संकल्प नव्या युगाचा दैनिक लोकमानस
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० ला पाक्षिक मूकनायक सुरु केले होते त्याचा १०३ वा वर्धापनदिन ३१ जानेवारी २०२३ ला असणार आहे.अमरावतीत २६ जानेवारी २०२० ला आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या नव्या युगाच्या समाजाला दिशा दाखविण्यासाठी सुरुची जयप्रकाश बनगैय्या या तरुण तडपदार अभ्यासू पत्रकार तरुणीने दैनिक लोकमानस ऑनलाईन वृत्तपत्राचा जन्म दिला होता. अनेक वृत्तपत्राचा अनुभव तिच्या पाठीशी होता म्हणून तिने हे धाडस केले.त्यालाच आता २६ जानेवारी २०२३ ला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.तोच लोकमानस तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे.देशात आणि राज्यात बहुसंख्य वृत्तपत्र आहेत.राजकीय सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक आणि कला क्रिडा या चळवळीच्या बातम्या देणारे पेपर खूप आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो. पण आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या नव्या युगाच्या समाजाला दिशा दाखविण्यासाठी दैनिक लोकमानस ऑनलाईन वृत्तपत्र समाजाची योग्य दखल घेऊन दिशाहीन नवतरुण समाजाला दिशा दाखविणारा दैनिक लोकमानस एक पत्र नव्हे तर एक बहुजन समाजाचे सत्य चित्र दाखवणारे वृतपत्र वाटते.
वृतपत्र कधी खोटे लिहत नाही.तसाच दैनिक खोट कधी लिहत नाही असा शंभर टक्के सर्व सामान्य बहुजन समाजाला विश्वास वाटायला लागतो.गेल्या दोन वर्षात दैनिक लोकमानसने सर्वांच्या बातम्या वैचारिक लेख प्रसिद्ध करून बहुजन समाजाच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. सोशल मिडीयाच्या जलद प्रचार प्रसारावर हे नेटद्वारे पीडीएफ (pdf) च्या माध्यमातून वाचकांच्या पसंतीला उतरला आहे.हे मी का सांगू अथवा लिहू शकतो, कारण माझे नियमितपणे दैनिक लोकमानस मध्ये लेख व मी पाठविलेल्या मित्रांचे लेख व बातम्या प्रसिद्ध होत असतात. दैनिक गांव दवंडीत असतांना माझी सुरुची जयप्रकाश बनगैय्या यांच्याशी मोबाईलवर बोलून ओळख झाली.दैनिकात लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाचकांच्या प्रतिकीर्या नियमितपणे मिळतात आणि त्यांनी मला त्यांच्या वाट्साप ग्रुपवर घेतल्यामुळे मैत्रीभावना वाढली आहे. संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या यांच्या दैनिक लोकमानसच्या तिसऱ्या वर्धापनदिना निमित्ताने हा विशेष लेख देत आहे वाचकांनी तो वाचून निर्भीड,निपक्ष प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही अपेक्षा करतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले.त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी बहुजन चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरच बहुजन पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते बहुजन समाजाचे पाक्षिकाचे प्रथम संपादक,संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदण्ड आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे वेळोवेळी बदललेल्या परिस्थितीनुसार नांव दिली आहेत. पाक्षिक मूकनायक म्हणजे न बोलणाऱ्यांना बोलण्याची संधी व नेतृत्वाची सुवर्ण संधी,बोलणारे लिहणारे आणि लढणारे झाले तेव्हा त्यांनी नांव दिले जनता,त्याचा बहुजन समजात समानता असावी म्हणून नांव दिले समता,जेव्हा हाच बहुजन समाज बहिष्कृत होता तेव्हा त्यांनी नांव दिले बहिष्कृत भारत.आणि बहिष्कृत भारतातून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा प्रबुद्ध भारत.ते पुढे दैनिक होऊ शकले नाही.तरी बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम एक दैनिक लोकमानस अमरावती वरून पी डी एफ द्वारे प्रसिद्ध होऊन सर्व सोशल मिडीयावर प्रसारित होत आहे.
राज्यात बातम्या देणारे पेपर खूप आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो.पण बहुजन समाजाची योग्य दखल घेऊन त्यावर वैचारिक लढा उभारून सडेतोड उतर देणारे एकही दैनिक नाही.रोखठोक,निर्भीडपणे, निपक्षपाती लिहणे अपेक्षित असते.चुकीचे वागणाऱ्या नेत्यांना त्यांची भूमिका कशी वैचारिक पातळीवर चुकीची आहे.हे सांगण्याचे काम वैचारिक पातळीवर संपादक बुद्धीजीवी विचारवंतानी केलेच पाहिजे.ते होत नसल्यामुळेच बहुजन समाजात संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष खूप जन्म येत आहेत.त्याकारणाने चळवळ व समाज दिशाहीन झाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते,तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." हे वाक्य वापरून ज्यांनी ज्यांनी पत्रकारिता केली, त्यांचे क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करणे हे उदिष्ट कधीच नव्हते. त्यांनी शब्दात शहाणपण,विचारात निष्ठा,वर्तनात चारित्र्य या ब्रिदवाक्यनुसार चळवळीतील कार्यकर्ते,नेते याची दररोज चे जगण्याची साधन झाली आहेत,त्यामुळेच त्यानाच जगण्याची दिशा नाही ते समाजाला काय दिशा दाखवणार हा प्रश्न उभा राहतो. समाजातील असे कार्यकर्ते नेते कोणती चळवळ चालविणार आणि मग त्यांना कोणत्या चळवळीला यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता लागेल.ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सांगून फक्त वैचारिक लेख प्रसिद्ध करीत राहिलो.तर क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी कोणी करावी?. कधी करावी?. कशी करावी?. हेच ठरत नसल्यामुळे आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी चळवळ मात्र आज ही पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे होती त्यापेक्षा दिशाहीन झाली आहे. म्हणूनच शिस्तबद्ध बहुजन समाजाला आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या नव्या युगाच्या समाजाला दिशा दाखविण्यासाठी तरुण तडपदार झुंझार पत्रकारिता करणाऱ्या संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या यांचा लोकमानस ऑनलाईन दैनिक हवा आहे.
आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे अनेक लेख मी लिहले.ते प्रसिद्ध करण्याचे धाडस अनेक संपादक दाखवत नाही.पण दैनिक लोकमानस संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या ते लेख प्रसिद्ध करण्याचे धाडस दाखवतात त्याबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले पाहिजे.मी ज्या असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय,हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारी सत्यशोधक कामगार संघटन सलंग्न स्वतंत्र मजदूर युनियनचे काम करतो.ते लोक कसे जगतात,त्यांना रोजी रोटीसाठी काय काय करावे लागते.याचा कोणीच विचार करीत नाही.तरी हाच असंघटीत कष्टकरी समाज बहुजन चळवळीतील कार्यकर्ते, नेत्या सोबत अन्याय अत्याचार आणि पुतळा विटंबना झाल्या नंतर कोणत्याही आंदोलनात सर्वात पुढे असतो.तोच खरी चळवळ पुढे आणि मागे नेतो. त्याला शिस्तबद्ध बहुजन समाज म्हणून उभे केल्यास अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील आणि बहुजन समाजाच्या चळवळीला योग्य दिशा दाखवून योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी इच्छाशक्ती हवी,ती दैनिक लोकमानस दाखवीत आहे.त्याला बुद्धीजीवी विचारवंतानी आर्थिकदृष्ट्या मदत मिळवून देणे आवश्यक आहे.असे मला वाटते. लाखो करोडो बहुजन अनुयायी,भक्त,शिष्य आहेत.पण शिस्त नसेल तर काय कामाचे?.क्रांतिकारी विचार मान्य असणाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा,चर्चा, संवाद,मैत्रीभावना जागृत करावी आणि सकारत्मक विचारांची उर्जा देणारे विभागीय दैनिक निर्माण केली पाहिजे.दैनिक लोकमानस केवळ अमरावतीचा न राहता तो राज्याच्या सहा विभागीय आवृत्या देणारा झाला पाहिजे.बहुजन समाज व त्यातील क्रांतिकारी विचार मानणारा निपक्षपाती निर्भीड निर्भय बहुजन समाज सैनिका सारखा रक्षणासाठी जागरूक वाचक असल्या पाहिजे.दैनिक लोकमानस संपादिका सुरुची जयप्रकाश बनगैय्या सह सर्व संपादकीय मंडळांला आणि तमाम बहुजन समाजाच्या जागरूक वाचकांना दैनिक लोकमानस च्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा.
आपला
सागर रामभाऊ तायडे,भांडूप-मुंबई -९९२०४०३८५९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा