मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.

 ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.



ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवून 11 लाख ओबीसी लोकप्रतिनिधी संपविले गेले.या सामाजिक अपघाताची,आघाताची ज्याच्या मनात आणि गावात जाणीवच होत नाही ते मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आहोत हेच ज्यांना माहीत नाही त्या भारताच्या 52 टक्के लोकसंख्येला म्हणजेच अर्ध्या भारताला ओबीसी म्हणतातमंडळ आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या 360,तर देशात ओबीसी जातींची संख्या 3,744 इतकी नोंद केल्याचे गुगल सांगते.ही माहिती अनेक ओबीसी कार्यकर्ते नेते आणि समाजकारण राजकारण करणाऱ्या ओबीसी बांधवानी समजून घेतली पाहिजे.
ओबीसी बांधवाना हे राजकीय आरक्षण संपल्याचे संकट समजत नाही ?.म्हणून ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.
भारतात देवा देवीकांच्या जन्म मृत्यू च्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातात.त्यांचे संस्कार लहानपानापासून मुलामुलीवर होतात.देवाची मनोभावो पूजा अर्चा केली तर देव कसे चमत्कार करून प्रसन्न होतात हे शिकविल्या जाते.गणेशोत्सवात दररोज होणारी आरती व नवरात्रीच्या देवीच्या आरती बहुसंख्य मुलामुलींना तोंडपाठ असतात. पण त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाही. रामानंद सागर यांनी रामायण, महाभारत टीव्हीवर आणल्या पासुन तर विद्यार्थी शिक्षकांनाच उलट सुलट प्रश्न विचारतात. त्यात इंग्रजी माध्यमाच्या स्कुल मध्ये थोडे विज्ञान थोडे सांस्कृतिक म्हणून जनरल नॉलेज म्हणून रामायण महाभारतातील पात्रराची वेशभूषा व ठराविक डॉयलाग बोलण्याची स्पर्धा घेतली जाते.
सोशल मीडियावर नेहमीच हुशार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात रामायण, महाभारत किंवा राजकीय नेत्याच्या बाबत लक्षवेधी पोस्ट खुप शेयर होत राहतात.
आजचा विद्यार्थी हा स्मार्टफोन,कॉम्प्युटर,गुगल,यूट्यूब वर पाहिजे ते शोधणारा असणारा असल्यामुळे प्रथम तो माहिती घेतो नंतर इतरांशी चर्चा करण्यासाठी भिडतो. स्मार्टमोबाईल वर ऑन लाईन शिक्षण घेणारा विध्यार्थी त्यामुळे स्मार्ट झाला आहे. शिक्षकांनी सांगितले तर चुपचाप ऐकून घेणारा विध्यार्थी आज नाही.त्याला जे पटले नाही तर प्रश्न विचारण्याचे धाडस तो करतोच.तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात झालेला प्रश्न उत्तर कसा घडतो वाचा.गांवात मंदिर बांधले तर सर्वांची समस्या सुटू शकते.गावातील माणसांवर कोणते ही संकट देव येऊ देणार नाही.त्यासाठी त्याची मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून दान धर्म केला पाहिजे.शाळा कॉलेजमध्ये मध्ये गेलेली मुलमुली वाईट मार्गाने जातात त्यांच्यावर धर्माचे संस्कार होत नाही. आरक्षणामुळे मागासवर्गीय समाजांच्या लोकांना नोकरीत प्राधान्य मिळत असते. त्यामुळे धर्मसत्ता धोक्यात आली आहे.म्हणूनच आर एस एस प्रणित केंद्र सरकारने एस सी,एसटी,ओबीसी यांचे सर्वच आरक्षण दोन मार्गाने संपविले.एक राम मंदिर बनवून दुसरे खासगीकरण करून मंदिराच्या कामासाठी दान व श्रम त्याग करणारे हे बहुसंख्य ओबीसी नेते कार्यकर्ते आणि समाजच होता.म्हणूनच आरक्षण नको धर्म पाहिजे. सर्व हिंदू जागे झाले तर हा देश हिंदुराष्ट्र बनेल.ही घोषणा यशस्वी करण्यात ५२ टक्के ओबीसी आणि बहुसंख्य बहुजन समाज जबाबदार आहे.हेच ५२ टक्के ओबीसीचे आरक्षण गेल्यावर शेतकऱ्याच्या आंदोलना पेक्षा मोठे व तिव्र आंदोलनची अपेक्षा होती.पण गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणारे ओबीसी पेटून उठलेच नाही. 
दोन महादेव अवतार घेऊन देवा धर्माच्या रक्षणासाठी अठरा अठरा तास काम करीत आहेत. शिक्षण देणारे शाळा कॉलेज नको. मंदिर पाहिजेत ते सर्वाना समान न्याय देतील म्हणूनच आरक्षण बंद झाले पाहिजे आणि धर्माचे रक्षण झाले पाहिजे.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.विज्ञानाच्या चौकटीत ते घेतले तर तो श्रद्धा व अंधश्रद्धा,आणि ज्ञान व अज्ञान यातील फरक समजु शकतो.मग त्यांना माझ्या सारखे  नेहमी प्रश्न लिहून विचारतात.मंदिर नाही शाळा पाहिजे!.धर्म नाही अधिकार पाहिजे!!.

गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाही.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही.पण मंदिर बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात.त्यात त्यांची चढावळ लागते.धर्मानुसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो.तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?. सुशिक्षित पदवीधर सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्तर मागत नाहीत.मागासवर्गीय समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली, देव दर्शन, उपवास पकडून नवस फेडला म्हणून नाही.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला रोखण्यासाठी मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज देशभरात ब्राम्हणी प्रिंट,चॅनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहे.धर्मा नुसार सर्व हिंदू आहेत.मग मंदिराच्या उत्पन्ना वर सर्वच समान अधिकार का नाही?. राज्य व केंद्रातील सरकार यावर ठोस निर्णय का घेऊ शकत नाही?.
शाळा,कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल,आज पर्यत धर्माने सांगितले ते मुलामुलींनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातुन कसा बाहेर आला यांचे शाळा कॉलेज मध्ये उत्तर मिळत नाही.पुढे असे सांगितल्या जाते रावण महापंडित होता!.मग आज पर्यत एकही पंडितांच्या मुलाचे नांव रावण का नाही?.शाळा कॉलेज मध्ये मुलामुलींना गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यात नियमितपणे आरती म्हटली जाते.बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे.मग कोणत्या शाळा कॉलेज, व हिंदूंच्या मंदिरात बुद्ध मूर्ती का नाही लावल्या जात नाही?.कोणत्याही भटा ब्राम्हणाने स्वतःचा मुलाचे किंवा इतर हिंदू धर्मातील लोकांच्या मुलाचे नांव गौतम,सिद्धार्थ, तथागत का ठेवले नाही. वाल्मिकी ऋषी सर्वात श्रेष्ठ होते त्यांनी रामायण,महाभारत लिहले.मग कोणीच हिंदू धर्मातील आपल्या मुलांचे नांव वाल्मिकी का ठेवत नाही.असे प्रश्न सोडविण्यासाठी मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!.पण ५२ टक्के ओबीसी व इतर हिंदू समाज शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे म्हणतात.सार्वजनिक शिक्षण,हॉस्पिटल आणि उद्योग धंदे यांचे खासगीकरण यशस्वीपणे होत असल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.असे माझ्या सारख्यांना लिहावे लागते.यामुळे काही फरक पडेल असे वाटत नाही.पण आम्ही संविधान प्रेमी सत्यशोधक विचारांच्या लोकांनी काही केलेच नाही असे होऊ नये म्हणून लिहत आहे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा