एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून द्या.
सुशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी इतर असंघटित कष्टकरी कामगार, शेतमजूर समाजासाठी काम करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना चोर,एजंट, वसुली करणारा असे दूषणे लावू नये.कारण तो कोणतीही अपेक्षा ठेऊन काम करीत नाही. ती खरा बिन पगारी फुल अधिकारी समाजासाठी असतो, अन्याय,अत्याचार झाला तर प्रथम तोच आवाज उचलतो,पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना जाब विचारतो. उच्च शिक्षित सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यां कर्मचारी अधिकारी वर्गात ही हिंमत कधीच नसते. शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळाले म्हणूनच त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला. म्हणजे त्याचे सर्वच प्रश्न निकाली निघाले. हा समज कर्मचारी अधिकारी वर्गाचा दृष्टिकोन त्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतो?.
सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी हा आंबेडकरी विचारधारेशी कधीच प्रामाणिक राहिला नाही, नोकरीत असतांना तो आंबेडकरी विचारधारेच्या विरोधी युनियनचा आर्थिक पाठबळ देणारा वार्षिक वर्गणीदार सभासद असतो. तसाच तो निवडणूकीच्या वेळी आंबेडकरी विचारांच्या पक्षाच्या गरीब उमेदवारांना मत न देता हिंदुत्ववादी विषमतावादी विचारांच्या उमेदवाराला मतदान प्रत्येक निवडणूक मध्ये करतो.
आंबेडकरवादी विचारधारेला आपली मते देऊन आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्याऐवजी मनुवादी विचारांच्या पक्षाला मते देऊन त्यांची राजकीय शक्ती मजबूत करतो.अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर एकत्र येऊ शकतील, पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जीवंत बेडकांचं तराजूत वजन करण्यासारखं आहे. दुस-याला तराजूत टाकेपर्यंत पहिला उडी मारुन पळून जातो. कारण यातील प्रत्येक जण स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो.तो पक्का स्वार्थी मतलबी झालेला असतो.तो समाज आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना नेहमीच कमी लेखतो.त्यामुळेच तो ज्या पदावर बसलेला असतो तेव्हा तो मनुवादी विषमतावादी विचाराचा विचार करुन आचरण करतो म्हणूनच तो गोगारीबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मानाची वागणूक न देता तुच्छ पणे वागतो.मात्र तोहे विसरतो कि तो जी सुरक्षित नोकरी करतो ते याच असंघटीत कष्टकरी लोकांनी केलेल्या आंदोलना मुळे मिळाली आहे.
शिक्षणाची व नोकरीची संधी मिळाली ती यांच समाजच्या घाम गाळल्याने.तशीच राजकीय सत्ता हवी असेल तर त्यासाठी गोरगरिबांच्या घरा घरात जाऊन न बिकनेवाला मतदार बनवावा लागेल.कोणती सत्ता हवेतून मिळत नाही,सत्तेसाठी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक आणि आर्थिक दुष्ट्या सामाजिक बांधिलकी निर्माण करावी लागते. रोजगार,आरोग्य आणि शिक्षण ज्यांचं ताब्यात आहे ते सर्वच पक्षातील धन दांडगे,जात दांडगे आहेत.त्यांचं विरोधात जाऊन मतदान करणे म्हणजेच कुटुंबाचा व समाजाचा सत्यानाश करणे होय.याची जाणीव गोर गरीब कष्टकरी मजुरांना आहे.म्हणूनच तो खेडे सोडून शहरात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जात असतो. मान्यवर कांशीराम यांनी उतर भारतात प्रथम न विकणारा समाज बनविला म्हणूनच मायावती चारवेळा मुख्यमंत्री होऊ शकल्या.हाच प्रयोग महाराष्ट्रात श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी करण्यास सुरुवात केली.मान्यताप्राप्त चारीही राजकीय पक्षाना घाम फोडला.याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण झालेच पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचा विधानसभेतील निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असला तरी तो बहुजन समाजाला प्रेरणादायी होता.प्रत्येक मतदारसंघातील मतदान संख्याबळाने लोकप्रतिनिधी निवडून येणारा होता. गेल्या वेळी देगलूर-बिलोली मध्ये वंचित बहुजन आघाडीला तीस हजार मते मिळाली होती.मग पोट निवडणुकीत लाखोंच्या जाहीर सभा होऊन मतदान कमी कसे झाले?. हा संशोधनाचा विषय आहे.पक्ष संघटना बांधणीत दहा हजार पदाधिकारी पकडले तर प्रत्येक कुटुंबात चार किंवा पाच मतदार असतात.या हिशेबाने चाळीस पन्नास हजार मतदार हे हक्काचे होतात.इतर बहुजन हितचिंतक पकडले तर आकडा लक्षवेधी असला पाहिजे होता.परंतु तो केवळ एकरा हजार वर आला म्हणजेच गद्दार घरात भरपूर आहेत.हे सिद्ध होते.हक्काची घरची मते शाबूत ठेवण्यात क्रांतिकारी विचारांचा आंबेडकरवादी माणूस अपयशी का ठरतो.यांचे सत्य वास्तव समजून घ्यावे लागेल.
ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक यांच्याकडे मत मागण्या पूर्वी आपली स्वतःची राजकीय ताकद निर्माण झाल्याशिवाय इतरांची मते मिळणार नाहीत.हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकर करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.त्यासाठी आपल्या वस्तीतील गद्दार,चमचे तितर पक्षी शोधून ठेचून काढले पाहिजेत.शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष बांधणी झाली पाहिजे.एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती संपविल्या शिवाय समाजात संघ शक्ती निर्माण होणार नाही.
सुरक्षित नोकरी करणारा कामगार कर्मचारी आणि अधिकारी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियन चा सभासद होत नाही.विषमतावादी विचारांच्या ट्रेड युनियन चा सभासद असल्यामुळे पदोन्नती मधील आरक्षण जवळ जवळ संपल्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच नोकरीतील आरक्षण संपल्यात जमा झाले आहे.त्याला सरकार नाही तर बहुसंख्य आरक्षणाचे लाभार्थी जबाबदार आहेत.राजकीय पक्षात जशी स्पर्धा आहे तशीच इथे ही कामगार चळवळीतील एक ना धड भारा भर चिंद्या ही मनोवृत्ती जबाबदार आहे.कामगार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात स्वार्थीपणाची मनोवृती असल्यामुळेच बहुसंख्ये बहुजन कामगार कर्मचारी अधिकारी समाजात असून ही ते चळवळीच्या कामाचे नाहीत.त्यामुळेच आपण ८५ टक्के असून ही अपयशी ठरतो.
सोशल मिडीयावर बहुमत असून ही कशी त्याची हार होते.त्याचे उत्तम उदाहरण चर्चेत आहे. एका वसतीगृहामध्ये उपमा रोज १०० विद्यार्थ्यांना दिला जायचा. १०० विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थ्यांनी उपमा नको म्हणून विरोध केला व दररोज वेगवेगळे टिफिन देण्याची तक्रार केली. पण,रोज २० विद्यार्थ्यांना उपमा खायला आनंद व्हायचा.८० विद्यार्थ्यांना उपमा वगळता दुसरे काहीतरी हवे होते.नेहमीच मुलांच्या तक्रारी येत असल्यामुळे सर्वांच्या आवडीचा पदार्थ देण्याचे ठरवले मग वॉर्डनने मतदानाची व्यवस्था केली. ज्या पदार्थाला बहुमत प्राप्त होईल, तो नाश्ता देण्याचे ठरविण्यात आले.उपमा हव्या असलेल्या २० विद्यार्थ्यांनी उपमाच हवा म्हणून तातडीने मतदान केले. उर्वरित ८० विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार मतदान केले.
पदार्थानुसार मतदान असे झाले.
१८ %: मसाला डोसा,१६%: आलू पराठा आणि दही,१४ %: रोटी आणि सबजी,१२ %: ब्रेड आणि बटर,१० %: नूडल्स,१० %: इडली सांबार, २० %:उपमा वरील प्रमाणे मुलांनी मतदान केले.याचा परीणाम असा झाला कि,मतदानाच्या पद्धतीनुसार आणि बहुमतानुसार, उपमाच सुरू ठेवण्यात आला.यातुन आपण कोणता धडा घेणार आहोत. जोपर्यंत ८० % लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली राहील, २० % लोक ८० % वर राज्य करतील.हाच ओबीसी,एस सी,एस टी,आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाज ८५ टक्के असूनही असाच विभागला जातो.सर्वच एकमेकांना दोषी ठरवतात.पण कोणत्या नियमाचे पालन करून एकसंघ बनत नाही.म्हणूनच एक ना धड भारा भर चिंद्या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांच्या आपण कळत नकळत करत असतो आणि दोष मात्र मनुवादी विषमतावादी विचारधारेला देत असतो.हे कुठे तरी कडक कारवाई शिस्तबद्ध होऊन थांबली पाहिजे तरच येणारा काळ चांगला असेल अन्यता वर्णव्यवस्था दूर नाही.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा