आंबेडकरी विचारांच्या समाजाने एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून दिली पाहिजे.
सुशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी इतर असंघटित कष्टकरी कामगार,शेतमजूर समाजासाठी काम करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना चोर,एजंट,वसुली करणारा असे दूषणे लावू नये.कारण तो कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करीत असतो. तो खरा "बिन पगारी फुल अधिकारी" समाजासाठी असतो, अन्याय,अत्याचार झाला तर प्रथम तोच आवाज उचलतो,पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी तक्रार देऊन पोलिसांना जाब विचारतो. उच्च शिक्षित सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यां कर्मचारी अधिकारी वर्गात ही हिंमत कधीच नसते.शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळाले म्हणूनच त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला.म्हणजे त्याचे सर्वच प्रश्न निकाली निघाले.हा समज कर्मचारी अधिकारी वर्गाचा दृष्टिकोन त्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतो?.
सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी हा आंबेडकरी विचारधारेशी कधीच प्रामाणिक राहिला नाही,नोकरीत असतांना तो आंबेडकरी विचारधारेच्या विरोधी युनियनचा आर्थिक पाठबळ देणारा वार्षिक वर्गणीदार सभासद असतो. तसाच तो निवडणूकीच्या वेळी आंबेडकरी विचारांच्या पक्षाच्या गरीब उमेदवारांना मत न देता हिंदुत्ववादी विषमतावादी विचारांच्या उमेदवाराला प्रत्येक निवडणूकी मध्ये मतदान करतो.आंबेडकरवादी विचारधारेला आपली मते देऊन आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्याऐवजी मनुवादी विचारांच्या पक्षाला मते देऊन त्यांची राजकीय शक्ती मजबूत करतो.अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर एकत्र येऊ शकतील,पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जीवंत बेडकांचं तराजूत वजन करण्यासारखं आहे. दुस-याला तराजूत टाकेपर्यंत पहिला उडी मारुन पळून जातो. कारण यातील प्रत्येक जण स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो.तो पक्का स्वार्थी मतलबी झालेला असतो.तो समाज आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना नेहमीच कमी लेखतो.त्यामुळेच तो ज्या पदावर बसलेला असतो तेव्हा तो मनुवादी विषमतावादी विचाराचा विचार करुन आचरण करतो म्हणूनच तो गोरगरीबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मानाची वागणूक न देता तुच्छ पणे वागतो.मात्र तो हे विसरतो कि तो जी सुरक्षित नोकरी करतो ते याच असंघटीत कष्टकरी कामगार मजुर लोकांनी केलेल्या आंदोलना मुळे मिळाली आहे.
शिक्षणाची व नोकरीची संधी मिळाली ती यांच समाजच्या घाम गाळल्याने. तशीच राजकीय सत्ता हवी असेल तर त्यासाठी गोरगरिबांच्या घरा घरात जाऊन न बिकनेवाला मतदार बनवावा लागेल.कोणती सत्ता हवेतून मिळत नाही, सत्तेसाठी सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,धा र्मिक आणि आर्थिक दुष्ट्या सामाजिक बांधिलकी निर्माण करावी लागते.रोजगार,आरोग्य आणि शिक्षण ज्यांचं ताब्यात आहे ते सर्वच पक्षातील धन दांडगे,जात दांडगे आहेत.त्यांच्या विरोधात जाऊन मतदान करणे म्हणजेच कुटुंबाचा व समाजाचा सत्यानाश करणे होय.याची जाणीव गोर गरीब कष्टकरी मजुरांना आहे.म्हणूनच तो खेडे सोडून शहरात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात. मान्यवर कांशीराम यांनी उतर भारतात प्रथम न विकणारा समाज बनविला म्हणूनच बहन मायावती चारवेळा मुख्यमंत्री होऊ शकल्या.हाच प्रयोग महाराष्ट्रात श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त चारीही राजकीय पक्षाना घाम फोडला.याचे अभ्यासपूर्ण चिंतन परीक्षण झालेच पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा,विधानसभेतील प्रत्येक मतदार संघातील निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असला तरी तो बहुजन समाजाला प्रेरणादायी होता.प्रत्येक मतदारसंघातील मतदान संख्याबळाने लोकप्रतिनिधी निवडून येणारा होता. गेल्या वेळी देगलूर-बिलोली मध्ये वंचित बहुजन आघाडीला तीस हजार मते मिळाली होती.मग पोट निवडणुकीत लाखोंच्या जाहीर सभा होऊन मतदान कमी कसे झाले?. हा संशोधनाचा विषय आहे.पक्ष संघटना बांधणीत दहा हजार पदाधिकारी पकडले तर प्रत्येक कुटुंबात चार किंवा पाच मतदार असतात.या हिशेबाने चाळीस पन्नास हजार मतदार हे हक्काचे होतात. इतर बहुजन हितचिंतक पकडले तर आकडा लक्षवेधी असला पाहिजे होता.परंतु तो केवळ एकरा हजार वर आला म्हणजेच गद्दार घरा घरात दबा धरून आहेत.हे सिद्ध होते.हक्काची घरची मते शाबूत ठेवण्यात क्रांतिकारी विचारांचा आंबेडकरवादी माणूस अपयशी का ठरतो.यांचे सत्य वास्तव समजून घ्यावे लागेल.
मी १९८२ पासून नाका कामगार घरकामगारांच्या समस्या वर काम करत आलो नाक्यावरील एक असंघटीत कामगार ते सुरक्षित नोकरी करणारा संघटीत कर्मचारी म्हणून सेवा निवृत्त झाले.पण हा कामगार बदलला नाही. हा कामगार शहरातील प्रत्येक मिलिंद नगर,आंबेडकर नगर,भिम नगर,गौतम नगर,रमाबाई नगर,सिद्धार्थ नगर,फुले नगर अशा वस्तीत गेला की कट्टरपंथीय जातीवादी असतो नव्हे होतो. नाक्यावर तो श्रम विकतो आणि नगरात आल्यावर इमान विकतो.तो त्यांच्या जातीच्या पक्ष संघटनेचा,नेत्यांचा सुद्धा होत नाही.कारण कार्यकर्ताच विकाऊ मानसिकतेचा असतो.त्यांची स्वताची उत्पनाची साधन किंवा नोकरी नसते.त्यामुळेच तो निवडणुकेच्या काळात जात दांडगे,धन दांडगे यांचाशी साटेलोटे करून ठेवतो. अशा कार्यकर्त्यावर आज पर्यंत कुठे ही कठोर कारवाई झाली नाही. म्हणूनच तो या गटातून त्या गटात बेडका सारखा उड्या मारतो त्या बरोबर नगरातील हेच पोटासाठी इमान विकणारे असंघटीत कामगार असतात.तेच या विकाऊ कार्यकर्त्या बरोबर असतात.माझा सारखा कार्यकर्ता पत्रकार म्हणून लिहायला लागला तर एक तर हात पाय तोडण्याची किंवा आई बहिण मुलीवरून कमरे खालील भाषेत शिवीगाळ केली जाते.याला ही पुरून उरला तर कायम दुर्लक्षित केल्या जाते.एक कार्यकर्ता चुकीचा असेल तर बाकी समाजाने त्यांचे समर्थन का करावे.सत्य असत्य हे किती दिवस लपवून ठेवल्या जाते.कोणाची बदनामी किती दिवस करावी.हे सत्य स्वीकारणारा आंबेडकरी विचारांचा समाज निर्माण होत नाही तो पर्यत असंघटीत समाज आणि सुरक्षित नोकरी करणारा समाज बाबासाहेबांच्या विचारांचा मतदार होऊ शकत नाही.तो गद्दारी करीत राहणार आहे.यामुळेच निवडणुकीत मतदार संघातील मतदारांची संख्या आणि उमेदवारांना मिळाल्या मतदानाची संख्या टक्केवारी स्पष्टपणे दिसून येते.
ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक यांच्याकडे मत मागण्या पूर्वी आपली स्वतःची राजकीय ताकद निर्माण झाल्याशिवाय इतरांची मते मिळणार नाहीत.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकर करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आपल्या वस्तीतील गद्दार,चमचे तितर पक्षी शोधून ठेचून काढले पाहिजेत.शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष बांधणी झाली पाहिजे.एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती संपविल्या शिवाय समाजात संघ शक्ती निर्माण होणार नाही.आणि राजकीय समीकरण बदलणार नाही.
सुरक्षित नोकरी करणारा कामगार कर्मचारी आणि अधिकारी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियनचा सभासद होत नाही.विषमतावादी विचारांच्या ट्रेड युनियनचा सभासद असल्यामुळे पदोन्नती मधील आरक्षण जवळ जवळ संपल्याच्या मार्गावर आहे.त्यामुळेच नोकरीतील आरक्षण संपल्यात जमा झाले आहे.त्याला सरकार नाही तर बहुसंख्य आरक्षणाचे लाभार्थी जबाबदार आहेत. राजकीय पक्षात जशी स्पर्धा आहे तशीच इथे ही कामगार चळवळीतील एक ना धड भारा भर चिंद्या ही मनोवृत्ती जबाबदार आहे.कामगार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात स्वार्थीपणाची मनोवृती असल्यामुळेच बहुसंख्ये बहुजन कामगार कर्मचारी अधिकारी समाजात असून ही ते चळवळीच्या कामाचे नाहीत.त्यामुळेच आपण ८५ टक्के असून ही सर्व ठिकाणी अपयशी ठरतो.त्यांचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.आजच्या विचारवंतात पत्रकार संपादक,साहित्यिक यात वार्षिक आवहाल लिहण्याची हिंमत नाही.मी परिणामाची पर्वा न करता योग्य वेळी लिहण्याची हिंमत करीत असतो.आणि ते ही केवळ तथागत गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,फुले,लोखंडे,शाहूमहाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्यशोधक विचारधारेमुळेच मला ही लिहण्याची शक्ती प्राप्त होते.
आंबेडकरी विचारांच्या समाजची मतदार संघातील संख्या बघून अनेक पक्षातील एकच जातीचे उमेदवार अर्ज भारतात.त्या एक ना धड भारा भर चिंद्या वृत्ती समाजाचे कसे न भरून येणारे नुकसान होते. त्याचे उत्तम उदाहरण वाचा आणि विचार करा.एका वसतीगृहामध्ये उपमा रोज १०० विद्यार्थ्यांना दिला जायचा. १०० विद्यार्थ्यां पैकी ८० विद्यार्थ्यांनी उपमा नको म्हणून विरोध केला व दररोज वेगवेगळे टिफिन देण्याची तक्रार केली.पण,रोज २० विद्या र्थ्यांना उपमा खायला आनंद व्हायचा.८० विद्यार्थ्यांना उपमा वगळता दुसरे काहीतरी हवे होते. नेहमीच मुलांच्या तक्रारी येत असल्यामुळे सर्वांच्या आवडीचा पदार्थ देण्याचे ठरवले मग वॉर्डनने मतदानाची व्यवस्था केली.ज्या पदार्थाला बहुमत प्राप्त होईल,तो नाश्ता देण्याचे ठरविण्यात आले.उपमा हव्या असलेल्या २० विद्यार्थ् यांनी उपमाच हवा म्हणून तातडीने मतदान केले.उर्वरित ८० विद्यार्थ्यां नी त्यांच्या आवडीनुसार मतदान केले.पदार्थानुसार मतदान असे झाले.
१८ टक्के: मसाला डोसा,१६ टक्के: आलू पराठा आणि दही,१४ टक्के: रोटी आणि सबजी,१२ टक्के: ब्रेड आणि बटर,१० टक्के: नूडल्स,१० टक्के: इडली सांबार, २० टक्के:उपमा वरील प्रमाणे मुलांनी मतदान केले.याचा परीणाम असा झाला कि,मतदानाच्या पद्धतीनुसार आणि बहुमतानुसार,उपमाच सुरू ठेवण्यात आला.यातुन आपण कोणता धडा घेणार आहोत. जोपर्यंत ८० टक्के लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली राहील, तर २० टक्के लोक ८० टक्क्यावर राज्य करतील.हाच ओबीसी,एस सी,एस टी,आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाज ८५ टक्के असूनही असाच विभागला जातो.सर्वच एकमेकांना दोषी ठरवतात.पण कोणत्या नियमाचे पालन करून एकसंघ बनत नाही.म्हणूनच एक ना धड भारा भर चिंद्या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांच्या आपण कळत नकळत करत असतो आणि दोष मात्र मनुवादी विषमतावादी विचारधारेला देत असतो.
वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे काही पदाधिकारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना धोका देत धूळफेक करत असतात.मोठी मोठी पदे उपभोगतात त्यामुळे राजकीय वजन निर्माण करतात.परंतु काम मात्र हवेत असते,पेपर मध्ये फोटो बातम्या प्रसिद्ध केले म्हणजे नांव होते.पण गरिबांच्या कामाचे काय?. दुसरीकडे ज्यांच्याकडे पदे नाहीत ते जमिनीवर राहून खेडोपाडी फिरून वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नांव घरा घरात पोहचविण्याचे काम करत असतात.काही कार्यकर्ते निवडणुका जवळ आल्या की सक्रिय अन इतर वेळी निष्क्रिय राहतात. म्हणून निवडणुकीत निकाल वंचितच्या बाजूने कमी लाग तात. हे दुर्दैव म्हणावे लागते यासाठी प्रत्येक काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ता यांनी नि ष्ठेने काम करावे.देखावा नको.
बहुजन समाजाच्या उज्वल भविष्यासाठी हुकूमशाहीच्या विरोधात भक्कमपणे बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले त्यांचा वैचारिक आणि रक्ताचा वारसा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत.हे कुणीच विसरता कामा नये.आपल्याला सत्तेचे फळे चाखता यावी यासाठी ते वेग वेगळ्या प्रकारे राजकीय समीकरण नियोजनबद्धरीत्या राबवितात.ज्या प्रमाणे शेतकरी शेतीची मशागत करून अनेक प्रकारे पिक घेण्याचा प्रयत्न करीत असतात.त्याच पद्धतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राजकारण करीत आहेत.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.घरात बसून बाबासाहेबाचा जयजयकार करणे बंद करा.जागरूक होऊन सक्रिय व्हा निवडणुकीत जिंकायचे असेल तर मतदार संघातील सर्व सामान्य मतदारांचे मुलभूत प्रश् न सोडवावे लागतात.ते न करता कोणीच यशस्वी होऊ शकत नाही.त्यासाठी प्रथम आंबेडकरी विचारांच्या समाजाने एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून दिली पाहिजे.लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन मतदान करून ते निवडून आले आणि संविधानाचा गैरवापर करून ते लोकशाहीच्या चारीही खांबाच्या फांद्या उघड उघड तोडत आहेत.ते करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाला कडक शिस्तीची सवय लावली अनेकांना मुळा सकट पक्षातून समाजातून बाहेर फेकले म्हणूनच ते यशस्वी झाले.हेच आम्ही विसरतो.म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारांच्या स्व्यमघोषित संस्थापक राष्ट्रीय अध्यक्षांना पक्षनेत्यांना प्रथम धडा शिकविला पाहिजे.आणि त्यांच्यामागे जाणाऱ्या समाजाला ही कुठे तरी कडक कारवाई शिस्तबद्धता लावली पाहिजे.तरच येणारा काळ चांगला असेल अन्यता वर्णव्यवस्था दूर नाही.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा