गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

" खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!."

" खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!." 


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज त्यांच्या संघर्षाला कधीच विसरत नाही.विसरू शकत नाही.याची आठवण दरवर्षी सहा डिसेंबर महापरीनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसर दादरच्या शिवाजी पार्क वरील गर्दी पाहिल्यावर होतो.ते निष्ठावंत भक्त आहेत की शिष्य हे ठरविता येत नाही.
 लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर या समाजाच्या सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मिळाल्या मतदारसंघातील मतदानाचा अभ्यास केल्यास " खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!." हे म्हणणे शंभर टक्के असत्य वाटते.पण सहा डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहिल्यावर डोळ्याने दिसते ते सत्य की निवडणुकीत मतदान पेटीत,ई व्ही एम मशीन मधून बाहेर पडलेले सत्य मान्य करावे हा मोठा गंभीर विषय आहे.
सत्य व असत्याचा इतिहास वाचला तर गांधी आंबेडकर यांच्यातील शाब्दिक संघर्ष आठवतो.गांधीजी मोठया अहंकाराने सांगत होते, डॉ आंबेडकर समाजाचा उद्धार आणि काय सेवा करू शकतील ते तर कायम सुटा बुटात राहतात. यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे उत्तर दिले ते मिस्टर गांधी तुमच्या या वर्णव्यवस्थेने हजारो वर्षे माझ्या समाजाला नागडे राहण्यास मजबूर केले होते.परंतु मी लवकरात लवकर त्यांना माझ्या सारखे सुटाबुटात राहणारे बनवेल.मिस्टर गांधी तेव्हा तुम्हाला मानणारा सर्व समाज त्यांना पाहून मनातल्या मनात जळत राहील. हे सत्य आहे देशात कोणत्याही नेत्यांच्या स्मृतिदिनी एवढी गर्दी होत नाही. जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होते.त्यांची गिनीज बुकात नोंदणी झाली पाहिजे. यादेशातील वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या भांडवलदारांच्या व ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे ते सत्य दाखवू शकत नाही. त्यांची अपेक्षा हा कष्टकरी असंघटित समाज ठेवत नाही.तरी तो म्हणतो नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला ही भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. हे गाणे तरुणांच्या ओठावर कायम प्रेरणा देत राहते.
 महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी व शिवाजी पार्क वर होणारी गर्दी केवळ मोफत भोजन घेऊन समाधानी होत नाही.
जेवणाच्या पैशात अनेक पुस्तके विकत घेऊन जातात.
आणि एक नवीन ऊर्जा घेऊन जातात.पुस्तक वाचूनच ते म्हणतात खाण्यासाठी आम्ही जगत नाही,तर जगण्यासाठी आम्ही खातो.म्हणून ते म्हणतात खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!.
भारत हा विविध जाती धर्माचा देश आहे,त्यांच्या रीती रिवाज,परंपरा संपूर्ण वेगवेगळ्या आहेत,तरी ते सर्व लोक एकत्र गोविंद्याने राहतात.यांचे सर्व श्रेय केवळ या देशाच्या राज्य घटनेला जाते, जिथे भारतीय संविधान लागु आहे तिथे कोणता ही गंभीरप्रसंग निर्माण झाला तर संविधान योग्य मार्गदर्शन करते,पण आंबेडकरी चळवळीतील समाज, कार्यकर्ते आणि नेत्यांना कठीण प्रसंगी संविधान का लागु होत नाही.हा मोठा प्रश्न देशातील इतर समाज समोर आहे.सहा डिसेंबर म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन दरवर्षी लाखो लोक या महापुरुषांच्या चरणी वंदन करण्यासाठी येतात. त्यात दरवर्षी मोठया संख्येने भर पडते.खरच हे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानां मानणारे असतील काय?. हे फक्त मूर्तीच्या पुतळ्याला पाया पडण्यासाठी येत नाही तर क्रांतिकारी विचारांची प्रेरणा घेण्यासाठी येतात.खेड्यात पाड्यात राहणार हा असंघटित मजूर जरी असला तरी स्वतःची ओळख निर्माण करून राहतो.
आंबेडकरी चळवळ म्हणजे कष्टकरी वंचित शोषितांचा एक बुलंद आवाज. पण वंचित,शोषित म्हणजे महाराचे बौद्ध झालेले लोक,समाज नाही. तर बहुसंख्य असंघटित कामगार मजुर हे सर्व मागासवर्गीय जाती जमाती, भटके आणि आदिवाशी हे सर्व शोषिता मध्ये मोडतात, या सर्व बहुजन मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी केले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते, या सर्वांना सोबत घेतल्या शिवाय ही चळ्वळी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आंबेडकरी चळवळ जोमाने वाढलीच पाहिजे.पण संविधान मान्य नसणारे लोक कार्यकर्ते आणि नेते चळवळीचे नेतृत्व करणार असतील तर?. कुपनच शेत खाते असे म्हणावे लागते.समाजाला शत्रु कडून कमी आणि नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्या कडून जास्त धोका निर्माण होत आहे. म्हणूनच कार्यकर्ता प्रशिक्षित प्रामाणिक असावा. तर आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या संस्था, संघटना आणि पक्ष मजबूत करू शकतो.अन्यता दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक येत राहतील व व्यक्तिगत प्रेरणा घेत राहतील.पण सामाजिक,राजकीय क्रांतिकारी परिवर्तन होणार नाही. असे समजण्याचे कारण नाही आताच तरुण जागृत होत आहे. तो गांभीर्याने विचार करायला लागला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाला दादर येथे होणारी प्रचंड गर्दी पाहून सर्व विरोधकांचे डोळे फिरतात.तीच गर्दी राजकीय दृष्ट्या जागृत झाली तर राज्याचे नव्हे देशाचे राजकीय गणित बदली करू शकते. दादरच्या चैत्यभूमी वर येणारा हा बहुसंख्येने मागासवर्गीय असंघटित कामगार,मजूर शेतमजूर असतो.इथे तो भिमसैनिक, भीम अनुयायी, म्हणूनच नतमस्तक होतो, पण कामगार,कर्मचारी अधिकारी म्हणून जिथे जिथे नोकरी करत असतो तिथे तिथे तो याचं बाबासाहेबांच्या विचारधारेचा खून करणाऱ्या संघटनेचा,युनियन चा अधिकृत सभासद असतो,तो त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी वार्षिक वर्गणी,देणगी न मागता देत असतो.हे चित्र बदलण्याची गरज आजच्या परिस्थितीत आहे हे आम्ही स्वतंत्र मजदूर युनियन च्या बॅनर खाली बदल घडविण्याचे आवाहन स्वीकारले आहे तरुणांनी त्यात सहभागी झाले पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची त्यावेळी राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी का होती?. त्यात सतर टक्के असंघटीत कष्टकरी मजूर, शेतमजूर, कामगार होता.त्यांचा नेत्यावर विश्वास होता.पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी, मतभेद, अहंकार, स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली.हे आजचा तरुण गांभीर्याने पाहत आहे.
आंबेडकरी विचारांची एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन आहे. देशातील तमाम कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांनी इतरांच्या दबावाखाली  काम न करता स्वतंत्र मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली काम केल्यास सत्ताधाऱ्यावर आणि प्रशासकीय व्यवस्थेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करून समाजाच्या अनेक मूलभूत गरजा सहज सोडवू शकतात.म्हणूनच देशातील ९३ % असंघटीत कामगार मजुरांचे समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे.?.१९२७ ते १९५६ पर्यंत मागासवर्गीय शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता तरी तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू, तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल. व स्वाभिमानी राहील.
 असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता, बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. रिपब्लिकन विचारधारा किती हि चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसतील तर रिपाई रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठूच शकत नाही. 
लोकशाहीचे बंधन मान्य नसणारे कार्यकर्ते लगेच पन्नास शंभर लोक सोबत घेऊन पक्ष संघटना काढत राहिले म्हणजे काय होईल?. म्हणून सर्व गल्लीबोळातील तरुणांनी प्रथम आपल्या विभागातील स्वार्थी,अहंकारी कार्यकर्ते संपविण्याची जबाबदारी घ्यावी.आणि आपल्या परीसरातील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच आंबेडकरी चळवळीचा नेेता असेल.अन्यता दरवर्षी लाखो लोक भावनिक दृष्ट्या गर्दी करून  खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!. म्हणत राहतील. विचारधारेशी बेईमानी करत राहतील. हे थांबण्यासाठी तरुणांनी संघटित झाले पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी क्रांतिकारी विचारांच्या चळवळीला गतीमान करण्याचे काम तरुणच करतील.तीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आदरांजली, श्रद्धांजली आणि अभिवादन असेल.

सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा