मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!.
भारतात देवा देवीकांच्या जन्म मृत्यू च्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातात.त्याचं बरोबर त्यांनी अफाट चमत्कार कसे देवाला प्रसन्न केल्यामुळे केले हे आवर्जून सांगितल्या जाते. गणेशोत्सवात दररोज होणारी आरती व नवरात्रीच्या देवीच्या आरती बहुसंख्य मुलामुलींना तोंडपाठ असतात. पण त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाही. रामानंद सागर यांनी रामायण, महाभारत टीव्हीवर आणल्या पासुन तर विद्यार्थी शिक्षकांनाच उलट सुलट प्रश्न विचारतात. त्यात इंग्रजी माध्यमाच्या स्कुल मध्ये थोडे विज्ञान थोडे सांस्कृतिक म्हणून जनरल नॉलेज म्हणून रामायण महाभारतातील पात्रराची वेशभूषा व ठराविक डॉयलाग बोलण्याची स्पर्धा घेतली जाते.
सोशल मीडियावर सध्या एक हुशार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात रामायण की कहाणी ही पोस्ट खुप फिरते आहे. आजचा विद्यार्थी हा स्मार्टफोन, कॉम्प्युटर, गुगल, यूट्यूब वर पाहिजे ते शोधणारा आहे.त्यामुळे शिक्षकांनी सांगितले तर चुपचाप ऐकून घेणारा नाही.त्याला जे पटल नाही तर प्रश्न विचारण्याचे धाडस करतोच.तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात झालेला प्रश्न उत्तर कसा घडतो वाचा.शिक्षक मुलांनो श्री रामचंद्रजी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी सर मला काही सांगायचे आहे.शिक्षक > बोल पप्पू ,पप्पू > रामचंद्र जी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय चुकीचा होता.शिक्षक तो कसा काय?.पप्पू > सर रामचंद्र जी कडे हनुमान होते.ते उड्डाण भरून लंकेत जाऊ शकत होते. मग पुल बांधण्याची गरज नव्हती.शिक्षक हनुमान उड्डाण घेऊ शकत होते बाकी वानर उडू शकत नव्हते. शिक्षक > फक्त हनुमान उडू शकत होते.बाकी वानर उडू शकत नव्हते.पप्पू > गुरुजी ते हनुमानाच्या पाठीवर बसुन जाऊ शकले असते.जर हनुमान पुरा पहाड हातावर उचलून आणू शकतात तर ?.शिक्षक > देवाच्या चमत्कार लिला वर प्रश्न विचारत नसतात नालायका.पप्पू >गुरुजी त्यांच्या कडे आणखी एक उपाय होता.गुरुजी > रागाने लाल होऊन काय?. पप्पू > गुरुजी हनुमान आपला आकार पाहिजे तेवढा लहान व मोठा करीत होते.जसा मगराच्या तोंडातुन लहान होऊन बाहेर निघाले होते व सूर्याला गिळण्यासाठी मोठे झाले होते.तसेच ते आपला आकार समुद्राच्या लांबी व खोली एवढा बनवुन घेऊ शकले असते त्यांच्या पाठीवरून बाकी वानर व रामचंद्रजी लंकेत जाऊ शकले असते.गुरुजी आणखी एक गोष्ट विचारू ?.शिक्षक >विचार. पप्पू >गुरुजी ऐकले आहे की समुद्रावर पुल बनवितांना वानर सेनेने दगडावर राम नांव लिहले होते?.त्यामुळे सर्व दगड पाण्यावर तरंगत होते म्हणे?.गुरुजी > हा ते सत्य आहे.पप्पू >गुरुजी मग वानर सेनेला वाचणे लिहणे कोणी शिकविले होते?.गुरुजी> हरामखोर,नालायक देवाच्या गोष्टीवर अविश्वास दाखवितो?. बंद कर तुझी बकवास व मुर्गा बनुन वर्गाच्या बाहेर उभा रहा.पप्पू > ठीक है गुरुजी, वर्षानुवर्षे आम्ही वर्गाच्याच काय गांवच्या बाहेर उभे आहोत.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.विज्ञानाच्या चौकटीत ते घेतले तर तो श्रद्धा व अंधश्रद्धा,आणि ज्ञान व अज्ञान यातील फरक समजु शकतो.मग त्याला नेहमी प्रश्न पडतात.ते मित्रांना नेहमी विचारतो.मंदिर नाही शाळा पाहिजे!.धर्म नाही अधिकार पाहिजे!!.गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाही.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही.पण मंदिर बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात.त्यात त्यांची चढावळ लागते.धर्मानुसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो.तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?.सुशिक्षित पदवीधर सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्तर मागत आहेत.मागासवर्गीय समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली, देव दर्शन, उपवास पकडून नवस फेडला म्हणून नाही.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला रोखण्यासाठी मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज देशभरात ब्राम्हणी प्रिंट,चॅनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहे.धर्मा नुसार सर्व हिंदू आहेत.मग मंदिराच्या उत्पन्ना वर सर्वच समान अधिकार का नाही?. राज्य व केंद्रातील सरकार यावर ठोस निर्णय का घेऊ शकत नाही?.शाळा,कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल,आज पर्यत धर्माने सांगितले ते मुलामुलींनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातुन कसा बाहेर आला यांचे शाळा कॉलेज मध्ये उत्तर मिळत नाही.पुढे असे सांगितल्या जाते रावण महापंडित होता!.मग आज पर्यत एकही पंडितांच्या मुलाचे नांव रावण का नाही?.शाळा कॉलेज मध्ये मुलामुलींना गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यात नियमितपणे आरती म्हटली जाते.बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे.मग कोणत्या शाळा कॉलेज, व हिंदूंच्या मंदिरात बुद्ध मूर्ती का नाही लावल्या जात नाही?.कोणत्याही भटा ब्राम्हणाने स्वतःचा मुलाचे किंवा इतर हिंदू धर्मातील लोकांच्या मुलाचे नांव गौतम ,सिद्धार्थ,तथागत का ठेवले नाही. वाल्मिकी ऋषी सर्वात श्रेष्ठ होते त्यांनी रामायण/महाभारत लिहले.मग कोणीच हिंदू धर्मातील आपल्या मुलांचे नांव वाल्मिकी का ठेवत नाही.असे प्रश्न सोडविण्यासाठी मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!.
ब्राम्हण किती ही उच्च शिक्षित असु द्या.तो कोणत्याही मोठया पदावर विराजमान झाला तरी आपली ब्राम्हणवादी,असमानतावादी भूमि का जबाबदारी कधीच विसरत नाही.आपण हिंदू म्हटले की सर्व जाती पाती विसरून त्यांच्या आदेशाचे पालन करतो. पण शाळा कॉलेज आणि मंदिर, व धर्म आणि अधिकार यातील फरक आपल्याला कळत नाही.मग स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्क, गुगल यूट्यूब यासाठी 3G,4G पाहिजे हे कसे कळते ?.हा अज्ञान व विज्ञान यातील फरक आहे.म्हणूनच सर्व भारतीय नागरिकांनी गांभीर्याने विचार करून मांगणी करावी की मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!!.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा