रविवार, १६ एप्रिल, २०२३

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा!

 शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा!



    तथागत गौतम बुद्ध यांच्या काळात राजा प्रसेनजित म्हणून राजा होऊन गेला. या राजाचा आवडता हत्ती अचानक एका पायाने लंगडू लागला.त्यामुळे राजा प्रसेनजित फार दुःखी झाला,कष्टी झाला. ही गोष्ट ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांना कळाली. ते स्वतः होऊन राजवाड्यावर गेले. हत्तीचा पाय पाहिला तर कोठेही कोणत्याही प्रकारची जखम नाही. तदनंतर त्यांनी त्या हत्तीच्या माहुताला बोलावले. त्याच्या हातात दोरी दिली.माहुत पुढे आणि त्याच्या पाठीमागे हत्ती लंगडत चालत होता. काही वेळानंतर गौतम बुद्धांनी त्या माहुताच्या हातातील दोरी आपल्या हाती घेतली.तथागत गौतम बुद्ध पुढे आणि पाठीमागून लंगडत चाललेला हत्ती अचानक सरळ चालू लागला. हे दृष्य पाहिल्यानंतर राजा प्रसेनजित आनंदीत झाला.हर्षित झाला.आनंदाच्या भरात त्यांनी तथागत बुद्धांच्या पायावर लोळण घेतली.त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध म्हणाले,मी कोणत्याही प्रकारचा अद्भुत चमत्कार घडवून आणलेला नसून या हत्तीचा माहूत एका पायाने लंगडा होता. त्यामुळे हत्ती त्याचे अनुकरण करत होता.बंधूंनो,ज्या समाजाचा नेता माहुत हा विचाराने लंगडा आणि कर्माने विकृत असेल तर त्याचा समाज सुद्धा त्याचेच अनुकरण करत असतो.

      विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या भिम जयंतीचा जलोश पहिला तर?.लाखो लोकांचे नेतृत्व कोण करतो.हत्ती सारखा अवाढव्य असलेला हा समाज कोणत्या माहुताच्या मागे लंगडत जात आहे.याचा विचारा कधी करणार?.१९७२ दलित पँथरचा काळ होता. दलितांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाची सीमा नव्हती कुठे नां कुठे बलात्कार, सामूहिक बलात्कार,सामुदायिक हल्ले अन्याय अत्याचार नियमित पणे होत होते.मुंबईत राहणारे नेते पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवून ईशारा,धमक्या देत होते.पण काही लोक  पँथरचे छावे असे होते कि रात्री दोन वाजता गावात जाऊन तोडफोड करून धडा शिकवत होते.त्यांचे नांवे शेवट पर्यंत कुठे प्रसिद्ध झाले नव्हते.त्यातच त्यांची सुरक्षित नोकरी गेली. म्हणूनच तेव्हा  पँथरची एक घोषणा होती. "कल करे आज,आज करे सो अभी" म्हणजेच शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा!.एक दिवस पँथर,वाघ सिंह बनून जागा.आता आजची परिस्थितीती काय आहे.एक ना धड भारा भर चिंद्या.सर्वच वाघ शेळ्या बनून मनुवाद्याचा मासाहार बनत नाही काय ?.

         बाबासाहेबांनी सांगितले होते खेडे सोडा,शहर गाठा.गांवात राहिल्यास पाटलांच्या मर्जीने काम करून मजुरी घ्यावी लागेल.आणि शहरात गेल्यावर तुमची मजुरी तुम्ही ठरवणार. म्हणूनच आज शहराचा सिमेंट कॉन्कॅरेट चा विकास सर्वांना दिसतो.पण तो बनविणारा असंघटीत कष्टकरी मजूर,कामगार कोणाला दिसत नाही.बाबासाहेबाचा जय जय कार करणारा हा समाज मजूर,कामगार म्हणून संघटीत होतांना दिसत नाही.म्हणूनच बाबासाहेब सांगत होते तुम्ही केवळ तुमच्या समाजाला शहाणे आणि जागृत करण्याचे काम करा. त्यांच्या आर्थिक शोषणाचे रूपांतर नंतर लाचारीत होणार नाही ते शहरात कोणते ही काम करून स्वाभिमानी बनून जगतील.असे त्यांना अपेक्षित असलेले बदल कुठे ही दिसत नाही. गावातील लाचार मजूर आज शहरात झोपडपट्टीत राहत आहे.तो आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.पण तो कामगार म्हणूनच पुन्हा लाचार झालेला दिसत आहे.त्यांच्या खांद्यावर निळा कमी आणि लाल,हिरवा,भगवा जास्त दिसत आहे.
        महापुरुषांच्या भिम जयंती दिनाला हा समाज काय समजतो.स्वताच्या आईवडिलाचा वाढदिवस चार पांच वर्षात विसरून जातो.पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस १३२ वर्षा नंतर ही विसरता येत नाही.यांचे कारण त्यांनी सामाजिक,शैक्षणिक संस्कृती धार्मिक,आणि विशेष कामगार चळवळ, राजकीय चळवळ मध्ये लक्षवेधी कार्य करून ठेवले आहे.ते पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी एकसंघ बनले पाहिजे.म्हणून आपण केवळ बौद्ध समाजच घडवण्याबाबत इथून पुढे पुढाकार घेतला पाहिजे.कारण आपली अवस्था अशी झालेली आहे की, आपण स्वतःच इथे कोणत्याही क्षेत्रात स्थिर उभे नाही आहोत आणि निघालोय दुसऱ्यांना सावरायला अशा अवस्थेत आपण दुसऱ्यांना तरी कसे सावरणार आहोत?. प्रत्येकवेळी आपण आपली लढाई एकटे लढलेलो आहोत.
       एक बाजूला शिक्षणात कोंडी करण्यात येत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) ८६१ विध्यार्थांना फेलोशिप देण्तासाठी २० फेबुर्वारी २०२३ पासून आझाद मैदानांत बेमुदत धरणे आंदोलन झाले.तर दुसरीकडे कान गावात बौद्धांना गाव सोडून जाण्याची पाळी येत आहे.म्हणजेच सामाजिक न्याय आमच्या वाट्याला येताना किती अडथळे अजून शिलक आहेत याचा अंदाज आला पाहिजे.ओबीसी मागासवर्गीय बहुजनांना जागे करण्यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करायचे होते,ते सगळे करून झाले आहेत. तरीही त्यांना त्याच गोष्टीत धन्यता वाटत असेल तर, तुम्ही त्यांच्यावर सक्ती करू शकत नाही.त्यापेक्षा आपण आपल्या तरुण पिढीकडे लक्ष्य देऊन,त्यांना प्रशिक्षित कार्यकर्ता बनवूया.व त्यांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवूयात.तरचे शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ बनून जगतील.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा