पहिली कामगार कर्मचारी अधिकारी महिला परिषद
जगात आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. परिवहन मंत्रालयाने सर्व ऑटो रिक्षा वर लिहण्यास सांगितले ते आपण वाचतो "मुलगी शिकली प्रगती झाली" पण मुलींना,महिलांना प्रथम शिक्षण देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना महिला विसरतात. 19 व्या शतकात या दोघांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता संघर्ष करून केलेलं कार्य म्हणजे आजची सर्व क्षेत्रात समान संधीचा उपभोग घेणारी महिला आहे.आज महिला मान सन्मान मिळवत आहेत.त्यांची पायाभरणी फुले दांपत्यानेच केली हे कोणीच नाकारू शकत नाही.मनुवादी मानसिकता असणाऱ्या महिलांनी किती ही सरस्वती, शारदा,लक्ष्मी,कोणत्याही देवीचे पात्र उभे केले तरी त्यांचा जन्म. कुठे?.कधी?,कोणत्या जिल्ह्यात राज्यात झाला. त्याच्या आईवडीलांचे नांव, पती,मुलामुलींचे नांव ?. शिक्षण कुठे?. कधी?. किती?. झाले हे सांगता येत नाही. त्यांची कितीही उपासना केली तरी त्या महिलांवर होणारे अत्याचार अन्याय,लैंगिक शोषण थांबविण्यास त्या असमर्थ आहेत. हे शंभर टक्के सत्य माहिती असुनही उच्च शिक्षित कामगार,कर्मचारी आणि अधिकारी महिला अंधश्रद्धा अज्ञान रीतीरिवाज सोडायला तयार नाहीत.असा सुशिक्षित कामगार,कर्मचारी अधिकारी महिलांची राज्यातील नव्हे तर देशातील पहिली महिला परिषद 23 नोव्हेंबर ला नागपुर येथे स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
महिलांना आज जे काही मिळत आहे ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय राज्य घटनेत त्यांनी लिहून मजूर करून घेतले त्यांची तुलना होऊच शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितले कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या महिलांच्या प्रगती वरून मोजली पाहिजे. महिलांना प्रथम घरात मुलींना शिक्षण मिळवून देण्यासाठी पुरुषांशी संघर्ष करावा लागतो. तेव्हा मुलगी शिकते,संघर्ष करते,पण संघटित होत नाही. हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९४२ साली नागपुरात महिला परिषदेत सांगितले होते. त्यावेळी २२ हजार असंघटित महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सुशिक्षित व्हावे तरच त्या कुटुंबातील सर्वांना सुशिक्षित करतील.जिच्या हाती पाळण्याची दोरी ते केवळ बाळाचा उद्धार नाही तर जगाचा उद्धार करेल असे म्हटल्या जाते.महिलांचा पेहराव कपडे परिधान करण्याच्या पध्दती किती झपाट्याने बदलल्या तरी नोकरी करणाऱ्या महिला नवरात्रात कोणाचे अनुकरण करतात.त्या कोणते शिक्षण घेऊन कोणत्या जगात वावरतात?. शिक्षण वाघिणीचे दूध आहे.असे म्हणतात वाघीणीवर बसलेली देवी कोणत्या राज्यातील होती?. वाघ,सिंह आजही हिंस प्राणी म्हणून ओळखल्या जातात मग तेव्हा ते पाळीव प्राणी होते काय?.असा प्रश्न नोकरी करणाऱ्या सुशिक्षित महिलांना का पडत नाही. कारण ज्या मानसिक विचारधारेच्या कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाच्या संघटना, युनियन सोबत त्या जोडल्या गेल्या आहेत त्या यांना मानसिक गुलाम बनविणाऱ्या संस्काराचे रितीरिवाजाचे खुलेआम समर्थन करण्यास भाग पडतात. त्यांचा परिणाम आज सर्वत्र दिसत आहे.महिलांना समान काम समान वेतन मिळत नाही. लाखो अंगणवाडी सेविका, आशा वर्क्स मानधनावर काम करतात. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या ट्रेंड युनियनच्या नेत्यांना मानधन व वेतन या शब्दांचा अर्थ समजत नाही?. लाखो अंगणवाडी सेविका मध्ये कोणीच भारतीय संविधान, कायदेविषयक अभ्यासक नाही.महिलांना अनेक सोयी सवलती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हाईसरॉय मंत्रिमंडळात मजुरमंत्री असतांना मंजूर करून दिल्या होत्या.अमेरिका सारख्या देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. भारतातील महिलांना कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता मतदानाचा हक्क आणि अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिला. त्यांची जाणीव महिला कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला नाही.ते करून देण्याचे काम मान जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन करीत आहे.
संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार,कर्मचारी व अधिकारी महिलांना नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२५ कोटी आहे.त्यात ६२ कोटी महिलांची संख्या आहे.तर साक्षरतेचे प्रमाण ७४.०४ टक्के आहे.त्यात पुरुषांचे ८०.९ टक्के तर महिलांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे.ग्रामीण भागातील शिक्षण हे फक्त कागदावर आहे.जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या शाळेतील मुलामुलींना आणि महानगरपालिका शाळेतील मुलामुलींना
भारतीय महिलांची सामाजिक, शैक्षणिक प्रगतीची तपासणी करतांना मागासवर्गीय, आदिवासी व अल्पसंख्याक महिला कोणत्या सामाजिक स्तरातील आहेत.यांची आकडेवारी जाहीर करण्याचे जाणीवपूर्वक टाळले जाते.प्रस्थापित कामगार चळवळीनी महिला कामगार शक्तीचा स्वतःच्या राजकीय उधिष्टपूर्ती साठी गैरवापर केल्याचे दिसुन येते. मागासवर्गीय, आदिवासी अल्पसंख्याक समाजातील कष्टकरी कामगार,शोषित,पिडीत महिलांच्या स्वातंत्र्य, समता व न्याय मिळवून देणारी क्रांतिकारी विचारधारा ही फुले,शाहू आंबेडकरी विचारांची असु शकते. आणि हाच मुलभूत पाया मजबूत करण्यासाठी फुले,शाहु आंबेडकरी विचारांची देशातील एकमेव कामगार संघटना "स्वतंत्र मजदूर युनियन" २००३ साली स्थापन करण्यात आली आहे.
फुले,शाहू आंबेडकरी विचाराच्या परिवर्तनशील लढ्यात महिलांचा मोठा सहभाग होता तसाच सहभाग कामगार चळवळीच्या परिवर्तनशील लढ्यात स्थापित करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन आता सिद्ध झाली आहे. विशेष सुशिक्षित महिला कामगार,कर्मचारी व अधिकारी यांची जबाबदारी हे असंघटित क्षेत्रातील महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या विकास व कल्याणासाठी कसे वाढविता येईल यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन आज देशभरात प्रयत्नशील आहे.
आणि एका सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिवर्तनासाठी सज्ज व्हावे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.
भांडुप मुंबई,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा