सोमवार, ६ मे, २०१९

जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत

जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत 
 जेट एअरवेज कंपनी बंद पडली व वीस हजार कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या एका दिवसात गेल्या या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला. तिथे युनियन होती की नाही माहिती नाही. पण विमानतळावर संघटित कामगारांची व असंघटित कंत्राटी कामगारांची एकमेव युनियन भारतीय कामगार सेना ही आहे. ह्या युनियनची प्रचंड दहशत आत बाहेर आहे.मोठं मोठया कंपन्या एकदिवसात बंद पडत नाही. एक दोन वर्षांपासून तिच्या आर्थिक परिस्थितीचा ताळेबंद संचालक मंडळाच्या वतीने एम डी सादर करत राहतो.त्यात काटकसरीने वागण्याचे सूचना दिल्या जातात. कास्टकटिंग सुरू केली जाते. देशात अनेक कंपन्या जागतिक बाजारपेठेतुन गायब झाल्या. प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहेत.काहींना विज्ञानाच्या विकसित तंत्रज्ञानाचा मार खावा लागला. तर काहींना प्रगतीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत यांचा अंदाज आला नाही. किंवा त्यांनी निसर्गाच्या काळानुसार बदलत्या उद्योग धंद्याचा स्वीकार केला नाही.म्हणूनच ते बाहेर फेकल्या गेले.
१९९८ मध्ये कोडक Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते,ती कंपनी जगातील सर्वात जास्त ८५ टक्के फोटो पेपर बनवून विकत होती.ती सर्वात जास्त लोकप्रिय होती.या लक्षवेधी कंपनीला काही वर्षांनंतर Digital photography या विकसित तंत्रज्ञानाने कोडक  कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं.kodak कंपनीचं अक्षरशहा दिवाळं निघालं सर्व कामगार रस्त्यावर आले. HMT ( घड्याळ ) BAJAJ (स्कुटर) DYNORA (टीव्ही) MURPHY (रेडिओ) NOKIA (मोबाईल) RAJDOOT (बाईक) AMBASDOR (कारया सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरी सुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.कारण?. ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या नाहीत. कोणालाच अंदाज नसेल कि येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील.चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आपल्याला स्वागतच करावे लागेल.
डिजिटल मार्केटिंग,हाडवेयर,सॉफ्टवेअर कॉम्प्युटर  तंत्रज्ञानाचा बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. अनेक कामगार कर्मचाऱ्यांची कामे एक कुशल ऑपरेटर बसल्या जागी करू शकतो. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे उबेर.
उबेर फक्त एक software कंपनी आहे.त्याची स्वत:ची एकही कार नाही.तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे. Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company असुनही तीचं स्वत:चं असं एकपण होटेल नाही. Paytm,Ola cabs,oyo rooms यांसारखी खुप उदाहरणं आहेेेत.
जागतिक करणने जग झपाट्याने बदलत आहे. भारतात मात्र शाप दिल्याने शत्रूला अतिरेकी मारतात. आणि सत्यनारायण महापूजा घातल्याने संकट दूर होतात.उच्चशिक्षित लोक पदव्या घेऊन वकील, प्राध्यापक डॉक्टर होत असतांना त्यांच्यावर ही गंडांतर येत आहे.भारतातील कोर्टाच्या बाहेर पहा जशी सकाळी नाक्यावर नाका कामगारांची फौज उभी असते तशीच वकिलांची फौज कोर्टाच्या आवारात उभी असते.त्या आवारात कोणत्याही माणूस आला तर हे वकील लोक त्यांच्या मागे धावतात. 
विदेशात विशेष यु एस मध्ये वकिलांना कोणत्याही प्रकारची कामे नाही. कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकतं. येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९० टक्के वकिल बेरोजगार  होतील. जे १० टक्के वाचतील ते फक्त super Specialist राहतील. Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चं Diagnosis ४ पट जास्त Accuracy नं करतो.२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहेत.२०१९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील.२०२० पर्यंत एका असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरूवात केलेली असेल.येत्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९० टक्के Cars गायब झालेल्या असतील.ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid... Petrol ची खपत ९० टक्के कमी होऊन जाईल. सर्व अरब देश कंगाल झालेले असतील.आपण Uber सारख्या एका Software नं कार मागवायची की Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहिल.Car Driverless असल्या कारणे ९० टक्के Accidents होणं बंद होईल.Car Insurance नावाचा धंदा बंद पडेल.ड्रायव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९० टक्के Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटतील.मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता.तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली.आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय. तुम्ही कधी लक्ष केंद्रित केलं का?.जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.
आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारं तिसरं दूकान फक्त मोबाईल फोनचं आहे.Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची आता तर Paytmनं व्यवहार  होतात. रेल्वे तिकीटाचं फोनवर बुकींग तर पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत. Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झालं.जग फार वेगात बदलत आहे.डोळे,कान,नाक उघडे ठेवा नाहीतर मागं राहाल. वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.यासाठी प्रत्येक माणसानं वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवं.वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना. आता येणाऱ्या काळासाठी अपडेट असणं व त्याबरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून Upgrade असणं गरजेचं आहे. जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत. यांचा विचार सर्व संघटित व असंघटित कामगारांनी केला पाहिजे.
कामगार कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन स्वतःच्या स्वरक्षणासाठी संघटना, युनियन बनविली पाहिजे. आणि स्वतःच नेतृत्व केले पाहिजे.दुसऱ्यांच्या भरोसा वर राहाल तर तुमच्यावर गिरणी कामगार व जेट एअरवेज कामगारा सारखी परिस्थिती आल्या शिवाय राहणार नाही.
भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम कायद्याला जन्मा दिला.त्याला कंत्राटी कामगारांच्या भल्यासाठी असा दिशाभूल करणारा प्रचार करण्यात आला.सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कारखाने,कंपनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कामगारांची जबाबदारी राहील असे सांगून सर्वांनीच आपली मुख्य जबाबदारी टाळली.त्यांचे समर्थन करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली दिला होता. या निर्णया विरोधात राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी जायाला पाहिजे होते पण 12 राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन व एक अंतर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन सि एफ टी यु आय यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली नाही. या मागचे खरे कारण काय असेल तर बहुसंख्य मागासवर्गीय कामगारांचे जाती व्यवस्था नुसार कायमस्वरूपी आर्थिक शोषण होत राहावे. याचे वैचारिक समर्थन होय.यामुळे प्रत्येक वेळी सरकारी, निमसरकारी खाजगी कारखान्यात कंपन्यांच्या आत चालणारे कायमस्वरूपी काम प्रत्येक वर्षी ठेकेदार बदली केल्या मुळे कामगार ही बदलावा लागतो. त्यामुळेच ठेकेदारी पद्धतीने काम करणारा कोणत्याही कामगार कोणत्याही सरकारी निमसरकारी खाजगी कारखान्यात,कंपनीत कायमस्वरूपी कामगार राहू शकत नाही. युनियन बनवु शकत नाही हा देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाच्या कामगारांवर अन्याय करणारा निर्णय झाला होता.जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत
या विरोधात स्वतंत्र मजदूर युनियन बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगारात प्रबोधन करून जनजागृती करीत आहे.जे मागासवर्गीय बहुजन समाजातील कामगार या जातीव्यवस्था समर्थन करणाऱ्या ट्रेंड युनियन चे वार्षिक सभासद आहेत त्यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करून आपण कोणाचे व कोणत्या विचारधारेचे समर्थन करतो ते ठरवावे.
सरकारी निमसरकारी व खाजगी कारखान्यात,कंपनीत स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे ठेकेदार बदली झाला तरी कामगारांना कामावरून कमी करू नये अशी राज्य व केंद्र सरकारने सुरवातीला भूमिका घेतली होती. त्यावेळी भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य असे जनआंदोलन देशभरात उभे राहिले होते. त्यातूनच अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्षाचा जन्म झाला.पुढे राजकिय सत्ताधारी भांडवलदारांच्या फंडिंगवर निवडणूक लढवुन निवडून येत असल्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या प्रणित कामगार संघटना, ट्रेंड युनियन सत्ताधाऱ्यांच्या किंवा सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात न जातात केवळ रस्त्यावरील आंदोलने करून कामगारांची दिशाभूल व फसवणूक करीत आले आहेत.मग संघटीत कामगारांची हि व्यवस्था असेल तर असंघटीतांची काय ?.जेट एअरवेज  कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही इंटक प्रणित गिरणी कामगारांची युनियन होती.त्यांच्या पक्षाचे अनेक राज्यात व केंद्रात सरकार होते तरी मुंबई व देशातील गिरण्या बंद झाल्या व त्यांच्या जमिनीवर टोलेजंग टॉवर उभे राहून लाखो गिरणी कामगार उध्वस्त झाला.म्हणूनच बहुसंख्य कामगार ट्रेंड युनियन इंटक व राष्ट्रीय पक्षा पासुन दूर गेला.त्यांचे आत्मचिंतन संघटीत असंघटीत कामगारानी केले पाहिजे. नाहीतर जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत 
 स्वतंत्र मजदूर युनियन गेल्या बारा वर्षा पासुन बहुजन समाजातील मागासवर्गीय कामगारांना सांगत आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 12 व 13 फेब्रुवारी 1938 साली रेल्वे गँग मन कामगारांच्या कामगार परिषद समोर सांगितले होते की मागासवर्गीय समाजाच्या कामगारांनी स्वतःची ट्रेंड युनियन लवकरात लवकर स्थापन करून तिला स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन शी संलग्नता स्विकारावी असे सर्व क्षेत्रातील मागासवर्गीय कामगारांना आवाहन केले होते. आज पर्यंत लाखोच्या संख्येने मागासवर्गीय कामगार, कर्मचारी अधिकारी जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियनला वार्षिक वर्गणी देऊन आर्थिक दृष्ट्या मजबूत करतात.ते संघटीत कामगारांना असंघटित कामगार करणाऱ्या कंत्राटी कामगार कायद्याचे समर्थन करून पुन्हा जाती व्यवस्था स्थापना करण्यासाठी मदत करतात असे लिहले व म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.कामगारांचे अनेक समस्या आज जशाच्या तसा आहेत त्या सोडविण्यासाठी ट्रेंड युनियनने सनदशीर मार्गाने लढण्याची तयारी करण्या ऐवजी अयोध्या मध्ये राम मंदिर बांधकाम करण्यासाठी आंदोलन उभारण्यासाठी ट्रेंड युनियन संघटनानां पक्षांना आर्थिक मदत करतात.पण सामाजिक सुरक्षितता कायद्याच्या अंमलबजावणी साठी कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यावर भर देत नाही.
रेल्वे स्टेशनवर काम करणारा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, मेल एक्सप्रेस च्या डब्यात पाणी भरणारा कामगार, कारखान्यात काम करणारा इतर कामगार हा मोठया प्रमाणात कंत्राटी कामगार भरल्या जात आहे.त्यावर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी ज्या शक्तीने लढले पाहिजे होते त्या शक्तीने लढत नाही.गांधीवादी,गोवळकरवादी समाजवादी,मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या लाल बावटा वाल्या ट्रेंड युनियन मागासवर्गीय कामगारांना खूप प्रामाणिक वाटतात. पण आम्हाला हे समजत नाहीये कि जातीव्यवस्था समर्थक कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे नेते मागासवर्गीय कामगारांची गेट बाहेरची जात नष्ट करण्यासाठी काय करतात?.देशातील सर्वात जास्त कम्युनिस्ट चळवळी कामगारांच्या जोरावर चालतात. खालचे काम करणारे खास करुन त्या कामगारां पैकी बहुतांशी कामगार कर्मचारी हे मागासवर्गीय असतात. खरं तर मागासवर्गीयांना शंभर टक्के न्याय देण्याचं खरं काम बाबासाहेबांनी केलं. तर मग बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याच्या कामगार संघटना, युनियन कडे मागासवर्गीय कामगार मोठया संख्येने का जात नाही?. हा प्रश्न स्वताला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या कामगार,कर्मचारी अधिकारी यांना का पडत नाही. संघटित कामगारांना त्यांच्या मुलामुलींना असंघटित कामगार बनविण्यात कामगार संघटना युनियन आणि त्यांच्या महासंघाची मोठी भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे.जेट एअरवेज  कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.जेट एअरवेज कामगार एक जाती धर्माचे नव्हते तरी त्यांचा बळी भांडवलशाही ब्राह्मणशाहीच्या यंत्रणेने घेतला.यावर आज दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. परिस्थिती बदलली तर जाहीर चर्चा सुरू होईल.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप मुंबई 9920403859,
 

Attachments area

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा