सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?

 अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? 


    जग कुठे चालले आणि आपण कुठे चाललो हे पाहण्यासाठी आज स्मार्टफोन मोबाईल,कॉम्प्युटरवर गुगल सर्च इंजिन उपलब्ध आहे. त्याच बरोबर अनेक संशोधन करणारे चॅनल ही उपलब्ध आहेत.दोनशेच्या वरून वृत्तवाहिन्या आहे,ते सर्व सत्य दाखवतील यांची शंभर टक्के खात्री नसतांना ही लोक ती पाहतात.बातम्या पाहण्यास आवडत नसतील तर अनेक मालिका सुद्धा आहेत,सुख म्हणजे काय असते?,फुलाला सुगंध मातीचा,आई काय करते,मुलगी झाली हो,रंग माझा वेगळा मराठी माध्यमाच्या सर्वच मालिका कायमस्वरूपी पुढे काय होईल?. यासाठी कामधंदयातुन वेळ काढून पहाव्याच लागतात.तारक मेहताचा उलट चष्मा,हिंदी लोकप्रिय धारावीक तुम्हा अर्धा एक तास निश्चितच सर्व प्रकारच्या अडघड घटना विसरायला लावतात.मन करमणूक होते.पण शांत होऊन झोप लागत नाही. मग परत रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर काय काय पाहावे असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळेच अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?. 
काय स्वीकारा हेच बहुसंख्य लोकांना कळतंच नाही.मग ते रितीरिवाज परंपरा स्वीकारतात, मग त्यांचे वार ठरलेले असतात,रविवार,बुधवार आणि शुक्रवार वसट म्हणजे मांसाहार खाण्याचे दिवस.घर कार्यालय,हॉटेलमध्ये ठरलेले असते.बाकी उपास,तपास,पूजा अर्चा आणि देव देवीचे दिवस असतात.त्यांचे संघटित सुशिक्षित असंघटित अशिक्षित,कामगार,मजूर कर्मचारी अधिकारी काटेकोरपणे पालन करतात.यातून काही निष्कर्ष आम्ही काढले आहेत. 
     घरी सुखात असणारा माणूस कार्यालयात दुःखात असतो,तर काही ठिकाणी उलटे असते, कार्यालयात सुखात असणारा माणूस घराकडे निघाला की दुःखी होतो,हे प्रत्येकांचे अनुभव खूप गमतीदार व चमत्कारिक असतात.दहा मिनिटे बायकोसमोर बसा,आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे, हे समजेल.त्यासाठी विचार सकारात्मक असावे लागतील नकारात्मक असतील तर समस्या आणखी कठीण वाटेल,आणि दृष्टिकोन बदलावा लागेल. विज्ञानवादी विकास हवा असेल तर,स्मार्टफोन,मोबाईल,कॉम्प्युटर इंटरनेट जरूर लागेल. अज्ञानवादी अंधश्रद्धा रीतिरिवाज परंपरा मान्य असणारा विकास हवा असेल,तर लिंबू,मिरची कोळसा,हळद कुंकू,नारळ,अगरबत्ती आणि भटजी शिवाय पर्याय नाही. शॉट कट हवा असेल तर कडक उपवास ठेऊन मंदिर किंवा घरातील देवघरात पूजा घालून उपवास सोडला पाहिजे. असेच अनेक प्रकारचे माणसं आपल्या आजूबाजूला खूप असतात. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदली करा.
      जगात दारू पिणारा कोण नाही.सर्वच आहेत पण प्रत्येकाचा बाँड वेगळा असतो त्यामुळे तो तसा ओळखल्या जातो.म्हणूनच दहा मिनिटे जो बहुसंख्य बेवडा नांवाने ओळखला जातो त्या बेवड्यासमोर बसा,त्यांचे आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे,हे समजेल.कारण त्याला प्रचंड दुःख झाले आहे त्यामुळेच तो सुखात राहण्यासाठी पितो.त्याला अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचाचं नको आहे.त्यामुळेच तो कामधंदा करून पिण्यासाठीच जगतो. दुसरे उधिस्ट त्याच्या समोर नसते.त्यांची संख्या जास्त असल्यामुळे जगात साठ,सतर टक्के दारूचे उत्पादन होत असते.त्यातून सरकारला मोठा कर मिळतो.म्हणूनच दारू अत्यावशक वस्तू,पदार्थात मोडते.हे कोरोना काळात सर्वच देशात पाहण्यास मिळाले.
     देशातील सर्वात लक्षवेधी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे साधू,संत म्हणूनच दहा मिनिटे साधू संन्याशासमोर बसा,आपल्याजवळील सर्वकाही दान करून टाकावे,असे वाटेल. त्यांचे अज्ञान आपल्यासाठी प्रचंड ज्ञान असते.त्यासाठी त्यांनी खूप तपश्चर्या रानावनात गांजा अफू पिऊन केली असते.कारण कोणताही साधू बघा त्याला चिलम लागते,त्याला ते धुनी म्हणतात.म्हणूनच ते आपल्याला ग्रेड वाटतात.
       देशातील सर्व कारभार चालवणाऱ्या राजकीय सत्ताधारी नेत्या समोर दहा मिनिटे बसा, आपण आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ,निरुपयोगी व कुचकामी असल्याचे,कळून येईल. राजकारणातील पॉवर किती मोठी असते,भ्रष्टाचार,गुन्हेगारी,अन्याय,अत्याचार करून ही  माणस समाजात प्रतिष्ठित म्हणून यांचे आपल्याला अप्रूप वाटेल.इथे पण हाच नियम अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा महत्वाचा असतो.मनी पॉवर,मसल पॉवर, म्यान पॉवर  
 देशातील आणखी एक लक्षवेधी व्यक्ती म्हणजे विमा एजंट दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा,जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे,असे वाटेल...अपंग झाल्यास किती आणि पूर्ण मेल्यावर किती यांचा वयाच्या हिशेबाने वारसदारांना कसा पैसा मिळेल यांचे संपूर्ण गणित समजावून सांगेल.त्यामुळे जिवंत राहून कष्टकरत हप्ता भारत राहणे महत्वाचे कि पॉलीशी  काढून मेल्याचे फायदेशीर असते.हाच त्यांचा मुख्य मुद्धा असतो.
       दहा मिनिटे गुजर मारवाडी व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे, असे वाटेल.धंदा करतांना तो देवाची शप्पत घेऊन सांगतो.मी तुम्हाला फसवून जास्त पैसे घेईल तर माझा मुलगा खाईल.म्हणजे अर्थ काय त्याच्या पैशाचा उपभोग मुलगाच घेणार आम्हाला वाटते त्याने देवासमोर मुलाची शप्पत घेतली तो खोटे बोलणार नाही.वरून म्हणतो गंदा है लेकीन धंदा है,यातुन आपल्याला काय अपेक्षित आहे.अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? 
      आता आपण प्रत्येक क्षेत्रातील तज्ञा समोर बसा तो त्याचे अगाध ज्ञान तुम्हाला सांगेल.दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा,स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे,हे समजेल.
  शाळा कॉलेज मधील शिक्षणाचा धंदा,बाजार म्हणून पाहू नका.शिक्षण खूप महत्वाचे असते त्यासाठी दहा मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा,पुन्हा विद्यार्थी व्हावे,अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.शिक्षणासाठी पालकांचे आर्थिक शोषण संस्था संचालक करतात हे अजिबात शिक्षक सांगणार नाहीत.पण शिक्षण किती महत्वाचे आहे त्यासाठी वाटेल तितका पैसा खर्च करा आणि पदव्या मिळवा एक वेळ पदवी मिळाली की नोकरी शंभर टक्के मिळालीच समजा मग खर्च केलेला पैसा खोऱ्याने गोळा करा.त्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? ते मात्र तुम्हीच ठरवा.
        तुम्ही प्रामाणिक इमानदार कर्तव्यदक्ष नागरिक असाल तर दहा मिनिटे शेतकरी,कामगार यांच्यासमोर बसा,त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता,असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल.पेनाने कागदावर शेरा मारणे सोपी असते.किंवा शून्याच्या पुढे मागे कोणता आकडा टाकावे ते समोरच्या चेहरा पाहून ठरवता आले पाहिजे.तेच खरे शिक्षण असते.तिथे ही तुम्हाला कोणाचा सहवास हवा ते ठरवतात येत. अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?       
      डोनेशन घेऊन घेतलेला प्रवेश आणि तिथे घेतलेली शिक्षणाची पदवी त्यामुळे मिळालेली गलेलठ्ठ पगाराची रक्कम थोडावेळ बाजूला ठेवून दहा मिनिटे सैनिकासमोर बसा,तुम्ही करत असलेली सेवा,समर्पण,त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे,याचा साक्षात्कार तुम्हाला होईल.जर तुम्ही देशाचे प्रामाणिक जागरूक कर्तव्यदक्ष सुज्ञान नागरिक असाल तर अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? ते ठरवता येईल.
       दहा मिनिटे माऊलींच्या वारीत चाला,आपोआप तुमचा अहंकार,मीपणा गळून पडेल.  दहा मिनिटे मंदिरामध्ये डोळे बंद करून शांत बसा,मनाला मनःशांती मिळेल.दहा मिनिटे लहान बालकाशी खेळा, नि:स्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल.दहा मिनिटे आई वडिलांसोबत बसा,त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल.याचाच अर्थ सहवास कुणाचा,हे खूप महत्त्वाचं असतं..! अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? उघडा मनाची कवाडे पहा निट.सगळे काही विकत घेता येते,मात्र कोणाचेही मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही.तुमचे सर्वात मोठे चाहते हे कुणी तरी अनोळखी असतात,परंतु तुमचे सर्वात जास्त तिरस्कार करणारे हे तुमच्या ओळखीचे, नात्यातले जवळचे असतात.हो कि नाही ?. कोण ठरवणार अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? 
      निसर्गाने अनेक उदाहरणे आपल्याला दाखवून दिले त्याकडे पाहण्याचा दुष्टीकोन  आपला कसा असावा हे आपल्यावर आहे.रानावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते,तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता,तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा.कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील.कारण तुम्ही कोणाच्या सहवासात काम केले त्यांची निसर्ग नोंद घेतो.अज्ञान, अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?,आपणच ठरवाल ही अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई. 

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

राजकीय नेत्याला बाप मानणाऱ्या मुलाच्या कानाखाली जाळ काढणारा बाप माणूस.

 राजकीय नेत्याला बाप मानणाऱ्या मुलाच्या कानाखाली जाळ काढणारा बाप माणूस.


महा राष्ट्र सध्या मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी साठ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या अभेद किल्ल्याला कटकारस्थान करून सुरुंग लावल्याने घरा घरात गावागावात उभी फुट पडल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अनेक पक्षाचे स्वताला कार्यकर्ते समजणारे प्राणी हवालदिल आहेत.आईवडिला पेक्षा पक्षाच्या नेत्याला चिन्हाला मानणाऱ्या तरुणांना कानाखाली जाळ काढणारा बाप माणूस कुठे दिसत नाही.त्यासाठी सोशल मिडिया वर आलेली ही पोस्ट वाचका समोर ठेवत आहे. 
    साधारणपणे ५-१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग! दिवाळीची सुट्टी लागली म्हणून गावाकडे निघालो होतो.दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती.माझ्या शेजारी जागा रिकामी होती.एक पन्नाशीला टेकलेला मनुष्य घाम पुसत माझ्या जवळ आला.जागा रिकामी आहे का चौकशी केली.मी अगदी मनमोकळेपणाने बॅग वर टाकून जागा करून दिली.गाडी नगरहून निघाली आणि गावाच्या दिशेने निघाली.माझं तरुण वय आणि हातात अग्निपंख पुस्तक पाहून न राहवून त्या सद्गृहस्थाने माझी चौकशी केली.मी सांगितलं की,कॉलेजमध्ये आहे.सुटीला घरी जातोय.गप्पांच्या ओघात ती व्यक्ती शिक्षक असल्याचं कळलं! मी पण उत्सुकतेने शाळेतल्या गमतीजमती विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी पण त्या मोठ्या आवडीने सांगायला सुरुवात केली.
   बोलता बोलता त्यांनी मला विचारलं,तू कोणता व्यवसाय करणार?.मी म्हटलं - मला व्यवसाय करायला आवडेल पण मला शिकवायला आवडतं!.माझ्या उत्तरावर त्यांनी कुतूहलाने माझ्याकडे पाहिलं.आणि म्हणाले - शिक्षक होणं ही साधी गोष्ट नाही.त्यासाठी पाठ हे स्वतः जगावे लागतात आणि विद्यार्थ्यांना जगायला शिकवावे लागतात.कोणत्या तरी धड्याचा संदर्भ देऊन हे त्यांनी सांगितलं. वाक्य आवडलं म्हणून लक्षात राहिलं.पण पुढे त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल याची अजिबात कल्पना नव्हती.आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. 
  नगरपासून ४०-५० किलोमीटर वर गाव होतं त्यांचं! गेली २० ते २५ वर्षे एसटी ने अप डाऊन करुन नोकरी केली होती.माणूस प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक होता. पोरगा नुकताच १२ वी झाला.मार्क पण चांगले पडले होते.नगरला यायला त्रास होऊ नये, म्हणून सरांनी मुलाला दुचाकी गाडी घेऊन दिली होती.साहजिकच पोराच्या हुशारीचं कौतुक बापाच्या डोळ्यातून पाझरत होतं.गाव १० किमीवर आलं, तसा सरांनी मुलाला एसटी स्टॅन्डवर घ्यायला ये असा फोन केला. पोराने पण लगेच तत्परता दाखवून येतो असं उत्तर दिलं आणि एसटी स्टॅण्डकडे निघाला. गाव आलं.एसटी थांबली. तसा पोरगा आणि त्याचे मित्र सरांना घेण्यासाठी गाडीवर आले होते.सर खाली उतरले. नवीन कोऱ्या गाडीवर एका राजकीय पक्षाचे चिन्ह आणि त्याचा फोटो चिकटवलेला दिसला.पुढच्या क्षणी एसटी स्टॅन्ड मुस्काडात मारल्याचा आवाजाने चपापले!सरांनी पोराच्या जोरदार कानाखाली वाजवलीं होती. सरांचा आवाज आणि राग दोन्ही चढत होते."तुझा बाप गेली वीस वर्षे तुझ्या बुडाखाली गाडी असावी,या करिता झिजतोय आणि तू मात्र नव्या कोऱ्या गाडीवर अनोळखी नेत्याचा फोटो लावून हिंडतोय? तुझ्या बापापेक्षा भारीय का रे....तो?.तो पण जिवंत आहे आणि तुझी आई आणि बाप पण! मग आईबाप विसरुन तुला त्याचा फोटो का लावावा वाटला?
    राजकारण करायचंय जरुर कर! मास्तरांचा पोरगा मास्तर व्हावा असा काही नियम नाही.पण कर्तृत्व असं घडवं की नेता तुझ्या दारात येऊन म्हंटला पाहिजे - "साहेब माझ्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. ह्या वेळी तिकीट तुम्हाला द्यायचं ठरलं आहे."सरांच्या डोळ्यातून आग आणि मुखातून शिशाचा रस कानात ओतला जात होता."जो पोरगा त्याच्या आईबापाच्या रक्ताच्या कमाईला कुणा नेत्याच्या प्रचाराचं लेबल लावत असेल, तर ती औलाद हरामखोर म्हणावी लागेल.अशी औलाद असण्यापेक्षा नसलेली परवडली.
    छत्रपती शिवाजी महाराजांनी पण स्वराज्याचं तोरण बांधलं,पण माता आणि मातृभूमीला वंदन करून,मावळ्यांना साक्षी ठेवून!.आणि पित्याला विश्वासात घेवून! लाचारी आणि लाळघोटेपणा करून नाही.घरी येईपर्यंत जर गाडीवरची ठिगळ जर निघाली नाहीत तर गाडी जाळून टाकेन."असं म्हणून सर पायीचं घराकडे निघाले.मी म्हटलं,साधी गोष्ट होती. जी घरी पण समजावून सांगणे शक्य होते. इतकं आक्रमक होण्याची गरज नव्हती.सर पायीच घरी निघाले. 
तसं पोराने आधी भराभर स्टिकर फाडले.पुढचं दृश्य फार पाहण्या सारखं होतं.सर फक्त त्यांच्या मुलाला बोलले, पण त्याच्या मित्रांना पण ते लागलं होतं. पोरांनी भराभर स्टिकर फाडली. सरांच्या शब्दांत दम होता.उद्या हा प्रसंग आपल्या कुणाच्या वाट्याला येणार नाही असं नाही.आणि त्यात चूक काहीच नाही. पोरांनी नीट घरचा रस्ता धरला.पोरगा मात्र घरी जायला धैर्य एकवटत होता.
सरांनी स्वतःच्या मुलाच्या थोबाडात वाजवून वेदना मात्र सगळ्यांच्या हृदयात जागवल्या होत्या. 
    पाठ जगणे कशाला म्हणतात हे सरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं होतं.गप्पा आणि अचानक घडलेला पुढचा प्रसंग यात सरांचं नाव विचारायचं राहून गेलं.इतक्यात कंडक्टरने डबल बेल मारली आणि गाडीतल्या अनेक बापांच्या मनात एक नवीन विचार आणि पोरांच्या मनात कृतज्ञतेच्या जाणिवा जाग्या करून गाडी गावाच्या दिशेने निघाली.
   वेळीच घातलेला एक टाका पुढचे शंभर टाके वाचवतो ते असं! नातं वृद्धाश्रमात पोहोचण्या इतकं फाटल्यानंतर त्याला सहानुभूतीचे टाके घालण्यापेक्षा वेळीच जबाबदारीच्या जाणिवा थोडं कठोर होऊन जाग्या केलेल्या उत्तम नाही का?.नेत्याला बाप समजणाऱ्या सगळ्या गाढव तरुणांना आवर्जून पाठवा. कदाचित अक्कल येईल आणि त्यांच्या आयुष्याचे मातेरे होणार नाही.प्रत्येक पक्षाच्या तरुणाला पाठवा, म्हणजे तो जागा होईल आणि कार्यकर्ता नावाचा एक प्राणी पृथ्वीवरून नामशेष होईल.
संकलन :- सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

स्वतःला अबला समजणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माहिती असली पाहिजे.


स्वतःला अबला समजणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माहिती असली पाहिजे.


एका सासूची प्रार्थना वाचून पुढे जाऊ या.
हे माते,
माझ्या सुनेला दिवाळीच्या साफसफाई साठी तितकीच शक्ती दे, जितकी शक्ती नवरात्रीच्या ९ दिवसात उड्या मारत मारत गरबा खेळताना तिच्यात होती.दिवस रात्र तिला पायाच्या नखापासून ते डोक्यावरील केसापर्यंत साजशृंगार करण्यासाठी देवीची शक्ती प्रेरणा देत होती.पण गात ज्यांनी मानव जाती साठी ऐतिहासिक कार्य केले.त्यांना एक तर महापुरुष महामानव,संत,महंत,महाराज,राजे महाराजे,सम्राट असा अनेक नांवाने ओळखल्या जाते.त्यांचा जन्म,आई,वडील, त्यांची जन्मभूमी कर्मभूमी,शिक्षण आणि मूत्यू याची नोंद असते.यासर्वाची माहिती मानव कल्याण करणाऱ्या माणसा करिता आणि संस्था करिता प्रेरणादायी असावी या करिता त्यांची माहिती विविध भाषे मध्ये इतिहासात उपलब्द असते. या महापुरुषांची माहिती आजच्या तरुण तरुणीला व्हावी म्हणून काही स्वाभिमानी लोक त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन त्यांच्यावर कथा,कांदबरी,नाटक, सिनेमा,तयार करून त्यांना सर्व समाजा पर्यंत पोचवितात.सध्या जमाना सोशल मिडीयाचा नेट गुगलचा आहे.म्हणूनच स्वतःला अबला समजणाऱ्या प्रत्येक स्त्रीला नवरात्रातील देवी पेक्षा सावित्रीबाई, जिजासाबाई,अहिल्याबाई ताराबाई माहिती असली पाहिजे.त्या प्रकारची आधुनिक संजूक्ता पराशरची कहाणी आहे जी महिलांना शंभर टक्के प्रेरणा देणारी आहे.शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.ते अनवाणी पायी चालण्याचे शिकवत नाही.तर ते संघर्ष करायला शिकवते.म्हणूनच वाचा.
     हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एक हाती यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे.दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही.एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात,धर्मापलीकडे ही आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं,रीतीरिवाज परंपरा याचा उदोउदो करणारे सत्य कधीच सांगत नाही आणि त्याचे समर्थन ही करत नाही. त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभर ही लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी,सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात.ही खेदाची बाब आहे.
   आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली. युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते.तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी, त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे.संजूक्ताची आई त्याला सांभाळते.
    संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली. बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता.शेकडो लोकांचे बळी गेले होते.आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते.तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही.तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले,तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये.म्हणूनच स्वतःला अबला समजणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माहिती असली पाहिजे.आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे. देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे.अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वानीच मानाचा मुजरा करायला हवा.शिक्षण घेऊन सुरक्षित नोकरी करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस ज्या देवीची मनोभावे पूजा अर्चा करून सेवा केली तिच्या जीवनातील संघर्षाची सत्य परिस्थिती समजून घ्यावी.संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला भेट देऊन लाईक करा.
जय हिंद,जय भारत.
संकलन सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई.

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी"

 आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) यांच्या ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्याने विशेष लेख

आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी"



मी १९८२ पासून असंघटीत नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेचे काम करत आलो आहे.त्या असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईसह राज्यातील सर्व संघटनांना अनेकदा एकत्र करून कृतिसमिती,सुरक्षा परिषद बनवल्या,इंटक आयटक सिटूच्या राष्ट्रीय नेत्या बरोबर अंतर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली होती.त्यामुळे त्यांची आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्याची काम करण्याची पद्धत जवळून पहिल्या गेली.पण समस्या काय आहे.ते सोडविण्यासाठी काय केले पाहिजे.याचे कोणताही अभ्यासपूर्ण नियोजन न करता मोर्चा,आंदोलन करून आंबेडकरी विचारांचा जय जय कार करून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तडजोडी करणारे सामाजिक,धार्मिक आणि राजकीय नेते पायलीचे पंधरा पाहायला अनुभवाला मिळाले.पण क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करणारे शोधावे लागतील,संविधानाच्या चौकटीत राहून पंचशिलेचे पालन करणारे व कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गाला संघटनेच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते पदाधिकारी बनविणारे एकमेव  आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणजेच आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार,मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे नेते म्हणून राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता अशी त्यांची लक्षवेधी ओळख निर्माण झाली आहे.
      सुरक्षित नोकरी करणारे आरक्षण लाभार्थीच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रातील तळागळातील संघटीत असंघटीत कामगारांचे आशास्थान सन्मानीय जे.एस.पाटील साहेब आहेत. उत्तर भारतात बहुजन समाजात मान्यवर कांशीराम यांनी प्रबोधन करून प्रचंड राजकिय जागृती निर्माण केली होती.त्यामुळेच मागासवर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय महत्वकांक्षा निर्माण झाल्या होत्या.आपल्या राजकीय मूल्यांबाबत उघडपणे भरभरून बोलणारा बहुजन समाज मुख्यतः कर्मचारी-कामगार वर्ग हा फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीच्या माध्यमातून संघटित होण्याबाबत मात्र अगदीच उदासीन असल्याचे उत्तर व दक्षिण भारतात दिसून येतो
    बहुसंख्या बहुजन समाजातील कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात गोळवलकर,गांधीवादी,साम्यवादी कम्युनिस्ट विचारांच्या ट्रेंड युनियन मध्ये किर्याशील सभासद असल्याचे दिसून येते.प्रत्येक कामाच्या ठिकाणी असलेली ब्राम्हणवाद्यांची मक्तेदारी,त्यांच्या प्रस्थापित संघटना व मागास-बहुजन कामगारांवर पिढ्यानपिढ्या लादलेली सामाजिक विषमतेची व्यवस्था ही बहुजन समाजामध्ये फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीत संघटित होण्याविषयी भीती निर्माण करते.ही भीतीच सर्वप्रथम दूर करण्याचे लक्षवेधी प्रबोधन आदरणीय जे.एस.पाटील यांनी केले आहे.त्यामुळेच उत्तर भारतात व दक्षिण भारतात स्वतंत्र मजदूर युनियनची पाळेमुळे घट्ट होतांना दिसत आहेत.
       भारतातील ब्राम्हणवाद दरवर्षी शोषण करण्याची माध्यमे बदलत असतो.व्यवस्थेचे परिवर्तन मान्य नसल्याने शोषितांसाठी वरवरचे बदल तो स्वतः घडवून आणतो.बहुजन कामगारांनी आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी स्वतंत्र 'ट्रेड युनियन' स्थापन न करता ब्राम्हणवाद्यांचेच नेतृत्व स्वीकारावे म्हणूनच वेल्फेअर असोसिएशन,फेडरेशनचा फार्स ब्राम्हणवाद्यांनी निर्माण केले आहेत. हे सर्वप्रथम स्पष्टपणे मांडण्याचे काम माननीय जे.एस.पाटील यांनी केले आहे,त्यामुळेच ते देशातील आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणून एकमेव नेतृत्व पुढे येत आहे. 
      फुले-शाहू,आंबेडकरवादी विचारांची देशव्यापी ट्रेड युनियन निर्माण होईल व ती राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन महासंघानां आव्हान निर्माण करील असे कोणालाही वाटले नव्हते, मान्यताप्राप्त प्रस्थापित ट्रेंड युनियनच्या विरोधात म्हणजेच ब्राम्हणवादाला थेट आव्हान आज आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता देत आहे.त्याला सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक यांनी मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे.म्हणूनच  महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष आज स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून एक देशव्यापी कामगार चळवळ बनली आहे.
    आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" जे एस पाटील यांच्या कुशल संघटक,वकृत्व आणि नेतृत्वाने,मिशनरी बाण्याने,मोठ्या जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन उभी राहत आहे.देशभरातील मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील कामगार कर्मचारी जागरूक होऊन स्वतःच्या ट्रेंड युनियन स्थापन करून आय एल यु शी संलग्न करीत आहेत.एखादया क्षेत्रात करिअर करायचंय म्हणून काम करणारे अनेक इंजिनियर लोक भेटतील पण आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियन उभी करण्यासाठी जीवाचे रान करणारा इंजिनियर एखादाच भेटेल. प्रशासनाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कामगार,कर्मचाऱ्यांना संघटित करून संघर्ष करण्यास तयार करणारा अधिकारी कुठेही भेटणार नाही.कामगारांना संघटित करून युनियन बनविली म्हणून बदली झाली,तर सुवर्ण संधी म्हणून नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करणारा इंजिनियर अधिकारी अशी ओळख निर्माण करणारा माणूस सेवा निवृत्तीनंतर घरी बसून नातवांना खेळवत बसला असतात.पण सेवा देत असतांना कामगार कर्मचाऱ्यांचे संघटना बांधणी करून प्रशिक्षित कार्यकर्ता पदाधिकारी निर्माण करणारा माझ्या दृष्टीने एकमेव नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणजेच जे एस पाटील साहेब असावे.
      मी अनेक राजकीय सामाजिक नेते पाहिले,जे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटना पक्ष बांधणी करतात,तेव्हा ते तोंडात साखर डोक्यावर बर्फ व पायाला भिंगरी लावून फिरतात.तेव्हा कुठे त्यांचे थोडे फार नांव राहते.इथे पाटील साहेबांचे उलटे आहे,पायाला जरूर भिंगरी आहे,पण तोंडात साखर नाही,रोखठोक शब्दांत शिस्तबद्ध पध्दतीने काम करण्याची तंबी आहे,डोक्यावर बर्फ नाही तर सकारात्मक विचारांची प्रचंड ऊर्जा आहे.भावनिकता बिलकुल नाही,आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी भाषे सोबत सनदशीर मार्गाने आचरणाचे हमी हवी आहे. भारतीय संविधानात दिलेल्या प्रशासकीय कामाचा दर्जा वेळोवेळी दिली जाणारी जबाबदारी तिचा तिमाही,सहामाही,वार्षिक सर्वसाधारण सभेत मजूर केलेला अहवाल सादर करण्यात कोणतीही सबब चालत नाही,प्रशिक्षण शिबिरात वेळेवर न येणाऱ्याला प्रवेश नाही.म्हणजेच नाही,असे कडक शिस्तीचे आंबेडकरी विचारांचे क्रांतिकारी नेते सर्वच क्षेत्रात निर्माण झाले असते तर आंबेडकरी समाज हा शासन कर्ती जमात शंभर टक्के झाला असतात.
    हजारो लोकांना गोळा करून संघटना स्थापन करून चालविण्या ऐवजी शंभर लोक रीतसर सभासद बनवून केलेलं काम निश्चितच ध्येय गाठण्यासाठी परिपूर्ण असते.त्यासाठी क्रांतिकारी विचारांची देवाणघेवाण नियमितपणे झाली पाहिजे.समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी आदरणीय जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन काम करते. त्यात देशभरातील संघटित असंघटित कामगार संघटना संलग्न होत आहेत,राष्ट्रीय पातळीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार,कर्मचाऱ्यांनी संघटित व्हावे आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेत्याचे हात मजबूत करावे,आदरणीय जे एस पाटील यांच्या (६ ऑक्टोबर १९५५)  वर्ष पूर्ण करून ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०१७ पासून मी त्यांचा सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.त्या अनुभवावर हा लेख लिहला आहे
   लाखो कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाला प्रेरणा देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची साधी राहणी,उच्च विचार आणि शुद्ध आचरण हे कौतुकास्पद आहे. कोणत्याही पोस्टरवर,होडिंग वर फोटो टाकून प्रचार प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई करणारे नेते शोधून सापडणार नाहीत,अशा कडक शिस्तीच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेंड युनियनचे राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्या आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" आदरणीय जे एस पाटील साहेब यांना जे निर्माण करून ठेवले ते एकाही आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी ६० वर्षात केले नाही.त्यांनी व्यक्तिगत आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती केली असेल.पण संघटनेची संस्थेची साधन संपतीचे काय?.स्वताचे मालकी हक्काचे एक कार्यालय किंवा सभागृह नाही.मात्र जे.एस पाटील यांच्या कुशल त्यागी जिद्धी नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे बांद्रा मुंबईत म्हाडा कार्यालयासमोर सुप्रभात बिल्डींग मध्ये करोडो रुपयाचे कार्यालय आहे.नागपूर मध्ये मध्यवर्ती ठिकाणी निलकमल कॉम्प्लेक्स महाजन मार्केट सीताबर्डी येथे मध्यवर्ती कार्यालय व १०० लोक बसतील एवढे सभागृह आहे.प्रेरणा नगर, हजारी पहाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत आहे.त्यात एक हजार लोकांचे सभागृह,पाचशे,तीनशे लोकांचे वातानुकूलित सभागृह आणि दोन व्ही आय पी,सूट,सहा,आठ लोकांसाठी स्पेशल खाटची व्यवस्था,पाहुण्यांसाठी दोन खाटांचे आठ रूमची व्यवस्था आहे.कामगार कर्मचारी अधिकारी नागपुरात कामा निमित्याने आला तर हॉटेल लॉज वर राहण्याची गरज नाही.असेच प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत औरंगाबाद तयार होत आहे.एका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बळावर हे निर्माण झाले आहे.स्वतंत्र मजदूर युनियन संलग्न युनियनचा काही प्रमाणात त्यात सहभाग आहे.सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने अशा पद्धतीने काम केल्यास प्रत्येक तालुक्यात,जिल्ह्यात स्वताच्या मालकीचे कार्यालय व सभागृह उभे राहू शकते.हे केवळ आणि केवळ जे.एस.पाटील रमेश रंगारी सारखी इंजिनियर प्रशासकीय अधिकारी संघटीत झाल्या मुळे शक्य झाले.त्यात अनेकांचे मोलाचे योगदान आहे.आज वयाची ६७ वर्ष पूर्ण झाल्यावर ही जे एस पाटील घरात न बसता मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी आणि विशेष असंघटीत कामगारांना संघटीत करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या कोणते ही कारण न सांगता राज्यात आणि देशात स्वतंत्र मजदूर युनियन मजबूत करण्यासाठी फिरतात. म्हणूनच मी आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" असे लिहतो.त्यांच्या त्या जिद्धीला ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मानाचा मुजरा आणि लाख लाख शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबई
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य,
(आदरणीय जे.एस.पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन आयोजित विविध कार्यकर्माची छायाचित्र माहिती करिता सोबत देत आहे.योग्य त्याचा लेखात उपयोग करावा.ही नम्र विनंती.)

दिक्षाभूमीवर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?

 दिक्षाभूमीवर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?



सम्राट अशोक धम्म विजया दिन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जगाच्या नकाशावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दीक्षा सोहळयाचा ऐतिहासिक इतिहास नोंदविला गेला आहे.तो दरवषी विजया दशमीला नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा होतो.देशात असा कोणताही नेता व संघटना,पक्ष नाही की त्याला हजार दोन हजार लोक गोळा करण्यासाठी हंड्बील,पोस्टर,जाहिराती देऊन मिटींगा घ्याव्या लागतात तेव्हा मोठ्या मुश्किलीने लोक गोळा होतात.त्यांना वाहनाची,चहा,पाणी आणि जेवणाची व्यवस्था करावी लागते. देशात नव्हे तर जगात एकच व्यक्ती अशी आहे कि त्याच्या प्रतिमेला त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी,सलामी देऊन नतमस्तक होण्यासाठी नागपुरात गेल्या ६६ वर्ष लाखोच्या संख्ये लोक येतात.त्यासाठी त्यांना कोणताच नेता हंड्बील पोस्टर कडून येण्याचे आमंत्रण निमंत्रण देणारे आवाहन करीत नाही तरी लोक लाखोच्या संख्येने येतात.त्या लाखो लोकांचे नेतृत्व कोणीच करीत नाही. सर्वच स्व्यमघोषित नेते कार्यकर्ते असतात.

     १ जानेवारी शौर्य दिन भिमा कोरेगांव,विजया दशमी नागपूर आणि ६ डिसेंबर चैत्यभूमी दादर मुंबई येथे येणारी गर्दी कोणाच्याही नियंत्रणात नसल्यामुळे सरकारला खूप काळजी पूर्वक परिस्थिती हाताळावी लागते.त्यामुळेच प्रशासन अधिकारी दरवर्षी लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल यांचेच नियोजन करीत असतात.रोड बंद,पार्किंग बंद,जाणूनबुजून या असंघटीत समाजाला त्रास देण्यासाठी किंवा जातीय दंगल घडविण्यासाठी अनेक षड्यंत्र केली जातात.त्यातच घरका मुद्यी लंका ढाये,कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बारा. मान्यताप्राप्त नेत्यांच्या विरोधात समाजात असंतोष निर्माण करून शॉटकट नेते बनणारे काही कमी नाहीत.सम्राट अशोक धम्म विजय दिनाच्या पूर्व स्नाध्येला एड गुणवंत सदावर्ते,यांनी देन संघाची तुलना करून सुरुंगस्फोट घडविण्याचा प्रयत्न केला.त्यांनतर दिक्षाभूमी स्मारक समितीच्या सदाफुले यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी नको ते शब्द व्यक्त करून दुसरा शब्द स्पोट घडविण्याचा प्रयत्न केला.आणि रामाच्या दासने वेगळाच शोध लावला.त्यामुळे नेहमी सारखा नागपुरांच्या दिक्षाभूमी वर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?.ही होणारच आहे.

       मागासवर्गीय समाजातील भक्त मंडळी महापुरुषांचे जन्मदिन आणि स्मृतीदिन आल्यावर भरभरुन अभिवादन करायला लागतात. मी पण १९८२ पासून १९९४ पर्यत नागपूर,मुंबई बुक स्टोल लावून पुस्तके विकत होतो.दादरच्या शिवाजी पार्क मध्ये चष्मा तपासणी शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर,जनजागृती साठी पत्रक वाटप असे काम दरवर्षी करत होतो.कालकथीत विजय गोविंद सातपुते यांच्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांच्या  संपर्कात आल्यानंतर खरी परीस्थिती आणि मूळ समस्या व त्या समस्यांचे मूळ कारण लक्षात येऊन त्या दृष्टीकोणातून फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीची क्रांतिकारी विचारांची खरी ओळख पटू लागली. मग हे एक दिवसाचे भावनिकदृष्ट्या दाखवल्या जाणारे प्रेम, अभिवादन,त्रिवार वंदन ह्या गोष्टी बनावटी वाटून चीढ निर्माण करु लागल्या.कारण ह्यामुळे महापुरुषांना अपेक्षित बदल होणं तर दूर उलट त्यांच्या विचारधारेचा पराभव होऊन त्यांच्याच समतावादी विचारांची हत्या होऊन विषमतावादी विचारधारेचा विजय होतांना दिसत आहे.नागपूरच्या दिक्षाभूमी वर होणाऱ्या प्रत्येक कार्यकमात आर एस एस प्रणित नेत्यांचे उपस्थिती आणि आदरतिथ त्यातून राज्यात देशात जाणारा संदेश हा भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या? करणारा आहे. 

      "मेरा जीवन ही मेरा संदेश है!" हे शंभर टक्के सत्य असतांना त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यावर भर दिला जात आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून माझे अपूर्ण कार्य पूर्ण करा. "जागृतीचा ग्नी अखंड तेवत ठेवा." असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या आयुष्याचा खराखूरा अभ्यास केलात तर जाणवते,त्यांनी त्यांच्या जीवनात मानलेले तीन गुरु बुद्ध-कबीर- फुले यांचा जयजयकार न करता त्यांच्या विचारांचे आयुष्यभर अनुकरण करत त्यांचे सामाजिक कार्य पूर्णत्वास नेले.ही कोणत्या ही अनुयायाने आपल्या महापुरुषाला दिलेली खरी व प्रामाणिक प्रेरणादायी मान वंदना,श्रद्धांजली किंवा आदरांजली असते. बाकी सगळं प्रचंड ढोंग असते व स्वताचा स्वार्थ संभाळत केलेली तडजोड असते.खरे प्रबोधन व आनुकरण समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या सामाजिक गुरुंच्या आयुष्यातले अनेक  महत्वपूण प्रसंग वाचले तर प्रेरणा देतात. बाबासाहेबांनी आम्हा पाच्यांशी टक्के बहुजनांना संख्यावार प्रतिनिधीत्व व मानवी हक्क-अधिकार देण्यासाठी मनुस्मृती विरोधात "लोकशाही व संविधान" भारतात आणण्यासाठी वेळप्रसंगी स्वताची पत्नी व मुले,सुखसोई त्यागून आयुष्यभर जनजागृती,समाजप्रबोधन,संघटीत जात दांडगे धनदाग्यांच्या विरोधात असंघटीतांना संघटीत करून अभ्यास करून संघर्ष केला. आज दिसणारा साधन-संपन्न एस सी,एस टी,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज निर्माण केले.अन्यता शुद्र, अतिशूद्र आणि अस्पृश समाज माणूस मानून जगण्याच्या लायकीचा सुद्धा नव्हता. तो समाज आता लोकशाही व संविधान कमकूवत करत असलेल्या ब्राम्हणशाहीची वाढती  "गर्वसे कहो हम हिंदू है" ही गुलामी पत्कारून बहुजन समाजातील महापुरुषांच्या   क्रांतिकारी विचारांना पराभूत करून भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?. करीत आहे.
    महापरीनिर्वाण दिनाला,शौर्य दिनाला,धम्म विजया दशमी दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी निवडणूकीत कोणत्या ही मतदारसंघात संख्येच्या बळावर खरी का उतरत नाही.यांचे चिंतन कोणता ही नेता कार्यकर्ता करतांना का दिसत नाही.म्हणजेच ही वेगवेगळ्या दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?.करणारी आहे.हे सिद्ध होते.यावर वैचारिक विचारमंथन झाले पाहिजे.चर्चा,संवाद परिसंवाद होऊन योग्य मार्ग काढला पाहिजे.अन्यता असे दिन येत राहतील आणि गर्दी वाढत जाईल.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४४०३८५९,भांडूप,मुंबई.

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन

 मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन



          वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते.डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही.आणि संकट आल्या शिवाय, डोळे उघडत नाहीत.राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन म्हणणारे राजकारणातील तरुण तडफदार अभ्यासू कावेबाज अण्णाजी पंत म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास आपण पाहत असाल,वाचत असाल.तो महारष्ट्राला कुठे नेणारा आहे.निसर्गाचा नियम जल बिन मछ्ली म्हणजे पाण्याच्या बाहेर जिवंत मासळी काढली तर ती कशी करते कधी पाहिले काय?. ती पाण्यात जाण्यासाठी ज्या जिद्दीने तडफड करते ते पाहिल्यावर कोणत्याही माणसांचे मन हेलावून निघते. असाच प्रकार सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे, माजी मुख्यमंत्री,माजी विरोधी पक्षनेते आणि आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणविस साहेबांची परिस्थिती त्या माश्या सारखी झाली आहे. मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन हे त्यांनी करून दाखविले.
           महाराष्ट्रात अहोरात्र खोटे बोलून शेतकरी,मराठा,धनगर,ओबीसी,मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करून ई व्ही एम मुळे निवडणूक जिंकली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पद आपले हक्काचे आहे.शंभर टक्के गृहीत धरून चालले असतांना शिवसेनेच्या वाघांची डळकाळी फोडून शिकाऱ्याने शिकार सहजतेने करून नेली.त्यामुळेच देवेन्द्र फडणवीस यांची हालत एका वाटसरू सारखी झाली.विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.त्याला मारण्या साठी दगड उचलावा.दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.तिने वेग घेण्यापूर्वी,एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.तर हात सुटून विहीरीत पडण्याची भिती यालाच तोंडाशी आलेला घास गेला असे म्हणतात.म्हणूनच आपण प्रतिज्ञा केली होती.मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन.आता आला तर महाराष्ट्राचा विकास करण्याचे स्वप्ना पहा.गुजरातचे नाही.
         देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असतांना.केवळ महाराष्ट्रात नाही? सर्व राज्यासह देशभरात सुरू असतांना देवेंद्रजी फडणविस यांना रात्रंदिवस झोप लागत नव्हती.जागोजागी त्यांना महाराष्ट्र आणि राज्याचा मुख्यमंत्री दिसतो.त्यांना सारखा शेतकरी आत्महत्या करतो,वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील मंत्रालयात येऊन आत्महत्या करतो.जेंव्हा ऐशी वर्षाच्या शेतकऱ्याने आपल्या कार्यकाळात मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व आपन कित्येएक दिवस त्याच्या कुटुंबियांना आपण नजरकैदेत ठेवले होते.हा इतिहास शेतकरी विसरला नाही.विसरला असेल तर तो शेतकरी नसावा.
     "एक मराठा लाख मराठा" मराठ्यांचे लाखोंचे क्रांती मुक मोर्चे शिस्तप्रीय पद्धतीने निघाले होते व बावीस बांधवांनी बलीदान दिले तरी आपन मुग गिळून गप्प बसलात होता. म्हणे अभ्यास सुरु आहे. जेंव्हा न्याय्य मागण्यासाठी आमचा आदिवाशी कष्टकरी बांधव नाशिक ते मुंबई पायी प्रवास करत आसताना उन्हामुळे पिघळनाऱ्या डांबरी रस्त्यावर  चालल्यामुळे त्याचे पाय सोलुन निघत असतांना ही तो आझाद मैदानात आला होता.त्याच्या सातबाराचे काय केले.हा इतिहास वनविभागाची जमीन कसणारा आदिवासी विसरला नाही. विसरला असेल तर तो भूमिहीन आदिवासी नसावा. 
    फडणविस साहेब महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे आर्थिक आडचणींचा सामना करत सताना, तुम्ही मोदीच्या पी एम केयरला मदत करा असे आवाहन करत होता. हे सांगताना महाराष्ट्र राज्याशी थोडी तरी सामाजिक बांधिलकी ठेऊन बोलले पाहिजे होते.  आपन फार अभ्यासू राजकारणी व्यक्तीमत्व आहात असे तुमचे लोक म्हणतात.संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करीत होता.तेव्हा जगाच्या पाठीवर कोरोनाचे राजकारण  करनारे आपन एकटेच होता. आपनही पाच वर्षे महाराष्ट्रातचे मुख्यमंत्री राहीलात आपन राज्यात कीती हॉस्पिटल व पायाभुत सुविधा ऊभ्या केल्या होत्या व महाआघाडी सरकारने त्या बंद केल्या त्यामुळे महाराष्ट्र संकटात सापडला. हे सांगितले पाहिजे ना?.
        अच्छे दिन दाखविण्यासाठी तुम्हाला वृतपात्रांना संपूर्ण पाच वर्षात दरदिवशी ऐशी हजार रुपये जाहीरातींवर खर्च करावे लागले. हे आम्ही सांगत नाही माहिती अधिकारात ऊघड झाले आहे.देवेंद्रजी संपुर्ण देशामध्येच कोरोनाच्या रुग्नांचा आकडा वाढत होता.मग ते अपयश सन्माननिय मोदी साहेबांचे अपयश नव्हते का?. जी,एस,टी चे एकविस हजार कोटी  केंद्राकडे अडकुन पडले होते.मी काही करीन ते राज्यात घेऊन येण्यास मदत असे कधीच म्हटले नाही.मदत करण्या ऐवजी महाराष्ट्राला संकटात टाकण्याचे महापाप आपण त्यावेळी केले होते. असे आम्हाला वाटते.तुम्हाला वाटत नाही काय?. 
     सांगली महापुराच्या वेळी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना काय मार्गदर्शन करीत होता, त्याच्या बातम्या आणि व्हीडीवो क्लिप पाहता काय?.राजकारणात यशस्वी होण्यासाठी सहकार्याचा आणि मतदारांचा विश्वासघात करण्याचा अनुभव प्रचंड असतांना आपणास विरोधीपक्ष नेते बनावे लागले. आणि कोणताही राजकारणात विश्वासघात करण्याचा अनुभव नसणारे मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात अतीशय चांगले काम करत होते. ते आपणास शांतपणे पाहण्याची इच्छा नव्हती.म्हणूनच मी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन असे जाहीरपणे सांगत होता.ते आपण पूर्ण करून दाखवले.आप तरुण तड फड करणारे राजकारणातील कुशल संघटक हरहुन्नरी नेते आहातमी काही करीन आणि मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन. आता आला आहात तर मतदारसंघात फिरतांना मतदारांनी महाराष्ट्र संकटात असतांना आपण काय करीत होता?. असे विचारले नाही पाहिजे,यासाठी महाराष्ट्रातील जनतेला मतदारांना वाचविण्यासाठी  संविधानाच्या चौकटीत काम करा.हीच आपणास मतदारांच्या वतीने विनंती करतो.
सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

सर्वात मोठे धन कोणते?.

 सर्वात मोठे धन कोणते?.



 आज काल काही लोक श्रीमंतीचे जास्त प्रदर्शन करतात.गाडी,बंगला,सोने चांदी हिरे मोती असे दाखवतात की त्यांच्याकडे अफाट खरी संपत्ती आहे.पण त्यांना त्यांचे शरीर साथ देत नाही.त्यामुळे त्यांना अनेक गोष्टीनां मुखावे लागते. खाण्या पिण्यावर बंधन असली की माणूस नावाचा प्राणी कावळा बावळा होतो. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी निसर्गाच्या नियमांचे पालन करावे लागते. आणि नियमांचे उल्लंघन केले तर डोके ठिकाणावर राहत नाही. म्हणूनच एक सुप्रसिद्ध म्हण आहे, "शरीर ओके तर ठिकाणावर डोके".पैसे असल्यावर सर्वच विकत मिळू शकते, पण शरीर आणि शरीरातील अवयव मिळणे अशक्य असते. ते आपल्या शरीरातील अवयव देण्याची वेळ येते तेव्हा जवळची माणसं तोंड फिरवून उभी राहतात.तेव्हा आपली कोण आणि परकी कोण हे लक्षात येते.आपल्यांशी बोलतांना आनंद दुप्पट असतो आणि दुःख अर्धे होत असते. तीच माणसं आपली वाटत असतात,जग परके वाटत असते.
   आईवडीलांनी जन्म दिला असतो,तेच लहानपणी संगोपन करून नांव देतात,शिक्षण शाळेत मिळते आणि संस्कार समाज देतो.शिक्षणामुळे नोकरी मिळते आणि संस्कारामुळे मानसन्मान मिळतो.तुमचे आचरण व स्वभाव तुमची ओळख निर्माण करते.तुमचे शिक्षण,पद कोणी विचारात घेत नाही.पण तुमच्या चेहऱ्यावरील हास्य (स्माई) गाडी वरचा वाहन चालक,गेटवरचा सुरक्षा रक्षक ते कार्यालयातील कर्मचारी अधिकारी कायम लक्षात ठेवून उत्साहात उत्स्पुर्तपणे नमस्कार करून स्वागत करतात.त्यांचा आनंद घेता आला पाहिजे.
    कर्मचारी अधिकारी वर्गाने किंवा प्रत्येक माणसाने एक लक्षात असु द्यावे.आपल्या वडिलांचे नांव व संपत्ती,आपल्याला मिळू शकते,पण आरोग्य,शरीर,आपले आपल्यालाच कमवावे लागते,ते वारसाहक्काने मिळत नाही.आता पर्यंत पैसा श्रेष्ठ होता,पण इथुन पुढे ज्याचं आरोग्य उत्तम,तोचं खरा श्रीमंत.असचं म्हटलं जाईल. म्हणूनच सर्वात मोठे धन कोणते?.विचारले तर उतर एकच आहे आरोग्य धन.प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल तर,पण ते खाता येत नाहीये,हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,म्हणून शरीर,आरोग्य हे जपा.म्हणूनच सर्वात मोठे धन आरोग्य धन असते हे कायमस्वरूपी जपून ठेवावे. 
     प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल पण चांगले मित्र आणि नातलग नसतील तर त्याची किंमत शून्य असते.मेल्यानंतर ही काही माणस आपल्या शरीराला स्मशानभूमीत नेण्यासाठी आवश्यक असतात.त्यासाठी चांगली माणसं ही जपा.कारण जसे उत्तम शरीराशिवाय,आनंद नाही,तसेच चांगले नातेवाईक,जिवलग मित्र-मैत्रीण शिवाय,जीवनात आनंद नाही.जगताना स्वतःच्या बोलण्यात,इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा.की,वाईट लोकांना त्याचा ठसका,आणि चांगल्या लोकांना त्याची चवच लागली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात, "प्रेम, काळजी आणि आदर" पहिल्या दोन तुम्ही दिल्या कि तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते.कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं,प्रत्येकाला काही तरी सुंदर दिलयं.पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते.या जगात नाते तर सर्वच जोडतात.पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.मोठ्यामोठ्या शब्दांनी नाते टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होते
आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो. शब्द देवुन "आस" निर्माण करण्यापेक्षा,साथ देवुन "विश्वास" निर्माण करा,म्हणूनच माणसांनी माणसांना धीर देण सुद्धा अत्यावश्यक असते.ते अतिआवश्यक सेवेतच मोडते.वेळेचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येक माणसांनी वागले पाहिजे.वेळ निघून गेल्यावर हात जोडून पाया पडले तरी त्यांची भरपाई होऊ शकत नाही.
  जगात भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस जगाच्या प्रयोग शाळेत तयार झाली नाही.प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील डाग कोणी सत्य सांगणार नाही.त्यासाठी आरसाचं लागतो.तो जे आहे तेच आपल्या चेह-यावरील "डाग" दाखवतो. त्यावेळी राग येवून आपण आरसा नाही फोडला पाहिजे.तर चेहऱ्यावरील तो डाग साफ केला पाहिजे.अहंकारी लोक नेहमी सत्य दाखविणार आरसाच बदली करतात.स्वतच्या चेहऱ्यावरील डाग,आणि आचरणातील नकारत्मक विचार घालवत नाही.म्हणूनच ते कायम दुखी दिसतात.इतरांना हसत चेहऱ्याने पाहिले की त्यांना त्याचे दुखाच वाटते.
      प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी असलेले लोक देवाला खूप घाबरतात.ते मंदिरात कायम देव शोधात असतात.मंदिरात दान दक्षिणा सढळ हस्ते देत असतात. दु:खी गरजू माणसांत त्यांना कधीच देव दिसत नाही. देव हा शब्द आहे,जो तुम्हाला पुस्तकात मिळेल.देव मूर्ती आहे,जी तुम्हाला मंदिरात मिळेल.देव माणूस आहे,जो तुम्हाला समाजात मिळेल.पण देव जीवनात आहे,तो तुमच्या आत मिळेल.निसर्गाने खूप काही चमत्कारी बनवून ठेवले त्याचा लाभ घेता आला पाहिजे.निसर्गाने हवेची निर्मिती केली.म्हणूनच हवेची पण गंमत पहांना,चाकातून गेली की,चाक पळत नाही. डोक्यात गेली की,चांगल-वाईट कळत नाही. आणि शरीरातून श्वासोच्छवास सोडून गेली की,घरात कोणी चार तासापेक्षा जास्त ठेवत नाही.त्यावेळी तुमच्या प्राॅपर्टी,पैसा,समृद्धीला काहीच किंमत राहत नाही.म्हणूनच आरोग्याची योग्य वेळी काळजी घ्यावी कारण तेच सर्वात मोठे धन आहे.
         माणसांनी माणसांना धीर देण अतिआवश्यक सेवेतच मोडते. सकारत्मक विचाराने कायम वागले पाहिजे.नकारत्मक विचाराने वागल्यास कायम नुकसान होते.माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो,म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते. आणि स्वतःच जळते.परंतु,आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे.मग आपण का लहानसहान गोष्टीने नकारत्मक विचाराने पेटून उठतो.सकारत्मक विचाराने शांत रहा.निरोगी व स्वस्थ रहा.घर्षण करून पेटविणाऱ्यां पासून सावध रहा.आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही.जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा.इतरांना जगवा त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर ही आपले नांव निघेल.त्यालाच लोक कुशल कर्म,कुशल पुण्य आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारी व्यक्ती म्हणून नोंद घेतली जाते.त्यासाठी सर्वात मोठे धन सांबाळून ठेवा.आणि इतरांना ही सांबाळून ठेवण्यास सांगा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.