणि त्याचा मुख्य सूत्रधार कधीच समोर आला नाही.जनआंदोलन करणारे कार्यकर्ते आणि नेते नंतर स्वता पोलीस कोर्टाचे चक्कर काढुन हैराण झाले मानसिक शारीरिक व आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे ढासळले आणि नाईलाजाने काँग्रेसवासी झाले. त्यामुळे ते ना आंबेडकरी समाजाचे राहिले ना रिपाईचे. आज रमाबाई नगर घाटकोपरचा फेर फटका मारल्यास हेच का ते रमाबाई नगर असा प्रश्न पडतो .रमाबाई नगरातील ४५ मंडळा च्या तरुण कार्यकर्त्यांना भेटा आणि एकच प्रश्न विचारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि गोळीबार करणाऱ्या मनोहर कदमचे काय झाले?.रामबाई नगरातील गोळीबारत निरपराध भिमसैनिक मारल्या गेले.त्या शहीदाना विनम्र अभिवादन करण्या शिवाय आपल्याला पर्याय नाही.कारण ज्यांनी रमाबाई हत्याकांड ज्यांच्या आशीर्वादाने मनोहर कदम यांने घडविले त्याचेच सरकार आज आहे.आणि दुखची बाब ही कि ज्या नेत्याने समाजा कडून गुरा सारखा मार खल्ला तोच मान्यताप्राप्त नेता आज त्याच्या मांडीला मांडी लावून केंद्रात सामाजिक न्याय मंत्री झाले.आजची तरुणानी व विद्यार्थ्यानी विचारले रमाबाई कॉलनी तील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना कोणी केली होती?.त्याचा आरोपी एवढी मोठी जन आंदोलन करून पोलिस का पकडू शकले नाही. रमाबाई ते शिर्डी हत्याकाड घडविणारी आणि आता आंबेडकरी समाजाचे प्रेरणाश्रोत्र असलेल मुख्य केंद्र आंबेडकर भवन पाडनारी प्रवृत्ती गाडण्यासाठी बंद करा ती गटबाजी सर्वांनी एक व्हा भीमाचे लेक व्हा आणि शहीदाना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्हा.
आपला भिम सैनिक -सागर रा तायडे भांडूप मुंबई -९९२०४०३८५९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा