शाळा कॉलेज मध्ये गीता?.
महाराष्ट्र राज्य सरकारने गीता हा पवित्र धर्म ग्रंथ शाळा कॉलेज महाविद्यालयात वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.त्याला पुरोगामी विचारांच्या लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.पण राज्य व केंद्र सरकार हे आर एस एस प्रणित मनुवादी हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांना जे करायचे आहे ते जाहीर पणे करण्याची हिंमत करीत नाही ते त्यांच्या धर्मानुसार लपूनछपून मुखवटे धारण करून करीत आहे,भारतात हा सर्वधर्मसमभाव मानणारा देश आहे तो कधीच एका जातीचे समर्थन करून राज्य करू शकत नाही.भारतीय संविधाना मुळे हा देश सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन गुण्यागोविंदाने नांदत आहे.भारतीय संविधान जर संपले तर देशाचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही.गीता हा हिंदूंचा पवित्र धर्म ग्रंथ आहे त्यात स्वतःच्या फायद्या साठी कमजोर लोकांवर अन्याय अत्याचार केला त्यांचे शोषण केले तर ते चुकीचे ठरत नाही.परंतु गोरगरीब लोकांनी उच्च वर्गीय वर्णीय लोकांच्या विरोधात संघटितपणे संघर्ष केला तर तो अधर्म समजल्या जातो.गीते मध्ये जे दिले आहे ते प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांनी स्विकारल्यास कर्ण, घटोत्क भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर, द्रौपदी, पाचपांडव, कौरव यांच्यातील वर्ण संघर्ष जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही.धर्माचे विद्यार्थी दशेत मुलांवर संस्कार व्हावे म्हणून एका बापाने मुलांना गीता वाचण्यासाठी दिली.मुलाने काळजीपूर्वक ती वाचली तर काय घडू शकते त्यांचा हा विदर्भातील वऱ्हाडी भाषेतील संवाद सोशल मीडियावर फिरत आहे.नागपुर चे अधिवेशनात गीता वाटपाचा निर्णय झाला.त्यांचे पडसाद राज्य भरात उमटत आहेत.ग्रामीण भागातील हा एक नमुना आपल्या समोर देत आहे.विद्यार्थ्यांनी गीता वाचली तर काय होऊ शकते?.
वडील : "ए पोट्ट्या.. का करून रायला बे..?? मी तुले थे 'गीता' देली होती वाचाले... झाली का पुरी वाचुन??
मुलगा : (वडिलांवर बंदूक रोखून) "हो बावाजी झाली पुरी वाचून… आता तुमी मरासाठी तय्यार राहा..
वडील : "बे भैताडा.. पागल झाला का…? बाप होये न मी तुया..?
मुलगा : चोssssप…!! कोनी कोनाचा बाप नाई अन कोनी कोनाचा पोरगा नाई राहात.. "गीता" मधी लिहून हाये असं.. मघाशीच वाचलं.
वडील : "बे बह्याडा मरून जाईन न मी...?
मुलगा : "बावाजी फक्त शरीर मरन तुमचं....आत्मा नाई मरत कधी… आत्मा अमर रायते..
वडील : "बे पोट्ट्या मजाक नोको करू... गोळी-गीळी चालुन जाईन… तडपू-तडपू मरीन मी..
मुलगा : "अरे बावाजी कायले फालतू चिंता करता..आन कावून येवढे घाबरता..? आत्माले ना कोनी पेटवू शकत, न कोनती गोळी मारू शकत, न कोनती तलवार कापू शकत … सांगितलं न आत्मा अमर राहीन तुमची..
वडील : "अरे माया पोरा, आपल्या भावा-बहिनीचा त विचार कर…कमीतकमी आपल्या आईबद्दल त विचार कर.. माया बिना अनाथ होतीन ते..
मुलगा : "ओ बावाजी… फालतू Overacting नोका करू… ह्या जगात कोनीच कोनाचं नाई राहात.. सब रिश्ते मतलबा साठी रायते…सब मोहमाया हाये.. हे बी लिहलं आहे 'गीता' मधी..
वडील : "अरे माया लेकरा.. पन कावून असा करतं तू... मले मारुन तुले का भेटन?
मुलगा : मले नाई तुम्हाले… या 'धर्मयुद्धा'मधी तुम्ही मेले त तुम्हाले स्वर्ग भेटन.. डायरेक…..आन मले तुमची प्रापर्टी भेटन... डायरेक..!!
वडील : "अरे माया सोन्या… असा नोको करू न मा…
मुलगा : "अरे बावाजी तुमी कावून अशे करता..?? जशी आत्मा जुनी वाली म्हतारी बॉडी सोडून दुसऱ्या बॉडीत घुसते, तशेच तुम्ही बी तुमची ही म्हतारी बॉडी सोडून दुसऱ्या फ्रेश बॉडीत घुसान..
वडील : "आबे पन…..
मुलगा : "हा चला लय झालं आता तुमचं नाटक.. डोळे बंद करा...
ढिशक्याsssssssव….!!!
या गोष्टीतुन आपण काय बोध घेणार?. तर आपल्या लेकरांना चांगलं साहित्य वाचायला द्या.गीता वाचली तर आणखी काय चांगले घडण्याची इच्छा बाळगणाऱ्या बापाला हेच मिळणार असेल त्याला गीता वाचनासाठी देणे योग्य की अयोग्य हे आईवडील यांनी ठरविले पाहिजे जर राज्य सरकार हे ठरवत असेल तर ?.त्यांचा निर्णय चांगला आहे असे समजता येईल काय?.आर एस एस प्रणित राज्य केंद्रातील सरकार अनेक समस्या सोडविण्यास असमर्थ ठरले आहे.त्यामुळे जनतेचे लक्ष दुसरी कडे वळविण्याचा हा प्रकार आहे.त्यातून समस्या सोडविण्या ऐवजी समाजा समाजात तेढ निर्माण होईल.अशी ही गीता आहे
सागर रामभाऊ तायडे, भांडुप, मुंबई 9920403859
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा