संघर्षातुन नवा आत्मविश्वास अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे- सुरेखा अथरगडे
मागासवर्गीय असंघटित कामगारांचा डाव्या उजव्या विचारांच्या संघटना भीती घालून असंतोष शांत करतात.आणि जातीव्यवस्थेचे छुपे समर्थन करतात.दोन लाख अंगणवाडी सेविका १९७४ पासुन डाव्या विचारधारा मानणाऱ्या संघटनेच्या सोबत जोडल्या असतांना त्यांना मानधनावर कायमस्वरूपी ठेवल्या जात आहे. त्यांना सरकारी यंत्रणा कायमस्वरूपी वेतनश्रेणी का लागु करीत नाही. असा सवाल सुरेखा अथरगडे चिमूर चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका यांनी प्रचंड मोर्चात नागपुर येथे विचारला.
नागपूर विधानभवनावर स्वतंत्र मजदूर युनियन वतीने आयोजित प्रचंड मोर्चात राष्ट्रीय अध्यक्ष मान. जे. एस. पाटील साहेब यांच्या नेतृत्वात हजारो संघटित शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यां सोबतच असंघटित क्षेत्रातील कार्यकर्ते संवैधानिक हक्कांच्या रक्षणासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या प्रसंगी बोलताना स्वतंत्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सुरेखा अथरगडे यांनी अतिशय भावूक होत मोर्चाला संबोधित केले. त्या म्हणाल्या, आमचा मुलगा डॉक्टर, इंजिनीयर, तहसीलदार होऊ शकत नाही, कारण इतकी वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम करून सुद्धा आम्हाला वेतन नसून केवळ तुटपुंज्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करावा लागतो. वेळोवेळी शासनाद्वारे मानधनात नावापुरती वाढ करून आमच्यातला वाढता असंतोष शांत केल्या जातो. परंतु, आता हे तुटपुंजे मानधन नको तर वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी भावूक अंतःकरणाने या प्रसंगी त्यांनी केली. त्यावेळी बाबासाहेबांनी याच नागभूमीवर केलेल्या १९५६ सालच्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण होते ज्यात विषमतावादी व्यवस्थेचे वर्णन करताना बाबासाहेब म्हणतात कि, "ब्राम्हण बाई बाळंतीण झाली कि तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते.आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडू वाल्याची जागा रिकामी आहे, तिकडे असते." अशा तऱ्हेने ही विषमतावादी वर्णवादी व्यवस्था सामाजिक, मानसिक, शैक्षणिक ऱ्हासा सोबतच बहुजन समाजाच्या आर्थिक दडपशाहीचे सुद्धा मुख्य कारण ठरली आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या चाळीस वर्षांपासून अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्या ब्राम्हणवादी, डाव्यांच्या संघटनांमध्ये आजपर्यंत कार्य करत होत्या. परंतु, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात तसुभरही फरक पडला नाही. त्या संघटनांं मधील त्यांचे स्थान केवळ पावती फाडण्यापूरतेच मर्यादित होते. कामगारांचे हित साधण्याचे ढोंग करणाऱ्या या ब्राम्हणवादी, डाव्यांच्या संघटना या विषमतावादी व्यवस्था कायम ठेवण्यासाठीच कार्यरत असतात.हे मागासवर्गीय अंगणवाडी सेविकांनी लक्षात घेऊन आपली चूक सुधारावी स्वतंत्र अंगणवाडी कर्मचारी युनियन मध्ये सहभागी व्हावे.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या संघटित शक्तीच्या जोरावर मान. जे.एस.पाटील साहेब यांच्या नेतृत्वात बाबासाहेबांनी सांगितलेले बहुजन कामगारांचे शत्रू भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या विरुद्ध असलेल्या संघर्षातुन नवा आत्मविश्वास अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आणि असंघटित संघटित कामगार कर्मचारी अधिकारी वर्गात निर्माण होत आहे म्हणूनच आज सर्व संघटित असंघटित या प्रचंड मोर्चात सहभागी झाले हे सिद्ध होत आहे.
सुमित चिंचखेडे नागपुर यांस कडून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा