जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा.
जगातील प्रत्येक माणसांचे समाजाचे,त्यांच्या चळवळीचे जगण्याचे एक तत्व असते.त्यालाच आपण जीवनशैली म्हणतो.माणसात आणि पक्षात ही जगण्याची वेगवेगळी शैली असते.गरुड व कबुतर दोघांना ही पंख असतात.पण गगनभरारीचं वेड कबुतराला गरुडा सारखे पंख असतांना ही नसणार.कारण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं.त्यासाठी आकाशात गगनभरारी घेण्याची हिंमत आकाशाने दिली असते.सर्वच पक्षांना आकाशात गगनभरारी घेता येत नाही.ती फक्त गरुडत असते.सर्वच माणस सारखी असतात.ती सर्वच डॉक्टर बनत नाही.किंवा प्राध्यापक वकील,इंजिनियर,नेता,अभिनेता बनत नाही.प्रत्येकाच्या शिक्षण घेण्याच्या वयातील जिवन संघर्ष हा वेगवेगळा असतो.तोच त्याच्या एकूण जिवनातील संघर्षाची मर्यादा ठरवून देतो.पुढे आपल्यावर अवलंबून आहे कि जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत?. करावा.
परिस्थिती दरवषी बदलत राहते.काल कधी कुणासाठी थांबत नाही. प्रत्येक काळातील संकटाशी झुंज द्यावी लागते.त्याच्याशी जो लढतो तो टिकतो.निसर्गाच्या नियमानुसार वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
आपल्या जीवनावर किती परिणाम करून घेऊन जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हे आपणच ठरविले पाहिजे.करोना आला आणि गेला तरी तिसऱ्या लाटेची भिती आज ही कायम आहे.रोजगार,व्यवसाय आणि सुरक्षित नोकरी सर्वच बदलून गेले.पण संघर्ष सुरूच आहे.म्हणूनच जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हे आपणच ठरविले पाहिजे.आहे त्यात समाधान मानून जगण्यास शिकले पाहिजे.
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत त्याचा सगळा संघर्ष गृहीत धरला असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे.समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर जीव घेणा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते. त्यात आपण किती समाधानी असावे हे आपणच ठरविले पाहिजे.जे आहे त्याचा आनंद न घेता जे नाही त्याचे दुख करत बसल्यास जिवनातील संघर्ष कधीच थांबणार नाही. मग आपल्या जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हे कोण ठरविणार?.
डॉक्टर,प्राध्यापक,वकील,इंजिनियर,नेता,अभिनेता,शेतकरी प्रत्येक महिन्याच्या तारखेवर लक्ष ठेऊन त्यावर पेनाने चौकोन बनवून ठेवत असतो.ते त्याचे उधिष्ट असत. कॅलेंडर भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.ते कशासाठी जगतात आणि कशासाठी खातात हेच त्यांना माहिती नसते.म्हणूनच जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हे त्यांनाच माहिती नसते.
व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर गाठायचे त्यांनी ठरविले असते.ते पूर्ण करण्यासठी संघर्ष असतो तरी तो परिपूर्ण होत नसतो.जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. निसर्गाने सोनं निर्माण केलं.चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला?. अपुर्णतेतही काही मजा आहेच की.सोने सुखत नाही आणि सुगंध ही देत नाही.तरी त्यांची किंमत कमी न होता वाढत जाते.चाफा काही काल सुंगध देतो आणि संपून जातो.असेच माणसांच्या जीवनाचे आहे.चांगले कुशल कर्म चाप्याच्या फुला सारखा सुंगध देत राहणार आणि केलेलं काम सोन्यासारखे कायम लक्षात राहील त्याची किंमत कधीच कमी होणार नाही.त्यासाठी जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत आणि कशासाठी करावा ठरविले पाहिजे.
माणूस हा दगड सारखा असतो.जसा घडविला तसा घडतो.दगड हा खाणीतून आणतात त्यावर शनी हातोड्याने घाव घालून नको असलेला भाग तोडून टाकतात.मगच त्याला आकार नांव रूप दिल्या जाते तेव्हा ती मूर्ती बनते.दगडात मूर्ती असते असे कोणी म्हटले तर पटत नाही.पण जेव्हा नको असलेला भाग दगडातुन काढून टाकला तर शेवटी मूर्ती असते. निसर्गाने प्रत्येक माणसांना हे कला कौशल्य दिले असतेच असे नाही.त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो.त्याचाकडे जाती धर्माच्या नजरेतून पाहिले नाही तर ती प्रेरणादायी कलाकौशल्य असते. मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे,नद्या,वारे,आकाश,जमीन,पक्षी,प्राणी आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. म्हणजेच जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हे शिकता येईल.
जगात समस्या कुणाला नसतात? ते शेवट पर्यंत सर्वांनाच असतात. पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच.ते सोडवायला थोडा वेळ हवा असतो.कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडच्या समस्या अस्थित्वात नसतात.समस्या कसा सोडविल्या पाहिजे यांची माहिती असणे गरजेचे असते ते सोडविण्यासाठी तज्ञाची निर्मिती झाली असते.
समोरच्याच्या दुःखाचे समाधान समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.
अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा लागतो.
आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.सेवा निवृत्ती नंतर कसे जगावे यांचे तज्ञानी दिलेल्या मार्गदर्शनाचे हे छोटे छोटे उदाहरणे आहेत.जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हे कोण ठरविणार.
उत्पन्न जसे असेल त्या हिशेबाने खर्च करा.तरच खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.पळू नका प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.म्हणूनच जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हे ठरविले पाहिजे
समस्या सोडवता सोडवता अनेक चुका होतात.त्यावेळी माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.जगात कोणताही माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते. तेव्हाच त्याला जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा हेच समजत नाही.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा