मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां राजकीय व्यक्तींना जाहीरपणे धडा शिकवा.

 धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां  

राजकीय व्यक्तींना जाहीरपणे धडा शिकवा.


आंबेडकरी चळवळीत रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट महाराष्ट्रात आहेत,ज्याचे अनेक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष असून ते महाराष्ट्राच्या राजकारणात उपद्रव्य मूल्य दाखविण्यात आघाडीवर आहेत.ते राजकीय अस्तित्वासाठी नेहमीच धडपड करीत असतात.ते राजकीय अस्तित्व गमाऊन बसले असल्यामुळे धम्माचा आधार घेऊन धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या मागे जनाधार आहे हे दाखविण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत असतात.अशा नेत्यांची उपस्थिती असलेल्या धम्म परिषदच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे.त्यामुळे त्यांच्या मागे कुठला ही जनाधार नाही हे सिद्ध होते,संघटना स्थानिक पातळीवरची,पण नावे मात्र भारतीय आणि देशपातळीवरील संघटना,असे लेटरहेडच्या माध्यमातून भासवत असतात.असे पक्ष आणि त्यांचे नेते सत्ताधारी पक्षाची लाचार होऊन चाकरी करीत असता,मनुवादी विचारांच्या पक्षाच्या व्यक्तीच्या आर्थिक मदतीवर धम्म परिषद घेणाऱ्या आयोजकांचे चरित्र पाहून धम्म उपासक उपासिकांनी बहिष्कार टाकला पाहिजे. तुमच्या भावनिक उपस्थितीने त्यांच्या पदरामध्ये काही तरी पडेल,याच विचारांने ते काही लाचार दलाल चरित्रहीन कार्यकर्ते नेत्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करीत असतात.परंतु त्यांना धम्माशी समाजाशी आणि चळवळीशी काही घेणे - देणे नसतेआंबेडकरी विचारांची संघटना स्वार्थासाठी वापरली जाते.सामाजिक बांधिलकी ठेऊन लोक कल्याणासाठी नाही.असे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते जेव्हा काही भनतेना हाताशी धरून धम्म परिषदांचे आयोजन करतात, तेव्हा धम्मापेक्षा स्वतः ला राजकीय लाभ कसा मिळेल,याच्या चिंतेत ते असतात.असे नेते बुद्ध धम्माच्या पंचशीलेचे पालन आपल्या दररोजच्या आचरणात आणतात का?. पूज्य भनते खरोखरच विचाराने आचरणाने पूज्य आहेत काय हे पण आपण उपासक उपासिका यांनी तपासले पाहिजे.भावनिक होऊन कोणाच्या ही कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून नालायक कार्यकर्त्यांना व नेत्यांना मोठे करू नका.ते मोठे झाल्यावर तुमचाचं बळी घेतात.हा गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन वाचा किंवा पहा. 

      बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ही भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवित असतांना, मनुवादी संघटना अशा नेत्यांना साधनसामुग्री देऊन,धम्मक्रांतीला खीळ घालण्याचा कुटील प्रयत्न करीत आहेत.त्यांच्यापासून सावध राहून बहिष्कार घालणे यातच आपले आपल्या समाजाचे आणि चळवळीचे हित आहॆ. आजच्या जमान्यात सर्वात जास्त मागासवर्गीय ओबीसी,भटके विमुक्ते जाती जमातीचे,चांभार,महार,मांग,एस सी,एस टी,महाराचे बौद्ध झाले सुशिक्षित गद्दार आज घरात गणपती उत्सव पांच,दहा दिवस साजरा करतांना दिसतात.ते स्वतच्या धर्माशी गद्दारी करताचं पण ब्राम्हणाच्या प्रवित्र देवाची विटंबना करून बाटवता.त्यांनाच हाताशी धरून असा धम्मा परिषदेचे आयोजन केले जाते.आज आपण थोडे धाडस दाखविले तर त्यांचे मनसुबे पाहिलेले स्वप्न नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही.
   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधन धम्म उपासक शिबिरातून तयार झालेल्या धम्म उपासक उपासिका आणि बौद्धचार्य यांच्या सहकार्याने सहभागाने कोणताही संघर्ष न करता संघटित पणे विचारपूर्वक बहिष्कार घालून धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां राजकीय व्यक्तींना कार्यकर्त्यांना जाहीरपणे धडा शिकवा.त्यांच्या धम्मा परिषदला आमचा विरोध नाही,पण त्यांनी दोन दगडावर पाय ठेऊन एका बाजूला मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून  शिक्षणात,नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती घ्याच्या आणि दुसरीकडे कट्टरपंथीय हिंदू म्हंणून मनुवादी राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने आमची प्रगती झाली, मुले झाली,त्यांना नोकरी लागली असे बेशरमपणे सांगायचे हे सत्य असेल तर सरकारच्या जातीच्या कोणत्याही सवलती घेऊ नये,मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून शिक्षणात,नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती बंदच झाल्या पाहिजेत.विशेष स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजणाऱ्या गणपती उत्सव, नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या गद्दारांना घरात घुसून मारले पाहिजे. स्वताच्या धर्माचा अपमान करून हिंदू धर्माच्या प्रवित्र देवाचा उत्सव साजरा करून धम्मा परिषेदा घेणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना राजकीय व्यक्तींना जाहीरपणे धडा शिकवला पाहिजे.आणि त्यांनी स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजू नये,हिंदू धर्मात किड्या मुंगी सारखे जगावे की मरावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.म्हणूनच मी असे लिहतो अशा धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां राजकीय व्यक्तींना जाहीरपणे धडा शिकवा.  
    हे स्वातंत्र्य त्याला भारतीय संविधानाने दिले.पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्ट त्याग जिद्दीमुळे आणि अपमानास्पद वागणूक सहन करून मिळवुन दिला.त्यांच्याशी बेईमानी करून कोणी धम्माच्या विरोधात वागत असेल तर त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे,हे काम आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून करतो. असे समजून सांगून प्रबोधन करून ऐकत असेल तर त्यांचे समाज स्वागत करतो,आणि ऐकत नसेल तर त्याला पाणी पिण्याचा,शिक्षण घेण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोणी दिला मनुवादी पक्षाने कि भारतीय संविधान लिहलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी. 
       मनुवादी विचारांच्या पक्षाने मागासवर्गीय,आदिवाशी,अल्पसंख्याक  समाजातील नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री,उपप्रधानमंत्री आणि राष्ट्रपती केले. तरी त्याला त्यांच्या जातीच्या समाज व्यवस्थेनुसार वागणूक दिली जाते.आणि मिळते हा इतिहास आहे.हे माहीती असूनही कोणी स्वताला समाजा पेक्षा जास्त मोठा समजून व्यक्तिगत पातळीवर त्याच्या मना सारखा वागत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत पातळीवर अधिकार आहे. हे आमचे व्यक्तिगत मत नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीला समज देऊन समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी प्रबोधन आहे.
     ज्यांना वाटत असेल कि मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविल्याने  त्यांची जात बदली झाली असेल तर त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष वाचावा.देश स्वातंत्र्य झाल्यावर देशाचे उपप्रधानमंत्री झालेले बाबू जगजीवनराम, रामनाथ कोविंद,द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यावरही यांना माणूस म्हणून हिंदुच्या मंदिरात प्रवेश नव्हता.त्यांचे शिक्षण,त्यांचं पद याच हिंदू धर्माच्या समाजव्यवस्थेला काहीच मान्य नव्हते.मग मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माच्या लोकांनी  मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविल्याने भटा,ब्राम्हणांच्या नियंत्रणा खाली असलेला सुवर्ण मराठा समाज मान्य करेल काय?.
    काही राजकीय दलाली करून स्वताचे अस्तित्व टिकविणारे लोक असतात.ते याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगतात.स्वता वैचारिक प्रबोधन करीत नाही आणि प्रबोधन करणाऱ्यांचे मानसिक दुष्ट्या खच्चीकरण करतात.अशा स्वार्थी बेईमान कार्यकर्ता नेत्यांना समाजाने योग्य वेळी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.काही उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी कलावंत मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविनाऱ्या व्यक्तीचे समर्थन करतात.त्यांच्याकडे आंबेडकरी चळवळीचे निर्लज राजकीय नेते जातात.त्यांची समाजात चर्चा होते पण इलाज होत नाही.समाज मान्यताप्राप्त संस्था,संघटना निर्णय घेण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच मी असे लिहतो की अशा मनुवादी विचारांच्या पक्षात काम करून पद भूषविनाऱ्या आणि धम्मपरिषद मध्ये ढवळाढवळ करणाऱ्यां राजकीय व्यक्तीच्या प्रमुख उपस्थिती वर जाहीरपणे बहिष्कार टाकून धडा शिकवा.
सागर रामभाऊ तायडे-९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत भेद नसावा.

 शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत भेद नसावा.



बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो,तेव्हाचे मित्र आणि नथीयबाई विद्यालय सूनगांव येथील मित्र यांची भेट वर्षातून एकदा लग्ना निमित्य किंवा कामा निमित्याने गांवी गेल्यावर होते. तेव्हा मित्रांच्या घरी चहा,फळाल,कधी जेवण होत असते.पण गेट टू गेदर होत नाही.मी मुंबईत नोकरीत असलेल्या मित्रांना गेट टू गेदर घेण्यासाठी तयार करतो. लोणावळा,माले बंगला मुळशी,अलिबाग येथे दरवर्षी गेट टू गेदर होत असते.त्यात पद ग्रेड,कर्मचारी अधिकारी आणि गरीब श्रीमंत असा भेद बिलकुल नसतो.तसाच शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत भेद नसावा असे सर्वांना वाटले पाहिजे.
     शहरात जाऊन सरकारी नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी,डॉक्टर,वकील, प्राध्यापक मित्र आणि पदवीधर असूनही नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करणारा मित्र.मित्राबरोबर कोणतीही चर्चा केली तर बायकोला सांगणारे मित्र आनंदी सुखी समाधानी असतात.त्यामुळेच नवऱ्याच्या वागणुकीतील बदल बायकोच्या नजरेतून सुटत नाही.असा मित्रांची ही गोष्ट आहे. मित्रांच्या बायकोला याबाबत माहिती होती.मित्राने लागवडीचं मधेच काय काढलंय? बायको ओरडली,उद्या रविवार आहे,कामाला बाया मिळणार नाहीत.आणि उद्या तुमचं गेटटुगेदर पण आहे ना?.मला गेटटुगेदरला जायचं नाही! मी शांतपणे बोललो,उद्याच्याला लागवड करून घेऊ.इतके दिवस गेटटुगेदर,गेटटुगेदर नाचत होता आणि आज काय झालं? अचानक काढलेल्या कामाने बायको वैतागली होती.मला जायचं नाही.विषय संपला!.
   रविवारच्या दिवशी दिवस आणि सवयीनी बायका रोज पण जास्त मागतील.मला बाहेर जाताना बघून बायको कुरकुर करू लागली.रविवारची लागवड करायची तिची इच्छा नव्हती.बायांनी किती पण रोज घेऊ दे.लागवड उद्याच करायची!.मागच्या काही वर्षांत दहावीचं स्नेहसंमेलन घेण्याची टूम निघाली आहे.आमच्याही वर्गमित्रांनी स्नेहसंमेलन घ्यायचं ठरवलं.माझ्यासह गावातील काहीजण एकत्र आले आणि कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. स्नेहसंमेलनाच्या आयोजक समितीत मीही होतो.गावात राहणारे वर्गमित्र सोडले तर दहावीच्या बॅचमधली बरीचशी मुलं संपर्कात नव्हती.मुलींचंही तसंच.लग्न होऊन त्या सासरी नांदत होत्या. क्वचित एखाद दुसरीची भेट व्हायची."दादा, उद्या तुमचं गेट-टुगेदर आहे नां?" रविवारच्या दिवशी मालकाने कांदा लागवडीचा घाट घातल्याने गडी बावरला होता. त्या बिचाऱ्यालाही रविवारची सुट्टी हवी असते. "उद्या कार्यक्रम आहे पण मी जाणार नाही.आपली लागवड महत्त्वाची आहे." मी तिरसटपणे बोललो.माझा मूड बघून तो गप्प बसला.रविवारचं काम करणं कुणाला आवडतं? स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला आणि व्हाट्सअप ग्रुपवर मॅसेजचं प्रमाण वाढलं.कोण कुठे आहे,काय करत आहे याची कल्पना येऊ लागली. 
गावातली म्हणजे आमच्याच वर्गातली कितीतरी पोरं-पोरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होती. काही पदव्यांनी मोठे झाले होते,काही अधिकारांनी तर काही पैशांनी.आमच्यातले काही कंपनीत कामगार झाले,काही नोकरदार,काही डॉक्टर,वकील,काही इंजिनियर,काही प्राध्यापक तर काही सरकारी अधिकारी. दोन वर्गमित्र तर सैन्यात भरती झाले होते. काही पोरी देखील पोरांना लाजवतील अशा पदांवर काम करत होत्या. 
स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला तसा माझ्यातला न्यूनगंड जागा होऊ लागला.कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी,शनिवारी संध्याकाळी,आम्ही सात-आठ जण शाळेत जमलो.कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.दिलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडली होती.आता कार्यक्रमात उपस्थित राहणं एवढाच भाग शिल्लक होता.प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझ्याकडे कसलीच जबाबदारी नव्हती.त्या रात्री मला झोप येईना.वर्गात माझ्या शेजारी बसणारा,अभ्यासातही कायम माझ्या मागे असणारा राटे आता महसूल अधिकारी झाला होता.आमच्या वर्गातला साळवी, ज्याच्या घरी त्या काळात खाण्यापिण्याचे वांधे असायचे, किलोस्कर न्यूमॅटिकमध्ये सिनिअर इंजिनियर झाला होता.कायम मागच्या बेंचवर बसून धिंगाणा घालणारा जाधव आता मोठा बिल्डर झाला होता.एवढंच कशाला? केदारी नावाची मुलगी,जी कुणाला आठवतही नव्हती,झेडपीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परीषद सदस्या झाली होती. ढेरंगे आडनावाचा पोरगा,ज्याला शाळेत असताना चप्पल घालायला मिळाली नाही, तो आता क्लास-वन ऑफीसर झाला होता.मला खरं कौतुक वाटलं परटाच्या मोडकाचं! आम्ही एकमेकांना आडनावानेच हाका मारायचो. तो मला लोखंडे म्हणायचो आणि मी त्याला मोडक. खालच्या आळीत त्यांची लाॅन्ड्री होती. त्या काळात कोण रोज कपड्यांना इस्त्री करत होतं? मोडकाची लाॅन्ड्री फारशी चालत नसे. त्याच्या घरी कायमची तारांबळ.ज्या दिवशी तो डबा आणत नसे, त्या दिवशी त्याला मी माझ्या घरी जेवायला नेत असे.तोच एके काळचा गरीब मोडक आता जर्मनीत नोकरी करत होता. इंग्रजीबरोबर जर्मन भाषा शिकला होता. दहावीनंतर तो शहरात मामाकडे शिकायला गेला आणि त्यानंतर आमचा संपर्कच झाला नाही. आता व्हाट्सअप ग्रुपवर पोरं-पोरी त्याचं कौतुक करत होते. खास स्नेहसंमेलनासाठी भारतात येणार म्हणल्यावर मोडक आमच्यासाठी सेलिब्रिटी झाला होता. 
एकदा मला मोडकला व्हाट्सअपवर "हाय" करावसं वाटलं होतं. पण नंतर म्हणलं आता मोडक मोठा माणूस झालाय. त्याने आपल्या "हाय" ला रिप्लाय दिला नाही तर? एक मन असंही सांगत होतं की मोडक स्वतःच मला फोन करेल.पण त्याचा फोन आला नाही.वर्गातल्या बऱ्याचशा मुला-मुलींनी केलेली प्रगती बघून मला प्रश्न पडले. मला काय कमी होतं? मी का प्रगती करू शकलो नाही? वर्गात माझी गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती. आमच्या घरची परिस्थिती चांगली होती. वडील मोठे शेतकरी होते. तरीही मी एवढा मागे का राहिलो? मी शिकलो नाही असं नाही.माझं पोस्टग्रॅज्युएशन झालं.पण कॅरियर म्हणून जी जडणघडण व्हायला हवी होती ती झाली नव्हती.मला चिंता लागली. आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मित्र-मैत्रिणीना उद्या तोंड कसं दाखवायचं?" सर्वजण विचारणार, "तू आता काय करतो?" त्यांना काय सांगायचं? शेवटी मी ठरवलं. गेट-टुगेदरला जायचंच नाही.त्या रात्री नीट झोप आली नाही.पहाटेच उठलो.हळूहळू उरकलं.सहा वाजता ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून शेतात गेलो. बरोबर गडी होताच.सकाळी सकाळी आम्ही कांद्याचं रोप उपटायला सुरुवात केली.आठ वाजता रोजंदारीवरच्या बायका हजर झाल्या.बायको त्यांच्यामागे होतीच.मी पाण्याच्या बाऱ्यावर तर गडी कांद्याचं रोप वाफ्यांनी टाकत होता. वावरात लागवड चालली असली तरी माझं मन शाळेतच होतं.फोन सायलेंट मोडवर ठेवलेला.आज मी कुणाचा फोन घेणार नव्हतो. दहा वाजेपर्यंत कुणाचा फोन आलाही नाही.साडेदहानंतर मात्र खिशात ठेवलेला मोबाईल थरथरू लागला. दोन-तीन वेळा तसं झाल्यावर मोबाईल चेक केला तर मित्रांचे मिस्ड कॉल. न पाहिल्यासारखं करून मोबाईल खिशात ठेवला.अकरा वाजल्यानंतर एसएमएस येऊ लागले. नेट चालू केलं तर व्हाट्सअपवर धडाधड मॅसेज पडू लागले. कार्यक्रमालाच जायचं नाही त्यामुळे मॅसेजला उत्तर द्यायचा किंवा कॉलबॅक करायचा प्रश्न नव्हता.विहिरीवरून आणलेल्या पाईपलाईनचं पाणी पाटाने खळखळत पुढे सरकत होतं.बारं दिल्यावर लोण्यासारख्या मऊ मातीचे गादीवाफे पाण्याने टरारून भरत होते. माझंदेखील मन शाळेच्या आठवणींनी भरून आलं होतं.शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीतील गरीब श्रीमंत भेद माझ्या मनात सारखा घोळत होता. 
   पहिली ते चौथी मराठी शाळा आणि पाचवी ते दहावीतली हायस्कूलची वर्षे डोळ्यांपुढे उभी राहिली.मला माझ्या मित्र-मैत्रिणींना खरंच खूप भेटावंसं वाटत होतं.पण काय करणार? मी शेतकरी माणूस. त्यांच्यापुढे कसा जाणार? त्यांना काय सांगणार? स्वतःबद्दल सांगताना "एवढं शिकूनसुद्धा मी मातीत मरतोय" हे सांगू?.आता सर्वजण हॉलमध्ये बसले असतील.आता दीपप्रज्वलन चाललं असेल.आता प्रमुख पाहुणे सरस्वती पूजन करत असतील.आता आमची वयोवृध्द शिक्षक मंडळी व्यासपीठावर बसली असतील.आता माझे मित्र व मैत्रिणी समोरच्या खुर्च्यांवर बसून शिक्षकांची मनोगतं ऐकत असतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतलेला बर्वे आत्ता डायसपुढे उभा बोलत असेल.कार्यक्रमाचा आराखडा आम्हीच बनवला असल्याने ते नियोजन मला पाठ होतं. मनगटावरच्या घड्याळात बघून आता तिथे काय चालू असेल याचा अंदाज मी बांधत होतो. कांद्याची लागवड चालू असलेल्या वावरात उभा असतो तरी मनाने मी शाळेतच होतो.पुढे जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाबरोबर स्नेहसंमेलनात काय घडत असेल याचं चित्र डोळ्यांपुढे उभं राहत होतं.मला मित्रांची,मैत्रिणींची आठवण क्षणोक्षणी येत होती. पण कार्यक्रमात बिझी असलेल्या मित्रमैत्रिणींना माझी आठवण येत असेल का? माझी शंका निराधार होती.जसा इथे मी त्यांना मिस करत होतो, तसं तेदेखील मला मिस करत होतेच की! त्याशिवाय का एवढे मिस्ड कॉल आणि मॅसेजेस आलेत?.अचानक विचार आला. आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या,श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय! पाण्याची बारी देतोय! चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय! या कल्पनेनेच मला कसंतरी झालं.बघता बघता दुपार उलटली.कार्यक्रम सोडून आपल्याला बोलवायला कुणी येणार नाही हा विश्वास खरा ठरला. चुकून जर कुणी आलंच तर लागवडीला माणसं कमी आहेत, बाया घेतलेल्या आहेत,मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगता आलं असतं. 
लागवडीचं काम जोरात चाललं होतं.रविवार असल्याने बायांना काम उरकून घरी जायची घाई होती.तसं बघता दुपारपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम झालं होतं. चार वाजताच लागवड उरकली तर? मग काय करायचं? बायको म्हणेल, "गेटटुगेदरला जा." पण मी तर तिथे जाणार नव्हतो. आता तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू असेल. मुलं-मुली एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत असतील.जुन्या आठवणी काढून हसत असतील.एकमेकांचं कौतुक करत असतील.नकळत मी माझी तुलना मोडकशी करू लागलो.तो जर्मनीत सेटल झाला असला तरी मीही गावातला एक मोठा शेतकरी होतो.आम्हाला मूळचीच जमीन जास्त.त्यात मी माझ्या कष्टाने अजून भर घातली होती. आज गावात माझ्याइतकं क्षेत्र कुणालाही नव्हतं.पण मोठा शेतकरी असूनही वावरात काम करायची माझी खोड मोडली नव्हती.स्वतःच्या वावरात काम करायला कसली लाज? 
चार वाजता लागवड संपली.बायामाणसं घरी गेली.गडी संध्याकाळच्या धारांची तयारी करायला गोठ्यावर गेला. बायको "घरी चला" म्हणाली पण मी गेलो नाही.तिथेच बांधावर बसून राहिलो. डोक्यात पुन्हा एकदा तेच विचारचक्र सुरू झालं. एव्हाना कार्यक्रम उरकला असेल.चारपर्यंतचीच वेळ होती.आता पाच वाजून गेले होते.आता सगळे घरी निघाले असतील.मी सुटकेचा निश्वास टाकला.पण नंतर माझ्या विचारांची दिशा बदलली.मला स्वतःचा राग आला.आपण आपल्या आयुष्यात काही करू शकलो नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपली मित्रमंडळी 'ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही केलं आहे' त्यांचं मला कौतुक का करावं वाटलं नाही? शाळेत ज्या मित्रांबरोबर खेळलो,अभ्यास केला,मार खाल्ला,त्यांच्या यशाचा मला हेवा वाटावा? त्यांचं कौतुक करण्याचा मोठेपणा माझ्यात नाही? विचारांच्या या वेगळ्या प्रवाहाने स्नेहसंमेलनाला न जाऊन आपण चूक केल्याचं लक्षात आलं.जे नशिबात होतं,ते आपल्याला मिळालं. पण ज्यांनी स्वःतचं नशीब घडवलं,त्यांचं कौतुक मी करायलाच हवं! शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीतील गरीब श्रीमंती याचा मी विचार करायला नको होता.
विहिरीवर जाऊन हातपाय धुवावेत,घर गाठावं आणि कपडे बदलून शाळेत जावं. तिथे गेल्यावर सांगता येईल की अचानक लागवडीचं ठरलं.मी धावतच विहिरीवर गेलो. मोटर चालू केली.विहिरी जवळचा एक आउटलेट खोलला.पाटात उतरून हातपाय धुवू लागलो.हातपाय धुताना मला जुने दिवस आठवू लागले.आमच्या घरापुढे पाण्याचा हापसा होता.शाळा घराजवळच असल्याने पोरं सकाळ संध्याकाळ हापशावर यायची. सकाळी पाणी प्यायला हापशावर,दुपारी डबे धुवायला हपश्यावर,संध्याकाळी हातपाय धुवायला हापशावर.घरापुढच्या बाभळीवर जशा दिवसभर चिमण्या दिसायच्या तशीच हापशावर दिवसभर पोरं दिसायची.आमचं घर माझ्या मित्रांसाठी "आओ जाओ, घर तुम्हारा" होतं.हापशाच्या आठवणींनी मी पुन्हा एकदा लहान झालो होतो. स्वतःचं देहभान हरवून बसलो होतो. माझ्यातला लहान मुलगा पाटातल्या पाण्यात खेळत होता.पाईपमधून बदाबदा पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने बांधावरून चालत येणाऱ्या बडबडीकडे माझं लक्ष गेलं नाही. मान वर करून पाहिलं तर काय दिसलं? सणवाराला घालावेत तसे खास कपडे घातलेल्या मित्र-मैत्रिणी बांधावरून चालत माझ्याकडे येत होत्या.त्या सगळ्यांना शेतावर आलेलं बघून मला गुदमरल्यासारखं झालं.आपण कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून सर्वजण इकडे आले काय? 
आज स्नेहसंमेलनाला सत्तर विद्यार्थी आल्याचं समजलं. त्यातले वीस जण माझ्याकडे आले होते.एवढ्या सगळ्यांत मी मोडकला लगेच ओळखला.तो माझ्याकडे बघून हसला पण काही बोलला नाही.तो वेळ काढून माझ्याकडे आला होता हेही महत्त्वाचं होतं.मला मोडकशी बोलावं वाटत होतं.पण एवढी पोरं-पोरी खास माझ्यासाठी आलेली. कोण काय बोलतंय कळत नव्हतं.एवढ्यातून एकट्या मोडकचीच चौकशी कशी करायची? तसा मोडकही फारसा बोलका नव्हता.शाळेत असताना मोडक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा होता.आजही तो गालातल्या गालात हसत होता.क्षणभर वाटलं,मोडक त्याची पोझिशन दाखवायला तर आला नाही? "लोखंडे,बघ,आज मी कुठे आणि तू कुठे!" 
  "गेटटुगेदरला का आला नाहीस? एवढा कामदार लागून गेलास की काय?" बोरावकेने विचारलं.ही बोरावके वर्गात सुध्दा खूप बडबड करायची. "तू आम्हाला भेटायला आला नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो" असं म्हणून जांभळेने मला लाजवलं.आता खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता.शिवाय मित्रांशी खोटं बोलणं मला जमणारही नव्हतं. "तुमच्यापैकी बरेच जण नावाजलेल्या कंपन्यांत, मोठमोठ्या पदांवर काम करत असताना मी मात्र आहे तसाच राहिलो. त्यामुळे कार्यक्रमाला यायची लाज वाटली." मी खरं ते सांगितलं. "अरे राजा,आम्ही करतोय ते तर कुणीही करेल. पण तुझ्यासारखा शिकला-सवरलेला मुलगा शेती करतोय याहून चांगली गोष्ट कोणती? तू सुध्दा पोस्टग्रॅज्युएट झाला आहेस.ठरवलं असतं तर तुही हवी तशी नोकरी मिळवली असती! पण तू शेती करायचं ठरवलं.तू नुसती शेतीच केली नाहीस तर तुझ्या वडिलांच्या सातबाऱ्यातलं क्षेत्रही वाढवलं!" बर्वेने मोठं भाषणच दिलं. "मुख्याध्यापकांनी तर भाषणात तुझं आवर्जून कौतुक केलं.तू शेती करतोय याचा त्यांना अभिमान आहे." कोलतेने त्या भाषणाची आठवण करून दिली आणि इतरांनी माना हलवून माझ्याकडे कौतुकाने पाहिलं "तुला आमचा अभिमान आहे की नाही माहित नाही," शाळेत असताना वर्गात कधीच न बोललेली वरपे म्हणाली, "पण आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे." खरं तर मी मित्रांची चौकशी, कौतुक करायचं तर तेच माझी चौकशी,कौतुक करू लागले. मी एकटा आणि ते एवढे सगळे. ते मला बोलूही देईनात. मग विचार केला,हॉटेलात नेऊन सर्वांना चहा पाजावा. तिथं सर्वांशी बोलता येईल. 
"काय लोखंडे,ओळखलं का नाही?" बराच वेळ माझ्याकडे बघत असलेला मोडक शेवटी बोलला."तुला ओळखणार नाही असं कधी होईल का?" इथेसुद्धा माझा इगो आडवा आला होता.मोडक बोलल्यावरच मी त्याच्याशी बोललो होतो. "एक काम करू.इथं एक नवीन हाॅटेल झालंय.आपण तिथं चहा घेऊ." मी पुढे म्हणालो. 
"दोस्ता,शाळेत असताना मला घरी नेऊन जेवायला घालायचा आणि आता इथे हॉटेलवर चहा पाजून परत पाठवणार का?" मोडकच्या प्रश्नाने मला लाजवलं.माझी त-तं-म-मं झाली.मोडकने पुढे केलेला हात मी माझ्या हातात घेतला. त्या हस्तांदोलनात तीच पूर्वीची उब होती,प्रेम होतं,आपुलकी होती. "मी मिसेसला सांगून आलोय की भारतात गेल्यावर लोखंडेच्या घरी जाऊन बाजरीची भाकर उडदाच्या आमटीत चुरून खाणार..." मोडक असं बोलताच माझे डोळे भरून आले.त्याला भाकर चुरून खायला, बुक्कीत कांदा फोडायला मीच शिकवलं होतं. मोडक अजून काही बोलला असता तर मी पोरींसारखा रडलो असतो. 
"काय रावऽ तुझं आडनाव लोखंडे आणि वाफ्यात पाणी शिरल्यावर ढेकूळ विरघळावं तशी तुझी अवस्था व्हावी?" असं विचारताना घेनंदने हसण्याचा प्रयत्न केला पण तो डोळ्यांच्या खालच्या कडा बोटांनी कोरड्या करत होता. त्या क्षणी बऱ्याच जणांच्या डोळ्यांत पाणी आलेलं. आपलं रडकं तोंड दिसू नये म्हणून सर्वजण इकडे-तिकडे बघत होते.शेवटी मीच कसंबसं हसलो. खिशातला रुमाल काढून तोंड पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मित्र-मैत्रिणींना "चला,माझ्या घरी जाऊ" म्हणालो. शेवटी मित्र परिवार हाच खरा सुखदुःखात सहभागी होणारा मित्र परिवार असतो तो भेटला की अनेक वेळा मनात साठवून ठेवलेल्या वेदना मोकळ्या करता येतात.मित्राबद्दल मनात खूप काही असते पण व्यक्त होता येत नाही. कोण कसा मोठा अधिकारी किंवा पैसेवाला, त्याला समाजात मिळणारी प्रतिष्ठा,मान सन्मान यासमोर आपण स्वतःला कमी समजून भेटणे टाळतो पण रिकाम्या वेळी किंवा झोपताना त्यांची आठवण आपोआप होत जाते.
   मी सतत कामगार नेता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्या मिटिंग सभा घेत असतो,आणि १९९४ पासून विविध वृत्तपत्रात नियमितपणे लिहत असल्यामुळे त्यांचे शब्दांकन करून ठेवतो,त्यांना एकत्र केले की उत्तम संकलन केलेला लेख तयार होतो. गेट टू गेदर हे एक औषध हा लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या,त्यात लक्षवेधी सुभाष कुलकर्णी चाळीस वर्षे भांडुपच्या दादा सावंत च्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करून सेवा निवृत्तीनंतर पुण्याला स्थाहीक झालेले त्यांनी तिथे जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला,आणि १२० जेष्ठ नागरिक संघाचा महासंघ बनविला त्यांच्या वतीने ते दरवर्षी विविध कार्यक्रम राबवितात.अनेक सेवानिवृत जेष्ट नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी शाळा कॉलेज आणि नोकरीतील मैत्रीत गरीब श्रीमंत,जात,धर्म प्रांत असा भेद कधीच नसावा.मैत्री खळखळ वाहणाऱ्य पाण्या सारखी निर्मल,स्वच्छ विचाराने केली तर कायम सुखादुखाच्या वेळी उपयोगी ठरते. तीच इतरांना प्रेरणा देते.काही लोक सेवानिवृतीनंतर एकटे का पडतात?. याचा विचार झाला पाहिजे. 
संकलन सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई.


गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी

 दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी 



     कृषिप्रधान भारत देशातील सर्वात मोठा सण दिवाळी,दीपावली,दीपोत्सव काही दिवसावर आला.सुरक्षित काम करणारा कामगार,कर्मचारी,अधिकारी दिवाळी बोनस सानुग्रह मिळण्यासाठी धमक्या इशारे द्याला लागला.त्याच बरोबर देशातील ९३ टक्के असंघटीत कामगार ही बोनस ची मागणी करायला लागला.ज्या कंत्राटी कामगारांना नियमित काम नाही,वेळेवर पगार नाही.किमान वेतन सुविधा नाही.ज्यांची एक मजबूत विचारांची संघटना,युनियन नाही.ज्यांचा जिल्ह्यात,राज्यात एक नेता एक विचारधारा नाही ते ही नगर परिषद,नगर पंचायत मध्ये आंदोलने करीत आहेत.काही ठिकाणी बोनस मागण्यासाठी युनियन बनवली म्हणून मारहाण करून कामावरून काढून टाकले.त्याच ठिकाणी दुसऱ्या कामगारांना कामावर घेतले.अशा अनेक समस्या असंघटीत कामगारांच्या असतांना काही नेते त्यांना दहा हजार,पंधरा हजार रुपये बोनस मिळावे यासाठी पत्रकाद्वारे सरकारला,प्रशासनाला धमक्या इशारे देतात.
      देशात सर्वात मोठा इमारत बांधकाम धंदा आहे.त्यात इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांची संख्ये लक्षवेधी आहे.ती आपणास कधी दिसत नव्हती पण २०२० ला देशाचे प्रधानसेवक देशभक्त इमानदार चौकीदारांनी बावीस मार्चला लॉक डाऊनची घोषणा केली. आणि तेवीस मार्चला देशभरातील शहरातुन वाळूलातून ज्याप्रमाणे मुंग्या बाहेर पडतात त्याप्रमाणे कामगार,मजूर बाहेर पडले,बाहेर गावी जाणाऱ्या मेल एक्सप्रेस रेल्वे,बस,ट्रॅव्हल एस टी सर्वच बंद करण्यात आल्या असतांना एवढ्या मोठ्या संख्येने कामगारांना मजुरांना बिल्डर,ठेकेदार,लेबर सप्लायर यांनी राहत्या जागा खाली करण्यास भाग पाडले. तेव्हा परप्रांतीय लोकांचा तिरस्कार करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे मराठी हृदय सम्राट गळा आवळून बोबळत होते.लाखोंच्या संख्येने परराज्यातील लोक मुंबईत कोणती ही  अधिकृतपणे नांव नोंदणी न करता कामे करतात. बिल्डिंगच्या आजूबाजूला,गटार,नाल्याच्या बाजूला,कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या जागेवर झोपड्या बनवुन राहतात.त्यांची मतदार यादीत नांव नोंदणी केली जाते. पण बाकी इतर नागरी सेवा सुविधा देण्यासाठी योग्य दखल योग्यवेळी घेतली जात नाही.बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत त्या कामगारांच्या झोपडीचा व झोपडपट्टीचा कोणालाच त्रास होत नाही. त्यावेळी त्यांना लाईट,पाणी जाहीर पणे चोरून विकत मिळते. अशा असंघटित कामगारांसाठी दि बिल्डिंग अँड अदर कॉन्स्ट्रुकॅशन ओरकर्स १ ऑगस्ट १९९६ हा  (The Building and other construction workers (Regulations of Employment and Conditions of Service) Act 1996 ) कायदा अस्तित्वात आला होता, त्यांची अंमलबजावणी काही राज्यांनी केली तर काही राज्यांनी असंघटित इमारत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी केलीच नाही.त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रचंड आंदोलने करावी लागली,आंदोलने करणाऱ्या संस्था,संघटना त्याचे कार्यकर्ते,नेते आज खूप मागे पडले आणि पोटभरणारे कार्यकर्ते नेते संघटनांचे भरपूर पीक आले आहे. त्यामुळेच दलाली,बोगस नांव नोंदणी रोख कमिशन मिळणाऱ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. म्हणूनच इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी झाला आहे.
   मुंबई ही भारताची औद्योगिक राजधानी आहे.या महानगरीत जेवढे इमारत बांधकामे व इतर दुरुस्तीचे कामे चालतात तेवढे कोणत्याही शहरात नसावेत.पण त्या कामाची आणि कामगारांची नोंद कोण घेते?. हे २३ मार्च २०२० ला सर्वांनी अनुभवले असेलच.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून बांधकाम कामगारांसाठी २८ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने १८ ते ६० वयाचे कामगार आपल्या व आपल्या कुटुंबासाठी विविध योजनाचा लाभ घेऊ शकतात. त्यांचा लाभ घेण्यासाठी अंशदान स्वरुपात शुल्क घेण्यात येते आज बांधकाम कामगार नोंदणी होण्यासाठी ९० दिवसांचा इंजिनिअरचा,किंवा ठेकेदारांचा दाखला गरजेचा आहे. त्यात प्रामुख्याने वर्षात ९० दिवस किंवा त्या पेक्षा जास्त काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पण जे एका जागेवर एकाच इमारतीच्या साईटवर बांधकाम कामगार म्हणून काम करतात त्यांना हे सोयीचे आहे. परंतु त्यांनी संघटना,युनियन म्हणून नांव नोंदणीचा आग्रह केला तर त्यांना ताबडतोब कामावरून काढले जाते. बिल्डर,ठेकेदार लेबर सप्लायर या कामगारांची अधिकृतपणे नांव नोंदणी न करता काम करून घेतात. त्यामुळेच मुंबईत इतर शहरात सर्वात जास्त इमारत बांधकामे सुरू असतांना ही इमारत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी नगण्य आहे. याला कोण कोण जबाबदार आहे?.मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांनी कोणत्या बिल्डर ठेकेदाराच्या कानाखाली जाल काढल्याचे पाहिले,वाचले आहे काय?.
   मुंबईसह प्रत्येक शहरांच्या नाक्या नाक्यावर हजारोंच्या संख्येने सकाळी कामगार एकत्र येतात व मिळेल तिथे कामासाठी निघून जातात.त्यांची अधिकृतपणे नांव नोंदणी कुठेच होत नाही. कारण त्यांना वर्षभरातुन ९० दिवसांचे प्रमाणपत्र कोणीच लिहून देण्यास तयार नसते.या नाका कामगारांचा मालक व कामाची जागा दर दोन तीन दिवसांनी बदली होत असते.अशा कुशल कारागीर कामगार,बिगारी कामगारां कडून काम करून घेतल्या जाते,पण कोणताही इंजिनिअर ठेकेदार,बिल्डर ९० दिवसाचा दाखला देत नाही. मग अशा बांधकाम कामगारांनी मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा.कल्याणकारी मंडळाने एक पुस्तिका कामगारांना काही महिन्यापूर्वी दिली त्यावर दररोज ज्या ठिकाणी ज्या मालकाकडे काम केले त्यांचे नांव मोबाईल नंबर लिहण्यास सांगितले आहे.तरी एकाही मालक नांव,नंबर सही देण्यास तयार नाही.कारण प्रशासनातील अधिकारी काय काय करू शकतात याचा अनुभव प्रत्येकांना असतो.यांचा सरकारी कामगार विभागांचे अधिकारी गांभीर्याने विचार करीत नाही. म्हणूनच इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी खात आहेत.
   नाका कामगार असंघटित आहे,बिल्डर ठेकेदार संघटित आहेत कामगार अधिकाऱ्यां सोबत त्यांचे साटेलोटे असल्यामुळेच मुंबईत बिनबोभाट इमारतीचे बांधकामे सुरू आहेत. शासनाने दिनांक ०६/नोव्हेंबर २०१५ रोजी शासन परिपत्रक क्रमांक २०१४/ प्र क्र ३५०/नवि २० यानुसार बांधकाम कामगारांची नोंदणी साठी धडक मोहीम घेण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात फक्त तीन लाख बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचे सांगितले जाते. यात राजकीय पक्षाचे बोगस कामगार किती आहेत,हे अनेकदा उघड होऊन ही कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही.कारण तेव्हा ते सत्ताधारी होते आज ते विरोधी पक्षात आहेत.खरा इमारत बांधकाम कामगार नांव नोंदणी पासून वंचित आहेत.साहजिकच बांधकाम कामगारांची नोंदणी न झाल्याने बहुतांशी कामगारांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार सेवाशर्ती नियम २००७ च्या नियम ३३(३)(c) मध्ये सुधारणा करण्यासाठी उधोग उर्जा व कामगार विभागाने दि १३/८/२०१४ रोजी पुढील अधिसूचना जारी करण्यात आली होती.पोट कलम (३) मध्ये  (आ) खंड ऐवजी पुढील खंडाचा समावेश करण्यात येत आहे.(१) नियुक्त मार्फत देणेत आलेले प्रमाणपत्र ज्या बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगारांचे सातत्य नसलेले अस्थायी/दैनंदिन स्वरुपाचे काम आहे आणि ज्यामुळे कामगारांना एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करावे लागते अशा बांधकाम कामगारांना संबंधित ग्रामपंचायतींचे,ग्रामसेवक किंवा संबंधित नगरपरिष,नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी प्राधिकृत अधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी निर्गमित केलेले (प्रमाणपत्र) उपरोक्त अधिसूचनेनुसार महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देऊ शकतात. याप्रमाणे दि ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत प्रत्त्येक महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक नाका कामगार यांना प्रमाणपत्र देण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्याबाबत आवश्यक कारवाई तात्काळ निर्णय जारी करण्यात आला होता. त्यांचे काय झाले?. याविरोधात अनेक जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या संघटना मोर्चे,धरणे उपोषण करतात.पण त्यांना आश्वासन शिवाय काहीच मिळत नाही. 
    कोणत्या जिल्ह्यात किती इमारत कामगारांची नांव नोंदणी झाली.मुंबईत किती झाली?. का मुंबईत इमारत बांधकामे नाहीत.मग बिल्डर ठेकेदार कामगार कुठून आणतात?.  कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांना हे दिसत नाही. सरकार,अधिकारी कर्मचारी आंधळे,बहिरे झाले आहे काय?. कारण इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी खात आहेत.ग्रामीण भागात काही प्रमाणात अंमलबजावणी झाली पण आता शासन निर्णय जारी करण्यात येवून आज  वर्ष झाली तरी शहरी भागात कोठेही शासन निर्णयानुसार काम झालेले नाही. याला कारण म्हणजे इमारत बांधकाम कामगार मोठया प्रमाणात असंघटित आहे.त्यातही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संघटना स्थापन करून कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्या ऐवजी अधिकाऱ्यांना हाताशी धरून दलालीच जास्त वाढवून ठेवली आहे. त्यामुळेच इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळ म्हणजेच इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी झाले आहे.
   बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देऊन त्यांची जबाबदारी कोण घेणार ही मानसिकता आज शासनाने निवडलेल्या अधिकारी वर्गाची आहे. एसीत बसून पन्नास हजार रुपयांच्या पुढे पगार घेणारे अधिकारी कर्मचारी बेजबाबदार पणे वागतांना उघड दिसत असतांना त्यांच्या विरोधात असंघटित कामगार संघटितपणे संघर्ष करीत नाहीत.म्हणूनच असंघटित कामगारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनांनी एकत्र येऊन शासन निर्णयानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करण्यास भाग पाडणे अन्यता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे.कामगारांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली की अधिकारी कामगारावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करू शकतात.पण कर्मचारी अधिकारी याने नियमानुसार काम केले नाही म्हणून त्यावर गुन्हा का दाखल केल्या जात नाही?.
     इमारत बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय असतांना महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायत,नगरपरिषद अधिकारी कामगार नोंदणी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असतात. त्यांच्या विरोधात संघटनांनी शासन निर्णायाचा अवमान केला म्हणून अधिकारी व कर्मचारी यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे आले पाहिजे.परंतु पोटभरण्यासाठी संघटना चालविणारे कार्यकर्ते नेते तसे करती ही असंघटित कामगारांनी अपेक्षा ठेऊ नये,आजच्या घडीला ऑन लाईन नांव नोंदणी होत आहे.तो खरा कामगार आहे की नाही हे तपासणारी यंत्रणा सरकार कडे नाही.त्यामुळेच बोगस नांव नोंदणी मोठ्या प्रमाणत झाली आणि होत आहे.आता त्यांना दहा हजार रुपये बोनस देण्याची मागणी जोर धरत आहे.म्हणजेच बोगस नांव नोदणी करणारा अधिकारी आणि दलाल पुन्हा त्यात आपला वाटा घेऊन दिवाळी साजरी करणार.यावर उपाय म्हणजे जे स्वता खरे इमारत बांधकाम कामगार आहेत.त्या असंघटित कामगारांनी स्वतःच कार्यकर्ता व नेता बनावे,त्यासाठी योजनेचा आणि कायद्याचा अभ्यास करावा नंतर सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करावा जर न्याय मिळत नसेल तेव्हा आंदोलन हा शेवटचा पर्याय उपलब्ध असतो.दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी याला उलटे करता येईल,अधिकारी दलाल उपाशी इमारत कामगार तुपाशी.यासाठी संघटीत होऊन संघर्ष करणे हाच एकमेव पर्याय आहे.करिता इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना प्रमुख पदाधिकारी यांना मी सागर तायडे जाहीर आवाहन करीत आहे.बांधकाम कामगार कृती समितीत सहभागी व्हा.पुढे हा संघर्ष तीव्र होणार आहे. असंघटीत कामगार हा सर्वात मोठा मतदार आहे. "जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी" तो ३०/४० टक्के जागृत झाला तर सर्वच राजकीय पक्षाची समीकरणे बदलू शकतो.ही ताकद असंघटीत कामगारात आहे.ती ओळखून जागे व्हा.
 
सागर रामभाऊ तायडे,9920403859,
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना 
संलग्न :- स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा?.

 इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा?.



  ‌    देशातील सर्वात मोठा उद्योग धंदा म्हणजेच इमारत बांधकाम धंदा,(बिल्डिंग कॉन्ट्रक्शन) यावरच अवलंबून असतात ९४ प्रकारचे कच्चा माल पुरवठा करणारे उद्योग धंदे व ९४ प्रकारचे असंघटित कामगार कारागीर ते सर्व बहुजन समाजातील वंचित आणि अशिक्षित अडाणी गरजू व्यसनी समजला जाणारा घटक म्हणजे मिळेल ते काम मिळेल ती मजूरी घेणारा आपला आणि आपल्या कुटुंबाचा कसाबसा अर्धपोटी उपाशी राहून उदरनिर्वाह करणारा असंघटीत कामगार.आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक वैद्यकीय दृष्ट्या अपंगत्व असलेला आणि गांव सोडून पोटभरण्यासाठी भटकणारा असा असंघटित नाका,कामगार म्हणजेचं इमारत व इतर बांधकाम करणारा कामगार.याचं  इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा?. टाकण्याचे जाहिरात वर्तमानपत्रात दिली जात आहे.
     इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे ध्येय उद्धेश आणि उद्धिष्ट हे कामगारांना कल्याणकारी योजनेची माहिती देऊन त्यांची नांव नोंदणी करून घेणे हे आहे.त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या म्हणजेच प्रत्येक गावात जाणाऱ्या एस टी वर तिन्ही बाजूला जाहिरात केली आहे.प्रत्येक डेपो,ग्रामपंचायत,पंचायत समिती मध्ये जाहिराती लिहून ठेवल्या आहेत.ते वाचून इमारत व इतर कामगार नांव नोंदणीसाठी जातात तेव्हा त्यांना समाधान कारक उतरे दिली जात नाही.कार्यकर्ते गेले तर कर्मचारी नाही असे उतर दिली जातात.असे असतांना ही करोडो रुपयांची जाहिरात करणारी मोबाईल येल्डी वाहनाची गरज काय?. तोच पैसा कामगारांची नांव नोंदणी करणाऱ्या कार्यालयात कर्मचारी अधिकारी यांना साधन सामुध्री साहित्य उपलब्द करण्यासाठी खर्च करावा.आणि कामगारांच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या कामगार संघटनेला प्राधान्य देऊन इमारत व इतर बांधकाम कामगारांना जास्तीतजास्त कल्याणकारी योजनेचा लाभ द्यावा. आणि इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा घालण्याची मानसिकता बदलावी.
       इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा उद्धेश आणि उद्धिष्ट डोळ्यासमोर ठून वागावे.ऑनलाईन ऑफ लाईन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण करावे,इमारत व इतर बांधकाम कामगारांना माहिती खूप मिळाली आहे.पण नांव नोंदणी करतांना मध्ये येणारे झारीतील शुक्राचार्य दलाल,एजन्सी भ्रष्टाचारी कर्मचारी यांचा बंदोबस्त झाला पाहिजे.तो होत नसल्यामुळेच ९३ टक्के असंघटीत इमारत कामगार कल्याणकारी योजने पासून वंचित आहेत.इमारत बांधकाम साईट वर कामगारांची खऱ्या अर्थाने नोंदणी झाली पाहिजे.ती कोणतीही संघटना करू शकत नाही.आणि कामगार संघटीत झाला तर मालक ठेकेदार सब लेबर सप्लायर,मुकादम या कामगारांची कामावरून आणि राहत्या ठिकाणावरून हक्कालपट्टी करतात.कामगार कार्यालयाचे अधिकारी त्याला मोबदला मलिदा मिळत असल्यामुळे नांव नोंदणीचे अभियान राबविण्यात असमर्थ आहेत.हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही.कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे आवश्यक असतांना त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे सेस करातून मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे.त्याचे योग्य पद्धतीने वाटप न होता जाहिरात बाजीवर मोठ्या प्रमाणात खर्च करून प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. म्हणूनच इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा?.घालण्याची जाहिरात केली जात आहे.ती सरकारने थांबवावी अन्यता प्रचंड जन आंदोलन उभे राहिल्या शिवाय राहणार नाही.
     देशातील असंघटीत कामगारांना संघटीत करून न्याय हक्क व अधिकार मिळवून देणारे महात्मा ज्योतीराव फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे हे आहेत त्यांनी त्यांनी १८८४ ते १८९० पर्यंत जो संघर्ष केला.त्यामुळेच कामगारांना रविवारची सुट्टी व आठ तास कामाची दिवटी मिळत आहे.आपल्या देशातील उच्चवर्णीयांना कोणालाही याची जाणीव आणि कणव नव्हती पण आपणं ज्या इंग्रजाना आपल्याला गुलाम केल अस म्हणतो त्यांनीच या बांधकाम व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मुंबई येथे पहिले कामगार कार्यालय स्थापन केले.त्यावेळचे लाॅरड लाईड यांनी हे काम आपल्या निदर्शनात पूर्ण केले.त्यावेळी संपूर्ण भारतात एकच कामगार कार्यालय होते. त्यावेळेपासून कार्यालयाने आजतागायत यशस्वीरीत्या कामकाज केले आहे.१९२६ साली या कार्यालयाचे नाव बदलून संचालक. माहिती व कामगार इंनटिलिजनस असे ठेवण्यात आले.१९३९ साली कामगार कार्यालये विभाजन करण्यात आले.१९४७ साली मुंबई कामगार कार्यालयाची पुनर्रचना करण्यात आली.१९५३ साली कामगार कल्याण मंडळांची स्थापना होई पर्यंत हे कामकाज कामगार कल्याण यांच्यामार्फत कामगार आयुक्त पाहत होते. १९७९ साली कामगार कार्यालयाची फेररचना करुन तीन विभाग करण्यात आले.विविध कामगार कायदे करण्यात आहे.कामगार आयुक्त यांचेकडून एकूण २४ कामगार कायदे तयार करण्यात आले. त्यामधील १९ कायदे केंद्रीय कायदे व उर्वरित ६ कामगार कायदे हे राज्यसरकार यांच्या अखरितयाखाली आहेत. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम,१९९६.इमारत व इतर बांधकामावर काम करणा-या कामगारांच्या सेवाशर्ती नियमित करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षा,आरोग्य,आणि कल्याणकारी योजना पुरविण्यासाठी व त्याशी निगडीत इतर सर्व बाबींच्या नियंत्रणासाठी हा अधिनियम अस्तित्वात आलेला आहे. ज्या आस्थापनेत गेल्या १२ महिन्यातील कोणत्याही एका दिवशी १० किंवा त्याहून अधिक बांधकाम कामगार किंवा इतर बांधकाम करणारे मजूर कामावर ठेवण्यात आलेले असतील, अशा सर्व आस्थापनांना हा अधिनियम लागू आहे.महाराष्ट्र शासनाने दिनांक ५ फेब्रुवारी २००७ रोजी जारी केलेल्या अधिसूचने अन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) नियम, २००७ लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे, दिनांक १ मी २०११ रोजी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापनाही केलेली आहे.यात कामगारांचे कमी आणि कर्मचारी दलाल एजंट यांचेच मोठे कल्याण झाले आहे.
    कामगार नोंदणीसाठी गाव गल्ली वस्ती तालुका शहर राज्य देश यामधून विविध संघटना सेवाभावी संस्था,कामगार संघटना,युनियन राजकीय सामाजिक संघटना याची निर्मिती करण्यात आली त्यांना शासकीय नोंदणी करुन कामगारांना न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी कामगार योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी शासनाने रजिस्ट्रेशन दिले होते.पण आता उलट झाले आहे.प्रत्येक कामगार संघटना, सेवाभावी संस्था, युनियन सामाजिक, राजकीय संघटना यांनी कामगारांना विविध योजना मिळवून देतो यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या लाभातील आपला आर्थिक वाटा अगोदरच निश्चित केला आहे.जागोजागी कामगार नोंदणी करणारे दुकाने उघडून ठेवण्यात आली आहेत.कर्मचारी अधिकारी यांना जो जास्त कमिशन देईल तोच या असंघटीत कामगारांचे "कामगार मेळावे" घ्याला लागले आहेत. त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती त्या त्या जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त अधिकारी कर्मचारी आपली हजेरी लावत आहेत. त्यामुळेच असंघटीत इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेचे लाभार्ती खरे कमी आणि बोगस जास्त होत आहेत.बोगस एक वेळा नांव नोंदी करू शकतो पण दुसऱ्यावेळी दलाल कर्मचारी आणि बोगस कामगार संघटना,सेवाभावी संस्था,राजकीय संघटना युनियन यशस्वी होऊ शकत नाही.कारण वर्ष भरात खऱ्या खुऱ्या कामगारांना आणि संघटनांना यांची माहिती झाली असते तेव्हा माझ्या सारखा कामगार प्रतिनिधी पत्रकार अभ्यासक यावर हे सर्व लिहू शकतो. म्हणूनच मी लिहतो की इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या निधीवर दिवसा ढवळ्या दरोडा आहे,याविरोधात इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनांनी हे निविदा मागे घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन द्यावे,अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष - सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.
             

भिक्खू सर्व लोकांना धम्माच्या प्रकाशाने प्रकाशित करतो.

 भिक्खू सर्व लोकांना धम्माच्या प्रकाशाने प्रकाशित करतो.



वर्षावास समारंभ व कठिण चिवरदान संपन्न 
विशेष प्रतिनिधी मुंबई- 
"यो हवे दहरो भिक्खू युज्ज्ती बुद्धशासने,सोम लोकं पभासेती अब्भा मुत्तोव चंदिमा"
याचा अर्थ जो भिक्खू कमी वयामध्ये प्रवज्जीत होऊन बुद्ध शासणात सहभागी होतो.तो भिक्खू जशाप्रकारे चंद आकाशात सर्व तारे व ग्रहांना प्रकाशित करतो.तशाच प्रकारे तो भिक्खू सर्व लोकांना धम्माच्या प्रकाशाने प्रकाशित करतो.  
भगवान बुद्धाने हिमालयाच्या अनवतप्त सरोवरात पाचशे अरहन्तांसमवेत कठिण चीवर दानाचे फळ अपरिमित असल्याचे अनेक गाथांमधून विशद केलेले आहे. बुद्ध विनयानुसार ज्या विहारात भिक्खु वर्षावास अधिष्ठान करतात त्या विहारात कठिण चीवर दान सोहळा आयोजित करुन उपासक उपासिका यांनी अधिष्ठानीत भिक्खु यांना कठिण चीवर अनुमोदन करायचे असते. 
पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली जयभिम नगर बुद्ध विहार हिरानंदानी पवई येथे पूज्य भदंत संघप्रिय,पूज्य भदंत शिलबोधी,पूज्य भदंत पद्मपाणी,पूज्य भदंत बोधीशील,पूज्य भदंत उपली,पूज्य भदंत करुणासागर यांनी वर्षावास काळामध्ये विविध अभिनव उपक्रम राबविले आहेत,पवई परिसरातील संपूर्ण बुद्ध विहारामध्ये जाऊन धम्म देशना देऊन उपसाकांमध्ये धम्माविषयी जनजागृती केली.तथागतांचे बाबासाहेबांचे विचार सांगून उपासक उपासिकांमध्ये बुद्ध धम्म,आणि संघ या तिन्ही रत्नाप्रती श्रद्धा निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे.त्या सर्व उपक्रमाचा व वर्षावासाचा सांगता समारोप दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून थाईलंड आणि लाओसा या देशातील भिख्खू,भिख्खूनी उपासक,उपासिका लाभली होती. त्याच बरोबर वर्षावास अधिष्ठान पुण्यवितरण व कठिण चीवरदान सोहळ्यास महाराष्ट्र व भारतातील वरिष्ठ भिक्खू संघाच्या मंगलमय उपस्थितीमध्ये रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. 
"कठिण चीवर" म्हणजे एका रात्रीत रूई पासून तयार केलेले चीवर होय. परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याकडे तयार असलेले चीवराला कमीत कमी पाच भिक्खुंसमोर आणून "इमं कठिण चीवरं भिक्खुसंघ देम, कठिणं अत्थरितुं" असे बोलून संघाला दिले जाते. यावेळी 'विनय कम्मवाचाचे' पठण केले जाते.जयभिम नगर बुद्ध भूमी वेलफेयर असोसिएशन द्वारा मुंबईतील उच्चभू हिरानंदानी गार्डन कोलगेट ऑफिस समोर पवई मध्ये जयभिम नगर बुद्ध विहारात कठिण चीवर दानोत्सव या कार्यक्रमांसाठी दान पारमिता संपादन करण्यासाठी मुंबईतील जागरूक उपासक उपासिका दरवषी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.मुंबईतील जागरूक उपासक -उपासिका यांनी दान पारमिता चीवर दान १,५०० + अन्य भोजन खर्च देऊन पुण्य संपादन करून सहपरिवार उपस्थित राहून व अनमोल मानवी जीवनातील पारमि वृद्धिंगत केली.
पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो (बुद्धगया) पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो (संघानुशासक) पूज्य भदंत धम्मरत्न,पूज्य भदंत शांतीरत्न,पूज्य भदंत विरत्न,पूज्य भदंत के.आर लामा थेरो,पूज्य भदन्त धम्मरत्न महाथेरो,पूज्य भदंत डॉ.एन.आनंद महाथेरो,पूज्य भदंत शासनक्रांती महाथेरो,पूज्य भदंत संघकिर्ती महथेरो,पूज्य भदंत विनयबोधी महाथेरो,पूज्य भदंत करुणाज्योती महाथेरो,पूज्य भदंत मिलिंदबोधी महाथेरो,पूज्य भदंत ज्योतीरत्न महाथेरो,पूज्य भदंत संघपाल महाथेरो,पूज्य भदंत बोधिशील थेरो,पूज्य भदंत बोधानंद थेरो,पूज्य भदंत सुगतानंद थेरो,पूज्य भदंत महामोग्गल्यान,पूज्य भदंत कीर्तीपियो पूज्य भदंत नागसेन,पूज्य भदंत बोधानंद थेरो,पूज्य भदंत सारिपुत्त,पूज्य भदंत महिंदानंद,पूज्य भदंत विनयबोधि,पूज्य भदंत धम्मपाल,पूज्य भदंत म्मतप,पूज्य भदंत विनयशील,पूज्य भदंत संघरत्न,पूज्य भदंतदीपंकर,पूज्य भदंत शांतीरक्षित, पूज्य भदंत सत्यधम्म,पूज्य भदंत संघसेन,पूज्य भदंत गुनरत्न,पूज्य भदंत सदानंद,पूज्य भदंत अधिचित्तो,पूज्य भदंत आनंद,पूज्य भदंत बुद्धप्रिय,पूज्य भदंत म्मराज,पूज्य भदंत कीर्तीबोधी,प्रियरत्नबोधी,पूज्य भदंसंघरत्न,पूज्य भदंत सम्यक बोधी,पूज्य भदंत सारीपुत्त,पूज्य भदंत मुदितानंद,पूज्य भदंत महेंद्र,पूज्य भदंत संघपाल,पूज्य भदंत महेंद्रबोधी,पूज्य भदंत दीपंकर,पूज्य भदंत बोधिधम्म,पूज्य भदंत भद्रशील,पूज्य भदंत अमृतानंद बोधी,पूज्य भदंत करुणानंद,पूज्य भदंत कश्यप,पूज्य भदंत नागसेन,पूज्य भदंत प्रज्ञाज्योती,पूज्य भदंतधम्मलोका,पूज्य भदंत अनिरुद्ध थेरो,पूज्य भदंत बुद्धरत्न शंभर च्या पेक्षा जास्त पूज्य भदंत उपस्थित होते.थाईलंड आणि लाओसा या देशातील भिख्खू, भिख्खूनी उपासक,उपासिका प्रत्येकी हजार रुपये दान दिले तर मुंबईतील उपासक,उपासिका यांनी दानपात्र फिरून जमा झालेल्या दानांतून प्रत्येकी एक हजार रुपये दान देण्यात आले.त्याच बरोबर अनेक जीवना आवश्यक अष्टपरिष्कार अर्थात चप्पल,टॉवेल,रुमाल,बॉटल,बंग चादर,बेडसिट अनेक वस्तू,कपडे मुंबईतील उपासक,उपासिका यांच्या वतीने दान देण्यात आले. पूज्य भदंत शिलबोधी यांनी सर्व उपस्थित भिक्खू संघ आणि धम्म उपासक उपासिका यांनी वर्षावास समारंभ व कठिण चिवरदान सभारंभाला उपस्थिती दाखवली त्याबद्ल आभार मानले.पूज्य भदंत शिलबोधी ८६२३८८७३२४.संयोजक महाराष्ट्र युवा संघ तसेच पवई परिसरातील सर्व उपासक उपसिकांनी यांनी वर्षावास समारंभ व कठिण चिवरदान सभारंभ यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
सागर रामभाऊ तायडे यांसकडून 



समान न्याय समान अधिकार देणारा चिंतनशील दिपोत्सव

 समान न्याय समान अधिकार देणारा चिंतनशील दिपोत्सव



भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेती आणि शेतीशी संबंधित सर्व आर्थिक उलाढाली त्यानाचं डोळ्यासमोर ठेवून पार पडला जातात.तरी मग देशातील शेतकरी आत्महत्या का करतो. शेती विकून मुलांना शहरात नोकरीसाठी का पाठवतो.शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलेमुली शिकून सुशिक्षित बेरोजगार का आहेत?.सर्व शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा व्यापाऱ्यांचा,राजकीय नेत्यांचा धर्म हिंदूच आहे.सर्वांचे सण उत्सव एकच असतात.त्यात जात कधी आडवी येत नाही.शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी नाका कामगार,घरकामगार,नोकरी करणारा कामगार,  कर्मचारी अधिकारी यांचा दिपावली एकच सण मोठ्या उत्सवात साजरा होतो,शेतकऱ्यांच्या घरात विविध प्रकारचे अन्न धान्य फळ फराळ येतात त्यामुळे घरात आनंद असतो,तसाच कामगार कर्मचारी अधिकारी यांना दिवाळीला बोनस,सानुग्रह,बक्षीस मिळतात.देश किती ही संकटात असला तरी आमदार खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार,वेतनवाढ कधीच थांबत नाही.आणखी एक अजब प्रकार मान्यताप्राप्त आहे तो म्हणजे कांदा बाजार भावांवर ठरत असतो,कांदा महाग झाला तर वेतनवाढ मिळते,कांदा भाव कमी झाला तर वेतनवाढ कमी होत नाही तर तो स्थिरचं राहतो. त्यांचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना भेटतो.कारण येथे ब्राह्मण वैश्य क्षत्रियांची दोस्ती युती आघाडी शेतकऱ्यांचे योग्य शोषण करण्याचे काम कृषीउत्पन्न समिती द्वारे चोख करते.देशभरात शेतकरी आत्महत्या का करतात?.  शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलेमुली शिकून सुशिक्षित बेरोजगार का असतात?.त्यांचे आत्मचिंतन परीक्षण चिंतनशील दिपोत्सवा निमित्याने झाले पाहिजे.पण ते होत नाही.कारण लिहणारे साहित्यिक विचारवंत संपादक पत्रकार यांच्या वर्ण व्यवस्थेत शेतकरी व शेतकऱ्यांची जात बसत नाही.आणि माझ्या सारख्याने लिहले तरी त्याला प्रसिद्धी देणे हे त्यांच्या वैचारिकतेत बसत नाही.त्यामुळे त्यांच्या आर्थिक वैचारिक हितसंबंधात बाधा येऊ शकते म्हणून ते प्रसिद्ध होत नाही.काही संपादक प्रसिद्धी देतात पण लगेच लेखाच्या शेवटी टीप देतात लेखकांचे हे व्यक्तिगत मत आहे त्याला संपादक मंडळ सहमत नाहीचं.तरी लेख प्रसिद्धीस दिला म्हणून त्याबद्ल त्यांचे संपादक संपादकीय मंडळांचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे.

     भारतातील दिपावलीचा सबंध हिंदू धर्माच्या अनेक भाकड कथेशी जोडला जातो.कधी तो रामायण महाभारतातील वर्णसंघर्षाशी जोडला जातो तर कधी मनुस्मृती नुसार बळी राजा वामनाच्या तीन पावलाने आकाश,पातळ व्यापुन टाकतो.कधी तो संभाजी महाराजांना मनुस्मृती नुसार हलाहल करून मारतो आणि त्यांचे मुडके काठीला बांधून गांवभर मिरवणुकीत मिरवून घराघरावर आनंद उत्सव म्हणून गुढी उभारतो.दारात कंदील आणि दिव्याची माळ लावुन लक्ष्मी फटके,फुलझल्या लावून कोणता उत्सव साजरा करतो.हे कोणत्याही जाती धर्माचा माणूस शंभर टक्के सत्य सांगु शकत नाही.प्रत्येकांचे उत्तर एकच वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज आहे,त्यांचे पालन केले पाहिजे.बाकी उत्सवात समता स्वातंत्र्य बंधुभाव कुठेही दिसत नाही.प्रचंड प्रमाणात विषमता घराघरात भरली आहे.म्हणजेच एकत्र आनंद उत्सव नाहीच.शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलेमुली शिकून सुशिक्षित बेरोजगार का आहेत?.चिंतनशील दिपोत्सवाची ही झाली एक बाजू, तर दुसरी बाजू....

         भारत देश हा फक्त आणि फक्त बौद्ध संस्कृतीचा देश होता.येथे ज्याही गोष्टी पर्वाच्या रुपात दिसतात ती फक्त बौद्ध संस्कृती आहे.हिंदू धर्मात कोणताही पर्व साजरा केलाच जाऊ शकत नाही,कारण ज्या समुहात विषमता आणि दु:ख;असते तिथे आनंद साजरा होत नसतो.पर्व तिथेच साजरे होतात जिथे समता असते.आणि समता फक्त बौद्ध धम्मात आहे. अन्य कोणत्याही धर्मात समता नाही.दिप फक्त बुद्धासमोर लावतात.मुळात दिपावली हा सण दिव्याच्या आनंदत्सोवचा आहे.हा हिंदूंचा सण नसून तो बौद्धांचा सण आहे.हिंदू धर्मात कोणताच सणच नाही.कारण हिंदु हा धर्मच नाही.हिंदू धर्मातील सण बौद्ध धर्मातील कॉपी पेस्ट आहे.हिंदू धर्मानुसार दिवाळीचे जे पाच दिवस कथा स्वरुपात दिले आहेत.त्या पूर्णत: काल्पनिक भाकड कथा आहेत.त्यातील कोणतीच गोष्ट सिद्ध करता येत नाही.लक्ष्मीपूजन,विष्णू,देव,नरकासुर या हास्यास्पद भाकड कथा आहेत.यांचा विज्ञानाशी तर्कसंगत तिळ मात्रही संबंध नाही.या भाकड कथानाच हिंदुनी त्यांचे सण मानून घेतलय. कोणतेही तर्कसंगत कारण नसतांना मराठा मागासवर्गीय ओबीसी स्वतःला हिंदू समजून हिंदू धर्मीय सण साजरे करीत असतात. तिथे बौद्ध धम्मात सणांना कारण असते. विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही. हाच बुद्धाचा प्रतीत्यसमुद्पाद सिद्धांत आहे.

        सणांची सुरवात भारतात बौद्ध संस्कृतीतून झाली आहे.सण तेव्हा साजरे केले जातात जेव्हा आनंद होत असतो आणि आनंद तिथे साजरा होत असतो जिथे सर्व बाबतीत समानता असते.हिंदू समाजात जोगोजागी विषमता असल्यामुळे तिथे सर्वानुमते आनंदोत्सव सणाच्या स्वरुपात साजरा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.म्हणूनच शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलेमुली शिकून सुशिक्षित बेरोजगार असूनही,असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर असंघटीत असूनही दिपोत्सव हा सण साजरा करण्याचा उत्साहात कमी दिसत नाही. वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज म्हणूनच तो पाळल्या जात असतो.आणि आहे.

    दिपावलीचे महत्व बौद्ध धम्मात आहे.अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे याच दिवसात तथागताच्या स्वागतासाठी जोगोजागी बुद्धाच्या अनुयायांनी लाखो दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे.ग्रिष्म ऋतू नंतर शेतकरी,शेतीवर काम करणारे मजूर हे त्यांच्या पिकांना भाव देतात. तो महिना अश्विन महिना असतो.त्यामुळे शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांजवळ जवळ अन्न धान्य पैसा येतो. त्यामुळे हे लोक दीप लावून,गोडधोड करुन,घरे सारवून उत्सव साजरा करतात त्याचे नांव दिवाळी. हे हजारो वर्षापासून सुरु आहे. भारताचे बहुतेक सण हे जमिन मालक आणि मजुरांवर वर आधारीत आहेत.या बाबतीत चिंतनशील दिपोत्सव हा सण साजरा केला जातो.

          बुद्ध काळात हा सन प्रज्ञावली म्हणुन साजरा केला जात होता. ही प्रथा राजा सम्राट अशोकानी तशीच पुढे चालू ठेवली.पुढे अशोकानंतर या पर्वावर प्रतिक्रांती झाली. या सणाची सुरवात अशोकाने इ.स. पुर्व २५७ ला केली होती. बुद्धाने ८४००० वचने प्रस्तुत केलीत म्हणुन सम्राट अशोकाने ८४००० हजार बौद्ध स्तूप बांधले असे दिपवंश म्हणतो हेच औचित्य लक्षात घेउन अशोकाने कार्तिक अमावस्येला जागोजागी दिपमाला आणि पुष्पमाला अलंकृत केले होते. रस्ते दिवे लाऊन सजविण्यात आले होते. ८४००० हजार स्तुपाप्रमाणे अशोकाने ८४००० दिप प्रज्वलीत केलेत. हा पर्व सतत सात दिवस चालला होता. भिक्कू आणि उपासकाना दान स्वरुपात धन देण्यात आले होते. म्हणुन तो दिवस दीपावलीचा धनोत्रय दिवस म्हणून साजरा केला गेला. कारण अशोकाने आपला संपूर्ण खजिना धम्मासाठी दान केला होता. (अधिक वर्णनासाठी पहा महावंश पान न. ४९) यामित्ताने प्रत्येक घर आणि विहार स्वच्छ करुन वंदना घेण्यात येत होत्या. या पर्वाच्या निमित्ताने प्रत्येक घराच्या आंगणात एक छोटे छोटे स्तुप बनविण्यात आलेत. आज आपण बहुसंख्य मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या अंगणात जे वृंदावन,किल्ला,कुंडी हिंदूंच्या अंगनात पाहतो त्याचा इतिहास तोच आहे. या उत्सवाला देश विदेशची ८० करोड जनसंख्या आणि सोबत भिक्कू उपस्थित होते असे प्राचिन दिपवंश या ग्रंथात लिहिल्या गेले आहे.चिंतनशील दिपोत्सव केवळ कंदील दिवा लाऊन फटाके फोडण्यासाठी नसावा. समान न्याय समान अधिकार देणारा चिंतनशील दिपोत्सव त्यामागील सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी असावा.

      श्रीलंका येथे आजही बौद्ध धम्माच्या मतानुसार दीपावली साजरी केली जाते. राजा तिष्यने याच कार्तिक अमावस्याच्या दिवसात बौद्ध धम्म दिक्षा घेतली होती आणि श्रीलंकेत आनंदोत्सव साजरा केला होता.चिंतनशील दिपोत्सव हा लेख लिहतांना खूप संदर्भ पाहिले वाचले.प्रत्येकात काळानुसार बदल जाणवला त्यातील मला जे योग्य वाटले तेच मी केला. दिवाळी म्हणजे चिंतनशील दिपोत्सव सर्व जाती धर्माच्या गरीब श्रीमंत माणसांच्या आनंदाचा सण असतो.तो निसर्गाने सर्वांना आपल्या परीने उत्सवात साजरा करण्याचा समान अधिकार दिला आहे.शेती करणारा शेतकरी असो की शेत मजूर आणि शेतीचा मालक शेतकरी त्यांच्या उत्पनावर आधारित एकूण सर्व बाजार पेठ त्यातील दुकानदार कामगार मालक गिऱ्हाईक सर्वांचे हितसंबंध एकमेकात गुंतलेले असतात.त्यामुळेच प्रत्येक माणूस एकमेकाला ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुख समृद्धीची जावे असे म्हणतो.म्हणजेच अज्ञान अंधश्रद्धा अंधार दिप प्रकशित करून नष्ट हो हीच कामना करून घरात दारात पणत्या लावतो.आणि उंच जागेवर कंदील लावतो.त्याचा उद्देश माझ्या जीवनातील अंधार नष्ट होऊन चिंतनशील दिपोत्सवाने प्रकाशमय हो हा असतो.असा सर्वाना समान न्याय समान अधिकार देणाऱ्या चिंतनशील दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाचा ११ वा स्मृतिदिन.

 शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाचा ११ वा स्मृतिदिन. 


लेखन कला अवगत असलेला बुध्दीजीवी विचारवंतानी,साहित्यिकांनी,संपादकांनी पत्रकारांनी समाजाला दिशा दाखवण्याचा संकल्प करावा.सत्य असत्यातील भेद ओळखून आपल्याकडे असलेल्या लिहिण्याच्या,मांडण्याचा,व्यक्त होण्याच्या कौशल्य व सामर्थ्यातुन  समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य आपण करावे.यासाठी समाजातील वर्तमान भंप्पक दांभिकता,धार्माधंता, जातीयता,अंधश्रद्धा कर्मकांड चुकीचा चंगळवाद याच्यांवरती घावघालून आपल्या महापुरुषांनी दाखवलेले विचार व मार्ग त्यांची निश्चित उदेशपुर्त याबद्दल लेखन करावे व यातुन समाज जनजागृतीत आपले योगदान द्यावे.आपले लेखन समाजातील व्यवस्था परिवर्तनासाठी असावे.म्हणूनच मी वेगवेगळ्या विषयावर आणि व्यक्तीवर लिहतो.आज स्वर्गीय बाळ ठाकरे यांच्या जीवना कार्यावर लिहत आहे.कारण ९ मार्च १९९७ महाराष्ट्र मुक्त पत्रकार महासंघ,२९ ऑक्टोबर १९९७ महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ यांच्या पत्रकार प्रशिक्षणा निमित्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर "मिडडे प्रेस" मध्ये बसून मनमोकळे बोलण्याची संधी मला मिळाली होती.तेव्हा त्यांनी सांगितले होते जे आपणास पटत नाही ते निर्भीडपणे निर्भयपणे लिहण्याचे मांडण्याचे धाडस पत्रकारात असले पाहिजे.मी ते केले म्हणूनच तुम्हाला सांगतो. 

 स्वर्गीय बाळ ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली.१९५० मध्ये ते फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कामाला लागले होते. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या समवेतही काही काळ काम केले.फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे,व्यंगचित्रे जाहिरातीचे डिझाइन बनवून देण्याचे  काम करीत होते.त्यांच्या व्यंगचित्रात विशेष इंदिरा गांधीची व्यक्तिरेखा आवडती होती.  त्यामुळेच ते जास्त प्रसिद्धीच्या झोतात राहत असत.बाळासाहेबांनी फ्री प्रेस जर्नल मधली नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक  (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक होते. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. या समारंभास प्रा.अनंत काणेकर उपस्थित होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता,पण मुंबईतील मराठी माणसावर अनेक प्रकारे अन्याय होत होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून महत्वपूर्ण आणि लक्षवेधी टीका करत होते.त्यामुळे मराठी माणसांचे प्रबोधन आणि परिवर्तन होत होते.

      स्वर्गीय बाळ ठाकरे त्यामुळे ते १९६० पासून ते राष्ट्रीय व राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत,तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी माणसांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होतीमाननीय बाळ ठाकरेंनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली होतीत्यावेळी त्यांच्या मते,समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे.पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत,पण मराठी माणूस दुविधेत आहे.महाराष्ट्रात उद्योग आहेत,पण मराठी तरुण बेरोजगार आहे.महाराष्ट्रात पैसा भरपूर आहे पण मराठी माणूस गरीब आहे.  महाराष्ट्राला भारताची औधोगिक राजधानी असलेले राज्य म्हणून मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (विशेष मुंबईत) अपमानित होत होता.शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आजच्या शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला होता.  त्यावेळी राज्यातील अंदाजे ५ लाख लोकांचा सहभाग होता असे सांगण्यात येतेत्या वेळेच्या मेळाव्या पासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील शिवाजी पार्क वरील मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली होती.

      स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे कुशल वक्ते संघटक होते. त्यांची ठाकरी भाषा मराठी माणसांच्या ह्रदयाला भिडणारी होती.आणि वक्तृत्वा बरोबरच बाळासाहेब ठाकरे यांची लेखणी तलवारीच्या धारेपेक्षा तेज होती. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात नेहमी जाणवायचा.पण प्रबोधन कार ठाकरेचे क्रांतिकारी विचार अंमलात आणण्याचे धाडस बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही.त्यांनी प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा स्वीकारला नाही.म्हणूनच त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला मावळा,शिवसैनिक त्यांनी घडविला नाही तर मनुवादी हिंदुत्व मानणारा गोब्राम्हण प्रतिपालक सैनिक त्यांनी घडविला. त्यांच्या निधनानंतर काही वर्षातच त्याचा कट्टरपंथीय हिंदू शिवसैनिक त्यांचा वारसा सोडून गेला.उद्धवजी ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा वैचारिक वारसा स्वीकारला नाही तर प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा स्वीकारला.अन्यता महाराष्ट्रात शिवसेना सोडून जाणाऱ्यांना धडा शिकविला असता.पण तसे काही झाले नाही, त्यामुळेच सत्ता संघर्षात शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाचा ११ वा स्मृतिदिन कसा साजरा होणार याचा पोलिसावर मोठा दबाव आहे.तो पूर्वी भी असाच होता, आज ही कायम आहे. कालचा हिंदुत्वाचे बाळकडू पिऊन मोठा झालेला बाळ सैनिक आज पेशवाईचा कट्टर मनुवादी मानसिक गुलाम झाला आहे.त्यांचे एकच उदिष्ट आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची शिवसेना मुळासकट नष्ट करायची. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.मनुवादी विचारांच्या राजकीय पक्षाने भाजप लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाची शिवसेनेची हत्या घडवून आणली असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.

     १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील बांद्रा कलानगर मातोश्री या निवासस्थानी बाळ ठाकरे यांचे निधन झाले.त्याला १७ नोव्हेंबर २०२३ ला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी स्थापन झालेली शिवसेना आणि तिचे संस्थापक शिवसेना प्रमुख यांनी मुंबई ठाण्यातील मराठी तरुणांना प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात मूलभूत समस्यावर हल्ला बोल करून स्थानिक नगरसेवक,आमदार,खासदारांना जेरीस आणले होते,कायदेशीर कायदेकानुन सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तोडफोड करून दंगली घडवून दहशत निर्माण केली होती. स्थानिक मराठी लोकाधिकार समितीच्या नांवाने सर्व ठिकाणी परप्रांतीय कामगारांची होणारी भारती याविरोधात प्रस्थापित कामगार संघटना,युनियनच्या विरोधात संघर्ष करून मराठी तरुणांना नोकरीत घेण्यास भाग पाडले होते.कंपनीचा मालक असो की व्यापारी,बिल्डर,बँक मॅनेजर यांच्या घरात कार्यालयात घुसून तोडफोड करून तोंडाला काळे फासून दहशत निर्माण केली होती. त्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये अदखल पात्र तक्रारी नोंदी झाल्या पण ठोस कारवाई झाल्याची नोंद नाही. त्यावर उपाय योजना करण्यास सत्ताधारी राजकीय पक्ष अपयशी ठरले. त्यामुळेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणारी शिवसेना मुंबई ठाणे महानगरपालिका मध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यास यशस्वी झाली होती. त्यांचे शाखा प्रमुख नगरसेवक झाले,नगरसेवकांचे आमदार झाले.त्यांनी दलित मुस्लिम समाजाच्या विरोधात सतत गळल ओकली त्यामुळे मराठी हिंदू ह्र्दय सम्राटावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.यामुळेच मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत राज्यात होती ती आता अकरा वर्षात मनुवाद्यांनी बाळकडू पिलेल्या शिवसैनिकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन संपविली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती. अशा मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या  शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाच्या ११ वा स्मृतिदिन तोच रिक्षावाला वाहन चालक,नगरसेवक,आमदार झालेला शिवसैनिक आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाने जे मनुवादी बाळ कडू पाजले होते ते देशातील नागरिकांना दाखवत आहे. शिवसैनिकांच्या हिंदुहृदय सम्राटाचा १७ नोव्हेंबर ला ११ वा स्मृतिदिन कशा पद्धतीने साजरा केला जातो.बाळ ठाकरे हिंदुत्व हेच राष्ट्रीत्व सांगत होते.तर आर एस एस प्रणित भाजपा मनुवादी सनातन धर्म सांगत आहेत.त्यांचे हिंदुत्व हे वेगवेगळ्या वर्ण व्यवस्थेनुसार ठरणारे आहे.हा आत्मचिंतन व परीक्षणाचा विषय आहे. शिवसैनिकांच्या हिंदुहृदय सम्राट बाळ ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनास भावपूर्ण श्रदांजली.

सागर रामभाऊ तायडे,९९२२०४०३८५९,भांडूप,मुंबई    

मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत कोणी संपविली???.

 १२ नोव्हेंबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिना निमित्ताने विशेष लेख.

मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत कोणी संपविली???.



     मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी स्थापन झालेली शिवसेना आणि तिचे संस्थापक शिवसेना प्रमुख यांनी मुंबई ठाण्यातील मराठी तरुणांना प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात मूलभूत समस्यावर हल्ला बोल करून स्थानिक नगरसेवक,आमदार, खासदारांना जेरीस आणले होते,कायदेशीर,कायदेकानुन सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तोडफोड करून दंगली घडवून दहशत निर्माण केली होती. स्थानिक मराठी लोकाधिकार समितीच्या नांवाने सर्व ठिकाणी परप्रांतीय कामगारंची होणारी भारती याविरोधात प्रस्थापित कामगार संघटना,युनियनच्या विरोधात संघर्ष करून मराठी तरुणांना नोकरीत घेण्यास भाग पाडले होते. कंपनीचा मालक असो की व्यापारी,बिल्डर,बँक मॅनेजर यांच्या घरात, कार्यालयात घुसून तोडफोड करून तोंडाला काळे फासून दहशत निर्माण केली होती. त्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र तक्रारी नोंदी झाल्या पण ठोस कारवाई कुठेही झाल्याची नोंद नाही.त्यावर उपाय योजना करण्यास सत्ताधारी राजकीय पक्ष अपयशी ठरले. त्यामुळेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणारी शिवसेना मुंबई ठाणे महानगरपालिका मध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यास यशस्वी झाली. त्यांचे शाखा प्रमुख नगरसेवक झाले, नगरसेवकांचे आमदार झाले. त्यांनी दलित मुस्लिम समाजाच्या विरोधात सतत गळल ओकली त्यामुळे मराठी हिंदू ह्र्दय सम्राटावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्यावेळी शिवसेना प्रमुखांची जाहीर धमकी होती माझ्या केसाला हात लावला तर उभा महाराष्ट्र पेटेल!.किंवा पेटून टाकील आणि त्यांचे परिणाम वाईट होती.या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था कायमस्वरूपी धोक्यात आली होती.पोलीस अधिकारी प्रत्येक वेळी कारवाई करण्यात मोठा धोका आहे असे रिपोर्ट सत्ताधारी पक्षाच्या गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना सादर करीत होते.यामुळेच मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची व शिवसेनेची दहशत राज्यात होती ती आता संपली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.
        सहा डिसेंबर 1956 पासून दादरच्या चैत्यभूमी शिवाजी पार्क परिसर दरवर्षी पंचवीस तीस लाख लोक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाला वंदन करण्यासाठी येतात.त्यांचे रिकार्ड मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपून जाईल असे अनेक मराठा समाजाचे स्वताला सुवर्ण समजणारे कट्टरपंथीय मराठा शिवसैनिक म्हणत होते. कारण स्वताला सुवर्ण समजणाऱ्या मराठा समाजाच्या रक्तात दलित मुस्लीम समाजाच्या विरोधात विष पेरण्याचे काम मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळ ठाकरे यांनी केले होते.उभा आयुष्यात बाळ ठाकरे कधी चैत्यभूमीवर गेले नाही.तेच बाळ कडू मराठा ओबीसी शिवसैनिकांना पाजले होते. ते आज ही कायम आहे. त्याला निमित्य होते २७ जुलै १९७८ ला मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नांव देण्याचा विधानसभा विधानपरिषद मध्ये एकमताने मंजूर झालेला ठराव.त्यामुळेच मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात "जय शिवाजी जय भवानी" घोषणा घेऊन पोचली.त्यात मराठा ओबीसी समाजाचे गांवगुंड असलेले पोर शिवसैनिक झाले.त्याची सुरवात ठाण्यातून झाली. त्यावर कट्टरपंथी मराठा,शिवसैनिकांनी एक सिनेमा काढला होता तो काही महिने गाजत राहिला.त्या "धर्मवीर" सिनेमात पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या गुंडांना सोडविण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब येतात पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि सांगतात हे तुमच्या रिकार्ड मध्ये गुंड असतील पण ते माझे कट्टर शिवसैनिक मराठी कार्यकर्ते आहेत.तोच रिक्षावाला वाहन चालक,नगरसेवक आमदार शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची व शिवसेनेची दहशत संपविण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपच्या आशीर्वादाने शहरातून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील शिवसैनिकांना भष्टाचारी गुन्हेगारीतुन जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेतुन पाप मुक्त करण्याचे पुण्यकर्म करीत आहेत.आणि देशभरात शिवसेनाप्रमुख नावाची साठ वर्षाच्या मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत संपविण्याचे काम करीत आहे.
      प्रिय मराठी वाचक बांधवांनो,मी हे का लिहतो अनेक कामगार, कर्मचारी अधिकारी वाट्साप ग्रुपवर कृपया राजकीय पोस्ट टाकणे बंद करा असे म्हणतात.ते सर्वच मराठी आहेत,त्यात मराठा ओबीसी जास्त असतांना ही ते शिवसेनेच्या राजकीय कुरघोडीवर घरफोडीवर चर्चा करण्यास मनाई करतात.त्यामुळे आपल्यात कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गात मतभेद होऊन संबंध गढूळ होणार अशी शंका घेतात. त्यासाठी राजकीय पोस्ट टाकून चर्चा करू नये असे म्हणतात. कंपनीत कार्यालयात आपण कामगार कर्मचारी अधिकारी  आहोत पण बाहेर तर आपण मतदार,नागरिक,कोणत्या तरी समाजाचे आणि वैचारिक पक्षाचे समर्थक असतोच नां?.मग त्यावर मत व्यक्त करण्यात काय वाईट आहे,शेवटी प्रत्येकाचे विचार स्वातंत्र्य अबाधित आहेच, इतरांनी व्यक्त केलेले मत पटलं पाहिजेच ही अपेक्षा नसावी.विज्ञानवादी कंपनीतील कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाने अज्ञानी असता कामा नये,सद्विवेकबुध्दी सर्वच ठिकाणी वापरी पाहिजे,कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन कॉम्पुटर,पी सी ओ,झेरोक्स मशीन,प्रिंटर,स्मार्ट मोबाईल,देशातील आणि जगातील नामांकित तंत्रज्ञान कंपन्या बाजारात एकापेक्षा एक लॅपटॉप ऑफर करत असतात. आजकाल लॅपटॉप गरजेचा झाला आहे. शाळा-कॉलेजचे क्लासेससाठी लॅपटॉप अत्यावश्यक बनला आहे. आणि यामुळेच गेल्या काही दिवसात लॅपटॉप्सची मागणी देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाजारात उपलब्ध काही चांगल्या लॅपटॉप्सबद्दल माहिती असली पाहिजे. आपण वापरण्यापूर्वी त्यांची टेस्टिंग करतो.त्यातील प्रत्येक भागाची क्षमता,चेकिंग करून पाहतो.नंतर त्यांची सर्विस  कशी आहे हे पाहतो.मग विकत घेतो की नाही.मग आपण आपले कुटुंब,जिथे राहते ते नगर,सोसायटी,विभाग तेथील सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय परिस्थिती यावर चर्चा केली आणि अज्ञान दूर करून सज्ञान झाले तर काय वाईट आहे?.
      मित्रांनो सोशल मिडिया हा फक्त मित्राचा ग्रुप नसतो.तर एक खुले व्यासपीठ असते.  त्यात आपल्याला माहिती असलेली माहिती मित्रांना देऊन सावध करता येते.मित्रांचे त्याच्या कुटुंबाचे रक्षण स्वरक्षण करता येऊ शकते. जर रेल्वे स्टेशन बाहेर राजकीय कार्यकर्त्यांनी तोडफोड केली,जाळपोळ केली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली तर आपण काय केले पाहिजे?. ही विचारांची देवाणघेवाण आहे,चर्चा आहे त्यात व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये,तुम्ही तुमचे कुटुंबातील सदस्या काँग्रेस,शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे किंवा अन्य कुठल्याही पक्षात असतील.जात धर्म भाषा प्रांत म्हणून कोण्या एका पक्षाचे समर्थन करत असाल त्यात काहीच गैर नाही.तो तुमचा अधिकार आहे.ती तुमची पसंती आहे.त्या बद्दल कोणाचे काहीही म्हणणे नाही.परंतु माझ्या मराठी बांधवांनो अहो ज्या मातीत तुम्ही जन्मले आहात. त्या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या आजोबा पणजोबांची राख मिसळली आहे.ती तुमची महानगरी महा राष्ट्र आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभुमी आहे. ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त या मातीत सांडले आहे.त्याच मराठी भाषिक राज्याचे कोणी तुकडे पडण्याचे स्वप्न पाहत असेल तर?. आपण शांत बसून राजकारण पाहत राहणार काय?. त्यासाठीच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत राज्यात हवी होती. ती आता पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे रिक्षावाला वाहन चालक,टपरीवाले, नगरसेवक आमदार शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत संपविण्याचे काम भष्टाचारी गुन्हेगारीतुन जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेतुन पापमुक्त होण्यासाठी करीत आहेत. आणि देशभरात शिवसेनाप्रमुख नावाची साठ वर्षाच्या मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत संपविण्याचे काम करीत आहे.ती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी बलाढ्य शिवसैनिकांची शिवसेना एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.आम्ही शिवसेनेच्या हिंदुत्वादी विचारांचे कट्टर विरोधक होतो.आणि आज ही आहोत. पण मराठी माणसांच्या स्वाभिमानी जगण्यासाठी महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरेंनी स्थापना केलेली शिवसेना आज ही हवी आहे. अन्यता हे ब्राम्हण बनिया जातभाई मुंबई सह महाराष्ट्र गिळकृत कारणासाठी १९६० साला पासून टपून बसले आहेत.पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे आमदार खासदारांनी स्वार्थासाठी शिवसेनेच्या अस्तित्वाला सुरुंग लावला आहे. हे मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी खूप वेदनादायक आणि भविष्यासाठी प्रचंड नुकसान करणारे आहे.
       मुरारजी देसाई चे स्वप्न मराठी माणसांनी प्रचंड जनांदोलन करून १०६ हुतात्मानी उधळून लावले. तेव्हा पासून गुजरातचे गुजर मारवाडी बनिया ब्राह्मण आपल्या राज्यातील उद्योग धंदे गुजरात कडे घेऊन जाण्याचे प्रयत्न करीत होते. त्याला मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत होती. तीच आमदार कट्टर शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाच्या शिवसेनेची दहशत संपविण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपच्या आशीर्वादाने करीत आहेत. देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीच्या नियोजनबद्ध योजनेनुसार राज्यातील उद्योग धंदे गुजरातला पळवत असतील तर त्या कृतीचा मराठी माणसांनी पक्ष संघटना विसरून विरोध केलाच पाहिजे.आर एस एस प्रणित संस्था संघटना आणि भाजप पक्ष यांच्या हिंदुत्वादी मराठी माणसांना मोदीच्या निर्णयाचा विरोध करायचा नसेल तर तो त्यांनी करू नये.पण महाराष्ट्रात त्यांना भविष्यात राजकारणात किर्याशील राहायाचे आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राट जिवत असते तर त्यांनी कट्टर शिवसैनिकांना आदेश दिला असता "जिथे दिसतील तिथे तुडवा" त्यांची अंमलबजावणी शिवसैनिकांनी ताबडतोब केली असती.महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ हिंसक झाला असता.राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगाडली असती आणि हे शिवसेनेशी गद्दारी करणारे घराच्या बाहेर पडले नसते त्याच बरोबर यांना फितूर करणारे रात्री तोंड लपूनछपून फिरणारे सुद्धा दिवसा फिरण्याची हिंमत करू शकले नसते.याचा भाजपा समर्थक मराठी माणसांनी मतदारांनी विचार केला पाहिजे.
        भाजपा समर्थक मराठी मतदारांनी आज लक्षात घ्यावे की आज त्यांचे समर्थन करत असाल तर उद्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही ते गुजरातला घेऊन जातील. कारण त्यांना माहीती आहे. आपण कीतीही चुकीचे केले तरी आपले भक्त आपले समर्थनच करतील.माणुसकिती ही वाईट आणि किती ही निच मनोवृत्तीचा असला,तरी काही ही झालं तरी तो  आपल्या घराचा राज्याचा देशाचा चांगलाच विचार करतो.परंतु आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी तर लोकलज्जा शर्मच सोडली आहे. ज्या भाजपाला महाराष्ट्राने १०५ आमदार व २२ खासदार दिलेत ते १०५ आमदार व २२ खासदार सुध्दा आपल्या राज्याचा विचार करत नसतील तर यांना मतदारांनी धडा शिकविला पाहिजे. 
वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्याने आपल्या राज्याचे १,५४.००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प राज्यात यावा यासठी अनेक प्रयत्न केले.उद्योग मंत्री सुभाष देसाई,अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग आणि एम.आय.डी.सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन यांच्यासह मंत्र्यांनी खूप वेळा कंपनीच्या अधिकाऱ्या भेटा घेऊन सोबत बैठका घेतल्या होत्या. वेदांत फॉक्सकॉर्न कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथे जमिनीचे सर्वेक्षण सुद्धा केले होते. हीच जागा संपूर्ण देशातील सर्वाधिक कशी उपयुक्त आहे हे म्हटले होते.२१ जून २०२२ रोजी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्ता बदल घडविण्याच्या घडामोडी झाला नंतर विधानसभेच्या अधिवेशनात तशी अभिमानाने घोषणा केली होती.वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रात होणार निश्चित असतांना अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेबर २०२२ रोजी वेदांत समूहाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि ८ दिवसाच्या आत १३ सप्टेंबर २०२२ रोजी हा प्रकल्प गुजरातला मिळाला. त्यामुळेच महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायामुळे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय कार्यकर्ता,नेता आणि मराठी माणूस पेटून उटला पाहिजे होता.पण तो कुठे ही पेटून उठलेला उभा राहिलेला दिसला नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांची आज क्षणा क्षणाला आठवण येते.मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची त्यांच्या शिवसेनेची दहशत राज्यात होती ती आता संपली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.शेवटी इतिहासात मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची व शिवसेनेची  दहशत कोणी संपली???. असा प्रश्न विचारला जाईल.१२ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट यांचे दुःखद निधन झाले. देशात राज्यात मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची शिवसेनेची दहशत राज्यात होती ती आता अकरा वर्षात मनुवाद्यांनी बाळकडू पिलेल्या शिवसैनिकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन संपविली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती. अशा मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांच्या हिंदुहृदयसम्राटाच्या ११ वा स्मृतिदिनास भावपूर्ण श्रदांजली.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.