सोमवार, ६ मे, २०१९

जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत

जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत 
 जेट एअरवेज कंपनी बंद पडली व वीस हजार कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या एका दिवसात गेल्या या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला. तिथे युनियन होती की नाही माहिती नाही. पण विमानतळावर संघटित कामगारांची व असंघटित कंत्राटी कामगारांची एकमेव युनियन भारतीय कामगार सेना ही आहे. ह्या युनियनची प्रचंड दहशत आत बाहेर आहे.मोठं मोठया कंपन्या एकदिवसात बंद पडत नाही. एक दोन वर्षांपासून तिच्या आर्थिक परिस्थितीचा ताळेबंद संचालक मंडळाच्या वतीने एम डी सादर करत राहतो.त्यात काटकसरीने वागण्याचे सूचना दिल्या जातात. कास्टकटिंग सुरू केली जाते. देशात अनेक कंपन्या जागतिक बाजारपेठेतुन गायब झाल्या. प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहेत.काहींना विज्ञानाच्या विकसित तंत्रज्ञानाचा मार खावा लागला. तर काहींना प्रगतीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत यांचा अंदाज आला नाही. किंवा त्यांनी निसर्गाच्या काळानुसार बदलत्या उद्योग धंद्याचा स्वीकार केला नाही.म्हणूनच ते बाहेर फेकल्या गेले.
१९९८ मध्ये कोडक Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते,ती कंपनी जगातील सर्वात जास्त ८५ टक्के फोटो पेपर बनवून विकत होती.ती सर्वात जास्त लोकप्रिय होती.या लक्षवेधी कंपनीला काही वर्षांनंतर Digital photography या विकसित तंत्रज्ञानाने कोडक  कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं.kodak कंपनीचं अक्षरशहा दिवाळं निघालं सर्व कामगार रस्त्यावर आले. HMT ( घड्याळ ) BAJAJ (स्कुटर) DYNORA (टीव्ही) MURPHY (रेडिओ) NOKIA (मोबाईल) RAJDOOT (बाईक) AMBASDOR (कारया सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरी सुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.कारण?. ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या नाहीत. कोणालाच अंदाज नसेल कि येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील.चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आपल्याला स्वागतच करावे लागेल.
डिजिटल मार्केटिंग,हाडवेयर,सॉफ्टवेअर कॉम्प्युटर  तंत्रज्ञानाचा बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. अनेक कामगार कर्मचाऱ्यांची कामे एक कुशल ऑपरेटर बसल्या जागी करू शकतो. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे उबेर.
उबेर फक्त एक software कंपनी आहे.त्याची स्वत:ची एकही कार नाही.तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे. Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company असुनही तीचं स्वत:चं असं एकपण होटेल नाही. Paytm,Ola cabs,oyo rooms यांसारखी खुप उदाहरणं आहेेेत.
जागतिक करणने जग झपाट्याने बदलत आहे. भारतात मात्र शाप दिल्याने शत्रूला अतिरेकी मारतात. आणि सत्यनारायण महापूजा घातल्याने संकट दूर होतात.उच्चशिक्षित लोक पदव्या घेऊन वकील, प्राध्यापक डॉक्टर होत असतांना त्यांच्यावर ही गंडांतर येत आहे.भारतातील कोर्टाच्या बाहेर पहा जशी सकाळी नाक्यावर नाका कामगारांची फौज उभी असते तशीच वकिलांची फौज कोर्टाच्या आवारात उभी असते.त्या आवारात कोणत्याही माणूस आला तर हे वकील लोक त्यांच्या मागे धावतात. 
विदेशात विशेष यु एस मध्ये वकिलांना कोणत्याही प्रकारची कामे नाही. कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकतं. येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९० टक्के वकिल बेरोजगार  होतील. जे १० टक्के वाचतील ते फक्त super Specialist राहतील. Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चं Diagnosis ४ पट जास्त Accuracy नं करतो.२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहेत.२०१९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील.२०२० पर्यंत एका असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरूवात केलेली असेल.येत्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९० टक्के Cars गायब झालेल्या असतील.ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid... Petrol ची खपत ९० टक्के कमी होऊन जाईल. सर्व अरब देश कंगाल झालेले असतील.आपण Uber सारख्या एका Software नं कार मागवायची की Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहिल.Car Driverless असल्या कारणे ९० टक्के Accidents होणं बंद होईल.Car Insurance नावाचा धंदा बंद पडेल.ड्रायव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९० टक्के Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटतील.मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता.तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली.आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय. तुम्ही कधी लक्ष केंद्रित केलं का?.जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.
आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारं तिसरं दूकान फक्त मोबाईल फोनचं आहे.Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची आता तर Paytmनं व्यवहार  होतात. रेल्वे तिकीटाचं फोनवर बुकींग तर पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत. Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झालं.जग फार वेगात बदलत आहे.डोळे,कान,नाक उघडे ठेवा नाहीतर मागं राहाल. वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.यासाठी प्रत्येक माणसानं वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवं.वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना. आता येणाऱ्या काळासाठी अपडेट असणं व त्याबरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून Upgrade असणं गरजेचं आहे. जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत. यांचा विचार सर्व संघटित व असंघटित कामगारांनी केला पाहिजे.
कामगार कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन स्वतःच्या स्वरक्षणासाठी संघटना, युनियन बनविली पाहिजे. आणि स्वतःच नेतृत्व केले पाहिजे.दुसऱ्यांच्या भरोसा वर राहाल तर तुमच्यावर गिरणी कामगार व जेट एअरवेज कामगारा सारखी परिस्थिती आल्या शिवाय राहणार नाही.
भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम कायद्याला जन्मा दिला.त्याला कंत्राटी कामगारांच्या भल्यासाठी असा दिशाभूल करणारा प्रचार करण्यात आला.सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कारखाने,कंपनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कामगारांची जबाबदारी राहील असे सांगून सर्वांनीच आपली मुख्य जबाबदारी टाळली.त्यांचे समर्थन करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली दिला होता. या निर्णया विरोधात राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी जायाला पाहिजे होते पण 12 राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन व एक अंतर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन सि एफ टी यु आय यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली नाही. या मागचे खरे कारण काय असेल तर बहुसंख्य मागासवर्गीय कामगारांचे जाती व्यवस्था नुसार कायमस्वरूपी आर्थिक शोषण होत राहावे. याचे वैचारिक समर्थन होय.यामुळे प्रत्येक वेळी सरकारी, निमसरकारी खाजगी कारखान्यात कंपन्यांच्या आत चालणारे कायमस्वरूपी काम प्रत्येक वर्षी ठेकेदार बदली केल्या मुळे कामगार ही बदलावा लागतो. त्यामुळेच ठेकेदारी पद्धतीने काम करणारा कोणत्याही कामगार कोणत्याही सरकारी निमसरकारी खाजगी कारखान्यात,कंपनीत कायमस्वरूपी कामगार राहू शकत नाही. युनियन बनवु शकत नाही हा देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाच्या कामगारांवर अन्याय करणारा निर्णय झाला होता.जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत
या विरोधात स्वतंत्र मजदूर युनियन बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगारात प्रबोधन करून जनजागृती करीत आहे.जे मागासवर्गीय बहुजन समाजातील कामगार या जातीव्यवस्था समर्थन करणाऱ्या ट्रेंड युनियन चे वार्षिक सभासद आहेत त्यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करून आपण कोणाचे व कोणत्या विचारधारेचे समर्थन करतो ते ठरवावे.
सरकारी निमसरकारी व खाजगी कारखान्यात,कंपनीत स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे ठेकेदार बदली झाला तरी कामगारांना कामावरून कमी करू नये अशी राज्य व केंद्र सरकारने सुरवातीला भूमिका घेतली होती. त्यावेळी भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य असे जनआंदोलन देशभरात उभे राहिले होते. त्यातूनच अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्षाचा जन्म झाला.पुढे राजकिय सत्ताधारी भांडवलदारांच्या फंडिंगवर निवडणूक लढवुन निवडून येत असल्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या प्रणित कामगार संघटना, ट्रेंड युनियन सत्ताधाऱ्यांच्या किंवा सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात न जातात केवळ रस्त्यावरील आंदोलने करून कामगारांची दिशाभूल व फसवणूक करीत आले आहेत.मग संघटीत कामगारांची हि व्यवस्था असेल तर असंघटीतांची काय ?.जेट एअरवेज  कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही इंटक प्रणित गिरणी कामगारांची युनियन होती.त्यांच्या पक्षाचे अनेक राज्यात व केंद्रात सरकार होते तरी मुंबई व देशातील गिरण्या बंद झाल्या व त्यांच्या जमिनीवर टोलेजंग टॉवर उभे राहून लाखो गिरणी कामगार उध्वस्त झाला.म्हणूनच बहुसंख्य कामगार ट्रेंड युनियन इंटक व राष्ट्रीय पक्षा पासुन दूर गेला.त्यांचे आत्मचिंतन संघटीत असंघटीत कामगारानी केले पाहिजे. नाहीतर जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत 
 स्वतंत्र मजदूर युनियन गेल्या बारा वर्षा पासुन बहुजन समाजातील मागासवर्गीय कामगारांना सांगत आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 12 व 13 फेब्रुवारी 1938 साली रेल्वे गँग मन कामगारांच्या कामगार परिषद समोर सांगितले होते की मागासवर्गीय समाजाच्या कामगारांनी स्वतःची ट्रेंड युनियन लवकरात लवकर स्थापन करून तिला स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन शी संलग्नता स्विकारावी असे सर्व क्षेत्रातील मागासवर्गीय कामगारांना आवाहन केले होते. आज पर्यंत लाखोच्या संख्येने मागासवर्गीय कामगार, कर्मचारी अधिकारी जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियनला वार्षिक वर्गणी देऊन आर्थिक दृष्ट्या मजबूत करतात.ते संघटीत कामगारांना असंघटित कामगार करणाऱ्या कंत्राटी कामगार कायद्याचे समर्थन करून पुन्हा जाती व्यवस्था स्थापना करण्यासाठी मदत करतात असे लिहले व म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.कामगारांचे अनेक समस्या आज जशाच्या तसा आहेत त्या सोडविण्यासाठी ट्रेंड युनियनने सनदशीर मार्गाने लढण्याची तयारी करण्या ऐवजी अयोध्या मध्ये राम मंदिर बांधकाम करण्यासाठी आंदोलन उभारण्यासाठी ट्रेंड युनियन संघटनानां पक्षांना आर्थिक मदत करतात.पण सामाजिक सुरक्षितता कायद्याच्या अंमलबजावणी साठी कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यावर भर देत नाही.
रेल्वे स्टेशनवर काम करणारा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, मेल एक्सप्रेस च्या डब्यात पाणी भरणारा कामगार, कारखान्यात काम करणारा इतर कामगार हा मोठया प्रमाणात कंत्राटी कामगार भरल्या जात आहे.त्यावर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी ज्या शक्तीने लढले पाहिजे होते त्या शक्तीने लढत नाही.गांधीवादी,गोवळकरवादी समाजवादी,मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या लाल बावटा वाल्या ट्रेंड युनियन मागासवर्गीय कामगारांना खूप प्रामाणिक वाटतात. पण आम्हाला हे समजत नाहीये कि जातीव्यवस्था समर्थक कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे नेते मागासवर्गीय कामगारांची गेट बाहेरची जात नष्ट करण्यासाठी काय करतात?.देशातील सर्वात जास्त कम्युनिस्ट चळवळी कामगारांच्या जोरावर चालतात. खालचे काम करणारे खास करुन त्या कामगारां पैकी बहुतांशी कामगार कर्मचारी हे मागासवर्गीय असतात. खरं तर मागासवर्गीयांना शंभर टक्के न्याय देण्याचं खरं काम बाबासाहेबांनी केलं. तर मग बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याच्या कामगार संघटना, युनियन कडे मागासवर्गीय कामगार मोठया संख्येने का जात नाही?. हा प्रश्न स्वताला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या कामगार,कर्मचारी अधिकारी यांना का पडत नाही. संघटित कामगारांना त्यांच्या मुलामुलींना असंघटित कामगार बनविण्यात कामगार संघटना युनियन आणि त्यांच्या महासंघाची मोठी भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे.जेट एअरवेज  कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.जेट एअरवेज कामगार एक जाती धर्माचे नव्हते तरी त्यांचा बळी भांडवलशाही ब्राह्मणशाहीच्या यंत्रणेने घेतला.यावर आज दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. परिस्थिती बदलली तर जाहीर चर्चा सुरू होईल.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप मुंबई 9920403859,
 

Attachments area

मतदान कोणाला करावे ?

मतदान कोणाला करावे ?

लोकांना लोकांमधून लोकशाहीने लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा सर्वात मोठा अधिकार म्हणजेच मताधिकार आहे.त्यामुळे लोकांनी लोकप्रतिनिधी निवडतांना पाच वर्षांत भविष्यात काय बदल होऊ शकते यांचा विचार करून मतदान केले पाहिजे.त्याचा गांभीर्याने विचार न करता मतदान केले तर त्यांचे परिणाम कायमस्वरूपी सर्व लोकांना भोगावे लागतात.
 असंघटीत कष्टकरी समाजाला पंधरा दिवस सुगीचे आले. तर राजकारणी लोकांना युद्धाचे दिवस आहेत.युद्ध जिंकण्यासाठी सर्व बाजूनी तन,मान,धन लावून प्रयत्न करावे लागतात.वेळ प्रसंगी सम,दंड भेद नीतीचा वापर करण्यास मागे पुढे पाहावे लागत नाही.जे तुमच्या कडे कधी चांगल्या नजर ने पाहत नव्हते ते आता तुमच्या पाया पडायला मागेपुढे पाहनार नाही. सोबत पत्रकार फोटोग्राफर घेऊन तुमची गळा भेट करतील.कारण आता म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तारखे पर्यंत तुम्ही त्याचे मायबाप आहात.त्याच्या प्रेमाला बळी पडू नका.खरोखर ते तुमच्या सोबत नेहमी असे वागतात काय?.तुमच्या सुखा दुखत सहभागी होतात काय?.आणि ते तुमची जात,धर्म पाहून मदत करतात काय?. कि तुमची अडवणूक करतात.यांचा विचार मतदारांनी करावा.९३ टक्के असंघटीत कामगार मजदूर,हे बहुजन समाजातील लोक दर पांच वर्षांनी फसवल्या जातात.त्यामुळेच ते वंचित बहुजन समाज म्हणून ओळखल्या जातात.
मतदार बंधू आणि भगिनीनो मतदान करताना खूप विचार करून मतदान करा.उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे. जातीचा,धर्माचा आहे हे महत्वाचे नाही.तो तुमच्यावर तुमच्या गावावर सर्व जाती धर्माच्या लोकावर माणुसकी दाखवनारा.भारतीय संविधान मानणारा आहे का?. त्याला मतदान करावे.राजकारण हा त्याचा प्रतिष्ठेचा धंदा आहे. त्याच्या स्पर्धेत आपला बळी जाणार नाही.याची दक्षता घ्यावी. पंधरा दिवसाच्या रणधुमाळीत आपण आपली सुरक्षा पहावी.हे सर्व राजकीय पक्ष आज जरी एकमेकाचे वस्रहरण करीत असतील.तरी ते निवडणुकी नंतर एकत्र आल्या शिवाय राहणार नाहीत.प्रश्न आणि समस्या तुमच्याच राहतील. तुम्ही त्याच्या नजर मध्ये कायम सलत राहाल. त्याचा परिणाम मतदारांना भोगावा लागतो.लाखो रुपये वाटताना अनेक उमेदवाराच्या गाड्या,माणस पकडल्या जातात त्याचे पुढे काय होते?.कोणालाच कळत नाही. काय करतात निवडणूक आचार संहिता पाळणारे अधिकारी. कुठे जाते भरारी पथक आणि पोलीस ?.आज पर्यँत कोणाला कडक शिक्षा झाली?. की त्याभिती मुळे असले प्रकार करण्याचे धाडस कोणी करत नाही.
मतदान करताना आणखी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा.आज आपण उमेदवारा कडून काही पैसे घेणार तो तुम्हाला एक मताचे पाचशे,हजार रुपये दिल.तर मतदार बंधू आणि भगिनी नो तुमच्या मताची किंमत किती असेल?.एका मताची किंमत एक हजार धरली तर एका वर्षाचे १२ महिने म्हणजे ३६५ दिवस x ५ वर्ष केली तर १८२५ दिवस म्हणजे तुमच्या एका मताची किंमत पन्नास पैसे होते.उमेदवार निवडून आला आणि तुम्ही त्याकडे कोणतेही काम घेऊन गेला तर त्याला कायम आठवणीत राहणार तुम्हाला एक मताचे हजार रुपये दिले होते.आज जो कोणी उमेदवार लाखो रुपये खर्च करतो ते फुकट करीत नाही पाच वर्षात अनेक योजनेतून ते वसूल करणार. गावाचा आणि गावात राहणाऱ्या माणसाचा विकास व कल्याण करण्या करिता केंद्र आणि राज्याचे २२ मंत्रालय आहेत.त्याच्या योजना जिल्हा तालुख्या मार्फत तुमच्या घरा पर्यंत पोचतात. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तशिलदार यांना स्थानिक लोकप्रतीधिनीना विश्वासात घेऊन पुढील कामे करावी लागतात.
ज्या उमेदवाराने निवडणूक जिंकण्यासाठी जे लाखो रुपये खर्च केले असतात तो मग कुठून वसूल करेल?. याचा मतदारांनी विचार करावा.मग आपण मतदान कोणाला करावे ते ठरवावे आपण दरवर्षी वृत्तपत्रात वाचतो. राजकीय नेत्याची संपती चार पट वाढली.देशाची समाजाची सेवा करणाऱ्याची संपती कशी वाढते?.सरकारी नोकरी करून साठ वर्षात मोठा अधिकारी निवृत्त झाल्यावर परत कुठे तरी नोकरी करतो. नोकरी करत असताना मुला मुलीचे शिक्षण,लग्न आणि स्वताचे २/३ किचनरूम घेताना त्याचे कर्ज फेडता फेडता निवृत्तीचे वय होवून जाते.मग राजकारणातील हे लोकप्रतिनिधी कोणता उधोग धंदा करतात कि त्यामुळे त्याची अफाट आर्थिक प्रगती होते?.  सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते कार्यकर्ते एकमेकांचे कायम शत्रु नाहीत.ते सर्वच सरकारी योजनेचा संपूर्ण लाभ घेतात.ते आपल्या असंघटीत कामगार मागासवर्गीय समाजाच्या मतावर ते करोडपती होतात.पुढे त्यांच्या नांवावर कायम सातबारा त्या मतदारसंघाचा लिहल्या जातो.म्हणुन ते वारसा हक्क सांगतात.काल प्रयन्त काँग्रेस राष्ट्रवादी भांडत असत एकमेकांचे उणे धुणे,इज्जत जाहीर पणे काढून लढत लढत आर्थिक स्थळावर मोठे झाले.आता तेच काम शिवसेना भाजपा यांचे पंचवीस वर्षाच्या युतीला राज्यात व केंद्रात सत्ता मिळाल्या मुळे त्यांचे आपसात कोणी किती खावे कसे खावे यांचे भानच ठेवले नाही.त्यांचे हिशेब तेच जनते समोर जाहीर पणे अभ्यासपूर्ण मांडत आहेत.त्यातुन सर्वच जातीच्या मराठी माणसाने आणि गर्वसे कहो हम हिंदू म्हणणाऱ्यांनी मतदान करतांना विचारपूर्वक करावा.
मतदार बंधू भगिनी नो आपल्या मुला मुलीचे भविष्य उज्वल करण्या करिता योग्य उमेदवाराला मतदान करा जो तुमच्या मतदार संघात अन्न,वस्र,निवारा, शिक्षण,रोजगार आणि आरोग्य यासाठी सरकारी योजना प्रामाणिकपणे राबवील. तरच तुमचे कल्याण आणि विकास होईल. जर वार्डात दहा माणस झाडू मारण्या करीता लावणार.आणि पालिकेच्या खात्यातून अठरा माणसाचा पगार घेणार.दोन गाड्या कचरा उचलणार आणि पालिका खात्यावर आठ गाडया लिहून जनतेची तन,मन,धनाने सेवा करणार हे आता लपुन राहिलेले नाही.माहिती तत्त्वज्ञान युग आहे.सोशल मिडियाच्या मध्यमा मुळे क्षणा- क्षणाची जगतील कोणतीही माहिती तुम्हाला मिळू शकते.जग झपाट्याने बदलत आहे.आपणही निसर्ग नियमा नुसार बदलणे गरजेचे आहे. म्हणून मतदान करा जागृत होवून मतदान करा.प्रलोभनाला बळी न पडता ताठ माने जगण्या करिता स्वाभिमानी मतदार म्हणून मतदान करून लोकशाही बळकट करा.आपला माणुस आपली विचारधारा जिवंत ठेवण्या करीता आपलाच गरीब होतकरू प्रामाणिक समाजसेवेची आवड असणारा माणुस निवडा. धंदा म्हणुन पक्ष संघटनेत काम करणारे लोक निवडू नका.ते तुमचा घात करतील हे विसरू नका. मतदान करा पण विचार पूर्वक करा.शेवटी असंघटीत कामगार,बहुजन समाज म्हणजे मागासवर्गीय समाजाला एकच विंनती.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने भाजपा शिवसेना युती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.म्हणून फुले, शाहु आंबेडकर यांच्या नांवाचा जयजयकार करणाऱ्या सर्व मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक बहुजन समाजातील असंघटित कामगार शेतमजूर मतदार बंधूनो हीच ती तुमची खरी परीक्षा आहे.मतदान कोणाला करावे ?. तुम्ही भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा किती आदर करता. आणि आदर्श ठेवता हे मतदान करून दाखवा.पक्ष आणि उमेदवार गरीब असला तरी, पडणार असेल तरी, आपली शक्ती दाखविण्या करीता त्यालाच मतदान करा.कायमस्वरूपी आम्ही भारतीय संविधान आणि लोकशाहीला मनापासून मानतो त्यांची अंमलबजावणी करतो. हे मतदारसंघातील संख्येने दाखवून द्या.मतदान करा.स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी.

लोकशाही की हुकूमशाही निवड करायची आहे.

लोकशाही की हुकूमशाही निवड करायची आहे.
 पालघर जवळील वेढी गावी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ मार्च १९३६ रोजी दिलेल्या भाषणात महत्वपूर्ण इशारा दिला होता तो "मत विकणे हा गुन्हा आहेच शिवाय तो आत्मघातकी आहे". आज ही भारतीयांना कळला नाही. हीच मोठी शोकांतिका आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की राज्यघटनेप्रमाणे सर्व अधिकार कायदेमंडळाकडे जातील व कायदेमंडळाच्या हुकूमती खाली कलेक्टरांना व मामलेदारांना मान खाली घालून वागावे लागेल." यासाठी कायदेमंडळावर चांगली माणसे लोकप्रतिनिधी म्हणून गेली पाहिजेत.शेठ,सावकार,पैसेवाले कायदेमंडळावर जाण्यासाठी डोळे लाऊन आहेत.भारतीय संसदीय मंडळावर म्हणजेच कायदेमंडळावर लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपल्या सर्वात मोठा मताचा अधिकार दिला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच धोका ओळखला होता म्हणून त्यांनी देशातील तमाम शोषित, वंचित मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाला मत ही विकण्याची वस्तु नाही.ती आपली संरक्षणाची साधनशक्ती आहे.हे लक्षात न घेतल्यामुळे मते विकत घेऊन नालायकाची खोगीरभरती कायदेमंडळावर गेल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगती कडे वाटचाल करेल,करीत आहे.
 हे तपासून पाहण्यासाठी आर एस एस प्रणित भाजपा आणि त्यांच्या विविध संलग्न संस्था, संघटना यांनी काँग्रेसच्या सरकार विरोधात जी जी जनआंदोलन करून जनमत तयार केले ते मुद्दे आज मोदींचे सरकार त्यांचे एकूण मित्रमंडळी प्रिंट,चॅनल मीडिया पूर्णपणे विसरली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यावर कुठेच चर्चा होत नाही. म्हणून तुम्हाला लोकशाही की हुकूमशाही निवड करायची आहे.
मोदींच्या गळ्यात प्रधानमंत्री पदाची माळ पडल्या नंतर मोदीने ज्या पद्धतीने देशात प्रचार,प्रसार करून सर्वत्र गोंधळ निर्माण केला होता.लोकसभा २०१४ ला ज्या मुद्द्यावर मोदींनी निवडणूक जिंकली ते मुद्दे आता २०१९ ला कुठे आहेत?. शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी केलेली आंदोलने आणि शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्त्या चर्चेत नाहीत.लाखो संघटीत कामगार उध्वस्त करून असंघटित कामगारांच्या टोळ्या निर्माण होत असतांना कामगार कायद्यातील अनिष्ट बदलांवर चर्चा नाही.
मराठा,धनगर,गुजर,ओबीसी, अल्पसंख्याक यांना विशेष आरक्षण सवलती देऊ सांगणारे आता मागासवर्गीय यांच्या बढतीतील आरक्षणावर चर्चा करीत नाही.विशेष महिला आरक्षणावर कोणतीही चर्चा नाही.सरकारी सार्वजनिक उधोगधंदात तोटा दाखवुन खासगी उद्योगपतीला मातीमोल भावाने विकल्या, (बी एस एन एल,ओ एन जी सि)त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली असतांना, बेकारी कमी करण्यासाठी कोणतीही चर्चा नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोई सवलती, वसतिगृह शिष्यवृत्तीवर चर्चा नाही. मुस्लिम समाजाच्या शिक्षण, दारिद्र्यावर सच्चर आयोगाने दिलेल्या आवाहलावर चर्चा नाही.सनदशीर मार्गाने चर्चा करायची नसेल तर मग कोणाची निवड करावी?.तुम्हाला मतदारांना लोकशाही की हुकूमशाही निवड करायची आहे.
नाशिक ते मुंबई पायी लॉंगमार्च काढल्यावर हजारो वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी नांवावर सातबारा करून देण्याचे लेखी आश्वासन देऊन ही त्यांची अंमलबजावणी नाही. आदिवासींच्या वन हक्कापासून ते रेशन कार्डापर्यंतच्या कोणत्याच प्रश्नावर चर्चा नाही. काळापैसा बाहेर काढण्यासाठी, भ्रष्टाचार बंद करण्यासाठी, अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी केलेली नोटबंदी त्यावर चर्चा नाही. नोटाबंदीतून लादल्या गेलेल्या मंदीची व त्यात म्रुत्यु पडलेल्या ११० लोकांवर काहीच चर्चा नाही. बेरोजगारी,गोरगरीबांच्या उपाशी राहिल्याने बिगडणाऱ्या आरोग्यासाठी व कुपोषणाने दगावणाऱ्या आई-बाळाच्या मृत्यू वर चर्चा नाही. नोटबंदी, जी एस टी मूळे खचत चाललेल्या लघु-उद्योगांची, बंद पडत चाललेल्या छोट्या व्यवसायांच्या मालक कामगारांच्या समस्यावर चर्चा नाही. 
उच्चवर्णीय, उच्चवर्गीय भांडवलदार यांच्या कडे असणाऱ्या साडे तीन लाख करोड रुपये बुडीत कर्जासंबंधात काहीच चर्चा नाही.ती कर्जदार व्यक्ती कोण त्यांची नांवे जाहीर नाहीत. भाजपाला करोडो रुपये देणगी देणाऱ्यांची नांवे जाहीर नाहीत. ही लोकशाही आहे. की हुकूमशाही?.
भारतातील उच्चवर्णीय,उच्चवर्गीय मोठे उद्योगपती चाळीस हजार करोड रुपये घेऊन पळाले त्यासंदर्भात काहीच चर्चा नाही.गॅस सिलेंडर, डिझेल व पेट्रोलचे भाव वाढीवर ज्यांंनी
देशभरात तीव्र जनआंदोलन केली होती.तेच लोक सत्ताधारी झाल्यावर वाढलेल्या भाववाढी महागाई बाबत कोणतीच चर्चा करीत नाही. (आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव प्रति ब्यारल कमी असतानाही).
जय जवान जय किसान म्हणून साद घालणारे देशप्रेमी. पाचशे सैनिक व ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यावर ही काहीच चर्चा करीत नाही.
अठावीस हजार करोड रुपये रिझर्व बँकेच्या रिझर्व्ह फंडातून काढून इतर बँकांना देण्यासंदर्भात, आजपर्यंतच्या इतिहासात कधीही न घडलेल्या बाबींची काहीच चर्चा नाही.
गोरक्षणाच्या नावाखाली मागासवर्गीय,आदिवासी व अल्पसंख्यांक समाजावर झालेले शेकडो अत्याचार, त्यांना मारहाण व मृत्यूंची काहीच चर्चा नाही.नोटबंदी, जी एस टी मुळे भारतातील अंदाजे चार ते पाच करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्या संदर्भात काहीच चर्चा नाही.
उच्चवर्णीय समाजातील लोकांनी पाकिस्तानातील आयएसआयला भारतीय लष्करा संदर्भात गुपिते विकली,पुलवामा येथे अडीचशे किलो आरडीएक्स कसे आले?.तेव्हा आपली सुरक्षा यंत्रणा काय करीत होती?. त्यासंदर्भात काहीच चर्चा नाही.म्हणजे ही लोकशाही की हुकूमशाही?.
दिल्लीच्या जंतरमंतर वर जाहीरपणे भारतीय संविधान जाळून देशद्रोही कृत्ये करणाऱ्यांवर पोलीस प्रशासकीय यंत्रणा काही कारवाई करीत नाही म्हणजे हे कृत्य सरकार मान्य आहे. हे सिद्ध होते म्हणूनच त्या संदर्भात काहीच चर्चा नाही.मनुवादी विरोधात लिहिणाऱ्या विचारवंतांच्या हत्या घडवून आणल्या जातात मात्र आरोपी पोलीस यंत्रणेला मिळत नाही. त्यावर सत्ताधारी कुठेच उल्लेख करतांना दिसत नाही.करोडो रुपयांची स्फोटके मनुवादी व सनातनी विचारसरणीच्या अनुयायाकडे व संस्थाकडे सापडलीत यावर प्रिंट चॅनल मिडिया रान उठवत नाही.सरकार त्यांना देशद्रोही ठरवत नाही.मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजातील आरोपी असते तर जाहीरपणे भररस्त्यात त्यांचा खून करण्यात आला असता.यावर देशद्रोही कृत्यावर काहीही चर्चा नाही. स्वीस बँकेतील भारतीयांचे काळेधन दुपटीने व अब्जावधीने वाढले त्यासंदर्भात काहीच चर्चा होतांना दिसत नाही.भारतातील अब्जोपतींची संख्या 42 वरून दुप्पट झाली त्या संदर्भात काहीच चर्चा नाही. मागासवर्गीय आदिवासी व अल्पसंख्यांकावरील,शेकडो  
अन्याय,अत्याचाराच्या घटना घडल्या व त्यात शेकडो लोकं मारली गेलीत,त्याची काहीच चर्चा नाही.पांच वर्षात आम्ही काय केले यावर लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने चर्चा होत नसेल तर मग निवडणूका नेमक्या कोणासाठी आहेत?. आम्ही भारतीय नागरिकांना मतदारांना सत्तेवर आल्यानंतर काय करू हे जाहीरनाम्यात सांगितले होते. त्यातील किती समस्या आम्ही दूर केल्या,किती दुर्लक्षित केल्या हे त्या मतदारांना माहिती असणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. तो अधिकार त्यांना देण्याची तुमची इच्छा नसेल तर लोकशाही हवीच कशाला,सरळ हुकूमशाही आहे हे सांगण्याचे धाडस तरी करा. म्हणूनच भारताची संसद नेमकी कोणाला उत्तरदायी आहे?. यांचे उत्तर मतदारांना मिळालेच पाहिजे.मतदार बंधू आणि भगिनींनो मतदान करतांना एकच ठाम निर्णय घ्यावा की भारतात लोकशाही हवी हुकूमशाही?.तुम्हीच निर्णय घेऊ शकता.लोकशाही की हुकूमशाही निवड करायची आहे.
सागर रामभाऊ तायडे,9920403858,भांडुप,मुंबई
Attachments area

साध्वी म्हणजे कोण ?.देशद्रोही की देशभक्त?.

साध्वी म्हणजे कोण ?.देशद्रोही की देशभक्त?.
    भारत हा सर्वधर्मसमभाव असणारा जगातील एकमेव देश म्हणून ओळखला जात होता.त्यांचा गौरवशाली इतिहास आहे. तथागत गौतम बुद्धाची जन्मभूमी प्रबुद्ध भारत म्हणून सुद्धा तो जगात प्रेरणादायी भूमी म्हणून आदर्श मानला जातो. त्याला सध्या गर्वसे कहो हम गांडू है म्हणणाऱ्यांनी वेगळीच ओळख निर्माण करण्याची तयारी केली. त्याला अर्थातच गांडू हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या देशद्रोही गद्दारांची साथ आहे.२६/११ मुंबईतील ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व इतर ठिकाणी जे अतिरेकी हल्ले झाले त्यात आमचे स्वाभिमानी पोलीस अधिकारी जवान शहीद झाले.हेमंत करकरे ए टी एस प्रमुख होते ते ही यात शहीद झाले होते.ते शहीद नाही तर साध्वी प्रज्ञासिंग ठाकुरच्या शापाने मारल्या गेल्याचे ती गर्वाने सांगत आहे.हा "कावळ्याच्या शापाने गाई मरत नाही" हया प्रसिद्ध मणी सारखे झाले आहे.मग ही साध्वी म्हणजे कोण ?. देशद्रोही की देशभक्त?.
उच्चवर्णीय साधु,संतांच्या संगतीत राहून प्रज्ञासिंग ठाकूर कशी काय साध्वी झाली हे कोणालाच माहिती नव्हती.पण देशात अनेक ठिकाणी बॉंबस्फोट झाल्यावर मालेगांवच्या स्फोटाने हेमंत करकरे यांनी ज्या पद्धतीने शोध घेतला तेव्हा त्यांना ही प्रज्ञासिंग ठाकूर साध्वी मिळाली.त्या दिवसापासून साध्वी ही प्रसिद्धीच्या झोतात आली.मालेगाव बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी म्हणूनच ती जेलची 
हवा खाऊन आली.तीच आता जमिनीवर बाहेर आली असतांना देशद्रोही हिंदुत्ववादी संघटनांची सुपरस्टार झाली.
बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकुरला खासदारकीचं तिकिट देऊन आर एस एस प्रणित भाजपाने हे सिद्ध केले कि भाजपा हा देशद्रोही आरोपींना किती मोठी संधी उपलब्ध करून देणारा राष्ट्रीय पातळीवरील देशासाठी किती घातक पक्ष आहे. 
भारतीय संस्कृती मानणाऱ्या नागरिकांना ही सामान्य बाब अजिबात नाही. हा शहिद हेमंत करकरे आणि त्यांच्या संपुर्ण पोलीस प्रशासकीय यंत्रणेचा अपमान आहे.अशा वेळी पोलीस यंत्रणेने कोणी तक्रारदार येईल नंतर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका न घेता कायद्याच्या चौकटीत साध्वी प्रज्ञासिंगच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. कायद्या पेक्षा ही मोठी ठरत आहे.कोण आहे ही साध्वी ?.साध्वी म्हणजे कोण ?.देशद्रोही की देशभक्त?.
याकूब मेमन (मुंबई बॉम्बस्फोट) यांची स्कुटर बॉम्ब स्फोटात वापरली म्हणून तो त्या कटात सहभागी होता असे कोर्टाने मान्य केले आणि त्याला फाशीची शिक्षा दिली.साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर मालेगांव बॉम्बस्फोटा मध्ये सहभागी होती तिच्या नांवे स्कुटर होती हे सिद्ध झाले तरी तिला कोणतीही शिक्षा नाही.ज्या देशाभिमान असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांने इमानदारीने तपास करून गुन्हेगार पकडले त्याला ही साध्वी शाप देऊन मारल्याचे छातीठोकपणे सांगते.ती देशद्रोही लोकसभेची उमेदवार ठरते?.म्हणजेच या पक्षाची आणि या पक्षाला मानणाऱ्या लोकांची मानसिकता,संस्कार,संस्कृती वैचारिक मांडणी काय आहे ही स्पष्टपणे दिसून येते. असली साध्वी कायदेमंडळावर निवडून गेल्यावर कोणत्या देशहितासाठी काम करणार आहे?. लोकशाही नुसार की मनुस्मृती नुसार ?. रामराज्य स्थापना करण्यासाठी ही आजच काम करते उद्या लोकसभेत गेल्यावर काय करेल ?.
बॉम्बस्फोट स्कुटर आणि मोटरसायकल मुळे झाला यात फरक काय आहे?.कोणी केला त्यांची जात महत्वाची असते. त्याला वाचवण्यासाठी कसा युक्तिवाद केला पाहिजे हे ऍड उज्वल निकम यांना विचारा तो जात,धर्म पाहून चांगला युक्तिवाद करतो.याकूब मेमनला फाशी व प्रज्ञा सिंग ठाकुरला लोकसभा टिकट ?. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी तब्बेतीच कारण दाखऊन जामिनावर बाहेर असलेली आणि आतंकवादी कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असलेली व्यक्ती खासदारकीच्या निवडणुकीला उभी राहते. ही लक्षवेधी घटना लोकशाही मानणाऱ्या देशासाठी भयंकर आहे.
उद्या आसाराम बापु ,राम रहीम,रामलाल,सारखे लिंगपिसाट, लोक तुरुंगातुन जामिनावार बाहेर आल्यावर निवडणुकीला उभे राहिले व अश्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटण्याचं अजिबात कारण नाही.आर एस एस प्रणित भाजपा,उद्धव ठाकरेची श्रीराम सेना सारखे पक्ष संघटना पुढच्या पांच वर्षात सत्ताधारी झाल्या तर लोकशाहीचे चारी खांब कोसळल्याला वेळ लागणार नाही.
   ब्राम्हणशाही व भांडवलशाही आज हातात हात घालून सर्व क्षेत्रावर संपूर्ण नियंत्रण ठेऊन आहे.त्यामुळेच प्रिंट ,चॅनल मीडिया सत्य जनतेला दाखविण्याचे काम करीत नाही.मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणाचा सत्य खुलासा असलेले " हु किल्ड करकरे ?." आणि शहीद करकरेंच्या सुविद्य पत्नी स्मृतीशेष करकरे मॅड्म ह्यांनी लिहिलेले " द लास्ट बुलेट " हे पुस्तक वाचल्यावर डोक ठिकाणावर राहात नाही. किती अमानवीय पद्धतीने कट करुन हा हमला केला गेला आणि नियोजनबद्ध रित्या करकरे, कामठे आणी साळसकर ह्याना मारण्यात आले. ह्याचे हसन मुश्रीफ ह्या तत्कालिन पोलीस अधिकार्याने केलेल भाष्य अगदी जबरदस्त आहे. 
 साध्वी प्रज्ञासिंग ठाकुरला एक कायदा आणि हार्दिक पटेल सारख्या ओबीसी कुणबी पटेलला एक कायदा?. साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर साध्वीला कोर्टाने निवडणूक लढविण्यास परवानगी कशी दिली?.हार्दिक पटेलला कोर्ट निवडणुकीत अर्ज भरु देत नाही.ज्याच्यावर कोणताही मनुष्यवधाचा गुन्हा नाही आणि ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत त्यांना परवानगी दिली जाते. हे अगदी मनुस्मृतीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
हेमंत करकरे यांनी संपुर्ण टिमसह मालेगाव बॉंबस्फोटातील ह्या हिंदुआतंकवाद्यांना लॅपटॉपसहित अटक करुन त्यांच्यावर आरोप सिद्ध करणार होते व शिक्षा होणार होती . मात्र ह्या अगोदरच त्यांचा गेम केला गेला. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर बोलत आहे की करकरेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. साध्वी तर सर्व मोहमाया,पाप पुण्य,काम, क्रोध, लोभ, राग,मत्सर या पासुन अलिप्त असणारी हवी होती. ही तर कट्टर मनुस्मृतीची हिंदुराष्ट्र संकल्पनेची सक्रिय समर्थक 
बोलतेय. ही तीची विचारधारा आहे. हेमंत करकरे हे १९८२  बॅचचे IPS अधिकारी होते. त्यानंतर ATS Chief झाले.नंतर Joint Commissioner of Police नंतर Austria मधे ७  वर्षे RAW Officer, नंतर External Intelligence Agency मधे officer, आणि 2008 मधे शहीद झाले.
त्यांच्या पत्नीने एका रुपयांची सुद्धा मदत सरकार कडून घेतली नाही.एवढं सगळं करून हा माणूस देशद्रोही आणि आठ वर्षे शिक्षा भोगणारी बाई देशप्रेमी?. हेमंत करकरे हे बहुजन समाजाचे होते. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ही कोण आहे आता जग ओळखायला लागले.ह्यांना देश्यात हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणांची संपुर्ण सत्ता व्यवस्था आणायची आहे. इ व्ही एम मशीन द्वारे त्यात ते जवळ जवळ ९५% यशस्वी झालेले आहेत. संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र ! ह्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कालपरवाला कोणतीही परिक्षा न देता केंद्रात सचिव पदावर  झालेल्या नऊ ब्राह्मणवाद्यांची  एकजात निवड होय . 
जो ब्राह्मणाला शिक्षा देईल त्याला मृत्युदंडाची शिक्षा मनुस्मृतीत आहे. हाच प्रकार छत्रपती संभाजी महाराजां बरोबर ब्राह्मणांनी घडवला होता कारण त्यांनी मोरोपंत पिंगळे,आण्णाजी दत्तो आणि राहुजी सोमनाथ ह्या तिघा ब्राम्हणांना शिवरायांच्या हत्येच्या गुन्ह्यात रायगडावर हत्तीच्या पायी देऊन देहदंडाची शिक्षा दिली होती. संभाजी महाराज शुद्र होते आणि मनुस्मृतीत शुद्राला ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार स्पेशल नाकारते. हा इतिहास आहे.
लोकशाहीच्या मार्गाने म्हणुनच हा सर्व ईव्हीएम मशीन द्वारे  घोटाळा सुरु आहे.लोकसभेत असे नामचीन देशद्रोही,गंभीर गुन्हेगार ब्राम्हणशाही,भांडवलशाहीचे मनुस्मृती समर्थक एकत्र आले तर संविधानाची सर्व चौकट मोडून काढण्यासाठी तयार असतील.साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरचा पोलिसांनी खूप छळ केला म्हणे.इतका छळ केला इतका त्रास दिलानां पोलिसांनी की विचारू नका. आत गेली तेव्हा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरचे वजन फक्त पन्नास किलो होते. आता ती नवद किलोची होऊन बाहेर आली.तिची ही माहिती प्रिंट चॅनल मीडियावर येणार नाही पण सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती व फोटोत व्हायरल होत आहेत.छायाचित्रे कधीच खोटे चित्र दाखवीत नाही.मग 
आता वाचकांनी ठरवायचे की साध्वी म्हणजे कोण ?.देशद्रोही की देशभक्त?.
सागर रामभाऊ तायडे, 9920403859,भांडुप मुंबई
3 Attachments

लोकसभा निवडणुकीत आपला मुख्य शत्रू कोण?

लोकसभा निवडणुकीत आपला मुख्य शत्रू कोण?


भारतीय राजकारणात आपला मुख्य शत्रू कोण ?.हेच ओळखणे अशक्य झाले आहे.सत्तेचा लाभ घेण्यासाठी कोण कधी एकत्र येतील हे समजणे कठीण आहे.लोकसभा निवडणुकीत जगाचे लक्ष वेधून ठेवत आहे.कलानगरचे स्वयं घोषीत हिंदू हृदय सम्राट आणि राष्ट्रीय हिंदुत्ववादी मनुवादी होलसेल ठेकेदार यांची रेशमी धाग्याने मागासवर्गीय समाजाला बांधून ठेवनारी पंचवीस वर्षाची युती मराठी माणसाला दाखविण्या करीता किती वेळा तुटली व घोडेबाजार होऊन जोडल्या गेली.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे काय?.महाराष्ट्रातील मराठी माणसांचे काय झाले?.हे मतदारांनी विसरू नये.बहुजनांच्या मागासवर्गीयांच्या बाजुने शिवसेना भाजपा काँग्रेस कधी लढली नाही.म्हणजेच हे कौरव पांडव आहेत.कौरव पांडव जनतेसाठी लढले नाही.ते फक्त त्यांच्या फायद्या करीता जनते समोर भांडण्याचे नाटक करतात.बाकी सर्व वाटून खातात.म्हणुन वंचित बहुजन समाजातील मागासवर्गीय मतदारांनी कौरव पांडवांची जात पाहून मतदान करावे. हे एकाच जातीचे आणि धर्माचे आहेत.ते हिंदू कधीच नव्हते.ते फक्त ब्राम्हण आहेत.आणि ब्राम्हणच राहतील.वंचित बहुजन कितीही मोठा उच्चशिक्षित, या उधोगपती किंवा राष्ट्रपती असला तरी वंचित शोषित मागासवर्गीयच राहील हे मतदारांनी लक्षात ठेवावे राजकारणात जात धर्म नसते. विचारधारा असते. त्यानुसार समाजाच्या आर्थिक नाड्या हाती घेऊन समाजात जाऊन समाजप्रबोधन,जागृती करण्याचा पहिला नियम आहे.  लोकसभा निवडणुकीत आपला मुख्य शत्रू कोण?. शत्रूच माहित नसेल तर लढाई कोणा बरोबर लढणार?. काँग्रेस, भाजपा आणि कम्युनिस्ट कधीच वैचारिक शत्रु नव्हते आणि नाही.सर्व पक्षात वैचारिक वर्चस्व ब्राम्हणाच्या हाती राहून बहुजन मागासवर्गीय समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे पक्ष संघटना करतात. काँग्रेसचा सर्वात मोठा नेता ब्रॉरिस्टर मोहनचंद करमचंद गांधी महात्मा झाल्यावर मारल्या गेला त्याला कोणा कोणाची साथ होती?. हे राम वाले आता खुलेआम नथुरामचा जयजयकार करतात.या मागील सत्य वैचारिक शक्ती कोणती ते समजून घ्या.ती जर नसती तर आज देशात मनुवादी हिंदुत्ववादी कौरव पांडवांची उत्पत्ती झालीच नसती. म्हणून या तिन्ही राष्ट्रीय पक्ष संघटनेचा वैचारिक पाया एकच आहे पण काम करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे.हे महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ बाबासाहेबांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखविले.म्हणून कोणत्या पक्षात संघटनेत आपला शत्रु आहे.हे या देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला समजत नाही. म्हणुन कामगार क्षेत्रातील बलाढ्य राष्ट्रीय संघटना, भांडवलदारांच्या विरोधी लढतांना दिसतात पण मनुवादी हिंदुत्ववादी ब्राम्हणवादा विरोधात लढतांना दिसत नाही. महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते देशाचे दोनच शत्रू आहेत.एक भांडवलशाही दुसरी ब्राम्हणशाही हे सर्वच क्षेत्रात हातात हात आणि गळ्यात गळा घालून काम करून सत्तेवर नियंत्रण ठेवतात.राज्य आणि केंद्रातील मंत्रीमंडळातील नांवावर काळजीपूर्वक नजर टाका व कोणत्या जातीचे वर्चस्व आहे ते पहा.म्हणजे कौरव पांडवांच्या सत्ता संघर्षात आपण बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कोण आहोत?.तर वंचित बहुजन मागासवर्गीय या तिन्ही पक्ष संघटनेत आहेत.त्यांची समाजात किंमत काय?.कोणत्या जातीतील नेत्याचा व्यक्तिगत आर्थिक विकास होऊन कल्याण झाले.पण त्या त्या समाजाचे काय?. त्याला तर हा नेता आणि त्यांचा पक्ष संघटना सतत वापर करून मूर्ख बनविते म्हणुन देशात सार्वजनिक उधोगधंद्याचे खासगीकरण औधोगिकरण, जागतिकीकरण मोठया प्रमाणत झाले आहे.कारण शोषण करणारे आणि शोषणकरू देणारे बहुसंख्य एकाच पक्षात आणि संघटनेत काम करतात.म्हणून वंचित बहुजनांंनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे, लोकसभा निवडणूकीत आपला उमेदवार आणि पक्ष निवडला पाहिजे. सत्ताधारी पक्षाची नीती आणि विरोधी पक्षाची नीती एकच आहे.बहुसंख्य वंचित बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी सरकारची नीती आणि सत्ताधारी यांची नीतीचा मतदार म्हणुन शत्रुच्या विरोधात जनआंदोलन सोबत निवडणूकीत एकझुठ दाखविली असती.तर मनुवादी हिंदुत्ववादी शक्ती मोठया संख्येने निवडून आली नसती. मराठी माणसाच्या न्याय,हक्कसाठी लढणारी शिवसेना आणि मराठी हृदय सम्राटानी मराठी माणसाच्या काम धंदा आणि नोकरी करीता काय केले?. मुंबईतील सर्व स्टेशन रोडसह रोडवरील जागा उत्तर भारतीयांना काम धंद्या करीता सात बारा कोणी दिला?.मराठी माणसाला रेशनकार्ड, गुमस्ता,आदिवास दाखला सहज मिळत नाही. मग उत्तर भारतीय आणि इतर राज्यातील माणसानां ते सहज कसे मिळते?.त्यांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कारण मुंबई
 आणि फक्त भ्रष्टाचार करूनच कामकाज करते.त्यात मराठी माणुस कमी पडतो. गेल्या पन्नास वर्षा पासुन मराठी माणसाचे आणि भाषेचे ठेकेदार असली शिवसेना काम धंदा नोकरी देण्यास कमी पडली?. नाही त्यांनी गणपती,दहीहंडी आणि पायी पालकी पदयात्रा सारखे लक्षवेधी उत्सवी उधोगधंदे मराठी तरुणांना देण्यास प्रेरणादायी करून ठेवले.हेच तिचे जगाच्या औधोगिक आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ओळख जागतिक पातळीवर नेली.हेच तिचे मराठी माणसा करीता ऐतिहासिक काम आहे.छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आराध्य दैवत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊच्या चरित्र हरण करणाऱ्यांना त्यांनी काय शिक्षा दिली हे मराठी माणूस म्हणुन प्रश्न विचारण्याचा हक्क मुंबईतील मतदाराला असला पाहिजे.कारण सत्ता केवळ लुटण्यासाठी नसते तर विकास आणि कल्याण करण्यासाठी असते.कौरव पांडवांच्या या सत्ता संघर्षात महाराष्ट्रातील मराठी माणसाला मतदाराला काय मिळाले?.
डॉ बाबासाहेब आंबेडकर दोनवेळा लोकसभा निवडनूकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा पराजित झाले. बाबू जगजिवनराम आठ वेळा लोकसभेला उभे राहीले आणि आठही वेळेस निवडून आले. इतकेच काय कायम केंद्रीय मंत्रीमंडळात राहिले.दोघेही मागासवर्गीय बहुजनांचे नेते पण आज आपण उपेक्षित ,वंचित भटक्या,आदिवासी, मागासवर्गीय बहुजनांचे प्रेरणा स्थान म्हणून बाबासाहेबांना मानतो. बाबु जगजिवनराम यांना नाही.आंबेडकरवाद लाचारी शिकवत नाही. म्हणून हारुनही बाबासाहेब घरा घरात विराजमान आहेत. बाबू जगजिवनरामांचा फोटो काँग्रेस कार्यालयात ही नाही. तर त्यांच्या किंवा इतर समाजाच्या घरात फोटो आणि कोणता ही विचार नाही. म्हणुन तुम्ही सत्तेपेक्षा जनतेशी नातं जोडले पाहीजे. विचारधारेशी प्रामाणिक असले पाहिजे. महापुरुषांच्या क्रांतिकारी विचाराचे सैनिक झालेच नाही.जे स्वतःला वैचारिक सैनिक समजतात ते रक्षक नाही तर भक्षक झाले आहेत.क्रांतिकारी विचाराचे रक्षक लढून मरतील पण सिद्धांताची रक्षा करतील.समझोता तडजोड कधीच करणार नाहीत.म्हणजे जे समझोता तडजोड करतात ते महापुरुषाचे लायक औलाद नाही तर नालायक औलाद आहे हे सिद्ध होते.महापुरुषांच्या महात्मा क्रांतिकारी विचारांच्या देशात कौरव पांडवांचा इतिहास जिवंत होतो.हाच मोठा पराभव आहे.वंचित बहुजन समाजातील मतदारांनी मतदान करतांना भविष्यकाळ लक्षात ठेवून गांभीर्याने विचार करून मतदान करावे.
भारतीय लोकशाहीत भांडवलशाही ब्राम्हणशाही डोके वर काढते हे मतदारांना गुलाम बनविणारे तंत्र आहे.म्हणुन मतदारांनी कौरव पांडवांच्या लढाईत आपला खरा शत्रु कोण ?.हे प्रथम ओळखले पाहिजे.आणि मतदान केले पाहिजे.राणीच्या पोटी राजा जन्म येण्याचे दिवस संपले असले तरी नगरसेवक,आमदार,खासदार यांच्या पोटी किंवा त्यांच्याच घरातील माणसाचा पहिला हक्क त्यांच्या मतदारसंघात असेल तर तिथे पक्ष संघटना काम करीत नाही.तर घराणे काम करते तेच सर्व निर्णय घेत असेल निवडणूक कसा करता घेतात.कौरव पांडवालाच सत्ता देयाची असेल तर मतदारांनी जागृत होऊन मतदान करावे. आणि कौरव पांडवा दोन्ही आपले शत्रु आहेत.हे प्रथम लक्षात घेऊन मतदान करावे.वंचित बहुजन समाज निवडणुकीत हरला तरी चालेल, पण त्यांची लक्षवेधी संख्या त्याच्या उमेदवाराला मिळालीच पाहिजे.तरच लोकशाही जिवंत राहील.
आपला 
 सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई,९९२०४०३८५९.