राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया
मंगळवार, ११ जानेवारी, २०२२
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया
ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.
ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.
सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी
सावित्रीबाई फुले मृत्यू- १० मार्च स्मृतिदिना निमित्याने विशेष लेख
सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी
जगात विज्ञानने एवढी अफाट प्रगती केली.तरी भारतात त्यांची नोंद घेतली जात नाही.या देशात अज्ञान अंधश्रद्धा यालाच खुप महत्व आहे.त्यात महिला वर्गाचे प्रमाण जास्त आहे.म्हणुन त्यांना महिलांना कायम त्यात गुंतवून ठेवण्या करीता घराघरात दूरदर्शन म्हणजे टीव्ही चोवीस तास मेंदूला योग्य खाद्य देण्यास तयार आहेत.प्रत्येक घरात टीव्हीच्या रिमोटवर ताबा सांगुन वर्चस्व गाजवणाऱ्या महिलाच (त्यांच्या भीतीनं पुरूषही) काय पाहतात? तर "तुझ्यात जीव रंगला", "खुलता कळी खुलेना","माझ्या नवऱ्यांची बायको", "नागिन" किंवा बालाजी चा टुकार कौटुंबिक कलह ! "बायकांनी बायकांसारखंच रहायचं" हे यात ठासून शिकवलं जात.म्हणजे इथली सामाजिक,धार्मिक व्यवस्थाच नाही तर प्रचार,प्रसार माध्यमे देखिल स्त्रियांना एकाच साच्यात बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. आई कुठे काय करते?. रंग माझा वेगळा, सुख म्हणजे काय असते?.फुलला सुगंध मातीचाह्या मालिका करमणूक म्हणून तरी आपण काय पाहतो आणि त्याचा काय परीणाम होतोय हे सुध्दा लक्षात येत नाहीये.ज्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आहेत किंवा मोठ्या पदावर आहेत त्यांचाही कल स्त्रियांनी स्त्रियांचे प्रश्न सोडवावेत असाच असतो असा विचार खरं तर खुप संकुचित आहे.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.
आजच्या सुशिक्षित महिला ज्या कोण्या देवीच्या उपासक असतील तर त्यांनी त्यांचा जन्म कोण्या आई वडिलांच्या पोटी कुठे,कधी झाला प्राथमिक शिक्षण,माध्यमिक शिक्षण कुठे झाले.तालुखा जिल्हा,राज्य कोणते होते.त्यांच्या पराक्रमात कोण कोण सहभागी होते.आई,वडील,भाऊ,बहिण, नवरा,मुलगा,मुलगी शेवटी त्यांचे निधन कुठे,कधी,कसे झाले.याची सविस्तरपणे माहिती सांगितली, लिहली पाहिजे.सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी.सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण जन्मा पासून मृत्यू पर्यंत माहिती उपलब्ध आहे. इतरांची अशी माहिती नसतांनाही त्यांचे डोळे बंद करून समर्थन करणे म्हणजेच अज्ञान आहे. सुशिक्षित प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची कहाणी कशी असावी प्रेरणादायी, तरच तिच्या कार्याची इतिहासात नोंद झाली असेल.सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहाणी झाली नाही पाहिजे.यासाठी अशिक्षित असो की सुशिक्षित महिलांनी १० मार्चला त्यांच्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन केले पाहिजे. हीच अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९.भांडुप.मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य
बुधवार, २९ डिसेंबर, २०२१
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डिसेंबर महिना
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डिसेंबर महिना क्रांतिकारी विचारांच्या संत महापुरुष,महामानव यांचा संघर्ष वाचला तर इतिहास घडविता येईल.असे विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. त्यांच्या जीवनातील "डिसेंबर" महीन्यातील काही महत्वाच्या बाबी माहिती असणे आवश्यक आहेत.फक्त अखेरचा सहा डिसेंबर महापरीनिर्वाण दिना यालाच महत्व देणारे इतर संघर्षाकडे दुर्लक्ष करतात.म्हणूनच डिसेंबर महिन्यातील घटनेवर लक्षवेधतो. 03) 12 डिसेंबर 1916:- भीमराव व रमाबाई या दांपत्याला पुञरत्न झाले. (बी.आय.टी. चाळ नं.1,रुम नं.50,परळ,मुंबई) त्याचे नाव यशवंतराव भैयासाहेब म्हणून ओळखले गेले. 04) 18 डिसेंबर 1916 लंडन विद्यापीठाच्या सिनेटने भीमरावांच्या अर्जावर चर्चा करुन भीमरावांना सरळ "M. Sc."च्या पदवी परिक्षेला बसण्याची परवानगी देणारा ठराव संमत केला. 05) 5 डिसेंबर 1917 भीमरावांनी सिडनहॅम काॅलेजातील प्राध्यापकाच्याजागेसाठी अर्ज केला. 06) 15 डिसेंबर 1925 भालताच्या चलन पद्धतीत योग्यत्या सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने " राॅयल कमिशन आॅन इंडियन करन्सी अॅण्ड फायनान्स" हे कमिशन सर एडमंड हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते. त्या कमिशनसमोर डाॅ. आंबेडकरांची साक्ष झाली. या कमिशनने आंबेडकरांसह एकूण अर्थतज्ज्ञांच्या साक्षी घेतल्या. त्या वेळी कमिशनच्या प्रत्येक सदस्यांच्याहाती डाॅ. आंबेडचरांच्या 'इव्हल्युशन ऑफ प्राॅव्हिन्शियलफायनान्स इन ब्रिटिश इंडीया' या ग्रंथांची प्रत होती. 07) डिसेंबर 1926 डाॅ. भिमराव आंबेडकर व डाॅ.पी.जी.सोळंकी यांची मुंबई सरकारने सरकार नियुक्त सदस्य म्हणून मुंबई विधिमंडळावर नेमणूक केली. 08) 25 डिसेंबर 1926 मुंबई विधिमंडळावर निवड झाल्याबद्दल नायगावच्या "वाय.एम.सी. ए." च्या हाॅलमध्ये उभयतांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. 09) 25 डिसेंबर 1927 डाॅ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विषमतेची शिकवण देणा-या "मनुस्मृती" या हिंदूंच्या पविञ ग्रंथाची बापुसाहेब सहस्ञबुद्धे यांच्या हस्ते परिषदेच्या मंडपा समोर खास तयार केलेल्या वेदीत दहन करण्यात आले.10) 25-26 डिसेंबर 1927 महाड सत्याग्रह परिषद डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. 11) 27 डिसेंबर 1927:- महाड परिषदेच्या अखेरच्या दिवशी स्ञियांना उद्देशून "ज्ञान आणि विद्या या गोष्टी स्ञियांनाही आवश्यक" या मुद्यावर भाषण दिले. 12) 28 डिसेंबर 1929 "बहिष्कृत भारत" चा शेवटचा अंक प्रकाशित झाला. 13) 28 डिसेंबर 1929 "धारवाड जिल्हा बहिष्कृत परिषद" बैठक पहिली, धारवाड येथे डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. "माझा इंग्रज सरकारवर विश्वास नाही. आमचा उद्धार आम्हीच करुन घेतला पाहिजे." असे त्यांनी आपल्या भाषणात सांगीतले. 14) 31 डिसेंबर 1937 पंढरपूर येथे भरलेल्या सोलापूर जिल्हा अस्पृश्य परिषदेत डाॅ. आंबेडकराचे भाषण, पंढरपूर नगरपरिषदेतर्फे डाॅ.आंबेडकर यांचा सत्कार. 15) डिसेंबर 1938 तत्कालीन निझाम राजवटीतील औरंगाबाद येथे "बहिष्कृत" वर्गाच्या प्रथमच भरलेल्या परिषदेत, अस्पृश्यांनी स्वावलंबी बनावे असा उपदेश केला. 16) 11 डिसेंबर 1938 श्रीरामपूर, जि.नगर येथे महारपरिषदेत अध्यक्षीय भाषण केले. 17) 16 डिसेंबर 1941 सिन्नर, जि. नाशिक येथे डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत 'जुडी कर' अन्यायकारक असल्याचे सांगून भाषणात निषेध व्यक्त केला 20) 5 डिसेंबर 1943 डाॅ.आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी परळ, मुंबई ( गोकुळदास पास्ता रोडजवळील मैदान) येथे मडकेबुवा यांचे अध्यक्षतेखाली डाॅ. आंबेडकरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डाॅ. आंबेडकर म्हणाले की,अस्पृश्य समाज लुळा पांगळा आहे. परंतु त्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकावे, गुणावर व लायकीवरच वर चढण्याची उमेद बाळगावी. 21) 8 डिसेंबर 1943 डाॅ. एम.एन.राॅय स्थापित हिंदीकामगार फेडरेशनच्या (इंडियन फेडरेशन आॅफ लेबर) वार्षिक अधिवेशनाचे डाॅ. आंबेडकरांच्या हस्ते मुंबईतील वरळी जेलजवळील मैदानात उदघाटन झाले. 22) 9 डिसेंबर 1943 भारत सरकारचे मजूरमंञी डाॅ. आंबेडकर यांनी बिहारमधील धनबाद येथील भुलन बरारी कोळसा खाणींची 400 फूट खाणीत उतरुन प्रत्यक्ष पाहाणी केली. मजुरांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले. कामगारांच्या वसाहतीला भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. 23) 10 डिसेंबर 1943 बिहारमधील राणीगंज कोळसा खाणींना भेट देऊन मजूरमंञी डाॅ. आंबेडकरांनी खाणीतील मजुरांची सुरक्षितता, प्रसाधन व्यवस्था, आरोग्य सुविधा आदींची तसेच मजुराच्या वसाहतींची पाहणी केली. 24) 4 डिसेंबर 1944 मुंबई सेंट्रलहून सायंकाळी फ्राॅन्टीयर मेलने दिल्लीस रवाना झाले. 25) 30 डिसेंबर 1944 कानपूर येथे एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या समता सैनिक दलाच्या दुस-या अधिवेशनात बोलताना "अस्पृश्य तरुणांनी शे.का.फे.च्या पाठीमागे आपली ताकद उभी केली पाहीजे. असे झाल्यास कोणालाही अस्पृश्यांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत होणार नाही. असे सांगीतले. 26) 6-7 डिसेंबर 1945 मुंबईच्या सचिवालयात भारताचे मजुरमंञी डाॅ. आंबेडकर यांनी विभागीय कामगार आयुक्तांच्या परिषदेचे उदघाटन केले. 27) 8 डिसेंबर 1945 मनमाड येथे भरलेल्या शे. का. फे.च्या परिषदेतील भाषणात डाॅ. आंबेडकरांनी येऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात सांगीतले की, "आता सर्व राखीव जागा जिंकल्याशिवाय तरणोपाय नाही. 28) 9 डिसेंबर 1945 मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोर्डींगच्या इमारतीच्या कोनशिला समारंभ प्रसंगी "शिक्षणाशिवाय मा-याच्या जागा काबीज करता येणार नाही" या मुद्यावर भाषण दिले. 29) 9-10 डिसेंबर 1945 व-हाड प्रांतिक शे.का.फे.च्या अकोला येथे भरलेल्या पहिल्या अधिवेशनात निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. 30) 13 डिसेंबर 1945 नागपूर येथे भरलेल्या प्रचंडसभेत त्यांनी भाषण केले. या प्रसंगी गुरु घंटाळची गोष्ट सांगून काँग्रेस गुरु घंटाळची भूमिका बजावत असल्याचे सांगीतले. 31) 23-27 डिसेंबर 1945 डाॅ. आंबेडकरांनी मद्रास प्रांताचा दौरा करुन निवडणूक प्रचार केला. 32) 9 डिसेंबर 1946 भारतीय घटना समितीची पहिली बैठक संपन्न होऊन तीत डाॅ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समीतीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 33) 25 डिसेंबर 1946 घटना समितीत डाॅ. आंबेडकरांनीप्रभावी भाषण करुन भारताच्या ऐक्यावर भर दिला. प्रसैद्ध तत्त्ववेत्ते एडमंड बर्क यांचे वचन (It is very easy to give power, but it is difficult to give wisdom ) उदधृत केले. 34) 25-27 डिसेंबर 1946 अखिल भारतीय शे.का.फे.विद्यार्थी फेडरेशनचे दुसरे अधिवेशन जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अध्यक्षतेखाली भरले. वस्तुतः या अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ.आंबेडकर होते. पण घटना समितीच्या कार्यबाहुल्यामुळे ते हजर राहू न शकल्याने त्यांनी मंडल यांना अध्यक्ष नेमले व आयोजक गेडाम यांना आपला संदेश पाठविला.35) 22 डिसेंबर 1948 शे.का.फे.च्या वतीने मुंबईतील आर.एम.भट हायस्कूल पटांगणात डाॅ. आंबेडकर व सौ.माईसाहेब यांना चहापान देण्याचा कार्यक्रम झाला. 36) 19 डिसेंबर1949 पंतप्रधान पं. नेहरु यांनी हिंदू कोड बिल संमत करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. 38) 22 डिसेंबर 1951 डाॅ. आंबेडकरांचे वरळी येथील बुद्ध विहारात बौद्ध धर्मावर भाषण झाले. 39) 24 डिसेंबर 1951 शे. का. फे. व समाजवादी पक्षातर्फे मुंबईतील चौपाटीवर निवडणूक प्रचार सभा झाली. डाॅ. आंबेडकरांनी प्रभावी विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाशी युती केली असल्याचे सांगीतले. 40) 22 डिसेंबर 1952 पुणे जिल्हा विधी वाचनालयाच्या नव्या विभागाचे डाॅ. आंबेडकरांनी उदघाटन केले. त्या वेळी लोकशाही यशस्वी रीतीने चालवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे यावर भाषण केले. 41) 25 डिसेंबर 1953 निपाणी येथे भरलेल्या सभेत बोलताना निवडणुकीच्या पराभवाने निराश न होता चळवळ जिवंत ठेवण्याचा अनुयायांना संदेश दिला. 42) 1 डिसेंबर 1954 रंगून येथे भरणा-या जागतीक बौध्द परिषदेत भाग घेण्यासाठी "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" रंगूनला पोहोचले. 43) 4 डिसेंबर 1954 बौद्ध परिषदेच्या प्रतिनिधींसमोर डाॅ. आंबेडकरांनी म्हटले की, "मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी काही गोष्टी करुन ठेवल्या आहेत. 44) 25 डिसेंबर 1954 डाॅ. आंबेडकरांनी देहू रोड (जि.पुणे) येथे बुद्ध विहाराचे उदघाटन केले. भाषणातचपंढरपुरच्या विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती असल्याचे सांगीतले. 45) 12 डिसेंबर 1955 औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातीलबोधि मंडळाच्या विद्यमाने एका सभेचे आयोजन होते. त्याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी "प्रत्येक विद्यार्थांने आपले चारिञ्य बनविले पाहीजे" या मुद्यावर भाषण दिले. 46) 21 डिसेंबर 1955 मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे "मराठवाड्यासाठीस्वतंञ विद्यापीठाची आवश्यकता आहे." या मुद्यावर भाषण दिले. 47) 1 डिसेंबर 1956 दिल्लीत मथुरा रोड येथे भरलेल्या प्रदर्शनातील "बुद्ध मूर्तीचे डाॅ. आंबेडकरांनी निरीक्षण" केले. 48) 2 डिसेंबर 1956 बुद्धगया येथे होणा-या "2500व्या बुद्ध महापरिनिर्वाण" समारंभात भाग घेण्यासाठी आलेल्या "दलाई लामांच्या" सन्मानार्थ आयोजित मेहरोली, दिल्ली येथील समारंभात "डाॅ. आंबेडकर" उपस्थित राहीले. दलाई लामा यांनी डाॅ. आंबेडकरांचा "बोधिसत्व" असा गौरव केला. संकलन : बालाजी भाऊ दवणे,(एम ए) पौर्णिमा नगर, नांदेड.9673520356. |
जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा.
|
शनिवार, १८ डिसेंबर, २०२१
स्वच्छतेचे महत्व जाणणारे संत गाडगेबाबा
स्वच्छतेचे महत्व जाणणारे संत गाडगेबाबा
शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१
एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून द्या.
एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून द्या.
