मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

एकच वारी बारा जानेवारी झाली तर.....?. राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील.

 एकच वारी बारा जानेवारी झाली तर.....?. राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील.



छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ सारखी दुरदुष्टी आजच्या सर्व मातानी ठेवली तर आमच्या ही घराघरात छत्रपती शिवाजी महाराजा सारखे शूरवीर निर्माण होतील.राष्ट्रमाता जिजाऊ हि इतिहास घडविणारी एक महान स्त्री झाली होती.स्वराज्य निर्माण करण्यासाठी गोरगरिब,शेतकऱ्यावर विविध जाती धर्माच्या मराठी मावळ्यांवर दया दाखविणारी कारूण्यमूर्ती होती.त्यामुळेच शिवाजी महाराजाच्या कृतीतून कार्य सिद्धीस नेण्यासाठी लागणारी प्रेरणा मूर्ती जिजामाता होती. हे जरी शंभर टक्के सत्य असले. तरी मराठयाच्या मनावर जिजामाते पेक्षा भवानीमातेचे वर्चस्व आज ही कायम राहत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ कशा निर्माण होतील?. स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा जिजामातेची म्हणजे एका स्त्रीची होती.परंतु गेले अनेक शतक आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या अभ्यास क्रमातील इतिहासाच्या धड्यातून "स्वराज्य" निर्माण करणे हि श्री ची इच्छा आहे.हे विद्यार्थी दक्षे पासुन बिंबविले जाते.त्यामुळे जिजामाते पेक्षा भवानी मातेचे भक्त होणेच मराठा समाजातील महिलांनी जास्त पसंत केले आहे.मराठा सेवा संघाच्या प्रबोधनाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.त्यामुळे एक घोषणा सर्व ठिकाणी निनादते "एकच वारी बारा जानेवारी" यांची खरच अंमलबजावणी झाली.तर शेगांव,शिर्डी आणि पंढरपूरच्या पायी यात्रा निश्चित बंद होतील.त्यामुळे मराठाच नव्हे तर लाखो बहुजन समाजात करोडो रुपयाची बचत होईल.आणि आपल्या मुलामुलींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होती.म्हणुन एकच वारी बारा जानेवारी ही केवळ घोषणा नाही.क्रांतिकारी मंत्र होईल.
भारतात मुलांना घडविताना त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगून त्याच्यावर संस्कार केले जातात.त्यांना शाळा कॉलेज मधून हे शिकविल्या वर कोण कसा छत्रपती शिवाजी राजा निर्माण होईल?. स्वराज्याचे राजे असलेले मराठे आज सर्वच मनुवादी विचारधारा असलेल्या पक्षाचे गुलाम झाले आहेत.राज्यातील २८८ आमदारात १४५ मराठा समाजाचे आमदार आहेत.हे लिहतांना मला लाज वाटते त्यांना मराठा म्हणण्याची. म्हणुन त्यांना गुलामच म्हटले पाहिजे.हे बेशरम पणे मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते. बहुजन क्रांती मोर्चा मुळे खरेच मराठा समाजात खूप मोठे प्रबोधन झाले ते इतिहास वाचायला लागले. आरक्षण मागायला लागले आणि शिवसेनेच्या बॅनर,पोस्टर वरून छत्रपती शिवाजी महाराज गायब झाले.का कसे माहिती नाही.मग मराठा सरदार,शिवसैनिकांवर कोणते संस्कार झाले?.

रामायणातील संस्कार कोणाला हि शूरवीर बनण्याची प्रेरणा देत नाही.तर दुसऱ्या करीता कसे मरावे त्याची प्रेरणा रामायणात मिळते.तर महाभारताचे संस्कार अधर्माने कसे मारावे याचे अनेक उदाहरण देऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते.असे संस्कार शिवाजी महाराज यांच्यावर झाले असते तर त्यांनी मावळ्याची फौज उभी करून परकीय शत्रू आणि घरभेद्याशी लढाई केली नसती.शत्रू सर्व शक्तीने बलाढ्य आहे.हे माहित असूनही शिवाजी महाराज कधीच हिंमत हारले नाहीत.ती हिंमत लहानपणा पासून त्यांच्यात निर्माण करणारी माता जिजाऊ त्याच्या मागे सदैव उभी होती.आज कालच्या माता मुलामुलीच्या मनात हिंमत निर्माण करण्या ऐवजी प्रचंड भिती निर्माण करतात.त्याच्या पासून सावध राहण्याची सतत त्याची कान उघडनी करतात. 

"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी" अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे.जी माता स्वताच्या कुटुंबाची काळजी घेण्यास आपल्या मुलावर संस्कार करते.ती त्याला जगाची उगाच उठाठेव करू नको अशी सतत तंबी देते.ती जगा बाबत विचार करूच शकत नाही. त्यात एखादीच जिजामाता, सावित्रीमाता,रमाईमाता,अहिल्याबाई, ताराबाई तयार होतात. जगात आदर्श निर्माण करतात.इथे शालिनीताई, प्रतिभाताई,प्रभाताई,शोभाताई,मीनाताई,निलमताई निर्माण झाल्या.त्यांना शिवाजी जिजाऊ कधीच आदर्श नव्हता.त्या गुलामांच्या गुलाम होत्या.त्यांच्या कडून राज्याच्या रयतेने कधीच अपेक्षा ठेवल्या नाहीत.

परकीय गुलामगिरीचे साम्राज्य पसरले असताना.जवळपास पंधराशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रमाता जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बहुजन समाजाच्या प्रेरणांना,अस्मितेला जन्म दिला आज आम्ही जरी बहुजन समाज हा शब्द वापरत असलो तरी त्यावेळी दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्व जाती जमाती आदिवासीना जिजामाता व शिवबांनी मावळे म्हणून गोळा केले होते.तेव्हा या सर्व बहुजनांना ज्ञानबंदी,वर्णबंदी,  जातबंदी,रोटीबंदी,बेटीबंदी,शस्रबंदी,समुद्रबंदी होती. या सर्व बंदया प्रथम जिजामाताने आपल्या बाळ शिवाजीला तोडण्यास लावुन मावळ्याची मुंग्यांसारखी फौज निर्माण केली. मुंग्या कितीही छोट्या असल्या तरी त्या एकत्र एखाद्या किड्यावर तुटून पडल्यावर त्याला जिवंत मारतात.व सर्व एकत्र येऊन त्याला वाहुन नेतात.या मुंग्यांच्या एकजुटीतुन शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली.आणि सर्व जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या कष्टकरी गोरगरीब पण शरीराने आडदांड असलेल्या तरुणाना मावळे म्हणून गोळा केले.सम्राट अशोकाच्या नंतर हजारो वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था झुगारून छत्रपतीच्या गादीचा वारसा निर्माण केला.चंदगुप्त मौर्या,सम्राट अशोकाचा वारसा आणि रयतेच्या विचाराचे स्वराज्य निर्माण करून त्याची रीतसर स्थापना केली. जिजामातेमुळे केवळ एका मातेचा किंवा मातृत्वाचा गौरव झाला नाही.तर त्यापेक्षा आमच्या मातृसत्ताक संस्कृतीचा गौरव झाला.यांचे भान आजच्या आरक्षण मांगणाऱ्या मराठा क्रांतीची भाषा करणाऱ्यांना नाही. 

५७ मोर्चे काढणारा एक मराठा लाख मराठा समाजाच्या १४५ आमदारांनी मराठा आरक्षणा करीता राजीनामा देऊन निवडणूक घेण्यासाठी राज्यपाला समोर प्रस्ताव दाखल केला असता तर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा समाजाचे असते. १४५ आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असल्यामुळे ते सभागृहात तोंड उघडू शकत नाही.भारतीय संविधान निर्माते त्यांची ती एकजातीय दादागिरी जाणुन होते म्हणुन त्यांनी तशी तरतुद लिहून ठेवली.म्हणुन ते मोर्चात सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा सांगणारे पक्ष,संस्था,संघटना जिजामाताची जयंती साजरी करताना दिसत नाही.पण ममता दिन मात्र मोठ्या उत्सवात गटागटाने प्रमुख गल्लीबोळात साजरा करताना दिसतात. ममता,समता, करुणा यांचा थांगपत्ता नसलेल्या माताचा नऊ दिवस कडक उपवास आणि नऊ दिवस नऊ रंगाची उधळण केली जाते. ज्यांच्या आईवडीलाचा पत्ता नाही,कुठे जन्मले?.गांव,तालुखा,जिल्हा,राज्य कोणते तेच कधी कळले नाही अशा मातांना प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया रात्रंदिवस दाखविते, मात्र जिजामाता,सावित्रीमाईचे जन्मा पासून मृत्यू प्रयन्त सर्व इतिहास माहित असूनही त्याबाबत लिहल्या आणि दाखविल्या जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजाना आद्यदैवत मानणारे जेव्हा त्याच्या मातोश्रीचे चरित्र हरण करून विटंबना केल्या गेली. तेव्हा एकदाही रस्त्यावर उतरून खळ्ळयाय खःटाक आवाज केला नाही.अन एका धातूच्या पुतळ्याला माती लागताच उभा महाराष्ट्र पेटविला होता. यालाच आईचे व दाई प्रेम म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊचे चरित्र हरण करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरवल्या जाते. राज्यातील मराठ्यांना हे दिसते तरी पण स्वार्था करीता हे त्यांचे गुलामी स्विकारतात. छत्रपती शिवाजी महाराज  व जिजाऊच्या चरित्रावर लिहणाऱ्यानां पिता समान मानुन मनसे सेवा करणारी ही औलाद मराठा समाजातील तरुण तरुणीला कशी दिसली नाही.त्यांच्या एका इशाऱ्यावर महाराष्ट्रात तोडफोड करून धुमाकुळ घालणारी ही पोर कोणत्या मातेची आहेत?. त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराजाची आई संस्कार मूर्तीची आठवण होत नाही.मग कशा राष्ट्रमाता जिजाऊ निर्माण होतील?.अशा जातीशी बेईमानी करून परकीयांची गुलामगिरी करणाऱ्या मराठी बहुजन समाजाचे अज्ञान कधी दूर होणार?.त्याने स्वजातीचा इतिहास वाचला पाहिजे,स्वता जागरूक होऊन समाजाला जागृत केले पाहिजे,म्हणुनच एकच वारी बारा जानेवारी स्वाभिमानी मराठा बहुजन समाजाच्या घराघरात राबविली पाहिजे. हिच राष्ट्रमाता जिजाऊ च्या जयंती निमित्त अपेक्षा.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि राष्ट्रमाता जिजाऊच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम !!!.

 सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई ९९२०४०३८५९.   
सोबत-राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांचे चरित्रहरण व समर्थन करणाऱ्या औलादीचा पिता पुत्र वैचारिक वारसा सांगणारे छायाचित्र.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा