सर्वात मोठे धन कोणते?.
आज काल काही लोक श्रीमंतीचे जास्त प्रदर्शन करतात.गाडी,बंगला,सोने चांदी हिरे मोती असे दाखवतात की त्यांच्याकडे अफाट खरी संपत्ती आहे.पण त्यांना त्यांचे शरीर साथ देत नाही.त्यामुळे त्यांना अनेक गोष्टीनां मुखावे लागते. खाण्या पिण्यावर बंधन असली की माणूस नावाचा प्राणी कावळा बावळा होतो. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी निसर्गाच्या नियमांचे पालन करावे लागते. आणि नियमांचे उल्लंघन केले तर डोके ठिकाणावर राहत नाही. म्हणूनच एक सुप्रसिद्ध म्हण आहे, "शरीर ओके तर ठिकाणावर डोके".पैसे असल्यावर सर्वच विकत मिळू शकते, पण शरीर आणि शरीरातील अवयव मिळणे अशक्य असते. ते आपल्या शरीरातील अवयव देण्याची वेळ येते तेव्हा जवळची माणसं तोंड फिरवून उभी राहतात.तेव्हा आपली कोण आणि परकी कोण हे लक्षात येते.आपल्यांशी बोलतांना आनंद दुप्पट असतो आणि दुःख अर्धे होत असते. तीच माणसं आपली वाटत असतात,जग परके वाटत असते.
आईवडीलांनी जन्म दिला असतो,तेच लहानपणी संगोपन करून नांव देतात,शिक्षण शाळेत मिळते आणि संस्कार समाज देतो.शिक्षणामुळे नोकरी मिळते आणि संस्कारामुळे मानसन्मान मिळतो.तुमचे आचरण व स्वभाव तुमची ओळख निर्माण करते.तुमचे शिक्षण,पद कोणी विचारात घेत नाही.पण तुमच्या चेहऱ्यावरील हास्य (स्माई) गाडी वरचा वाहन चालक,गेटवरचा सुरक्षा रक्षक ते कार्यालयातील कर्मचारी अधिकारी कायम लक्षात ठेवून उत्साहात उत्स्पुर्तपणे नमस्कार करून स्वागत करतात.त्यांचा आनंद घेता आला पाहिजे.
कर्मचारी अधिकारी वर्गाने किंवा प्रत्येक माणसाने एक लक्षात असु द्यावे.आपल्या वडिलांचे नांव व संपत्ती,आपल्याला मिळू शकते,पण आरोग्य,शरीर,आपले आपल्यालाच कमवावे लागते,ते वारसाहक्काने मिळत नाही.आता पर्यंत पैसा श्रेष्ठ होता,पण इथुन पुढे ज्याचं आरोग्य उत्तम,तोचं खरा श्रीमंत.असचं म्हटलं जाईल. म्हणूनच सर्वात मोठे धन कोणते?.विचारले तर उतर एकच आहे आरोग्य धन.प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल तर,पण ते खाता येत नाहीये,हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,म्हणून शरीर,आरोग्य हे जपा.म्हणूनच सर्वात मोठे धन आरोग्य धन असते हे कायमस्वरूपी जपून ठेवावे.
प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप असेल पण चांगले मित्र आणि नातलग नसतील तर त्याची किंमत शून्य असते.मेल्यानंतर ही काही माणस आपल्या शरीराला स्मशानभूमीत नेण्यासाठी आवश्यक असतात.त्यासाठी चांगली माणसं ही जपा.कारण जसे उत्तम शरीराशिवाय,आनंद नाही,तसेच चांगले नातेवाईक,जिवलग मित्र-मैत्रीण शिवाय,जीवनात आनंद नाही.जगताना स्वतःच्या बोलण्यात,इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा.की,वाईट लोकांना त्याचा ठसका,आणि चांगल्या लोकांना त्याची चवच लागली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात, "प्रेम, काळजी आणि आदर" पहिल्या दोन तुम्ही दिल्या कि तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते.कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं,प्रत्येकाला काही तरी सुंदर दिलयं.पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते.या जगात नाते तर सर्वच जोडतात.पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.मोठ्यामोठ्या शब्दांनी नाते टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होते.
आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो. शब्द देवुन "आस" निर्माण करण्यापेक्षा,साथ देवुन "विश्वास" निर्माण करा,म्हणूनच माणसांनी माणसांना धीर देण सुद्धा अत्यावश्यक असते.ते अतिआवश्यक सेवेतच मोडते.वेळेचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येक माणसांनी वागले पाहिजे.वेळ निघून गेल्यावर हात जोडून पाया पडले तरी त्यांची भरपाई होऊ शकत नाही.
जगात भीती पेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी कोणतीच लस जगाच्या प्रयोग शाळेत तयार झाली नाही.प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी, खुप असेल तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील डाग कोणी सत्य सांगणार नाही.त्यासाठी आरसाचं लागतो.तो जे आहे तेच आपल्या चेह-यावरील "डाग" दाखवतो. त्यावेळी राग येवून आपण आरसा नाही फोडला पाहिजे.तर चेहऱ्यावरील तो डाग साफ केला पाहिजे.अहंकारी लोक नेहमी सत्य दाखविणार आरसाच बदली करतात.स्वतच्या चेहऱ्यावरील डाग,आणि आचरणातील नकारत्मक विचार घालवत नाही.म्हणूनच ते कायम दुखी दिसतात.इतरांना हसत चेहऱ्याने पाहिले की त्यांना त्याचे दुखाच वाटते.
प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी असलेले लोक देवाला खूप घाबरतात.ते मंदिरात कायम देव शोधात असतात.मंदिरात दान दक्षिणा सढळ हस्ते देत असतात. दु:खी गरजू माणसांत त्यांना कधीच देव दिसत नाही. देव हा शब्द आहे,जो तुम्हाला पुस्तकात मिळेल.देव मूर्ती आहे,जी तुम्हाला मंदिरात मिळेल.देव माणूस आहे,जो तुम्हाला समाजात मिळेल.पण देव जीवनात आहे,तो तुमच्या आत मिळेल.निसर्गाने खूप काही चमत्कारी बनवून ठेवले त्याचा लाभ घेता आला पाहिजे.निसर्गाने हवेची निर्मिती केली.म्हणूनच हवेची पण गंमत पहांना,चाकातून गेली की,चाक पळत नाही. डोक्यात गेली की,चांगल-वाईट कळत नाही. आणि शरीरातून श्वासोच्छवास सोडून गेली की,घरात कोणी चार तासापेक्षा जास्त ठेवत नाही.त्यावेळी तुमच्या प्राॅपर्टी,पैसा,समृद् धीला काहीच किंमत राहत नाही.म्हणूनच आरोग्याची योग्य वेळी काळजी घ्यावी कारण तेच सर्वात मोठे धन आहे.
माणसांनी माणसांना धीर देण अतिआवश्यक सेवेतच मोडते. सकारत्मक विचाराने कायम वागले पाहिजे.नकारत्मक विचाराने वागल्यास कायम नुकसान होते.माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो,म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते. आणि स्वतःच जळते.परंतु,आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे.मग आपण का लहानसहान गोष्टीने नकारत्मक विचाराने पेटून उठतो.सकारत्मक विचाराने शांत रहा.निरोगी व स्वस्थ रहा.घर्षण करून पेटविणाऱ्यां पासून सावध रहा.आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही.जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा.इतरांना जगवा त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर ही आपले नांव निघेल.त्यालाच लोक कुशल कर्म,कुशल पुण्य आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारी व्यक्ती म्हणून नोंद घेतली जाते.त्यासाठी सर्वात मोठे धन सांबाळून ठेवा.आणि इतरांना ही सांबाळून ठेवण्यास सांगा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा