सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

शिवसेनेची शिवजयंती आणि संविधान

 शिवसेनेची शिवजयंती आणि संविधान  



भारत हा विविध जातीधर्माच्या लोक समूहाचा देश आहे,प्रत्येकाची जात,धर्म,भाषा वेशभूषा वेगवेगळी असली तरी सर्वांना स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि समानन्याय मिळत असतो. ज्यांना भारतीय राज्य घटना "संविधान" मान्य नाही ते वेळोवेळी मनुस्मृती नुसार आचरण करून देशाच्या सार्वभौम धर्मनिरपेक्षतेलाचा आव्हान देण्यासाठी उभे राहतात. यांचे उत्तम उदाहरण म्हणजेच तिथीनुसार शिवजयंती व सत्यनारायण महापूजा आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडविणे समाजात तेड निर्माण होईल असा कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे कलम १४२ ते १५२ नुसार गुन्हा केला आहे. पण मुंबईसह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन या घटनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असते.ती धर्मनिरपेक्ष,निःपक्षपाती निर्भीड पणे कायद्याची अंमलबजावणी करीत नाही हे यावरून सिद्ध होत आहे.शिवजयंती साजरी करणारी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिथी नुसार जयंती साजरी करते?. म्हणूनच शिवसेनेची शिवजयंती आणि संविधान आज खूप लक्षवेधी विषय झाला आहे.हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळले असेल.
        शिवाजी महाराजाच्या नांवाचा व्यापार करून काही संघटना राज्यात केंद्रात सत्ताधारी झाल्या पण त्यांनी शिवाजी महाराजांचा खरा आदर्श कधीच घेतला नाही, केवळ नांवा पुरती प्रतिमा आणि मूर्तीचा वापर केला. शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या समर्थनात आपली शक्ती खर्च केली. त्याचं पद्धतीने शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद बुद्धिजीवी विचारवंतांच्या समितीने सोडविल्यावर ही त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. त्यामुळे राज्यात शिवरायांचे मावळे कमी आणि कावळे जास्त झाले.म्हणून त्यानी जयंती बाबत ही समाजात गैरसमज कसे निर्माण होतील यांची जास्त काळजी त्यांनी घेतली.शाळा,कॉलेजमध्ये विद्यार्थीदसे पासूनच त्यांना अभ्यासक्रमात एक आणि बाहेरच्या जगात एक शिवाजी महाराज शिकविला जातो,त्यांना कोणता शिवाजी अभिप्रेत आहे हे दरवर्षी ते कायद्याला आव्हान देऊन दाखवून देतात.म्हणूनच शिवसेनेची शिवजयंती आणि संविधान आज खूप लक्षवेधी विषय झाला आहे.
        राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी १८६९ साली रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला.शिवरायांचे जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली.शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.तेंव्हा पासून शिवजयंती मोठया धुमधडाक्यात सुरु झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ' होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.म्हणून ही तिथीनुसार शिवजयंती साजरी होते. हा सन्मान आहे की अपमान?.हे मराठी माणसांना व स्वताला शिवसैनिक मनसे सैनिक समजणाऱ्यांना कळला नाही.तीच  शिवसेना शिवजयंती साजरी करतांना संविधान मानत नाही.आणि पक्षाची मान्यता व चिन्ह रद्द झाल्यामुळे संविधाना

        शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्याला पेशवाईचे समर्थन होते.म्हणुन ब्राह्मणांचे जेष्ठपुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात शिवजयंती बाबत संभ्रम निर्माण केला. आणि करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण होते.पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद' कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल. ख-या शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त मावळे निर्माण होतील, हे रोखण्यासाठी ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली 1) वा.सी.बेंद्रे, 2) न.र.फाटक 3) ग.ह.खरे, 4) द.वा. पोतदार, 5) डॉ.आप्पासाहेब पवार, 6) ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली. वादग्रस्त बाबीसाठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग,न्या.सावंत आयोग बापट आयोग.सराफ आयोग किती तरी आयोग आहेत. त्याप्रमाणे शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली.
        इतिहास तज्ञा बुद्धिजीवी विचारवंताला या कामाला २ वर्ष लागतात,तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लावले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता कि नाही?. यासमितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.१९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथि प्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहीराती दिल्या.या पाठीमागे जयंत साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका होती. जयंत साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी 1) पुरंदरे, 2) बेडेकर, 3) मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्र दिली.शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून जयंत साळगांवकर इतर ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी टिळक प्रेमी आहेत हे सिद्ध झाले.
          1) जयंत साळगांवकर, 2) पुरंदरे, 3) बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह धरून आपला ब्राम्हणी कावा दाखविला,त्याला विरोध करण्यासाठी बाळ कडू आणि बाळकडू पिलेले कावळे जोमाने कामाला लागले,शासन प्रशासनाने दिलेले निर्णय आम्ही मानत नाही हे दाखवून दिले,खरे तर लोकशाहीच्या चौकटीत यांच्या वर राष्टपुरुषाचा अवमान केला म्हणुन देशदोहाचा गुन्हा दाखल होऊ शकला असता,पण राज्यकर्ते मनुवादी हिंदुत्व मानणारे असल्यामुळे कोणीच कोणावर कारवाई केली नाही,
शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेला नसून 
पुरंदरे,बेडेेकर आणि जंयत साळगांवकर यांनी निर्माण केलेला आहे. पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले.अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले.ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला विरोध तर तिथीचा आग्रह धरला.या मागील षडयंत्र काय होते हे आता तरी शिवसेनेच्या शिवसैनिकांना कळला असेल अशी अपेक्षा. 

     तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल,कारण देशातील ग्रामपंचायत,शाळा,कॉलेजेस् पासून न्यायालय,संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात.तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो.सरकारी बँका, कार्यालये,शाळा,महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात.त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला समजते.खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही,ही भीती ब्राह्मणांना होती.म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात,जयंतीत वाद निर्माण करतात.म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा ब्राम्हणी कावा आहे.

इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात.इंग्रजी संगणक,मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर जानेवारी ऐवजी चैत्र (एप्रिल) महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे व तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात. ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार चालत नाही. आपले गांव,शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो.मग तिथी प्रमाणे वाद कायम का राहतो?. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत किंवा प्राथमिक शाळा देखील चालत नाही.शिवाजीराजे जर,राष्ट्रपुरुष,युगपुरुष आहेत.तर तिथीत अडकविण्या इतके राजे लहान का करता?. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी जयंत साळगांवकर यांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला.कारण तिथी आली की पंचांग आले,पंचांग आले की भटजी आला. भटजीची रोजगार हमी आली व ती चालावी या करीताच हा वाद आहे,तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला. त्यामुळे कावळे आणि मावळे संघर्ष अटळ झाला आहे. त्यात हे मराठी माणस व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठे अपोआप पुढाकर घेऊन वाद पेटवितात.हे ब्राम्हणांना चांगले कळते.म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण केले त्याला डोळे व मेंदू बंद करून उद्धवजी ठाकरे,संजय राऊत यांनी समर्थन करून फोटोचे अनावरण केले.कारण छत्रपती शिवाजी महाराज ३९० वर्षा नंतर ही ब्राम्हणांना पचविणे अशक्य होत आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या फोटोत तीन चार हात दाखवून त्यांच्या हातात वेगवेगळे शस्त्र दाखविले.तो फोटो प्रसिद्ध झाल्यावर संभाजी ब्रिगेड शिवाय कोणीच फारसा विरोध केला नाही.तिथेच शिवसेनेचे वैचारिक अंधपतन सुरू झाले,साठ वर्षाचा अभेद शिवसेना किल्ला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आर एस एस प्रणित भाजपाने सुरुंग लावून फोडला.की अधर्माने ईडी, इनकम टॅक्सची भीती दाखवून फोडला हे जग जाहीर आहे.

       शिवरायांची दोन वेळा जयंती साजरी करुन ब्राह्मणांनी एका महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक,महावीर,बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का?.कारण तो समाज जागा असल्यामुळे ब्राह्मण हे धाडस करीत नाहीत.मग शिवरायांचे मावळे कोण?. शिवचरित्रावर विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करतात यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा असतो.हे राज्यातील सरकारने व केंद्रातील सरकारने करून दाखवली आहे. म्हणूनच बाळकडू पिलेले जेजे कावळे आहेत ते शिवजयंती निमित्ताने सत्यनारायण महापूजा ठेवतात.  ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सन्मान करण्यासाठी नव्हे तर मनुस्मृती नुसार शूद्र राजाने शौर्य दाखवुन स्वराज निर्माण करून बहुजन समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून दिला यांचा बदला म्हणून अवतारी पुरुष बनविले.छत्रपती शिवाजी महाराजांना देवीचा आशीर्वाद होता त्यामुळेच त्यांनी लढाया जिंकल्या असा भ्रम निर्माण केल्या जातो. त्याकरिता सत्यनारायण महापूजा घातली जाते. पण हे करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कोणत्या गड किल्ल्यावर सत्यनारायण महापूजा घातल्याचा इतिहास आहे काय?. मग तिथी नुसार शिवजयंती साजरी करणारी ही मंडळी महाराजांचा सन्मान करीत नसुन घोर अपमान करीत आहेत. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळत कसे नाही.हा इतिहास माहिती असणारे एक मराठा लाख मराठा म्हणणारे कुठे झोपेत असतात.उच्चशिक्षित असूनही त्यांना हा अपमान का दिसत नाही काय?.         

भारत सरकार व राज्य सरकार हे भारतीय राज्य घटने नुसार म्हणजेच संविधानानुसार चालविल्या जाते. राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष झाली.आणि शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळेच शिव जयंती कशी साजरी झाली पाहिजे होती.शासनाने भारतीय संविधानाच्या नियमानुसार शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली होती. तिच्या निर्णयानुसार कि मनुस्मृती नुसार?. हे मराठी माणसाना व एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या मराठ्यांना कळले असेलच.म्हणूनच शिवसेनेची शिवजयंती आणि संविधान आज धर्मसत्ता,राजसत्ता, शिक्षणसत्ता,आर्थिकसत्ता हाती आल्यावर काय काय करू शकते दाखवुन दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव व फोटो वापरून मोठ्या झालेल्या शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान म्हणजे प्रजासत्ताक लोकशाही उद्धवजी ठाकरे यांना व त्यांना मानणाऱ्या  शिवसैनकांना समजली असेल तर त्यांनी त्यानुसार येणाऱ्या काळात वैचारिक बदल करून आचरण करून स्वराज निर्माण करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. तिचा परिपूर्ण वापर करून प्रबोधनकार ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं स्वप्न साकार करावे.हेच खरे अभिवादन असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंती निमित्याने सर्व रयतेला हार्दिक शुभेच्छा.

सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई, 9920403859,

आंबेडकरी विचारांच्या समाजाने एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून दिली पाहिजे.

 आंबेडकरी विचारांच्या समाजाने एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून दिली पाहिजे.



    सुशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी इतर असंघटित कष्टकरी कामगार,शेतमजूर समाजासाठी काम करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना चोर,एजंट,वसुली करणारा असे दूषणे लावू नये.कारण तो कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करीत असतोतो खरा "बिन पगारी फुल अधिकारी" समाजासाठी असतो, अन्याय,अत्याचार झाला तर प्रथम तोच आवाज उचलतो,पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी तक्रार देऊन पोलिसांना जाब विचारतो. उच्च शिक्षित सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यां कर्मचारी अधिकारी वर्गात ही हिंमत कधीच नसते.शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळाले म्हणूनच त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला.म्हणजे त्याचे सर्वच प्रश्न निकाली निघाले.हा समज  कर्मचारी अधिकारी वर्गाचा दृष्टिकोन त्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतो?.
     सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी हा आंबेडकरी विचारधारेशी कधीच प्रामाणिक राहिला नाही,नोकरीत असतांना तो आंबेडकरी विचारधारेच्या विरोधी युनियनचा आर्थिक पाठबळ देणारा वार्षिक वर्गणीदार सभासद असतो. तसाच तो निवडणूकीच्या वेळी आंबेडकरी विचारांच्या पक्षाच्या गरीब उमेदवारांना मत न देता हिंदुत्ववादी विषमतावादी विचारांच्या उमेदवाराला  प्रत्येक निवडणूकी मध्ये मतदान करतो.आंबेडकरवादी विचारधारेला आपली मते देऊन आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्याऐवजी मनुवादी विचारांच्या पक्षाला मते देऊन त्यांची राजकीय शक्ती मजबूत करतो.अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर एकत्र येऊ शकतील,पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जीवंत बेडकांचं तराजूत वजन करण्यासारखं आहे. दुस-याला तराजूत टाकेपर्यंत पहिला उडी मारुन पळून जातो. कारण यातील प्रत्येक जण स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो.तो पक्का स्वार्थी मतलबी झालेला असतो.तो समाज आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना नेहमीच कमी लेखतो.त्यामुळेच तो ज्या पदावर बसलेला असतो तेव्हा तो मनुवादी विषमतावादी विचाराचा विचार करुन आचरण करतो म्हणूनच तो गोरगरीबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मानाची वागणूक न देता तुच्छ पणे वागतो.मात्र तो हे विसरतो कि तो जी सुरक्षित नोकरी करतो ते याच असंघटीत कष्टकरी कामगार मजुर लोकांनी केलेल्या आंदोलना मुळे मिळाली आहे.
       शिक्षणाची व नोकरीची संधी मिळाली ती यांच समाजच्या घाम गाळल्याने. तशीच राजकीय सत्ता हवी असेल तर त्यासाठी गोरगरिबांच्या घरा घरात जाऊन न बिकनेवाला मतदार बनवावा लागेल.कोणती सत्ता हवेतून मिळत नाही, सत्तेसाठी सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,धार्मिक आणि आर्थिक दुष्ट्या सामाजिक बांधिलकी निर्माण करावी लागते.रोजगार,आरोग्य आणि शिक्षण ज्यांचं ताब्यात आहे ते सर्वच पक्षातील धन दांडगे,जात दांडगे आहेत.त्यांच्या  विरोधात जाऊन मतदान करणे म्हणजेच कुटुंबाचा व समाजाचा सत्यानाश करणे होय.याची जाणीव गोर गरीब कष्टकरी मजुरांना आहे.म्हणूनच तो खेडे सोडून शहरात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात. मान्यवर कांशीराम यांनी उतर भारतात प्रथम न विकणारा समाज बनविला म्हणूनच बहन मायावती चारवेळा मुख्यमंत्री होऊ शकल्या.हाच प्रयोग महाराष्ट्रात श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त चारीही राजकीय पक्षाना घाम फोडला.याचे अभ्यासपूर्ण चिंतन परीक्षण झालेच पाहिजे.
       वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा,विधानसभेतील प्रत्येक मतदार संघातील निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असला तरी तो बहुजन समाजाला प्रेरणादायी होता.प्रत्येक मतदारसंघातील मतदान संख्याबळाने लोकप्रतिनिधी निवडून येणारा होता. गेल्या वेळी देगलूर-बिलोली मध्ये वंचित बहुजन आघाडीला तीस हजार मते मिळाली होती.मग पोट निवडणुकीत लाखोंच्या जाहीर सभा होऊन मतदान कमी कसे झाले?. हा संशोधनाचा विषय आहे.पक्ष संघटना बांधणीत दहा हजार पदाधिकारी पकडले तर प्रत्येक कुटुंबात चार किंवा पाच मतदार असतात.या हिशेबाने चाळीस पन्नास हजार मतदार हे हक्काचे होतात. इतर बहुजन हितचिंतक पकडले तर आकडा लक्षवेधी असला पाहिजे होता.परंतु तो केवळ एकरा हजार वर आला म्हणजेच गद्दार घरा घरात दबा धरून आहेत.हे सिद्ध होते.हक्काची घरची मते शाबूत ठेवण्यात क्रांतिकारी विचारांचा  आंबेडकरवादी माणूस अपयशी का ठरतो.यांचे सत्य वास्तव समजून घ्यावे लागेल. 
    मी १९८२ पासून नाका कामगार घरकामगारांच्या समस्या वर काम करत आलो नाक्यावरील एक असंघटीत कामगार ते सुरक्षित नोकरी करणारा संघटीत कर्मचारी म्हणून सेवा निवृत्त झाले.पण हा कामगार बदलला नाही. हा कामगार शहरातील प्रत्येक मिलिंद नगर,आंबेडकर नगर,भिम नगर,गौतम नगर,रमाबाई नगर,सिद्धार्थ नगर,फुले नगर अशा वस्तीत गेला की कट्टरपंथीय जातीवादी असतो नव्हे होतो. नाक्यावर तो श्रम विकतो आणि नगरात आल्यावर इमान विकतो.तो त्यांच्या जातीच्या पक्ष संघटनेचा,नेत्यांचा सुद्धा होत नाही.कारण कार्यकर्ताच विकाऊ मानसिकतेचा असतो.त्यांची स्वताची उत्पनाची साधन किंवा नोकरी नसते.त्यामुळेच तो निवडणुकेच्या काळात जात दांडगे,धन दांडगे यांचाशी साटेलोटे करून ठेवतो. अशा कार्यकर्त्यावर आज पर्यंत कुठे ही कठोर कारवाई झाली नाही. म्हणूनच तो या गटातून त्या गटात बेडका सारखा उड्या मारतो त्या बरोबर नगरातील हेच पोटासाठी इमान विकणारे असंघटीत कामगार असतात.तेच या विकाऊ कार्यकर्त्या बरोबर असतात.माझा सारखा कार्यकर्ता पत्रकार म्हणून लिहायला लागला तर एक तर हात पाय तोडण्याची किंवा आई बहिण मुलीवरून कमरे खालील भाषेत शिवीगाळ केली जाते.याला ही पुरून उरला तर कायम दुर्लक्षित केल्या जाते.एक कार्यकर्ता चुकीचा असेल तर बाकी समाजाने त्यांचे समर्थन का करावे.सत्य असत्य हे किती दिवस लपवून ठेवल्या जाते.कोणाची बदनामी किती दिवस करावी.हे सत्य स्वीकारणारा आंबेडकरी विचारांचा समाज निर्माण होत नाही तो पर्यत असंघटीत समाज आणि सुरक्षित नोकरी करणारा समाज बाबासाहेबांच्या विचारांचा मतदार होऊ शकत नाही.तो गद्दारी करीत राहणार आहे.यामुळेच निवडणुकीत मतदार संघातील मतदारांची संख्या आणि उमेदवारांना मिळाल्या मतदानाची संख्या टक्केवारी स्पष्टपणे दिसून येते.
        ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक यांच्याकडे मत मागण्या पूर्वी आपली स्वतःची राजकीय ताकद निर्माण झाल्याशिवाय इतरांची मते मिळणार नाहीत.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकर करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आपल्या वस्तीतील गद्दार,चमचे तितर पक्षी शोधून ठेचून काढले पाहिजेत.शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष बांधणी झाली पाहिजे.एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती संपविल्या शिवाय समाजात संघ शक्ती निर्माण होणार नाही.आणि राजकीय समीकरण बदलणार नाही.
    सुरक्षित नोकरी करणारा कामगार कर्मचारी आणि अधिकारी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियनचा सभासद होत नाही.विषमतावादी विचारांच्या ट्रेड युनियनचा सभासद असल्यामुळे पदोन्नती मधील आरक्षण जवळ जवळ संपल्याच्या मार्गावर आहे.त्यामुळेच नोकरीतील आरक्षण संपल्यात जमा झाले आहे.त्याला सरकार नाही तर बहुसंख्य आरक्षणाचे लाभार्थी जबाबदार आहेत. राजकीय पक्षात जशी स्पर्धा आहे तशीच इथे ही कामगार चळवळीतील एक ना धड भारा भर चिंद्या ही मनोवृत्ती जबाबदार आहे.कामगार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात स्वार्थीपणाची मनोवृती असल्यामुळेच बहुसंख्ये बहुजन कामगार कर्मचारी अधिकारी समाजात असून ही ते चळवळीच्या कामाचे नाहीत.त्यामुळेच आपण ८५ टक्के असून ही सर्व ठिकाणी अपयशी ठरतो.त्यांचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.आजच्या विचारवंतात पत्रकार संपादक,साहित्यिक यात वार्षिक आवहाल लिहण्याची हिंमत नाही.मी परिणामाची पर्वा न करता योग्य वेळी लिहण्याची  हिंमत करीत असतो.आणि ते ही केवळ तथागत गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,फुले,लोखंडे,शाहूमहाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्यशोधक विचारधारेमुळेच मला ही लिहण्याची शक्ती प्राप्त होते. 
        आंबेडकरी विचारांच्या समाजची मतदार संघातील संख्या बघून अनेक पक्षातील एकच जातीचे उमेदवार अर्ज भारतात.त्या एक ना धड भारा भर चिंद्या वृत्ती समाजाचे कसे न भरून येणारे नुकसान होते. त्याचे उत्तम उदाहरण वाचा आणि विचार करा.एका वसतीगृहामध्ये उपमा रोज १०० विद्यार्थ्यांना दिला जायचा. १०० विद्यार्थ्यां पैकी ८० विद्यार्थ्यांनी उपमा नको म्हणून विरोध केला व दररोज वेगवेगळे टिफिन देण्याची तक्रार केली.पण,रोज २०  विद्यार्थ्यांना उपमा खायला आनंद व्हायचा.८० विद्यार्थ्यांना उपमा वगळता दुसरे काहीतरी हवे होते. नेहमीच मुलांच्या तक्रारी येत असल्यामुळे सर्वांच्या आवडीचा पदार्थ देण्याचे ठरवले मग वॉर्डनने मतदानाची व्यवस्था केली.ज्या पदार्थाला बहुमत प्राप्त होईल,तो नाश्ता देण्याचे ठरविण्यात आले.उपमा हव्या असलेल्या २०  विद्यार्थ्यांनी उपमाच हवा म्हणून तातडीने मतदान केले.उर्वरित ८० विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार मतदान केले.पदार्थानुसार मतदान असे झाले.
१८ टक्के: मसाला डोसा,१६ टक्के: आलू पराठा आणि दही,१४ टक्के: रोटी आणि सबजी,१२ टक्के: ब्रेड आणि बटर,१० टक्के: नूडल्स,१० टक्के: इडली सांबार, २० टक्के:उपमा वरील प्रमाणे मुलांनी मतदान केले.याचा परीणाम असा झाला कि,मतदानाच्या पद्धतीनुसार आणि बहुमतानुसार,उपमाच सुरू ठेवण्यात आला.यातुन आपण कोणता धडा घेणार आहोत. जोपर्यंत ८० टक्के लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली राहील, तर २० टक्के लोक ८० टक्क्यावर राज्य करतील.हाच ओबीसी,एस सी,एस टी,आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाज ८५ टक्के असूनही असाच विभागला जातो.सर्वच एकमेकांना दोषी ठरवतात.पण कोणत्या नियमाचे पालन करून एकसंघ बनत नाही.म्हणूनच एक ना धड भारा भर चिंद्या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांच्या आपण कळत नकळत करत असतो आणि दोष मात्र मनुवादी विषमतावादी विचारधारेला देत असतो.
     वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे काही पदाधिकारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना धोका देत धूळफेक करत असतात.मोठी मोठी पदे उपभोगतात त्यामुळे राजकीय वजन निर्माण करतात.परंतु काम मात्र हवेत असते,पेपर मध्ये फोटो बातम्या प्रसिद्ध केले म्हणजे नांव होते.पण गरिबांच्या कामाचे काय?. दुसरीकडे ज्यांच्याकडे पदे नाहीत ते जमिनीवर राहून खेडोपाडी फिरून वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नांव घरा घरात पोहचविण्याचे काम करत असतात.काही कार्यकर्ते निवडणुका जवळ आल्या की सक्रिय अन इतर वेळी निष्क्रिय राहतातम्हणून निवडणुकीत निकाल वंचितच्या बाजूने कमी लागतात. हे दुर्दैव म्हणावे लागते यासाठी प्रत्येक काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ता यांनी निष्ठेने काम करावे.देखावा नको. 
           बहुजन समाजाच्या उज्वल भविष्यासाठी हुकूमशाहीच्या विरोधात भक्कमपणे बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले त्यांचा वैचारिक आणि रक्ताचा वारसा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत.हे कुणीच विसरता कामा नये.आपल्याला सत्तेचे फळे चाखता यावी यासाठी ते वेग वेगळ्या प्रकारे राजकीय समीकरण नियोजनबद्धरीत्या राबवितात.ज्या प्रमाणे शेतकरी शेतीची मशागत करून अनेक प्रकारे पिक घेण्याचा प्रयत्न करीत असतात.त्याच पद्धतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राजकारण करीत आहेत.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.घरात बसून बाबासाहेबाचा जयजयकार करणे बंद करा.जागरूक होऊन सक्रिय व्हा निवडणुकीत जिंकायचे असेल तर मतदार संघातील सर्व सामान्य मतदारांचे मुलभूत प्रश्न सोडवावे लागतात.ते न करता कोणीच यशस्वी होऊ शकत नाही.त्यासाठी प्रथम आंबेडकरी विचारांच्या  समाजाने एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून दिली पाहिजे.लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन मतदान करून ते निवडून आले आणि संविधानाचा गैरवापर करून ते लोकशाहीच्या चारीही खांबाच्या फांद्या उघड उघड तोडत आहेत.ते करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाला कडक शिस्तीची सवय लावली अनेकांना मुळा सकट पक्षातून समाजातून बाहेर फेकले म्हणूनच ते यशस्वी झाले.हेच आम्ही विसरतो.म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारांच्या स्व्यमघोषित संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षांना पक्षनेत्यांना प्रथम धडा शिकविला पाहिजे.आणि त्यांच्यामागे जाणाऱ्या समाजाला ही कुठे तरी कडक कारवाई शिस्तबद्धता लावली पाहिजे.तरच येणारा काळ चांगला असेल अन्यता वर्णव्यवस्था दूर नाही.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई 

निसर्ग शेतकऱ्यांना काही कमी पडू देत नाही.

निसर्ग शेतकऱ्यांना काही कमी पडू देत नाही.



    शेतकरी देत राहतो,त्याला निसर्ग कधीच काही कमी पडू देत नाही.एक शेतकरी माणूस असतो.तो सरकारी मस्तवाल प्रशासनामुळे एवढा गरीब होतो की त्याला दोन वेळेचे अन्न देखील नीट मिळत नसते.तो हताज होऊन एका ठिकाणी बसलेला असतो. तेव्हा त्याच्या समोरून एक तेजस्वी चेहऱ्याचे बौद्ध भिख्खू चाललेले असतात.शेतकरी त्यांना बघून म्हणतो,साधु महाराज तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात.कारण त्या शेतकऱ्याला साधु संत महाराज व भिख्खू यातील फरक लक्षात येत नाही. कारण सर्वच भगवे कपडे घालून असतात.म्हणूनच ते त्यांना साधु महाराज म्हणून विचारतो सांगा की,माझ्या नशिबात नक्की काय लिहिले आहे.मला दोन वेळची नीट भाकरी सुद्धा खायला मिळत नाही.आणि आयुष्यात नुसते दुःखच दुःख आहे.तेव्हा भिख्खू म्हणतात,तु शेतकरी आहेस मानवाला अन्नधान्य देणारा अन्नदाता आहेस.तुला निसर्ग कधीच कमी पडू देणार नाही.तु देत रहा सदा सुखी राहशील आणि इतरांना सुखी ठेवशील.असे सांगून भिक्खू निघून गेले.
    थोड्यावेळाने भगव्या कपड्यातील साधु महाराज आले त्यांना शेतकऱ्यांनी विचारले माझ्या नशिबात नक्की काय लिहिले आहे.मला दोन वेळची नीट भाकरी सुद्धा खायला मिळत नाही.आणि आयुष्यात नुसते दुःखच दुःख आहे. हे ऐकल्यावर ठीक आहे म्हणून साधू महाराजांनी डोळे बंद करून थोडी साधना करतात.काही वेळानंतर डोळे उघडल्यानंतर ते त्या माणसाला सांगतात, इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त २० भाकरी लिहिल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही.२० भाकरी मिळतील,पण त्यानंतर तू राहशील कि नाही.हे मी सांगू शकत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहात,विद्वान आहात.तुम्ही एवढे भविष्य बघता, तेव्हा असे काहीतरी करा की,या २० च्या २० भाकरी मला एक साथ आताच खायाला मिळायला हव्यात.कारण मी आतपर्यंत एक साथ कधी दोन भाकरी सुद्धा बघितल्या नाहीत.तेव्हा महाराज म्हणतात,अरे तुला या २० भाकरी मिळून तर जातील. पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाही.या शेवटच्या २० भाकरी असणार आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो,महाराज ठीक आहे.नंतर काही नाही मिळाले तरी चालेल.पण आता २० भाकरी मिळाल्या तर बरं होईल.तेव्हा ते साधू महाराज म्हणतात,ठीक आहे.कसे तरी ते आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या माणसासाठी २० भाकरींची व्यवस्था करतात.आणि नंतर त्याला सांगतात की,या तुझ्या वाट्याच्या राहिलेल्या २० भाकरी आहेत.असे बोलून ते महाराज निघून जातात.
     आता तो माणूस त्या भाकरी खायला सुरुवात करतो.तो खूप आनंदित होतो. त्याने २ भाकरी कधी एकसाथ खाल्ल्या नाहीत.व पहिल्या नसतात.त्याला आता एकदम २० भाकरी मिळालेल्या असतात.मग ती अर्धी भाकर खातो,नंतर एक भाकर खातो, नंतर २ खातो. आयुष्यात त्याने एवढे जेवण कधीच केलेले नसते.२ भाकरी खाल्ल्यानंतर त्याचे पोट भरते. आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की,या राहिलेल्या १८ भाकरींचे मी काय करू?.तेव्हा तो बघतो की,एक त्याच्या सारखाच माणूस समोरून चाललेला असतो.तो सुद्धा खायला काही मिळते का याच्या शोधात असतो.मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की,आज माझ्याकडे १८ भाकरी आहेत.त्यातल्या दोन तू घे जसे तो त्या गरीब माणसाला दोन भाकरी देतो,तसा तो दुसरा माणूस पळत पळत जातो आणि त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की,त्या माणसाकडे आज भाकरी आहेत.तेव्हा ते सगळे गरीब त्या माणसाकडे येतात.मग तो राहिलेल्या सगळ्या भाकरी त्या गरीब लोकांमध्ये वाटतो. 
     काही वर्षे उलटल्यानंतर ते जे साधू महाराज असतात ते त्याच रस्त्याने चाललेले असतात.ते विचार करतात की,मी काही वर्षांपूर्वी इथे एका माणसाला २० भाकरी दिल्या होत्या.ज्या त्याच्या नशिबातल्या शेवटच्या भाकरी होत्या.आता बघू तरी,त्या माणसाचे काय हाल आहेत?. ते जेव्हा त्या जागेजवळ येतात,तेव्हा ते बघतात तर तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो.त्याने तिथे खूप मोठा मांडव घातलेला असतो.तिथे हजारो लोक जेवत असतात.जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान्न असतात.ते साधू महाराज एकदम हैराण होतात.ते त्या माणसाजवळ येतात आणि विचारतात, हे कसं झाले?.तुझ्या हाताच्या रेषांवर, तुझ्या मस्तकावर फक्त २० भाकरी लिहिल्या होत्या.याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हते.पण आज तर तू धनवान झालास.तुझ्यामुळे आज हजारो लोक जेवत आहेत.तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज जेंव्हा तुम्ही मला २० भाकरी देऊन गेलात,तेव्हा त्यातल्या मी फक्त दोनच भाकरी खाऊ शकलो.मग बाकीच्या १८ भाकरी मी माझ्या सारख्याच गरीब लोकांना वाटल्या.आणि मी जशा भाकरी वाटल्या,तसे माझ्याकडे अजून लोक जेवण घेऊन येऊ लागले.जसे तुम्ही मला २० भाकरी दिल्या होत्या, तसेच बाकीचे लोक सुद्धा मला जेवण देऊ लागले.परत मी त्यातले थोडे खायचो आणि बाकीचे वाटायचो.असे करत करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायचे आणि एक दिवस एवढे जेवण आले की, मी खाऊन सुद्धा शंभर लोकांना वाटू शकलो.
     जेवढे मी वाटू लागलो, त्याच्या कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येत गेले.माझं हे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिले.त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला. माझा व्यवसाय माझी बायको बघते,आणि मी दिवसभर हे जेवण वाटायचे काम करतो. आज हजारो लोक रोज जेवण करतात.मला माहीत नाही की,कुठून हे येतं.पण जेवढे जास्त मी वाटतो,त्याच्या अनेक पटीने माझ्याकडे येतं.मित्रांनो हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे.जेवढे तुम्ही दुसऱ्याला देता,निसर्ग तुम्हाला अनेक पटीने देतोच देतो.आणि हा नियम शंभर टक्के काम करतो.जरी तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहिल्या असतील,पण तुम्ही देण्याचे कर्म सतत करत असाल,तर तुमच्या नशिबात लिहलेल्या गोष्टींपेक्षा १० पट जास्त तुम्हाला मिळते. कारण हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे.बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, द्यायचे म्हणजे फक्त पैसे द्यायचे.पण तसे नाहीये.तुमच्याकडे देण्यासारख्या अनेक गोष्टी असतात.तुम्ही तुमच्याकडे असलेले एखादे कौशल्य शिकवू शकता.तुम्ही एखाद्याला चांगले मार्गदर्शन करू शकता.तुम्ही एखाद्याला आधारासाठी तुमचा खांदा देऊ शकता.तुम्ही एखाद्याला त्याच्या संकट काळात धीराचे दोन शब्द देऊ शकता.
     काही जमत नसेल,तर एखादे छानसे हास्य तर देऊ शकता.मित्रांनो एक लक्षात ठेवा, जेव्हा जमिनीमध्ये आपण बी पेरतो तेंव्हा झाडाला यावंच लागते.हा निसर्गाचा नियम आहे. तसेच ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी द्यायला सुरुवात करता,निसर्गाला तुम्हाला द्यावेच लागते.हा निसर्गाचाच नियम आहे.पण आपली अपेक्षा असते की,आपण ज्याला मदत केली,त्यानेच आपली मदत केली पाहिजे.मग आपण म्हणतो मी त्याला एवढी मदत केली आणि नंतर त्याने धोका दिला.तर मित्रांनो जरूरी नाही की,ज्याला तुम्ही मदत केली, त्याच्याकडूनच तुम्हाला काही मिळेल.ते वेगळ्या रुपात सुद्धा मिळू शकते.जसे तुमचे ऑफिसमध्ये प्रोमोशन होईल, तुमच्या मुलांना चांगली शाळा मिळेल,तुमची अडकलेली कामे पटापट व्हायला सुरुवात होईल.पण तुम्ही काही वाटले,तर तुम्हाला मिळणार हे निश्चित.अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते.ती म्हणजे स्वतःचे नुकसान करून दुसऱ्यांना काही देऊ नका.त्या गरीब माणसाने आधी स्वतःचे पोट भरले आणि मग राहिलेले दुसऱ्यांना वाटले.तसेच तुम्ही सुद्धा स्वतःचे नुकसान होऊ न देता,दुसऱ्यांची मदत करा.म्हणून जो माणूस देणारा असतो,त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही.म्हणूनच त्याला शेत करी म्हणतात.निसर्गाच्या भरोशावर जो शेत नागरतो ओखरतो आणि पेरणी करतो त्यांचे रक्षण करतो नंतर पिक काढतो.परंतु पिक घरात आल्यावर माणसातील स्वार्थी लाभाड अडते,व्यापारी,कृषी अधिकारी,समितीचे सरकारी कर्मचारी या शेतकऱ्यांची अडवणूक आर्थिक शोषण करतात.म्हणूनच काही शेतकरी कर्जबाजारी होतात.त्यांना चांगले सांगणारा भिख्खू तु शेतकरी आहेस मानवाला अन्नधान्य देणारा अन्नदाता आहेस.तुला निसर्ग कधीच कमी पडू देणार नाही.तु देत रहा सदा सुखी राहशील आणि इतरांना सुखी ठेवशील.असे सांगणारा  भिक्खू भेटत नाही.तर इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त २० भाकरी लिहिल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही.२० भाकरी मिळतील,पण त्यानंतर तू राहशील कि नाही.हे मी सांगू शकत नाही. असे सांगणारे साधू महाराज शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पडतात.म्हणूनच प्रत्येक माणसांने निसर्गावर विश्वास ठेवावा.निर्सग नियमांचे पालन करावे.निर्सग कोणालाच कमी पडू देत नाही.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

संकल्प नव्या युगाचा दैनिक लोकमानस

 संकल्प नव्या युगाचा दैनिक लोकमानस 



    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० ला पाक्षिक मूकनायक सुरु केले होते त्याचा १०३ वा वर्धापनदिन ३१ जानेवारी २०२३ ला असणार आहे.अमरावतीत २६ जानेवारी  २०२० ला आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या नव्या युगाच्या समाजाला दिशा दाखविण्यासाठी सुरुची जयप्रकाश बनगैय्या या तरुण तडपदार अभ्यासू पत्रकार तरुणीने दैनिक लोकमानस ऑनलाईन वृत्तपत्राचा जन्म दिला होता. अनेक वृत्तपत्राचा अनुभव तिच्या पाठीशी होता म्हणून तिने हे धाडस केले.त्यालाच आता २६ जानेवारी २०२३ ला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.तोच लोकमानस तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे.देशात आणि राज्यात बहुसंख्य वृत्तपत्र आहेत.राजकीय सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक आणि कला क्रिडा या चळवळीच्या बातम्या देणारे पेपर खूप आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो. पण आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या नव्या युगाच्या समाजाला दिशा दाखविण्यासाठी दैनिक लोकमानस ऑनलाईन वृत्तपत्र समाजाची योग्य दखल घेऊन दिशाहीन नवतरुण समाजाला दिशा दाखविणारा दैनिक लोकमानस एक पत्र नव्हे तर एक बहुजन समाजाचे सत्य चित्र दाखवणारे वृतपत्र वाटते.

     वृतपत्र कधी खोटे लिहत नाही.तसाच दैनिक खोट कधी लिहत नाही असा शंभर टक्के सर्व सामान्य बहुजन समाजाला विश्वास वाटायला लागतो.गेल्या दोन वर्षात दैनिक लोकमानसने सर्वांच्या बातम्या वैचारिक लेख प्रसिद्ध करून बहुजन समाजाच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. सोशल मिडीयाच्या जलद प्रचार प्रसारावर हे नेटद्वारे पीडीएफ (pdf) च्या माध्यमातून वाचकांच्या पसंतीला उतरला आहे.हे मी का सांगू अथवा लिहू शकतो, कारण माझे नियमितपणे दैनिक लोकमानस मध्ये लेख व मी पाठविलेल्या मित्रांचे लेख व बातम्या प्रसिद्ध होत असतात. दैनिक गांव दवंडीत असतांना माझी सुरुची जयप्रकाश बनगैय्या यांच्याशी मोबाईलवर बोलून ओळख झाली.दैनिकात लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाचकांच्या प्रतिकीर्या नियमितपणे मिळतात आणि त्यांनी मला त्यांच्या वाट्साप ग्रुपवर घेतल्यामुळे मैत्रीभावना वाढली आहे. संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या यांच्या दैनिक लोकमानसच्या तिसऱ्या वर्धापनदिना निमित्ताने हा विशेष लेख देत आहे वाचकांनी तो वाचून निर्भीड,निपक्ष प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही अपेक्षा करतो.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले.त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी बहुजन चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरच बहुजन पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते बहुजन समाजाचे पाक्षिकाचे प्रथम संपादक,संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदण्ड आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे वेळोवेळी बदललेल्या परिस्थितीनुसार नांव दिली आहेत. पाक्षिक मूकनायक म्हणजे न बोलणाऱ्यांना बोलण्याची संधी व नेतृत्वाची सुवर्ण संधी,बोलणारे लिहणारे आणि लढणारे झाले तेव्हा त्यांनी नांव दिले जनता,त्याचा बहुजन समजात समानता असावी म्हणून नांव दिले समता,जेव्हा हाच बहुजन समाज बहिष्कृत होता तेव्हा त्यांनी नांव दिले बहिष्कृत भारत.आणि बहिष्कृत भारतातून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा प्रबुद्ध भारत.ते पुढे दैनिक होऊ शकले नाही.तरी बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम एक दैनिक लोकमानस अमरावती वरून पी डी एफ द्वारे प्रसिद्ध होऊन सर्व सोशल मिडीयावर प्रसारित होत आहे.
   राज्यात बातम्या देणारे पेपर खूप आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो.पण बहुजन समाजाची योग्य दखल घेऊन त्यावर वैचारिक लढा उभारून सडेतोड उतर देणारे एकही दैनिक नाही.रोखठोक,निर्भीडपणे, निपक्षपाती लिहणे अपेक्षित असते.चुकीचे वागणाऱ्या नेत्यांना त्यांची भूमिका कशी वैचारिक पातळीवर चुकीची आहे.हे सांगण्याचे काम वैचारिक पातळीवर संपादक बुद्धीजीवी विचारवंतानी केलेच पाहिजे.ते होत नसल्यामुळेच बहुजन समाजात संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष खूप जन्म येत आहेत.त्याकारणाने चळवळ व समाज दिशाहीन झाला आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते,तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." हे वाक्य वापरून ज्यांनी ज्यांनी पत्रकारिता केली, त्यांचे क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करणे हे उदिष्ट कधीच नव्हते. त्यांनी शब्दात शहाणपण,विचारात निष्ठा,वर्तनात चारित्र्य या ब्रिदवाक्यनुसार चळवळीतील कार्यकर्ते,नेते याची दररोज चे जगण्याची साधन झाली आहेत,त्यामुळेच त्यानाच जगण्याची दिशा नाही ते समाजाला काय दिशा दाखवणार हा प्रश्न उभा राहतो. समाजातील असे कार्यकर्ते नेते कोणती चळवळ चालविणार आणि मग त्यांना कोणत्या चळवळीला यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता लागेल.ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सांगून फक्त वैचारिक लेख प्रसिद्ध करीत राहिलो.तर क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी कोणी करावी?. कधी करावी?. कशी करावी?. हेच ठरत नसल्यामुळे आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी चळवळ मात्र आज ही पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे होती त्यापेक्षा दिशाहीन झाली आहे. म्हणूनच शिस्तबद्ध बहुजन समाजाला आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या नव्या युगाच्या समाजाला दिशा दाखविण्यासाठी तरुण तडपदार झुंझार पत्रकारिता करणाऱ्या संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या यांचा लोकमानस ऑनलाईन दैनिक हवा आहे.
     आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे अनेक लेख मी लिहले.ते प्रसिद्ध करण्याचे धाडस अनेक संपादक दाखवत नाही.पण दैनिक लोकमानस संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या ते लेख प्रसिद्ध करण्याचे धाडस दाखवतात त्याबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले पाहिजे.मी ज्या असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय,हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारी सत्यशोधक कामगार संघटन सलंग्न स्वतंत्र मजदूर युनियनचे काम करतो.ते लोक कसे जगतात,त्यांना रोजी रोटीसाठी काय काय करावे लागते.याचा कोणीच विचार करीत नाही.तरी हाच असंघटीत कष्टकरी समाज बहुजन चळवळीतील कार्यकर्ते, नेत्या सोबत अन्याय अत्याचार आणि पुतळा विटंबना झाल्या नंतर कोणत्याही आंदोलनात सर्वात पुढे असतो.तोच खरी चळवळ पुढे आणि मागे नेतो. त्याला शिस्तबद्ध बहुजन समाज म्हणून उभे केल्यास अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील आणि बहुजन समाजाच्या चळवळीला योग्य दिशा दाखवून योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी इच्छाशक्ती हवी,ती दैनिक लोकमानस दाखवीत आहे.त्याला बुद्धीजीवी विचारवंतानी आर्थिकदृष्ट्या मदत मिळवून देणे आवश्यक आहे.असे मला वाटते. लाखो करोडो बहुजन अनुयायी,भक्त,शिष्य आहेत.पण शिस्त नसेल तर काय कामाचे?.क्रांतिकारी विचार मान्य असणाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा,चर्चा, संवाद,मैत्रीभावना जागृत करावी आणि सकारत्मक विचारांची उर्जा देणारे विभागीय दैनिक निर्माण केली पाहिजे.दैनिक लोकमानस केवळ अमरावतीचा न राहता तो राज्याच्या सहा विभागीय आवृत्या देणारा झाला पाहिजे.बहुजन समाज व त्यातील क्रांतिकारी विचार मानणारा निपक्षपाती निर्भीड निर्भय बहुजन समाज सैनिका सारखा रक्षणासाठी जागरूक वाचक असल्या पाहिजे.दैनिक लोकमानस संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या सह सर्व संपादकीय मंडळांला आणि तमाम बहुजन समाजाच्या जागरूक वाचकांना दैनिक लोकमानस च्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा.
आपला 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप-मुंबई -९९२०४०३८५९.