सोमवार, ६ मे, २०१९

मतदान कोणाला करावे ?

मतदान कोणाला करावे ?

लोकांना लोकांमधून लोकशाहीने लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा सर्वात मोठा अधिकार म्हणजेच मताधिकार आहे.त्यामुळे लोकांनी लोकप्रतिनिधी निवडतांना पाच वर्षांत भविष्यात काय बदल होऊ शकते यांचा विचार करून मतदान केले पाहिजे.त्याचा गांभीर्याने विचार न करता मतदान केले तर त्यांचे परिणाम कायमस्वरूपी सर्व लोकांना भोगावे लागतात.
 असंघटीत कष्टकरी समाजाला पंधरा दिवस सुगीचे आले. तर राजकारणी लोकांना युद्धाचे दिवस आहेत.युद्ध जिंकण्यासाठी सर्व बाजूनी तन,मान,धन लावून प्रयत्न करावे लागतात.वेळ प्रसंगी सम,दंड भेद नीतीचा वापर करण्यास मागे पुढे पाहावे लागत नाही.जे तुमच्या कडे कधी चांगल्या नजर ने पाहत नव्हते ते आता तुमच्या पाया पडायला मागेपुढे पाहनार नाही. सोबत पत्रकार फोटोग्राफर घेऊन तुमची गळा भेट करतील.कारण आता म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तारखे पर्यंत तुम्ही त्याचे मायबाप आहात.त्याच्या प्रेमाला बळी पडू नका.खरोखर ते तुमच्या सोबत नेहमी असे वागतात काय?.तुमच्या सुखा दुखत सहभागी होतात काय?.आणि ते तुमची जात,धर्म पाहून मदत करतात काय?. कि तुमची अडवणूक करतात.यांचा विचार मतदारांनी करावा.९३ टक्के असंघटीत कामगार मजदूर,हे बहुजन समाजातील लोक दर पांच वर्षांनी फसवल्या जातात.त्यामुळेच ते वंचित बहुजन समाज म्हणून ओळखल्या जातात.
मतदार बंधू आणि भगिनीनो मतदान करताना खूप विचार करून मतदान करा.उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे. जातीचा,धर्माचा आहे हे महत्वाचे नाही.तो तुमच्यावर तुमच्या गावावर सर्व जाती धर्माच्या लोकावर माणुसकी दाखवनारा.भारतीय संविधान मानणारा आहे का?. त्याला मतदान करावे.राजकारण हा त्याचा प्रतिष्ठेचा धंदा आहे. त्याच्या स्पर्धेत आपला बळी जाणार नाही.याची दक्षता घ्यावी. पंधरा दिवसाच्या रणधुमाळीत आपण आपली सुरक्षा पहावी.हे सर्व राजकीय पक्ष आज जरी एकमेकाचे वस्रहरण करीत असतील.तरी ते निवडणुकी नंतर एकत्र आल्या शिवाय राहणार नाहीत.प्रश्न आणि समस्या तुमच्याच राहतील. तुम्ही त्याच्या नजर मध्ये कायम सलत राहाल. त्याचा परिणाम मतदारांना भोगावा लागतो.लाखो रुपये वाटताना अनेक उमेदवाराच्या गाड्या,माणस पकडल्या जातात त्याचे पुढे काय होते?.कोणालाच कळत नाही. काय करतात निवडणूक आचार संहिता पाळणारे अधिकारी. कुठे जाते भरारी पथक आणि पोलीस ?.आज पर्यँत कोणाला कडक शिक्षा झाली?. की त्याभिती मुळे असले प्रकार करण्याचे धाडस कोणी करत नाही.
मतदान करताना आणखी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा.आज आपण उमेदवारा कडून काही पैसे घेणार तो तुम्हाला एक मताचे पाचशे,हजार रुपये दिल.तर मतदार बंधू आणि भगिनी नो तुमच्या मताची किंमत किती असेल?.एका मताची किंमत एक हजार धरली तर एका वर्षाचे १२ महिने म्हणजे ३६५ दिवस x ५ वर्ष केली तर १८२५ दिवस म्हणजे तुमच्या एका मताची किंमत पन्नास पैसे होते.उमेदवार निवडून आला आणि तुम्ही त्याकडे कोणतेही काम घेऊन गेला तर त्याला कायम आठवणीत राहणार तुम्हाला एक मताचे हजार रुपये दिले होते.आज जो कोणी उमेदवार लाखो रुपये खर्च करतो ते फुकट करीत नाही पाच वर्षात अनेक योजनेतून ते वसूल करणार. गावाचा आणि गावात राहणाऱ्या माणसाचा विकास व कल्याण करण्या करिता केंद्र आणि राज्याचे २२ मंत्रालय आहेत.त्याच्या योजना जिल्हा तालुख्या मार्फत तुमच्या घरा पर्यंत पोचतात. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तशिलदार यांना स्थानिक लोकप्रतीधिनीना विश्वासात घेऊन पुढील कामे करावी लागतात.
ज्या उमेदवाराने निवडणूक जिंकण्यासाठी जे लाखो रुपये खर्च केले असतात तो मग कुठून वसूल करेल?. याचा मतदारांनी विचार करावा.मग आपण मतदान कोणाला करावे ते ठरवावे आपण दरवर्षी वृत्तपत्रात वाचतो. राजकीय नेत्याची संपती चार पट वाढली.देशाची समाजाची सेवा करणाऱ्याची संपती कशी वाढते?.सरकारी नोकरी करून साठ वर्षात मोठा अधिकारी निवृत्त झाल्यावर परत कुठे तरी नोकरी करतो. नोकरी करत असताना मुला मुलीचे शिक्षण,लग्न आणि स्वताचे २/३ किचनरूम घेताना त्याचे कर्ज फेडता फेडता निवृत्तीचे वय होवून जाते.मग राजकारणातील हे लोकप्रतिनिधी कोणता उधोग धंदा करतात कि त्यामुळे त्याची अफाट आर्थिक प्रगती होते?.  सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते कार्यकर्ते एकमेकांचे कायम शत्रु नाहीत.ते सर्वच सरकारी योजनेचा संपूर्ण लाभ घेतात.ते आपल्या असंघटीत कामगार मागासवर्गीय समाजाच्या मतावर ते करोडपती होतात.पुढे त्यांच्या नांवावर कायम सातबारा त्या मतदारसंघाचा लिहल्या जातो.म्हणुन ते वारसा हक्क सांगतात.काल प्रयन्त काँग्रेस राष्ट्रवादी भांडत असत एकमेकांचे उणे धुणे,इज्जत जाहीर पणे काढून लढत लढत आर्थिक स्थळावर मोठे झाले.आता तेच काम शिवसेना भाजपा यांचे पंचवीस वर्षाच्या युतीला राज्यात व केंद्रात सत्ता मिळाल्या मुळे त्यांचे आपसात कोणी किती खावे कसे खावे यांचे भानच ठेवले नाही.त्यांचे हिशेब तेच जनते समोर जाहीर पणे अभ्यासपूर्ण मांडत आहेत.त्यातुन सर्वच जातीच्या मराठी माणसाने आणि गर्वसे कहो हम हिंदू म्हणणाऱ्यांनी मतदान करतांना विचारपूर्वक करावा.
मतदार बंधू भगिनी नो आपल्या मुला मुलीचे भविष्य उज्वल करण्या करिता योग्य उमेदवाराला मतदान करा जो तुमच्या मतदार संघात अन्न,वस्र,निवारा, शिक्षण,रोजगार आणि आरोग्य यासाठी सरकारी योजना प्रामाणिकपणे राबवील. तरच तुमचे कल्याण आणि विकास होईल. जर वार्डात दहा माणस झाडू मारण्या करीता लावणार.आणि पालिकेच्या खात्यातून अठरा माणसाचा पगार घेणार.दोन गाड्या कचरा उचलणार आणि पालिका खात्यावर आठ गाडया लिहून जनतेची तन,मन,धनाने सेवा करणार हे आता लपुन राहिलेले नाही.माहिती तत्त्वज्ञान युग आहे.सोशल मिडियाच्या मध्यमा मुळे क्षणा- क्षणाची जगतील कोणतीही माहिती तुम्हाला मिळू शकते.जग झपाट्याने बदलत आहे.आपणही निसर्ग नियमा नुसार बदलणे गरजेचे आहे. म्हणून मतदान करा जागृत होवून मतदान करा.प्रलोभनाला बळी न पडता ताठ माने जगण्या करिता स्वाभिमानी मतदार म्हणून मतदान करून लोकशाही बळकट करा.आपला माणुस आपली विचारधारा जिवंत ठेवण्या करीता आपलाच गरीब होतकरू प्रामाणिक समाजसेवेची आवड असणारा माणुस निवडा. धंदा म्हणुन पक्ष संघटनेत काम करणारे लोक निवडू नका.ते तुमचा घात करतील हे विसरू नका. मतदान करा पण विचार पूर्वक करा.शेवटी असंघटीत कामगार,बहुजन समाज म्हणजे मागासवर्गीय समाजाला एकच विंनती.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने भाजपा शिवसेना युती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.म्हणून फुले, शाहु आंबेडकर यांच्या नांवाचा जयजयकार करणाऱ्या सर्व मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक बहुजन समाजातील असंघटित कामगार शेतमजूर मतदार बंधूनो हीच ती तुमची खरी परीक्षा आहे.मतदान कोणाला करावे ?. तुम्ही भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा किती आदर करता. आणि आदर्श ठेवता हे मतदान करून दाखवा.पक्ष आणि उमेदवार गरीब असला तरी, पडणार असेल तरी, आपली शक्ती दाखविण्या करीता त्यालाच मतदान करा.कायमस्वरूपी आम्ही भारतीय संविधान आणि लोकशाहीला मनापासून मानतो त्यांची अंमलबजावणी करतो. हे मतदारसंघातील संख्येने दाखवून द्या.मतदान करा.स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा