बुधवार, १९ जानेवारी, २०२२

नामांतराचा स्मृतिदिन कि जयंती दिन साजरा करणार?.

 

नंतर करू म्हणता म्हणता सेवानिवृत्त झालो.

 नंतर करू म्हणता म्हणता सेवानिवृत्त झालो.



संघटीत असंघटीत कामगार कर्मचारी अधिकारी यांना वयाचे साठ वर्ष पूर्ण झाले की सेवानिवृत्त होवावे लागते.शेतकरी,शेतमजूर व व्यापारी यांचे ही वय वाढत गेल्या तरी त्यांना सेवानिवृत्त होता येत नाही.पण म्हातारपण आले म्हणून काम करणे जमत नाही. निसर्गाच्या नियमानुसार वय झाले कि शारीरीक ताकद कमी होते.अनेक रोगाने शरीरात प्रवेश केला असतो तो कधी शरीरात गेला हे कळत नाही.दुखल्यावर निधान, तपासणी केली तर त्या रोगाला नांव दिल्या जाते. 
सेवानिवृत्तीच्या एक वर्षा अगोदर कर्मचारी अधिकारी यांना सामाजिक,आर्थिक आणि शारीरिक कौटुंबिक संकटांना सामोरे कसे जावे यांची तज्ञा कडून माहिती दिल्या जाते.इतर ठिकाणची मला माहिती नाही.पण टाटा पॉवर कंपनीच्या टाटा उद्योग समूहाच्या सर्व कंपन्यातील कामगार,कर्मचारी अधिकारी यांना व्यवस्थापन मानसिक तणावाचे आजच्या या धावपळीच्या व धकधकीच्या जीवनात तणाव अपरिहार्य आहे. अशा तणावाचे व्यवस्थापन कसे करावे ?ह्या बद्दल मुंबईचे प्रसिद्ध Soft Skills Trainer & Psychologist श्री निलेश मंडलेचा,प्रज्ञा मंडलेचा खूप खेळीमेळीच्या वातावरणात दोन तीन दिवसाचे वैचारिक क्रांतिकारी प्रबोधन करतात.ते प्रत्येक कामगार कर्मचारी अधिकारी जे माणसात मोडतात त्या सर्वांसाठी उपयोगाचे असते. नोकरी करून सेवा निवृत्त होणे म्हणजेच म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे. आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे हे काळाची गरज आणि  आवश्यकता आहे, यानिमित्याने काय करायला पाहिजे,
वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे तज्ञ करीत असतात. बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहित नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते.
वयाची ६० वर्षे उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यस्त, वाट्साप फेसबुक बोलण्यासाठी त्यांचं कडे वेळ असेल.पण तुमच्या जवळ बसून गप्पागोष्टी करण्यासठी वेळ नसेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.त्यासाठी अगोदरच आवडत्या क्षेत्रातील सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि वैचारिक संस्था संघटनेत सहभागी होऊन क्रियाशील रहा.
माणसाच्या उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
प्रत्येक माणसांचे वय झाल्यावर पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा असतो. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्या बरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात राहू नका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.त्यासाठी समाजात समाजासोबत राहणे तेवढेच आवश्यक आहे.
एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे,पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी पत्नी.मुलगा,मुलगी,सून असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका 'nursing staff' वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? ती वेतना पुरते चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने,कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.त्यासाठी सकारत्मक विचारांची उर्जा मिळवत रहा.
माणसांच्या जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही,मग खऱ्या अर्थाने एकटे पडणार.म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.
शेवटची घटिका येण्यापूर्वी,आयुष्यातील संधीकालात,आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका व तसे इतरांना दाखवू पण नका. उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल. आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील प्रवास हसतमुखाने करा.सकारत्मक विचार करत इतरांना सकारत्मक विचाराने प्रेरित करा.
निसर्गाच्या नियमानुसार शेवटचे दिवस सुरु झाले. आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.काल सोमवार होता असे वाटत होते आणि आज शुक्रवार आला सुद्धा.महिना संपत आला,वर्ष संपायला आले, आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही.आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय,मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे?
चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही. आपल्या आयुष्यात रंग भरुया,छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया. हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया.उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे.तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका.हे नंतर करेन हे नंतर सांगीन यावर नंतर विचार करेन 'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे.कारण, आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यानंतर प्राधान्य बदलल्यानंतर उत्साह निघून गेल्यानंतर.आरोग्य बिघडल्यानंतर.मुले वयात आल्यानंतर.आई-वडील म्हातारे झाल्यानंतर.आश्वासन न पाळल्यानंतर.दिवसाची रात्र झाल्यानंतर.आयुष्य संपल्यानंतर.आणि ह्या सगळ्या 'नंतर' नंतर आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की... म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका. 'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.म्हणूनच जे करायचे ते चांगले कार्य वेळेवर करा.सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि वैचारिक संस्था संघटनेत सहभागी होऊन क्रियाशील रहा कधीच कधीच एकटे पडणार नाही. म्हणजेच आरोग्य संपन्न व आनंदी राहणार आणि इतरांना ठेवणार ती उर्जा तुमच्यात असेल. तुम्ही कधीच म्हणणार नाही.मी सेवा निवृत्त झालो म्हणून.आणि नंतर नंतर नंतर करू म्हणता म्हणता सेवानिवृत्त झालो.असे ही म्हणणार नाहीच!.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा.

 समाजाच्या चळवळीत ओळख निर्माण करून मरा.



सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे माध्यम वर्गीय लोक स्वताला जास्त शहाणे आणि पैसेवाले समजतात.ज्या गावातून जन्म शिक्षण घेऊन इथ पर्यंत पोचले तो संघर्ष सोयीनुसार विसरतात.त्यांना समाजाशी चळवळीशी काही घेणेदेणे नसते. त्यामुळेच ते मेल्या नंतर त्यांच्या कुटुंब व कार्यालयातील लोकांना जास्तीत जास्त आठ दिवस दुख होते. नंतर सर्वच विसरून जातात.कारण त्यांचा आदर्श नोकरी गाडी, प्लॉट,सुंदर साडीतील बायको एवढाच असतो.म्हणूनच त्यांना सोसायटी व कार्यालया बाहेर कोणी ओळखत नाही.पण ज्यांचा आदर्श तथागत गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव गायकवाड,कर्मवीर भाऊराव पाटील,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज.या राष्ट्रसंत महामानव यांचा वैचारिक वारसा असतो. तो सामाजिक बांधिलकी म्हणून अपोआप चळवळीशी जोडल्या जातो .कारण यांनी पैसे कमविण्यासाठी कधीच काम केले नाही.ह्या लोकांनी कधी घरादाराचा, परिवाराचा,नातेवाईकांचा जास्त विचार केला नाही.म्हणूनच ते आज कितीही वर्ष झाले आपल्यातून शरीराने गेले तरी विचारामुळे कामामुळे आजही आपल्या समोर असतात. त्यांना विसरून आपण कोणते ही काम करू शकत नाही.म्हणूनच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजाच्या चळवळीत स्वताची ओळख प्रत्येक माणसांनी निर्माण करावी.
राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढला असता पण राजसुखाचा त्याग करून राजघराणे का बरं सोडले असावे?. त्यांना स्वतःच्या परिवाराबद्दल प्रेम,आपुलकी नव्हती का?. पण सिद्धार्थ राजघराण्याच्या मोहात असते तर कदाचित इंग्लडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या १० हजार वर्षातील आणि जगातील १०० टॉप महामानवाच्या यादीत प्रथम स्थानावर सिद्धार्थापासून तयार झालेले "गौतम बुद्ध" आम्हाला दिसले नसते. राजसुखाचा लाभ घेतला असता तर जगाला विज्ञानवादी बौद्ध धम्म दिला नसता. २५०० वर्षाचा काळ लोटला तरी आजही संपूर्ण जग त्यांच्या विचारांवर चालत आहे.याला म्हणतात ओळख.त्याग,कष्ट जीद्धीने ती मिळविता येते.
मूठभर मावळे घेऊन महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करणारे हृद्यसम्राट कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या परिवारात गुंतले होते का?. परिवाराच्या अडचणी सोडवत बसले का?. नाही, कारण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आपल्या राज्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यामुळेच जगात महाराजांचे नाव अभिमानाने घेतले जाते. आज करोडो मावळे महाराजांच्या कार्यावर स्तुतीसुमने वाहतांना थकत नाही.."शिवाजी महाराज की" म्हटल्याबरोबर 'जय' हा शब्द आपोआपच मुखात येतो कारण महाराजांचे कार्य हे समाजाच्या कल्याणासाठी होते. म्हणूनच आज आमचे ते आदर्श आहेत.संधी साधू राजकीय सैनिकांचे नाही.
स्त्री शिक्षणाची दारे उघडे करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना गोविंदरावाने घराबाहेर काढले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वाटत नव्हते का?.की आपल्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी नाही मग आपण समाजासाठी कशाला वेळ द्यायचा. पण नाही, जर त्यावेळी त्यांनी तसा स्वार्थी विचार केला असता तर आज दीडशे वर्षानंतर ते आमचे आदर्श झाले नसते. "चूल आणि मूल" या कचाट्यातुन महिला बाहेर पडून प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या अस्तित्वाचा पताका फडकविला नसता. त्यांच्या नावाने चळवळी सुरु झाल्या नसत्या पण आज अभिमानाने त्यांचे नाव घेतले जाते कारण ते घरादाराच्या बंधनापासून अलिप्त होते. 
बाबासाहेब विदेशात शिक्षण घेत असतांना त्यांचा मुलगा मरण पावला पण बाबासाहेब घरी आलेच नाही. का?. त्यांना वाटले नसेल का की माझा मुलगा मरण पावला, पत्नी एकटीच घरी आहे. तिला जाऊन आधार द्यावा. पण बाबासाहेबांनी त्या दुःखी प्रसंगी आपल्या परिवाराचा विचार केला नाही तर समाजाचा विचार केला म्हणून आज ते आमच्या हृदयावर आजही अधिराज्य गाजवित आहेत. आणि हो आमच्या माय-बापाने तर फक्त आम्हाला जन्म दिला. पण खरे उपकार बाबासाहेबांच्या त्यागाचे, संघर्षाचे आणि कष्टाचे आमच्यावर आहेत.कारण आमच्या हक्कासाठी स्वतःच्या परिवारातील लोकांचा विचार न करता. त्यांनी समाजातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाईट रूढी,परंपरेला मातीत गाडून आम्हाला स्वातंत्र्याची चव चाखायला दिली.म्हणूनच ते आमचे आदर्श आहेत.दिवसभर गावातील कचरा साफ करून रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायचे, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा एकदा कीर्तन करत असतांना त्यांना त्यांच्या मुलाच्या निधनाची वार्ता सांगितली पण मुलाच्या निधनाची वार्ता ऐकताच रडत न बसता गाडगेबाबा म्हणतात, "असे गेले कोट्यान कोटी कशाला रडू मी एकट्यासाठी". त्यावेळी कीर्तन जाऊदे म्हणून गाडगेबाबा घरी गेले असते तर अशिक्षित असलेल्या गाडगे महाराज यांचे नाव आज अमरावती विद्यापीठाला मिळाले असते काय?. 
 सुशिक्षित असो की अशिक्षित, संघटीत कामगार कर्मचारी अधिकारी असो की असंघटीत कामगार,मजूर सर्वांना या महापुरुषांचे नाव आणि त्यांचे कार्य आम्हाला का माहित आहेत. कारण ते कधीही स्वतःपुरते आणि घरापुरते विचार न करता समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी त्याग केला,कष्ट घेतले आणि जिद्द ठेवली म्हणूनच अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्याच पुण्याईने आम्ही आज सन्मानाचे जीवन जगत आहोत. त्यांच्याच विचाराचा प्रभाव आमच्यावर पडला आहे. म्हणूनच आम्ही खूप पुढे गेलो आहोत.आम्ही त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे पूर्णपणे आचरण केले तर आम्ही जागतिक पातळीवर जोडल्या जाऊ शकतो.
तुम्हाला साधा प्रश्न केला की तुमच्या वडिलांच्या वडिलांचे नांव काय आहे?. तर डोके खाजवायला लागते.सरळ नाही म्हणता येत नाही. तुम्हाला तुमच्या पिढीमधील लोकांचे नाव माहित नाही पण २५०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तीचे नुसते नावच माहित नाही तर त्यांचे विचार आणि शिकवण आजही तुमच्या डोळ्यासमोर आदर्श निर्माण करून आचरण करायला लावते.कारण हीच तर क्रांतिकारी विचारांची चळवळ आहे.त्यात आपण जोडल्या गेलो तर आपले ही असेच इतिहासात नांव नोंदविल्या जाईल.आपल्याला ज्याची आवड आहे त्या क्षेत्रातील चळवळीत सहभागी व्हा.
विचार करा कर्मचारी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाला तर तुमची कोण किती दिवस आठवण ठेवील?. तुम्हाला वडिलांच्या वडिलांचे आज्याचे नांव,गांव,काम माहित नाही.कारण ते घराच्या बंधनातून कधी बाहेर पडले नाहीत पण आमचे महापुरुष हे स्वतःच्या परिवाराचा विचार न करता समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले तेच आज आमचे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत आणि राहणारच. म्हणून घर सोडून समाजाच्या चळवळीत स्वताची ओळख त्याग,कष्ट आणि जिद्धीने काम करून निर्माण करा.घरात कोणत्या तरी बिमारीने मरण्यापेक्षा समाजाच्या चळवळीत कायम पुढाकार घेऊन.रचनात्मक काम करतांना संघटीत संघर्षाचे साक्षीदार होऊन कायम आठवणीत रहा.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

माणसांने सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवावे.

 माणसांने सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवावे.



कोरीनाची तिसरी लाट प्रत्येक माणसांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे.म्हणूनच कोरोनाची काळजी करू नका!.स्वताची आणि कुटुंबाची काळजी घ्या. काळजी करू नका आणि काळजी घ्या यातील शब्दाचा अर्थ समजला तर आनंदात जगू शकता.आणि अर्थ समजला नाही तर चिंतेने भीतीने जगण्याची हिंमत हारून लवकरच कोरोना गस्त रुग्ण बनून जाणार. कारण माणसांचे मन खुप विचित्र असते.ते कधीच समाधानी नसते. 
चांगल्या पगाराची उच्च पदस्थ नोकरी, कार्यालयात मान सन्मान नेहमीच आदेश देण्याची सवय मी दिलेला निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असे वागणे. अधिकारी असल्यामुळे सर्व कार्यालयीन कामगार कर्मचारी माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत यांचा कायम गर्व असतो. त्यामुळेच माझे मन कार्यालयात प्रसन्न असते.त्यांचे समाधान घरी गेल्यावर संपते.कारण मी घरात प्रवेश केला की मी आदेश देणारा अधिकारी नसतो. कुटुंबातील एक सदस्य होतो. हा सकारात्मक विचार माणसांनी केला तर  आनंदात जगता येते. तसेच प्रत्येक माणसाने कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवले तर सर्वच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.
कोरोना लॉक डाऊन ची भिती प्रत्येक माणसांना आहे.त्यामुळेच आज काल प्रसन्न मनाने घरी जाणार कामगार,कर्मचारी,अधिकारी जातांना दिसत नाही. लवकर घरी जाण्याची इच्छा मेलेली आहे.चांगला टू बी एच के प्लॉट आहे,टू व्हीलर,फोर व्हीलर गाडी आहे.आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. तरी घरी जाऊन बायको मुलामुलींच्या सहवासात राहण्याची व्यवस्था राहिली नाही. घरात कोणी ही पाहिजे त्याप्रमाणात सुखी नाही. 
कोरोना लॉक डाऊनच्या आठवणी दुःख,वेदना,चिंता काही प्रमाणात मनात घर करून ठेवल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी सकारात्मक विचारांचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
शारीरिक वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! मानसिकता वेदना देणाऱ्या घटना मनातुन काढून टाकल्या तर चिंता पाठलाग करत नाही. त्यासाठी भुतकाळात घुटमळणे बंद केले पाहिजे. माणसात,समाजात वावरताना कोणत्याही प्रकारच्या घटना डोक्यात येणार नाहीत. आणि रिकामे बसले तर आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, ते एक नसते त्यांची मोठी लिंक लागते.मग त्यातुन बाहेर येणे अशक्य होते. कोरोना लॉक डाऊनच्या काळात माझी नोकरी गेली नसती तर?. आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर झालो असतो. चांगली बायको मिळाली असती तर सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घेतला असता.आईवडीलांचे ऐकले असते तर तेव्हाच प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली. त्यावेळी मी त्यांच्याशी आईवडीलांशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!. असा वेदना देणाऱ्या आठवणी जाग्या होत जातात.त्या विसरून गेल्या पाहिजेत.
आज मी चांगल्या पगारावर काम करतो, पण मनाला समाधान नाही, तेव्हा कमी पगारात कुटुंबात सुखी समाधानी होतो.मी असे नव्हते करायला पाहीजे. व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च करतो, त्यापेक्षा भुतकाळातल्या त्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे विचार करणे आवश्यक आहे. 
  कोरोना लॉक डाऊनमुळे इथे प्रत्येक जण दुःखी आहे.आणि बहुतेक दुःखांच मुळ हे तुलनेत असते.प्रत्येकाशी तुलना करीत राहिलो तर हया जगात प्रत्येक गोष्ट,घटना वेगवेगळी असते. त्यांची तुलना सकारात्मक विचाराने केली तर पुढच्या घटना घडनार  नाहीत.आणि नकारात्मक विचाराने विचार केला तर न घडणाऱ्या घटना घडविल्या जातील. घरात कार्यालयात किंवा एसटी, रेल्वे प्रवासात धक्का लागला, बसायला जागा उपलब्ध नाही.त्यामुळे होणारी चिडचिड घरातुन कार्यालया पर्यत कार्यालयातुन घरा पर्यत मनातील भावना वेदनेत रूपांतर होते.प्रत्येक वस्तू कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदली होतो. जे जिथे घडले तिथेच सोडून आले तर निश्चितच आनंदी वातावरणात आपण राहू शकतो आणि दुसऱ्याला ठेऊ शकतो.प्रत्येक व्यक्तीचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती सर्वच बाबतीने वेगळा असु शकतो.
आयुष्य कशासाठी आहे यांचे प्रत्येकांनी उत्तर शोधले पाहिजे. आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे.जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मनमोकळे व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे निःपक्षपातीपणे सामोरे जा!. 
कोरोना लॉक डाऊन कधी होईल हे सांगता येत नाही. तो होणारच नाही या सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवले तर.
माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, अपेक्षा,अपुर्ण स्वप्ने, ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!
खुप वेळा आपण ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:खी होत राहतो. तारक मेहता का उलटा चष्मा संपूर्ण कुटुंब एकत्र बसुन पाहत असते. पोपटलालचे पात्र किती गंमतीशीर आहे. समजा,एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन! म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
 कोरोना लॉक डाऊन आला आणि गेला पुन्हा आला तरी ते जाणार आहेच.हेच लक्षात ठेवा.
माणसाचा स्वभाव आहे जे मिळते त्यात तो समाधान मानत नाही.जे मिळत नाही त्यांची नेहमी अपेक्षा करत असतो. तेव्हा तो समाधानी नसतो पण जेव्हा मिळतो तेव्हा समाधानी असतो काय?. आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, प्रत्येकाचे होतच असते, मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो.आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!.तेव्हा सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवावे.
 सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. बघा! किती मजेशीर आहे हे,अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झाले असं म्हणता येईल. म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवावे.
सकारत्मक विचारांची ऊर्जा आणि नकारात्मक विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते यांची माहिती मला दोन जानेवारी २०२२ ला रविंद्र सूर्यवंशी यांनी सिल्वासा ते मुंबई बाय रोडने प्रवास करतांना सांगितली. तीन वर्षापूर्वी कणकवली ते मुंबई प्रवास करतांना सांगितली होती.तेव्हा 
कोरोना लॉक डाऊन नव्हता.आता आहे त्यांचा परिणाम कुटुंबावर समाजावर कसा होतो. यांची गांभीर्याने चर्चा केली. तेव्हा पासुन माझ्यात खुप बदल झाला. एक तर नकारात्मक विचार करणे,लिहणे सोडून दिले.म्हणूनच प्रत्येकाने माणसांने सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवावे.कोरोना लॉक डाऊन सारखी संकटे कधी येतील आणि जातील.पण आपण स्थिर राहिले पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई

एकच वारी बारा जानेवारी झाली तर.....?. राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील.

 एकच वारी बारा जानेवारी झाली तर.....?. राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील.



छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ सारखी दुरदुष्टी आजच्या सर्व मातानी ठेवली तर आमच्या ही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजा सारखे शूरवीर निर्माण होतील.राष्ट्रमाता जिजाऊ हि इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती.स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब,शेतकऱ्यावर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती.त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणा मूर्ती जिजामाता होती. हे जरी शंभर टक्के सत्य असले. तरी मराठयाच्या मनावर जिजामाते पेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आज ही कायम राहत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील?. स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा जिजामातेची म्हणजे एका स्त्रीची होती.परंतु गेले अनेक शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून "स्वराज्य" निर्माण करणे हि श्री ची इच्छा आहे.हे विद्यार्थी दक्षे पासुन बिंबविले जाते.त्यामुळे जिजामाते पेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच मराठा समाजातील महिलांनी जास्त पसंत केले आहे.मराठा सेवा संघाच्या प्रबोधनाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.त्यामुळे एक घोषणा सर्व ठिकाणी निनादते "एकच वारी बारा जानेवारी" यांची खरच अंमलबजावणी झाली.तर शेगांव,शिर्डी आणि पंढरपूरच्या पायी यात्रा निश्चित बंद होतील.त्यामुळे मराठाच नव्हे तर लाखो बहुजन समाजात करोडो रुपयाची बचत होईल.आणि आपल्या मुलामुलींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होती.म्हणुन एकच वारी बारा जानेवारी ही केवळ घोषणा नाही.क्रांतिकारी मंत्र होईल.
भारतात मुलांना घडविताना त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगून त्याच्यावर संस्कार केले जातात.त्यांना शाळा कॉलेज मधून हे शिकविल्या वर कोण कसा छत्रपती शिवाजी राजा निर्माण होईल?. स्वराज्याचे राजे असलेले मराठे आज सर्वच मनुवादी विचारधारा असलेल्या पक्षाचे गुलाम झाले आहेत.राज्यातील २८८ आमदारात १४५ मराठा समाजाचे आमदार आहेत.हे लिहतांना मला लाज वाटते त्यांना मराठा म्हणण्याची. म्हणुन त्यांना गुलामच म्हटले पाहिजे.हे बेशरम पणे मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते. बहुजन क्रांती मोर्चा मुळे खरेच मराठा समाजात खूप मोठे प्रबोधन झाले ते इतिहास वाचायला लागले. आरक्षण मागायला लागले आणि शिवसेनेच्या बॅनर,पोस्टर वरून छत्रपती शिवाजी महाराज गायब झाले.का कसे माहिती नाही.मग मराठा सरदार,शिवसैनिकांवर कोणते संस्कार झाले?.

रामायणातील संस्कार कोणाला हि शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही.तर दुसऱ्या करीता कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते.तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते.असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय शत्रू आणि घरभेद्याशी लढाई केली नसती.शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे.हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हारले नाहीत.ती हिंमत लहानपणा पासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्याच्या मागे सदैव उभी होती.आज कालच्या माता मुलामुलीच्या मनात हिंमत निर्माण करण्या ऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात.त्याच्या पासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडनी करतात. 

"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी" अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे.जी माता स्वताच्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते.ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते.ती जगा बाबत विचार करूच शकत नाही. त्यात एखादीच जिजामाता, सावित्रीमाता,रमाईमाता,अहिल्याबाई, ताराबाई तयार होतात. जगात आदर्श निर्माण करतात.इथे शालिनीताई, प्रतिभाताई,प्रभाताई,शोभाताई,मीनाताई,निलमताई निर्माण झाल्या.त्यांना शिवाजी जिजाऊ कधीच आदर्श नव्हता.त्या गुलामांच्या गुलाम होत्या.त्यांच्या कडून राज्याच्या रयतेने कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत.

परकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना.जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रमाता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना,अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते.तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी,वर्णबंदी,  जातबंदी,रोटीबंदी,बेटीबंदी,शस्रबंदी,समुद्रबंदी होती. या सर्व बंदया प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावुन मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली. मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात.व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात.या मुंग्यांच्या एकजुटीतुन शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली.आणि सर्व जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणाना मावळे म्हणून गोळा केले.सम्राट अशोकाच्या नंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतीच्या गादीचा वारसा निर्माण केला.चंदगुप्त मौर्या,सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली. जिजामातेमुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.तर त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला.यांचे भान आजच्या आरक्षण मांगणाऱ्या मराठा क्रांतीची भाषा करणाऱ्यांना नाही. 

५७ मोर्चे काढणारा एक मराठा लाख मराठा समाजाच्या १४५ आमदारांनी मराठा आरक्षणा करीता राजीनामा देऊन निवडणूक घेण्यासाठी राज्यपाला समोर प्रस्ताव दाखल केला असता तर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा समाजाचे असते. १४५ आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे ते सभागृहात तोंड उघडू शकत नाही.भारतीय संविधान निर्माते त्यांची ती एकजातीय दादागिरी जाणुन होते म्हणुन त्यांनी तशी तरतुद लिहून ठेवली.म्हणुन ते मोर्चात सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष,संस्था,संघटना जिजामाताची जयंती साजरी करताना दिसत नाही.पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने प्रमुख गल्लीबोळात साजरा करताना दिसतात. ममता,समता, करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते. ज्यांच्या आईवडीलाचा पत्ता नाही,कुठे जन्मले?.गांव,तालुखा,जिल्हा,राज्य कोणते तेच कधी कळले नाही अशा मातांना प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया रात्रंदिवस दाखविते, मात्र जिजामाता,सावित्रीमाईचे जन्मा पासून मृत्यू प्रयन्त सर्व इतिहास माहित असूनही त्याबाबत लिहल्या आणि दाखविल्या जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजाना आद्यदैवत मानणारे जेव्हा त्याच्या मातोश्रीचे चरित्र हरण करून विटंबना केल्या गेली. तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरून खळ्ळयाय खःटाक आवाज केला नाही.अन एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला होता. यालाच आईचे व दाई प्रेम म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊचे चरित्र हरण करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरवल्या जाते. राज्यातील मराठ्यांना हे दिसते तरी पण स्वार्था करीता हे त्यांचे गुलामी स्विकारतात. छत्रपती शिवाजी महाराज  व जिजाऊच्या चरित्रावर लिहणाऱ्यानां पिता समान मानुन मनसे सेवा करणारी ही औलाद मराठा समाजातील तरुण तरुणीला कशी दिसली नाही.त्यांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्रात तोडफोड करून धुमाकुळ घालणारी ही पोर कोणत्या मातेची आहेत?. त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराजाची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही.मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील?.अशा जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणाऱ्या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार?.त्याने स्वजातीचा इतिहास वाचला पाहिजे,स्वता जागरूक होऊन समाजाला जागृत केले पाहिजे,म्हणुनच एकच वारी बारा जानेवारी स्वाभिमानी मराठा बहुजन समाजाच्या घराघरात राबविली पाहिजे. हिच राष्ट्रमाता जिजाऊ च्या जयंती निमित्त अपेक्षा.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि राष्ट्रमाता जिजाऊच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम !!!.

 सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई ९९२०४०३८५९.   
सोबत-राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांचे चरित्रहरण व समर्थन करणाऱ्या औलादीचा पिता पुत्र वैचारिक वारसा सांगणारे छायाचित्र.




राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया

 राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया



12 जानेवारीला आपल्या घरातील माँ जिजाऊंचा फोटो दिसला पाहिजे आणि घरातील कँलेंडर हातात घेऊन सेल्फी काढुन जयंती साजरी करुया.आपल्या घरातल्या कँलेडरचा फोटो आणि घरात असणारया महापुरुषांचा फोटो पाठवा.
(एकाच फोटोत आपल्या घरात असणारया माँ जिजाऊंचा आणि अन्य महापुरुषांचे आणि घरातील कँलेडर हातात घेऊन फोटो पाठवा.
"माझा देश माझे संविधान" सोशल मिडिया प्रस्तुत ही स्पर्धा घेण्यात येत आहे याविषयी थोडक्यात दरवर्षी आपल्या घरी किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक कँलेंडर घेत असतोच.पण तो कँलेंडर कोणता आहे?. त्या कँलेंडर मधुन आपण काय घेतो?तो कँलेडर कोणत्या विचाराचा आहे?हे ही तेवढेच महत्वाचे आहे.हा शुभ दिवस,तो अशुभ दिवस याबरोबर राशी भविष्य असते,पंचाग असते हे कशाला पाहिजे? आपण आणि हे सगळे तयार करणारे कालनिर्णय वाले साळगावकर आपल्यात हळुहळु ज्योतिषी पणा रुजवले आहे. शुभ दिवस अशुभ दिवस रुजवला जात आहे तिथी पाहणे आपल्याच महापुरुषांचे जन्मतारीख चुकीच्या लावणे असे आहे.सर्व प्रथम महात्मा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होऊ लागली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेनुसार साजरी करायची कि तिथीनुसार जयंती साजरी करायाची.
पण काही सनातन्या प्रवृत्तीने शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी करायची ठरवली आणि त्यानुसार मागील कित्येक वर्षे हे कालनिर्णय,महालक्ष्मी वाले त्यांनी तयार केलेल्या या कँलेडर वर तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी अशा पध्दतीने त्यांच्या कँलेंडर मध्ये उल्लेख असतो, आणि आपण त्याचे कँलेडर घेऊन त्यानांच मोठे करतो त्यांनी फक्त लक्ष्मीचे व्रत करणारी पुस्तके आणि हे कँलेडर पासुन आपल्याला मुर्ख बनवले, कोट्यावधी रुपये कमवले आज ही आपल्या लोकांच्या घरात महालक्ष्मी,आणि कालनिर्णय दिसतो. तो कँलेडर तुम्ही घेऊ नका.आपल्या विचारांचे कँलेडर घ्या.उदा प्रबुध्द भारत कँलेंडर,धम्मयान कँलेडर घ्या.किंवा इतर बरेच कँलेडर आहे हे समतेच्या विचारांचे कँलेडर आहेत. आणि या माध्यमातुन का होईना आपण आपल्या लोकांच्या व्यवसायाला चालना देऊ शकतो. आणि आपण घेतलेले कँलेडर ही आपल्या विचारांचे असतील,त्यामध्ये तिथी,पंचाग, राशी भविष्य नसतील, हे बघा. आणि नंतरच खरेदी करावे.
याबरोबर जनजागृतीसाठी सुशिक्षिंतानी ही स्पर्धेसाठी पुढे यावे.सर्वाचे फोटो
"माझा देश माझे संविधान" या फेसबुक पेज वर नावे आणि फोटो अपलोड केला जाईल.
माझे घर माझे कँलेडर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम 
1) कालनिर्णय,महालक्ष्मी आणि अन्य सनातनी विचारांचे (ज्यात पंचाग राशीभविष्य,शुभ अशुभ आहेत) असे कोणतेही कँलेडर घेऊ नये.2) समतेच्या विचारांचे कँलेडर आपण घ्यावेत.3) फोटो काढताना कँलेडर आपल्या हातात घेऊन आपल्या घरातील महापुरुषांचे फोटो ही आले पाहिजेत,असा फोटो काढावा4)कँलेडर बरोबर फोटो काढताना घरातील एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती जरी फोटोत आल्या तरी चालतील,पण कँलेडरचे किमान नाव दिसावे आणि घरातील महापुरुषांचे फोटो दिसावे हे महत्वाचे आहे5) एका घरातील एकच फोटो पाठवावा,6) 12 जानेवारी माँ जिजाऊचा जन्मदिवस या दिवशीच पाठवावा.7) विजेते 26 जानेवारीला घोषित करण्यात येईल.8) विजेत्याला आँनलाईन किंवा आँफलाईन सर्टिफिकेट मिळेल. 9) या स्पर्धेसाठी कँलेडर 2022 चा पाहिजे.10) फोटो 9067047333 या नंबर वर whatsapp करावे फोटो सोबत आपले नाव आणि पत्ता पाठवा,
चला बदलाची सुरवात आपल्यापासुन करुया आपण आपल्यानाच साथ देऊ या आपण आपली प्रगती करु या.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया
आपलाच
यश भालेराव 9067047333 पुणे

ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.

 ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.



ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवून 11 लाख ओबीसी लोकप्रतिनिधी संपविले गेले.या सामाजिक अपघाताची,आघाताची ज्याच्या मनात आणि गावात जाणीवच होत नाही ते मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आहोत हेच ज्यांना माहीत नाही त्या भारताच्या 52 टक्के लोकसंख्येला म्हणजेच अर्ध्या भारताला ओबीसी म्हणतातमंडळ आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या 360,तर देशात ओबीसी जातींची संख्या 3,744 इतकी नोंद केल्याचे गुगल सांगते.ही माहिती अनेक ओबीसी कार्यकर्ते नेते आणि समाजकारण राजकारण करणाऱ्या ओबीसी बांधवानी समजून घेतली पाहिजे.
ओबीसी बांधवाना हे राजकीय आरक्षण संपल्याचे संकट समजत नाही ?.म्हणून ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.
भारतात देवा देवीकांच्या जन्म मृत्यू च्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातात.त्यांचे संस्कार लहानपानापासून मुलामुलीवर होतात.देवाची मनोभावो पूजा अर्चा केली तर देव कसे चमत्कार करून प्रसन्न होतात हे शिकविल्या जाते.गणेशोत्सवात दररोज होणारी आरती व नवरात्रीच्या देवीच्या आरती बहुसंख्य मुलामुलींना तोंडपाठ असतात. पण त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाही. रामानंद सागर यांनी रामायण, महाभारत टीव्हीवर आणल्या पासुन तर विद्यार्थी शिक्षकांनाच उलट सुलट प्रश्न विचारतात. त्यात इंग्रजी माध्यमाच्या स्कुल मध्ये थोडे विज्ञान थोडे सांस्कृतिक म्हणून जनरल नॉलेज म्हणून रामायण महाभारतातील पात्रराची वेशभूषा व ठराविक डॉयलाग बोलण्याची स्पर्धा घेतली जाते.
सोशल मीडियावर नेहमीच हुशार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात रामायण, महाभारत किंवा राजकीय नेत्याच्या बाबत लक्षवेधी पोस्ट खुप शेयर होत राहतात.
आजचा विद्यार्थी हा स्मार्टफोन,कॉम्प्युटर,गुगल,यूट्यूब वर पाहिजे ते शोधणारा असणारा असल्यामुळे प्रथम तो माहिती घेतो नंतर इतरांशी चर्चा करण्यासाठी भिडतो. स्मार्टमोबाईल वर ऑन लाईन शिक्षण घेणारा विध्यार्थी त्यामुळे स्मार्ट झाला आहे. शिक्षकांनी सांगितले तर चुपचाप ऐकून घेणारा विध्यार्थी आज नाही.त्याला जे पटले नाही तर प्रश्न विचारण्याचे धाडस तो करतोच.तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात झालेला प्रश्न उत्तर कसा घडतो वाचा.गांवात मंदिर बांधले तर सर्वांची समस्या सुटू शकते.गावातील माणसांवर कोणते ही संकट देव येऊ देणार नाही.त्यासाठी त्याची मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून दान धर्म केला पाहिजे.शाळा कॉलेजमध्ये मध्ये गेलेली मुलमुली वाईट मार्गाने जातात त्यांच्यावर धर्माचे संस्कार होत नाही. आरक्षणामुळे मागासवर्गीय समाजांच्या लोकांना नोकरीत प्राधान्य मिळत असते. त्यामुळे धर्मसत्ता धोक्यात आली आहे.म्हणूनच आर एस एस प्रणित केंद्र सरकारने एस सी,एसटी,ओबीसी यांचे सर्वच आरक्षण दोन मार्गाने संपविले.एक राम मंदिर बनवून दुसरे खासगीकरण करून मंदिराच्या कामासाठी दान व श्रम त्याग करणारे हे बहुसंख्य ओबीसी नेते कार्यकर्ते आणि समाजच होता.म्हणूनच आरक्षण नको धर्म पाहिजे. सर्व हिंदू जागे झाले तर हा देश हिंदुराष्ट्र बनेल.ही घोषणा यशस्वी करण्यात ५२ टक्के ओबीसी आणि बहुसंख्य बहुजन समाज जबाबदार आहे.हेच ५२ टक्के ओबीसीचे आरक्षण गेल्यावर शेतकऱ्याच्या आंदोलना पेक्षा मोठे व तिव्र आंदोलनची अपेक्षा होती.पण गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणारे ओबीसी पेटून उठलेच नाही. 
दोन महादेव अवतार घेऊन देवा धर्माच्या रक्षणासाठी अठरा अठरा तास काम करीत आहेत. शिक्षण देणारे शाळा कॉलेज नको. मंदिर पाहिजेत ते सर्वाना समान न्याय देतील म्हणूनच आरक्षण बंद झाले पाहिजे आणि धर्माचे रक्षण झाले पाहिजे.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.विज्ञानाच्या चौकटीत ते घेतले तर तो श्रद्धा व अंधश्रद्धा,आणि ज्ञान व अज्ञान यातील फरक समजु शकतो.मग त्यांना माझ्या सारखे  नेहमी प्रश्न लिहून विचारतात.मंदिर नाही शाळा पाहिजे!.धर्म नाही अधिकार पाहिजे!!.

गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाही.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही.पण मंदिर बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात.त्यात त्यांची चढावळ लागते.धर्मानुसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो.तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?. सुशिक्षित पदवीधर सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्तर मागत नाहीत.मागासवर्गीय समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली, देव दर्शन, उपवास पकडून नवस फेडला म्हणून नाही.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला रोखण्यासाठी मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज देशभरात ब्राम्हणी प्रिंट,चॅनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहे.धर्मा नुसार सर्व हिंदू आहेत.मग मंदिराच्या उत्पन्ना वर सर्वच समान अधिकार का नाही?. राज्य व केंद्रातील सरकार यावर ठोस निर्णय का घेऊ शकत नाही?.
शाळा,कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल,आज पर्यत धर्माने सांगितले ते मुलामुलींनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातुन कसा बाहेर आला यांचे शाळा कॉलेज मध्ये उत्तर मिळत नाही.पुढे असे सांगितल्या जाते रावण महापंडित होता!.मग आज पर्यत एकही पंडितांच्या मुलाचे नांव रावण का नाही?.शाळा कॉलेज मध्ये मुलामुलींना गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यात नियमितपणे आरती म्हटली जाते.बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे.मग कोणत्या शाळा कॉलेज, व हिंदूंच्या मंदिरात बुद्ध मूर्ती का नाही लावल्या जात नाही?.कोणत्याही भटा ब्राम्हणाने स्वतःचा मुलाचे किंवा इतर हिंदू धर्मातील लोकांच्या मुलाचे नांव गौतम,सिद्धार्थ, तथागत का ठेवले नाही. वाल्मिकी ऋषी सर्वात श्रेष्ठ होते त्यांनी रामायण,महाभारत लिहले.मग कोणीच हिंदू धर्मातील आपल्या मुलांचे नांव वाल्मिकी का ठेवत नाही.असे प्रश्न सोडविण्यासाठी मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!.पण ५२ टक्के ओबीसी व इतर हिंदू समाज शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे म्हणतात.सार्वजनिक शिक्षण,हॉस्पिटल आणि उद्योग धंदे यांचे खासगीकरण यशस्वीपणे होत असल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.असे माझ्या सारख्यांना लिहावे लागते.यामुळे काही फरक पडेल असे वाटत नाही.पण आम्ही संविधान प्रेमी सत्यशोधक विचारांच्या लोकांनी काही केलेच नाही असे होऊ नये म्हणून लिहत आहे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य  

सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी

 सावित्रीबाई फुले मृत्यू- १० मार्च स्मृतिदिना निमित्याने विशेष लेख 

सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी



जगात विज्ञानने एवढी अफाट प्रगती केली.तरी भारतात 
त्यांची नोंद घेतली जात नाही.या देशात अज्ञान अंधश्रद्धा यालाच खुप महत्व आहे.त्यात महिला वर्गाचे प्रमाण जास्त आहे.म्हणुन त्यांना महिलांना कायम त्यात गुंतवून ठेवण्या करीता घराघरात दूरदर्शन म्हणजे टीव्ही चोवीस तास मेंदूला योग्य खाद्य देण्यास तयार आहेत.प्रत्येक घरात टीव्हीच्या रिमोटवर ताबा सांगुन वर्चस्व गाजवणाऱ्या महिलाच (त्यांच्या भीतीनं पुरूषही) काय पाहतात? तर "तुझ्यात जीव रंगला", "खुलता कळी खुलेना","माझ्या नवऱ्यांची बायको", "नागिन" किंवा बालाजी चा टुकार कौटुंबिक कलह ! "बायकांनी बायकांसारखंच रहायचं" हे यात ठासून शिकवलं जात.म्हणजे इथली सामाजिक,धार्मिक व्यवस्थाच नाही तर प्रचार,प्रसार माध्यमे देखिल स्त्रियांना एकाच साच्यात बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. आई कुठे काय करते?. रंग माझा वेगळा, सुख म्हणजे काय असते?.फुलला सुगंध मातीचाह्या मालिका करमणूक म्हणून तरी आपण काय पाहतो आणि त्याचा काय परीणाम होतोय हे सुध्दा लक्षात येत नाहीये.ज्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आहेत किंवा मोठ्या पदावर आहेत त्यांचाही कल स्त्रियांनी स्त्रियांचे प्रश्न सोडवावेत असाच असतो असा विचार खरं तर खुप संकुचित आहे. 

आम्ही तर म्हणतो, स्त्रियांनी आता फक्त स्त्रियांचेच नाही तर सर्वच स्तरावरील प्रश्न सोडवायला सिध्द व्हायला हवंय आणि तितक्या त्या नक्कीच सक्षम आहेत. 
हे राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई, ताराबाई,
लक्ष्मीबाई झिलकरी, अहिल्याबाई यांनी जो इतिहास घडविला त्यांच्या पराक्रमाची 
इतिहासात 
नोंद आहे.पण भारतातील 
चॅनलवाले ते 
दाखविण्याचे, प्रिंट मीडिया वाले लिहण्याचे धाडस करीत नाही.कोण ती शिक्षणाची देवता शारदा,सरस्वती कोणत्या गावात, तालुक्यात,जिल्ह्यात जन्मली.त्यांच्या आई,वडिलाची नांवे काय होती ?.त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण कुठे झाले?.हे आजच्या सुशिक्षित महिलांना सांगितले पाहिजे.त्याच पद्धतीने धन,संपती पैसा याची देवता लक्ष्मी देवी. कोणत्या गावात, तालुक्यात,जिल्ह्यात जन्मली ?. त्यांच्या आई,वडिलाची नांवे काय होती ?.त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण कुठे झाले?. तिने धन,संपती पैसा कसा निर्माण केला.तिच्या करिता आज महिला वर्ग दरवाजे खुले ठेवतात.झाडू मारणे आणि दिवाबत्ती याची वेळ ठरलेली आहे.त्याबाबत ही मिडिया सत्य काही दाखवीत नाही.आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत तांचे कारण शिक्षण आहे.

भारतात ज्या महिलेने पहिले स्वत शिक्षण घेऊन मुलीना शिक्षण देण्यासाठी पाहिली शाळा काढली. ती १ मे १८४७ रोजी.सावित्रीबाई फुले (जन्म ३ जानेवारी १८३१,जन्म स्थळ-नायगाव,सातारा- मृत्यू- १० मार्च १८९७ पुणे येथे झाला.) त्या पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन केली. महिलांना शिक्षण कोणामुळे मिळाले, हे मान्य न करता शिक्षणामुळे सर्व क्षेत्रातील महिला ते आपले पारंपारिक रीतीरिवाज अंधश्रद्धा,अज्ञान दूर करून घेण्यास तयार नाही.कोणत्याही धर्माच्या नियमानुसार एक महिला कधी मस्जिदची मौलाना बनू शकत नाही,एक महिला कधी मंदिराची पुजारी बनू शकत नाही,एक महिला कधी चर्चची फादर बनू शकत नाही, पण शिक्षण घेऊन एक महिला राष्ट्रपती,पंतप्रधान, खासदार,मंत्री,आमदार, कलेक्टर, सचिव, सरपंच सगळ बनू शकते.कारण जे धर्म देऊ शकत नाही ते भारतीय संविधानाने त्यांना फुकट दिल आहे. तरी काही महिला धर्म ग्रंथांना श्रेष्ठ मानून त्यांच्या अलिखित नियमांचे पालन करतात.त्यांना प्रोत्साहन देणारी आणि आज देशाला पुन्हा मागे घेऊन जाणारी शक्ती सत्तेवर आली आहे.संविधानातील मुल्यांना हरताळ फासला जात असताना विज्ञानवादी मानसिकतेच्या स्त्रियांनी ठाम निर्णय ठाम भुमिका घेऊन नेतृत्व हातात घ्यायला हवं, तेव्हा आपण म्हणू की सावित्रीचा वारसा खऱ्या अर्थाने पुढं नेला जात आहे.फक्त चळवळीत, संस्था,संघटना,राजकारणात असणाऱ्या स्त्रियांनीच नाही तर गृहीणींनी सुध्दा येणाऱ्या काळात हातात स्मार्टफोन फोरजी नेटवर्क ठेवून आपण कुठं असणार आहोत हे आजच ठरवून मार्गक्रमण करायला हवं. निर्णय प्रक्रीयेत सामावून घेण्यात किंवा समान संधीच्या संघर्षात स्त्रिया अजुन कीती मागे आहेत याचा सडेतोड अभ्यास आतातरी ठळकपणे झाला पाहीजे.
शिक्षण घेऊन आघाडीवर असणाऱ्या बहुसंख्य महिला आज मानसिक वैचारिक गुलाम आहेत.आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कष्ट, त्याग आणि जिद्दीला बेईमान झाल्या आहेत. म्हणूनच अशा सर्व महिलांना मनुवादी मनुस्मृती नुसार वागणूक दिली पाहिजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या वर खूप दया दाखवली. त्यांना भारतीय संविधानात मान, सन्मान समान अधिकार दिला.आज त्या मोकळ्या वातावरणात जीन पॅन्ट टीशर्ट घालून, बॉब कट करून वावरत असतात.तरी त्या गुरुवार उपास धरल्या शिवाय राहत नाही. असा महिलांना काय म्हणावे?. माझ्या सारख्या चळवळीतील कार्यकर्त्या समोर मोठा ग्रहण प्रश्न आहे.परिवर्तनाच्या प्रवासातील त्या प्रत्येक रणरागिणीने सावित्रीबाई स्मृतीदिना निमित्ताने क्रांतीकारी सलाम केला पाहिजे.तिचे उपकार मान्य केले पाहिजे.
पुणे परिसरात १८९६-९७ सालांदरम्यान प्लेगच्या  साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंना ही प्लेग झाला. त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.

सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.

आजच्या सुशिक्षित महिला ज्या कोण्या देवीच्या उपासक असतील तर त्यांनी त्यांचा जन्म कोण्या आई वडिलांच्या पोटी कुठे,कधी झाला प्राथमिक शिक्षण,माध्यमिक शिक्षण कुठे झाले.तालुखा जिल्हा,राज्य कोणते होते.त्यांच्या पराक्रमात कोण कोण सहभागी होते.आई,वडील,भाऊ,बहिण, नवरा,मुलगा,मुलगी शेवटी त्यांचे निधन कुठे,कधी,कसे झाले.याची सविस्तरपणे माहिती सांगितली, लिहली पाहिजे.सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी.सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण जन्मा पासून मृत्यू पर्यंत माहिती उपलब्ध आहे. इतरांची अशी माहिती नसतांनाही त्यांचे डोळे बंद करून समर्थन करणे म्हणजेच अज्ञान आहे. सुशिक्षित प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची कहाणी कशी असावी प्रेरणादायी, तरच तिच्या कार्याची इतिहासात नोंद झाली असेल.सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहाणी झाली नाही पाहिजे.यासाठी अशिक्षित असो की सुशिक्षित महिलांनी १० मार्चला त्यांच्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन केले पाहिजे. हीच अपेक्षा.

सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९.भांडुप.मुंबई.

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य