सोमवार, ३ एप्रिल, २०२३

अष्टांगिक मार्गाचे पालन न करणारे अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही.

 अष्टांगिक मार्गाचे पालन न करणारे अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही.



      बुद्धिवान आहेत परंतु त्यांच्याजवळ निष्ठा व शील नाही,असे लोक समाजाला विकण्याचे काम करतात.सामाजिक आंदोलनासाठी निष्ठेची शीलपालनाची खूप गरज आहे. निष्ठेशिवाय कोणतेही आंदोलन चालविणे किंवा ते यशस्वी करणे शक्य नाही. जर तुम्ही आंदोलन उभे करायचे ठरविले असेल तर निष्ठेची खूप गरज आहे.निष्ठेचा काय अर्थ आहे. जे स्वप्न घेऊन तुम्ही पुढे चालत आहात त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे काम तुम्ही सुरु करता त्या कामाला आचार विचार करून स्वीकार केला पाहिजे. आणि जर विचार करून स्वीकार केले असेल तर जिंदगीभर ते पूर्ण करण्यासाठी ते निभवाल तर तुम्हाला निष्ठावान आहेत आणि आणि या कामाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवनभर कष्ट केले असे म्हणता येते.म्हणूनच म्हणतात अष्टांगिक मार्गाचे पालन न करणारे अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही.
         कला,कौशल्य हे विकण्यासाठी नसते.तर समाजाचे प्रबोधन करून समाजात परिवर्तन घडविण्यासाठी असते.लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना चित्रपटातील लोकांनी गाणी लिहिण्यासाठी कित्येक वेळेस लाखो रुपयांची ऑफर दिल्या गेली.पण वामनदादा ने चित्रपटासाठी गाणे लिहिलेले नाही.तर जिंदगीभर त्यानी स्वतःसाठी जे काम स्वीकारले होते ते काम त्यांनी शेवटपर्यंत केले.आज लोक त्यांना लोकप्रिय कवी गायक शाहीर,दादा म्हणतात. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा आहे सन्मान आहे. काही अधिकारी गरज नसतांना मोठमोठ्या गायकांना घेऊन सी डी कॅसेट काढतात.पैसे खर्च करून नांव मोठे करतात.ते त्यांचे काम नाही.त्यांनी समाजासाठी चळवळीसाठी कायम प्रेरणा देणाऱ्या वास्तू निर्माण केल्या पाहिजे.ज्याची समाजासाठी आवश्यकता आहे.म्हणूनच आंदोलन चालवण्यासाठी निष्ठेची आवश्यकता आहे. परंतु आंदोलन फक्त निष्ठेच्या विश्वासावर चालत नाही. बुद्धीची पण गरज असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला निष्ठावान लोक पाहिजेत,बुद्धीची भरपाई मी करेन!.बुद्धीला बाबासाहेबांनी दुसऱ्या स्थानावर ठेवले. निष्ठा,शील नाही आणि केवळ बुद्धी आहे तर खूप भयावह आहे.बुद्धी असणारे लोक स्वताचा फायदा आणि समाजाचे चळवळीचे नुकसान करू शकतात.पहा आजची उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संख्या कुठे कमी पडतो आम्ही?. त्यावेळी लोक गरीब होते आणि चळवळ श्रीमंत होती.आज लोक श्रीमंत आहेत,चळवळ गरीब आहेच पण दिशाहीन सुद्धा आहे.कारण समाजात लाखो डॉक्टर,प्राध्यापक,वकील,इंजिनियर,आय.ए. एस,आय.पी.एस,पत्रकार संपादक,साहित्यिक,विचारवंत आहेत.पण सत्य लिहण्याची बोलण्याची,आणि मांडण्याची हिंमत त्यांच्यात नाही.कारण स्वार्थासाठी,हे सर्व ठिकाणी तडजोडीची भूमिका घेऊन वावरतांना दिसतात.म्हणनूच उच्चशिक्षित उच्चपदस्थ आणि बुद्धीजीवी अष्टांगिक मार्गाचे पालन न करणारे यशस्वी होऊ शकत नाही.
        अष्टांगिक मार्गाचे पालन न करणारे अधिकारी यशस्वी होत नाही.हे उच्चशिक्षित उच्चपदस्थ सेवा निवृत्त झाल्यांनतर बाहेर येते.हे मला अनेक उच्चपदस्थ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या सेवा निवृत्त समारंभातून बाहेर पडल्यावर समजले.काही लोक विचार मंचावर खंत व्यक्त करतात,तर काही लोक विशेष कार्यक्रमाला प्रमुख वक्ता, उद्घाटक म्हणून उपस्थित राहिल्यावर बोलतात.आपण कोणत्या विचारधारा मानणाऱ्या संघटनेचे महासंघाचे सभासद होतो.हे सांगत नाही. आम्ही धार्मिक सामाजिक कार्यकर्माला खूप मदत केली हे न विसरता सांगीतल्या जाते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या कोणत्या क्षेत्रातील संस्था संघटनेशी जोडले,संलग्न आहोत हे सांगत नाही.अष्टांगिक मार्गाचे पालन न करणारे अधिकारी यशस्वी होऊ शकत नाही.धम्म उपासक प्रचारक अभ्यासक मान.श्याम तागडे आय ए एस अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई सेवा निवृत्ती निमित्याने सत्कार कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी अनेक अधिकारी मित्रांनी विशेष शिरीन लोखंडे ताई कामगार आयुक्त यांनी सांगितले होते.रवि सूर्यवंशी यांनी आग्रह केला होता.प्रवेश दारावरच स्वागत झाले. अनेकांनी आजच्या सेवा निवृतीवर विशेष लेखाची इच्छा व्यक्त केली.करिता हा लेख प्रपंच केला आहे.
        शिक्षणात आरक्षण घेऊन पदवी प्राप्त केल्यावर नोकरीत आरक्षण घेणारे समाजासाठी,चळवळीसाठी काय करू इच्छितात.आज पर्यंत त्यांनी काय योगदान दिले याची ते लेखी माहिती देऊ शकतात काय?.जेव्हा सरकारी नोकरी असते उच्चपद आणि अधिकार असते तेव्हा समाजासाठी चळवळीसाठी काही तरी लक्षवेधी आणि प्रेरणादायी वस्तू निर्माण करून ठेवावी असे त्यांना कधी वाटले नाही.विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या एका क्षेत्रात स्वताला वाहून घ्यावे असे कधी वाटले नाही.पण भिमजयंतीला,किंवा संस्था,संघटनांच्या वार्षिकोत्सवात समाजातील उच्चपदस्थ अधिकारी म्हणून बोलावल्यावर प्रशासकीय कामाचे मोफत सल्ले द्याचे पण कृती मात्र शून्य.हेच स्वताची आर्थिक परिस्थिती लक्षवेधी करून घेतात.परंतु समाजाच्या चळवळीच्या लक्षवेधी केंद्राकडे तन,मन आणि धन देण्यासाठी त्यांना वेळ नसते.बाबासाहेब सांगत होते आपल्या समाजासाठी आपल्या मिळकतीतून यथाशक्ती जास्तीतजास्त धन द्याला हवे.त्यातून समाजाला कायमस्वरूपी प्रेरणा देणारी,प्रशिक्षण देणारी इमारत बांधता येईल.मी भारत सरकार कडून दरवर्षी आपल्या विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तीन लक्ष रुपयांची रक्कम मिळविण्याची व्यवस्था केली आहे.त्याचा तुम्ही मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा.जर तुम्ही तसे केले नाही.आणि महत्वाच्या पदाचा वापर समाजासाठी चळवळीसाठी केला नाही तर सेवा निवृतीच्या वेळी तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल.बाबासाहेबांनी त्यावेळी आणखी एक खंत व्यक्त केली होती. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करणारा अष्टांगिक मार्गाचे पालन करणारा एकमेव अधिकारी आदरणीय जे.एस.पाटील मी पाहिला.
        महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Maharashtra State Electricity Board; प्रचलित संक्षिप्त नाव: म.रा.वि.म. किंवा एम.एस.ई.बी.) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती व पुरवठा करणारी कंपनी आहे.याकंपनीत   नोकरीत असतांना जे.एस.पाटील,रमेश रंगारी यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना स्थापना केली होती. स्वतंत्र मजदूर युनियनची २००६ ला स्थापन केली. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे स्वताच्या मालकीची तीन माजली डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र,प्रेरणा नगर हजारी पहाड, सिताबर्डी महाजन मार्केट मध्ये निलकमल कॉम्प्लेक्स मध्ये आय एल युचे सुसज्य मध्यवर्ती कार्यालय नागपुरात आहे,मुंबई च्या बांद्रा कलानगरात स्वताचे कार्यालय आहे.नाशिक येथे कार्यालय आहे,औरंगाबाद येथे तीन माजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.एका कामगारांच्या वार्षिक वर्गणी व योगदानातून हे भव्य वास्तू निर्माण होऊ शकते.इतर प्रमुख क्षेत्रातील कामगार स्वतंत्र मजदूर युनियनशी जोडल्या गेले तर प्रत्येक तालुक्यात स्वताची लक्षवेधी इमारत बांधून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली कामगार चळवळ शासन कर्ती जमात बनू शकते.हा आदर्श सर्वच उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी यांनी घेतला तर अष्टांगिक मार्गाचे पालन  करणारे अधिकारी यशस्वी होऊ शकतात.हे त्यांनी जे.एस.पाटील यांनी सेवेत असतांना आता सेवानिवृत्त झाल्या नंतर ही निरंतर काम सुरु ठेऊ शकते. म्हणूनच आजच्या घडीला स्वतंत्र मजदूर युनियन २२ राज्यात आणि ४७ क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे.
         सरकारी सेवेत असतांना सामाजिक बांधिलकी स्वताहून स्वीकारायची नाही.किंवा आंबेडकरी विचारधारेच्या चळवळीशी जोडून घेत नाही.स्वताला संस्था,संघटने पेक्षा आणि विचारधारे पेक्षा मोठे समजतात.तेच लोक सेवानिवृत्त होतांना सत्काराला उतर देतांना अनेक अधिकारी संकल्प करतात मी समाजासाठी हे करीन ते करीन.काही लोक उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी फक्त भाषण,व्याख्यान देऊन स्वताच्या संस्था,संघटना स्थापन करून नावारुपाला आले आहेत.पण अंतिम उदिष्ट नाही.यावेळी मला डॉ.बाबासाहेबांनी व्यक्त केलेली खंत आठवते.ते म्हणत होते उच्चशिक्षित उच्चपदस्थ लोक नोकरी लागल्यावर आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर आपल्या समाजातील आपल्या नात्यातील तरुणीशी विवाह करीत नाहीत.मग आपल्या समाजातील नात्यातील तरुणेशी विवाह कोण करेल.त्यामुळेच आपल्या समाजात लाखो डॉक्टर,प्राध्यापक,वकील, इंजिनियर,आय.ए.एस,आय.पी.एस,पत्रकार संपादक,साहित्यिक,विचारवंत असून सुद्धा आहेत. समाजाचे चळवळीचे रोखठोक सत्यपरिस्थितीचे आत्मचिंतन परीक्षण करू शकत नाही.एकमेकाकडे बोट दाखविण्याचे काम करीत असतात.एकूण आंबेडकरी चळवळीची श्याम तागडे सर यांनी जी चिरफाड केली ती अंगावर शहारे आणणारी होती.ती अष्टांगिक मार्गाचे पालन करणारे अधिकारीच मांडणी करू शकतो.

सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा