बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डिसेंबर महिना

 

जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा.

 

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

स्वच्छतेचे महत्व जाणणारे संत गाडगेबाबा

 स्वच्छतेचे महत्व जाणणारे संत गाडगेबाबा



उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही.ते साफसफाई करण्यासाठी त्यांना असंघटीत मागासवर्गीय समाजाचे कामगार लागतात.पण जेव्हा त्यांना न्याय,हक्क आणि अधिकार देण्याची वेळ येते तेव्हा हीच मंडळी त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत.असा उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा आज ही प्रेरणादायी असायला पाहिजेत. कोविड १९ महामारीत ज्यांनी जीवाची बाजीलावून स्वच्छता ठेवली.त्यांना नंतर कामावरून कमी करण्यात आले.त्यांना स्वच्छतेचे व ते ठेवणाऱ्यांचे महत्व कधी कळणार?.
समाज प्रबोधन करण्या करीता शिक्षणाची गरज नसते.समाजसेवा हे सुशिक्षित माणसाचे काम नाही.ते फक्त नोकरी करून पैसा कसा कमाविण्यासाठीच असते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आणि त्यासाठी त्यांना किती खोटे बोलण्याचे कैशल्य आत्मसात करावे लागते.ते  गरिबांना समजू शकत नाही.मग हेच उच्चशिक्षित गाडगेबाबाना कसे समजून घेतील.
भारत कृषिप्रधान देश आहे या देशातील कृषिचे मालक असणारे शेतकरी. आर्थिक शोषण होते म्हणूनच जास्त आत्महत्या करतात.कारण ते सुशिक्षित नाही लिहण्या वाचन्या पुरते त्याचे शिक्षण असते.म्हणुन त्याला ऐनवेली कृषि उत्पन्न बाजार समितीतील अडते व व्यापारी लुटतात. त्याच्या शेतातील उत्पादित मालाचा भाव पडतात. त्याच वेळी सुशिक्षित बँक अधिकारी आपले कैशल्य दाखवतात. त्यात कोणत्या ही धर्माची माणस मागे नसतात. का होते असे?. हा मोठा प्रश्न आहे.म्हणून संत गाडगेबाबा यांची आठवण येते.गाडगेबाबाचे शिक्षण आणि त्यांची समाज प्रबोधन करण्याची पद्धत म्हणजे किर्तन पाहिली तर ते उच्च शिक्षित वाटतात.पण ते उच्च शिक्षित नव्हते असे आजच्या तरुणांना सांगून पटणार नाही.
    सरकारच्या ग्राम स्वछता अभियानाच्या जाहिराती वर्षा तुन दोन वेळा येतात.एक जयंती दिनी दूसरी स्मुर्ती दिनी तेव्हाच सरकारला गाडगेबाबाची आठवण येते.गाडगेबाबाचे तत्वज्ञान मानव मुक्ति करणारे होते ते आजही सर्व समाजाला चिंता मुक्त करणारे आहे.ते समजुन घेण्यास सुशिक्षित समाज कमी पडतो.आज प्रत्येकजन आपला कुटुंबा पुरता विचार करतो.घर,परिसर,गांव स्वछ ठेवा हा मंत्र त्याकाळी गाडगेबाबानी सांगितला होता.आज कोणता ही सुशिक्षित माणूस असा विचार करीत नाही.पण गाड्गेबाबानी दहाकलमी कार्यक्रम राबविला तो किती लोकांना माहित आहे?. 
काय म्हणतात संत गाडगेबाबा १) भूकेलेल्यांना - अन्न,२) तहानलेल्याना - पाणी, ३) उघड्या नागड्या ना - वस्त्र,कपडा, ४) गरीब मुलामुलींना - शिक्षणासाठी मदत, ५) बेघरांना - आसरा, ६) बिमार लोकांना - औषधोपचार, ७) बेकारांना - रोजगार, ८) मुक्या प्राण्यांना - अभय, ९) गरीब मुलीमुलाचे - लग्न, १०) गोरगरीबना - शिक्षण, हा त्यांनी खेड्या पाड्यात राबविला.हेच कोणताही माणूस कुठे ही कधी ही जात,धर्म,प्रांत न पाहता राबवू शकतो.
   गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६- मुत्यु २० डिंसेंबर १९५६ झाला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरच्या महापरी निर्वाणाने त्यांना खूप दुख झाले होते त्यांनी अन्नत्याग केला होता असे म्हणतात.संत गाडगेबाबा विज्ञानवादी होते.म्हणूनच ते  खेड्यापाड्यातील गावागावात मंदिरासमोर भजन करीत आणि विचारत बापो हो "ईश्वर देव कशात आहे?." देवा बाबत लोकात असणारी श्रद्धा,अंधश्रद्धा,अज्ञान,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने समाज प्रबोधन करणारे कार्य करीत होते. "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी " असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. ते ओबीसी समाजातील होते. पण त्यांना त्यांच्या समाजाने किंवा ओबीसीनी कधीच स्वीकारले नाही. त्यांचे तत्वज्ञान जाती धर्मासाठी कधीच नव्हते.ते खरे प्रबोधन करणारे संत होते.त्यांचा वैचारिक वारसा ओबीसी समाजाने ठेवला असता तर देशातील मंदिरे वसान पडली असती.आणि तीन टक्के समाज घरोघरी भिक्षा मागत फिरला असता.त्यांची हक्काची रोजगार हमी कायमची बंद पडली असती.हा ऐतिहासिक वैचारिक वारसा ओबीसी समाज कधी स्वीकारणार?. 
 माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी धर्मशाळा,अनाथालये,आश्रम आणि विद्यालये सुरू केली होती.तेव्हा ते शिक्षण सम्राट होऊ शकले असते. पण त्यांनी रंजले-गांजले, दीन-दुबळे,अपंग-अनाथ यांच्यात देव शोधला. या खऱ्याखुऱ्या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके  असा त्यांचा वेश असे.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी  जिवापाड प्रयत्न केले.हा आदर्श आज कोणताही समाज घ्याला तयार नाही.ज्यांनी घेतला त्यांचा आज सर्वच ठिकाणी दबदबा (वैचारिक) आहे.
   गाडगेबाबाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत तेव्हा त्यांनी सांगितले मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही.१४ फेबुवारी १९४९ ला गाडगे बाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची माहिती दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर २०/११/१९४७ ते ३१/०३/१९४९ कायदेमंत्री होते ) आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यानी सर्व कामे बाजूला ठेवली. आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या. आणि म्हणाले डॉ.तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक एक मिनिट महत्त्वाचे आहेत. तुमचा किती मोठा अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.तेव्हा पासून बाबासाहेबाला मानणारा समाज प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबाचा आदर्श गुरु म्हणुन उल्लेख करू लागला.कोणते ही कार्यक्रम असो भाषणाची सुरवात बाबासाहेबाच्या आदर्श गुरुच्या विचाराला आणि प्रतिमेला वंदन केल्या शिवाय पुढे भाषण करीत नाही.हि पद्धत बहुजन आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे.त्यामुळे बाबासाहेबाच्या फोटो बरोबर गाडगेबाबाचा फोटो घराघरात असतो.उलट गाडगे बाबाच्या समाजाने आज ही बाबांना स्वीकारले नाही.९० टक्के लोकाच्या घरात गाडगेबाबाचा फोटो नसतो.लग्न कार्य किंवा कोणताही कार्यक्रमात त्याच्या नांवाचा उल्लेख नसतो.फोटोचा प्रश्नच नाही.म्हणजे ज्यासामाजातील एक संत सर्व समाजा करिता एवढा आदर्श निर्माण करतो त्याचा आदर्श त्याच्या समाजाने न घेणे हि खूप दुर्दव्य म्हणावे लागेल.काही संघटना जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत.पण हिंदुत्वाची चौकट मान्य करूनच.गाडगेबाबा सारख समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्याचा उल्लेख टाळून संघटना संस्था चालवितात. त्यामुळेच त्यांना आताच्या केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्य न्यायालया मार्फत लगाम लावला. 
   गाडगेबाबा आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.तसाच प्रयत्न त्याच्या समाजातील संघटना नी करायला पाहिजे. ओबीसीना निवडणुकीत उभे राहण्याच्या अधिकारांचे आरक्षण नसेल.तर त्यांनी मतदान का करावे?. असे प्रश्न विचारण्याची त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे बहुजन समाजाच्या चळवळीत आदर्श संत म्हणून कायम आहेत आणि राहतील.ओबीसीनी त्यांचा वैचारिक वारसा स्वीकारावा आणि त्यांना २० डिसेंबर स्मृतिदिनी खरी मानवंदना द्यावी.आम्ही जीवावर उद्धार होऊन असे प्रबोधन करणारे लिहत असतो.सत्य असत्याची जाणीव करून देणे म्हणजेच प्रबोधन आहे असे तथागतांनी व महामानवानी आम्हाला सांगितले आहे.समाजाच्या हिताचे व कल्याणाचे विचार परखडपणे निर्भीडपणे निपक्षपातीपणे लिहणे,बोलणे मांडणे म्हणजेच प्रबोधन असते. संत महापुरुषांच्या जयंती दिनी,स्मृतिदिनी मी ते दरवर्षी करीत असतो त्यातून त्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रतिमेला त्रिवार अभिवादन असते.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून द्या.

 एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून द्या.



सुशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी इतर असंघटित कष्टकरी कामगार, शेतमजूर समाजासाठी काम करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना चोर,एजंट, वसुली करणारा असे दूषणे लावू नये.कारण तो कोणतीही अपेक्षा ठेऊन काम करीत नाही. ती खरा बिन पगारी फुल अधिकारी समाजासाठी असतो, अन्याय,अत्याचार झाला तर प्रथम तोच आवाज उचलतो,पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना जाब विचारतो. उच्च शिक्षित सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यां कर्मचारी अधिकारी वर्गात ही हिंमत कधीच नसते. शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळाले म्हणूनच त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला. म्हणजे त्याचे सर्वच प्रश्न निकाली निघाले. हा समज कर्मचारी अधिकारी वर्गाचा दृष्टिकोन त्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतो?.
सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी हा आंबेडकरी विचारधारेशी कधीच प्रामाणिक राहिला नाही, नोकरीत असतांना तो आंबेडकरी विचारधारेच्या विरोधी युनियनचा आर्थिक पाठबळ देणारा वार्षिक वर्गणीदार सभासद असतो. तसाच तो निवडणूकीच्या वेळी आंबेडकरी विचारांच्या पक्षाच्या गरीब उमेदवारांना मत न देता हिंदुत्ववादी विषमतावादी विचारांच्या उमेदवाराला मतदान प्रत्येक निवडणूक मध्ये करतो.
आंबेडकरवादी विचारधारेला आपली मते देऊन आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्याऐवजी मनुवादी विचारांच्या पक्षाला मते देऊन त्यांची राजकीय शक्ती मजबूत करतो.अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर एकत्र येऊ शकतील, पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जीवंत बेडकांचं तराजूत वजन करण्यासारखं आहे. दुस-याला तराजूत टाकेपर्यंत पहिला उडी मारुन पळून जातो. कारण यातील प्रत्येक जण स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो.तो पक्का स्वार्थी मतलबी झालेला असतो.तो समाज आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना नेहमीच कमी लेखतो.त्यामुळेच तो ज्या पदावर बसलेला असतो तेव्हा तो मनुवादी विषमतावादी विचाराचा विचार करुन आचरण करतो म्हणूनच तो गोगारीबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मानाची वागणूक न देता तुच्छ पणे वागतो.मात्र तोहे विसरतो कि तो जी सुरक्षित नोकरी करतो ते याच असंघटीत कष्टकरी लोकांनी केलेल्या आंदोलना मुळे मिळाली आहे.
शिक्षणाची व नोकरीची संधी मिळाली ती यांच समाजच्या घाम गाळल्याने.तशीच राजकीय सत्ता हवी असेल तर त्यासाठी गोरगरिबांच्या घरा घरात जाऊन न बिकनेवाला मतदार बनवावा लागेल.कोणती सत्ता हवेतून मिळत नाही,सत्तेसाठी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक आणि आर्थिक दुष्ट्या सामाजिक बांधिलकी निर्माण करावी लागते. रोजगार,आरोग्य आणि शिक्षण ज्यांचं ताब्यात आहे ते सर्वच पक्षातील धन दांडगे,जात दांडगे आहेत.त्यांचं विरोधात जाऊन मतदान करणे म्हणजेच कुटुंबाचा व समाजाचा सत्यानाश करणे होय.याची जाणीव गोर गरीब कष्टकरी मजुरांना आहे.म्हणूनच तो खेडे सोडून शहरात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जात असतो. मान्यवर कांशीराम यांनी उतर भारतात प्रथम न विकणारा समाज बनविला म्हणूनच मायावती चारवेळा मुख्यमंत्री होऊ शकल्या.हाच प्रयोग महाराष्ट्रात श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी करण्यास सुरुवात केली.मान्यताप्राप्त चारीही राजकीय पक्षाना घाम फोडला.याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण झालेच पाहिजे.
 वंचित बहुजन आघाडीचा विधानसभेतील निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असला तरी तो बहुजन समाजाला प्रेरणादायी होता.प्रत्येक मतदारसंघातील मतदान संख्याबळाने लोकप्रतिनिधी निवडून येणारा होता. गेल्या वेळी देगलूर-बिलोली मध्ये वंचित बहुजन आघाडीला तीस हजार मते मिळाली होती.मग पोट निवडणुकीत लाखोंच्या जाहीर सभा होऊन मतदान कमी कसे झाले?. हा संशोधनाचा विषय आहे.पक्ष संघटना बांधणीत दहा हजार पदाधिकारी पकडले तर प्रत्येक कुटुंबात चार किंवा पाच मतदार असतात.या हिशेबाने चाळीस पन्नास हजार मतदार हे हक्काचे होतात.इतर बहुजन हितचिंतक पकडले तर आकडा लक्षवेधी असला पाहिजे होता.परंतु तो केवळ एकरा हजार वर आला म्हणजेच गद्दार घरात भरपूर आहेत.हे सिद्ध होते.हक्काची घरची मते शाबूत ठेवण्यात क्रांतिकारी विचारांचा आंबेडकरवादी माणूस अपयशी का ठरतो.यांचे सत्य वास्तव समजून घ्यावे लागेल.
ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक यांच्याकडे मत मागण्या पूर्वी आपली स्वतःची राजकीय ताकद निर्माण झाल्याशिवाय इतरांची मते मिळणार नाहीत.हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकर करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.त्यासाठी आपल्या वस्तीतील गद्दार,चमचे तितर पक्षी शोधून ठेचून काढले पाहिजेत.शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष बांधणी झाली पाहिजे.एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती संपविल्या शिवाय समाजात संघ शक्ती निर्माण होणार नाही.
सुरक्षित नोकरी करणारा कामगार कर्मचारी आणि अधिकारी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियन चा सभासद होत नाही.विषमतावादी विचारांच्या ट्रेड युनियन चा सभासद असल्यामुळे पदोन्नती मधील आरक्षण जवळ जवळ संपल्याच्या मार्गावर आहे.  त्यामुळेच नोकरीतील आरक्षण संपल्यात जमा झाले आहे.त्याला सरकार नाही तर बहुसंख्य आरक्षणाचे लाभार्थी जबाबदार आहेत.राजकीय पक्षात जशी स्पर्धा आहे तशीच इथे ही कामगार चळवळीतील एक ना धड भारा भर चिंद्या ही मनोवृत्ती जबाबदार आहे.कामगार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात स्वार्थीपणाची मनोवृती असल्यामुळेच बहुसंख्ये बहुजन कामगार कर्मचारी अधिकारी समाजात असून ही ते चळवळीच्या कामाचे नाहीत.त्यामुळेच आपण ८५ टक्के असून ही अपयशी ठरतो. 
सोशल मिडीयावर बहुमत असून ही कशी त्याची हार होते.त्याचे उत्तम उदाहरण चर्चेत आहे. एका वसतीगृहामध्ये उपमा रोज १०० विद्यार्थ्यांना दिला जायचा. १०० विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थ्यांनी उपमा नको म्हणून विरोध केला व दररोज वेगवेगळे टिफिन देण्याची तक्रार केली. पण,रोज २० विद्यार्थ्यांना उपमा खायला आनंद व्हायचा.८० विद्यार्थ्यांना उपमा वगळता दुसरे काहीतरी हवे होते.नेहमीच मुलांच्या तक्रारी येत असल्यामुळे सर्वांच्या आवडीचा पदार्थ देण्याचे ठरवले मग वॉर्डनने मतदानाची व्यवस्था केली. ज्या पदार्थाला बहुमत प्राप्त होईल, तो नाश्ता देण्याचे ठरविण्यात आले.उपमा हव्या असलेल्या २० विद्यार्थ्यांनी उपमाच हवा म्हणून तातडीने मतदान केले. उर्वरित ८० विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार मतदान केले.
पदार्थानुसार मतदान असे झाले.
१८ %: मसाला डोसा,१६%: आलू पराठा आणि दही,१४ %: रोटी आणि सबजी,१२ %: ब्रेड आणि बटर,१० %: नूडल्स,१० %: इडली सांबार, २० %:उपमा वरील प्रमाणे मुलांनी मतदान केले.याचा परीणाम असा झाला कि,मतदानाच्या पद्धतीनुसार आणि बहुमतानुसार, उपमाच सुरू ठेवण्यात आला.यातुन आपण कोणता धडा घेणार आहोत. जोपर्यंत ८० % लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली राहील, २० % लोक ८० % वर राज्य करतील.हाच ओबीसी,एस सी,एस टी,आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाज ८५ टक्के असूनही असाच विभागला जातो.सर्वच एकमेकांना दोषी ठरवतात.पण कोणत्या नियमाचे पालन करून एकसंघ बनत नाही.म्हणूनच एक ना धड भारा भर चिंद्या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांच्या आपण कळत नकळत करत असतो आणि दोष मात्र मनुवादी विषमतावादी विचारधारेला देत असतो.हे कुठे तरी कडक कारवाई शिस्तबद्ध होऊन थांबली पाहिजे तरच येणारा काळ चांगला असेल अन्यता वर्णव्यवस्था दूर नाही.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई 

भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?.

 भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?.



देशात असा कोणताही नेता व संघटना,पक्ष नाही की त्याला हजार दोन हजार लोक गोळा करण्यासाठी हंड्बील,पोस्टर,जाहिराती देऊन मिटींगा घ्याव्या लागतात तेव्हा मोठ्या मुश्किलीने लोक गोळा होतात.त्यांना वाहनाची,चहा,पाणी आणि जेवणाची व्यवस्था करावी लागते. देशात नव्हे तर जगात एकच व्यक्ती अशी आहे कि त्याच्या प्रतिमेला वंदन करण्यासाठी,सलामी देऊन नतमस्तक होण्यासाठी गेल्या ६५ वर्ष लाखोच्या संख्ये लोक येतात.त्यासाठी त्यांना कोणताच नेता हंड्बील पोस्टर कडून येण्याचे आमंत्रण निमंत्रण देणारे आवाहन करीत नाही तरी लोक लाखोच्या संख्येने येतात.त्या लाखो लोकांचे नेतृत्व कोणीच करीत नाही. सर्वच स्व्यमघोषित नेते कार्यकर्ते असतात.१ जानेवारी शौर्य दिन भिमा कोरेगांव,विजया दशमी नागपूर आणि ६ डिसेंबर चैत्यभूमी दादर मुंबई येथे येणारी गर्दी कोणाच्याही नियंत्रणात नसल्यामुळे सरकारला खूप काळजीपूर्वक परिस्थिती हाताळावी लागते.त्यामुळेच प्रशासन अधिकारी दरवर्षी लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल यांचेच नियोजन करीत असतात.रोड बंद,पार्किंग बंद,जाणूनबुजून या असंघटीत समाजाला त्रास देण्यासाठी किंवा जातीय दंगल घडविण्यासाठी अनेक षड्यंत्र केली जातात.त्यातच घरका मुद्यी लंका ढाये,कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बारा.मान्यताप्राप्त नेत्यांच्या विरोधात समाजात असंतोष निर्माण करून शॉटकट नेते बनणारे काही कमी नाहीत.   
मागासवर्गीय समाजातील भक्त मंडळी महापुरुषांचे जन्मदिन आणि स्मृतीदिन आल्यावर भरभरुन अभिवादन करायला लागतात. मी पण १९८२ पासून १९९४ पर्यत बुक स्टोल लावून पुस्तके विकत होतो.चष्मा तपासणी शिबीर,आरोग्य तपसणी शिबीर,जनजागृती साठी पत्रक वाटप असे काम दरवर्षी करत होतो. कालकथीत विजय गोविंद सातपुते यांच्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर खरी परीस्थिती आणि मूळ समस्या व त्या समस्यांचे मूळ कारण लक्षात येऊन त्या दृष्टीकोणातून फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीची क्रांतिकारी विचारांची खरी ओळख पटू लागली. मग हे एक दिवसाचे भावनिकदृष्ट्या दाखवल्या जाणारे प्रेम,अभिवादन,त्रिवार वंदन ह्या गोष्टी बनावटी वाटून चीढ निर्माण करु लागल्या.कारण ह्यामुळे महापुरुषांना अपेक्षित बदल होणं तर दूर उलट त्यांच्या विचारधारेचा पराभव होऊन त्यांच्याच समतावादी विचारांची हत्या होऊन विषमतावादी विचारधारेचा विजय होतांना दिसत आहे. 
"मेरा जीवन ही मेरा संदेश है!" हे शंभर टक्के सत्य असतांना त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यावर भर दिला जात आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून माझे अपूर्ण कार्य पूर्ण करा. "जागृतीचा ग्नी अखंड तेवत ठेवा." असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या आयुष्याचा खराखूरा अभ्यास केलात तर जाणवते,त्यांनी त्यांच्या जीवनात मानलेले तीन गुरु बुद्ध-कबीर- फुले यांचा जयजयकार न करता त्यांच्या विचारांचे आयुष्यभर अनुकरण करत त्यांचे सामाजिक कार्य पूर्णत्वास नेले. ही कोणत्या ही अनुयायाने आपल्या महापुरुषाला दिलेली खरी व प्रामाणिक प्रेरणादायी श्रद्धांजली किंवा आदरांजली असते. बाकी सगळं प्रचंड ढोंग असते व स्वताचा स्वार्थ संभाळत केलेली तडजोड असते.खरे प्रबोधन व आनुकरण समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या सामाजिक गुरुंच्या आयुष्यातले अनेक महत्वपूण प्रसंग वाचले तर प्रेरणा देतात. बाबासाहेबांनी आम्हा पाच्यांशी टक्के बहुजनांना संख्यावार प्रतिनिधीत्व व मानवी हक्क-अधिकार देण्यासाठी मनुस्मृती विरोधात "लोकशाही व संविधान" भारतात आणण्यासाठी वेळप्रसंगी स्वताची पत्नी व मुले,सुखसोई त्यागून आयुष्यभर जनजागृती, समाजप्रबोधन,संघटीत जात दांडगे धनदाग्यांच्या विरोधात असंघटीतांना संघटीत करून अभ्यास करून संघर्ष केला. आज दिसणारा साधन-संपन्न एस सी,एस टी,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज निर्माण केले. अन्यता शुद्र,अतिशूद्र आणि अस्पृश समाज माणूस मानून जगण्याच्या लायकीचा सुद्धा नव्हता. तो समाज आता लोकशाही व संविधान कमकूवत करत असलेल्या ब्राम्हणशाहीची वाढती "गर्वसे कहो हम हिंदू है" ही गुलामी पत्कारून बहुजन समाजातील महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना पराभूत करून भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?. करीत आहे.महापरीनिर्वाण दिनाला,शौर्य दिनाला,धम्म विजया दशमी दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी निवडनुकीत कोणत्या ही मतदारसंघात संख्येच्या बळावर खरी का उतरत नाही. यांचे चिंतन कोणता ही नेता कार्यकर्ता करतांना का दिसत नाही.म्हणजेच ही वेगवेगळ्या दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?.करणारी आहे.हे सिद्ध होते.यावर वैचारिक विचारमंथन झाले पाहिजे.चर्चा, संवाद परिसंवाद होऊन योग्य मार्ग काढला पाहिजे.अन्यता असे दिन येत राहतील आणि गर्दी वाढत जाईल.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४४०३८५९,भांडूप,मुंबई.

ओबीसी कोणासाठी राजीनामा देतील?.

 ओबीसी कोणासाठी राजीनामा देतील?.



विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्याने देशात राज्यात केंद्रात सार्वजनिक सुट्टी असते.पण विषमतावादी मनुवादी विचारांचे केंद्रात सरकार आल्या पासून सहा डिसेंबर दिवसाचे महत्व कमी करण्यासाठी अनेक षडयंत्र रचल्या गेली त्यात लक्षवेधी बाबरी मशीद ओ बी सी च्या हातून पाडून त्यांना गुन्हेगार बनविण्यात आले.ज्या ओबीसीना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात ३४० कलमा द्वारे अनेक हक्के अधिकार दिले.त्यासाठी बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला.
सोमवार दि. ६/१२/२०२१ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने पंचायत राज्यात ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण देणारा ३/२०२१ हा वटहुकुम स्थगित केला. याचा अर्थ मिनी विधानसभा मानल्या जाणार्‍या आगामी महानगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी राजकीय आरक्षण असणार नाही. हे नष्ट करण्याचे पाप कुणाचे आहे? या पापाचे पहिले मानकरी आहेत रा.स्व. संघ, भाजपा, मोदी, फडणवीस आणि याचिकाकर्ते भाजपाचे जळगावचे सरचिटणीस राहुल रमेश वाघ.तर दुसरे पाप ठाकरे-पवार (महाविकास आघाडी) सरकारमधील समाज कल्याण खाते, ग्रामीण विकास खाते, नगरविकास खाते व विधी व न्याय खाते या चौघांच्या पदरात घालणे भाग आहे. 
     शासन कोणाचे हि असो प्रशासन मनुवादी विचारांच्या अधिकाऱ्यांच्या हातात असते हे एकदा नाही तर अनेकदा सिद्ध झाले तरी ओबीसी जागे होत नाही. हा अध्यादेश काढण्याचा सल्ला, आग्रह आणि हट्ट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा होता. ते लाख या सरकारला बदसल्ला देत होते, पण त्यांचा हा सल्ला मविआ सरकारने मान्य का केला? त्यामुळे हे सरकार तोंडघशी पडले आहे. आज भाजपची सत्ता जाऊन २ वर्षे झाली तरी सरकारी बाबू फडणविसांचेच हुकुम ऎकतात. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत २ सर्वपक्षीय बैठका घेतल्या होत्या. त्या दोन्हीही फडणविसांनी खिशात घातल्या. तिन्ही सरकारी पक्ष आणि बाकिचे ४८ छोटेमोठे पक्ष फडणविसांच्या हो ला हो भरीत होते. अशी काय मजबुरी होती या ५२ पक्षाची? याचे उत्तर आतातरी हे पक्षनेते देणार आहेत का? वटहुकुम काढण्याचा हा बदसल्ला देऊनच फडणविस थांबले नाहीत तर त्यांनी हा हट्ट आणि हेका लावून धरला.विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी बैठका घेतल्या. या वटहुकूमांचे शब्दांकन वकील देवेंद्र फडणवीस यांचे आहे. सर्वोच्च न्यायलयात मविआ सरकारने यासाठी नफडे वकील नेमले तेही फडणवीस यांची शिफारस होती म्हणून. ते वकिल सर्वोच्च न्यायालयाला राज्य सरकारची भुमिका समजाऊन सांगण्यात स्पेशल नापास ठरले. तसे या आदेशात न्यायालयाने नमूद केलेले आहे. 
आरक्षणमुक्त भारताचे नेतृत्व करणारे संघ-भाजपावाले सराईत खोटारडे नी दुटप्पी आहेत. त्याचा पुरावा हा की ह्या वटहुकुमाला आव्हान दिले ते राहूल रमेश वाघ भाजपचे आजही पदाधिकारी आहेत. त्यांची मोदी, फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी सलगी असल्याचे फोटो प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले आहेत.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही हिंदू कोड बिल सादर करतांना केले होते तेव्हा ओबीसी करिता डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांनी आपल्या मंत्री पदाचा राजनामा दिला होता हा इतिहास ओबीसी विसरले असतील पण सुर्वण हिंदू मराठा आणि मनुवादी ब्राम्हण विसरले नाहीत.हे त्यांनी पुन्हा सहा डिसेंबर २०२१ ला दाखवून दिले.
हिंदू कोड बिल (हिंदू संहिता विधेयक) हे भारतातील कायद्याचा मसुदा होता.हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. आंबेडकरांनी ४ वर्षे, १ महिना आणि २६ दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल इ.स. १९४७ पासून ते फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले. हा मसुदा सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर वर सुमारे ३ वर्ष काम केले. त्यांना वाटत होते की जाति व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे त्यासाठी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे. स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४८ मध्ये संविधान सभेत "हिंदू कोड बिल" चा मसुदा प्रस्तुत केला. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल, त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्तीत कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला. या कायद्यानुसार मयत झालेल्यांच्या सर्व मुलगे आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात येतात.या बिलामध्ये आठ अधिनियम बनवले आहेत.
हिंदू विवाह अधिनियम विशेष विवाह अधिनियम दत्तक घेणे,दत्तकग्रहण अल्पायु - संरक्षता अधिनीयम हिंदू वारसदार अधिनियम दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्य यांना भरन-पोषण अधिनियम अप्राप्तवय संरक्षण सम्बन्धी अधिनियम वारसदार अधिनियम हिंदू विधवाला पुनर्विवाह अधिकार अधिनियम या कायद्यात विवाह संबंधी प्रावधानांमध्ये बदल केला आहे. यात सांस्कारीक व कायदेशीर या दोन प्रकारच्या विवाहाला मान्यता देता येते. यामध्ये हिंदू पुरुषांना दोन किंवा त्यापेक्षाही अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध आहे आणि त्यासंबंधी शिक्षेची तरतूद केली आहे. यामध्ये हिंदू स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. हे बिल अशा अनेक कुप्रथांना हिंदू धर्मापासून दूर करत होते, ज्याला परंपरेच्या नावाखाली काही कट्टरतावादी सनातनी जिवंत ठेवू इच्छित होते. या बिलाचा जोरदार विरोध झाला. या बिलाला ९ एप्रिल १९४८ ला निवड कमिटीच्या जवळ पाठवण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तर्क आणि नेहरुंचे समर्थन असूनही सुरुवातीस हे बील संविधान सभेत प्राप्त होऊ शकले झाले. त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजनामा दिला. पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे बील संसदेत मंजूर करण्यात आले.आज ओबीसीची जनगणना होत नाही.कारण ते हिंदू आहेत.ओबीसी म्हणजेच Other Backward Class (OBC) कागदावर आरक्षण सवलती घेण्यासाठी असतात.बाकीच्या वेळी ते कट्टरपंथीय हिंदू असतात. आजच्या घडीला चारी मान्यताप्राप्त राजकीय पक्षानी ओबीसीच्या तोंडाला काळे फासले तरी कोणीच पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याची हिंमत दाखवत नाही.ओबीसी करिता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीआपल्या मंत्री पदाचा राजनामा दिला होता.आता ओबीसी नी कोणासाठी राजीनामा द्यावा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई. 
Attachments area

ओबीसीची उदिष्ट ध्येय निश्चित नसल्यामुळे दशा आणि दिशा

 ओबीसीची उदिष्ट ध्येय निश्चित नसल्यामुळे दशा आणि दिशा 



आपला ओबीसी समाज कुठे आहे? आपल्या ओबीसी समाजाची किती प्रगती झाली? आपल्या ओबीसी समाजात किती उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी लोक आहेत ? किती क्लासवन अधिकारी आहेत ?. पत्रकार,संपादक,साहित्यिक,वकील, डॉक्टर,इंजिनियर, प्राध्यापक,शिक्षक,आमदार खासदार नगरसेवक किती आहेत?.आणि कोण कोणाचे वैचारिक मानसिक गुलाम झाले आहेत.शिक्षण आणि नोकरीत सत्तावीस टक्के आरक्षण घेणारे कामगार,कर्मचारी अधिकारी कोणत्या विचारधारेच्या ट्रेड युनियनचे सभासद आहेत. का त्यांनी स्वताची कामगार संघटना युनियन बनविली नाही.मग ते ओबीसी समाजातील विध्यार्थी तरुणांना कशी नोकरी मिळवून देऊ शकतात?. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये कामगार,मजूर,शेतकरी यांची स्थिती कशी काय आहे, याकडे आपले लक्ष आहे काय?. याची माहिती प्रत्येक संस्था,संघटना व पक्षात समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिक्षित लोकांना असली पाहिजे.ते नसल्यामुळेच ओबीसीची दशा आणि दिशा कोणाला दिसत नाही.
ओबीसी समाज आजही शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक दृष्ट्या मागासलेले जीवन जगत आहे. भारत देशामध्ये बहुसंख्य समाज मागासलेला आहे. व अल्पसंख्य समाज पुढारलेला आहे. यामध्ये असंख्य जाती इतर मागासवर्गीयां मध्ये मोडतात त्यापैकी माळी,कोळी,शिंपी, नाभिक,परिट,गुरव,लोहार,कुंभार अशा अनेक जाती ओबीसी प्रवर्गात मोडतात. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये लोकांची संख्या सर्वाधिक आहे. भारतामध्ये ओबीसी समाज 3743 जातीत विभागलेला आहे. महाराष्ट्रात साडेतीनशे पेक्षा जास्त जाती या समाजामध्ये येतात.पण ते सर्व गर्वसे कहो हम म्हणतात आणि दुसऱ्यांची रोजगार हमी योजना राबवितात. स्वतःचे काय?.ओबीसीची दशा आणि दिशा त्यांना दिसत नाही?.
   ओबीसी समाज हा मूळचा कुशल कारागीर निर्माणकर्ता समाज होता. ओबीसी हा बारा बलुतेदार अठरा अलुतेदारांचा समाज आहे. ओबीसी समाजाचे पूर्वी स्वतःचे असे परंपरागत व्यवसाय होते. त्यांचे व्यवसाय यांत्रिकीकरणामुळे,औद्योगिकरणामुळे हिराऊन घेतल्या गेले. ओबीसी अखंड समाज बेकार झाला. औद्योगिक क्रांतीमुळे जवळजवळ या समाजाची गरज संपली. या लोकांवर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे कुशल कारागीर असलेला हा समाज बेरोजगार झाला, त्यांचा असंघटित मजूर,कामगार झाला,तो मिळेल ते काम संघर्ष करून जीवन जगत आहे. त्यामुळेच ओबीसी समाजाची सर्व क्षेत्रात लक्षवेधी संख्या असूनही त्यांची रीतसर नोंद नाही. त्याला स्वताला ओबीसीची दशा आणि दिशा काय हेच माहिती नाही.रायगड कुलाबा जिल्ह्यातील आगरी कोळी भंडारी समाजाच्या शेतजमिनी सरकारने घेऊन उधोग धंद्यांना दिल्या त्या विरोधात दि.बा पाटील यांनी प्रचंड संघर्ष केला म्हणून त्या भागात साडेबारा टक्के जमीन व रोजगार गेलेल्या कुटुंबांना नुकसानभरपाई कायदानुसार मिळते.त्याचा पद्धतीने ओबीसी समाजातील अनेक घटकांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्याची आवश्यकता होती.पण दि बा पाटील सारखे नेतृत्व कुंभार,लोहार,सुतार समाजाला मिळाले नाही.म्हणूनच त्यांच्या पोटावर लाथ मारून किलोस्कर,गरवारे,जिंदाल सारखे उच्चवर्णीय भांडवलदार पुढे आले.त्यामुळे एकेकाळचे कुशल कारागीर आज खरेदीच्या निमित्ताने आपण जेव्हा बाजारात जातो. तेव्हा मोठ्या दुकानांमध्ये आपलेच ओबीसी बांधव मारवाडी,जैन लोकांच्या हाताखाली काम करताना दिसतात. तेव्हा खूपच वाईट वाटतं. बारीकसारीक चुका झाल्यास मालक या लोकांवर ओरडतात. तेव्हा असं वाटतं की, या लोकांनी का असं जीवन पत्करले असेल. 
महाराष्ट्रात नव्हे तर देशात बहुसंख्य असलेला ओबीसी समाज एकजूट नसल्यामुळेच लाचार,गुलाम म्हणून सर्व सहन करतो. म्हणून त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. ५२ टक्के असलेला ओबीसी राजकीय दृष्ट्या जागृत झाला तर राज्यात,केंद्रात तो सत्ताधारी होऊ शकतो. तो संघटित झाला तर इतर भटक्या विमुक्त जाती जमाती,आदिवासी, अल्पसंख्याक त्यांच्या सोबत मोठा भाऊ म्हणून जोडला जाऊ शकतो.ओबीसीची दशा आणि दिशा बदलू शकतो,ओबीसी समाजातील प्रत्येक घटक हा समाज बनलेला आहे. परंतु साठ टक्के असलेला ओबीसी समाज अजूनही समाज बनलेला नाही. समाज म्हणजे एक असा समूह जो की एकमेकांचे दुःख, हित समजू शकतो तो समाज !! जसा पूर्वी बारा बलुतेदार अलुतेदार एकजीव होता.तो सर्व दृष्टीने एक दुसऱ्याशी जिव्हाळ्याने सामाजिक बांधिलकी म्हणूनच जोडला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारखे दूरदृष्टी ठेवणारा नेता मिळाल्यामुळे महार समाज समाज बनला. तो राजकारणामध्ये मागासवर्गीयाचा एक दबावगट बनलेला आहे. आपल्या हक्क अधिकारासाठी मागासवर्गीय बांधव जागृत आहेत. एका मागासवर्गीयावर अन्याय झाल्यास दुसरा मागासवर्गीय अन्यायाला वाचा फोडतो. त्यासाठी तो किती ही मतभेद असले तरी संघर्ष करण्यासाठी एकत्र येतो. परंतु एका ओबीसी शेतकऱ्याने आत्महत्या केली तर दुसऱ्या भागातील ओबीसी शेतकरी त्याविरुद्ध आवाज उठवत नाही. ही आपली शोकांतिका आहे. जर आपण ओबीसी समाजाने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार स्वीकारला असता तर ओबीसी समाज कधीच समाज बनलेला असता. आपण किती नतद्रष्ट आहोत ज्या  समाजात महात्मा जोतीराव फुलेंचा जन्म झाला होता. त्याच लोकांनी महात्मा फुलेंना बहिष्कृत केले होते. आजही आपण त्यांना पूर्णपणे स्वीकारले नाही. कारण त्यांचा विचार स्वीकारला असता तर ओबीसीची अशी दशा झाली नसती.तर तो देशाला दिशा दाखवणाऱ्या चळवळीचे नेतृत्व करणारा असता.मंडल आयोगाने अनेक राजकीय नेते दिले आहेत. त्यांना विसरता येणार नाही.
आजही आपला ओबीसी समाज महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो घरात लावतो. दुसरीकडे गणपती साईबाबा,गजानन महाराज आणि तिसरीकडे सत्यनारायण घालतो. एक प्रकारे आपण ओबीसी त्यांच्या विचारांची माती करत आहोत. आजही ओबीसी समाज जुन्या परंपरा रितीरिवाज,कर्मकांड,खुळचट कल्पना यांचे वाहक आहेत. महात्मा फुलेनी ज्याप्रमाणे धर्मव्यवस्था नाकारली व जातीव्यवस्था ठोकरली त्या प्रमाणे आपण महात्मा फुले यांचा विचार संपूर्णपणे स्वीकारण्याची आवश्यकता आहे. एवढा मोठा महात्मा आपल्या जातीत जन्माला याचा तरी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.असं आता म्हणावं लागतंय ! महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतात अस एकही दाम्पत्य नाही ज्यानी एकमेकांच्या सोबत राहून समाजकार्य,समाजक्रांती,प्रबोधन केले. त्यांचा आदर्श ओबीसी तरुणांना नाही कारण त्यांच्या आईवडीलानी तो घेतला नाही, तर तरुण पिढी कशी घेईल?.
   महात्मा फुलेंनी गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. शेतकऱ्याचा आसूड लिहून शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.शेतकऱ्यांचा मोर्चा काढला,नाव्ह्याचा संप घडविला. महात्मा फुले यांचा विचार स्विकारल्या शिवाय एकमय राष्ट्र निर्माण होणार नाही.ओबीसी समाजाला सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक,शोषणाविरुद्ध जागृत चळवळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्याचा मागोवा घेऊन एकजुटीने लढण्याची गरज आहे. समुहभान निर्माण करून सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज जागृत झाला पाहिजे. आपल्या अस्मितेसाठी ओबीसी ने लढा उभारला पाहिजे. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, ओबीसी जनगणनेच्या तुलनेत बजेटची तरतूद करणे,ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अल्प आहे, ओबीसी समाजाचे लोकसंख्येच्या मानाने शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, खाजगीकरणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ओबीसीने खाजगी आरक्षणाची मागणी करावी, जागतिकीकरणामुळे पारंपारिक व्यवसाय नष्ट होत आहेत, त्यासाठी ओबीसींना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे.या गोष्टीसाठी ओबीसी समाजाने सरकारकडून निधी उपलब्ध करून घेणे. या सर्व मागण्या म्हणजे ओबीसी समाजाचा हक्क, अधिकार आहे.जो संविधानिक आहे जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमान्वये दिलेला आहे. सर्व राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार ओबीसीनां वापरतात. प्रथम ते थांबले पाहिजे. तरच ओबीसीची दशा आणि दिशा बदली होऊ शकते.
    ग्रामीण तसेच शहरी भागातील ओबीसी महिलांची फरपट थांबली पाहिजे. त्यांचा सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचावला पाहिजे. भारतीय संविधानाने दिलेल्या हक्काविषयी महिलांनीही जागरूक व्हावे. आर्थिक स्वावलंबन साधावे.ओबीसी समाजाची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शिक्षण,आरोग्य,रोजगार,यात पुरेश्या योजना राबवण्यात अडथळा येतो असे सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी ओबीसी जनगणना करण्यात यावी. तर ओबीसी चे सर्व प्रश्न सुटतील. प्राण्यांची गुराढोरांची गिनती होते, आम्ही तर माणस आहोत. आमची गिनती झाली पाहिजे. ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व मिळावे व शिक्षण, आरोग्य, रोजगार मिळावा यासाठी सर्व ओबीसी समाजाने जागृत होणे व त्यासाठी योजना आखणे गरजेचे आहे. ओबीसी जनगणना झाली पाहिजे! यासाठी आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मागितल्याने मिळत नाही संघर्षाला पर्याय नाही. या मूलमंत्राचा आपण अंगीकार करून वाटचाल करावी. असे माझे सर्व ओबीसी बंधू-भगिनींना आवाहन आहे.ओबीसीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी वैचारिक आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणे आवश्यक आहे, तुमचे उदिष्ट ध्येय निश्चित असतील तरच यशस्वी वाटचाल होऊ शकते.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.